Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

योगदिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जागतिक योगदिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुलात योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यासह शहरात विविध भागांमध्ये योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते.

विभागीय क्रीडा संकुलाच्या इनडोअर हॉलमध्ये योगदिनाचा मुख्य कार्यक्रम झाला. या प्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, तहसीलदार विजय मुनलोड, सतीश सोनी, शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वेदपाठक, राम बारस्कर, उदय कहाळेकर, आरती पाल, कांचन वसेकर यांनी योगविद्येचे प्रशिक्षण दिले. योगदिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, कृष्णा केंद्रे, हितेंद्र खरात, लता लोंढे, सचिन पुरी, शरद कचरे, गणेश पवार, बी. एस. गोरे, सदानंद स‌वळे आदींनी केले.

\Bक्रीडा भारतीतर्फे योगदिन\B

क्रीडा भारतीतर्फे शहरात विविध भागांमध्ये योगदिन साजरा करण्यात आला. यात सुमारे नऊ हजार नागरिकांनी सहभाग घेतला. शालेय विद्यार्थ्यांनी योगांची प्रात्यक्षिके सादर केली. शारीरिक कवायती, ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, वक्रासन, भुजंगासन आदी योगासने, कपालभारती, प्राणायम, ध्यानधारणा केली.

मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर मुख्य कार्यक्रम झाला. या प्रसंगी संघचालक पुरुषोत्तम हेडा, महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक प्रमोद माने, विजय खाचणे, हेमंत पातूरकर, क्रीडा भारतीचे शहर अध्यक्ष पंकज भारसाखळे, शिवाजी जोशी, अॅड. संकर्षण जोशी, अॅड. गोपाल पांडे, डॉ. मकरंद जोशी, प्राचार्य शत्रुंजय कोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध भागांत डॉ. मीनाक्षी मुलियार, डॉ. संदीप जगताप, अॅड. बाळासाहेब वाघमारे, पद्मा धारवाडकर, कैलास शिवणकर, रोहित गाडेकर, प्रमिला आव्हाळे, माणिक राठोड, डॉ. सागर कुलकर्णी, दीपा आनंदगावकर, किरण वाळजे, मुख्याध्यापिका पानसे, औताडे, चौधरी आदींनी योगदिनाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

\Bसायकल फेरी\B

औरंगाबाद जिल्हा सायकलिंग संघटना व औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जागतिक योगदिनानिमित्त शुक्रवारी सायकल फेरी काढण्यात आली. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवला. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, गोकुळ तांदळे, सचिन पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यात गोकुळ तांदळे, डॉ. विजय व्यवहारे, चरणजितसिंग संघा, सुशील मापारी, अनंत ढवळे, अतुल जोशी, उन्मेष मारवाडे, सतीश अन्वेकर, हर्षा जाधव, मानव अरोरा, शंतनू शुक्ला, अनीश शुक्ला, ऋतुराज तांदळे, अभिजित कुलकर्णी, निनाद खोचे, सुनील बोरा, श्रेयसी ढवळे, श्रेयस निर्वळ आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एमबीबीएस प्रवेशासाठी अॅडमिशन एक्स्पो आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'नीट'चे निकाल जाहीर झाल्यानंतर 'एमबीबीएस'साठी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शनिवारी (२२ जून) सकाळी ११पासून जालना रोडवरील हॉटेल लेमन ट्री (सिडको बसस्थानकाजवळ) याठिकाणी एमबीबीएस अॅडमिशन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.

एमबीबीएस अॅडमिशन एक्स्पोच्या माध्यमातून कमी फिसमध्ये जागतिक दर्जाचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांबद्दलची माहिती देण्यात येईल. त्या विद्यापीठांमध्ये कशा पद्धतीने अर्ज करावा, त्याचे रजिस्ट्रेशन कसे करावे; तसेच विदेशात मेडिकलच्या क्षेत्रात करिअरच्या संधीविषयी माहिती देण्यात येणार आहे. यंदा या एक्स्पोचे सहावे वर्ष आहे. विशेष म्हणजे याठिकाणी रजिस्ट्रेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० टक्के सूट देखील मिळण्याची संधी या एक्स्पोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या एक्स्पोचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरधाव वेगाने घेतला विद्यार्थ्याचा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भरधाव वेगाने दुचाकीवर मित्रांना ट्रिपल सीट घेऊन जाणे एका १५ वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतले. महावीर चौकात झालेल्या अपघातात उर्वेश सुभाष जुमडे (वय १५, रा. राजनगर, मुकुंदवाडी) हा ठार झाला असून, त्याचे दोन मित्र किरकोळ जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (२१ जून) सकाळी आठ वाजता झाला. हे तीन जण गोगाबाबा टेकडीकडे जात होते.

उर्वेश हा सिडको एन २ भागातील संत मीरा विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी होता. जागतिक योगदिन असल्यामुळे शुक्रवारी सकाळी गोगाबाबा टेकडी आणि लेणी परिसरात फिरण्यासाठी जाण्याचे मृत उर्वेशसह सात मित्रांनी ठरविले होते.तीन दुचाकींवरून सात जणांनी जाण्याचे त्यांचे ठरले होते. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता उर्वेशच्या दुचाकीवर त्याच्यासह दोन मित्र बसले, तर इतर दोन दुचाकीवर चार मित्र बसले. हे सर्वजण क्रांतीचौक, महावीर चौकामार्गे गोगाबाबा टेकडी परिसराकडे निघाले होते. दरम्यान, उर्वेशच्या पुढे असलेल्या दोन दुचाकीवरील मित्र पुढे गेल्याने त्यांना गाठण्यासाठी त्याने दुचाकीचा वेग वाढविला. महावीर चौकात एका बसचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बसमागे असलेल्या उर्वेशच्या मित्राने देखील ब्रेक मारला. मात्र, मागून वेगाने येत असलेल्या उर्वेशला दुचाकीची गती नियंत्रणात ठेवता आली नाही. तो मित्राच्या दुचाकीवर जोरात आदळला. या अपघातात उर्वेश सुमारे दहा ते १५ फूट फेकला गेला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर मित्र किरकोळ जखमी झाले. घटनेनंतर छावणी पोलिसांनी उर्वेशचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये पाठविला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाखाची बॅग पळवली, तिघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दीड लाख रुपये ठेवलेली बॅग पळवल्याप्रकरणात शुभम उर्फâ संभाजी उर्फâ हवा श्याम पिंपळे, अंबादास कचरू मोरे व लखन उर्फ रविंद्र अशोक साळवे या आरोपींना मंगळवारपर्यंत (२५ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. कादरी यांनी दिले.

याप्रकरणी तरुण भारत फायनान्स कंâपनीत फिल्ड असिस्टंट असलेल्या विजय माने (वय २०, रा. मेघमल्हार सोसायटी, कॅâनॉट प्लेस) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, विजय हा बुधवारी सकाळी आडगाव, पिंप्रीराजा, घारेगाव येथे वसुलीसाठी गेला होता. पैशांची वसुली केल्यावर आपल्या दुचाकीवर परत येत असताना निपाणी फाट्याजवळील श्रीकृष्ण हॉटेलसमोर दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी विजय माने याला लाथ मारून खाली पाडले. नंतर त्याच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून धुम ठोकली. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन शुभम उर्फ संभाजी उर्फâ हवा श्याम पिंपळे (रा. चित्तेपिंपळगांव) याला ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान शुभम पिंपळे याने अंबादास कचरू मोरे (रा. रोहतळे, ता. शेगाव, अहमदनगर) व लखन उर्फ रविंद्र अशोक साळवे (रा. चित्तेपिंपळगांव) यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. तिघांच्या ताब्यातून हिसकावलेल्या बॅगेतील रोख रक्कम, टॅबलेट, बॅग हिसकावण्यासाठी वापरलेली विना क्रमांकाची दुचाकी, तीन मोबाईल असा एकूâण २ लाख १० हजार ४२० रुपये किंâमतीचा ऐवज जप्त करण्यात आला होता. प्रकरणात तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पावसाचा प्रयोग निविदा प्रक्रियेत अडकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदाही महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केल्यामुळे शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, हा प्रयोग तूर्त तरी निविदा प्रक्रियेत अडकल्यामुळे पाऊस नेमका कधी पाडणार या बाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. राज्यभरात यंदाही २०१५ प्रमाणे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी डॉप्लर रडार औरंगाबाद येथे बसविण्यात येणार आहे.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी मागविण्यात आलेल्या निविदा १३ जून रोजी उघडण्यात येणार होत्या. १५ जून रोजी कंत्राटदार कंपनीचा निर्णय होणार होता, परंतु निविदेच्या अनुषंगाने नेमण्यात आलेले समिती सदस्य वेगवेगळ्या कारणांमुळे राज्याबाहेर होते. त्यामुळे निविदा अंतिम होऊ शकल्या नाही. येत्या आठवड्यात निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात सी-बॅण्ड डॉप्लर रडार दाखल होईल. राज्यामध्ये मध्यवर्ती केंद्र औरंगाबाद आहे त्यामुळे २०१५ प्रमाणेच औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावरून कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी विमान उड्डाण घेण्यासाठी परवानगीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. २०१५ मध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे प्रयत्न झाले. मात्र, एकूणच प्रयोगाला विविध परवानग्यांमुळे झालेला विलंब तसेच उपयुक्त ढगांच्या आभावामुळे या प्रयोगाचा फारसा उपयोग झाला नाही. यंदाही या प्रयोगातून काय निष्पन्न होईल या विषयी शंका आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे होत असलेल्या आत्महत्या, त्यामुळे निर्माण होत असलेला जनक्षोभ आणि द्यावी लागणारी नुकसान भरपाई या प्रक्रियेमध्ये सरकारचा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो, पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारच्या विविध उपाययोजना सुरू आहेत. पर्जन्यवाढीसाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करण्याची निकड लक्षात घेऊन राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याला मान्यता देण्यात आली होती. प्रयोगासाठी होणाऱ्या खर्चाला नुकतीच प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. २०१५ मध्ये औरंगाबाद येथे १०० तासांवर १०० तास मोफत या तत्वावर ख्याती वेदर मॉडिफिकेशन या संस्थेला प्रयोगाकरिता २७ कोटी रुपयांचे कंत्राट दिले गेले होते.

अधिकारी काय म्हणतात ?

कृत्रिम पावसासंदर्भात राज्य आपत्कालीन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचा आहे, यासाठी निविदा प्रक्रिया अद्याप अंतिम झाल्या नाही, निविदा प्रक्रियेनंतर संबंधितांना वर्कऑर्डर दिल्या जाईल व त्यानंतर प्रयोग करण्याचा निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन तंत्राद्वारे काढली निष्क्रीय किडनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड जिल्ह्यातील एक ३५ वर्षीय महिला पोटात दुखत असल्यामुळे कमलनयन बजाज रुग्णालयात एक जूनला दाखल झाली. तपासणीअंती तिच्या डाव्या किडनीत पू झाल्याने निष्क्रीय झाल्याचे व तशा अवस्थेत निष्क्रीय किडनी शरीरात ठेवणे धोकेदायक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुंतागुंत कमी करण्याच्या उद्देशाने प्रचलित पद्धतीला फाटा देत योनी मार्गाद्वारे दुर्बिणीद्वारे निष्क्रीय किडनी काढण्याचा निर्णय घेऊन मुत्ररोगतज्ज्ञ डॉ. आदित्य येळीकर यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी कौशल्य पणाला लावले. अशा पद्धतीची पश्‍चिम भारतातील पहिली शस्त्रक्रया असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

अशा केसेसमध्ये शस्त्रक्रिया करुन किडनी नियमित पद्धतीनेही काढता येते; परंतु या पद्धतीत अधिक जखम तसेच रक्तस्त्राव होतो व ती जखम भरुन येण्यासाठी बराच अवधी लागतो आणि अशी पद्धत अधिक खर्चिक असते. त्यामुळेच डॉ. येळीकर यांनी नातेवाईकांशी चर्चा करुन व त्यांच्या संमतीने या पद्धतीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. योनी मार्गाद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेला 'लॅप्रोस्कोपिक नेफ्रेक्‍टॉमी विथ ट्रान्सव्हेजायनल रिट्रायव्हल ऑफ द स्पेसिमेन' असे म्हटले जाते. यात दुर्बिणीद्वारे किडनी योनी मार्गाने काढल्यामुळे रुग्णाला कोणतीही जखम, टाके किंवा निशाण येत नाही व रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर ४८ तासांतच घरी पाठविले जाऊ शकते. या पद्धतीमुळे रुग्णाचा रुग्णालयातील वास्तव्याचा कालावधी घटल्याचे रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अलोक श्रीवास्तव म्हणाले. डॉ. येळीकर यांना भूलतज्ञ डॉ. संजीव पुरोहीत, साहेबराव जाधव, विल्सन जाधव, माया साबळे यांचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखोंचा चुना, चौघांचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हरियाणाच्या फ्युचर मेकर लाइफ केअर कंपनीने आकर्षक परताव्याचे तर, साखळी पद्धतीने गुंतवणूक केल्यास अफाट व्याज देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा चुना लावल्याप्रकरणातील आरोपी प्रदीप गुलाबराव पराड, जगन्नाथ दत्तात्रय घुले, संजय भागिनाथ घुले व जयराम अहिलाजी शिंदे या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी फेटाळला.

याप्रकरणी रामेश्वर रघुनाथ रोकडे (२६, रा. गारखेडा) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची हरियाणाच्या हिस्सारमधील फ्युचर मेकर कंपनीचा आरोपी एजंट जगन्नाथ दत्तात्रय घुले (२९, रा. वानखेडेनगर) व आरोपी प्रदीप गुलाबराव पराड (३५, रा. पवननगर, हडको) यांच्याशी भेट झाली होती. दोघांनी फिर्यादीला बजरंग चौकात असलेल्या साई एंटरप्रायजेसच्या कंपनीच्या कार्यालयात नेले. तिथे त्यांनी कंपनीचा आरोपी संचालक जयराम अहिलाजी शिंदे (२९, रा. शाहू महाराज कॉलनी, एन-सात) व आरोपी संजय भागिनाथ घुले (४४, रा. संभाजी कॉलनी, एन-सहा) यांच्याशी ओळख करून दिली. शिंदेने सुचवल्यानंतर जून २०१८ मध्ये सूर्या लॉन्समध्ये तर, जुलै २०१८ मध्ये कुलस्वामिनी मंगल कार्यालयात व सिडको नाट्यगृहात झालेल्या सेमिनारला फिर्यादीने हजेरी लावली. त्यावेळी कंपनीत साडेसात हजार रुपये भरून एक 'आयडी' घ्या. त्या पटीत तुम्ही 'आयडी' वाढवा आणि भरपूर व्याज कमवा. कंपनीचा साडेसात हजारांचा एक 'आयडी' घेतल्यास शेती फवारणीची औषधे, कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक औषधे मिळतील असेही सांगण्यात आले होते. पैसे भरून एक सभासद समाविष्ट केल्यावर आपल्याला पहिलाच हप्ता अडीच हजारांचा मिळेल, असेही आमिष संजय घुले याने दाखवले होते.

कंपनीवर विश्वास ठेऊन फिर्यादीसह परवेज मोहम्मद, सुनील सुभाष मेहेत्रे व प्रमोद साळवे या चौघांनी एकूण १३ लाख ३१ हजार ६३९ रुपये गुंतविले. फिर्यादीने गुंतवणूक केलेल्या दोन लाख दोन हजार पाचशे रुपयांच्या मोबदल्यात १३ ऑगस्ट २०१८ रोजी 'टीडीएस' व इतर कपात होऊन २९ हजार २५० रुपये व्याज देण्यात आले. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी बोनस म्हणून १३ हजार ८९२ रुपये बँक खात्यात जमा झाले, मात्र त्यानंतर फिर्यादीला कृषी औषधे, खते, व्याज किंवा मुद्दल देण्यात आली नाही व कंपनीने तीनच महिन्यात गाशा गुंडाळून पळ काढला.

\Bअटकेशिवाय तपास होणे अशक्य

\Bफसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादीसह अन्य तिघांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, चौघांनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला असता, प्रकरण गंभीर असून, गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे व तपास आरोपींच्या अटकेशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने चौघांचा जामीन अर्ज फेटाळला. अॅड. देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समन्वयाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना फटका, पीक विम्यासाठी ससेहोलपट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बँक,विमा कंपन्या, सरकारचे पोर्टल आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. पीक विमा मिळवण्यासाठी त्यांची ससेहोलपट होत आहे असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांना पीक वीमा मिळणे सोपे व्हावे, पीक विमा मिळण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी शिवसेनेतर्फे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रश्नाला धरून आवाज उठवत आहेत. या संदर्भात त्यांनी 'मटा'शी बातचीत केली.

पीक विम्याचा नेमका प्रश्न विषद करताना अंबादास दानवे म्हणाले, शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा पीक विमा कंपन्या उचलत आहेत. प्रशासकीय व्यवस्था सरकारला बदनाम करीत आहे. कृषी विभाग, महसूल विभाग आणि जिल्हा परिषद या तिन्हीही विभागांच्या यंत्रणेने शेतकऱ्यांचा पीक विमा ठरविण्यासाठी गावागावी जाणे अपेक्षित आहे. गावोगावी जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी बोलून, शेती पाहून पीक विम्याबद्दल त्यांनी निर्णय घेतला पाहिजे, पण या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी गावोगावी न जाता सांगोवांगी पध्दतीने पीक विम्याची कागदपत्रे तयार करतात. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.

सीएससीच्या (कॉमन सर्व्हिस सेंटर) कार्यपद्धधतीबद्दलही आक्षेप घेतले जातात. याबद्दल बोलताना दानवे म्हणाले, कॉमन सर्व्हिस सेंटरवर प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. या सेंटरवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे, पण ते ही जबाबदारी पार पाडत नाहीत. जिल्हा बँकेची देखील तेवढीच जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना खाते क्रमांक देण्याची जबाबदारी जिल्हा बँकेची आहे. शेतकऱ्यांच्या नावे पैसे वळते करण्यासाठी पीक विमा कंपन्यांना बँक पैसे देते, पण खाते क्रमांक चुकीचा आहे, असे सांगून कंपन्या शेतकऱ्यांच्या नावे पैसे भरत नाहीत. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळायचे असतील तर बँक, विमा कंपन्या, सरकारचे पोर्टल आणि प्रशासन यांच्यात समन्वय असला पाहिजे. सध्या कोणत्याच प्रकारचा समन्वय नाही, तो प्रस्थापित करण्यासाठी सरकारनेच मार्ग काढला पाहिजे, असा उल्लेख दानवे यांनी केला.

शिवसेनेने आवाज उठवला

औरंगाबाद जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांचे खाते क्रमांक चुकले म्हणून दोन महिन्यापासून या शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा झाले नव्हते. शिवसेनेने याबद्दल आवाज उठविल्यावर साडेनऊ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा झाले, उर्वरित शेतकऱ्यांसाठी देखील आमचा लढा सुरू आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पुढील आठवड्यापासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण महापालिका पुढील आठवड्यापासून करण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणाच्या कामासाठी संस्था निश्चित करण्यात आली असून शासनाच्या मान्यतेनंतर या संस्थेचे काम सुरू होणार आहे.

फेरीवाल्यांचा प्रश्न शहरात गंभीर बनला आहे. सर्वच प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. फेरीवाल्यांनी वास्तविक पाहता फिरता व्यवसाय केला पाहिजे, पण बहुतांश फेरीवाले रस्त्यावर एकाच ठिकाणी दिवसभर उभे असतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना महापालिकेतर्फे परवाना देण्याचे काम २००६ - २००७ या वर्षी सुरू करण्यात आले होते, परंतु काही कारणांमुळे हे काम लगेचच बंद पडले, त्यानंतर सर्वेक्षण झाले नाही आणि परवाने देखील देण्यात आले नाहीत. फेरीवाल्यांच्या संदर्भात शासनाचे धोरण आहे, त्यानुसार प्रत्येक फेरीवाल्याची नोंदणी महापालिकेत झाली पाहिजे, महापालिकेने फेरीवाल्याला परवाना दिला पाहिजे, फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र रस्त्यांची व्यवस्था देखील केली पाहिजे असे निकष आहेत. हे निकष महापालिकेकडून अद्याप पाळण्यात आलेले नाहीत. त्यातच आता फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासाठी पालिका प्रशासनाने संस्था निश्चित केली आहे. संस्थेला मान्यता देण्याबद्दल शासनाला प्रस्ताव देखील पाठवला आहे. दोन-तीन दिवसात प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास पुढील आठवड्यापासून सर्वेक्षणाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरात फेरीवाल्यांची संख्या किमान ५० हजारांच्या घरात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीचा व्यास वाढवण्यास शासनाची मंजूरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरासाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत जलवाहिनीचा व्यास वाढवण्यात राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने मंजुरी दिली आहे. जलवाहिनीच्या वाढीव व्यासासह नवीन प्रस्ताव पुढील आठवड्यात महापालिकेतर्फे सादर केला जाणार आहे.

औरंगाबाद शहरासाठी एकत्रित पाणीपुरवठा योजना तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने 'पीएमसी'च्या माध्यमातून 'डीपीआर' तयार केला. या 'डीपीआर'चे सादरीकरण गुरुवार, शुक्रवार असे दोन दिवस मुंबईत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या समोर पालिका अधिकाऱ्यांनी केले. दीड हजार कोटींचा 'डीपीआर' पालिकेने तयार केला होता. या 'डीपीआर'मध्ये जलवाहिनीचा व्यास २२४५ मिलीमीटर असावा, असा उल्लेख करण्यात आला आहे. शहराचा विस्तार व पाण्याची वाढती गरज लक्षात घेता जलवाहिनीचा व्यास २२४५ मिलीमीटरवरून वाढवण्यास शुक्रवारी प्रधान सचिवांनी मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाणीपुरवठा योजनेचे नियोजन तीस वर्षांसाठी करा, असे त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. महापालिकेने तयार केलेल्या २२४५ मिलीमीटर व्यासाच्या 'डीपीआर'नुसार शहराला दररोज ३६३ एमएलडी पाणी मिळेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. आता जलवाहिनीचा व्यास २८०० मिलीमीटर करण्याचा निर्णय नवीन प्रस्तावानुसार झाल्यास किमान ५०० एमएलडी पाणी शहरात येऊ शकेल, असे मानले जात आहे.

\Bविधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मान्यता \B

जलवाहिनीचा व्यास वाढवण्यास प्रधान सचिवांनी मान्यता दिल्यामुळे पुढील आठवड्यात नवीन प्रस्ताव तयार करून तो नगरविकास खात्याला सादर केला जाणार आहे. पुढील आठवड्यात प्रस्ताव दाखल झाल्यास विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी त्याला मान्यता मिळू शकेल असेही सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धव ठाकरेंच्या साधणार आज शेतकऱ्यांशी संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या शनिवारी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांचे शहरात आगमन होणार आहे. त्यानंतर ते लासूर स्टेशन येथे रवाना होणार आहेत. लासूर स्टेशन येथे शिवसेनेतर्फे सुरू करण्यात आलेल्या पीक वीमा मदत केंद्राला ते सकाळी नऊ वाजता भेट देणार आहेत. त्यानंतर ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये असा इशारा ठाकरे यांनी यापूर्वीच दिला आहे. ठाकरे यांच्याबरोबर पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थसंकल्प रखडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद स्पीलच्या कामांची यादी वॉर्ड कार्यालयांकडून मिळत नसल्यामुळे अर्थसंकल्प तयार करण्याचे काम रखडले असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी लेखा विभागात जाऊन अर्थसंकल्पाच्या तयारीसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकसभा निवडणूकीमुळे पालिका प्रशासनाने लेखानुदान सादर केले होते, आता २०१९-२० वर्षाचा उर्वरित अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी लेखा विभागाने सुरू केली आहे, परंतु या कामाला गती आली नाही. गती न येण्याचे कारण महापौरांनी विचारले असता वॉर्ड कार्यालयांकडून स्पीलच्या कामांची यादीच मिळाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्थसंकल्प तयार करताना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करा, अशी सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी त्यांच्या बरोबर स्थायी समितीच्या सभापती जयश्री कुलकर्णी, सभागृहनेते विकास जैन उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसी पोलिसांनी रिक्षा चोरास पकडले

$
0
0

वाळूज महानगर : पुंडिलकनगर येथून चोरलेली रिक्षा वाळूज महानगरात चालवत असताना पोलिसांना बघून पळून गेलेल्या चोराला बुधवारी रांजणगाव येथे बुधवारी पाठलाग करून पकडले.

सुखदेव बारकु सहाने (४२, रा. गजानननगर, गारखेडा, औरंगाबाद) यांची ऑटोरिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरी झाल्याची घटना सोमवारी (१७ जून) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास सुरू असताना पुंडलिकनगर पोलिसांना संदीप काशिनाथ वाकळे (रा. सराई भटजी, ता. खुलताबाद) हा वाळूज महानगरातील तिरंगा चौक ते मोरे चौक या रस्त्यावरील वजन काट्याजवळ चोरीची रिक्षा घेऊन जाताना दिसला. यावेळी पोलिसांनी त्यास थांबवण्याचा इशारा केला असता, त्याने उडी मारून नाल्यातून पळ काढला होता.

बुधवारी सायंकाळी हा आरोपी हा रांजणगाव शेणपुंजी येथील एकतानगरात येणार असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख फौजदार राहुल रोडे यांनी आपल्या पोलिस पथकासह परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपी संदीप वाकळे हा एका हॉटेलवर येताच त्यास पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने नाल्यातून पळ काढला. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेऊन पुंडलिकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी साहित्याच्या समृद्ध दालनात ‘कळा’

$
0
0

औरंगाबाद :

विख्यात भारतीय साहित्यिकांनी लिहिलेल्या प्राण्यांवरील कथांचे ‘अॅनिमेलिया इंडिका’ पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या ‘कळा’ कथेचा समावेश आहे. ही सर्वोत्तम कथा पहिल्यांदाच अनुवादित होऊन इंग्रजी वाचकांपर्यंत पोहचली आहे.

प्राण्यांवर आधारित भारतीय साहित्यातील सर्वोत्तम कथांचे इंग्रजी पुस्तक ‘अॅनिमेलिया इंडिका नुकतेच प्रकाशित झाले. विख्यात भारतीय साहित्यिकांच्या वीस दर्जेदार कथांचा पुस्तकात समावेश आहे. आलेफ बुक कंपनीने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे संपादन सुमन रॉय यांनी केले आहे. या कथासंग्रहात ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या ‘कळा’ कथेचा समावेश आहे. कथेचा इंग्रजी अनुवाद अंजली नेर्लेकर यांनी केला आहे. प्राण्यांवर आधारित कथा अशी मध्यवर्ती संकल्पना असल्यामुळे बोराडे यांची ‘कळा’ कथा निवडण्यात आली. बोराडे यांनी १९७० मध्ये ही कथा लिहिली. भर पावसात अडकलेल्या गाभण गायीची फरफट कथेत दाखवली आहे. गुरांसोबत चरण्यासाठी गेलेली गाभण गाय एकटीच मागे पडते. माळरानावर अचानक तिला प्रसुतीच्या कळा सुरू होतात. आभाळ भरून आल्यामुळे माळरानावर असलेल्या एकमेव झाडाच्या आडोशाखाली जाण्यासाठी तिची धडपड सुरू होते. पण, झाडापर्यंत पोहचण्यापूर्वीच कळा वाढतात आणि पाऊससुद्धा वाढतो. वासराचे खुर बाहेर येत असल्यामुळे गायीचा झाडापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरूच राहतो. पाऊस, कळा आणि झाडाच्या त्रिकोणात गाय अडकते. वासराचे खुर आत ढकलण्याचा कसोशीने प्रयत्न करीत स्वत:भोवती फिरत राहते. उत्तम निसर्ग चित्रण आणि गायीचे भावविश्व असा ‘फिक्शन’चा वाचनीय मेळ कथेत साधला गेला होता. ही कथा आता इंग्रजी वाचकांपर्यंत पोहचली आहे.

मान्यवर लेखकांचा सहभाग
देशभर नावाजलेल्या वीस लेखकांच्या कथा पुस्तकात आहेत. या लेखकात श्री. ना. पेंडसे, प्रेमचंद, जॉर्ज ऑर्वेल, खुशवंतसिंग, हबीब कामरान, विक्रम सेठ, रस्कीन बाँड, पॉल जकारिया, पेरुमल मुरुगन, शरदच्चंद्र चट्टोपाध्याय, रूडयार्ड किपलिंग, ताकाझी शिवशकंर पिल्लई, आर. के. नारायण, नीलांजना रॉय, कनिष्क थरुर, सुजाता यांचा समावेश आहे. काही कथा मूळ इंग्रजी असून इतर कथा अनुवादित आहेत. कथासंग्रहासाठी श्री. ना. पेंडसे व रा. रं. बोराडे या मराठी लेखकांच्या कथा निवडल्या गेल्या.

संपादित इंग्रजी पुस्तकासाठी ‘कळा’ कथा निवडल्याचा आनंद आहे. मराठी वाचकांनी कथेचे भरभरुन स्वागत केले. आता इंग्रजी वाचकांच्या अभिप्रायाची उत्सुकता आहे.
- रा. रं. बोराडे, ज्येष्ठ साहित्यिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याला नडाल तर शिवसेनेच्या भाषेत समजावू!

$
0
0

विमा कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

'समोरच्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही बोलणार आणि त्याला तरीही जर समजलं नाही तर आम्ही शिवसेनेच्या भाषेत त्याला समजावू’, अशा स्पष्ट शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृषी विमा कंपन्यांना खणखणीत इशारा दिला आहे.

शिवसेनेने सुरू केलेल्या पीक विमा मदत केंद्राची पाहणी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लासूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना पीक विमा कंपन्यांना हा इशारा दिला आहे. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, आमदार संजय शिरसाठ, आमदार मनीषा कायंदे, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर आदी उपस्थित होते.

विमा कंपन्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांना नाडत योजनेमध्ये घोळ निर्माण केला आहे. हा घोळ आता उघडकीस यायला सुरुवात झाली आहे. याबाबत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, मोठमोठ्या विमा कंपन्यांच्या दलालांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे गोळा केले. ज्यावेळी नुकसानभरपाई देण्याची वेळ आली तेव्हा ते दिसत नाहीयेत. तुमची कार्यालये मुंबईत आहेत, जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला नडाल तर तुमची मुंबईतली ऑफिसेस बंद करून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी गाय वासरूचे प्रतीक देऊन स्वागत केले. ते आज मतदार संघातील शेतकऱ्यांसोबत हितगुज साधण्यासाठी लासूर स्टेशन येथे आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादला पावसाने झोडपले, घरांमध्ये पाणी शिरले

$
0
0

औरंगाबाद : शहरात रात्री पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी साचलेले पाणी घरांत घुसल्याच्या घटना शहरात घडल्या. जयभवानीनगर, सिडकोत एन ४ राठी कॉर्नर, बायजीपुरा, माता कॉर्नर, एन ८ आझाद चौक गील्टी सोसायटी, उल्कानगरीत बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर घरात पाणी घुसल्याबद्दल अग्नीशमन विभागाला मदत मागण्यासाठी कॉल आले होते. त्यांना मदत पोहचवण्यात आल्याचे अग्नीशमन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तर दर्गा परिसरात पाण्यामुळे वाहतुकीचा खोळब्याला सातारा देवळाईकडे जाणाऱ्यांना सामोरे जावे लागले. तर एमजीएम पार्कींग व एन ११ येथील महापालीकेच्या दवाखान्यात दोन झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. पावसामुळे शहरात अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता. सिबीएस (मध्यवर्ती बस स्थानक) येथे वीज पुरवठा नसल्याने प्रवाशांचे हाल झाले.

२२ ते २६ जूनमध्ये वादळी पाऊस, त्यानंतर पावसात खंड

मान्सूनचे आगमन १५ जून रोजी कोकणात झाले असले तरी अद्याप मान्सून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दाखल झालेला नाही. २२ ते २५ जून दरम्यान बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पावसाची शक्यता आणि प्रमाण कमी राहणार आहे. २६ तारखेनंतर या सर्व भागांमध्ये पावसात परत एकदा खंड आढळून येईल जो किमान आठवडाभर तरी राहणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि २६ नंतर पावसात पडणाऱ्या खंडाच्या अंदाजानुसारच पेरणी संबंधी निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर, वादळी पावसाच्यादरम्यान लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरदिवसा दोन घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी भरदिवसा दोन घरे फोडल्याच्या घटना घडल्या असून, या दोन्ही घटनेत मिळून जवळपास दोन लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश भय्याजी पोकळे (वय ४६, रा. शहानूरवाडी) यांचे घर बंद असताना २१ जून रोजी दुपारी दोन ते पावणेतीनच्या दरम्यान चोरट्याने कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडच्या कपाटात ठेवलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने, मंगळसूत्र व कानातील दागिन्यांसह ५१ हजार २०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत, २० जून रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेचारच्या दरम्यान सागर अनिल काळे (वय ३०, रा. सिडको वाळूज महानगर एक, प्लॉट नंबर ३३) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने लाकडी कपाटातील लॉकरमधून ८२ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, तीन तोळ्याचा हार, २६ हजार रुपये किमतीच्या नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तीन वेडे, २२ हजार रुपये किमतीची सोन्याची वाटी, सोन्याचे सहा ग्रॅमचे मणी, सात हजार रुपये रोख असा एक लाख ३७ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वाराने मंगळसूत्र हिसकावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात सध्या पोलिसांच्या डुलक्या आणि चोरट्यांचा उच्छाद असे चित्र आहे. रामनगर भागात मुलींच्या कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी हिसकावल्याची घटना घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

रामनगरमध्ये गुरुवारी (२० जून) रात्री साडेदहाच्या सुमारास कांचन सागर वैद्य (वय ३७, रा. प्रकाशनगर पूर्व, गल्लीनंबर चार, मुकुंदवाडी) या मैत्रिण संगिता राजू मगरे (वय ३५) यांच्यासोबत मुलींच्या कागदपत्रांची झेरॉक्स करण्यासाठी प्रकाशनगरहून रामनगरकडे निघाल्या होत्या. त्या हनुमाननगर मंदिराजवळ आल्या असता अंधारात मंदिरासमोरून काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आले. या दोघांचे वय अंदाजे २५ ते ३०च्या दरम्यान असावे. दुचाकीच्या मागील सिटवर बसलेल्या लाल रंगाचा शर्ट घातलेल्या मुलाने कांचन यांच्या गळ्यातील सोन्याचे सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावली. यावेळी कांचन आणि चोरट्याची बराच वेळ झटापट झाली. चोरट्यांना त्यांना जोराचा धक्का दिल्याने त्या खाली पडल्या. त्यांच्या हातात अर्धवट राहिलेली चैनही चोरट्याने ओढून घेतली. ३० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, १५ हजार रुपये किमतीची चैन असा एकूण ४५ हजारांचा माल घेऊन दुचाकीस्वार लंपास झाले. याप्रकरणी कांचन यांच्या फिर्यादीवरून मंगळसूत्र चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

………

\Bचोरट्याशी दोन हात

\Bचोरट्याने कांचन वैद्य यांचे मंगळसूत्र, सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कांचन यांनी बेडरपणे त्याच्याशी मुकाबला केला. मंगळसूत्र, चैन हिसकावणे शक्य होत नाही असे लक्षात येताच चोरट्याने त्यांना धक्का देऊन खाली पाडले. यावेळीही सोन्याची चैन कांचन यांच्याच हातात होती. चोरट्याने हिसका देऊन ही चैन ओढून घेतली आणि पोबारा केला. या झटापटीत कांचन यांना किरकोळ दुखापत झाली.

दरम्यान, शहरात गुटखा, दारू, अवैध गॅस अशा छोट्या-मोठ्या कारवाया करून पोलिस विभागाचे कर्तव्य दक्ष कर्मचारी पोलिस अधिकाऱ्यांकडून शाबासकी घेत आहेत. या कारवाया आवश्यक आहेतच. मात्र, शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असताना तो रोखण्यात मात्र पोलिसांना अपयश आले आहे. यात मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साक्षगंध कार्यक्रमात तृतीयपंथीयांचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सांची प्रधान व डॉ. सम्यक खैरे यांच्या साक्षगंध कार्यक्रमात तृतीयपंथीयांचा सत्कार करून प्रधान - खैरे कुटुंबियांनी समानतेचा संदेश देत एक आगळावेगळा सोहळा साजरा केला. अशा प्रकारच्या कृतीमधून तृतीयपंथीयांकडे पाहण्याची दृष्टी बदलेल असे मानले जात आहे.

माजी नगरसेवक बंडू प्रधान व उषा प्रधान यांची कन्या सांची आणि डॉ. भास्कर खैरे व डॉ. प्रभा खैरे यांचा मुलगा डॉ. सम्यक यांचा साक्षगंध सोहळा बौद्ध पद्धतीने पार पडला. यावेळी सामाजिक भान जपत समानतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने काही तृतीयपंथीयांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला शमिबा यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, 'साक्षगंध कार्यक्रमात आम्हाला सन्मान दिला हा आमच्यासाठी आनंदाचा आणि विलक्षण अनुभव देणारा क्षण आहे. यातून एक चांगला संदेश समाजात जाईल. पारंपरिक पद्धतीला सोडचिठ्ठी देवून प्रधान - खैरे कुटुंबीयांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे,' असा उल्लेख त्यांनी केला. पिंकी गुरू (श्रीरामपूर), सीमा गुरू (गंगापूर), शिल्पा गुरू (औरंगाबाद), धनश्री, हीना, आचल, पूनम आणि शमिबा, समन्वयक म्हणून काम करणाऱ्या रोहिणी या तृतीय पंथीयांना संविधानाची प्रत देवून यावेळी सन्मानित करण्यात आले.

डॉ. सत्यपाल महाथेरो, भदंत धम्म ज्योती, भदंत आनंद, भदंत बोधीरतन यांनी धम्म पद्धतीने सोहळा पार पाडला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, डॉ. कानन येळीकर, डॉ. दहाट, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. के. डी. गायकवाड, डॉ. चंद्रकांत थोरात, माजी खासदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर गजानन बारवाल, अमित भुईगळ, रतनकुमार पंडागळे, मंगल खिवंसरा यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूरकरांचे शिवसेनेवरचे प्रेम का आटले?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'गंगापूरवासीयांचे शिवसेनेवरील प्रेम का आटले,' असा भावनिक प्रश्न शनिवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लासूरस्टेशन येथील कार्यक्रमात उपस्थितांना केला. 'गंगापूरवासीयांवर माझा राग नाही, पण मला काय म्हणायचे आहे ते तुमच्या लक्षात आले आहे,' अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवानंतर उद्धव प्रथमच औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते. लासूरस्टेशन येथे पीक विमा मदत केंद्राच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या भाषणात खैरे यांच्या पराभवाचे शल्य जाणवत होते. भाषणाच्या सुरुवातीलाच ते म्हणाले, 'गंगापूरवासियांवर माझा राग नाही, पण मला काय म्हणायचे आहे ते तुमच्या लक्षात आले आहे, पण तुमचे शिवसेनेवरचे प्रेम आटले का, असा प्रश्न निर्माण होतो. प्रशांत बंब आता आपल्याबरोबर आहेत, पण ते जेव्हा प्रथम निवडणुकीला उभे होते तेव्हा आणि आता खैरेंच्या वेळी तुमचा हात मागे हटला. शिवरायांचा, शिवसेनेचा भगवा मागे कसा पडला याचा विचार करा,' असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. 'निवडणुका येतील आणि जातील, आपले नाते टिकून राहिले पाहीजे. आम्ही हे नाते टिकवणार आहोत,' असा उल्लेख ठाकरे यांनी केला. गंगापूर विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांना इतर प्रमुख उमेदवाराच्या तुलनेत फारच कमी मते मिळाली. गंगापूर हा शिवसेनेसाठी पूरक मतदारसंघ मानला जातो. याच मतदारसंघात खैरेंची पिछाडी मिळाली होती. त्या पार्श्वभमीवर ठाकरे यांनी गंगापूर मतदारसंघातील नागरिकांनी पीक विमा मदत केंद्राच्या निमित्ताने भावनिक साद घातल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

गंगापूरमध्ये शिवसेनेचा भगवा मागे का पडला, खैरेंच्या वेळी तुमचा हात मागे का हटला, गंगापूरवासीयांचे शिवसेनेवरचे प्रेम का आटले? गंगापूरवासीयांवर माझा राग नाही, पण मला काय म्हणायचे आहे, ते तुमच्या लक्षात आले आहे.

- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images