Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सैन्यभरतीत बनावट टीसी; मुख्याध्यापकाला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सैनिक भरतीमध्ये जन्मतारखेत सोयीनुसार बदल करुन तशी बोर्डाची बनावट प्रमाणपत्रे सादर करीत शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणात बनावट टीसी दिल्याचा आरोप असलेला आरोपी मुख्याध्यापक रघुनाथ सांडू शेजूळ याला शनिवारपर्यंत (२० जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जी. दुबे यांनी गुरुवारी (१८ जुलै) दिले.

या प्रकरणी सैन्य भरती कार्यालयाचे कर्नल सावलशहा कलीया यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, भरती प्रक्रियेत फिर्यादीकडे ९ जिल्ह्यातील सैन्य भरतीचे कामकाज होते व सैन्य भरतीसाठी २०१८ मध्ये ऑनलाईन फार्म भरण्यात आले होते. त्यानुसार पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी नोव्हेंबर २०१८ मध्ये जळगाव येथे, तर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा छावणीत झाली. दोन्ही परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात आली. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांचे डोमिसाईल, जात प्रमाणपत्र, चारित्र प्रमाणपत्र, तसेच शैक्षणिक व इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात १६ उमेदवारांनी वेगवेगळ्या जन्मतारखांची बोर्डाची प्रमाणपत्रे सादर करुन शासनाची फसवणूक केल्याचे आढळून आले. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. प्रकरणात वडोदचाथा (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) येथील अंबिकामाता विद्यालयाचा मुख्याध्यापक व आरोपी रघुनाथ सांडू शेजूळ (४०, रा. जळकीघाट, सिल्लोड) याने द्वारकादास जाधव व अनिल निकम या आरोपींना बनावट टीसी दिल्याचे व दोघांनी सैन्यभरतीत त्या टीसीचा दुरुपयोग केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपी मुख्याध्यापकाला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, आरोपीकडून शाळेचे दस्तावेज जप्त करणे व सखोल तपास करणे बाकी आहे आणि आरोपीने आणखी कितीजणांना बनावट टीसी दिली, याचाही शोध घ्यावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपी मुख्याध्यापकाला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिन्याभरात आपत्तीचे ११ बळी

$
0
0

(सिंगल)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे दुष्काळाची दहशत आणि दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती असा दुहेरी फटका मराठवाड्याला पावसाच्या पहिल्याच महिन्यात बसला आहे. अवघ्या महिन्याभरामध्ये आपत्तीमध्ये ११ जणांना प्राण गमवावे लागले. यामध्ये आठ जणांचा वीज पडून, तर दोन जणांचा दरड कोसळून मृत्यू झाला तर बीड जिल्ह्यात एकाचा इतर आपत्तीमुळे मृत्यू झाला आहे.

यंदा मराठवाड्याच्या औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यात काही मंडळांमध्ये दमदार पाऊस झाला. या कालावधीमध्ये नांदेड जिल्ह्यात तीन, बीड जिल्ह्यात दोन तर औरंगाबाद जिल्ह्यात दोघा जणांचा जीव वीज पडल्यामुळे गेला. तर औरंगाबाद जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू दरड कोसळून झाला. नैसर्गिक आपत्तीमुळे औरंगाबाद जिल्ह्यात ४० घरांची पडझड झाली आहे तर जिल्ह्यातील एक व हिंगोली जिल्ह्यातील एका ठिकाणच्या सार्वजिनक मालमत्तेचे नुकसान झाले.

महिन्याभाच्या आपत्तीमध्ये मराठवाड्यात एकूण १४३ जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये ६२ प्रकरणांमध्ये मदत देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ६८ मोठ्या दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला असून २१ लहान दुधाळ जनावरे, ओढकाम करणारी मोठी जणावरे ४० तर ओढकाम करणाऱ्या आठ लहान जनावरांचा समावेश आहे.

सात प्रकरणात मदत

आपत्तीमुळे मृत झालेल्यांच्या ११ पैकी आठ प्रकरणे पात्र ठरवण्यात आली असून यापैकी सात जणांच्या कुटूंबियांना २८ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तर तीन प्रकरणे अद्यापही शासनदरबारी प्रलंबित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीची विद्यार्थिनी फेरचौकशीत उत्तीर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हिंदी विषयाची उत्तरपत्रिका फाडल्याच्या आरोपावरून शिक्षण मंडळाने दोषी ठरविलेल्या अंजली भाऊसाहेब गळवी या दहावीच्या विद्यार्थिनीला फेरचौकशीत उत्तीर्ण करण्यात आले आहे. हा विषय विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी प्रतिष्ठेचा केला होता. या विद्यार्थिनीचा गुरुवारी बागडे यांनी सत्कार केला.

गवळी हिला मंडळाने हिंदी विषयात दोषी ठरवत निकाल राखीव ठेवला होता. मंडळाकडून दाद मिळत नसल्याने पालकांनी विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्याकडे धाव घेतली होती. बागडे यांनी मंडळात धाव घेतली, मात्र त्यांना विभागीय मंडळाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी मंत्रालयात या प्रकरणावर बैठक आयोजित केली. त्या बैठकीत फेरचौकशी समितीचा निर्णय झाला. गुरुवारी तिचा व तिच्या तिच्या आई-वडिलांचा सभापती बागडे यांनी सत्कार केला. यावेळी ते म्हणाले, अहवालात पर्यवेक्षक दोषी असल्याचे समोर आले. मार्गदर्शक सूचनामध्ये ९ नंबरच्या सूचनेत उत्तरपत्रिका देताना आणि परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्याकडून परत घेताना त्याची तपासणी पूर्ण करण्याची जबाबदारी पर्यवेक्षकाची असते. पान फाडलेले असेल, तर त्याचवेळी कारवाई करावी लागते. मात्र, तसे न करता नंतर कारवाई करण्यात आली. अंजलीच्या प्रकरणात पर्यवेक्षकासह मंडळाचे अधिकारी दोषी असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे बागडे यांनी सांगितले.

\Bत्यांनी संपर्क साधावा\B

उत्तरपत्रिका फाडल्याच्या आरोपावरून मंडळाने ५८ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. त्या विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी कार्यालयाशी, माझ्याशी संपर्क साधल्यास त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सभापती हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दळणवळण पर्यटनाच्या मुळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद पर्यटनाची राजधानी आहे, मात्र खराब रस्ते आणि बंद पडलेल्या विमानसेवेचा सर्वात मोठा फटका पर्यटन विभागाला बसल्याची कबुली पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

पर्यटनमंत्री रावल यांनी औरंगाबाद शहर व परिसरातील पर्यटन विषयी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, पर्यटनवाढीसाठी 'कनेक्टिव्हिटी' सर्वात महत्त्वाचा घटक आहे. अजिंठा-औरंगाबाद रस्ता तयार करताना सध्या असलेला रस्ता तोडून टाकण्याची घाई झाली आणि याचाच मोठा फटका पर्यटनाला बसला. आता एक वर्षाच्या आत किमान वापरण्यापुरता रस्ता तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्र्यांकडे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये या रस्त्याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.

'वर्ल्ड युनेस्को हेरिटेज सिटी'साठी औरंगाबादचा दावा होता, मात्र आता यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी समन्वयक असतील. शहर पर्यटनासाठी महापालिका, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी पर्यटनाच्या 'ब्रँडिंग'साठी पुढाकार घेण्याचेही आवाहन त्यांनी केले. शहरात अस्तित्वात असलेल्या सर्व दरवाजांचे संवर्धन करण्याचे सांगून, दौलताबाद किल्ल्यावर 'रोप-वे'साठी अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करण्याचेही रावल यांनी सांगितले. सिटी ब्रँडिंगच्या संकल्पनेला औरंगाबादेत मूर्त स्वरूप जेण्यासाठी बस, नकाशे आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शहरबसपैकी पाच बस केवळ शहरातील पर्यटनस्थळांच्या दर्शनासाठी असाव्यात, अशा सूचनाही रावस यांनी केल्या. बैठकीसाठी राज्यमंत्री अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाट, अब्दुल सत्तार तसेच डॉ. भागवत कराड, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त निपूण विनायक, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची उपस्थिती होती.

\Bसफारी पार्कला ४५ कोटी\B

मिटमिटा येथील सफारी पार्कसाठी १४५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. येथे सिंगापूरच्या धर्तीवर नाइट सफारी सुरू करण्यासाठी निधी देण्यात येणार असून, यासाठी पर्यटन विभाग ४५ कोटी रुपये टप्प्याटप्प्यात देईल. लवकरच दोन कोटी रुपये देण्यात येणार असल्याचेही रावस यांनी सांगितले.

पर्यटनासाठी...

- शहराच्या दरवाजांसाठी साडेतीन कोटी

- वेरूळ लेणीसमोर 'नो व्हेइकल झोन'

- अजिंठा येथे लवकरच हेलिकॉप्टर सेवा

- महापालिकेच्या बसमधून औरंगाबाद 'सिटी दर्शन'

- दौलताबाद, अजिंठा लेणी 'रोप-वे'साठी प्रस्ताव मागवणार

- अपर जिल्हाधिकारी जिल्ह्यातील पर्यटनाचे राजदूत

- 'पर्यटन पर्व'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जिल्ह्याची ओळख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वासरे चोरली, तिघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संजयनगर बायजीपुरा भागातून २८ हजार रुपयांच्या दोन वासरांची चोरी केल्याच्या प्रकरणात समद आमीर कुरेशी, असलम अहेमद कुरेशी व रिहान उर्फ बाबा कलीम खान यांना बुधवारी (१७ जुलै) अटक करुन गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, तिघांना शनिवारपर्यंत (२० जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी दिले.

या प्रकरणी कैलास जगदीश चरखा (२६, रा. संजयनगर बायजीपुरा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ७ जुलै २०१९ रोजी फिर्यादीने त्याच्या घरासमोर बांधून ठेवलेल्या १३ महिन्यांच्या वासराची चोरी झाली, तर त्याच परिसरातील उत्तम सोपान सूर्यवंशी यांच्याही १२ महिन्यांच्या वासराची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल होऊन खाटिक समद आमीर कुरेशी (३०), असलम अहेमद कुरेशी (२१) व रिहान उर्फ बाबा कलीम खान (२२, सर्व रा. संजयनगर) यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता, आरोपीकडून दोन्ही वासरे जप्त करणे बाकी असून, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, आरोपीने आणखी कोणते गुन्हे केले आहेत का आदी बाबींचाही तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी अॅम्ब्यूलन्स चालकाविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मद्यप्राशन करून अॅम्ब्यूलन्समध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी जालना रोडवरील केंब्रीज चौकात सिडको वाहतूक शाखेने ही कारवाई केली.

सिडको वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, पीएसआय रनेर, कर्मचारी भालेराव आणि डमाळे हे वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. यावेळी एक अॅम्ब्यूलन्स सायरन वाजवित त्या ठिकाणी आली. तिला जाण्यासाठी पोलिस रस्ता मोकळा करीत असताना आतमध्ये पेशंट नसून प्रवासी बसलेले दिसून आले. ही अॅम्ब्यूलन्स बाजूला घेत चालकाची तपासणी करण्यात आली. यावेळी त्याने मद्यप्राशन केलेले आढळले. या चालकाची ब्रीथ अॅनालायझर मार्फत तपासणी करण्यात आली. त्याच्याविरुद्ध मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगराज्यमंत्री अतुल सावे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मराठा आरक्षण यशस्वीपणे लागू केल्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांचे अभिनंदन करण्यात आले. सक्षमपणे निर्णय घेत या दोन्ही नेत्यांनी मराठा समाजाला मोठा न्याय दिला, अशी भावना महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केली. अतुल सावे यांची राज्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नगरसेवक राजू शिंदे यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्याला भाजप, शिवसेनेच्या अन्य नगरसेवकांनी अनुमोदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपअभियंता खान निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी उपअभियंता एम. एम. खान यांना गुरुवारी निलंबित केले. त्यांच्या निलंबनाचे आदेश दुपारी जारी करण्यात आले. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. खान यांच्या बद्दल अनेक तक्रारी होत्या. वॉर्ड अभियंता म्हणून देखील त्यांचे काम समाधानकारक नव्हते. नगरसेवक देखील त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भाजयुमो’ कार्यकारिणीवर कुणाल मराठे यांची नियुक्ती

$
0
0

औरंगाबाद : भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये सदस्यपदी कुणाल नितीन मराठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पक्षामध्ये सोशल मीडिया प्रमुख व अन्य पदे सांभाळली आहेत. त्याची दाखल घेऊन त्यांची भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती केली आहे. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी त्यांची नियुक्ती केली. मराठे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. त्यांच्या या नियुक्तीचे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रावसाहेब पाटील दानवे, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, महापालिकेतील गटनेते प्रमोद राठोड, यांच्यासह पक्षातील पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बावीस लाखाचे रक्तचंदन पकडले खुलताबाद पोलिसांनी २२ लाखाचे रक्त चंदन पकडले - लाकडांसह वाहन जप्त - च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी गावाजवळ खुलताबाद पोलिस ठाण्याच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने रक्तचंदन, ती वाहतूक करणारे वाहन पकडले. वन विभागाच्या अंदाजानुसार या रक्त चंदनाची बाजारभाव किंमत २० ते २२ लाख असल्याचा अंदाज आहे. १८ जुलैला (गुरुवार) पोलिसांच्या गस्ती दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

खुलताबाद पोलिस ठाण्यात पोलिस हेड कॉंन्स्टेबल नंदकुमार नरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील रक्त चंदन व वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. खुलताबाद पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नंदकुमार नरोटे, अनिल चव्हाण, चालक प्रमोद गरड हे बुधवारी ( १७ जुलै ) रात्री दरोडा प्रतिबंधक पथकाअंतर्गत खुलताबाद - कन्नड रोडवर गस्त घालत होते. गल्लेबोरगांव येथील पेट्रोलपंपाची तपासणी करून हे पथक वेरुळला परतले. वेरूळ येथील भोसले चौकाकडून कसाबखेडाकडे जात असताना वेरुळ लेणीकडून मारुती ओमनी (क्रमांक के. ए.०२ एम. बी. ३५३५) ही कार भरधाव वेगाने येत असताना वाहनाबाबत गस्ती पथकाला शंका आली. त्यांनी सदरील वाहन थांबविण्यासाठी इशारा केला. मात्र, वाहन चालकाने गाडीचा वेग वाढवित वाहन कन्नडकडे पळविले. या वाहनाचा गस्ती पथकाने पाठलाग सुरू केला. पोलिस पथक मागावर असल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने वाहन चालकाने सदरील वाहन खुलताबाद- कन्नड रोडवरील पळसवाडी गावाजवळील वळणावर सोडून देत अंधाराचा फायदा घेत शेतातून पळ काढला.

या घटनेची माहिती गस्ती पथकाने खुलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंदन इमले यांना दिली. पोलिस निरीक्षक इमले यांनी तातडीने पोलिस कर्मचारी प्रकाश मोहिते, रामनाथ भुसारे, हनुमंत सातपुते यांच्यासह घटनास्थळी धाव घेत वाहनचालकाचा परिसरात शोध घेतला. मात्र, तो हाती न लागला नाही. सदरील वाहनाची तपासणी केली असता त्यात रक्तचंदनाची तीन ते चार फुटांची लाकडे आढळली. सदरील लाकडांचे वजन तीन क्विंटल ८० किलो असून वन विभागाच्या अंदाजानुसार २० ते २२ लाख असून सदरील रक्त चंदन व ओमनी वाहन पोलिसांनी जप्त करून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इंडिगो’चे विमान शहरातून घेणार भरारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा विमानतळावरून इंडिगो कंपनीच्या विमान आगामी काही दिवसांत भरारी घेण्याची शक्यता आहे. औरंगाबाद विमानतळावरून इंडिगो कंपनीची सेवा सुरू करण्यासाठी १९ जुलै रोजी येणार आहेत. या अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर औरंगाबादहून देशभरातील महत्त्वाच्या शहरांसाठी विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद विमानतळावरून जेट एअरवेजचे मुंबई औरंगाबाद मुंबई हे विमान बंद झाल्यांनतर औरंगाबाद विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी टूर ऑपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या शिष्टमंडळाची इंडिगोच्या व्यवस्थापकीय समितीसमवेत बैठक घेण्यात आली होती. यावेळी दोन्ही विमान कंपन्यांनी औरंगाबादमधून नव्या विमानसेवा सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यावेळी कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना औरंगाबादमधून मुंबई, दिल्ली, राजस्थान, गोवा, हैदराबाद, नागपूर, पुणे आणि बंगळुरू ही महत्त्वाची शहरे जोडण्यात यावीत, ही मागणी करण्यात आली होती. याशिवाय औरंगाबाद शहरातील लोकप्रतिनिधींकडूनही विमान सेवा विस्तारण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

उद्योजक, व्यावसायिकांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, इंडिगो कंपनीने औरंगाबाद विमानतळ प्राधिकरणाकडे विमान सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा देण्याची मागणी केली आहे. औरंगाबाद विमानतळावर तिकिट बुकिंग काउंटर्स, बॅक अप ऑफिस आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे कंपनीने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. सुविधांबाबत पाहणी करण्यासाठी औरंगाबाद विमानतळावर १९ जुलै रोजी इंडिगोचे अधिकारी येणार आहेत. औरंगाबाद विमानतळाला भेट देण्यासाठी इंडिगोकडून मोहम्मद रजा रहमान यांच्यासह अन्य अधिकारी येणार आहेत. या पाहणीनंतर इंडिगो कंपनीचे विमान औरंगाबादेतून देशांतर्गत विमान सेवा विस्तारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'जय श्रीराम'ची जबरदस्ती, मुस्लिम तरुणाला मारहाण

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुस्लिम तरुणाला मारहाण करीत 'जय श्रीराम' म्हणायला लावणाऱ्या आठ जणांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी रात्री साडेबारा वाजता हडको कॉर्नर भागात हा प्रकार घडला.

या प्रकरणी इम्रान ईस्माईल पटेल (वय २८ रा. जटवाडा रोड) याने तक्रार दाखल केली. पटेल हा कटकटगेट भागातील एका हॉटेलमध्ये वेटर आहे. गुरूवारी रात्री काम संपल्यानंतर तो दुचाकीवर घरी जात होता. यावेळी हडको कॉर्नर भागात त्याला आठ ते दहा जणांनी दुचाकी आडवी लावत अडवले. त्यानंतर या जमावाने इम्रानला मारहाण करत त्याला 'जय श्रीराम' म्हणण्याची जबरदस्ती केली. यावेळी इम्रानने आरडाओरड केली असता तेथील एका व्यक्तीने घराबाहेर येऊन इम्रानची सुटका केली. या प्रकरणी इम्रानच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जय श्रीराम’ची जबरदस्ती; तरुणाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जय श्रीराम' म्हणण्यास भाग पडत मारहाण करण्याचे उत्तर भारत व पश्चिम बंगालमधील लोण औरंगाबाद शहरातही आले आहे. एका मुस्लिम तरुणाला मारहाण करीत 'जय श्रीराम' म्हणायला लावणाऱ्या अज्ञात आठ जणांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार गुरुवारी रात्री साडेबारा वाजता हडको कॉर्नर भागात घडला.

या प्रकरणी इम्रान इस्माईल पटेल (वय २८, रा. जटवाडा रोड) याने तक्रार दाखल केली. पटेल हे कटकटगेट भागातील एका हॉटेलमध्ये वेटर आहेत. ते गुरुवारी रात्री काम संपल्यानंतर दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी हडको कॉर्नर भागात त्यांना आठ ते दहा जणांनी दुचाकी आडवी लावत अडविले. इम्रान यांना मारहाण करत त्या टोळक्याने 'जय श्रीराम' म्हणण्याची जबरदस्ती केली. यावेळी आरडाओरड केली असता तेथील एका व्यक्तीने घराबाहेर येऊन इम्रानची सुटका केली, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी इम्रान पटेल यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक, केंद्रप्रमुखांवर गुन्हा दाखल

$
0
0

स.भु.च्या गोंदेगाव शाळेतील सामूहिक कॉपी प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्याच्या प्रकरणी गोंदेगाव येथील सरस्वती भुवन शाळेच्या केंद्रप्रमुख आणि दोन शिक्षकांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करून त्याचा अहवाल सादर करा, असे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी स. भु. शिक्षण संस्थेच्या सरचिटणीसांच्या नावे दिले आहेत.

दहावीच्या परीक्षेत गणित विषयाच्या पेपरच्यावेळी गोंदेगाव येथील येथील स. भु. शाळेत सामूहिक कॉपीचे प्रकरण उघडकीस आले होते. एस.एस.सी. बोर्डाच्या भरारी पथकाने शाळेत जाऊन तपासणी केली असता सामूहिक कॉपीचे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे बोर्डाने ३२१ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी सोयगाव येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून केंद्रप्रमुख बी. एन. कोठावदे, सहशिक्षक प्रदीप महालपुरे, संदीप महालपुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल केल्यावर शिक्षणाधिकारी डॉ. चव्हाण यांनी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सरचिटणीसांच्या नावे पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रदीप महालपुरे व संदीप महालपुरे यांच्या निलंबनासाठी पूर्वपरवानगी देण्याबाबत प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम ३३ व ३५च्या आधीन राहून निलंबनास परवानगी देण्यात येत आहे. याबद्दल तात्काळ कार्यवाही करून त्याचा अहवाल शिक्षणाधिकार्यालयास सादर करावा. इतर दोषींविरुद्धही नियुक्ती प्राधिकारी म्हणून तरतुदींच्या आधीन राहून कारवाई करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संशोधन विभागाच्या तक्रारींचा ओघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधन विभागाचा (पीएच. डी.) विस्कळीतपणा संशोधक विद्यार्थ्यांसाठी तापदायक ठरला आहे. संशोधन प्रक्रियेच्या विलंबाला विभागाचे कर्मचारी कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहेत. आता रेफ्री पॅनल परीक्षकांच्या पात्रेतवर बोट ठेवले गेल्याने पीएच. डी. प्रक्रिया वादात सापडली आहे.

नवनियुक्त कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासकीय कामकाजाचे नव्याने नियोजन करण्यात येत आहे. परीक्षा विभाग, संशोधन विभागाच्या (पीएच. डी.) कामाचा डॉ. येवले यांनी नुकताच आढावा घेतला. संशोधन प्रक्रियेवर त्यांचा भर असल्यामुळे पीएच. डी. विभागाच्या शिस्तबद्ध कामासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या विभागात विद्यार्थ्यांची सर्वाधिक गैरसोय असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थी संघटनांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नव्हती. मात्र, नवीन कुलगुरूंकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. संशोधन मान्यता पत्र मिळवण्यापासून ते मौखिक चाचणीपर्यंत विद्यार्थ्यांची कोंडी होते. शोधप्रबंध मूल्यांकन प्रक्रिया सर्वाधिक जिकिरीची असून विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे फाइल विभागात असूनही विद्यार्थी फक्त हेलपाटे मारतात. कर्मचारी आणि संशोधकात वाद झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या अडचणी जाणून घेऊन कुलगुरूंनी अनुकूल बदल करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी आहे.

आता परीक्षण पॅनलच्या (रेफ्री पॅनल) परीक्षकांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे काही नेमणुका नव्याने करण्याची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. तसेच संशोधन मान्यता समितीच्या बैठकीचे कार्यवृत्तांत तयार नसतात. प्रभारी अधिष्ठाता मागील बैठकीच्या तारखा टाकून संशोधन मान्यता समितीसमोर न ठेवलेली प्रकरणे सोयीनुसार निकाली काढतात. पीएच. डी. शोधप्रबंध परीक्षण पॅनलसाठी विषयनिहाय पात्र परीक्षक सूची नसते. काही परीक्षक दीड ते दोन वर्षे प्रतिसाद देत नाहीत. तरीही त्यांना परीक्षक पॅनलवर नेमल्याचा आरोप संशोधक विद्यार्थी हनुमंत गुट्टे यांनी केला. पॅनलवरील अपात्र परीक्षकांची नेमणूक रद्द करावी आणि मूल्यांकनासाठी विषयनिहाय परीक्षक सूची तयार करावी, अशी मागणी गुट्टे यांनी केली. याबाबत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना निवेदन देण्यात आले. अपात्र परीक्षकांच्या मूल्यांकन अहवालानुसारच्या सर्व पीएच. डी. पदव्या रद्द करुन प्रबंधाचे पुन्हा मूल्यांकन करावे असे गुट्टे यांनी म्हटले आहे.

\Bरेफ्री पॅनलवर आक्षेप

\Bविद्यापीठाने पीएच. डी. शोधप्रबंध मूल्यांकनासाठी परीक्षक पॅनलवर (रेफ्री) नेमलेल्या परीक्षकांच्या पात्रतेबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. तत्कालीन अधिष्ठातांनी पदव्युत्तर शिक्षक नसलेल्या, अध्यापन प्रक्रियेत नसलेल्या, पीएच. डी.चे मार्गदर्शक नसलेल्या, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली एकही पीएच. डी. प्रदान केली गेली नाही, अशा व्यक्ती परीक्षणासाठी नेमल्याचा आक्षेप तक्रारदार हनुमंत गुट्टे यांनी घेतला आहे.

\Bकुलगुरूंना सोमवारी भेटणार\B

पीएच. डी. विभागाच्या तक्रारीबाबत विद्यार्थी संघटना, संशोधक विद्यार्थी सोमवारी कुलगुरूंची भेट घेणार आहेत. काही विद्यार्थ्यांना अजूनही संशोधन मार्गदर्शक (गाइड) मिळालेले नाहीत. आंतरविद्याशाखीय मार्गदर्शक देणे शक्य असूनही चालढकल सुरू असल्यामुळे विद्यार्थी वैतागले आहेत. तीन वर्षांपासून सुरू असलेली पीएच. डी. प्रक्रिया अद्याप अर्धवट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूषित पाण्याच भडका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वारंवार तक्रार करूनही दूषित पाण्याचा प्रश्न सुटत नाही म्हणून संतापलेल्या नगरसेविका मीना गायके व नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तब्बल साडेतीन तास दुकानात कोंडून ठेवले. आयुक्तांनी येऊन पाहणी केल्यावर आणि तात्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यावर नागरिकांनी अधिकाऱ्यांची सुटका केली. हा प्रकार हनुमाननगर भागात शुक्रवारी घडला.

हनुमाननगरमधील काही गल्ल्यांमध्ये दूषित पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून या भागातील नळांना दूषित पाणी येते. हा प्रश्न पुंडलिकनगर वॉर्डच्या नगरसेविका मीना गायके यांनी वेळोवेळी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला. अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली, पण हा प्रश्न सुटला नाही. त्यांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दूषित पाणी भरलेल्या बाटल्या आयुक्त आणि महापौरांना दिल्या. त्यावेळी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी हनुमाननगरातील दूषित पाण्याची समस्या तात्काळ सोडवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता के. एम. फालक आणि ड्रेनेज विभागाचे उपअभियंता पी. जी. पवार पाहणी करण्यासाठी हनुमाननगरात दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ महापौर नंदकुमार घोडेले देखील आहे. घोडेले यांनी पाहणी केली व ते निघून गेले.

नगरसेविका गायके व नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करीत फालक व पवार यांना कटिंग सलूनमध्ये कोंडले. 'आयुक्त येत नाहीत तोपर्यंत तुमची सुटका केली जाणार नाही.' असे त्यांनी या अधिकाऱ्यांना सांगितले. अधिकाऱ्यांनी फोन करून घटनेची माहिती आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिली. आयुक्तांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना हनुमाननगरात पाठवले. पानझडे यांनी परिसराची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला, परंतु आयुक्तांनी आले पाहिजेत, असा आग्रह नागरिकांनी धरला. आयुक्त आल्यानंतरच अधिकाऱ्यांची सुटका करू, असे नागरिक म्हणत होते. ही बाब पानझडे यांनी आयुक्तांना कळवल्यावर आयुक्त दुपारी सव्वादोन वाजता हनुमाननगरात आले. त्यांनी गायके यांच्यासह नागरिकांशी चर्चा केली. दूषित पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ते काम तात्काळ सुरू केले जाईल, असे त्यांनी नागरिकांना सांगितले. त्यानंतर नागरिकांनी फालक व पवार यांची सुटका केली.

\Bमहापौरांबद्दल नाराजी\B

नागरिकांनी यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. 'तुम्ही येता आणि पाहणी करून जाता. काम सुरू होत नाही. काम सुरू होणार नसेल तर पाहणी करण्यासाठी येताच कशाला,' असे नागरिक म्हणत होते. महापौरांनी थोडावेळ पाहणी केली आणि ते निघून गेले. महापौर लगेचच निघून गेल्यामुळे नागरिकांचा संताप अधिकच वाढला. महापौरांनी मात्र,आपण लगेच निघून गेलो नाही, पाऊण तास त्या परिसरात फिरून पाहणी केली, असे सांगितले. हनुमाननगरातील ड्रेनेज लाइन बदलली जाणार आहे. जलवाहिनी खाली आणि त्यावर ड्रेनेज लाइन अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे या भागात दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थींना पालिकेचा दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पंतप्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत स्वत:च्या जागेवर घराचे बांधकाम करणाऱ्या लाभार्थींना 'बेटरमेंट चार्जेस'मध्ये सूट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत स्वत:च्या जागेवर घरांचे बांधकाम करण्यासाठी महापालिकेकडे दहा हजार ८०० लाभार्थींची नोंद झाली आहे. त्यापैकी ७३१ लाभार्थींचे प्रस्ताव मान्य झाले आहेत. त्यांना राज्य सरकारकडून एक लाख रुपये तर, केंद्र सरकारकडून दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. ३० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत घर बांधण्यासाठी ही मदत केली जाते. एवढ्या क्षेत्रफळाच्या जागेत दोन खोल्या, संडास, बाथरुम बांधण्याची तरतूद आहे. या बांधकामासाठी संबंधितांना महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी घ्यावी लागणार आहे. बांधकाम परवानगी घेताना 'बेटरमेंट चार्जेस' आणि शहर विकास शुल्क भरावे लागते. ३० चौरस मीटर जागेसाठी सुमारे २५ हजार रुपये 'बेटरमेंट चार्जेस' आणि ३० हजार रुपये विकास शुल्क म्हणून घेतले जाते.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी 'बेटरमेंट चार्जेस'मध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २५ हजार रुपयांची सूट या लाभार्थींना मिळणार आहे. बेटरमेंट चार्जेस ८५० रुपये प्रती चौरस मीटर प्रमाणे आकारले जातात, तर विकास शुल्क रेडिरेकन दराच्या दोन टक्के आकारले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा खून, आरोपीस अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'दुसऱ्या माणसांकडून मारहाण केली' असे म्हणत सुरा तसेच दांड्याने एकाच घरातील तिघांना गंभीर मारहाण करणाऱ्या आणि त्यात पिंपळगाव पांढरी (ता. जि. औरंगाबाद) येथील एक महिला मृत्युमुखी पडल्याच्या प्रकरणात आरोपी विलास नारायण ठोंबरे याला शुक्रवारी (१९ जुलै) अटक करुन न्यायालयात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (२२ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ईश्वर के. सूर्यवंशी यांनी दिले.

या प्रकरणी मृत मंदाबाई सुनिल भुकेले (३६, रा. पिंपळगाव पांढरी) हिची आई पार्वताबाई दामोधर ठोंबरे (७०, रा, पिंपळगाव पांढरी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १५ जुलै २०१९ रोजी रात्री नऊच्या सुमारास गावातील आरोपी विलास नारायण ठोंबरे (३३) हा आला व 'तुमची मुलगी मंदाबाई हिने दुसरी माणसे माझ्यामागे लावून मला मारहाण का केली', असे म्हणत शिविगा‌ळ करीत सुऱ्याने तसेच दांड्याने मंदाबाईला गंभीर मारहाण केली. फिर्यादीचा नातू रोहन सुनिल भुकेले हा मंदाबाईला सोडवण्यासाठी आला असता, आरोपीने त्याला व फिर्यादीलाही दांड्याने गंभीर स्वरुपाची मारहाण केली. ग्रामस्थांनी मंदाबाईला घाटीत दाखल केले असता, उपचारादरम्यान तिचा गुरुवारी (१८ जुलै) मृत्यू झाला. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, आरोपीने गुन्ह्यात वापरलेली हत्यारे तसेच कपडे जप्त करणे बाकी असून, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचाही तपास करावयाचा आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी महाराजांचा पुतळा २१ फूट उंचीचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१ फूट उंचीचा नवीन पुतळा बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी आता निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. चौकातील चबुतऱ्याची उंची वाढविण्यासाठी सध्या काढण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आता गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात बसवला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याबद्दल एक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. यासाठी शिवप्रेमींनी आंदोलन देखील केले. शेवटी आठ-दहा दिवसांपूर्वी पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले. यासाठी बसवण्यात आलेला पुतळा काढण्यात आला आहे. हा पुतळा सध्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मडिलगेकर आर्ट स्टुडिओमध्ये ठेवण्यात आला आहे. पुतळा हलवण्यात आल्यानंतर क्रांतीचौक येथील वाहतूक बेटात काम सुरू करण्यात आले आहे. चबुतऱ्याची उंची वाढविण्यात येणार आहे. चबुतऱ्याच्या उंचीच्या तुलनेत पुतळ्याची उंची कमी वाटते. त्यामुळे चबुतऱ्याच्या उंचीला साजेसा पुतळा बसवला पाहिजे, अशी भावना व्यक्त होत होती. त्याची दखल घेऊन नगरसेवक राजू शिंदे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवला व क्रांतीचौकात बसवण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा २१ फूट उंचीचा असावा अशी मागणी केली.

विनोद पाटील, अभिजीत देशमुख यांनी ही मागणी केली आहे, असा उल्लेख प्रस्तावात करण्यात आला आहे. या प्रस्तावाला राजेंद्र जंजाळ, गोकुळसिंह मलके यांनी अनुमोदन दिले. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी माहिती दिली. चबुतऱ्याची उंची वाढवली जाणार आहे. त्यामुळे चबुतऱ्याच्या उंचीला साजेसा पुतळा असला पाहिजे, असे ते म्हणाले. नव्याने बसवण्यात येणाऱ्या पुतळ्यासाठी निविदा काढली जाणार आहे.

सध्या मडिलगेकर स्टुडिओत असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात बसवला जाणार आहे. पुतळा बसवण्यासाठीची आवश्यक कामे महापालिकेकडून केली जाणार आहेत.

\Bडॉ. आंबेडकर यांचाही पुतळा बदलणार\B

भडकलगेट येथे बसवण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा देखील बदलण्यात येणार आहे. हा पुतळा बदलण्याबद्दलचा प्रस्ताव नगरसेवक राजू शिंदे यांनी मांडला होता. तो प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नवीन पुतळ्यासह तेथील सौंदर्यबेटाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. पुतळ्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करून व त्यांच्याकडून निधी आणू, असे शिंदे सर्वसाधारण सभेत म्हणाल्याचे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images