Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘पीपल्स’ची दुरवस्था रोखण्याची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पीपल्स एज्युकेशन सोसायटीमुळे आंबेडकरी चळवळीतील पहिली पिढी शिकली आणि नेतृत्व करू लागली. माजी विद्यार्थ्यांनी जबाबदारीकडे पाठ न फिरवता संस्थेच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा. अंतर्गत वादामुळे संस्थेची होत असलेली दुरवस्था थांबविण्यासाठी सर्वांनी संस्थेसोबत उभे रहावे,' असे आवाहन डॉ. प्रमोद दुथडे यांनी केले. ते नागसेनवन परिसरात बोलत होते.

मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन व माजी विद्यार्थी यांच्यातर्फे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७४वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त नागसेनवनातील लुम्बिनी उद्यानात सोमवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. प्रमोद दुथडे, माजी नगरसेवक इकबालसिंग गिल, डॉ. भीमराव साळवी, प्राचार्य सुनील वाकेकर, रिपब्लिकन सेनेचे रुपचंद गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले आणि मिठाई वाटण्यात आली. आणीबाणीच्या काळात कुठेही प्रवेश मिळत नव्हता. तेव्हा मिलिंद महाविद्यालयात आम्हाला शिक्षण मिळाले. आमच्या कार्याचे श्रेय मिलिंद महाविद्यालयाला आहे, अशी आठवण गिल यांनी सांगितली. पीपल्स एज्युकेशन सोसायटी आपल्या उत्कर्षासाठी स्थापन करण्यात आली. मात्र, संस्थेच्या वाताहतीस समाजही जबाबदार आहे. मिलिंदच्या माध्यमातून जबाबदार नागरिक घडविण्यासाठी बाबासाहेबांना शिक्षणासह सामाजिक, सांस्कृतिक क्रांतीचे केंद्र अपेक्षित होते. आता वादमुक्त पीपल्स करण्यासाठी समाजातून उठाव होणे गरजेचे आहे, असे प्राचार्य डॉ. सुनील वाकेकर म्हणाले. या उपक्रमाला चंद्रकांत रुपेकर, सचिन निकम, डॉ. अविनाश सोनवणे, अ‍ॅड. अतुल कांबळे, अविनाश कांबळे, रुपराव खंदारे, पवन पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेळेत निकाल लावण्याचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या ११२ अभ्यासक्रमाच्या परीक्षांपैकी आतापर्यंत ६० परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत तर, २० अभ्यासक्रमाचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. आता ४२ अभ्यासक्रमांचे निकाल वेळेत जाहीर करण्याचे आव्हान आहे.

विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांचे रखडलेले निकाल विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसात निकाल जाहीर करणे अपेक्षित असते मात्र, उत्तरपत्रिका तपासणीतील अडचणी, 'नॅक' मूल्यांकनाची तयारी अशा कारणांनी निकाल रखडला. गुणपत्रिका छापण्यासाठी कागद उपलब्ध नसल्यामुळे अधिक विलंब झाला. जून महिन्याच्या अखेरपर्यंत कागद मिळाला नव्हता. सात लाख कागदांपैकी जेमतेम ७५ हजार कागद उपलब्ध झाला आहे. प्राधान्यक्रमानुसार पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या. इतर कागद उपलब्ध झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येणार आहेत. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातही प्रलंबित निकालाचे प्रमाण अधिक आहे. एकूण ११२ अभ्यासक्रमाच्या परीक्षांपैकी ६० अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले. एम. एस्सी, विधी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकाल रखडले आहेत. या आठवड्यात बहुतेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात येतील, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जी. आर. मंझा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन विक्रीप्रकरणी आठ आठवड्यांत निर्णय घ्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य शासनाच्या वतीने वाळूज परिसरातील अठरा गावांच्या विकासासाठी सिडकोला सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या गावांमधील जमिनीची बेकायदेशिरपणे विक्री करण्यात आली म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी जनहित यााचिका दाखल केली आहे. या आक्षेप अर्जानुसार आठ आठवड्यात जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश न्या. प्रसन्न वराळे व न्या. आर. जी. अवचट यांनी दिले. ही जनहित याचिका आदेशानंतर निकाली काढण्यात आली आहे.

वाळूज परिसरातील अठरा गावांसाठी १९९१ मध्ये राज्यशासनाने सिडकोला प्राधिकरण म्हणून नियुक्त केले होते. मोठे उद्योजक आणि काही अधिकारी यांना हाताशी धरून वाळूज महानगरातील जमिनीची बेकायदेशीरपणे सक्षम अधिकारी यांचे नाहरकत प्रमाणपत्र न घेताच विक्री करण्यात आली. यासंबंधी जि. प. सदस्य रमेश गायकवाड यांनी आक्षेप घेतला असता. त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही.

याविरोधात खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीप्रसंगी खंडपीठाने अशा प्रकारचा व्यवहार सिडकोच्या अखत्यारित असलेल्या विभागात झाल्यामुळे खंत व्यक्त केली. जिल्हाधिकारी यांनी याचिकाकर्त्याच्या अर्जावर आठ आठवड्यांत निर्णय घ्यावा असे सूचित केले. चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. या प्रकरणात शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील एस. डी. घायाळ यांनी काम पाहिले. गायकवाड यांची बाजू सुरेश पी. सलगर यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय लोकशाही दिनी चार अर्जांवर सुनावणी

$
0
0

औरंगाबाद : विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी (आठ जुलै) आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनामध्ये पाच अर्ज दाखल झाले मात्र, एक अर्जदार हजर न राहिल्यामुळे चार अर्जांवर सुनावणी करण्यात आली. मागील प्रलंबित अर्जांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. ही प्रकरणे; तसेच सुनावणी घेण्यात आलेली प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी दिल्या यावेळी पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, उपायुक्त वर्षा ठाकुर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्याची कार्यवाही सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढविण्याच्या कामासाठी शिवाजी महाराजांचा पुतळा हलविण्याची कार्यवाही महापालिकेने कंत्राटदाराच्या मदतीने सुरू केली आहे. पुतळा काढून तो सुरक्षित ठिकाणी ठेवला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी शिवप्रेमींकडून होत होती, परंतु महापालिकेकडून या कामात चालढकल केली जात होती. त्यामुळे शिवप्रेमींनी निर्वाणीचा इशारा देत 'तुम्ही हे काम करीत नसाल तर आम्ही हे काम करतो, आम्हाला एनओसी द्या', असे ठणकावून सांगितले. त्यानंतर पालिकेची यंत्रणा गतीमान झाली. पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाचे टेंडर काढण्यात आले. सुरुवातीला निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर प्रतिसाद मिळाला आणि गायत्री कंस्ट्रक्शन या कंपनीची निविदा स्वीकारण्यात आली. आता या कंपनीने काम सुरू केले आहे. पुतळा हलविण्याचे काम सोमवारी रात्री उशिरा केले जाणार आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. पुतळा हलविल्यावर चबुतरा उंच करण्याचे काम सहा महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर पुतळा पुन्हा बसवला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखा विभागात कंत्राटदाराला धक्काबुक्की

$
0
0

सुरक्षारक्षकांनाही केले पाचारण; महापौरांच्या दालनात ठिय्या आंदोलन

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या लेखा विभागात कंत्राटदाराला धक्काबुक्की करण्यात आली. कंत्राटदाराला लेखा विभागाच्या बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर कंत्राटदारांनी महापौरांच्या दालनात आणि महापालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.

कलीम पटेल या कंत्राटदाराला त्याने केलेल्या कामाचे बिल देण्याचे आयुक्तांनी मान्य केले होते. त्यामुळे त्याने लेखा विभागातील अधिकाऱ्यांकडे बिलाबद्दल वारंवार पाठपुरावा केला, पण त्याला काहीच प्रतिसाद मिळत नव्हता, त्यामुळे कलीम पटेल सोमवारी थेट लेखा विभागात गेले. त्यांनी मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांची भेट घेतली आणि आयुक्तांनी मंजुरी दिल्यावरही तुम्ही बिल का देत नाही, असा सवाल केला. त्यामुळे केंद्रे आणि पटेल यांच्यात शाब्दिक चकमक झाली. केंद्रे यांनी सुरक्षारक्षकांना बोलावून पटेल यांना लेखा विभागाच्या बाहेर काढले. यावेळी झालेल्या झटापटीत पटेल यांचा शर्ट फाटला.

या घटनेच्या नंतर कंत्राटदारांनी एकत्र येत महापालिकेत आयुक्तांची गाडी ज्या ठिकाणी उभी राहते त्या पोर्चमध्ये ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सर्वजण महापौर नंदकुमार घोडेले यांच्या दालनात आले. या ठिकाणी देखील त्यांनी ठिय्या आंदोलन केले. थकित पेमेंट द्या, अशी त्यांची मागणी होती. आयुक्तांनी पेमेंट देण्याचे आश्वासन दिले होते, पण अद्याप हे आश्वासन पूर्ण झाले नाही. आयुक्त रजेवर गेले होते. ते सोमवारी येणार होते, पण त्यांनी गुरुवारपर्यंत रजा वाढवली. शुक्रवार ते रविवार सुट्ट्या असल्यामुळे ते आता सोमवारीच रुजू होतील. दरम्यानच्या काळात आमच्या पेमेंटचे काय असा प्रश्न त्यांनी महापौरांना केला. अधिकाऱ्यांशी बोलून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन महापौरांनी दिले. ठिय्या आंदोलनात कंत्राटदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडी कंत्राटदाराला दिलेल्या पेमेंटची चौकशी करा

$
0
0

कोर्टात जाण्याचा प्रशांत देसरडा यांचा पालिका प्रशासनाला इशारा

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एलईडी दिवे लावणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेने आतापर्यंत २५ कोटी रुपयांचे पेमेंट केले आहे. पालिकेने केलेले पेमेंट नियमबाह्य असून त्याची येत्या दोन महिन्यांत चौकशी करा, अन्यथा न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

प्रशांत देसरडा यांनी पालिका आयुक्तांच्या नावे निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील ४० हजार पथदिवे काढून त्या जागी एलईडी दिवे लावण्याचे कंत्राट महापालिकेने दिले आहे. एलईडी निविदा अंतिम करताना पथदिव्यांच्या विजेच्या बिलात मोठी बचत होईल असा दावा करण्यात आला होता. कंत्राटदाराने ४० हजार दिव्यांपैकी आतापर्यंत ३० हजार एलईडी दिवे लावले आहेत. लावलेल्या या दिव्यांमधून वीज बिलाची किती बचत झाली हे स्पष्ट झालेले नाही. कंपनीने लावलेले एलीडी दिवे बंद पडतात. एलीडीची निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनानेच सर्वसाधारण सभेत ठेवला होता. सर्वसाधारण सभेने हा प्रस्ताव मंजूर केला, पण प्रशासनाने हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला नाही. त्यामुळे न्यायालयाने कंपनीला वर्कऑर्डर देण्याचे आदेश महापालिकेला दिले. सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे एलईडीच्या कंत्राटदारावर पैसे खर्च करणे योग्य नाही, असे देसरडा यांनी म्हटले आहे. एलईडी दिवे बसविण्यासाठी खांबांवरच्या जुन्या फिटिंग काढण्यात आल्या, त्या फिटींगचा हिशेब लागत नाही, फिटिंग विकण्यात आल्या, असा आरोप देसरडा यांनी केला आहे. एलईडी दिवे लावणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेने केलेले २५ कोटी रुपयांचे पेमेंट नियमबाह्य असून त्याची येत्या दोन महिन्यांत चौकशी करा, अशी मागणी देसरडा यांनी केली आहे. ही चौकशी न झाल्यास आपण त्यासाठी न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा प्रशांत देसरडा यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोची मालमत्ता विनाअट फ्री होल्ड करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

सिडको भागातील मालमत्ता फ्री होल्ड करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. सिडकोवासियांना त्यांच्या मालमत्तेचा हक्क विनाअट देण्यात यावेा, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेंस कमिटीच्या वतीने सिडको प्रशासकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार, माजी आमदार कल्याण काळे, महापालिका गटनेता भाऊसाहेब जगताप, राहुल सावंत, संतोषकुमार देडवाल, सचिन शिरसाठ, मुज्जफर खान, हकीम पटेल यांनी सिडकोचे प्रशासक पी. बी. चव्हाण यांना भेटून सदर मागणीचे निवेदन सादर केले. या निवेदनात सिडको भागामध्ये अनेक वर्षांपासून राहत असलेले रहिवासी व व्यापारी यांना त्यांच्या मालमत्तेचे हक्क देण्यात आलेले नव्हते. याविषयी शासनाने वर्षभरापूर्वी निर्णय जाहीर केला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शासनाने सिडकोच्या मालमत्ता धारकांच्या मालमत्ता विनाअट आणि नाममात्र शुल्क घेऊन फ्री होल्ड करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. फ्री होल्ड करून पीआर कार्ड व लिज रद्द करण्यात यावी. अशी मागणीही काँग्रेसतर्फे करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवरीला जाळले, जवानास जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शाब्दिक वाद व संशयावरून लग्न ठरलेल्या नवरीला जिवंत जाळणारा लष्करातील लान्स नाइक सचिन देवमन हनवतेने याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी ठोठावली.

वाग्वधू व पदमपुरा येथे राहणारी २२ वर्षीय माधुरी प्रकाश जीनवाल हिच्या मृत्युपूर्व जबाबावरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्या जबाबानुसार, माधुरी हिचे पिसादेवी रोडवरील भक्तीनगरात राहणारा सचिन देवमन हनवते याच्यासोबत लग्न ठरले होते. १७ जून २०१२ रोजी त्यांचा साखरपुडा झाला. या साखरपुड्यामध्येच १४ फेब्रुवारी २०१३ ही लग्नाची तारीख ठरली होती. लग्न ठरल्यामुळे पश्चिम बंगाल येथील सिलीगुडी येथे लष्कारात लान्स नाईक पदावर कार्यरत असलेला सचिन हनवते हा पाच फेब्रुवारी २०१३ रोजी सुटी घेऊन शहरात आला होता. दुसऱ्या दिवशी त्याने सकाळी दहा वाजता माधुरीला फोन करुन 'पैठणी शालुवरील ब्लाऊजचे माप व चप्पल घेण्यासाठी माझ्या बहिणीच्या घरी सकाळी बोलवले आहे' असे सांगितले. त्यामुळे माधुरी हडकोतील नवजीवन कॉलनीत गेली असता, दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात सचिनने माधुरीच्या अंगावर रॉकेल ओतून काडी लावली. यामध्ये ती गंभीररित्या भाजली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तिचा जबाब नोंदविण्यात आला. उपचारादरम्यान माधुरीचा २१ फेब्रुवारी २०१३ रोजी मृत्यू झाला. तिच्या मृत्युपूर्व जबाबवरुन सिडको पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

\Bसाक्षीदारांचे जबाब ठरले महत्वपूर्ण

\Bखटल्यावेळी, सहायक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये माधुरी, तिचे आई-वडील, नायब तहसीलदार व डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने सचिन हनवते यास दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रुपय दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

\Bसतत वाद अन् संशय

\Bशिक्षा ठोठावण्यात आलेला सचिन हा माधुरीशी फोनवर नेहमी वाद घालत होता व सातत्याने शिविगा‌ळ करीत होता. तसेच माधुरीवर संशयदेखील घेत होता. त्याचवेळी सचिनचे इतर महिलांशीही संबंध होते, हे सचिन व माधुरीच्या फोनमधील मेसेजवरुन स्पष्ट झाले. कलिना येथील प्रयोगशाळेत दोघांच्या फोनमधील डेटा तपासण्यात आल्यानंतर ही बाब समोर आली व हेसुद्धा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षांचे आज काम बंद; ४७ संघटनांची हाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील राज्यभरातील रिक्षा चालक व मालक बुधवारी संपावर जाणार आहेत. शहरातील ४७ संघटनांनी बंदची हाक देत महाराष्ट्र अॅटो रिक्षा चालक - मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती संघटनेचे शहर अध्यक्ष लतीफ शेख यांनी दिली.

राज्यभरातील रिक्षा चालकांचे प्रश्न पाच वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर शासनाने कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळपासून सर्व रिक्षा बंद राहणार आहेत. कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते १ या दरम्यान निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे, निसार अहेमद खान यांनी दिली. दरम्यान, रिक्षा बंद काळात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शहर बसची संख्या वाढविण्यात आली आहे. सध्या ३६ बस शहरात धावतात. उद्या २७ जादा बस सोडण्यात येणार आहेत, अशी एसीडीसीएलच्या अधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रक यांना दिली आहे. एसटी महामंडळाच्या वतीने शहरात प्रवाशांची गैरसोय होणार नाही, यासाठी कंट्रोल पॉइंटवर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ज्या मार्गावर गर्दी जास्त राहिल त्या मार्गावर जादा शहर बस चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

\Bकृती समितीच्या मागण्या …

\B- रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी मंडळ हवे.

- रिक्षाचे मुक्त परवाने वाटप बंद करण्यात यावे.

- हकीम समितीच्या शिफारसीप्रमाणे रिक्षांचे भाडे वाढवा.

- विम्याचे वाढलेले दर कमी करा, ओला-उबेर बंद करा.

\Bजिल्ह्याचे चित्र

\B- जिल्ह्यातील रिक्षा - ३२, ७२७

- शहरात रिक्षा - २७ हजार ८३९

- एलपीजी रिक्षा - २१ हजार

- पेट्रोल रिक्षा - ६ हजार

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सिंगच्या विद्यार्थिनीची फसवणूक, संस्थाचालक गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अभ्यासक्रमाला मान्यता नसताना प्रवेश देऊन विद्यार्थिनींची फसवणूक करणारा जनहित नर्सिंग कॉलेजचा संस्थाचालक सुभाष पाटील याला पोलिसांनी मंगळवारी गजाआड केले. हे कॉलेज अदालत रोडवरील चुन्नीलाल पेट्रोलपंपाजवळ आहे. जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये लपलेल्या पाटील याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शोधून वेदांतनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

जनहित नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश देऊन ६० विद्यार्थिनींची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोमवारी मध्यरात्री एक वाजता संस्थाचालक सुभाष पाटील याच्या विरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी परीक्षा सुरू होत असताना हॉलतिकिट मिळाले नसल्याने संतप्त विद्यार्थिनींनी सोमवारी सायंकाळी कॉलेज परिसरात ठिय्या आंदोलन केले होते. मुंबई येथील टेक्निकल बोर्डाच्या संचालकांनी या कॉलेजला कोणतीही मान्यता नसल्याचे स्पष्ट केले होते. पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान पसार संस्थाचालक जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती युवासेनेचे राज्य उपसचिव, नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि नगरसेवक ऋषीकेश खैरे यांनी हॉटेल गाठले. या ठिकाणी सुभाष पाटील याला पकडल्यानंतर पोलिस निरीक्षक रोडे यांना माहिती देण्यात आली. निरीक्षक रोडे यांनी पथक पाठवत सुभाष पाटील याला अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सिंग कॉलेजबाबत न्यायालयाचा दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मान्यता नसलेल्या नर्सिंग कॉलेजातील विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत न्या. संजय गंगापूरवाला व न्या. मंगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देणे शक्य असल्यास विचार करावा, असे निर्देश दिले. परीक्षेला बसू दिले, तर खंडपीठाच्या आदेशाशिवाय त्यांचा निकाल जाहीर करू नये, असेही स्पष्ट केले आहे. अध्यक्ष व प्राचार्यांनी फसवणुकीने प्रवेश दिल्याचे स्पष्ट होते असल्याचे निरीक्षण खंडपीठाने सुनावणीप्रसंगी नोंदविले आहेत.

अदालत रोडवरील जनहित नर्सिंग कॉलेजने विद्यार्थ्यांची फसवूणक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारपासून (९ जुलै) परीक्षा सुरू असल्याने हॉलतिकिटाची मागणी केली असता टाळाटाळ करण्यात आली. संबंधित कॉलेजचा मान्यतेचा प्रस्ताव राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण मंडळाकडे प्रलंबित असल्याचे समजले. हॉलतिकिट मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांनी अॅड. देविदास शेळके यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली.

खंडपीठाने याचिका प्रथम सुनावणीस घेऊन यासंबंधी सरकारी वकील सिद्धार्थ यावलकर यांना परीक्षेला बसू देण्यासंबंधी विचारणा केली. अॅड. यावलकर यांनी विद्यार्थ्यांचे कुठलेही रेकॉर्ड प्रशासनाकडे नसल्याचे सांगत त्यांना परीक्षेला बसू देणे शक्य नसल्याचे सांगितले. याचिकाकर्त्यांचे वकील शेळके यांनी विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. यात विद्यार्थ्यांचा दोष नसून त्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, अशी विनंती केली.

\Bखंडपीठाचे निरीक्षण \B

खंडपीठाने प्रथमदर्शनी संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य यास जबाबदार असल्याचे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने त्यांच्यावर काय कारवाई करता येईल यासंबंधी विचार करता येईल, असे स्पष्ट केले. संबंधित दोघे विद्यार्थ्यांना भरपाई देण्यास पात्र ठरतील असेही म्हटले. कॉलेजास मान्यता नसेल, तर विद्यार्थ्यांना कुठलाही हक्क सांगता येणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगर, पुंडलिकनगर, गारखेडाचा पाणी पुरवठा चार दिवसाआड

$
0
0

समान पाणी वाटपासाठी पालिकेचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समान पाणी वाटपासाठी शिवाजीनगर, पुंडलिकनगर, गारखेडा आणि एसएफएस या भागाचा पाणी पुरवठा चार दिवसाआड म्हणजे पाचव्या दिवशी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सिडको-हडको भागातील पाणीप्रश्नावर तोडगा निघेल, या भागातही पाचव्या दिवशी पाणी पुरवठा होईल असे मानले जात आहे.

सिडको-हडको भागातील पाणीप्रश्न गेल्या काही महिन्यांपासून तीव्र बनला होता. नगरसेवक व नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. पाण्यासाठी या भागात वारंवार आंदोलन केले जात होते. समान पाणी वाटप झाले पाहिजे अशी या भागातील नगरसेवक, नागरिकांनी मागणी होती. समान पाणी वाटपाचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता, पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. सिडको-हडकोसह चिकलठाणा, मुकुंदवाडी, हर्सूल भागातील पाणी प्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन गेल्या आठवड्यात राज्यमंत्री अतुल सावे यांनी महापालिकेत येऊन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक घेतली तेव्हा आयुक्तांनी दीड दिवसात समान पाणी वाटपाबद्दल निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी या कामाची जबाबदारी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यावर दिली. पानझडे यांनी एक्स्प्रेस जलवाहिनीचा अभ्यास केला. या जलवाहिनीवरून सिडको-हडको भागासाठी पाणी पुरवठा केला जातो. याच जलवाहिनीवरून शिवाजीनगर, पुंडलिकनगर, गारखेडा, एसएफएसचा परिसर या संपूर्ण भागाला पाणी पुरवठा केला जातो. सध्या या भागात तीन दिवसांआड म्हणजे चौथ्या दिवशी पाणी पुरवठा होतो. त्यामुळे या भागाचा पाणी पुरवठ्याचा गॅप एक दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या भागात चार दिवसांआड म्हणजे पाचव्या दिवशी पाणी येणार आहे. सिडको-हडको भागात सहाव्या-सातव्या दिवशी पाणी येत होते. आता या भागात देखील पाचव्या दिवशी पाणी पुरवठा होऊ शकेल, असे मानले जात आहे.

सिडकोतील जलकुंभ भरले

गारखेडा, पुंडलिकनगर, शिवाजीनगर या भागाच्या पाणी पुरवठ्याचा गॅप एक दिवसाने वाढविण्याच्या निर्णयाची लगेचच अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे सिडको एन पाच, एन सात, हर्सूल आणि चिकलठाणा येथील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरले. हे जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरल्याची गेल्या काही वर्षातील पहिलीच वेळ आहे. जलकुंभ भरल्यामुळे सिडको-हडकोच्या संपूर्ण परिसरात व्यवस्थीत पाणी पुरवठा झाल्याचा दावा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास आराखड्यावर शुक्रवारी सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराच्या सुधारित विकास आराखड्याबद्दल शुक्रवारी (१२ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या दरम्यान महापौर शपथपत्र दाखल करणार की नाही याबद्दल मात्र पालिकेच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

शहराचा सुधारित विकास आराखडा २०१५ - २०१६ मध्ये तयार करण्यात आला होता. तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याबद्दल नंतर अनेक आक्षेप घेतले गेले. त्यानंतर विकास आराखड्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात विकास आराखड्याबद्दल सुनावणी सुरू आहे. विकास आराखडा करताना तत्कालीन आयुक्तांनी त्यावर स्वाक्षरी केली नाही, परंतु तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी विकास आराखड्यावर स्वाक्षरी केली होती. प्रशासकीय अधिकार नसताना महापौरांना विकास आराखड्यावर स्वाक्षरी करता येते का असा मुद्दाही उपस्थित झाला होता. विकास आराखडा तयार केल्यावर महापालिकेत आलेल्या प्रत्येक आयुक्ताने आराखड्यावर स्वाक्षरी केली नाही. आता याच आराखड्याबद्दल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने विद्यामान महापौरांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले विकास आराखड्याच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करणार की विरोधात शपथपत्र दाखल करणार या बद्दल चर्चा सुरू झाली होती. महापौरांनी शपथपत्रच दाखल न केल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी महापौर शपथपत्र दाखल करणार का याबद्दल पालिकेच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

सुधारित विकास आराखड्याच्या संदर्भात शपथपत्र दाखल करण्याबद्दल अद्याप भूमिका ठरली नाही. एक-दोन दिवसात निर्णय घ्यावा लागेल. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून या बद्दल निर्णय घेतला जाईल.

नंदकुमार घोडेले (महापौर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएंनी दिलेल्या प्रमाणपत्राची तपासता येणार वैधता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चार्टर्ड अकाऊंटंट्स (सीए) यांनी दिलेल्या प्रमाणपत्राची वैधता तपासणारी यंत्रणा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक 'सीए'साठी 'युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर' (युनिक नंबर) निश्चित करण्यात येणार असून प्रमाणपत्रावर हा क्रमांक असेल. जेणेकरून प्रमाणपत्र खरे की, खोटे लक्षात येईल, अशी माहिती दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल छाजेड यांनी मंगळवारी दिली.

'आयसीएआय'च्या औरंगाबाद शाखेतर्फे विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, सीए देत असलेल्या प्रमाणपत्रामध्ये अनेकदा बोगस प्रमाणपत्र असल्याचे समोर आले. प्रमाणपत्रांची वैधता प्रत्येकाला समजावी या हेतुने एक युनिक नंबर संकल्पना पुढे आणली आहे. प्रमाणपत्रावर क्रमांक असेल ज्याद्वारे प्रमाणपत्र कोणी दिले, त्याची योग्यता काय, निश्चितीकरण, संबंधितांनेच प्रमाणपत्र दिले का अशा बाबी एका क्लिकवर कळतील. यासह तंत्रज्ञानाचा वापराच्या दृष्टीने कार्यक्रम हाती घेतला आहे. अकाऊंटिंगचा कसा वापर होईल, यासाठी काही कार्यशाळा घेण्यात येत आहेत. यासह १०० तासांचे अॅडव्हान्स आयटीटीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी आम्ही नॉलेज पोर्टल तयार करतोय, यात वेगवेगळ्या प्रकारातील माहितीचे ऑडिओ-व्हिडिओ तयार करण्यात येत आहेत. लीडरशिपसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यावेळी 'आयसीएआय डब्ल्यूआयआरसी'च्या अध्यक्ष प्रीती सावला, उमेश शर्मा, औरंगाबादचे अध्यक्ष रोहन आचलिया, यशवंत कासार, गणेश शिलवंत, परवीन बांगड, योगेश अग्रवाल, रुपाली बोथरा, पंकज सोनी यांची प्रमुख उपस्थिीती होती.

एक लाख जणांची नोंदणी

देशभरात सीए सदस्य संख्या तीन लाख आहे. त्यापैकी दीड लाख सीए प्रत्यक्ष कार्यरत आहेत. त्यापैकी एक लाख युनिक नंबर निश्चित करण्यात आले. फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया सुरू असून बँकांसह, ग्राहकालाही प्रमाणपत्र तपासता येणार आहे. एप्रिलपासून देशभरात सीएंकडून पंधरा लाख प्रामणपत्र देण्यात आलेले आहेत, असेही छाजेड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अजंता एक्सप्रेसचे वेळापत्रक बदलणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिकंदराबाद-मनमाड-सिकंदराबाद चालणाऱ्या अजंता एक्सप्रेस रेल्वेचे वेळापत्रक बदलण्याचा प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून मध्य रेल्वेकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हैदराबादकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता सायंकाळी सात वाजता अजंता एक्सप्रेस रेल्वे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मनमाड सिकंदराबाद अजंता एक्सप्रेस (क्रमांक १७०६३) ही रेल्वे मनमाडहून रात्री १०.५० वाजता निघत होती. तर सिकंदराबादला ही रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५० ला पोहोचत होती. औरंगाबादसह जालना आणि परभणी या स्टेशनवर ही रेल्वे मध्य रात्री उशिराने पोहोचत असल्याने प्रवाशंना त्रास होत होता. याबाबत प्रवाशांच्या तक्रारीवरून या रेल्वेचा वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा नवीन प्रस्ताव मध्य रेल्वे विभागाकडे पाठविण्यात आला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या मुख्य वाहतूक व्यवस्थापक के. पद्मजा यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार मनमाडहून अजंता एक्सप्रेस सायंकाळी पाच वाजता सिकंदराबादकडे निघणार आहे. ही रेल्वे औरंगाबादला सात ते साडे सात वाजेच्या दरम्यान पोहोचणार असून सिकंदराबादला ही रेल्वे पहाटे पाच वाजता पोहोचेल. या नवीन वेळापत्रकामुळे ही रेल्वे साडे दहा वाजेपर्यंत परभणीला पोहोचणार आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून हायकोर्ट एक्सप्रेस गेल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत एकही रेल्वे नसते. औरंगाबाद ते नांदेड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या रेल्वेचाही लाभ घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५ व्या वर्षी स्ट्रोक; अँजिओप्लास्टीने पूर्वपदावर

$
0
0

(अँकर स्टोरी)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवघ्या ३५ व्या वर्षी पक्षाघाताचा सौम्य झटका आला आणि एमआरआय तपासणी करता-करता याच झटक्याने तीव्र स्वरुप धारण करीत एक बाजू पूर्णपणे लुळी पडली. सुदैवाने मेंदुचे नुकसान न झाल्याने तात्काळ मेंदुची अँजिओप्लास्टी करण्यात आली व फुग्याने रक्तवाहिनी मोकळी करुन रक्तप्रवाह सुरळीत करण्यात आला. फुग्यानेच रक्तप्रवाह सुरळीत झाल्याने स्टेंटची गरज पडली नाही. त्यानंतर रुग्ण चार तासांत उठून बसला, दुसऱ्या दिवशी चालू लागला आणि तिसऱ्या दिवशी त्याला आयसीयुतून वॉर्डात हलवण्यात आले. काही दिवसांत हा तरुण कामावरदेखील रुजू झाला; परंतु स्वत: प्रयोगशाळा तंत्रज्ञ असूनही त्याने स्वत:च्या उच्चरक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्याचे आणि महिन्यापासून गोळी घेतली नसल्याचेही समोर आले.

हा प्रयोगशाळा तंत्रज्ञ शहरातील असून, त्याला 'स्ट्रोक'ची कोणतीही 'फॅमिली हिस्ट्री' नाही. मात्र काही वर्षांपासून त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता व हा तंत्रज्ञ आपल्या रक्तदाबाकडे सातत्याने दुर्लक्ष करीत होता. त्याला त्याचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांनी रोज एक गोळी घ्यायला सांगितली होती. मात्र तो ती गोळी नियमितपणे घेत नव्हता आणि मागच्या एक ते दीड महिन्यापासून तर त्याने त्याच्याच मनाने गोळी बंद करुन टाकली होती. दरम्यान, मागच्या आठवड्यात त्याच्या डोक्यात मुंग्या येऊ लागल्या, हाता-पायात विचित्र कमकुवतपणा जाणवू लागला. त्याकडेही त्याने अनेक दिवस दुर्लक्ष केले. मात्र त्रास वाढल्यानंतर काहीतरी बिघडल्याचे त्याच्या लक्षात आले व त्याने मेंदुविकारतज्ज्ञ डॉ. अब्दुल माजिद यांच्याकडे धाव घेतली. सर्व लक्षणे सौम्य पक्षाघातासारखी (स्ट्रोक) दिसून येत होती व त्यामुळेच तातडीने एमआरआय तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तपासणी होईस्तोवर सौम्य स्ट्रोक तीव्र झाला आणि त्याची डावी बाजू पूर्णपणे लुळी पडली. बघता-बघता तरुण बोबडा बोलू लागला आणि त्याला अचानक काही कळेनासे झाले. तपासणीत मेंदुचे नुकसान न झाल्याचेही स्पष्ट झाल्यामुळे त्याला मेंदुच्या अँजिओप्लास्टीसाठी एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. 'एमजीएम'चे इंटरव्हेन्श्नल रेडिओलॉजिस्ट डॉ. शिवाजी पोले यांनी केलेल्या मेंदुच्या अँजिओग्राफीत मेंदुतील उजव्या बाजुची रक्तवाहिनी ९० टक्के ब्लॉक असल्याचे निष्पन्न झाले आणि अँजिओप्लास्टीत फुग्याने ब्लॉक झालेली रक्तवाहिनी मोकळी करण्यात यश मिळाले. क्षर्णार्धात रक्तपुरवठा सुरळीत झाला आणि 'स्टेंट' टाकण्याची गरज पडली नाही. त्यानंतर अवघ्या दोन-चार तासांत रुग्ण उठून बसला आणि दुसऱ्या दिवशी चालू लागला आणि तिसऱ्या दिवशी त्याला वॉर्डात हलवण्यात आले. त्यानंतर संबंधित तरुण ठणठणीत बरा होऊन कामावरही रुजू झाला.

\Bअटॅकने मेंदू होतो ३६ वर्षांनी वृद्ध

\Bब्रेन अटॅकने (पक्षाघात) मेंदुचे खूप मोठे नुकसान होते. पक्षाघातात लवकर उपचार न केल्यास प्रत्येक मिनिटाला मेंदुतील लाखो 'न्युरॉन्स' कायमचे मृत पावतात आणि केवळ एका पक्षाघाताच्या अटॅकने मेंदू ३६ वर्षांनी वृद्ध होतो. याचाच अर्थ एखाद्या व्यक्तीला ४० व्या वर्षी पक्षाघाताचा अटॅक आल्यास व उपचार न मिळाल्यास किंवा उशिरा उपचार मिळाल्यास त्याच व्यक्तीचा मेंदू हा ७६ वर्षांच्या व्यक्तीसारखा काम करतो. त्यामुळेच पक्षाघातामध्ये काही तासांत उपचार घेणे उपयुक्त ठरते. त्यातही तासाभरात उपचार झाल्यास सर्वोत्तम रिझल्ट मिळतात. केवळ या कारणामुळे मेंदुच्या उपचारांमध्ये 'गोल्डन आवर ट्रिटमेंट'ला अनन्यसाधारण महत्व आहे, असेही डॉ. माजिद म्हणाले.

वयाच्या ३५ व्या वर्षी स्ट्रोकच्या रुग्णावर मेंदुची अँजिओप्लास्टी केलेली ही माझी पहिली केस आहे. या केसमध्ये बलुनने रक्तवाहिनी मोकळी झाल्याने स्टेंटची गरज पडली नाही.

\Bडॉ. शिवाजी पोले\B, इंटरव्हेन्श्नल रेडिओलॉजिस्ट

जीवनशैलीमुळे हार्ट किंवा ब्रेन अटॅक विशीपासून दिसून येत आहे. त्यातच रक्तदाबाच्या उपचारांकडे दुर्लक्ष हे मोठे नुकसान करणारे ठरू शकते, हे सत्य स्वीकारले जात नाही.

\Bडॉ. अब्दुल माजिद\B, मेंदुविकारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपींचा धुडगुस; दुकानदार त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवस-रात्र धुडगुस घालणाऱ्या मद्यपींमु‌ळे औरंगपुरा भाजीमंडई परिसरातील पिया मार्केटमधील दुकानदार त्रस्त झाले आहेत. या दुकानदारांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होत असून, अनेक दुकानदारांनी तर कंटाळून आपली दुकाने बंद केली आहेत. परिणामी, फार कमी दुकाने या संकुलामध्ये सद्यस्थितीत सुरू आहेत.

महापालिकेच्या या संकुलात ६२ गाळे आहेत; परंतु संकुलाची दुरवस्था झाली आहे. जागोजागी अस्वच्छतेचे साम्राज्य असलेल्या याच संकुलात दोन बिअर शॉपी आहेत. मात्र या 'बिअर शॉपी'चे रुपांतर चक्क 'बिअर बार'मध्ये झाले असून, मद्यपी याच परिसरात दिवस-रात्र सर्रास मद्यपान करताना दिसून येतात. त्यातही दिवसापेक्षा संध्याकाळी व रात्री मद्यपींचा शब्दश: धुडगुस सुरू असतो. सायंकाळी सातपासून या मद्यपींचा गोंधळ सुरू होतो तो रात्री उशिरापर्यंत सुरुच असतो. मद्यपी जिथे जागा मिळेल तिथे ठाण मांडून 'बसतात'. मग ती जिन्याची जागा असो की दुकानांच्या आसपासची जागा, मद्यपींचा गोंधळ अव्याहतपणे सुरू असतो. याच गोंधळामुळे दुकानांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होत असून, ग्राहक येण्यास बिचकतात. त्यातल्या त्यात महिला या परिसरात फिरकू शकत नाही, अशी एकंदरीत स्थिती आहे. ग्राहकी घटल्यामुळे अनेक व्यावसायिकांनी गाळे सोडले आहेत व त्यामुळे मार्केटमधील कितीतरी गाळे रिकामे पडून आहेत. गाळे रिकामे राहिल्यामुळे पालिकेचेही मोठे नुकसान होत आहे. मात्र त्याकडे पालिकेचे वर्षानुवर्षे दुर्लक्ष आहे. त्याचवेळी दोन्ही बिअर शॉपी बंद करण्याचे आदेश असूनही दोन्ही शॉपी अवैधरित्या सुरू असल्याचे समजते. अनेकांचा वरदहस्त असल्यानेच बिअर शॉपी अवैधरित्या सुरू असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर दोन्ही शॉपी बंद करण्याची मागणी नाव न सांगण्याच्या अटीवर त्रस्त दुकानदारांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी महाराजांचा पुतळा हलवला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी मध्यरात्री यशस्वीपणे हलविण्यात आला. रात्री ११ वाजता पुतळा हलविण्याच्या कामाला सुरुवात झाली. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हे काम सुरू होते. दरम्यानच्या काळात महापौर, काही नगरसेवक व अधिकाऱ्यांनी रात्र जागून काढली. पुतळा हलविल्यानंतर आता चबुतऱ्याची उंची वाढवण्याचे काम केले जाणार आहे.

उड्डाणपुलामुळे क्रांतीचौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळा झाकला जात होता. त्यामुळे या पुतळ्याची उंची वाढवावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून होत होती. या मागणीसाठी शिवप्रेमींनी आंदोलन देखील केले, परंतु महापालिकेतर्फे वेळकाढूपणा केला जात होता. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांना माफी देखील मागावी लागली होती. पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामासाठी स्थायी समितीने एक कोटी ८४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. त्यानंतर निविदा प्रक्रिया करण्यात आली, पण निविदेला प्रतिसाद मिळत नव्हता. दोन वेळा फेरनिविदा काढल्यावर तिसऱ्यांदा निविदेला प्रतिसाद मिळाला. गायत्री कंस्ट्रक्शन्स या कंपनीला हे काम देण्यात आले. काम घेतल्यानंतरही कंपनीने प्रत्यक्ष काम सुरू केले नाही. त्यामुळे या कंपनीला समज देण्यात आली. नियमित पेमेंट करण्याची हमी मिळाल्यावर या कंपनीने काम सुरू केले. पुतळा हलविल्याशिवाय चबुतऱ्याची उंची वाढवता येणे शक्य नव्हते. त्यामुळे सोमवारी रात्री पुतळा हलविण्याचे काम करण्यात आले.

रात्री ११ वाजेच्या सुमारास महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेते विकास जैन, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, माजी नगरसेवक समीर राजूरकर, विनोद पाटील, पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, उप अभियंता नाना पाटील व अन्य कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला महापौरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. त्यानंतर गॅस कटर, ब्रेकरच्या सहाय्याने पुतळ्याचे फिटिंग काढण्याचे काम सुरू करण्यात आले. पहाटे पावणे चार वाजता पुतळा काढण्यात आला, पण तो चबूतऱ्यावरून खाली उतरवून ट्रकमध्ये चढविणे अवघड होणार असल्यामुळे उड्डाणपुलावर ट्रक उभा करून क्रेनच्या सहाय्याने पुतळा ट्रकमध्ये चढविण्यात आला. त्यानंतर ट्रक चिकलठाणा एमआयडीसीमधील मडिलगेकर स्टुडिओमध्ये नेण्यात आला. या ठिकाणी पुतळा सुरक्षितपणे ठेवण्यात आला आहे, अशी माहिती महापौरांनी दिली.

१९८३ मध्ये उभारण्यात आला होता पुतळा

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २३ मे १९८३ रोजी उभारण्यात आला होता. त्यावेळी महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. सतीश त्रिपाठी प्रशासक होते. पुतळा उभारण्याच्या समारंभाला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते पुतळा उभारण्यात आला. यावेळी पृथ्वीराज पवार, साहेबराव पाटील डोणगावकर, बाळासाहेब पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते उपस्थित होते, अशी महापालिकेत माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकाच्या मागणीसाठी ‘झेडपी’त भरविली शाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कसाबखेडा (ता. खुलताबाद) जिल्हा परिषद उर्दू शाळेत अपुऱ्या शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. नववी व दहावीध्ये १००हून अधिक विद्यार्थी आहेत. वारंवार शिक्षकांची मागणी करूनही पूर्तता होत नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारी कसाबखेडा ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी जिल्हा परिषदेत पोचले आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर शाळा भरविली.

कसाबखेडा येथे सातवीपर्यंतची शाळा आहे. तीन वर्षांपूर्वी आठवीचा वर्ग वाढविण्यात आला. उर्दू माध्यमाची विद्यार्थीसंख्या अधिक असल्याने हा वर्ग मागितला होता. त्याला संचमान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला होता. नैसर्गिक वाढीच्या तत्वानुसार नववीचा वर्ग सुरू झाला. यंदा दहावीचा वर्ग सुरू केला गेला, पण शिक्षक संख्या कमी आहे. २०१८ -१९च्या संचमान्यतेनुसार या शाळेत आठवीत ४५ तर, नववीत ५२ विद्यार्थी आहेत. तरीही दोन्ही वर्गासाठी उर्दू माध्यमाचे एकच पद मंजूर आहे. संचमान्यता दुरुस्त होऊन पदे मंजूर करणे आवश्यक होते मात्र, तसे झाले नाही. यंदा दहावीतील विद्यार्थ्यांची संख्या ५२ होणार आहे. त्यामुळे पाच पदे आवश्यक आहेत. वारंवार मागणी करूनही उर्दू शिक्षक दिले जात नसल्याने कसाबखेडा ग्रामपंचायतीचे सदस्य व विद्यार्थी मंगळवारी जिल्हा परिषदेत आले आणि शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांच्या दालनासमोर शाळा भरविली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी संचमान्यता दुरुस्त करून पुरेसे शिक्षक द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्याकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images