Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाणीदार विद्यापीठासाठी ‘वॉटर मॅपिंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॅम्पसमध्ये विहिरी, तलाव आणि बारव सुस्थितीत असूनही नियोजन नसल्याने पाणी टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे 'वॉटर मॅपिंग' करण्याची सूचना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केली आहे. त्यानुसार विद्यापीठ परिसरात डोंगरांच्या पायथ्याशी पाचशे झाडे लावून 'पाणी अडवा, पाणी जिरवा' प्रयोग राबविण्यात येणार आहे.

मराठवाड्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असून शैक्षणिक संस्थांनाही पाणी टंचाईचा फटका बसला आहे. विद्यापीठात वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सातत्याने पाण्यासाठी आंदोलने करावी लागली. दूषित पाण्यामुळे १६४ विद्यार्थिनी आजारी पडल्या होत्या. मुख्य प्रशासकीय इमारत, सामाजिकशास्त्रे विभाग, ग्रंथालय, अभ्यासिका, राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवन इमारतीत सतत पाणी टंचाई असते. नुकताच कार्यभार स्वीकारलेले कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी टंचाईचा आढावा घेतला. केमिकल टेक्नॉलॉजी विभागात कार्यरत असताना तलाव खोलीकरणातून पाणीसाठा वाढवण्यावर शिंदे यांच्यासह सहकारी प्राध्यापकांनी भर दिला होता. या कामाची आठवण ठेवत शिंदे यांनी विद्यापीठात पाणी अडवण्याचे व वितरणाचे नियोजन नसल्यामुळे पाणी टंचाई वाढल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठाचे 'वॉटर मॅपिंग' केल्यास पाणी अडवण्यासाठी मार्ग लक्षात येईल, असा प्रस्ताव शिंदे यांनी चर्चेत मांडला. त्यानुसार लवकरच 'वॉटर मॅपिंग' होणे अपेक्षित आहे. गोगाबाबा टेकडी, हनुमान टेकडी आणि डोंगररांगातून वाहणारे पाणी अडवण्याचे नियोजन करण्यावर चर्चा झाली. गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी जुलै महिन्यात तीन फूट उंचीची ५०० झाडे लावली जाणार आहेत. योग्य लागवड करण्यासाठी खड्डे खोदले जाणार आहेत. पाण्याचा ताण सहन करण्यासाठी मोठी रोपे लावण्यावर भर दिला आहे. तसेच तलाव, विहिरी आणि बारवांचे पुनर्भरण करण्यासाठी उपाययोजना हाती घेतली जाणार आहे.

\B'पाणीदार' विद्यापीठाचा प्रयोग

\Bडॉ. देवानंद शिंदे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रूजू झाल्यानंतर त्यांनी 'पाणीदार विद्यापीठ' प्रयोग यशस्वी केला. त्यात तब्बल ८५५ एकर क्षेत्र असलेल्या विद्यापीठात ३० कोटी लिटर पाणी अडवणे शक्य झाले. आता बारमाही पाणी उपलब्ध झाले असून पाण्यासाठी दरमहा होणारा नऊ लाख रुपये खर्च वाचला आहे. या प्रयोगाची दखल घेत देशभरातील जलज्ज्ञांनी विद्यापीठाला भेट दिली. विद्यापीठातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी 'आरओ'चे मुबलक पाणी उपलब्ध झाले. झाडे आणि फळबागांना पाणी मिळाल्यामुळे जैवविविधता वाढली आहे. या धर्तीवर 'बामू'त प्रयोग झाल्यास पाणीप्रश्न सुटेल, असा शिंदे यांचा विचार आहे.

कर्मचारी, विद्यार्थी आणि लोकांना प्रोत्साहन दिल्यास लोकसहभाग वाढतो. त्यातून प्रयोग सहजपणे यशस्वी होतो. विद्यापीठात भरपूर विहिरी व तलाव असल्यामुळे पाणी टंचाई दूर करणे शक्य आहे.

डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वर्गमित्रांनी सुरू केली वृक्षारोपण मोहीम

$
0
0

वर्गमित्रांनी सुरू केली वृक्षारोपण मोहिम

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वनक्षेत्र कमी झाल्याचा परिणाम मराठवाड्यावर कमी पाऊस पडून होत आहे. सरकारसह विविध सामाजिक, सेवाभावी संस्था वृक्षारोपणासाठी पुढाकार घेत आहेत. सरस्वती भुवन प्रशालेच्या १९८९च्या दहावीच्या वर्गमित्रांनी वृक्षारोपणाचा निश्चय करून त्याची रविवारी त्याची सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात शंभर झाडे लावून वृक्षारोपण मोहिमेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

पराग बाहेती यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पैठण रस्त्यावर गोविंदबाग हे फार्म असलेल्या रमेश सौंदनकर यांनी जागा उपलब्ध करून दिली. वन विभागाकडून झाडे प्राप्त झाली. रविवारी पहिल्या टप्प्यात उपक्रम राबविण्याचे ठरले आणि सकाळच्या टप्प्यात मित्रांनी एकत्र येऊन वृक्षारोपण केले. बाहेती यांनी प्रोत्साहन म्हणून सर्व मित्रांसाठी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून सांगणारा संदेश देणारे टी शर्ट तयार केले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात सातत्याने हा उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला. या मोहिमेत शैलेश पत्की, योगेश लोंढे, डॉ. संदीप मुळे, ब्रिजेश श्रीमाळी, संदीप पाठक, मनीष पाडळकर, अजय काळे, पुरुषोत्तम वर्मा, मुकुंद येवतेकर, महेश फडणीस, सुहास देशपांडे, प्रशांत नानकर, शांतीलाल पटेल, योगेश जहागीरदार, विजयराज शिनगारे आदींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून गजबजणार शाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दीड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर शाळा सोमवारपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. प्रथम शाळेत प्रवेश करणाऱ्या चिमुकल्यांसह सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फुल देऊन, तर काही ठिकाणी फेटे बांधून, दिंडी काढून स्वागत केले जाणार आहे.

शालेयस्तरावरील शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. शाळेत सोडून जाणाऱ्या पालकांचा कोणी हात घट्ट धरून ठेवत, कोणाला रडू कोसळणे, असे चित्र पहिल्या दिवशी असते. दीड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर शाळा सुरू होणार असल्याने आपल्या मित्रांना भेटण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांना असते. शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यासाठी शाळांनी विविध उपक्रम राबविण्याची तयारी सुरू केली आहे. खासगीसह जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षण विभागाने उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन सूचना केलेल्या आहेत. शाळांमध्ये साफसफाई करत, नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळा सजविण्यात आलेल्या आहेत. पहिल्या दिवशी गुलाबपुष्प देत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सरकारी शाळांमध्ये 'प्रवेश पंधरवडा' उपक्रम राबविला जाणार आहे. त्यात शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळी प्रवेश दिंडी, गावात दवंडी देणे, घोषवाक्य लिहणे, नवीन विद्यार्थ्यांची बैलगाडी, वाहनातून मिरवणूक काढणे, प्रवेशपात्र व गळती झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावाची यादी ग्राम पंचायत व महत्त्वाच्या ठिकाणी लावणे, पाठ्यपुस्तकांचे वाटप करून पुस्तकदिन साजरा करत पहिला दिवस साजरा करायचा आहे.

\B७२ लाख पुस्तकांचे वितरण\B

पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांची वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुस्तकांची रक्कम थेट विद्यार्थ्यांना मिळणार अशाही चर्चा होत्या. मात्र, या प्रक्रियेला मूर्त रूप येवू शकले नाही. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक असावे यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करण्यात आले. औरंगाबाद विभागातील पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारगृहातून ३० मेपर्यंत विविध जिल्हा, तालुकास्तरावर विद्यार्थी संख्येच्या तुलनेत पुस्तकांचे वितरण करण्यात आले असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. औरंगाबाद विभागात जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद महापालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ७२ लाख ४३ हजार पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

\Bजिल्ह्यातील शाळा

शासकीय………… ७१

जिल्हा परिषद…… २१७९

महापालिका ७२

नगरपालिका……… १९

खासगी अनुदानित… ८७८

खासगी विनाअनुदानित ३७८

विनाअनुदानित…………… ८६६\B

\Bजिल्ह्यातील एकूण शाळा संख्या ४४६३

जिल्ह्यातील पुस्तकांचे वितरण १९ लाख ४७ हजार ९७०\B

मोफत पाठ्यपुस्तके पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती देण्यासाठी यंदा विशेष प्रयत्न करण्यात आले. वितरणाची प्रक्रिया आम्ही ३० मे पर्यंत पूर्ण केले. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळतील.

-भागवत पुरी, विभागीय भांडार व्यवस्थापक, पाठ्यपुस्तक मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’चे वरातीमागून घोडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना, 'आरटीई' अंतर्गत मोफत प्रवेशासाठी दुसरी फेरीची सोडत काढण्यात आली. फेरी लांबल्यामुळे पालकांनी दुसरीकडे प्रवेश निश्चित केले आहे. परिणामी, पात्र ठरूनही अनेकांना प्रवेश संधीला मुकावे लागणार आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत प्रवेश घेणे अनिवार्य आहे.

मोफत प्रवेशाची प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेतील पहिली सोडत होण्यास आठ एप्रिल उजाडला. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश, मुदतवाढ, अर्जातील त्रुटी दुरुस्तीच्या नावाखाली शिक्षण विभागाने वेळ घालविला. राज्यात २०१९-२० शैक्षणिक वर्षातील शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. शाळा सुरू होण्यास काही तासांचा अवधी असताना दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी पात्र पालकांना शनिवार रात्रीपासून मॅसेज येत होते. यंदा प्रवेश प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले आहेत. प्रवेशाची सोडत राज्यस्तरावर करण्यात आली. त्यासह कागदपत्र पडताळणी समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडून कागदपत्र तपासणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पालकांना थेट शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीत पात्र ठरलेल्या पालकांना प्रवेश निश्चितीसाठी दहा दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे. पालकांना २७ जूनपर्यंत शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे.

\Bपालकांचे आर्थिक नुकसान, वेळही खर्ची\B

प्रवेशाची प्रक्रिया लांबल्याने पालकांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च झाला आहे. फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत पाच महिन्यात प्रक्रियेत राज्यभरात केवळ एकच फेरी पूर्ण होऊ शकली. शाळा सुरू होत असल्याने अन् शिक्षण विभागाकडून विलंब होत असल्याने पालकांनी 'आरटीई'चा प्रवेश जाईल आणि दुसरीकडेही प्रवेश मिळणार नाही, या भीती पोटी शाळांमध्ये प्रवेश निश्चित केले. संबंधित शाळांच्या शुल्कापैकी काही रक्कम जमा करत प्रवेश निश्चित केले. त्यात शाळा सुरू होण्यास काही तास अवधी असताना फेरीत पात्र ठरलेल्यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामुळे ज्या पालकांनी दुसरीकडे प्रवेश निश्चित केले त्यांचा वेळेसोबत पैसाही खर्च झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दुसऱ्या फेरीत १८९० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पहिल्या फेरीत पाच हजार ५४५ प्रवेश क्षमतेपैकी केवळ दोन हजार ५०३ जागांवर प्रवेश निश्चित झाले.

\Bपहिल्या फेरीत पात्र ५७२९

प्रत्यक्ष प्रवेश २५०३

दुसऱ्या फेरीसाठी पात्र विद्यार्थी...१८९०

शाळा..५८६

प्रवेश...५५४५

एकूण अर्ज १४३७३\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संसदेत खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली मराठी भाषेत शपथ

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

लोकसभेच्या विशेष सत्रात नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. या शपथविधी सोहळ्यात औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी खासदारकी आणि गोपनियतेची शपथ मराठी भाषेत घेतली.

१७ वी लोकसभेच्या अधिवेशनाला सोमवारी (१७ जुन) प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी नवीन खासदारांचा शपथ विधी कार्यक्रम घेण्यात आला. या शपथ विधी कार्यक्रमात विविध राज्यातून निवडून आलेल्या खासदारांनी त्यांच्या भाषेत शपथ घेतली. भाजपाच्या अनेक खासदारांनी संस्कृत आणि हिंदी भाषेत शपथ घेतली. मराठवाडयातील अनेक खासदारांनी मराठी भाषेत शपथ घेतली.

२० वर्षांपासून शिवसेना पक्षाकडे औरंगाबाद जिल्हा होता. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून एमआयएम पक्षातून निवडून आलेले औरंगाबाद जिल्हयाचे खासदार इम्तियाज जलील यांनीही मराठी भाषेत शपथ घेऊन आपल्या संसदीय कार्याची सुरुवात केली.

'विधानसभा २०१४ ला औरंगाबाद मध्यमधून निवडून गेल्यानंतर विधानसभेत मराठी भाषेत शपथ घेतली होती. आता दिल्लीत औरंगाबाद जिल्हयातून निवडून आलो आहे. राज्यभाषा मराठी आहे. यामुळे संसदेत मराठी भाषेत शपथ घेतली', असं जलील म्हणाले. मराठी भाषेत शपथ घेतल्याबाबत त्यांनी अभिमान असल्याचेही सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस असा रुणझुणला...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या चार दिवसांपासून गायब झालेल्या तुरळक पावसाने सोमवारी शहराला चिंब केले. संध्याकाळी सुरू झालेला पाऊस शहरातील बहुतांश भागात बरसला. रात्री साडेआठ वाजेपर्यंत ४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

गेल्या तीन चार दिवसांपासून प्रचंड उकाड्याने शहरातील नागरिक हैराण होते. पावसाचे वातावरण निर्माण होत असले तरी, प्रत्यक्षात पाऊस हुलकावणी देत होता. आज झालेल्या पावसाने वातावरण आल्हाददायक झाले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सिडको, हडको, औरंगपुरा, निराला बाजार, क्रांतीचौक, चिकलठाणा, मुकुंदवाडी, सातारा परिसर, गारखेडा परिसरासह जुने शहर तसेच परिसरात पाऊस झाला. शहरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला असला तरी, या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. या पावसामुळे सलीम अली सरोवरासमोर तसेच गणेश कॉलनी, औषधी भवन येथील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची अडचण झाली .

\Bआठवड्याअखेर बरसणार

\Bहवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरात आठवड्याअखेर शनिवारी (२२ जून) शहरात पावसाचा अंदाज आहे. येणारे चार दिवस मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे. जून महिन्यात गेल्या काही दिवसांपासून शहरात किमान तापमानामध्येही घट झाली असल्यामुळे पावसाचे वातावरण तयार होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात मान्सूनचे आगमन होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टापरगावची शाळा ग्रामपंयाचतीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

औरंगाबाद-धुळे महामार्गाच्या रुंदीकरणात शाळेच्या वर्गखोल्या पाडल्या गेल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दफ्तर दिरंगाईमुळे पहिली ते सातवीचे वर्ग ग्रामपंचायत कार्यालयात भरविण्याची नामुष्की शिक्षण विभागावर प्रवेशोत्सवाच्या पाहिल्याच दिवशी आली आहे.

शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशोत्सवाचा पहिलाच दिवशी, पडक्या शाळेतून विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयात नेण्यात आले. 'पाच बाय सात'च्या खोल्यामध्ये ८५ विद्यार्थी दाटीवाटीने बसविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी शाळेअभावी हिरमुसल्याने प्रवेशोत्सवावर विरजण पडले. यावेळी तीन शिक्षक अध्यापन व प्रवेशोत्सवाचे काम करत होते. शाळेची इमारत नाहीच, शिक्षकांची मंजूर पदे कमी केलेली, काही शिक्षक प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आलेले, यातच सात वर्गाचे ८५ विद्यार्थी कसे शिकतील असा प्रश्न आहे. यामुळे पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाच्या प्रवेशोत्सवाचा फज्जा उडाला आहे.

धुळे -सोलापूर महामार्गाचे भांबरवाडी ते करोडी यादरम्यान रुंदीकरणाचे काम निम्म्यापेक्षाही जास्त प्रमाणात झाले आहे. यामध्ये टापरगाव जिल्हा परिषद शाळेची भरपाई सुमारे ६३ लाख रुपये दीड वर्षापूर्वी शिक्षण विभागाकडे जमा आहे. महामार्ग प्राधिकरण भरपाई दिल्यामुळे वर्गखोल्यांचा बहुतांश भाग पाडण्यात आलेला आहे. टापरगाव ग्रामपंचायतीकडे गावठाणातील जागा उपलब्ध नसल्याने व गावालगत दोन ठिकाणी आवश्यक तेवढी खासगी जागा ग्रामपंचायतने उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे धूळ खात पडून आहे. या विभागाच्या दिरंगाईने व वेळकाढू पणामुळे शाळेच्या जागेचा व नवीन वर्गखोल्यांचा प्रश्न अंधातरी राहिल्याने ही वेळ ओढावली आहे. ग्रामपंचायतच्या तीन खोल्या ताब्यात घेऊन शालेय वर्ग भरविण्यात आल्याचे गट शिक्षणाधिरी हुमेरा सिद्दिकी यांनी या विषयी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांची उंटावरून मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

उन्हाळी सुटी संपली असून, सोमवारी शाळेची घंटा वाजताच शाळेत किलबिलाट सुरू झाला. यामुळे दीड महिन्याच्या सुटीनंतर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १०५ आणि खासगी शाळेचा परिसर पुन्हा गजबजून गेला.

शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढणार आहे. नवीन आशा-आकांक्षा समोर ठेवत सुटीनंतर आता विद्यार्थी नवीन इयत्तेत प्रवेश केला आहे. उन्हाळ्याच्या सुटीनंतर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये 'थोडी खुशी थोडा गम' असे वातावरण अनुभवायला मिळाले आहे. उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांसमवेत शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शाळांतर्फे विद्यार्थ्यांना फुले, मिठाईचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत प्रसन्न वाटावे, यादृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे फूल देऊन स्वागत करण्यात आले.

शाळांना आजपासून प्रारंभ होणार असला तरी, रविवारी शाळा खुल्या असल्याचे दिसून आले. शाळेची स्वच्छता,च लेखी नोंदी, विद्यार्थ्यांच्या स्वागताचे आयोजन यासाठी शिक्षक रविवारी शाळेत दाखल झाले होते. दीड महिन्यापासून बंद असलेल्या शाळेची स्वच्छता; तसेच शैक्षणिक साहित्याची दुरुस्ती करून शाळा विद्यार्थ्यांच्या आगमनासाठी सज्ज झाल्या असल्याचे दिसून आले.

खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शालेय पोषण आहार पुरविण्याचे काम करणाऱ्या मुदिता बचतगटातर्फे शाळेच्या पहिल्या दिवशी मिठाई म्हणून सोनपापडी वाटप करण्यात आली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलीभंजन येथे शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांची उंटावरून मिरवणूक काढून गावात प्रभातफेरी काढण्यात आली. सर्व नवीन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पुस्तक, मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच इलियास सय्यद, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा मनीषा डोंबल, ग्रामपंचायत सदस्य सदस्य नितिन जाधव, माजी सरपंच द्वारकादास घोडके, उपाध्यक्ष गणेश जंगले, सुभाष घुसळे, भिकन शहा, ज्योती घुसळे, रेखा घुसळे, मुख्याध्यापक एस. पी. पवार, बि. डी. जाधव, हेमकांत सुतार, राजेश्वर आराक, उदय वरकड, विनोद जाधव ग्रामस्थ व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिकलठाण्यातले कचरा प्रक्रिया केंद्र सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा कचरा प्रक्रिया केंद्राची यशस्वी चाचणी यशस्वी झाली असून, हे केंद्र अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू नाही. या केंद्रावर फक्त रोजच्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य असून, केंद्रावर साठलेल्या दोन हजार टन कचऱ्याचे करणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चिकलठाणा प्रक्रिया केंद्रावर कचरा टाकण्यास शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला होता. त्यामुळे रविवारी शहरात घरोघरी कचरा संकलनही बंद होते. अखेर सोमवारी या केंद्रावर प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर सोमवारी शहरातील कचरा संकलनाचे कामही सुरू झाल्याची माहिती घनकचरा विभागाकडून देण्यात आली. दीड वर्षे होत आले तरी प्रकल्पाच्या ठिकाणी केवळ कचरा टाकला जात आहे. अजून एकही प्रक्रिया केंद्र सुरू झाले नाही. चिकलठाणा प्रकल्पाची पाच जूनला चाचणी घेण्यात आली. मात्र, ते पूर्णपणे सुरू होऊ शकले नाही. पुन्हा नव्याने सध्या चाचणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कचऱ्यापासून खत करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येते. सध्या दीडशे टन कचऱ्यावर केंद्रात प्रक्रिया होणार आहे. जुन्या कचऱ्याचे काय करायचे याबाबत पालिकेकडे उपाययोजना नाहीत. पावसाळ्यात केंद्रावरील कचऱ्यातून निघणाऱ्या घाण पाण्यामुळे विहिरींचे पाणी दूषित होईल, अशी भीती गावकरी, शेतकऱ्यांना आहे. अखेर महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी यासंबधी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे आणि विजय पाटील यांचे अभिनंदनही केल. शेतकऱ्यांचा विरोध मावळल्यानंतर, प्रक्रिया केंद्र सुरू झाल्याने घरोघरी कचरा संकलनाचे काम सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ किलो गांजा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भरधाव वेगात कसाबखेडा फाटा ते देवगाव रस्त्यावर ग्रामीण वाहतूक पोलिसांनी एका कारच्या काचेला लावलेल्या काळ्या फिल्मच्या कारवाईसाठी अडविले. कार चालकाच्या संशयित वागण्यामुळे गाडीची तपासणी केली असता, या कारमधून १८ किलो ओल्या नमसर गांजाची पाकिटांची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला.

याप्रकरणी ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी सकाळी नऊपासून जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी पोलिस नाईक बळीराम जाधव व तात्यासाहेब विष्णू बेदरे हे कसाबखेडा फाटा ते देवगाव जाणाऱ्या रस्त्यावर फाट्याजवळ तैनात होते. दुपारी १२च्या सुमारास एका पांढऱ्या रंगाची तवेरा कार (एमएच २१ व्ही ०९४५) अतिशय वेगाने जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून पाठलाग करून ही गाडी थांबविली. या गाडीच्या काचेवर काळी फिल्म असल्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांनी चालकाला पकडले होते.

वाहतूक पोलिसांनी गाडी अडविल्यानंतर दंडाची शुल्क घ्या आणि लवकर सोडण्याची मागणी कार चालकांने केली. कार चालक शहारूख अजगर खाान (२२, रा. हर्सूल) याची हालचाल संशयास्पद वाटली. पोलिसांनी गाडीची तपासणी करण्याचे सांगताच कार चालकाची भांबेरी उडाली. वाहतूक पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता या गाडीच्या मागील जागेवर नऊ पाकिटांमध्ये नमसर गांजा होता. एका पाकिटामध्ये दोन किलो गांजा चोरून नेत असल्याचे समोर आले. वाहतूक पोलिसांनी शिल्लेगाव पोलिस ठाण्याला या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी शहारूख अजगर खान याच्यावर 'एनडीपीएस' कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याच्या जवळून पाच लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांचा पालिकेवर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्ते, पाणी, ड्रेनेजसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी करत पहाडसिंगपुरा येथील नागरिकांनी सोमवारी पालिका प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला.

अमोदी हिल्स, स्वप्नपूर्ती कॉलनीमधील रहिवाशांनी साखळी उपोषण केले. या वेळी पालिका प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सभापती जयश्री कुलकर्णी यांनी पंधरा दिवसांत काम सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'मागील अकरा वर्षांपासून वॉर्ड क्रमांक-बारा पहाडसिंगपुरा येथील या परिसरामध्ये राहत आहोत. 'एनए-४४' ले-आऊटची घरे खरेदी केली आहेत. त्यानंतर रस्ते, पाणी, ड्रेनेज अशा कोणत्याच पायाभूत सुविधा येथे पुरविण्यात आलेली नाही. पालिका हद्दीत असतानाही अकरा वर्षांपासून पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. पाच दिवसांपुर्वी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही प्रशासनाने कुठलीच हालचाल केली नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरावे लागले.' यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चा महिला प्रदेश सहप्रमुख छाया भोसले, प्राजक्ता आठवले, अलका हिवराळे, प्रज्ञा घाडीगावकर, करुणा गोले, नंदा सुर्वे, विजया सुखदेवे, दीपक नागावडे, अन्नपूर्णा कामे, रवींद्र शेजवळ, विजय आगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे सोमवारी स्वागत करून पहिल्या वर्गात प्रवेश देण्यात आला. तालुक्यातील मोफत पुस्तके वाटप योजनेत पहिली ते आठवी या वर्गांतील विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या १९१ शाळा असून, ३३ खाजगी शाळा आहेत. या शाळांतन २२ हजार ३५८ विद्यार्थी शिक्षण घेत असून, पहिल्याच दिवशी तालुक्यातील सर्व पात्र शाळेत २० हजार ७३६ मुलांना पुस्तके वाटप करण्यात आले.

तालुक्यात शिक्षण विभागातर्फे सोमवारी पहीलीच्या वर्गात प्रथमच प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. अनेक शाळांमध्ये रांगोळ्या काढून, फुले टाकून पहिल्या वर्गाचे प्रवेशद्वार सजविण्यात आले होते. फुले, फुगे, रंगीबेरंगी स्टिकर लावून वर्ग सजविण्यात आले होते.

शिक्षण विभागाने दोन ठिकाणी मुख्य प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजित केले होते. पहिला कार्यक्रम जालना जिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने समाविष्ट झालेल्या तळेगाव येथे झाला. शिक्षण अधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांच्या उपस्थित पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पूष्प देऊन स्वागत करण्यात आले. दुसरा कार्यक्रम आयएसओ मानांकन प्राप्त केलेल्या जिल्हा परिषद शाळा जळगाव मेटे येथे करण्यात आला. तेथे ढोल, ताशा व लेझीमच्या पथकाने पहिलीतील विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी अशोक पाटील यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पुस्तके देण्यात आली. यावेळी येथील सजावट पाहून विद्यार्थी आनंदी दिसत होते. शिक्षणाधिकारी अशोक पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन, केंद्रप्रमुख कव्हळे, श्रावणी हिंगमीरे, कल्याणी पवार, यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

शाळेतील शिक्षक कर्तव्यात कसूर करत आहेत, असा आरोप करत या शिक्षकांच्या बदलीसाठी ममनापूर येथील ग्रामस्थांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकल्याने खळबळ उडाली.

ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळेतील शिक्षक आक्षेपार्ह वर्तन करत आहेत. हे शिक्षक शाळेत बदलून आल्यापासून विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यास देत नाहीत. वर्गामध्ये शिकवत असताना पाठ्यपुस्तक समजावून सांगत नाही. वाचून दाखवतात. गृहपाठ व्यवस्थित तपासला जात नाही. दुपारी तीननंतर विद्यार्थ्यांना मैदानावर सोडले जाते. अशावेळी शिक्षक विद्यार्थ्यांसोबत नसतात. शाळेच्या मध्यवती सुटीची वेळ पाळली जात नाही. शिक्षक शाळेत उशिरा येतात. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडे; शाळेकडे फार दुर्लक्ष होत आहे. सर्व मुद्दे शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले होते. शैक्षणिक वर्षात काही सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र काहीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे जोपर्यंत या शिक्षकांच्या बदल्या करण्यात येत नाहीत तोपर्यंत शाळेला कुलूप ठोकण्यात येईल.

ममनापूर येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकल्याची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती अर्चना अंभोरे, गटशिक्षणाधिकारी विलास केवट, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी भोसले यांनी ममनापूर शाळेला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करून दोन शिक्षकांची बदली झाल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी शाळेचे कुलूप उघडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बबल्याचा कोर्टात पुन्हा राडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील प्लंबर शेख जब्बार शेख गफ्फारच्या खून खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू असून, खून खटल्यातील आरोपी म्होरक्या शेख वाजेद उर्फ बबला शेख असद याने सोमवारी (१७ जून) दुपारी पुन्हा एकदा न्यायालयात गोंधळ घालून पोलिसांना शिविगाळ; तसेच धक्काबुकी केल्याची घटना घडली. बबलाने यापूर्वी न्यायालयात महिला साक्षीदारास धमकी देत मारहाण केली होती.

मृत प्लंबर शेख जब्बार शेख गफ्फार याला प्लॉटिंगच्या कारणावरुन मारहण करुन त्याचे अपहरण करण्यात आले होते. याच प्लंबरचा खून करुन त्याच्या पोटातील अवयव काढून त्यात दगड भरले आणि तो मृतदेह मोमबत्ता तलावाजवळील विहिरीत टाकण्यात आला होता. प्रकरणातील आरोपी म्होरक्या शेख वाजेद उर्फ बबला शेख असद याच्यासह आठजण अटकेत असून, हे सर्व सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर सुरू असून, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी १७ जणांची साक्ष नोंदवली आहे. याच प्रकरणात सोमवारी साक्ष घेण्यात येणार असल्यामुळे हर्सूल कारागृहातून शेख वाजेद उर्फ बबलासह आठ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. खटल्यातील साक्ष पूर्ण झाल्यानंतर बबला याला दुपारी जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली नेताना बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना बबलाने अचानक शिविगाळ करीत धक्काबुकी केली. या प्रकारामुळे न्यायालयात एकाएकी गोंधळ उडाला, पण काही वेळेत परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकाराने न्यायालय परिसरात काहीसे भीतीचे वातावरणही निर्माण झाले होते. आरोपी थेट कोर्ट परिसरात गोंधळ घालत असतानाही बंदोबस्तासाठी पुरेसा फौजफाटा का नाही ठेवला जात, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

\Bबंदोबस्त काढला अचानक

\Bयाच प्रकरणात बबलाने मागे महिला साक्षीदारास धक्काबुकी केल्यानंतर न्यायालयाने बबलाच्या सुनावणीच्या वेळेस पुरेसा पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा, असे पत्रच पोलिस आयुक्तांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी चारवेळा झालेल्या सुनावणीच्या वेळेस पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता, परंतु पोलिसांनी कोणतीही पूर्व सूचना न देता पोलिस बंदोबस्त अचानक काढून घेण्यात आला. त्यामुळेच बबलाने संधी साधत कोर्टात राडा करुन माफीच्या साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा न्यायालय परिसरात सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कॉलेजांमध्ये प्रवेशाचा पहिल्याच दिवशी पेच निर्माण झाला. अनेक कॉलेजांनी सोमवारी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली. मात्र, निकाल व गुणपत्रिका नसल्याने प्रवेश कसा घ्यायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला. २१ जूनपर्यंत कॉलेजांना प्रवेशपूर्व परीक्षा पूर्ण करावयाची आहे.

मागील वर्षी एकत्रित प्रवेशपूर्व परीक्षा घेणाऱ्या विद्यापीठाने यंदा कॉलेजांनाच अधिकार दिले आहेत. कॉलेज व्यवस्थापनांनी पूर्वीप्रमाणे त्यांच्या स्तरावर प्रवेश द्यायचे असून त्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेणे बंधनकारक केले. यंदा त्याचे वेळापत्रक कॉलेजांना निश्चित करून देण्यात आले. पहिल्याच दिवशी (१७ जून) प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, त्यात ऐनवेळी बदल करून २१ जूनपर्यंत प्रवेशपूर्व परीक्षा घ्यायची आहे. सोमवारी अनेक कॉलेजांनी प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन केले होते. प्रवेशपूर्व परीक्षेसाठी काही कॉलेजांनी शूल्क आकारले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसल्याची चर्चा आहे.

प्रारंभी विद्यापीठाने एकाच दिवशी परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, एकाच दिवशी परीक्षा घेतल्यास बैठक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे नवीन परिपत्रक काढले असून प्रवेशपूर्व परीक्षेसाठी कॉलेजांना पाच दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यासाठी कॉलेजांनी आपापसात समन्वय साधावा असे विद्यापीठाकडून सांगण्यात आल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

\Bनिकाल, गुणपत्रिकाच नाही\B

परीक्षा होऊन ४५ दिवसांचा कालावधी उलटून गेला असून अद्याप पदवी अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झालेले नाहीत. उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. निकालानंतर गुणपत्रिका केव्हा मिळणार आणि प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

\Bविद्यापीठातंर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम कॉलेज...१५२

विविध अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता............६२०००\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रमाणपत्रांसाठी ‘सेतू’मध्ये विद्यार्थ्यांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उच्च माध्यमिक आणि शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावी आणि दहावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी लागणारे प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थी-पालकांची तोबा गर्दी होत आहे. या केंद्रात विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी दररोज सुमारे एक हजार अर्ज करण्यात येत असून, दररोज पाचशे ते सहाशे प्रमाणपत्रांचे वितरण केले जात आहे. सोमवारी (१७ जून) सेतू सुविधा केंद्रामध्ये तुफान गर्दी झाली होती.

इयत्ता दहावीचा निकाल आठ जून आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहीर झाल्यानंतर प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी वाढली. दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेशाची लगबग सुरु झाली असून यासाठी रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाच्या प्रमाणपत्राची विद्यार्थ्यांना आवश्यकता असते, यासाठी रहिवासी, उत्पन्न, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, एसईबीसी, राष्ट्रीयत्व आदी प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी गर्दी होत आहे. विद्यार्थ्यांना शक्यतो त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र अदा केले जात असल्याचे सेतू प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दैनंदिन विविध प्रकारचे पाचशे ते सहाशे प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येत असल्याचे नायब तहसीलदार एस. जी. पटवारी यांनी दिली. शहराच्या विविध भागात शासनाच्या सुविधा केंद्रातही अशा प्रकारचे प्रमाणपत्र वितरीत केले जात आहेत.

\Bआर्थिक दुर्बल घटकासाठी दररोज ६० अर्ज\B

सरकारने मराठा समाजासाठी एसईबीसी लागू केल्यानंतर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्रही सेतू सुविधा केंद्रामधून वितरीत करण्यात येत असून दररोज यासाठी ५० ते ६० अर्ज येत असल्याची माहिती सेतू प्रशासनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदीर्घ सुटीनंतर विद्यार्थ्यांचे स्वागत, शाळांना सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवा गणवेश, नवे दप्तर स्वागताला प्रवेशद्वारावर फुल घेऊन उभे असलेले शिक्षक, कोठे फुलांच्या वर्षावात प्रवेश, तर कोठे 'रेन डान्स'चा जल्लोष अशा उत्साही वातावरणांत सोमवारी शाळा गजबजल्या. शाळेचा पहिला दिवस, कोणाला रडू कोसळले, कोणी पालकांना सोडून जाऊ नका, असे विनवत होते, तर कोणी उत्साहात. असे, निरागस, निष्पाप चेहरे शाळेत दाखल झाले.

प्रदीर्घ उन्हाळी सुटीनंतर सोमवारपासून शाळा, शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. प्रथम शाळेत प्रवेश करणाऱ्या चिमुकले अन् पुढच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षण करून, गुलाबाचे फुल देऊन, तर काही ठिकाणी फुगे, फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सुटीत खेळणे, मस्ती अन् परगावी केलेली धमाल मित्रांना सांगण्यात विद्यार्थी रमले. अलमीर सेकंडरी स्कूलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबाचे पुष्प देत स्वागत करण्यात आले. गोदावरी हायस्कूलमध्ये डोरमॅन, मिकी माऊसने विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

\B'रेन डान्स'ही अनुभवला\B

अनेक शाळांमध्ये चिमुकल्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. मुकुल मंदिरमध्ये आकर्षण होते पावसात भिजण्याचे. पाऊस गाण्यावर धम्माल करत नाचत 'शाळा घर वाटावी' ही संकल्पना सत्यात उतरवली. एकही मुलगा न रडता आजचा शाळेचा पहिला दिवस अनुभवला. मिठाई, भेटवस्तू देवून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

\Bफुगे उडवित स्वागत\B

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना अनेक शाळांनी नवनवीन उपक्रम राबविले. गुजराती कन्या विद्या मंदिरमध्ये मुलांच्या स्वागतासाठी शाळेसमोर रांगोळी, प्रवेशद्वार फुगे लावून सजविण्यात आले. प्रवेश करताच विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

\Bपालिकेच्या मयूरबन कॉलनीतील शाळेत प्रवेशोत्सव\B

महापालिकेतर्फे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रियदर्शिनी मयूरबन कॉलनी येथे प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात प्रवेशदिंडी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यासह नवीन प्रवेश झालेल्या ५४ बालकांचे औक्षण करून खाऊ वाटप करण्यात आला. पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी सभापती जयश्री कुलकर्णी, नगरसेवक अर्चना निळकंठ, सांस्कृतिक अधिकारी, मुख्याध्यापक संजीव सोनार, शशिकांत ऊबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तेजस्विनी देसले यांनी केले. यावेळी सुरेखा महाजन, बी. आर. राठोड, सुनीता जोशी, मनीषा नगरकर, शोभा पवार आदींची उपस्थिती होती.

\Bजिल्ह्यातील शाळा\B

शासकीय………… ७१

जिल्हा परिषद…… २१७९

महापालिका ७२

नगरपालिका……… १९

खासगी अनुदानित… ८७८

खासगी विनाअनुदानित ३७८

विनाअनुदानित…………… ८६६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गढूळ पाणी घेऊन नागरिक पालिकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतर्फे अनेक ठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होत आहे. बेगमपुऱ्यातील रहिवासी असलेल्या नागरिकाने अनेकदा तक्रार करून ही दखल घेतली जात नसल्याने सोमवारी थेट नळाला आलेले गढूळपाणी घेऊन पालिकेत धाव घेतली.

शहरातील पाणीपुरवठा अद्यापही सुरळीत नाही. अनेक ठिकाणी आठवड्याला एक वेळेस पाणी येते. सोबत पाणीपुरवठ्यात गढूळ पाणी येत असल्याच्याही तक्रारी आहेत. सोमवारी बेगमपुरा भागातील प्रशांत रामावत पालिकेत गढूळ पाण्याची बाटली घेऊन आले. आरोग्य विभागाकडे तक्रार देण्यासाठी आल्याचे सांगत त्यांनी पालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. पाणी पाच दिवसानंतर येते अन् त्यातही गढूळ. त्यामुळे पाणी पिण्यासाठी योग्य नाहीतर वापरासाठी ही योग्य नसल्याचे ते म्हणाले. पाणी शुद्ध येईल यासाठी काहीवेळ पाणी वाया जावू द्यावे लागते व पुन्हा भरावे लागते. आता, पाणीच कमी येत असल्याने आणि पाणी टंचाई असल्याने बाटली घेऊन आल्याचे सांगितले. अशा पाण्यामुळे कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम होईल. त्यामुळे या प्रकरणात तातडीने पालिकेने कार्यवाही करावी, शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीट व सीईटी परीक्षेत ‘आयसीडी’च्या विद्यार्थ्यांना यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नुकत्याच जाहीर झालेल्या नीट व सीईटी परीक्षांच्या निकालात 'आयसीडी'च्या ३७ विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा जास्त गुण संपादन केले. शिवम शिवरकर हा विद्यार्थी क्लासेसमधून प्रथम आला.

'आयसीडी'च्या ऋषिकेश मुंदडा, प्रतीक पालवे, गीतांजली वारंगुळे, सुदीप कोळी, फैजान खान, डिंपल पाटील, प्रतीक शिंदे, जवेरिया शकील अहमद, गौरी पाठक, दर्शन शिंदे, रवींद्र पहाडे, हेमंत मुंदडा यांनी ५०० पेक्षा जास्त गुण मिळवले. गीतांजली वारंगुळे हिने सीईटीत ९९.९९ पर्सेंटाईल घेत राज्यात सर्वप्रथम (सीईबीसी) आली. 'आयसीडी'चे अडीचशेहून अधिक विद्यार्थी 'एमबीबीएस' प्रवेशास पात्र ठरल्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आशिष मिरजगांवकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमासह प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शनाला या यशाचे श्रेय जात असल्याचे चेअरमन डॉ. प्रफुल्ल मिरजगांवकर यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संसदेत जलील यांचा मराठी बाणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावून निवडून आलेले 'एमआयएम'खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी संसदेत मोठ्या बाणेदारपणे मराठीत शपथ घेतली.

लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवीन खासदारांचा शपथ विधी झाला. यावेळी भाजपच्या अनेक खासदारांनी संस्कृत आणि हिंदीसह इंग्रजी भाषेत शपथ घेतली. खासदार इम्तियाज जलील यांचे इंग्रजी, उर्दू आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे, तरीही त्यांनी मराठी भाषेत शपथ घेऊन आपल्या संसदीय कामाची सुरुवात केली. याबाबत 'मटा'शी बोलताना जलील म्हणाले, 'खासदार म्हणून शपथ घेताना देखील माझ्या मनात इतर कुठल्या भाषेचा विचार नव्हता. कारण मी महाराष्ट्रीयन आहे. माझा जन्म या राज्यात झाला. मी लहानचा मोठा झालो. शिक्षणही इथेच घेतले. मुळात माझे महाराष्ट्र आणि इथल्या मातृभाषेवर प्रेम आहे आणि माझ्यासाठी परमोच्च असलेल्या अशा क्षणी मी माझ्या भाषेला कसा विसरेन. मला सगळ्या भाषा येत असल्या तरी मी खासदार पदाची शपथ मराठीत घेतली याचा मला मनस्वी आनंद आणि अभिमानही आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images