Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तोडफोड सुरूच

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टोलविरोधी आंदोलनाचा जोर मंगळवारी, दुसऱ्या दिवशी ओसरला. मात्र, मुंबई, जालना येथे टोलनाक्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच राहिले. चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल पुण्यात राज ठाकरे यांच्यावर दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.

औरंगाबादेत चिलटांची ‘धाड’

$
0
0
चिलटांच्या उपद्रवामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. चिलटांच्या झुंडीच्या झुंडी वाहनचालकांवर येऊन धडकत असल्यामुळे वाहनांवरचा ताबा सुटून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

नाईकवाडे - दहिहंडे वाद मिटला

$
0
0
पालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे व नगरसेवक मनीष दहिहंडे यांच्यात सायंकाळी दिलजमाई झाली. दोघांनीही हस्तांदोलन करून वादावर पडदा टाकला. त्यांच्यातील वाद मिटावा यासाठी उपमहापौर संजय जोशी यांनी शिष्टाई केली.

लाखो रुपयांचा गैरव्यवहार

$
0
0
महापालिकेत श्रवणयंत्र आणि पिठाच्या गिरणीच्या वाटपात लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महिला बालकल्याण विभागाच्या कारभाराचे वाभाडेच यामुळे निघालेत.

टोल धोरण युतीच्या काळात

$
0
0
‘विरोधकांनी कितीही गोंधळ केला तरी सध्या टोल बंद करणे शक्य नाही. मात्र, टोलचे ऑडिट झाले पाहिजे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ‘देशात एनडीएच्या कार्यकाळात तर राज्यात युती सरकारच्या काळात टोलचे धोरण आणले गेले.

बाधित ग्रंथालयप्रश्नी मंत्रालयात मागणार दाद

$
0
0
बाधित ग्रंथालयाप्रश्नी ३० जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा, माजी आमदार तथा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष गंगाधर पटणे यांनी दिला.बाधित ग्रंथालयांना न्याय मिळावा, यासाठी मराठवाडा विभाग ग्रंथालय संघातर्फे मंगळवारी येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे कृतीसत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

राजकीय पक्षांची ‘मॉक पोल’कडे पाठ

$
0
0
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) तपासणीकडे (मॉक पोल) राजकीय पक्षांनी पाठ फिरविली. केवळ भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांची निदर्शने

$
0
0
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ते मिळावेत, खासगीकरणाचे धोरण रद्द करण्यात यावे, यांसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने बुधवारी (२९ जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. संघटनेने येत्या १३ फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

गांधी पुतळ्यासमोर भाजपचे आज आंदोलन

$
0
0
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी आघाडीतर्फे गुरुवारी राज्यात आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास धरणे धरण्यात येतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

जाधववाडीत फूल मार्केट उभारणार

$
0
0
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या फूल मार्केटाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जाधववाडी येथे एकसंघ फूल मार्केट प्रकल्प उभारण्यासाठी, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने जोमाने हालचाली सुरू केल्या आहेत.

पुणे गाड्यांचे नियोजन मध्यवर्ती बस स्थानकाकडे

$
0
0
पुणे मार्गावर चालणाऱ्या सिडको आगाराच्या डेपोच्या विनावाहक गाड्यांचे शेडयुल ‌मध्यवर्ती बस स्टॅण्ड (सीबीएस) आगाराकडे वर्ग करण्याचा आदेश काढण्यात आले आहे. एक फेब्रुवारी पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामूळे पुण्याला जाणाऱ्या गाड्यांचे दररोज सिडको ते सीबीएस रिकाम्या बसचा प्रवास थांबणार आहे.

३ जिल्ह्यांसाठी ‌३२०० नवीन रिक्षा परमिट

$
0
0
दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची गर्दी वाढत असतानाच शासनाने राज्यातील विविध प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कार्यक्षेत्रातील रिक्षा परवान्यांच्या वाटपासाठी इच्छुक पात्र अर्जदारांकडून अर्ज मागणवण्याचा निर्णय घेतला आहे.

नोकरीचे आमिष : १.५ कोटींचा गंडा

$
0
0
सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका तलाठ्याने पन्नासहून अधिक बेरोजगारांना दीड कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोकरीसाठी तरुणांना दिल्लीत खास प्रशिक्षण देण्याचे नाटक करण्यात आले.

विद्यार्थी मेळाव्यास १ गटाची गैरहजेरी

$
0
0
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थी मेळाव्या आजोजित करून आमदार प्रदीप जैस्वाल यांचे सुपूत्र ऋषिकेश जैस्वाल यांचे राजकारणात लॉचिंग करण्यात आले.

रोपवाटपाच्या टार्गेटसाठी धावपळ

$
0
0
सामाजिक वनीकरण विभागाच्या विविध नर्सरीमध्ये सुमारे एक कोटी रोपे लागवडीसाठी तयार करण्यात आले आहे. मागील वर्षभरात रोपे मोफत वाटप करण्याच्या योजनेंतर्गत ‌जवळपास तीस लाख रोपांचे वाटप करण्यात आले आहे.

अरुण बोर्डे यांचा गुंगारा

$
0
0
वीस लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणातील आरोपी अरुण बोर्डे यांनी पोलिसांना गुंगारा देत पलायन केल्याची घटना महापालीकेच्या परिसरात बुधवारी दुपारी घडली. हॉटेल व्यावसायिक महिलेला खंडणी मागितल्याप्रकरणी अरुण बोर्डेवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

‘ऑक्सिजन सिस्टीम’ नव्या रूपात येणार

$
0
0
दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असलेल्या शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये लवकरच ‘सेंट्रलाइज्ड लिक्विड ऑक्सिजन सिस्टीम’ कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी हॉस्पिटलच्या आवारात सहा हजार लिटरचा टँक बसविण्यात आला आहे. मात्र, चाचणी व त्यानंतर ही सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी मात्र ‘अँटी एक्स्प्लोझिव्ह विभागा’च्या परवानगीची आवश्यकता आहे.

रोहयो गैरव्यवहार : तपासासाठी दप्तर ताब्यात

$
0
0
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासासाठी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दप्तर ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलनामुळे राज्यभर गाजलेल्या या प्रकरणी इतर दोषींवर या आठवड्यात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

विहिरीत मिनी टेम्पो कोसळला

$
0
0
बीड बायपास रस्त्यावरील देवळाई परिसरात रस्त्याशेजारील कठडा नसलेल्या विहिरीत मिनी टेम्पो कोसळल्याने चालकाचा मृत्यू झाला. या टेम्पोला भरधाव ट्रकची धडक बसली आणि त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो विहिरीत कोसळला. या घटनेत अन्य तीन जण किरकोळ जखमी आहेत.

मंत्र्यांबद्दल आमदाराची शिवराळ भाषा

$
0
0
कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा शिवराळ भाषेत उल्लेख केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या बुधवारी कन्नड येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images