Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘वॉक-रन’मुळे वाहतूक मार्गात बदल

$
0
0

औरंगाबाद : विविध सामाजिक संस्था, पोलिस आयुक्तालय यांच्यातर्फे शनिवारी सायंकाळी शहरात जातीय सलोखा वाढवण्यासाठी' वॉक-रन'चे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी क्रांतीचौक येथून या 'वॉक रन'ला प्रारंभ होणार असून, एमटीडीसी कार्यालय, रेल्वे स्टेशन ते परत क्रांतीचौक असा 'वॉक-रन'चा मार्ग असणार आहे. यामध्ये हजारो नागरिक सहभागी होणार आहेत. यावेळी वाहतुकीला अडचण होऊ नये म्हणून सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ यादरम्यान या मार्गावरील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी यावेळी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधी विद्यापीठाचे आज भूमिपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधी विद्यापीठाच्या भूमिपूजनाचा आणि शिलान्यासाचा कार्यक्रम उद्या, शनिवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या कुलपती तथा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती आर. बानुमती यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग, आर.एम. बोर्डे, संजय गंगापुरवाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कांचनवाडी परिसरातील विधी विद्यापीठाच्या जागेवर हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विठ्ठलराव सपकाळ यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीन महिन्यांत ३५ कोटीच वसूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उद्दिष्ट न ठरवता महापालिकेने मालमत्ता कराची वसुली सुरू केली आहे. एक एप्रिल पासून २४ जुलैपर्यंत ३५ कोटी ४० लाख ३३ हजार ७०१ रुपयांची वसुली झाल्याची माहिती मिळाली आहे. मालमत्ता कराच्या वसुलीची मागणी आणि उद्दिष्ट या बद्दल प्रशासनातच संभ्रम असल्याचे बोलले जात आहे.

एप्रिल महिन्यात आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर दरवर्षी महापालिकेकडून मालमत्ता कराची मागणी त्या मागणीच्या तुलनेत मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून वसुलीच्या कामाला प्रारंभ केला जातो. यंदा मात्र मागणी आणि उद्दिष्ट अद्याप ठरवण्यात आले नाही. एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत झालेल्या कर वसुलीचा तपशील प्राप्त झाला असून त्यात मागणी आणि उद्दीष्टाचा रकाना कोराच आहे. वसुली मात्र ३५ कोटींपेक्षा जास्त झाल्याचा उल्लेख आकडेवारीवरुन स्पष्ट होते. गतवर्षीच्या तुलनेत ३५ लाख ३० हजार ७७७ रुपयांनी यंदाची आतापर्यंत झालेली वसुली जास्त आहे असा उल्लेख देखील करण्यात आला आहे.

झोन क्रमांक एकच्या अंतर्गत दोन कोटी ८२ लाख पाच हजार ६९८ रुपयांची वसुली झाली आहे. झोन क्रमांक दोनच्या माध्यमातून तीन कोटी १२ लाख १५ हजार ४८२ रुपये, झोन क्रमांक तीन अंतर्गत एक कोटी आठ लाख ८७ हजार ८७८ रुपये, झोन क्रमांक चारच्या अंतर्गत दोन कोटी २२ लाख ८९ हजार २३ रुपये, झोन क्रमांक पाच अंतर्गत पाच कोटी १४ लाख ८० हजार ४४३ रुपये, झोन क्रमांक सहा अंतर्गत दोन कोटी १८ लाख ३२ हजार ७३५ रुपये, झोन क्रमांक सात अंतर्गत सात कोटी ९५ लाख ७९ हजार ४४४ रुपये, झोन क्रमांक आठ अंतर्गत तीन कोटी ३७ लाख ९४ हजार २८४ रुपये तर झोन क्रमांक नऊच्या माध्यमातून चार कोटी २८ लाख १४ हजार ५०१ रुपये मालमत्ता करापोटी वसूल झाले आहेत. महापालिका मुख्यालयाच्या माध्यमातून तीन कोटी १९ लाख ३४ लाख २१३ कोटी रुपयांची कर वसुली झाली आहे.

महापौरांच्या घरावर दोन कोटी ७९ लाखांची थकबाकी

महापौर नंदकुमार घोडेले यांचे जाधववाडी भागात जुने घर आहे. त्यांचे बालपण याच घरात गेले आहे. या घराच्या मालमत्ता करापोटी महापालिकेने त्यांच्या मोठ्या भावाच्या नावाने थकबाकीची नोटीस बजावली आहे. ही थकबाकी थोडीथोडकी नसून दोन कोटी ७९ लाख रुपये आहे. त्यात ७५ हजार रुपये दंडाचीच रक्कम आहे. नोटीस मिळाल्यावर त्याची महापौरांना माहिती मिळाली आणी ते चक्रावून गेले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मी एनओसी घेतो मग एवढी थकबाकी कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. या थकबाकीबद्दल अधिक माहिती घेतली असता २०११ या वर्षापासूनची ही थकबाकी असल्याचे करमूल्यांकन विभागाने सांगितले. याबद्दल स्वत:ची बाजू मांडताना महापौर म्हणाले, 'जाधववाडी येथे आमचे जुने घर आहे. तेथे आम्ही अपार्टमेंट बांधले आहे. अपार्टमेंटमधील फ्लॅट विकले आहेत. ज्यांनी फ्लॅट विकत घेतले त्यांच्या नावाने ते अद्याप झालेले नाहीत, त्यामुळे सर्व फ्लॅटचा एकत्रित मालमत्ता कर आमच्या भावाच्या नावानेच येतो. आता त्या मालमत्तेची फोड करावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपअभियंत्याच्या बदलीला ‘मॅट’ची अंतरिम स्थगिती

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत उपअभियंतापदावर कार्यरत असलेल्या वीरभद्रप्पा हनमसागर यांची केवळ ११ महिन्यांतच बीड जिल्हा परिषदेत बदली करण्याच्या शासन निर्णयाला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या (मॅट) औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली.

हनमसागर यांची बीड जिल्हा परिषदेतून पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत उपअभियंतापदावर १४ ऑगस्ट २०१८ रोजी शासनाने बदली केली होती. ते त्या पदावर कार्यरत असताना केवळ ११ महिन्यांतच शासनाने अचानकपणे त्यांची पुन्हा बीड जिल्हा परिषदेमध्ये बदली केली होती. त्यांनी या बदली आदेशाला मॅटमध्ये आव्हान दिले होते. हनमसागर हे बदलीस पात्र नसताना, कोणतेही कारण नमूद न करता त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली, असा युक्तीवाद अर्जदाराचे वकील महेश स्वामी यांनी केला. हनमसागर यांच्या बदली आदेशाला उपाध्यक्ष बी. पी. पाटील यांनी अंतरिम स्थगिती दिली. सरकारतर्फे सादरकर्ता अधिकारी डी. आर. पाटील यांनी बाजू मांडली. मूळ अर्जावरील सुनावणी २७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोतकर, वैद्य, त्रिवेदी यांच्या ‘मातोश्री’ वर मुलाखती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबईत 'मातोश्री' वर शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आणि वैजापूर नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश चव्हाण यांनी मुलाखती दिल्या. मराठा आरक्षणासाठी झटणारे विनोद पाटील मात्र यावेळी उपस्थित नव्हते, त्यामुळे ते उमेदवार असतील की नाही याबद्दल संभ्रम कायम आहे. उमेदवाराची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या शनिवारी करण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणूकीची जागा युतीमध्ये शिवसेनेला सुटलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून फिल्डींग लावणे सुरु केले होते. शुक्रवारी 'मातोश्री' येथे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. अर्जुन खोतकर, राजू वैद्य, नरेंद्र त्रिवेदी आणि प्रकाश चव्हाण यांनी मुलाखत दिली अशी माहिती सुत्रांनी दिली. सुभाष देसाई यांनी प्रत्येकाशी सुमारे १५ ते २० मिनीटे चर्चा केली. आम्ही तुम्हाला कशामुळे उमेदवारी द्यावी, कशाच्या आधारावर तुम्ही निवडून याल, निवडून येण्याची क्षमता तुमच्यात आहे का असे प्रश्न या इच्छुकांना विचारण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यावर देसाई यांनी पदाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. त्यात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, भास्कर आंबेकर, आमदार संजय शिरसाट, संदिपान भुमरे, सुहास दाशरथे यांचा समावेश होता. देसाई यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी व इच्छुक उमेदवार यांच्याशी संवाद साधला. सर्वच इच्छुक उमेदवार तोलामोलाचे आहेत, त्यामुळे कुणाला उमेदवारी द्यायची हे ठरवणे कठीण आहे असे ते म्हणाले. उमेदवारी बद्दल उद्या किंवा परवापर्यंत निर्णय घेऊ, जो उमेदवार दिला जाईल त्याला तुम्ही सर्वजण मिळून निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले.

अंबादास दावने यांच्या नावाचीही चर्चा

या विधान परिषद निवडणूकीसाठी शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांचे नाव उमेदवार म्हणून ऐनवेळी जाहीर होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिली. दानवे यांच्याशी देखील सुभाष देसाई यांनी त्या दृष्टीने चर्चा केल्याचे सुत्रांनी सांगितले. विनोद पाटील मात्र मुलाखतीच्या वेळी उपस्थित नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणी परिसरातील निजाम बंगल्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू झाले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी दिली. एकूण शंभर विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था वसतिगृहात करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झाल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जानेवारी महिन्यात छावणी परिसरातील निजाम बंगल्यात वसतिगृह सुरू केले. मात्र, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला नसल्याने चालू शैक्षणिक वर्षापासून पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आई-वडिलांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृहाचे दरमहा शुल्क एक हजार रुपये असून जेवणाची व्यवस्था विद्यार्थ्यांनी करणे अपेक्षित आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे पात्र विद्यार्थ्यांनाच वसतिगृहात प्रवेश मिळणार आहे. तसेच प्रवेश क्षमतेच्या पाच टक्के दिव्यांग आरक्षण आहे. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश असल्यामुळे योग्य नमुन्यात कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास वसतिगृहात मेस सुरू करण्यात येईल, असे विश्वकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे राहुल तायडे यांनी सांगितले. वसतिगृहाच्या देखभालीचे काम संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलांचे 'अ' वसतिगृह किंवा निजाम बंगला वसतिगृहात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेचे समन्वयक प्रा. पी. एस. स्वामी आहेत. या पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ. प्राणेश मुरनाळ, डॉ. संतोष भोसले, डॉ. अभिजीत वाडेकर, संजय देशमुख, प्रा. प्रशांत जाधव, प्रा. मकरंद वैष्णव, प्रा. एस. बी. बोथरा, प्रा. जितेंद्र जोशी, प्रा. नीलेश विश्वनाथ, प्रा. राहुल साळवे उपस्थित होते.

अधिक अंतराचा मुद्दा

शहर आणि परिसरातील महाविद्यालयांचे अंतर लक्षात घेऊन छावणी परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी वसतिगृह सुरू करण्यात आले. हा परिसर मुख्य रस्त्यापासून दूर आहे. शिवाय शहरातून तिथपर्यंत जाण्यासाठी सार्वजनिक वाहन मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची अडचण आहे. या कारणामुळे जानेवारी महिन्यात पुरेसे प्रवेश झाले नव्हते, पण माफक शुल्क असल्यामुळे आता प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची माहिती दिली जाणार आहे.

चार वसतिगृहात एकूण शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पंचवीसपेक्षा अधिक प्रवेश असल्यास एक स्वतंत्र वसतीगृह विद्यार्थिनींसाठी राखीव ठेवले जाईल. वसतिगृहात पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत.

डॉ. महेश शिवणकर, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टपरीछाप’ कॉलेजांचे कॉपीला प्रोत्साहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत साडेतीनशेपेक्षा जास्त विनाअनुदानित पदवी व पदव्युत्तर महाविद्यालये सुरू आहेत. या महाविद्यालयात पात्रताधारक प्राध्यापक-प्राचार्य आणि पायाभूत सुविधा नसल्यामुळे गंभीर परिस्थिती आहे. शैक्षणिक मूल्यमापनाद्वारे 'टपरीछाप' महाविद्यालयांवर कारवाई करा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने (बामुक्टो) केली. याबाबत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले.

विद्यापीठाअंतर्गत विनाअनुदानित महाविद्यालयांच्या सुमार दर्जाच्या पार्श्वभूमीवर निवेदन देत 'बामुक्टो'ने गंभीर मुद्द्यांना हात घातला आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना निवेदन देऊन संघटनेने प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली. विनाअनुदानित महाविद्यालयात युजीसी पात्रताधारक पूर्णवेळ प्राध्यापक-प्राचार्य नाहीत. इमारती, प्रयोगशाळा, फर्निचर, ग्रंथालय अशा पायाभूत सुविधा नाहीत. या महाविद्यालयांचे 'नॅक' मूल्यांकन झालेले नाही. त्यामुळे शुल्क गोळा करुन परीक्षेत कॉपीला प्रोत्साहन देण्याचे प्रकार घडतात. अशा महाविद्यालयांच्या संलग्नीकरण समितीवर जाण्यासाठी मूल्यहिन प्राध्यापकांची गर्दी होते. त्यातून विद्यापीठाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे 'बामुक्टो'ने निवेदनात नमूद केले आहे. कायम विनाअनुदानित 'टपरीछाप' महाविद्यालयांच्या संलग्नीकरण करण्यात तत्कालीन प्र-कुलगुरूंचे कार्यालय आणि शैक्षणिक विभाग सक्रिय असल्याचा आरोप संघटनेने केला. अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक भरती आणि शिक्षकांचे 'कॅस' करताना सर्व प्रवर्गातील पात्र प्राध्यापकांची निवड करावी, महाविद्यालयीन प्राध्यापकांचे ऑनलाइन अर्ज मागवून विद्यापीठ स्तरावर 'कॅस' शिबिर घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी डॉ. बप्पासाहेब मस्के, डॉ. विक्रम खिलारे, डॉ. डी. आर. देशमुख, डॉ. दीपक भुसारे, प्रा. उमाकांत राठोड, डॉ. विकास चौधरी, डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ. महेश मोटे, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. एम. ए. करे आदी उपस्थित होते.

\Bअभ्यास मंडळावर आक्षेप

\Bअभ्यास मंडळात २५ सदस्य चुकीच्या पद्धतीने निवडले आहेत किंवा अपात्र सदस्यांचे नामनिर्देशन केले असल्याचे 'बामुक्टो'ने म्हटले आहे. प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्या कार्यकाळात चुकीच्या नेमणुका व निवड झाल्या आहेत. त्यांचे कृत्य शैक्षणिक भ्रष्टाचार व विद्यापीठ विरोधी असल्याने पांडे यांना पदावरुन निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अतिरिक्त बस सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

शालेय विद्यार्थ्यांसाठी वैजापूर - लाडगाव मार्गावर अतिरिक्त बस सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गुरुवारी पिंपळगाव फाटा येथे बस अडवून आंदोलन केले. या मार्गावर अतिरिक्त बस सुरू करण्याचे आगार व्यवस्थापकांनी मान्य केले.

अतिरिक्त बस सुरू होत नाही तोपर्यंत या मार्गावरून बस जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यानी घेतला. त्यांना गावकऱ्यांनीसुद्धा पाठिंबा दिला. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेत पाठिंबा दिला. त्यांनी मध्यस्थी करत आगार व्यवस्थापकांशी चर्चा केली. प्रशासनाने मागण्या मान्य करत शुक्रवारपासून लाडगाव रस्त्यावर अतिरिक्त बस सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी लाडगावचे सरपंच राजू जाधव, विकास सोमवंशी, शिवाजी सावंत, विद्यार्थी प्रतिनिधी प्रशांत सोमवंशी, मयूर रक्ताटे, बबनराव गायकवाड, साळुंके पाटील, आबा गायकवाड यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दूध दरात औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने २१ जुलैपासून प्रती लिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. दुष्काळाचे सावट, चारा-पशुखाद्याचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे विक्री दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही.

जिल्ह्यातील मुख्य दूध पुरवठादार असलेल्या जिल्हा सहकारी दूध संघ 'देवगिरी महानंद' या ब्रॅँडने बाजारात आपली उत्पादने विकतो. संघामार्फत दररोज सरासरी एक लाख लिटरपेक्षा जास्त दूध संकलन होते. तर स्थानिक पातळीवर सरासरी ५० हजार लिटरहून अधिक दुधाची विक्री होते. यासह ताक, लस्सी आदी दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती व विक्री संघामार्फत केली जाते. जिल्ह्यातील सुमारे ६० हजारांहून अधिक दूध उत्पादक शेतकरी संघाला नियमित दूध पुरवठा करतात. सध्या मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट घोंघावते आहे. त्यामुळे दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतीलिटरमागे २५ रुपयांचा खरेदी दर आता २७ रुपये झाला आहे. विशेष म्हणजे संघाने एक जून रोजीच दूध खरेदी दरात तीन रुपयांची वाढ केली आहे. आता या नव्या निर्णयामु‌ळे दीड महिन्यात दूध खरेदी दरात प्रती लिटरमागे एकूण पाच रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदीप पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून नशेच्या गोळ्या जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल माळवे याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. आरोपी माळवेच्या ताब्यातून दहा हजार रुपये किंमतीच्या नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी अनिल अंबादास माळवे (वय ४६ रा. मुकुंदवाडी) हा मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन भागातील दारुच्या दुकानाजवळ नशेच्या गोळ्या विकत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून आरोपी अनिल माळवे याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून नशेच्या गोळ्या असलेल्या दहा हजार रुपये किंमतीच्या १२ स्ट्रीप जप्त करण्यात आल्या. अन्न आणि औषधी निरीक्षक राजगोपाल बजाज यांच्या तक्रारीवरून माळवेविरुद्ध औषधे आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक घनश्याम सोनवणे, विकास खटके, महादेव पुरी, रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, प्रवीण मुळे, जालिंदर मांटे, शिवाजी गायकवाड आणि घोडके आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकर पुरवठ्यात येणार कुपन पद्धत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदार कंपनीप्रमाणे टँकरचे धोरण ठरविण्याचे नियोजन महापालिका करत आहे. येत्या काही दिवसांत नियोजन करून ते मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत ठेवले जाणार आहे. पैसे भरूनही पाण्याचे टँकर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी नवीन धोरणाचा उपयोग होईल असे मानले जात आहे.

पाण्याच्या टँकरसाठी पालिकेत भरूनही नागरिकांना टँकर दिले जात नाही, अशा तक्रारी प्रामुख्याने गुंठेवारी भागातून प्राप्त होत आहेत. गुंठेवारी भागात जलवाहिनी नसल्यामुळे नागरिकांकडून तीन महिन्यांचे टँकरचे पैसे आगाऊ भरून घेवून पालिकेतर्फे पाणी पुरवठा केला जातो. परंतु, टँकरने पाणी मिळेलच याची शाश्वती नसते. महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी घेतलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत हे समोर आले. या बैठकीला उपमहापौर विजय औताडे, माजी नगरसेवक किशोर नागरे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उप अभियंता के. एम. फालक उपस्थित होते. टँकरने पाणी पुरवठा करण्याचे धोरण ठरवा, अशी सूचना महापौरांनी बैठकीत केली. कोल्हे यांनी धोरण तयार केले जात असल्याचे सांगितले. समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी नियुक्त करण्यात आली होती. या कंपनीने नागरिकांकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी पैसे घेऊन त्यांना कुपन दिले होते. हे कुपन टँकरचे पाणी दिल्यानंतर नागरिकांनी टँकरचालकाला देणे व चालकाने ते कंपनीत जमा करणे अशी पद्धती ठरविण्यात आली होती. महिन्यातून पाचवेळा टँकर आले नाही, तर तेवढे कुपन शिल्लक राहत असत. ते कुपन नागरिकांना पुढील महिन्यात वापरता येत होते. याच प्रकारचे धोरण महापालिका ठरवित असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. हे धोरण मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत ठेवले जाणार आहे.

\Bटँकरच्या संख्येत घट \B

पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी बोअरला पाणी आले आहे. त्यामुळे टँकरची मागणी कमी झाली आहे. उन्हाळ्यात ११८ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात होता, आता ९८ टँकर्सद्वारे पाणी दिले जात आहे.

\Bचारीमुळे पाणी पुरवठा सुरळीत\B

जायकवाडी धरणातील अॅप्रोच कॅनॉलच्या तोंडाला चारी खोदण्यात आली आहे. त्यामुळे पंप हाउसच्या उपसा विहिरीपर्यंत पाणी येण्यातील अडथळा कमी झाला आहे. चारी खोदण्याचा निर्णय घेतला नसता, तर पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असता, असे हेमंत कोल्हे यांनी बैठकीत लक्षात आणून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक याचिकेत खासदार जलील यांना नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन (एआयएमआयएम) पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेत राज्य निवडणूक आयोगासह विजयी व पराभूत उमेदवार यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. आर. बोरा यांनी दिले.

खासदार जलील यांची निवडणूक रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. निवडणूक प्रचारात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होईल असा प्रचार करण्यात आल्याचे याचिकेत नमूद केले आहे. बहुजन महापार्टी या पक्षाचे पराभूत उमेदवार शेख नदीन शेख करीम यांनी निवडणूक याचिका केली आहे.

इम्तियाज जलील निवडणूक लढवीत असलेल्या 'एआयएमआयएम' पक्षाचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनी दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशी भाषणे निवडणूक प्रचारादरम्यान केली. त्यांनी काही 'सीडी' सादर केल्या. त्यांनी मशिदींमधूनही प्रचार केला आणि त्याची छायाचित्रेही सादर करण्यात आली. त्यांनी मुस्लिम; तसेच दलितांच्या नावावर मते मागितली. इम्तियाज जलील यांनी निवडणुकीदरम्यान ८२ हजार रुपये रोख खर्च केला. निवडणूक नियम ८७नुसार निवडणुकीचा खर्च करण्यासाठी स्वतंत्र खाते राष्ट्रीयीकृत बॅंकेत उघडून त्यातूनच सारा खर्च धनादेशाद्वारे करावा लागतो.

याशिवाय एका अल्पवयीन मुलगा सय्यद मोहम्मद अली हाश्मी याची 'सीडी' आफताब खान याने तयार करून ती मतदानाआधी सोशल मीडियावर प्रसारित केली. तो 'एआयएमआयएम'चा कार्यकर्ता आहे. या 'सीडी'मध्ये 'एआयएमआयएम'ला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याशिवाय यामध्ये धार्मिक तेढ निर्मित होईल अशा पद्धतीची वक्तव्ये अश्लील भाषेत करण्यात आली होती. या याचिकेत निवडणूक आयोग, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह निवडणुकीतील सर्वच पराभूत उमेदवारांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्याची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे हे मांडत आहेत. या याचिकेवर चार आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटलांटातील स्मार्ट सिटी एक्स्पोसाठी महापौरांना निमंत्रण

$
0
0

(सिंगल)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अटलांटा येथे ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या स्मार्ट सिटी एक्स्पोसाठी महापौर नंदकुमार घोडेले यांना निमंत्रण आले आहे. या उपक्रमात २५०० पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे. विविध विषयांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी दोनशे वक्त्यांना पाचारण केले जाणार आहे. यावेळी भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनात ५० स्टॉल्स असणार आहेत. डिजीटल ट्रान्सफॉरमेशन, गव्हरनन्स, पब्लिक सेफ्टी, इमरजन्सी रिस्पॉन्स अॅण्ड सायबर सेक्युरिटी, मल्टी मॉडल मोबॅलिटी, ट्रान्सपोर्टेशन अॅण्ड एव्हिएशन आदी विषयांवर या परिषदेत चर्चा केली जाणार आहे. परिषदेत सहभागी होण्यासाठी साडेसात लाख रुपयांचा खर्च येणार आहे. हा खर्च शासनाकडून केला जाण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी एक्स्पोला जाण्याचा आपण विचार करीत आहोत, असे महापौरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हनुमान मंदिराच्या दानपेटीतून रक्कम चोरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील जय वीर हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम लांबवली; तसेच मारोती महाराजांच्या कपाळावर लावलेला चांदीचा टिळाही चोरट्यांनी चोरून नेला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यस्त होत आहे

हा प्रकार बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटे यादरम्यान घडला. याची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रात्री गस्त घालीत असताना जवळपास दोन-अडीचपर्यंत या भागामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले नाही मात्र, त्यानंतर पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डाव साधला मारुती मंदिराचे चॅनल गेटचे कुलूप तोडले. मंदिरात ठेवलेल्या दानपेटीतील चिल्लर वगळता बाकी पैसे चोरट्यांनी लांबविले. यादरम्यान मंदिरात आतील दरवाजा उघडून मारुती महाराज त्यांच्या कपाळावर लावलेला चांदीचा टिळा चोरट्यांनी चोरून नेला या चोरीच्या घटनेमुळे शिक्षक नगर व शहरातील भाविक भक्तांमध्ये संताप आहे.

मागील महिनाभरापासून शहरातील विविध भागांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या या चौरपैकी एकाही चोरीचा तपास पोलिस अद्याप लावू शकले नाही. या चोरीबाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत

शहरातील वाढत्या चोरांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा व अशा चोरट्यांना तात्काळ अटक करावी नसता आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा जागरण मंचाचे विभागीय अध्यक्ष मनोज मोरेलू यांनी दिला आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी मंत्री डॉ. शंकरराव राख यांचे निधन

$
0
0

जालना:
माजी मंत्री व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. शंकरराव राख यांचे काल म्हणजेच शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. राख यांच्यावर आज रात्री आठ वाजता जालन्यात रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

स्व.शंकरराव राख यांनी सन १९६० मध्ये जालन्यात वैद्यकीय व्यवसाय सुरु केला सन १९७५ मध्ये ते वसंतदादा पाटील यांच्या मंत्री मंडळात मंत्री होते १९८५ नंतर सक्रिय राजकारणातून ते बाजूला झाले. काँग्रेसचे ते जेष्ठ नेते होते .दीपक हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय राख यांचे ते वडील होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

$
0
0

बीड: बीडमध्ये अत्यंत थरारक घटना घडली. शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बीडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वासनावाडी येथे हे तिहेरी हत्याकांड घडले. शेतीच्या वादातून किरण काशिनाथ पवणे, दिलीप काशिनाथ पवणे आणि प्रकाश काशिनाथ पवणे या तिघांची हत्या झाली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा दाखल केला असून हल्लेखोरांचा तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उधारीची ‘वाजंत्री’ समीक्षा निरुपयोगी !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महानगरातील गती आणि गुंतागुंत पकडण्याची भाषिक शक्यता कमी असल्याने भरीव लेखनाची शक्यता नाही. तर खेड्यापाड्यात कसदार लेखन करणाऱ्या लेखकांचा तुच्छतापूर्वक उल्लेख करुन भयप्रद वातावरण तयार केले जात आहे. पाश्चात्य सिद्धांतावरील उधारीची वाजंत्री समीक्षा तरुण लेखकांना बुजवण्याचा प्रयत्न करीत आहे. उलट या समीक्षकांनी स्वत:चे सिद्धांत आकाराला आणून नवीन लेखकाच्या साहित्याचे आकलन करुन घेणे गरजेचे आहे', असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी केले.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने 'समकालीन कादंबरीकार - प्रवीण बांदेकर' या विषयावर शनिवारी चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्राचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी केले. यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, डॉ. दादा गोरे आणि के. एस. अतकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. बांदेकर यांचे साहित्य आणि तरुण लेखकांच्या वाटचालीवर गवस यांनी भाष्य केले. 'खेड्यातील लेखकांचा धीर खचवण्याचे प्रयत्न नेहमीच झाले आहेत. एकांड्या लेखकांभोवती भयप्रद वातावरण तयार केले जात आहे. पूर्वीपासून हा दुस्वास कशासाठी असा प्रश्न पडतो. ही तरुण मुलं तुमच्या सावलीला उभी राहत नाहीत. तरीसुद्धा त्यांच्या अस्सलपणाची भीती वाटते का ? दलित कादंबरी असो की गावगाड्यातील जगणं, ते समजून घेण्यात समीक्षा थिटी पडते आहे. सध्याचे गुंतागुंतीच्या वातावरणात प्रवीण बांदेकर यांच्या लेखनावर चर्चासत्र घेणे धाडसाचे आहे. कोकणातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घुसळण बांदेकर यांनी अनुभवली आहे. राष्ट्र सेवा दलाने निर्माण केलेले संवेदन बांदेकर यांच्या लेखनात उमटले. बहुसंख्य समाज चळवळीपासून तुटत गेल्यानंतर निर्माण झालेली स्पेस धर्मवादी संघटनांनी व्यापली. त्याचे चित्रण 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' कादंबरीत आहे. 'चाळेगत', 'इंडियन अॅनिमल फार्म' कादंबरीत वेगळा आशय आहे. दशावतार, चित्रकथीचा नव्या रुपबंधातील वापर दखल घेण्याजोगा आहे. या साहित्यातून नव्या प्रश्नांची गुंतवळ समजून घेताना उकल करण्यापर्यंत पोहचता येते', असे गवस म्हणाले.

'कोकणातील काँग्रेसी, समाजवादी राजकारण आक्रसण्याचे चित्रण 'चाळेगत' कादंबरीत दिसते. 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' कादंबरी नवहिंदूत्व व उजव्या राजकारणाचे सूचन करते. कोकणाच्या परिवर्तनाचा मोठा अवकाश बांदेकर यांनी कादंबरीत आणला', असे रणधीर शिंदे म्हणाले.

प्रमोद मुनघाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या सत्रात डॉ. दत्ता घोलप, सुरेखा दळवी, अलका धुपकर यांनी निबंध वाचले. चर्चक डॉ. गोविंद काजरेकर यांनी निबंधावर भाष्य केले. डॉ. केशव तुपे यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या सत्रात बालाजी सुतार, डॉ. नीतीन रिंढे यांनी निबंध वाचले. चर्चक संदीप जगदाळे यांनी भाष्य केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप झाला. डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी रसिक, अभ्यासक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bलेखक पोलिस संरक्षणात

\B'प्रवीण बांदेकर यांचे लेखन भवताल मांडणारे आणि दिशादर्शक आहे. सनातन संस्थेसारखी संघटना थेट पुरोगामी व्यक्तींना आव्हान देत असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप-शिवसेना सरकारने कारवाई केली नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर सनातनवर कारवाई झाली असती तर पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांना वाचवता आले असते. हा सगळा पट 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या'त असल्यामुळे बांदेकर यांच्यावर पोलिस संरक्षणात फिरण्याची वेळ आली', असे पत्रकार अलका धुपकर म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलन यंदा हंपीमध्ये होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्रमंडळाचे १२ वे स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलन यंदा १४ डिसेंबर रोजी हंपी (कर्नाटक) येथे होणार आहे, अशी माहिती संमेलनाध्यक्ष प्रा. स्नेहल पाठक, निमंत्रक भाऊ सुरडकर यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

सुरडकर म्हणाले, 'संस्थेने यापूर्वी औरंगाबाद,भगूर, सेमाडोह, अंदमान, मॉरेशिअस, श्रीलंका, दुबई, लंडन, सिंगापूर, इंडोनेशिया, जपान या ठिकाणी संमेलने भरविली आहेत. हंपी गावाचा मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. जगातील कला, संस्कृती, आविष्कार असलेले धार्मिक स्थान आहे. संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून योगेश सोमण, डॉ. सी. एस. वासुदेवन, प्रा. एन. शहाजी, रणजित सावरकर, प्रा. नंदकुमार नाईक, शंकरराव गायकर, गायक प्रमोद सरकटे यांची उपस्थिती असणार आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सर्वदूर नेण्याचा प्रयत्न मंडळ सातत्याने करत असते. या संमेलनासोबत सहा दिवस बदामी, हंपी मुरडेश्वर, गोकर्ण महाबळेश्वर या स्थळांना भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. सहभाग नोंदविण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी भाऊ सुरडकर, ५९, मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. नंदकुमार नाईक, प्रमोद सरकटे, किशोर वैद्य, सुभाष कुमावत, विजय जहागिरदार, किरण सराफ, सागर निळकंठ, नारायणराव कुलकर्णी, मीना पिसोळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौघा दरोडेखोरांची कोठडीत रवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघा दरोडेखोरांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी शनिवारी दिले.

शेख आली शेख तयब (२२, रा. साकला प्लॉट परभणी), शेख रफीक उर्फ बाबा शेख चाँद (२९, रा. भैय्यासाहेब आंबेडकर नगर, परभणी), विकास राजेश जुमडे (२७, रा. अजिंठा नगर हडको, परभणी) व शेख युनूस शेख खदीर (३०, रा. मेहबुबनगर, अहमदपूर जि. लातूर) अशी आरोपींची नावे असून त्यांना परभणी लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली होती, तर न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. प्रकरणात परभणी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे हवालदार इसरार अब्दुल गफार कुरेशी (वय ४५) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, इसरार व त्यांचे सहकारी डिघोळे हे दोघे मंगळवारी मध्यरात्री रेल्वे स्थानकाच्या प्लॅट फार्म तीनवर गस्त घातल होते. त्यावेळी त्यांना पश्चिमकडील रेल्वे पटरीजवळ काही व्यक्ती अंधारात दबा धरून बसल्याची माहिती मिळाली. इसरार यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. लोहमार्ग पोलिसांनी दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना छापा मारून पकडले. मात्र, अंधाराचा फायदा घेत दोन दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या दरोडेखोरांची झडती घेतली असता त्यांच्याकडे खंजीर, मिर्चीपूड, काठी व ब्लेड सापडले. या प्रकरणात नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसकडून कुलकर्णी यांना उमेदवारी ?

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images