Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शटडाऊनच्या काळात वीस ठिकाणी दुरुस्तीची कामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शटडाऊनच्या काळात रिंग मेन युनिटसह मुख्य जलवाहिनीवरील वीस ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली. या कामांसाठी १२ तासांचे शटडाऊन घेण्यात आले होते. प्रत्यक्षात काम १५ तास चालले. त्यामुळे रात्री १२ वाजेच्या सुमारास जायकवाडीहून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

जायकवाडी आणि फारोळा येथे औरंगाबादच्या पाणी पुरवठा योजनेचे पंपहाऊस आहे. पंपहाऊसचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे दोन्हीही पंपहाऊससाठी रिंग मेन युनीट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे युनीट बसवल्यावर पंपहाऊसला अखंड वीज पुरवठा होईल, असे मानले जाते. त्यामुळे हे युनीट बसवण्यासाठी महावितरण कंपनीच्या सल्ल्याने रिंग मेन युनीट बसवण्यासाठी शटडाऊन घेण्यात आले. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत शटडाऊनची वेळ जाहीर करण्यात आली होती. प्रत्यक्षात हे काम रात्री ११ वाजेपर्यंत चालले. त्यानंतर जायकवाडीहून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

शटडाऊनच्या काळात जायकवाडी, फारोळा, नक्षत्रवाडी येथील पंपहाऊसमध्ये व्हॉल्व्ह बसवण्याचे काम करण्यात आले. ७०० आणि १४०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळत्या दुरुस्त करण्याची कामे सुमारे २० ठिकाणी करण्यात आली. ताहेरपूर जवळ व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम करण्यात आले. ढोरकीन येथे जमिनीखालील २४ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्यात आली. त्यातील गाळ, गवत काढण्यात आले.

रात्री १२ वाजेच्या सुमारास जायकवाडीहून पाणी पुरवठा सुरू केला जाईल असे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शटडाऊनमुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद होता. त्याचा परिणाम पुढील दोन दिवस पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेवर जाणवणार आहे. पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक एक ते दोन दिवसांनी पुढे ढकलले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तन्वीने संघर्षातून उभी केली गुणवत्तेची भक्कम इमारत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बेताची परिस्थिती. अभ्यासला पुरेशी जागा नाही. शालेय साहित्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून दहावीच्या परीक्षेत तन्वी दीपक देशमुख हिने घवघवीत यश मिळवले आहे. तिने ९६.२० टक्के गुण प्राप्त केले असून गणित विषयात विशेष रुची असलेल्या तन्वीला सीए व्हायचे आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर बंगला या गावात तन्वीचे वडील दीपक यांचे बालपण गेले. अवघी दोन एकर कोरडवाहू जमीन आणि सततचा दुष्काळ यामुळे सुमारे १४ वर्षापूर्वी ते रोजगाराच्या शोधात औरंगाबाद शहरात आले. एका ठिकाणी कायमस्वरुपी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु शिक्षण दहावीपर्यंत झालेले असल्यामुळे काही जमले नाही. त्यामुळे मिळेल त्या नोकऱ्या करून त्यांनी घर चालवले. एन आठ परिसरात भाड्याने घेतलेल्या छोट्या घरात ते कुटुंबासह राहतात. सध्या ते खासगी कंपनीमार्फत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. रोज १२ तासांहून अधिक काळ काम करूनही महिन्याला जेमतेम १२ हजार रुपये पगार त्यांच्या हाती पडतो. अशा या अत्यंत तुटपुंज्या पगारात घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि संगोपन, घरखर्च करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. मोठे कुटुंब सांभाळणाऱ्या वडिलांवर गावी राहणाऱ्या आई, वडिलांचीही जबाबदारी असून दीपक यांना साथ देत घरसंसाराला हातभार लागावा, यासाठी त्यांची पत्नीही शिवणकाम करते, परंतु त्यातून महिन्याकाठी जेमतेम हजार-पाचशे रुपयांपेक्षा अधिक मिळत नाही.

हृी होणारी आर्थिक ओढताण, आई वडिलांना करावे लागणारे कष्ट हे सर्व पहातच तन्वीचे शिक्षण सुरू होते. अर्थात आर्थिक परिस्थितीमुळे असंख्य संकटाचा सामना करतानाही आई बाबांनी तन्वीसह तिन्ही मुलांना शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले. तन्वीची लहान बहीण आठवीत व लहान भाऊ हा चौथीत शिक्षण घेत आहे.

\Bतन्वीच्या कष्टांना हवी समाजाची साथ\B

तन्वीने असंख्य आव्हानांना सामोरे जात दहावीचा टप्पा यशस्वीरित्या पार केला. तिला आता सीए होण्याची इच्छा आहे. सीए होऊन आई वडीलांची अपेक्षा पूर्ण करतानाच काही तरी आयुष्यात करुन दाखविण्याची तिची जिद्द आहे. पैशांअभावी तिचे स्वप्न अपुरे राहू नये, असे तिच्या पालकांना वाटते. दहावीप्रमाणे सीए होण्यासाठी खूप अभ्यास करण्याची तिची तयारी आहे. तन्वीच्या कष्टांना गरज आहे ती फक्त आर्थिक मदतीची. समाजाच्या दातृत्वाची मदत तिला झाली तर, तिचे स्वप्नपूर्ती होण्यासाठी मोठा हातभार लागेल.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभक्त राहणाऱ्या पत्नीवर पतीचा बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पतीपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीवर पतीने जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार जिन्सी भागात घडला. फेब्रुवारी २०१९ ते जून २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पतीविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील फिर्यादी महिला ४० वर्षांची असून, पतीपासून सहा महिन्यांपासून विभक्त राहते. पती तिच्यावर संशय घेत असल्याने दोघे वेगळी राहत असून, त्या दोघांचे महिला साह्य कक्षात प्रकरण सुरू आहे. यादरम्यान पतीने पत्नीला परत नांदवण्याचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार; तसेच अनैसर्गिक कृत्य केले. या महिलेने नकार दिला असता तिला शिवीगाळ करीत मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पती मोहम्मद नईम अन्सारी मोहम्मद करीम अन्सारी याच्याविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआय गिते याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातव्या वेतन आयोगासाठी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी शनिवारी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे शनिवारी विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज होऊ शकले नाही. येत्या १५ जुलैपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनाची घोषणा न झाल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शनिवारी काम बंद आंदोलन केले. काळ्या फिती लावून सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके यांनी आंदोलकांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन कुलगुरू शिंदे यांनी दिले. बंदमुळे विविध शुल्क व अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाली. या सर्व प्रकियेसाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे. आंदोलनात शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पर्वत कासुरे, उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, अनिल खामगावकर, जीवन डोंगरे, नजमा खान, सुनंदा सरवदे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसईबीसी’च्या प्रवेश शुल्काचा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात सवलत द्या, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे केली आहे.

मराठा जातीतील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने 'एसईबीसी' हा स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण जाहीर केले आहे. या आरक्षणानुसार राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, राखीव जागाच्या प्रवेशासाठीचे प्रवेश शुल्क खुल्या प्रवर्गानुसार आकारले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुष्काळाने राज्यातील परिस्थिती बिकट असून विद्यार्थ्यांना अतिरिक्त शुल्क भरणे परवडत नाही. प्रवेश शुल्काबाबत विद्यापीठ स्तरावर कोणतीही सूचना नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन देत प्रवेश शुल्कात सवलत देण्याची मागणी केली. याबाबत मार्गदर्शन मागवण्यात येईल असे आश्वासन कुलगुरूंनी दिली. यावेळी अमोल दांडगे, दीपक बहिर, पांडुरंग नखाते, दीक्षा पवार, सचिन मगर, मंगेश शेवाळे परमेश्वर काष्टे, हरिभाऊ विटोरे, रवी माने आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेरणाच्या यशाने दाखवला आशेचा किरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीच्या परीक्षेत प्रेरणा थोरात या विद्यार्थिनीने ९१.२० टक्के गुण मिळवत भीमशक्तीनगर वस्तीत आशेचा किरण दाखवला. मार्गदर्शन आणि सुस्थितीचा अभाव असल्याने शेकडो मुले शिक्षणाच्या वाटेवर भटकतात. जिद्दीने अभ्यास करीत प्रेरणाने मिळवलेले यश गरीब विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

सातारा (खंडोबा) गावातील भीमशक्तीनगर या डोंगर पायथ्याशी असलेल्या वस्तीत थोरात कुटुंब राहते. पायाभूत सुविधांचा ठणठणाट असलेल्या वस्तीत चिकाटीने अभ्यास करणे आव्हानात्मक असते. चिखलाने भरलेला रस्ता आणि पाणी टंचाई बारा महिने सोबतीला. प्रेरणाची आजी रमानगर येथे राहते. या भागात महापालिकेचे पाणी येत असल्याने प्रेरणा व तिची आई अनेकदा कपडे धुण्यासाठी रमानगरात जातात. कारण, दररोज टँकरचे पाणी विकत घेणे त्यांना परवडत नाही. सगळ्या वस्तीची हिच परवड. घरची जबाबदारी सांभाळून कविता थोरात ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेत काम करतात. प्रेरणाचा भाऊ याच शाळेत आठवीत शिकतो. बहिण-भाऊ अभ्यास सोबत करतात. सातारा गावातून सहकारनगरपर्यंत येण्यासाठी अनेकदा पायी प्रवास केला. कधी उशीर झाल्यास विनवणी करून एखाद्या वाहनाची 'लिफ्ट' घेत शाळा गाठतात. ही तारेवरची कसरत केवळ परिस्थितीमुळे करावी लागते. या परिस्थितीतही प्रेरणाने अभ्यासातील सातत्य टिकवले. 'गणित व विज्ञान विषयाची धास्ती वाटत होती. पण, अवघड वाटणारा अभ्यास अगोदर करायचा. ध्येय निश्चित करून अभ्यास केल्यास मनावर ताण राहणार नाही असे शिक्षिका निशिगंधा मुखेडकर यांनी सांगितले. त्यांनीच गणिताची तयारी करून घेतली व मार्गदर्शन केले', असे प्रेरणा सांगते. पहाटे लवकर उठून अभ्यास करण्याला तिने प्राधान्य दिले. अत्यंत सुबक अक्षर असलेल्या प्रेरणाला दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळाले. एवढे घवघवीत यश मिळवणारी प्रेरणा शाळेतील एकमेव विद्यार्थिनी आहे. या प्रवासात मामा आणि आजीने प्रेरणाला पाठबळ दिले. इंजिनीअर होण्याचे ध्येय असलेल्या प्रेरणाला आर्थिक मदतीची गरज आहे. तिचे यश प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरक आहे. मात्र, तिने ध्येय गाठले तरच सर्वांना दिशा मिळणार आहे. त्यामुळे दानशूर नागरिकांनी प्रेरणाच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावण्याची गरज आहे.

\Bशिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेर

\Bअकरावीत प्रवेश घेतलेली प्रेरणा इंजिनीअरिंगची तयारी करीत आहे. प्रयत्नपूर्वक अभ्यास करून 'आयआयटी'त प्रवेश मिळवण्याचे तिचे स्वप्न आहे. मात्र, शैक्षणिक खर्च आवाक्याबाहेर असल्याने थोरात कुटुंब चिंतेत आहे. या कामगार कुटुंबाला प्रेरणाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तिमिरातून तेजा’कडे शिक्षणच नेते!

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पारधी समाजातील तरुण, लहान मुलांमध्ये शिक्षणामुळे बदल येवू शकतो. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करून तिमिरातून तेजाकडे नेण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,' असे आवाहन ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी व्यक्त केले.

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने शनिवारी आयोजित पारधी समाजाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. पारधी समाजातील मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटावे, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचाव्यात यासाठी कैलास शिल्प येथे हा मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमात एकात्मिक आदिवासी विभाग, प्रकल्प अधिकारी गजानन फुंडे, तहसीलदार सतीश सोनी यांची उपस्थिती होती. यावेळी मोक्षदा पाटील म्हणाल्या, 'पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या कार्यक्रमामुळे पोलिसांसोबत एक संवादाची प्रकिया सुरू झाली आहे. त्याची मदत गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त होवून शिक्षणाच्या प्रवाहात एक उत्तम नागरिक होण्यासाठी होईल. या योजनेचा सर्वांनी लाभ घेवून स्वत:मध्ये बद्दल घडवावेत,' असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पोलिस निरीक्षक किरण बिडवे आदींनी परिश्रम घेतले. अपर पोलिस अधीक्षक गणेश गावडे, उप विभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल, ग्रामीण मधील विविध पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच पारधी समाजातील पाचशे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० टक्के बांधकाम करून भोगवटा प्रमाणपत्र घ्यावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एमआयडीसी'च्या औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या भूखंडांना चाळीस टक्‍के बांधकाम करून भोगवटा प्रमाणपत्र घेण्याचा नवा नियम लागू करण्यात आला आहे. अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे उद्योजक संभ्रमात सापडले आहेत. सर्वेक्षण करून तपासणी करण्याची सूचना 'एमआयडीसी'च्या अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे जुन्या नियमाने बांधकाम केलेल्या उद्योगांची अडचण वाढणार आहे.

'एमआयडीसी'कडून भूखंड घेऊन त्यांच्यावर दहा ते वीस टक्के बांधकाम करून भोगवटा प्रमाणपत्रे घेणाऱ्या उद्योगांची संख्या मोठी असल्याचा दावा 'एमआयडीसी'चा आहे. राज्यात उद्योगांना देण्यासाठी विद्यमान वसाहतींमध्ये जागा नसल्याने हे बांधाकाम चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत करण्याचा नवा नियम 'एमआयडीसी'ने २१ जून रोजी लागू केला. या नियमाला उद्योजकांनी विरोध दर्शविला आहे. या परिपत्रकाच्या विरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. औद्योगिक वसाहतींमध्ये किती कंपन्यांनी किती बांधकाम करून भोगवटा प्रमाणपत्र घेतले ? याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे नाही. चाळीस टक्‍क्‍यांपेक्षा कमी बांधकाम करून भोगवटा प्रमाणपत्र असलेल्या कंपन्यांची संख्या किती ? याबाबत माहिती विचारली असता सर्वेक्षण करूनच ती माहिती समोर येईल, असे 'एमआयडीसी'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परिपत्रकात नमूद नियमानुसार कमी चटईक्षेत्र असलेल्या कंपन्यांना २१ जुलै पर्यंत नोटिसा बजावण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळेची भरमसाठ शुल्कवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पालकांना विश्वासात न घेता केलेली भरमसाठ शुल्कवाढ मागे घ्या, अशी मागणी करत लिटल फ्लावर शाळेच्या पालकांनी शनिवारी शिक्षणाधिकारी कार्यालयात तासभर ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी सात दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले.

छावणी परिसरातील या शाळेने यंदा दरमहा शुल्कात साडेचारशे रुपयांपर्यंत वाढ केली आहे. अचानकपणे झालेल्या शुल्कवाढीमुळे पालकांनी काही दिवसांपूर्वी शाळा प्रशासनाला विचारणा केली. त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने शनिवारी पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली. शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल जागेवर नसल्याने त्यांच्या दालनाबाहेर पालकांनी ठिय्या मांडला. संतापलेल्या पालकांनी ठिय्या मांडून बसल्याचे कळताच शिक्षण विभागाच्या हालचालींना वेग आला. शाळेने विश्वासात न घेता शुल्कवाढ केल्याचा आरोप पालकांनी केला. वाढलेल्या शुल्कामुळे पालकांच्या खिशाला सुमारे पाच हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागेल, असे पालकांनी सांगितले. शुल्कवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी पालकांनी केली. पालकांचा वाढता रोष लक्षात घेत शिक्षण विभागाकडून चौकशीचे आश्वासन देण्यात आले. पालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अशा आहेत मागण्या

निवेदनात म्हटले आहे की, ठराविक ठिकाणाहूनच पुस्तके खरेदी, तेराशे रुपये किमतीची शालेय डायरी घेण्यासाठी सक्ती केली जाते. मुले-मुलींच्या स्वच्छतागृहांची अवस्थाही वाईट आहे. त्यासह आता शुल्कवाढ अशा नफाखोरीस आळा घालावा. शाळेवर प्रशासन नियुक्त करण्यात यावा, अधिनियमानुसार पालक, शिक्षक संघ तयार करावा, कार्यकारिणी समिती व पालक संघाच्या जनरल बैठका घेण्यात याव्यात, शुल्क किती याबाबत दर्शनीभागात प्रकाशित करावे, अल्पसंख्याक दर्जा तपासण्यात यावा, शुल्क विनियमन अधिनियम २०११, दिनांक १३ एप्रिल २०१६ कलम १४(क),(ख), (ग) कलम १५ मधील संपूर्ण अभिलेख तपासावेत या मागण्या करण्यात आल्या आहेत.

सात दिवसांत चौकशी

पालकांच्या आंदोलनानंतर शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले. शाळेसंबंधीच्या विविध मुद्द्यांबाबत शाळेची चौकशी करू. त्यासाठी सात दिवसांच्या आत चौकशी समिती नियुक्त करून चौकशी समितीच्या अहवालानुसार संबंधित शाळेविरुद्ध कारवाई करण्यात येईल, या आश्वासनानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले.

शाळेने शुल्कवाढ मोठ्या प्रमाणात केली आहे. पाच हजार रुपयांची वर्षाकाठी वाढ आहे. त्यासह इतर शैक्षणिक साहित्यासाठी सक्ती असे अनेक प्रकार पालकांना आर्थिक संकटात टाकणारे आहेत. हे प्रकार थांबवित शुल्कवाढ मागे घ्यावी, अशी आमची पालकांची मागणी आहे.

- विजय शिंदे, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात हलक्या सरी

$
0
0

औरंगाबाद : शहरात ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाने आल्हाददायक वातावरण तयार झाले. शहराच्या अनेक भागात शनिवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी सोमवारपासून पाऊस सक्रिय होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमेरिकन लष्करी अळीचे जिल्ह्यात संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मका पिकावर येणारी अमेरिकन लष्करी अळीचे यंदा संकट असून जिल्ह्यातील चौका, गदाना आदी भागात तिचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करा, खबरदारी म्हणून पाच जुलैपूर्वी मक्याची पेरणी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले.

अमेरिका, आफ्रिका असा प्रवास करत आलेल्या लष्करी अळीचे संकट मोठे आहे. मका पिकावर प्रामुख्याने पडणारी ही अळी ज्वारीसह इतर पिकांनाही लक्ष करते. सुमारे ८० पेक्षा जास्त वनस्पतीवर ही अळी जगू शकते. या अळीमुळे मक्याचे २० ते ६० टक्के नुकसान होते. औरंगाबादसह जालना व शेजारी बुलढाणा जिल्ह्यात प्रामुख्याने मका पिकाचे उत्पादन घेतले जाते. औरंगाबाद तालुक्यातील चौका, खुलताबादेतील गदाना, सालुखेडा, कन्नड तालुक्यातील रिठ्ठी या गावांमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. बीज प्रक्रिया केलेल्या सुमारे ३५ टक्के बियाण्यांची यंदा विक्री झाली, अशी माहिती डॉ. मोटे यांनी देताना आतापर्यंत जिल्ह्यात मक्याचा सुमारे पन्नास टक्के पेरा झाला आहे. ज्यांनी अद्याप पेरणी केली नाही त्यांनी सायन्ट्रॅनिलीप्रोल आणि थायोमिथॉक्झॅम या कीडनाशकाची बीज प्रक्रिया केलेले बियाणे खरेदी करावे, जर विना बीजप्रक्रिया बियाणे खरेदी केले असेल तर, या कीडनाशकाची खरेदी करून बियाण्यास बीज प्रकिया करूनच लागवड करावी, असे आ‌वाहन त्यांनी केले आहे.

\B...हे उपाय करा

\Bमका लागवडीनंतर ही अळी हल्ला करते. त्यामुळे पेरणीपासूनच दक्ष राहा. निंबोळी अर्काची व बीटी या जैविक तसेच बुरशीजन्य कीटकनाशकाची फवारणी करा. आवश्यकेतनुसार रासायनिक कीटकनाशकची फवारणी करा, कामगंध सापळा लावून नर पतंग मारा, जमिनीवर गुळाचे पाणी फवारा, प्रकाश सापळे लावा, मक्याच्या चार ओळीनंतर तूर, मूग, उडीद या पिकाच्या दोन ओळी घ्याव्यात. मक्याभोवती चवळीची लागवड करा, एकात्मिक किड व्यवस्थापन करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे ‘भगवा महाराष्ट्र’ अभियान सोमवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुलै महिन्यात शिवसेनेतर्फे 'माझा महाराष्ट्र - भगवा महाराष्ट्र' हे अभियान राबवले जाणार आहे. जिल्ह्यात १ ते ३१ जुलैपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास यांनी दिली.

दानवे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. या अभियानाअंतर्गत शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेतर्फे पंचायत समिती क्षेत्र निहाय कार्यकर्त्यांच्या बैठका - मेळावे घेतले जाणार आहेत. शहरात विभागनिहाय बैठका व मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख आमदार मनीषा कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम होणार आहेत. ग्रामपंचायतनिहाय शाखाप्रमुख नेमण्याच्या कामाला या अभियानाच्या दरम्यान गती दिली जाणार आहे. पीक विमा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतकऱ्यांचे पीक कर्ज या बद्दल शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेवून कृती कार्यक्रम आखला जाणार आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय देखील बैठका व मेळावे घेतले जाणार आहेत. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

\Bयुवतींसाठी संरक्षण शिबिर

\B२३ जुलै रोजी महिलांसाठी जिजाऊ कवच योजना, २५ जुलै रोजी युवतींसाठी स्वसंरक्षण शिबिर, २९ जुलै रोजी विद्यार्थी जनजागरण मोहिमे अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, ३१ जुलै रोजी भूमिपूत्र रोजगार मोहीम हे कार्यक्रम घेतले जाणार आहेत, अशी माहितीही दानवे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यात जलसंकट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी येथे महापालिकेने सुरू केलेल्या आपत्कालीन पाणीपुरवठा योजनेचे फ्लोटिंग पंप संकटात सापडले असून, गाळ आणि गवतामुळे वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे पालिकेची यंत्रणा हतबल झाली आहे.

शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर जायकवाडी आणि फारोळा येथे पंप हाउस तयार करण्यात आले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यावर या दोन्हीही पंप हाउसचे काम बंद पडायचे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत व्हायचा. पंप हाउसला अखंड वीजपुरवठा व्हावा म्हणून जायकवाडी आणि फारोळा या दोन्हीही ठिकाणी महावितरण कंपनीच्या मदतीने रिंग मेन युनिट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम शुक्रवारी करण्यात आले. त्यासाठी बारा तासांचा शटडाउन घेण्याचे जाहीर करण्यात आले होते, पण प्रत्यक्षात पंधरा तास काम चालले. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास जायकवाडीहून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शहरात पाणी येण्यासाठी पहाटे चार वाजले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी शनिवारी दिली.

पंप हाउससाठी रिंग मेन युनिट बसवले असले तरी आता पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन संकट निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले उपस्थित होते. जायकवाडी धरणातील पाणी पातळी खूप खाली गेली आहे. मृत जलसाठ्यातून पाणी उचलावे लागत आहे. त्यासाठी महापालिकेने आपत्कालीन योजना कार्यान्वीत केली. या योजनेच्या माध्यमातून सहा फ्लोटिंग पंप जायकवाडीच्या कालव्यात सोडण्यात आले. फ्लोटिंग पंपच्या माध्यमातून पाणी उपसून ते मुख्य पंप हाउसच्या विहिरीत टाकण्याचे काम सध्या केले जात आहे. मुख्य पंप हाउसच्या विहिरीतून पाणी उपसून ते शहरापर्यंत पाठवले जाते. आता फ्लोटिंग पंप संकटात सापडले आहेत. या पंपांमध्ये गवत आणि गाळ अडकत आहे. त्यामुळे दर दीड - दोन तासांनी फ्लोटिंग पंप बंद करावे लागतात. अडकलेले गाळ - गवत काढल्यानंतर पुन्हा हे पंप सुरू करावे लागतात. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेचा खोळंबा होतो. जो पर्यंत जायकवाडी धरणातील पाणी पातळी वाढणार नाही तो पर्यंत ही समस्या वारंवार भेडसावत राहणार आहे.

पालिका हद्दीबाहेरच्या नागरिकांचे हाल

सध्या जायकवाडी धरणातील पाणी पातळी खोल गेली आहे. त्यामुळे फ्लोटिंग पंपांमध्ये गाळ आणि गवत अडकत आहे. दर दोन तासांनी हे पंप बंद ठेवावे लागतात. गाळ, गवत काढल्यानंतर पुन्हा पंप सुरू करावे लागतात. जो पर्यंत धरणातील पाणी पातळी वाढणार नाही, तोपर्यंत ही समस्या सुरूच राहणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही शहरवासीयांना पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे. तर अजून जोरदार पाऊस न झाल्यामुळे बोअरवेलला पाणी आले नाही. त्यामुळे महापालिका हद्दीबाहेरील नागरिकांचे हाल सुरू असून, टँकरचे दर जवळपास हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीचे अर्ज भरण्याची मुदत चार जुलैपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) आणि आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून वेळापत्रकात बदल करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे बदल करण्यात आले. नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना अर्जातील भाग-एक, भाग-दोन भरण्यासाठी चार जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासह एसईबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थी तीन महिन्यांपर्यंत प्रमाणपत्र सादर करू शकतात तशी मुभा देण्यात आली आहे.

मराठा आरक्षण कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरवला. निर्णयामुळे शैक्षणिक प्रवेशात समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. सध्या अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. निर्णयानंतर त्या दृष्टिकोनातून बदल करण्यात आले. सध्या कोटा अॅडमिशन, शून्य फेरीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. नव्या बदलानुसार चार जुलैपर्यंत अर्ज भरता येतील. त्यानंतर पाच जुलै रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. सहा ते आठ जुलैदरम्यान दुरुस्ती करता येईल. पहिली सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही १२ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील पात्र विद्यार्थ्यांनी १३ ते १६ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करायचे आहेत. १६ जुलै रोजी रिक्त जागांचा तपशील आणि कट ऑफ जाहीर करण्यात येईल. यानंतर १७ आणि १८ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करता येईल. दुसरी सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही २२ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. या यादीतील पात्र विद्यार्थ्यांना २३ ते २५ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करावे लागतील. २५ जुलै रोजी सायंकाळी दुसऱ्या फेरीनंतरच्या रिक्त जागा जाहीर केल्या जाणार आहे. २७ आणि २९ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना अर्जामध्ये बदल करता येईल. तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी एक ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना दोन ते पाच ऑगस्टदरम्यान प्रवेश निश्चित करावे लागतील. पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता या फेरीतील रिक्त जागा आणि कटऑफ वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल. सहा ते सात ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करता येईल.

\Bनऊ ऑगस्ट रोजी विशेष फेरी \B

अकरावीसाठी विशेष फेरीही घेतली जाणार आहे. तिसऱ्या फेरीनंतर अर्जातील दुरुस्ती, नव्याने अर्ज भरण्याची संधी या प्रक्रियेनंतर नऊ ऑगस्ट रोजी विशेष फेरीसाठीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांनी दहा ते १३ ऑगस्ट रोजी प्रवेश निश्चित करायचे आहेत. त्यानंतर उर्वरित रिक्त जागांची यादी १४ ऑगस्ट रोजी वेबसाइटवर जाहिर केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा हेल्पलाइन: ‘सीए झालो, तर संपूर्ण कुटुंबाचा आधार होईल

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B

महापालिकेच्या सिडको एन ७ येथील शाळेत हुशार म्हणून गणल्या गेलेल्या संतोष किसन शिंदे या विद्यार्थ्याने हा विश्वास सार्थ करत दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले आहेत. मध्यरात्रीपर्यंत जागून अभ्यास केल्याचे त्याची आई भारती व वडील किसन शिंदे यांना कौतुक वाटत आहे. पण, पुढील शिक्षणाची चिंता त्यांना सतावत आहे. त्याच वेळी सीए होण्याचे ध्येय बाळगलेल्या संतोषला 'मी सीए झालो, तर संपूर्ण कुटुंबाचा आधार होईल,' असे वाटते.

संतोषचा लहान भाऊ रमेश हा सुद्धा ताच्या सोबतच दहावीत होता. त्यालाही ८९.४० टक्के गुण मिळाले आहेत. हे कुटुंब मूळ वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातल्या बिबेवाडी येथील आहे. किसन शिंदे हे शेतात राबून खर्च भागवायचे, पण संतोषचा जन्म झाल्यानंतर शहरात पगार मिळेल व मुलाला शिकवता येईल, असा विचार करून त्यांनी मुंबई गाठली. काही वर्षे मुंबई काढून हे कुटुंब औरंगाबाद येथे इ.स. २००० मध्ये आले. सुनील, रमेश, आठवीत शिकणारा प्रकाश आणि सहावीत शिकणारा अनिल, भारती यांच्या मावशी सरसबाई गव्हाणे यांच्यासह हे सात जणांचे कुटुंब आहे. किसन शिंदे हे मातीकाम आणि भारती धुणीभांडी करतात. दोघांचे मिळून महिन्याचे उत्पन्न सात ते आठ हजार रुपये असून घरभाडे तीन हजार रुपये आहे. उर्वरित पैशात कुटुंबकबिला चालावावा लागतो. 'संतोष आणि रमेश यांनी मन लाऊन अभ्यास केला. शाळा सुरू होण्यापूर्वी आणि मध्यरात्र झाली तरी ते अभ्यास करत असत,' असे संतोषचे इंग्रजी भाषेचे शिक्षक व्यंकट जाधव यांनी सांगितले. मुख्याध्यापिका हेमलता भुयार यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकरिता स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिली. शाळा सुटल्यानंतर मुले रात्री ११ पर्यंत शाळेत अभ्यास करत असत. आपले घर, परिस्थितीचा जराही बाऊ न करता संतोष याने अभ्यास केला. इतक्या कमी वयातील संघर्षाचा खरा कस आता लागणार असला तरी समाजाच्या दातृत्वाने संघर्षाची वाट सुखद होईल.

\Bभालाफेकमध्ये प्रावीण्य

\B

संतोष याने शाळेत सामान्य ज्ञानाची परीक्षा असो की मैदानी खेळ, सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. भालाफेकमध्ये त्याचने राज्य पातळीपर्यंत मजल मारली. 'संतोष आमच्या शाळेतील अत्यंत हुशार विद्यार्थी आहे. लिखाण, संभाषण, सामान्यज्ञान यातही तो शाळेत पहिल्या दहा विद्यार्थ्यांत होता. दहावीत तो यश मिळवेल याची खात्री मला होती,'असे मुख्याध्यापिका हेमलता भुयार यांनी सांगितले.

\Bक्लाससाठी नोकरी \B

दहावीची परीक्षा झाल्यापासून संतोष बजरंग चौकातील एका ज्वेलरीच्या दुकानात कामाला जातो. तेथे सकाळी दहा ते दुपारी एक व दुपारी चार ते रात्री नऊ पर्यंत काम करतो. त्याला सध्या अडीच हजार रुपये पगार मिळतो. या रकमेतून त्याला स्वतःची आणि रमेशच्या कॉम्प्युटर क्लासची फी भरायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाथवंशजांची गाडी ओढण्याची हटकरवाडीच्या गावकऱ्यांची परंपरा यंदाही कायम

$
0
0

\B \Bम. टा. प्रतिनिधी, पैठण

संत एकनाथ महाराजांच्या पालखीसोबत आलेल्या नाथवंशजाना बैलगाडीमध्ये बसवून ती तीन किलोमीटर ओढून डोंगराच्या पलीकडे नेण्याची परंपरा शिरूर कासार तालुक्यातील हटकरवाडी गावच्या तरुणाने यावर्षी सुद्धा सुरू ठेवली. हटकरवाडीच्या तरुणांनी रविवारी चिखलातून नाथवंशजाची गाडी ओढून डोंगरमाथ्यावर पोहचवली.

संत एकनाथ महाराजांच्या पालखीने २४ जून रोजी पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले. पालखी सात मुक्कामानंतर रविवारी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हटकरवाडी येथे सकाळी दहा वाजता पोहोचली. नाथांच्या दिंडीचा पुढचा मुक्काम पाटोदा येथ असतो. दिंडी हटकरवाडी येथून गारमाथा डोंगर चढून पाटोद्याकडे प्रस्थान करते. हा रस्ता दगड-धोंड्यांचा अत्यंत खडतर आहे. या रस्त्यावरूनच वारकऱ्यांना पायी प्रवास करावा लागतो.

अनेक वर्षांच्या परंपरेनुसार, हटकरवाडी येथील तरुण पालखीसोबत आलेल्या नाथवंशजाना बैलगाडीत बसून स्वतः गाडी ओढत त्यांची गाडी डोंगरापलीकडे नेतात. रविवारी, पालखीसोबत आलेल्या वारकऱ्यांचा पाहुणचार केल्यानंतर हटकरवाडीच्या गावकऱ्यानी नाथववंशजाना एका सजविलेल्या बैलगाडीत बसवले. गावातील तरुणांनी स्वतः नाथवंशज बसलेल्या बैलगाडीला चिखलातून मार्ग काढत, बैलगाडी तीन किलोमीटर ओढत नाथवंशजाना डोंगरमाथ्यावर पोहचवले. हटकरवाडीचे गावकरी या क्षणाची वर्षभर वाट पाहतात. तरुणांद्वारे नाथवंशजांची बैलगाडी ओढण्याच्या कार्यक्रम पाहण्यासाठी या भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

\B६० दिंड्यांचा आतापर्यंत सहभाग \B

संत एकनाथ महाराजांच्या पालखी विषयी पालखी प्रमुख तथा नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी यांना विचारले असता ते म्हणाले, यावर्षी आतापर्यंत १५ हजार वारकरी व ६० दिंड्या नाथांच्या दिंडीत सहभागी झाल्या आहेत. येत्या काही दिवसात वारकऱ्यांची संख्या लाखाच्या घरात जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

\Bयंदा वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ

\Bनाथांची पालखी सात दिवसानंतर पाटोदा येथे पोहचते. पाटोदा येथे पोहचल्यावर साधारणतः पंधरा ते वीस हजार वारकरी या दिंडीत सहभागी होतात. मात्र, यावर्षी नाथांच्या दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. पाटोदा येथे पोहोचविण्याच्या अगोदरच दिंडीमध्ये जवळपास ५० हजार वारकरी सहभागी झाल्याची माहिती नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभा निवडणुकीतही लोकसभेची पुनरावृत्ती

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, फुलंब्री \B

'आश्वासनापेक्षा कृतीने काम करणारे केंद्र व राज्य सरकार असल्यानेच जनतेने केंद्रात स्पष्ट बहुमत दिले. राज्यातही हेच चित्र पहावयास मिळणार आहे,' असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

फुलंब्री येथे पाच कोटी रुपयांच्या फुलंब्री येथील विविध १५ कामांचे भूमीपूजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित मंत्री दानवे व सावे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी केले.

यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, सध्या उद्योजक भिवंडी व चाकणला प्राधान्य देतात. पण, समृद्धी महामार्गामुळे अनेक उद्योग औरंगाबाद व जालना येथे येणार आहेत. पुढील काळात ही दोन्ही शहरे जोडशहरे म्हणूनच दिसतील. समृद्धी महामार्ग हा दोन ते अडीच वर्षात पूर्ण होणार असून बारा कंत्राटदारांना विभागून काम दिले आहे. मुख्यमंत्री स्वत: या रस्त्याची पाहणी करणार आहेत. यामुळे आतापासूनच उद्योजक औरंगाबाद व जालना येथे जागेची मागणी करत आहेत, असा दावा दानवे यांनी केला.

\Bविरोधकांची चिंता खोटी \B

समृद्धी महामार्गात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्याची खोटी चिंता करत आडकाठी केली होती. शरद पवार देखील यासाठी औरंगाबादेत आले होते. पुणे, बारामती, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे रस्ते बांधले तेव्हा पवारांनी चिंता केली नाही, असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी माजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, डॉ. नामदेव गाडेकर, देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, दामोधर नवपुते, सभापती सर्जेराव मेटे, शिवाजीराव पाथ्रीकर, जितेंद्र जैस्वाल आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्याची बॅग पळवली; ‘मकोका’त जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाथरीतील सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याच्या दुचाकीला कारने धडक देऊन त्याच्या जवळील १२ लाख १६ हजारांचा ऐवज असलेली बॅग हिसकाविणाऱ्या टोळीतील प्रताप मधुकर म्हस्के याचा 'मकोका'तील नियमित जामीन अर्ज विशेष न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी फेटाळला.

पाथरी येथील सोन्याचे व्यापारी श्रीकांत डहाळे हे १३ फेâब्रुवारी २०१९ रोजी दुकान बंद करून मित्र शेख सौरभ शेख अमजद यांच्यासोबत दुचाकीवरून घराकडे जात होते. त्यावेळी जिल्हा परिषद मैदानाजवळ भरधाव आलेल्या कारचालकाने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार व व्यापारी खाली पडले. रस्त्यावर पडलेली व्यापाऱ्याच्या हातातील बॅग घेऊन आरोपी कारमधून पळून गेले. त्या बॅगमध्ये रोख ९२ हजार रुपये व सोन्या-चांदीचे दागिने, असा १२ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज असल्याचे शेख सौरभ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन गौतम भगवान आदमाने, किरपानसिंग हत्यारसिंग टक, प्रताप मधुकर म्हस्के, रुपसिंग चतुरसिंग टका यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर 'मकोका'अंतर्गत कारवाई करून १४ एप्रिल २०१९ रोजी अटक करण्यात आली. सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, त्यातील आरोपी प्रताप मधुकर म्हस्के याने नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. सुनावणीवेळी, आरोपी प्रतापच्या ताब्यातून एक लाख ९५ हजारांचा ऐवज तपासादरम्यान जप्त केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे आरोपीचा गुन्हेगारी टोळीत सक्रीय सहभाग असल्याचे निष्पन्न होत असून त्याला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव अणू शकतो. त्यामुळे त्याला जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती विशेष सरकारी वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपी प्रताप म्हस्केचा जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्पोरेटसाठीच ‘एस्टॅब्लिशमेंट’चा घाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉक्टरांवर जीवघेणा हल्ले सुरू असतानाच, दुसरीकडे लहान-लहान क्लिनिक, नर्सिंग होमचे अस्तित्वच शिल्लक राहू नये व सर्व डॉक्टरांनी नाईलाजाने कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्येच नोकरी करावी, यासाठी 'क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट'चा घाट घातला जात आहे. परिणामी, वाजवी दरात योग्य उपचार होणेच कठीण होऊन बसेल आणि प्रत्येक वेळी मोठ्या-कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेणेही सर्वार्थाने गैरोसोयीचे होईल, अशी भीती शहरातील डॉक्टरांनी 'डॉक्टर्स डे'निमित्त व्यक्त केली आहे.

'झिरो टॉलरन्स टू व्हायलन्स अगेन्स्ट डॉक्टर्स अँड क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट' अशी यंदाची थीम असून, दरवर्षी एक जुलै रोजी हा दिवस राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. सद्यस्थितीत डॉक्टरांवर व रुग्णालयांवर होणारे हल्ले हे गंभीर व दूरगामी परिणाम करणारे असल्याचे सांगत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र खडके म्हणाले, आज वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवणेच महाकठीण झाले असून, पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण होईस्तोवर डॉक्टरची पस्तीशी येते आणि प्रत्येक अभ्यासक्रमाला एका-एका वर्षाची सेवाही द्यावी लागते. त्यानंतरही डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले होत असल्याने डॉक्टरांमध्ये कमालीची असुरक्षेची भावना आहे. त्यामुळेच आज डॉक्टर बॅकफुटवर जात आहेत. दुसरीकडे, 'क्लिनिकिल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट' आणला तर वाजवी दरात उपचार मिळणेच कठीण होणार असल्याचे डॉ. खडके म्हणाले. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळेच डॉक्टर कोणतीही जोखीम न घेता गंभीर रुग्णांना रेफर करणार व यात रुग्णांचेच नुकसान होणार आणि हल्ल्यांमुळेच विश्वासाचे नाते ढासळत असल्याचे नियोजित शहराध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर म्हणाले. रुग्णांचे 'आऊटकम' जाणून न घेताच अतिअपेक्षा घातक ठरत असल्याचे हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. कुलदीपसिंग राऊळ म्हणाले. तर, हल्लेखोरांवर गुन्हे दाखल होऊन शिक्षा होणे आजची गरज आहे, असे 'आयएमए'चे शहराध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा लाखांचे मंगळसूत्र पळवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी डोके वर काढत ज्येष्ठ नागरिक महिलेचे सव्वा लाखांचे मंगळसूत्र लंपास केले. २६ जून रोजी सकाळी नऊ वाजता ज्योतीनगर भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शारदा राजकुमार रामचंदानी (वय ५७, रा. आयोध्या अपार्टमेंट, ज्योतीनगर) यांनी तक्रार दाखल केली. रामचंदानी या २६ जून रोजी सकाळी विठ्ठल रुखमाई मंदिराजवळ 'वॉकिंग' करत होत्या. यावेळी एक दुचाकीवर दोन अनोळखी तरूण त्यांच्याजवळ आले. या तरुणांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत क्षणार्धात पसार झाले. रामचंदानी यांनी आरडाओरड केली, मात्र चोरटे तो पर्यंत निघून गेले होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय सानप तपास करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images