Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कामगाराचा मृत्यू; मकबऱ्याला कुलूप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीबी का मकबरा येथील दुरुस्तीचे काम सुरू असताना मजुराचा खाली पडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मंगळवारी संतप्त नातेवाईकांनी कामगाराच्या मुलास नोकरी द्यावी, कुटुंबास आर्थिक मदत करावी या मागणीसाठी मकबऱ्याच्या टाळे ठोकत धरणे आंदोलन केले. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात घेतला.

शहरातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या बीबी का मकबराची दुरुस्ती केली जात आहे. येथे काम करताना तोल जाऊन छोटुलाल जगन पनबिसरे हे सोमवारी खाली पडले. त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. विटखेडा येथील रहिवासी असलेल्या छोटुलाल यांच्या नातेवाईकांनी पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेत कुटुंबाला आर्थिक मदत, त्यांच्या मुलाला नोकरी देण्याची मागणी केली. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी असमर्थता दाखविली. त्यामुळे संतप्त झालेल्या पनबिसरे यांच्या नातेवाईकांनी प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. मकबऱ्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मागण्या मंजूर होईपर्यंत मृत्यदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांनी दिल्ली येथील मुख्यालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'नगर भूमापन' आगीचा अहवाल गुलदस्त्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नगर भूमापनच्या (सीटी सर्व्हे) रेकॉर्ड रूम आग प्रकरणाची आठ दिवसानंतरही चौकशी पूर्ण झाली नाही. ही आग शॉटसर्किटमुळे लागली की महत्त्वाचे रेकॉर्ड जाळण्यासाठी याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमधील भूमी अभिलेख विभागाच्या नगर भूमापन रेकॉर्ड रूमला सहा जून रोजी आग लागली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. या प्रकरणाचा दोन ते चार दिवसांत चौकशी होऊन अहवाल तयार करण्यात येणार होता. मात्र, घटनेच्या आठ दिवसानंतरही ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही बाब स्पष्ट होत नाही. प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून पोलिस योग्य तपास करू शकतील, असा दावा करण्यात येत आहे. पंचनाम्याच्या वेळी असलेले उपजिल्हाधिकारी, आपत्ती विभाग, चौकशी अधिकारी यापैकी कोणीही आग प्रकरणावर बोलायला तयार नाही. आगीचे खरे कारण पुढे यावे, यासाठी महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेतील अभियंत्यांमार्फत तांत्रिक जाणकार म्हणून चौकशी करण्यात आली होती. घटनेच्या दिवशीच त्यांनी चौकशी केली. मात्र, त्यांचा अहवालही गुलदस्त्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशातील पहिले इल्युजन म्युझियम शहरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लबच्या वतीने देशातील पहिले 'इल्युजन म्युझियम' उभारण्यात आले आहे. दोन हजार चौरस फुटातील या संग्रहालयाची संकल्पना 'मामाचा गाव' अशी आहे. यात १४ दालने व दहा दृष्टीभ्रम करणाऱ्या चित्राच्या माध्यमातून वैज्ञानिक रितीने भ्रमाचे विश्व निर्माण करण्यात आले आहे.

एमजीएम संस्थेच्या स्टेडियमशेजारी हे 'इल्युजन म्युझियम' उभारण्यात आले असल्याची माहिती केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर, केंद्र समन्वयक धनश्री कासार-अक्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या केंद्रात १४ विविध प्रयोग ठेवले आहेत. फसवी काठी, तळ नसलेली विहीर, गुरूत्व विरोधी दालन, सत्परंगी सावली दालन, फिरणारे दालन, आभासी मुखवटा, 'मुरी'चे भ्रमित विश्व, भ्रमित तबकड्या, प्रतिरुप दालन, अनंत प्रतिमेचे दालन, तसेच वैश्विक चक्र आदी विविध दालन तयार करण्यात केली आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोन, भौतिकशास्त्राच्या नियमांना आव्हान देणारे प्रयोग तयार केले आहेत. हे प्रयोग सर्वसामान्यांसाठी आकर्षक ठरणार असून संग्रहालयाचे उ‌द्घा‌टन १५ जून रोजी करण्यात आल्याचे औंधकर यांनी सांगितले. हे संग्रहालय संस्थेचे सचिव अंकुशराव कदम यांच्या 'मामाचा गाव' या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना ‘अर्थ’ ना ‘संकल्प’ !

$
0
0

अर्थसंकल्प हा सरकारी जमाखर्चाचा ताळेबंद नसून धोरणाचा दस्तावेज असतो, याचा विसर सरकारला पडला आहे. जिल्हा, जात, विभाग अशी तरतूद म्हणजे भाराभर योजनांचे किराणा दुकान आहे. त्यात ना 'अर्थ' ना 'संकल्प'. सर्व आकडे दिशाभूल करणारे आहेत. राज्याच्या आर्थिक पाहणीतील चित्र चिंताजनक होते. कृषी क्षेत्राची अधोगती झाली असून, आताचे चित्र नकारात्मक व उणे आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नाही. उलट 'जलयुक्त शिवार' योजना यशस्वी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. ही योजना यशस्वी झाली असती आणि एक लाख ६७ हजार शेततळी असती तर, भीषण दुष्काळ जाणवला असता का? यातूनच सरकारने शेती क्षेत्राकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याच स्पष्ट होते. अर्थसंकल्पात जाहीर योजना बांडगुळी आणि अनुदानी असून, उत्पादनक्षम नाहीत. राज्यात रोजगाराची अवस्था वाईट आहे. त्यामुळे फक्त तरतुदी करुन उपयोग नसतो, तर फलश्रुती काय हा खरा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेला अर्थसंकल्प एक जुमला आहे. यात गरीबांना भरपूर आश्वासने, मध्यमवर्गाला दिलासा आणि धनिकांना हात न लावण्याची खेळी आहे.

- प्रा. एच. एम. देसरडा, अर्थतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थसंकल्प प्रतिक्रीया - चव्हाण, बेलखोडे, चिकटगावकर

$
0
0

अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

सभागृहात आज राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याआधीच तो अर्थमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरू प्रसिद्ध करण्यात आला. राज्याच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. या घटनेचा निषेध करत आम्ही सभात्याग करून अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकला. खरे तर अर्थमंत्र्यांनी सभागृहाचा अपमान केला असून, याबद्दल त्यांनी सभागृहाची माफी मागून राजीनामा द्यावा.

- सतीश चव्हाण, आमदार

आरोग्याबाबत मराठवाड्याला डावलले

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले मात्र, यात मराठवाड्याला काहीही नाही. गडचिरोली व जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली मात्र मराठवाड्यातील परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असताना यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय असावे, असा सरकारचा प्रयत्न आहे मात्र या अर्थसंकल्पात मराठवाड्याला सपशेल डावलण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. या शिवाय संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये विकास मंडळांचा साधा उल्लेखही केलेला नाही.

- डॉ. अशोक बेलखोडे, तज्ज्ञ सदस्य, मराठवाडा विकास मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन शैक्षणिक धोरण मसुद्यावर चर्चासत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, महात्मा गांधी मिशन व शिक्षण विकास मंचतर्फे 'नवीन शैक्षणिक धोरण मसुदा-२०१९'वर २३ जून रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र 'जेएनईसी'मध्ये सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत होणार आहे. शिक्षणतज्ज्ञ आणि मुख्य संयोजक डॉ. वसंतराव काळपांडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अभ्यासक, पालक सहभाग नोंदवणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदी, कोणत्या तरतूदीचा अंतर्भाव असावा, याबाबत विचारमंथन होणार आहे. चर्चासत्रात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. चर्चासत्राला केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत यांच्यासह डॉ. श्रीरंग देशपांडे, डॉ. भालचंद्र कानगो, प्रा. अजीत दळवी, प्रा. दासू वैद्य, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. अपर्णा कक्कड, बिजली देशमुख, डॉ. रेखा शेळके, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव, रेणुका कड, विनोद सिनकर, रुपेश मोरे, राजेंद्र वाळके यांची उपस्थिती रहाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मर्जीतील कर्मचाऱ्यांसाठी वशिलेबाजी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि उस्मानाबाद उपकेंद्रात विद्यापीठ फंडातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियमबाह्य नियुक्त्या तत्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी कामगारांनी केली आहे. व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या मर्जीने काही कामगारांच्या नियुक्त्या झाल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागातील व उस्मानाबाद उपकेंद्रातील रोजंदारी कंत्राटी कामगारांना विद्यापीठ फंडातून कायम करण्यात आले. काही कामगारांना नियमबाह्य पद्धतीने कायम करण्यात आले. या कामगारांच्या नियुक्त्या बेकायदा असल्याचा आरोप भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनने केला. काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनी मर्जीतील कामगारांना सेवेत कायम केले. शेकडो कामगार मागील १८ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. पण, विद्यापीठ प्रशासनाने आश्वसनांची पूर्तता केली नाही. रोजंदारी कामगारांचे वेतनसुद्धा वेळेवर होत नाही. उस्मानाबाद उपकेंद्रातही काही कामगारांना नियमबाह्य पद्धतीने सेवेत घेतल्याचे युनियनने निवेदनात म्हटले आहे. विद्यापीठातील कामगारांना सेवेत कायम केल्यास आर्थिक बोजा पडणार असल्याचे कारण सांगितले जाते. मग उपकेंद्रात कामगारांना कायम करताना आर्थिक बोजा पडला नाही का, असा सवाल युनियनचे अध्यक्ष किरणराज पंडित यांनी केला आहे.

विद्यापीठ फंडातून केलेल्या नियुक्त्या तत्काळ रद्द करण्यावर कामगार संघटना ठाम आहेत. नवीन कुलगुरू नियुक्त झाल्यानंतर हा प्रश्न डोके वर काढण्याची शक्यता आहे. जवळपास शंभर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आठ हजार ते ३५ हजार रुपये दरमहा वेतन सुरू आहे. डावलण्यात आलेले कर्मचारी आणि कायम केलेले कर्मचारी, असा संघर्ष सुरू झाला आहे. या नियुक्त्यांवर प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भगवान निकाळजे, गौतम सोनवणे, किशोर भिंगारे, धनराज भिंगारे उपस्थित होते.

\Bकामगारांच्या मागण्या\B

रोजंदारी कामगारांना विद्यापीठ सेवेत सामावून घेणे, तत्कालीन कुलसचिव डॉ. धनराज माने यांच्या कार्यकाळातील नोकर भरतीची चौकशी करावी, विद्यापीठ फंडातील नियुक्त्या रद्द कराव्यात, रोजंदारी कामगारांना थकीत महागाई भत्ता व किमान वेतनातील फरक रक्कम तत्काळ द्यावी, विद्यापीठ प्रशासनाने कपात केलेल्या २००८ ते २०१२ या कार्यकाळातील थकीत पीएफमध्ये वगळलेली नावे समाविष्ट करावीत, विद्यापीठ फंडाच्या सर्वेक्षणाकरिता नेमलेली निंबाळकर समिती रद्द करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीपच्या धडकेत एकाचा एएस क्लब चौकात मृत्यू

$
0
0

वाळूज महानगर : महामार्गावरील एएस क्लब चौकात जीपच्या धडकेत ५९ वर्षाच्या नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (१७ जून) घडली. तुकाराम गिरप्पा खिल्लारे असे अपघातात ठार झालेल्या नागरिकाचे नाव आहे. ते चौकात उभे असताना त्यांना जीपने (एमएच ४३ डीबी २८९८) धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. खिल्लारे यांना जखमी अवस्थेत येथील तिरुपती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना सीटीस्कॅन करण्यासाठी औरंगाबाद येथे पाठवले. त्यानंतर त्यांच्या वर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार सुरू असताना पावणेचारच्या सुमारास डॉक्टरानी तपासून मृत घोषित केले. यासंदर्भात खिल्लारे यांचे नातू अमोल गायकवाड यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात जीप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीड हजार कोटींचे मृगजळ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या पाणीपुरवठ्याचा पुरता उडालेला फज्जा सुधारण्यासाठी महापालिकेने तब्बल दीड हजार कोटींची योजना तयार केली असून, बुधवारी तिचे सरकार दरबारी सादरीकरण करण्यात येणार आहे. या योजनेतून शहराला दररोज ३६३ दशलक्ष लिटर पाणी मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

वादग्रस्त समांतर पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, असा पाठपुरावा पालिकेने केला. राज्य सरकारकडे समांतरचा अर्जित असलेला निधी खर्च करण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी पाठविला होता. सोबतच सातारा-देवळाई भागासाठीचाही स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला होता. या वेगवेगळ्या प्रस्तावानंतर सरकारकडून पालिकेला फटकारण्यात आले व एकत्रित प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारतर्फे नवा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाचे सादरीकरण उद्या प्रधानसचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर पालिका प्रशासन करणार आहे.

\Bअसा आहे प्रस्ताव

\Bप्रस्तावानुसार औरंगाबाद ते पैठण अशी २२४५ मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकली जाणार आहे. योजनेचे काम पूर्ण झाल्यास दररोज शहराला ३६३ दशलक्ष लिटर पाणी आणले जाईल. सध्या जायकवाडीतून पालिकेकडून १५० ते १५५ दशलक्ष लिटर पाणी उपसा होतो. प्रत्यक्षात यापेक्षा अधिक गरज आहे. त्यातील गळती, पाइप फुटण्याचे प्रकार सव्वाशे दशलक्ष लिटर पाणी मिळते. शहरासह लगतच्या गावांनाही फायदा होईल असे प्रस्तावात सांगण्यात आले आहे.

\B...शहराच्या पाण्याचे गणित

\B- सध्याची आवश्यकता......२५० एमएलडी

- जायकवाडीतून उपसा ....१५५ एमएलडी

- प्रत्यक्षात मिळते............१२० एमएलडी

- प्रस्तावित योजना....३६३ एमएलडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीनंतर सरपंचांची निवडणूक

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी औरंगाबाद

पिंपळगाव पिराची येथील ग्रामपंचायत सदस्यांची पोटनिवडणूक निकालानंतरच सरपंचपदासाठीची निवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. मंगेश पाटील यांनी दिले.

पिंपळगाव पिराची ग्रामपंचायतीच्या बिनविरोध नवनिर्वाचित सदस्या स्वाती गलांडे यांनी याचिका दाखल केली होती. २० मे २०१९ रोजी राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरातील ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार कार्यक्रम जाहीर केला. पिंपळगाव पिराची येथे तीन सदस्य अपात्र ठरल्याने त्या जागा रिक्त होत्या. दरम्यान, सरपंचानी २१ मे २०१९ ला पदाचा राजीनामा दिला आणि ग्रामपंचायतीच्या सभेत तो मंजुरही झाला.

तहसीलदार, पैठण यांनी २० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना रिक्त जागांसंदर्भात अहवाल पाठविला. दहा जून रोजी याचिकाकर्त्या या बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार यांनी जाहीर केले. उरलेल्या दोन रिक्त जागांसाठीची निवडणूक २३ जूनला ठेवण्यात आली मात्र, १३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी १९ जूनला सरपंचपदासाठीची निवडणूक जाहीर केली.

त्या पार्श्वभूमीवर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. सदस्यांच्या पोटनिवडणुकीनंतर सरपंचपदाची निवडणूक घेण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती. येथील सरपंचपद हे ओबीसी गटासाठी राखीव असून, याचिकाकर्त्या याच गटातील आहेत. त्यांना सरपंचपदाची संधी मिळू नये यासाठीच सदस्य निवडीच्या आधीच सरपंचपदाची निवडणूक घेण्यात येत असून, हे बेकायदा आहे, १७ सदस्यांची ग्रामपंचायत असताना १४ सदस्यांमधून सरपंचांची निवड बेकायदा असून, सदस्य निवडीसाठीच्या आचारसंहितेच्या काळात अशी निवडणूक घेता येणार नाही, असे म्हणणे याचिकेत मांडण्यात आले.

सुनावणीअंती खंडपीठाने सरपंचपदाची निवडणूक ही ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीच्या निकालानंतर घेण्याचे आदेश दिले. या प्रकरणात याचिकाकर्त्यातर्फे रवींद्र गोरे यांनी काम पाहिले. त्यांना दिलीप खंडागळे आणि चंद्रकांत बोडखे यांनी साह्य केले. राज्य निवडणूक आयोगातर्फे अजित कडेठाणकर तर, राज्य शासनातर्फे पावन लखोटिया यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालये न बांधणाऱ्यांवर कारवाईचा निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

लाभार्थी कुटुंबांना निधी मिळूनही शौचालय बांधकाम न करणाऱ्यावर नगर पालिकेने कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला. यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी देशभर स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. याच आभियानाला राज्य शासनाकडून व्यापक स्वरूप देत नागरी भागातील नागरिकांसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. कन्नड नगर पालिका स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवत असून, याअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी केंद्र सरकारचे चार हजार, राज्य सरकारचे आठ हजार व नगर पालिकेकडून प्रोत्साहनपर पाच हजार असे एकूण १७ हजार रुपयाचे अनुदान शहरातील एक हजार ५२८ कुटुंबांना देण्यात आले. यातील ११० वैयक्तिक शौचालय नसलेल्या कुटुंबांनी शौचालय बांधले नाहीच, परंतु अनुदान उचलले आहे. याबाबात त्यांना वारंवार सूचना व नोटीस देऊनही काहीही उपयोग झालेला नाही. शुक्रवारपर्यंत (२१ जून) शौचालय न बांधणाऱ्या लाभार्थींवर नगर पालिकेने कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या लाभार्थींवर शासकीय पैशाचा अपहार केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. लाभार्थींनी त्वरित वैयक्तिक शौचालय बांधून सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यधिकारी डी. एस. साळवे यांनी केले आहे.

\Bयोजनेची वाटचाल...\B

मंजूर शौचालय : १,५२९

वापरातील : १,३८०

वापरात नसलेले : २७

बांधकाम अपूर्ण : ११

अनुदान परत केलेले लाभार्थी : १

बांधकाम न केलेले लाभार्थी : ११०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगिरी दाखवा… अन्यथा उचलबांगडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील विविध पोलिस ठाण्यांसह अनेक वर्षांपासून एकाच विभागात काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या विविध पोलिस ठाणी किंवा विभागांतंर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी रुजू होण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवीन विभागात किंवा नवीन पोलिस ठाण्यात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामगिरी दाखविली नाही तर, त्यांची परत उचलबांगडी करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त चिरंजिव प्रसाद यांनी दिला आहे.

पोलिस आयुक्तालयांतर्गत गुन्हेशाखेसह विविध पोलिस ठाण्यांत जवळपास २००पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात डीबी पथकासह गुन्हे शाखा, विशेष शाखा, शहर वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा अशा विविध विभागात पोलिस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या झालेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा येत्या तीन महिन्यात चांगल्या पद्धतीने कामगिरी न केल्यास त्यांची उचलबांगडी करण्यात येणार आहे. अनेक कर्मचारी एकदा बदली झाल्यावर सुरुवातीच्या काही काळात चांगली कामगिरी करतात नंतर त्यांची कामगिरी ढेपाळते असा नेहमीचा अनुभव आहे, परंतु आता त्यात बदल करून नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

\Bवाहन चोऱ्यांमुळे आयुक्त चिंतेत\B

शहरात वाहन चोरीचे प्रमाण वाढले असल्याची कबुली पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली आहे. वाढत्या दुचाकी चोऱ्या रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान असून, लवकरच दुचाकी चोरट्यांचा बिमोड करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

\Bगुडमार्निंग पथकाची गस्त वाढविणार\B

दरम्यान, शहरात मंगळसूत्र चोऱ्या रोखण्यासाठी; तसेच राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची, मंदिराची किंवा इतर धार्मिक वास्तुंची विटंबना रोखण्यासाठी पहाटेच्या वेळी गुडमॉर्निंग पथक आणि पोलिसांची विशेष गस्त सुरू करण्यात आली. आगामी काळात या गस्त अधिक वाढविणार असल्याचे चिंरजिव प्रसाद यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंकमोजणी पद्धतीवरून संभ्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुसरीच्या बदललेल्या अभ्यासक्रमात अंकमोजणीची नवी पद्धत अवलंबण्यात आली आहे. त्यावर शिक्षक नाराज असून, यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दुसरीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. त्यात बालभारतीच्या पुस्तकात अंक शिकविण्याची पद्धत नवीन आणण्यात आली. या पद्धतीवरून राज्यभर शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कसे शिकवायचे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. उच्चारण विद्यार्थ्यांना अवघड जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंकगणित सोपे ठरण्याऐवजी अवघड करून टाकल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे. या पद्धतीमुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे अंक शिकविणीची पद्धत वादात अडकली आहे. बालमनात संख्यावाचन अशा पद्धतीने रुजविल्यास भविष्यात व्यवहार करताना, मोठ्या संख्या वाचताना, लिहिताना त्रास जाणवेल असे शिक्षकांना वाटते. दुसरीच्या विद्यार्थ्यांपासून असे संख्या वाचन शिकविले जाईल. ते विद्यार्थी एकीकडे शाळेत या नवीन पद्धतीने वाचन करतील, लिहितील परंतु घरातील ज्येष्ठांकडून, समाजात वावरतांना जुन्याच पद्धतीने संख्यानामे कानावर पडत राहतील मग त्याचे करणार काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

इंग्रजी अथवा इतर प्रादेशिक भाषांपेक्षा मराठीचे अस्तित्व व ढाचा वेगळा आहे. शेकडो वर्षांपासून मराठी संख्यांना जे मराठी संख्यानामे दिली आहेत, ती बालपणापासूनच मराठी मुले ऐकत असतात. मात्र, बालभारतीच्या गणितज्ज्ञांनी इयत्ता दुसरीच्या पुस्तकात संख्या वाचनात व लिखाणात जो अनपेक्षित बदल घडवला आहे, तो अचंबित करणारा आहे. केवळ इंग्रजी किंवा अन्य भाषेत 'त्र्याहत्तर'ला जसे वाचतात, तसे मराठीला उगाचच वळवायचं म्हणजे, मराठीने गुलामत्व स्वीकारण्यासारखे आहे. इतर भाषांचे अंधानुकरण व जोडाक्षरे लिहावे लागू नये म्हणून गणितज्ज्ञांनी शिक्षकांना, समाजातील तज्ञांना विश्वासात न घेता उचललेले एवढे मोठे पाऊल क्लिष्ट ठरणारे आहे.

- महेश लबडे, सहशिक्षक

इयत्ता दुसरीच्या गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकात संख्यावाचनासंदर्भात केलेला बदल स्वागतार्ह आहे, परंतु हा बदल इयत्ता पहिलीपासूनच व्हायला हवा होता. कारण पहिलीत ३२ ही संख्या शिकलेल्या विद्यार्थ्यांचा बत्तीस ऐवजी तीस आणि दोन असे म्हणताना गोंधळ उडणार आहे. संख्यावाचनाची ही पद्धत अत्यंत सोपी आणि सुटसुटीत आहे, परंतु हा बदल फक्त पाठ्यपुस्तकात व्हायला नको तर तो व्यवहारात सुद्धा यायला हवा. इंग्रजी सोबतच अनेक भाषांत संख्या लिहिताना किंवा वाचताना अशीच पद्धत वापरली जाते. त्यामुळे या भाषांत संख्या शिकताना विद्यार्थ्यांचा गोंधळ मराठीच्या तुलनेत कमी होतो. एकंदरीत ही पद्धत स्वागतार्ह असली तरीही ती रुळायला काही काळ जावा लागेल तोपर्यंत विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचाही गोंधळ होणार हे नक्की.

- सोमनाथ वाळके, प्राथमिक शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठा पुन्हा होणार विस्कळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन बिघडले असून पुढील आठवड्यात मान्सूनपूर्व कामांसाठी १२ तासांचा शटडाउन घेतला जाणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन पुन्हा बिघणार आहे.

शहरातील पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात सुसूत्रता नाही. काही भागात तीन-चार, तर काही भागात पाच-सहा दिवसानंतर पाणी पुरवठा होतो. आयुक्तांनी सुधारणा करण्यात येईल, असे सांगूनही बदल झाले नाहीत. त्यात आता २८ जून रोजी मान्सूनपूर्व कामांसाठी फारोळा येथील वीज पुरवठा बंद केला जाणार आहे. सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत वीज पुरवठा बंद राहणार आहे.

जायकवाडी व फारोळा येथे अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी रिंग मेन युनिटची जोडणी करणे, महापालिकेच्या ३३ केव्ही फीडरवर मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती करणे या कामांसाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी उपसा होणार नाही. एक दिवसांच्या शटडाउनमुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार असून नियोजित वेळेपेक्षा एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

\Bपाणी पुरवठ्याबाबत बैठक

\B

शहरातील पाणी पुरवठ्यासंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले होते. पाच दिवसानंतरही पुरवठ्याबाबतचे नियोजन नाही. पाणी पुरवठ्याच्या विषयावरून गोंधळ उडाला होता. सिडको-हडकोतील नगरसेवकांनी आमच्यावरच अन्याय का, असा प्रश्‍न केला होता. शहराच्या इतर भागात तीन दिवसाआड पाणी मिळते, सिडको-हडकोत सात-आठ दिवसानंतर पाणी देऊन अन्याय केला जातो, असा आरोप करत नगरसेवक नितीन चित्ते यांनी आयुक्तांसमोर लोटांगण घातले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लेखान्यात चोरी; एका दिवसात चोर अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिल्लेखान्यातील एका घरात घुसून सोन्याच्या दागिन्यासह मोबाइल चोरी करणाऱ्यास क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव सलमान ईसा कुरेशी (वय २५, रा. पडेगाव), असे असून चोरी झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच ही कारवाई करण्यात आली.

मुसेफ नवाब कुरेशी (वय २३, रा. सिल्लेखाना कुरेशी हॉल जवळ) यांनी १७ जून रोजी फिर्याद दिली आहे. त्या नुसार, १७ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास अज्ञात चोराने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली पर्ससह घरातील सोन्याची आयरिंग, दीड हजार रुपये रोख व दोन मोबाइल चोरून नेल्या. संशयित व्यक्तीची हालचाल दिसत असल्याने, चोर-चोर, अशा हाका मारताच चोराने पळ काढला. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारदाराने पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजही दाखविले.

क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या विशेष तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना एक व्यक्ती चोरीचे मोबाइल विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पैठण गेट येथे संशयित सलमान ईसा कुरेशी याला पोलिसांची ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता चोरीचे दोन मोबाइल व ७०० रुपये, असा एकूण ३२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास केला असता सिल्लेखाना येथील चोरी साथीदार अजहर व अर्शद याच्या साह्याने केल्याचे त्याने मान्य केले. या चोराच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जालनाः कुत्र्याला वाचवताना वकिलाची गाडी उलटली!

$
0
0

जालनाः

जाफराबाद येथील वकील मयूर गौतम हे राजूरकडून जालनाकडे येत असताना घानेवाडी पाटीजवळ कुत्रा अचानकमध्ये आल्याने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नात त्यांची गाडी उलटली. सुदैवाने यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्याला वाचविताना उलटलेल्या गाडीने तीन ते चार वेळा पलटी घेतली आणि एका झाडाला जाऊन आदळली. सदर घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात झाला, तेव्हा गाडीत वकील मयूर गौतम व त्यांची ५ वर्षाची मुलगी प्रवास करत होते. परंतु दोघेही सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. चंदनझिराच्या पोलिसांनी तात्काळ पोहोचून मदतकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकांक्षा देशमुख खून; जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील एमजीएमच्या फिजिओथेरपी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आकांक्षा अनिल देशमुख हिच्या खून प्रकरणातील आरोपी राहुल सुरेंद्र शर्मा याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी फेटाळला. दरम्यान, न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पुराव्यावरून प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या ३७६ कलमाचा समावेश करण्याची संमती मागणारा विनंती अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक पूनम शिवाजी पाटील यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ११ डिसेंबर २०१८ रोजी आकांक्षा अनिल देशमुख (२२) ही एमजीएमच्या फिजिओथेरपी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी ही तिच्या गंगा मुलींच्या वसतिगृहातील ३३४ खोलीमध्ये बेशुद्धावस्थेत आढळली होती. त्यानंतर तिचा चुलत भाऊ राहूल देशमुख व शेख बाबू यांनी तिला एमजीएमच्या रुग्णालयात दाखल केले असता, रुग्णालयातील सीएमओने तपासून तिला मृत घोषित केले होते. शवविच्छेदन अहवालात तिच्या गळ्यावर दाब पडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपी राहूल सुरेंद्र शर्मा (२६, रा. उत्तर प्रदेश) याला १८ डिसेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली होती व २६ डिसेंबर २०१८ पासून आरोपी हा हर्सूल कारागृहात आहे. प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीने नियमित जामिनीसाठी अर्ज सादर केला असता, आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. अॅड. देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

\Bसीसीटीव्हीत घटना चित्रित

\Bआरोपी हा उत्तर प्रदेशचा राहणारा असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग चित्रित झाला आहे. तसेच गळा दाबून खून केल्यानंतर गळ्यातली मृताची चेनही आरोपीने लांबवली होती व घटनेनंतर आरोपीने वेशभूषा बदलली होती. तसेच डीएनए व सीए रिपोर्टनुसार मृतावर अत्याचार झाल्याचेही निष्पन्न झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पतंजली’ तर्फे शुक्रवारी योग शिबिरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वामी रामदेव बाबा प्रणित पतंजली योग समितीतर्फे पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस शुक्रवारी (२१ जून) साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने शुक्रवारी जिल्ह्यातील २०० शाळांसह कॉलेज, वसाहती, कंपन्यांमध्ये योग शिबिरांसह चार ठिकाणी मुख्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व योगसाधक असे अडीच लाख व्यक्तींपर्यंत योग पोचवण्याचे उद्दिष्ट समितीने ठेवले आहे.

भारत स्वाभिमान न्यासमध्ये बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे युवा भारत जिल्हा प्रभारी कैलास पवार यांनी ही माहिती दिली. या वेळी भारत स्वाभिमान न्यासचे सहप्रभारी संतोष राजपूत, महिला पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य मोना राजपूत, जिल्हा प्रभारी अंजली अयाचित आणि कोषाध्यक्ष माधुरी राऊत, न्यासचे कार्यालयप्रमुख रमाकांत देसाई हे उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, पाचवा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करताना पतंजली योग समिती तयारी केली आहे. समितीच्या जवळपास ७० हून अधिक प्रशिक्षकांनी आयुष मंत्रालयाचा योग अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण व सराव पूर्ण केला. २१ जूनला हे प्रशिक्षक शहर व ग्रामीण भागात योग शिबिरे घेतील. पतंजलीचे मुख्य कार्यक्रम जेएनईसी कॉलेज, एन -२ क्रिकेट मैदान, सिडको, विभागीय क्रीडा संकुल, सूतगिरणी चौक, गारखेडा परिसर आणि हर्सूल कारागृह येथे सकाळी सहा ते सात दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. हर्सूल कारागृहातील कार्यक्रम केवळ बंदिवानांसाठी असून उर्वरित शिबिर सर्वांसाठी खुले व नि:शुल्क आहे. शिबिरांमध्ये सहभागी होऊन संपूर्ण विश्वात एकाचवेळी होणाऱ्या शारीरिक स्वास्थाच्या यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन पतंजली योग समितीने केले आहे.

\Bरामदेबाबा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिबिर

\B'पतंजली योग समितीच्या वतीने नांदेडला २१ जून रोजी भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वविक्रम करण्यासाठी या शिबिराला एकाचवेळी लाखोंच्या संख्येत योगसाधक उपस्थित असतील. या कार्यक्रमाला योगगुरू बाबा रामदेव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत असे,' संतोष राजपूत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी प्रवेशातील तिढा सुटल्याने ऑनलाइन प्रक्रिया मार्गी लागली आहे. ऑनलाइन अर्जाच्या प्रक्रियेत 'भाग-२' भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. यासह प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रवेशासाठी तीन मुख्य फेरीसह विशेष गुणवत्ता फेरी होणार आहे.

राज्य मंडळाचा दहावीचा निकाल ८ जून रोजी जाहीर करण्यात आला. अकरावी प्रवेश प्रक्रियेत इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या समकक्ष आणण्यासाठीची प्रक्रिया निश्चित होऊ न शकल्याने प्रवेश प्रक्रिया थांबली होती. शिक्षण विभागाने त्यावर जागा वाटपाचा मार्ग काढला. त्यानंतर बुधवारपासून प्रवेश प्रक्रियेला गती आली. ऑनलाइन अर्जातील 'भाग-१' भरण्याची प्रक्रिया पूर्वीच सुरू होती. बुधवारपासून 'भाग-२'ही भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रवेश प्रक्रियाचे पुढचे वेळापत्रक ही निश्चित केले असून त्यानुसार, प्रवेशाच्या फेरी, शून्य फेरी, व्यवस्थापन, इन-हाउस, अल्पसंख्याक कोटा प्रवेश, त्यांच्या गुणवत्ता यादी, आक्षेप नोंदणी, द्विलक्षी विषयाची प्रवेश निश्चिती अशा विविध टप्प्यावरील वेळापत्रक जाहीर केले आहे. तीन फेरी, विशेष गुणवत्ता फेरी असणार आहे. त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर केला जाणार आहे.

\Bअशी असेल शून्य फेरी \B

शून्य फेरीला बुधवारपासून प्रारंभ झाला. यामध्ये सामान्य शाखेच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी तसेच द्विलक्षी विषय व एचएसव्हीसी शाखेसाठी भाग-१, भाग-२ अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना २३ जूनपर्यंत मुदत दिली आहे. सामान्य शाखेच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी भाग-१, भाग-२ भरणे त्याचसह कोटा प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अर्ज स्वीकारणे आणि कोटा प्रवेशातील गुणवत्ता याद्या जाहीर करणे, विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश अपडेट करणे प्रक्रिया होईल. ही प्रक्रिया २९ जून दरम्यान पूर्ण करावी लागेल. २५ जून रोजी द्विलक्षी विषयाची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. २६ व २७ जून दरम्यान प्रवेश निश्चिती. एक जुलै रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल दोन व तीन जुलै दरम्यान आक्षेप. त्यानंतर सहा जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल.

\Bवेळापत्रक\B

\Bशून्य फेरीची प्रक्रिया \B २९ जूनपर्यंत पूर्ण करणे

सर्वसाधारण गुणवत्ता यादी...... १ जुलै

आक्षेप नोंदविणे.................... २, ३ जुलै

अंतिम पहिली गुणवत्ता यादी...... ६ जुलै

यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती.. ८ ते १० जुलै

कट ऑफ व दुसऱ्या यादीसाठी उपलब्ध जागा.... १० जुलै

भाग-१, भाग-२मध्ये आवश्यक असल्यास बदल.....११, १२ जुलै

दुसरी गुणवत्ता यादी.................................. १५ जुलै

विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती.......................... १६ ते १८ जुलै

कट ऑफ व तिसऱ्या यादीसाठी उपलब्ध जागा.. १८ जुलै

भाग-१, भाग-२मध्ये आवश्यकता असल्यास बदल.. १९ ते २० जुलै

तिसरी गुणवत्ता यादी..............................२३ जुलै

प्रवेश निश्चिती.....................................२४ जे २६ जुलै

तिसऱ्या गुणवत्ता यादीची कट ऑफ व जागा....२६ जुलै

भाग-१, भाग-२साठी आवश्यक बदलासाठी.......२७ ते २९ जुलै

\Bविशेष गुणवत्ता फेरी..\B

विशेष गुणवत्ता यादी जाहीर....३१ जुलै

विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चिती.....१ व २ ऑगस्ट

उपलब्ध रिक्त जागा प्रसिद्ध करणे...३ ऑगस्ट

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील ९६० विद्यार्थी पात्र ठरले असून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत औरंगाबादचे केवळ तीन विद्यार्थी आहेत. गुणवत्ता यादीत सर्वाधिक कोल्हापूरचे विद्यार्थी आहेत, तर अकरा जिल्ह्यांनाच दोन आकडी संख्या गाठता आली आहे.

परिषदेतर्फे २४ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या बुधवारपासून परिषदेच्या www.mscepune.in व http://puppss.mscescholarshipexam.in या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला. राज्यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला चार लाख ९५ हजार ५४६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एक लाख नऊ हजार २३० विद्यार्थी पात्र ठरले, तर १६ हजार ५७९ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहेत. निकालाचे प्रमाण २२.०४२३ टक्के आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला तीन लाख ४१ हजार ९९१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६३ हजार २३६ पात्र ठरले, तर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी १४ हजार ८१५ एवढे ठरले. निकालाचे प्रमाण १८.४९०५ टक्के आहे. औरंगाबाद विभागातून पाचवी शिष्यवृत्तीसाठी ५६ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १५६५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. आठवी स्तरावर ४४ हजार २९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४४८ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले.

परीक्षेचा अंतरिम निकाल १६ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर गुणपडताळीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाइन मागविण्यात आले. त्यासाठी २७ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. अर्जांवरून संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी करून गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

\Bइयत्ता पाचवी निकाल \B

जिल्हा........परीक्षार्थी....शिष्यवृत्तीधारक

औरंगाबाद.....२२८६५....४८८

जालना.........८८०९......२७६

बीड............१०९११.....३६६

परभणी.........८९५९.......२६२

हिंगोली.........५०४१........१७३

\Bइयत्ता आठवी निकाल\B

औरंगाबाद.....१७७३२...४७२

जालना.........६९३४.... २८१

बीड............८३००..... ३५०

परभणी.........६३५२...... २०९

हिंगोली.........३२८६........१३६

\Bऔरंगाबाद जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी

इयत्ता पाचवी........४८८

इयत्ता आठवी........४७२\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images