Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खुनातील आरोपीला पोलिसांच्या बेड्या

$
0
0

औरंगाबाद : जालना येथील शिक्षकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याच्या प्रकरणात दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. राजू संतदिन गौतम उर्फ सोनू बिहारी असे त्याचे नाव आहे.

दत्तात्रय पोकळे (४३, शिंदेवडगाव, जि. जालना) हे शिक्षक कामानिमित्त २२ फेब्रुवारी २०१७ रोजी औरंगाबादेत आले होते. जालन्याला जाण्यासाठी रेल्वे स्टेशन येथे आले असताना प्लॅटफॉम पाचच्या बाजूला अंधारात सोनू दिलीप वाघमारे (वय २५, रा. राजीवनगर), दीपक काशिनाथ सेाळस (वय २२, रा. मनमाड), सोन्या बिहारी आणि फिरोज घरफोड्या या चौघांनी गाठून धाक दाखवित लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोकळे यांनी प्रतिकार केल्याने या आरोपींनी डोक्यात दगड घालून जिवे मारले. त्यांच्याकडील दहा हजार रुपये, सेान्याची चैन, मोबाइल घेऊन फरार झाले. या प्रकरणात पोलिसांनी सेान्या वाघमारे, दीपक सोळसे यांना २० ऑगस्ट २०१७ रोजी अटक केली होती. दोन्ही आरोपी हर्सूल कारागृहात होते. त्यापैकी सेान्या वाघमारे याला उपचारासाठी घाटीत आणले असता तेथून तो पळून गेला होता. पोलिसांनी फरार आरोपी सोनूला तपोवन एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून जाताना शनिवारी बेड्या ठोकल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वंचित’च्या मुलाखतीला इच्छुकांची झुंबड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांसाठी तब्बल दीडशे उमेदवारांनी दावा केला. औरंगाबाद पूर्व, पश्चिम व मध्य मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक उमेदवार असून मध्य मतदारसंघावर 'भारिप'ने दावा केला. मुलाखतीसाठी सर्व जाती-धर्माच्या उमेदवारांची गर्दी उसळली होती.

आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व एमआयएम २८८ जागा लढवणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या शनिवारी हॉटेल वर्षा इन येथे मुलाखती घेण्यात आल्या. 'वंबआ'च्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील, अशोक सोनोने, रेखा ठाकूर आणि किसन चव्हाण यांनी मुलाखती घेतल्या. पहिल्या टप्प्यात पैठण, कन्नड, गंगापूर, सिल्लोड, फुलंब्री, वैजापूर या ग्रामीण मतदारसंघासाठी मुलाखती घेण्यात आल्या. सर्व जाती-धर्मातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे गर्दी आवरताना पक्ष पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांची उमेदवारात जास्त संख्या होती. सायंकाळी औरंगाबाद शहर पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. जवळपास १५० उमेदवारांनी मुलाखत दिल्याचे प्रसिद्धीप्रमुख उद्ध‌व बनसोडे यांनी सांगितले. मध्य आणि पूर्व मतदारसंघावर 'एमआयएम' पक्षाने दावा केला आहे. मध्य मतदारसंघातून इम्तियाज जलील विजयी झाले होते. हा मतदारसंघ पूर्वीप्रमाणे 'एमआयएम'ला सोडण्याचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. भारिपचे सरचिटणीस अमित भुईगळ यांची उमेदवारी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली होती. पश्चिम मतदारसंघातून भुईगळ यांनी तयारी सुरू केली होती. मात्र, लोकसभा मतदारसंघातील मताधिक्याचा विचार करता हा मतदारसंघ सुरक्षित नसल्याचे 'भारिप' पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मध्य मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्नशील आहे. 'वंबआ' आणि 'एमआयएम' यांची आघाडी असल्यामुळे जागा वाटपावर चर्चा होणार आहे, असे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात एमआयएम १०० जागा लढवणार असून १८८ जागा वंचित लढवणार आहे. मतांची समीकरणे लक्षात घेऊन शहरातील तीन मतदारसंघांसाठी सर्वाधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. दरम्यान, इच्छुक उमेदवारात माजी सनदी अधिकारी सुभाष माने, इंजि. प्रवीण जाधव, माजी नगरसेवक कृष्णा बनकर आदींचा समावेश होता.

\Bआंबेडकर यांची आज सभा

\Bविविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार आहेत. हा पक्ष प्रवेश कार्यक्रम गारखेड्यातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात रविवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. माजी नगरसेवक कृष्णा बनकर, बंजारा सेनेचे प्रल्हाद राठोड, गोर बंजारा सेनेचे राजपालसिंह राठोड, डॉ. गजानन जाधव, चुन्नीलाल जाधव 'वंचित'मध्ये प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमाला 'वंबआ'चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढगाळ वातावरण; पावसाची हुलकावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यभरात धुव्वाधार पाऊस सुरू असताना मराठवाडा अजूनही कोरडा आहे. शनिवारी दिवसभर आभाळ भरून आले होते. मात्र, अधूनमधून पावसाच्या एखाद्या सरीचा अपवाद वगळता दिवस कोरडा गेला. दमदार पावसासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरण आणि जोराचे वारे कायम आहे. मात्र, पाऊस पडत नसल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मराठवाड्यातील धरणे कोरडी असून पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. पिके कोमेजली असल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण असूनही पावसाने हुलकावणी देणे सुरू ठेवले आहे. दिवसभरात पावसाची एखादी सर कोसळत असल्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. मात्र, मराठवाडा कोरडा असल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. दमदार पावसासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागेल, असे हवामान तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रन फॉर औरंगाबाद’ला उदंड प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सामाजिक सलोखा, पर्यावरण रक्षण, नशामुक्ती, पाणी बचतीचे महत्त्व आणि औरंगाबादकरांच्या आरोग्याची काळजी या उद्देशाने पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित 'रन फॉर औरंगाबाद' उपक्रमास औरंगाबादकरांनी उदंड प्रतिसाद दिला.

क्रांतीचौकातून 'रन फॉर औरंगाबाद' उपक्रमात धावण्यासाठी विविध सामाजिक संस्था, संघटना, क्रीडा संघटना, स्वयंसेवी संस्था, औरंगाबाद ब्लॅक बक्स, गरुड झेप अकादमी, हेल्प रायडर ग्रुप, शहर व ग्रामीण पोलिस दल, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वराज प्रतिष्ठान अशा विविध संघटना, संस्था तसेच औरंगाबादकरांनी सहभाग घेतला. सायंकाळी सहा वाजेपासूनच क्रांतीचौकात उपक्रमात सहभागी होण्यासाठी औरंगाबादकरांची गर्दी झाली होती. वाहतूक पोलिसांनी साडेपाच वाजेपासून या उपक्रमाचा मार्ग सुकर बनवला होता. क्रांतीचौक ते एमटीडीसी मार्गावर धावत व चालत सहभागी औरंगाबादकरांनी ही रन पूर्ण केली. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थिती रन फॉर उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमात एटीसी पथकाचे प्रमुख गौतम पातारे, आयर्नमॅन नितीन घोरपडे, एबीबीचे मुकुंद भोगले, संतोष वाघ, माधुरी निमजे, प्रभंजन भालेराव, डॉ. मंगेश पानट, सुरेश सोनवणे, रोशन जैस्वाल, सुमित पवार, डॉ. रश्मी बोरीकर, संजय पाटील आदी उपस्थित होते.

\Bआम्ही एक आहोत...

\Bमार्गदर्शन करताना विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंघल म्हणाले, 'शहरातील सामाजिक सलोखा कायम ठेवत आम्ही एक आहोत असा संदेश सर्वांना देत आपली एकता व सलोखता दाखवून देऊ. औरंगाबादकरांनी उत्फूर्तपणे घेतलेला सहभाग आपली एकता दाखवतो आहे.' 'रन फॉर औरंगाबाद हा उपक्रम शहरावासियांचा प्रतिसाद एकदा व एकात्मता दर्शवणारा आहे, असे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, रनच्या मार्गावर एबीबी तसेच विविध संस्थांतर्फे धावपटूंसाठी जलपानाची व्यवस्था केली होती. यावेळी स्वराज ढोलपथकाने वातावरण निर्मिती करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. देशभक्तीपर गीतांवर निनाद करीत वातावरण निर्मिती करीत धावपटूंचा उत्साह वाढवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचार पद्धतीबाबत जनजागृती हवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेळीच निदान झाले तर, योग्य उपाचाराद्वारे कर्करोग बरा होऊ शकतो. यात रेडिओलॉजीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. सर्वसामान्य लोकांना नवनवीन निदान पद्धतीबाबत माहिती नसते. त्यामुळे याबाबत अधिक प्रभावी जनजागृती होणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. पलक पोपट यांनी केले.

महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशनच्या (एमएसबीआयआरआयए) शहर शाखेच्या वतीने हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे शनिवारपासून दोन दिवसीय रेडिओलॉजीची राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात गर्भाशय आणि स्तनांच्या कर्करोग या विषयावर त्या बोलत होत्या. 'डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू@२०१९ असे नामाकरण करण्यात आलेल्या या परिषदेचे संपूर्ण आयोजन व नियोजन हे महिला क्ष-किरणतज्ज्ञांनी केले आहे. महिलांनी महिलांच्या आरोग्यवर्धीसाठी केलेला हा उपक्रम औरंगाबादेत प्रथमच होत आहे. उद्घाटन सोहळ्यास उपायुक्त वर्षा ठाकूर, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, नवजीवन संस्थेच्या संचालिका शर्मिला गांधी, समीर गांधी, प्रशांत ओंकार, परिषदेच्या अध्यक्ष डॉ. शिल्पा सातारकर, सचिव डॉ. सोनाली साबू, डॉ. शुभांगी शेटकार, कोषाध्यक्ष डॉ. रिंकू पळसकर आदी उपस्थित होते.

उद्घाटन सत्रात बोलताना उपायुक्त ठाकूर यांनी रेडिओलॉजीचे काम हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत हे विश्व खूप मोठे आहे. केवळ 'पीसीपीएनडीटी' पुरते मर्यादित नाही, असे नमूद केले. निदान व्हावे, यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्याचे शुल्क सर्वसामान्य लोकांनाही परवडणारे असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. तर डॉ. पाडळकर यांनी 'पीसीपीएनडीटी' कायद्याचा बाऊ करु नका, तर कायदा समजून घेत त्यानूसार कार्यवाही महत्वाचे असल्याचे सांगितले.

दरम्यान, प क्ष-किरणतज्ज्ञांच्या या परिषदेत विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यात डॉ. पोपट यांनी याप्रसंगी गर्भाशय आणि स्तनांच्या कर्करोग, गर्भातील विविध व्यंग आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या तपासण्या, त्यातील नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देतानाच नवीन निदान पद्धतीबाबत लोकांना अधिक माहिती होण्यासाठी प्रभावी जनजागृतीची गरज व्यक्त केली. तर डॉ. शिल्पा सातारकर यांनी स्त्रियांच्या गर्भाशयाच्या गाठीबद्दल निदान याबाबत उपस्थितींना मार्गदर्शन केले. मुंबईच्या डॉ. अलका कर्णिक यांनी गर्भाशयाच्या अस्तरांची सोनोग्राफी बाबत माहिती दिली. उतारवयातील महिलांच्या गर्भपिशवीचे आजार, तसेच तरुण वयातील पीसीओडी आणि गर्भपिशवीच्या जन्मजात वेगवेगळ्या आकारांबद्दल डॉ. अल्पना जोशी यांनी माहिती दिली. स्त्रिंयामध्ये आढळून येणाऱ्या थायरॉइडचा आजार यावर परिषदेत एक विशेष चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले. यात डॉ. मुक्ता जोशी, डॉ. वर्षा सारडा यांची सहभाग घेतला. डॉ. रचिता राममूर्ती यांनी डायबेटीस आणि गर्भारपण, गर्भातील व्यंग या विषयावर मार्गदर्शन केले. यासह डॉ. स्वाती आढाव, डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी गर्भारपणातील एमआरआय ची तपासणी या विषयावर तसेच डॉ. ज्योती राय, डॉ. पल्लवी पाटील या सोनोग्राफी तज्ज्ञांनी गरोदरपणातील कलर डॉपलरची तपासणी पद्धत यावर उपस्थितींना माहिती दिली.

\B

तीन डब्ल्यू

\Bदोन दिवसीय परिषदेला डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू@२०१९ असे नाव देण्यात आला आहे. यातील पहिले 'डब्ल्यू' हे 'विमेन्स इमेजिंग' अर्थात महिलांविषयीच्या तपासण्या, दुसरे 'डब्ल्यू' हे विमेन स्पीकर अर्थात महिला मार्गदर्शक, तर तिसरे 'डब्ल्यू' हे विमेन्स ऑर्गनायझर्स अर्थात महिला आयोजक यांना प्रतित करणारे असल्याचे संयोजकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाकाबंदीतही चोरट्यांचा डल्ला

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर पोलिस आयुक्तालयातील विविध भागात रात्री दहा ते एक वाजेदरम्यान नाकाबंदी मोहीम राबविण्यात येत असूनही, चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून धुमाकूळ घालत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारखेडा परिसरातील गजानननगरात राहणाऱ्या गणेश निवृत्ती अकोलकर (वय २७) यांच्या घराचा कडी-कोयंडा खिडकीतून हात घालून उघडत चोरट्याने ४० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार २५ ते २६ जुलैच्या मध्यरात्री घडला. चोरट्याविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत, आमखास मैदान येथे मोहम्मद रफीक मोहम्मद अकबर (वय ५०, रा. संजयनगर, बायजीपुरा) यांनी ठेवलेले रहाट पाळण्याचे तीन हजार रुपये किमतीचे लोखंडी पाइप, रहाट पाळण्याचे लोखंडी इंजीन स्टँड चोरट्याने चोरून नेले. ही घटना २६ जुलै रोजी सकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्याविरुध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत, जुना मोंढा परिसरातील दीप ट्रेडर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील एक लाख ४२ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना २४ ते २५ जुलैच्या मध्यरात्री घडली. तेजमल संपतलाल बंब (वय ४६, रा. सिडको, एन-३) यांचे हे दुकान होते. त्यातून रोख रक्कम १७ हजार रुपये, चार हजार रुपये किमतीचा मोबाइल, दुकानातील एक लाख २१ हजार ५०० रुपये किमतीचे ड्रायफ्रूट लंपास केले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या चौथ्या घटनेत, डॉ. हर्षल विजयसिंह परदेशी (वय ३५, रा. वेलकम नगर, गारखेडा परिसर) यांच्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील कंपनीच्या आवारातून ४५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना ३० मे ते ११ जुलै २०१९ या काळात घडली. डॉ. हर्षल परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजव्या बाजूला ह्रदय; अँजिओप्लास्टी यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये शरीराच्या उजव्या बाजूला हृदय असलेल्या एका रुग्णाची गुंतागुंतीची अँजिओप्लास्टी डॉक्टरांनी यशस्वी पार पाडली. अशी ही रुग्णालयातील चौथी अँजिओप्लास्टी होती. २६ जुलै रोजी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विलास मगरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ही दुर्मिळ शस्त्रक्रिया केली.

शस्त्रक्रियेची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी डॉ. विलास मगरकर, डॉ. विजय बोरगावकर, डॉ. हिमांशू गुप्ता, डॉ. रिजवान देशमुख, डॉ. देवेंद्र बोरगावकर, डॉ. प्रवीर लाठी, डॉ. मुनीर अहमद यांची उपस्थिती होती. चिखली (बुलढाणा) येथील ६७ वर्षीय रुग्णावर ही दुर्मिळ अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती डॉ. मगरकर यांनी दिली. छातीत दुखत असल्याने दाखल झालेल्या रुग्णाची अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांचे हृदय उजव्या बाजूला असल्याचे समोर आले. यासंदर्भात रुग्णाला कल्पनाही नव्हती. मात्र, त्याच्या काही नातेवाईकांना कल्पना होती. यावेळी रक्तवाहिन्यांत दोन लांब ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. त्यामुळे अँजिओप्लास्टी करणे गरजेचे होते. मात्र, अशा रुग्णांच्या शरिरातील रचना, विशेषत : हृदयाची रचना ही उलटी असते. यामुळे ही गुतांगुतीची शस्त्रक्रिया ठरत होती. धूत हॉस्पिटलमध्ये २००८, २०१० आणि २०१३मध्ये अशाच प्रकारच्या उजव्या बाजूला हदय असलेल्या रुग्णाची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यामुळे डॉक्टरांना त्याचा अनुभव गाठीशी होता. परंतु शेवटीची अँजिओप्लास्टी करून बरीच वर्षे लोटली होती. या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाऊन डॉक्टरांनी आव्हान स्वीकारून शुक्रवारी ३५ मिनिटांत अँजिओप्लास्टी यशस्वी केली. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. दीपक बोर्डे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीती सोडा, गुणवत्तेची पायाभरणी करा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाडा मागास असल्याचे विसरा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उच्च ध्येयसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले तर, आपण कोणत्या भागातून आलो याला महत्त्व राहत नाही. कायद्याच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर राष्ट्रीय विधी विद्यापीठांची रचना झाली आहे. औरंगाबाद विधी विद्यापीठानेही याच दृष्टिकोनातून पुढे यशस्वी वाटचाल करावी,' असे आवाहन कुलपती, सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. आर. बानुमती यांनी केले. त्या विद्यापीठाच्या भूमिपूजन सोहळ्यात त्या बोलत होत्या.

कांचनवाडी परिसरात विद्यापीठाच्या 'प्री- फॅब्रिकेटेड बिल्डिंग'ची पायाभरणी बानुमती यांच्या हस्ते झाली. यावेळी व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. प्रदीप नंदराजोग, न्या. आर. एम. बोर्डे, औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला, कायदा व न्याय विभागाचे मुख्य सचिव आर. एन. लड्डा, प्रभारी कुलगुरू डॉ. जे. कोंडय्या, प्रभारी कुलसचिव डॉ. अशोक वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी न्या. बानुमती म्हणाल्या, 'गुणवत्ता पूर्ण कायद्याचे शिक्षण असणे आवश्यक आहे. त्याचा थेट परिणाम कायद्याच्या प्रक्रियेवर पडतो. विद्यार्थ्यांनी कायद्याचा सखोल अभ्यास करावा. अभ्यासासह त्यांना विविध कौशल्ये अवगत असावी. यामध्ये भाषेवर प्रभूत्व, संभाषण कौशल्य, संवाद कौशल्य आत्मसात करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. त्यासह इंटर्नशीप, कॅम्पस मुलाखतीसाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. मराठवाडा मागास भाग असल्याचे विसरा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उच्च ध्येयसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले तर, आपण कोणत्या भागातून आले याला महत्व राहत नाही. विद्यार्थ्यांना कांचनवाडी ते शासकीय बीएड कॉलेज असा प्रवास करावा लागतो. त्यात मोठा वेळ जातो. त्यामुळे प्री फॅब्रिकेटेड इमारत उभारण्यात येत आहे. शासनाने ५० एकर जमीनही दिली आहे. आता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.' न्या. प्रदीप नंदराजोग म्हणाले, 'मराठवाड्यात आयटी, बँकिंग, औषधनिर्माणातील उद्योगांची उभारणी शक्य आहे. त्यासाठी जागतिक स्तरावरील ज्ञान मिळविणे महत्वाचे आहे. विधी विद्यार्थ्यांसाठी तीन महत्वाचे टप्पे आहेत. क्लॅट परीक्षा उत्तीर्ण होवून प्रवेश मिळवित विद्यार्थ्यांनी पहिला टप्पा पूर्ण केला. आता शिक्षकांना त्यांना योग्य ते घडविण्यासाठीचा दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा महत्त्वाचा असून, आपल्याला ज्या क्षेत्रात जायचे त्यामध्ये आपण परिपूर्ण ज्ञान कसे घेवू शकतो हे विद्यार्थ्याने पाहणे.' प्रास्ताविक कुलगुरू जे. कोंडय्या यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. अशोक वडजे यांनी मानले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्या. प्रसन्न वराळे, टी. व्ही. नलावडे, व्ही. के. जाधव, पी. आर. बोरा, मंगेश पाटील, विभा कंकणवाडी, एस. एम. गव्हाणे, आर. जी. अवचट, व्ही. एल. आचलिया, विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे आदींची उपस्थिती होती.

\Bसंघर्षाशिवाय पदरी काही नाही

\Bन्या. आर. एम. बोर्डे म्हणाले, 'नैसर्गिक आपत्तीला मराठवाड्याला मोठे तोंड द्यावे लागते आहे. कृषी समस्येमुळे सर्वाधिक आत्महत्या शेतकरी करत आहेत. त्यामध्ये विदर्भाला मागे टाकले. बीड जिल्ह्यातील दोन तालुक्यातील ऊसतोडीसाठी जाणाऱ्यांचे स्थलांतर धक्कादायक आहे. आजाराला कंटाळून गर्भाशय काढण्याच्या बातम्या वाचून थक्क होते. मानवी निर्देशांकात मराठवाडा मागे आहे. इथले दरडोई उत्पन्न कमी, सिंचनाखाली असलेली शेती कमी. मानवी हक्काची पायमल्ली होते आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक नेतृत्वाची कमतरता आहे.' न्या. संजय गंगापूरवाला म्हणाले, 'मराठवाड्याला संघर्ष शिवाय काही मिळाले नाही, राष्ट्रीय विधी विद्यापीठही त्यातूनच आले. जागेसाठी निधीसाठी लढावे लागते आहे. मराठवाड्यात क्षमतेची कमी नाही विद्यापीठही पूर्णक्षमतेने विकासात्मक वाटचाल करेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानपरिषदेसाठी युतीकडून अंबादास दानवे

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप युतीची उमेदवारी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना निश्चित झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

युतीमध्ये विधानपरिषदेची जागा शिवसेनेकडे आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत झाल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नावाचीही चर्चा झाली होती. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावरुन ३० किंवा ३१ जुलै रोजी ते अर्ज दाखल करतील. गेल्या दहा वर्षांपासून अंबादास दानवे यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद आहे. ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकांचे नियोजन, जिल्ह्यातील राजकीय आकडेवारी, शिवसेनेचे जाळे ग्रामीण भागात प्रभावीपणे पसविण्यात अंबादास दानवे यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. एक अभ्यासू आणि वस्तुनिष्ठ मांडणी करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. शेतकरी आत्महत्याप्रश्नी अभ्यासत्रून त्यांनी पक्षाला अहवाल सोपविला होता. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना शिवसेनेकडून आर्थिक मदत पुरविली गेली. पीकविमा प्रश्नी दानवे यांनी अभ्यास करून अहवाल सादर केला. राज्यातील पहिले पीकविमा मदत केंद्र लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथे सुरु करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचेही नियोजन त्यांच्याकडे होते. अंबादास दानवे यांना उमेदवारीमुळे मिळाल्यामुळे निष्ठावान शिवसैनिकाला न्याय मिळाल्याची भावना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात जुगार; पाच जणांना बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या पाठीमागील महादेव मंदिराच्या बाजूला जुगार खेळणाऱ्यांवर बेगमपुरा पोलिसांनी छापा मारून पाच जणांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून रोख दहा हजार, मोबाइल आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागे असणाऱ्या महादेव मंदिराच्या लगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली काहीजण झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती उपनिरीक्षक शिंब्रे यांना मिळाली. या माहितीवरून पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंच बोलावून स्टाफसह त्या ठिकाणी खासगी दुचाकीद्वारे दाखल झाले. दुचाकी दूर उभ्या करून लपत दुपारी अडीच वाजता या जुगाऱ्यांवर छापा मारला. त्यावेळी जुगार खेळणारे उत्तम भागीरथ सलामपुरे (वय ५५, रा. पहाडसिंगपुरा), जगदीश महाराज बाबूराम दायमा (वय ६५, रा. खाराकुवा), कैलास बाबूराव मगरे (वय ४५, रा. साई मंदिराजवळ), कचरू साळुबा दणके (वय ७०, रा. न्यू पहाडसिंगपुरा), अतुल भालचंद्र देशपांडे (वय ३१, रा. संजयनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून रोख नऊ हजार ९७० आणि २० हजार रुपये किमतीचे मोबाइल आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. या आरोपींविरोधात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिटिजन ऑफ मराठवाडा’ कौतुकाची थाप!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जीवनात केवळ यश मिळवूनच न थांबता आपल्यामुळे अनेकांच्या जीवनात बदल आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवे. व्यवसाय करताना लोकांचा विश्वास संपादन करून तो टिकवून ठेवणे तितकेच गरजेचे आहे. मराठवाड्यातील तरुण आजघडीला जगाच्या कानाकोपऱ्यात नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आहे. ही अभिमानाची बाब आहे. 'टाइम्स ग्रुप'च्या वतीने 'सिटीजन ऑफ मराठवाडा' सन्मान सोहळ्यामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे,' असे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काढले.

मराठवाड्याच्या विकासात आपले योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवर समूहांचा सन्मान व्हावा या हेतूने 'टाइम्स ग्रुप'च्या वतीने 'सिटीजन ऑफ मराठवाडा' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (२६ जुलै) सकाळी अकरा वाजता हॉटेल विंडसर कॅसेल (जळगाव रोड, सिडको बसस्थानकाजवळ) येथे आयोजित सोहळ्याला महापौर नंदकुमार घोडेले, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. विशेष म्हणजे यंदा या सोहळ्याचे चौथे वर्ष होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला योग थेरपी सेंटरच्या डॉ. चारूलता रोजेकर यांनी उपस्थितांना योग व नियमित व्यायामाचे महत्त्व विशद केले. प्रास्ताविकात 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. गुणवंतांना 'मदतीचा हात', विद्यार्थ्यांसाठी 'प्लॅनेट कॅम्पस', अनाथ, गोरगरिबांना तसेच वृद्धाश्रमात 'दिवाळी फराळ' यासारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाते असे नमूद केले. 'सिटीजन ऑफ मराठवाडा'च्या माध्यमातून त्या-त्या क्षेत्रातील मान्यवरांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी 'टाइम्स ग्रुप'चे कौतुक करताना सत्कारमूर्तींना केवळ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रच न देता तुळशीचे रोपटे दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आजघडीला सर्वत्र प्रदूषणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत असताना त्याच्यापासून बचाव करण्यासाठी तुळस अतिशय उपयुक्त आहे. वातावरणाला ऑक्सिजन प्रदान करणारी तुळस हिंदू धर्मातील प्रत्येकाच्या घरासमोर असते. अगदी अमेरिकेतील संशोधकांनी देखील तुळशीचे महत्त्व ओळखले आहे, असे बागडे म्हणाले. यावेळी आपापल्या परीने मराठवाड्याच्या विकासात आपले योगदान देणाऱ्या कंपन्या, रियल इस्टेट, आयटी, शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस आदींच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स', 'टाइम्स ऑफ इंडिया', 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या सौजन्याने 'सिटीजन ऑफ मराठवाडा- सिझन फोर' या उपक्रमांतर्गत त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वप्नील वाटेगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

\Bयांचा झाला गौरव

\B'सिटीजन ऑफ मराठवाडा' या सोहळ्यावेळी 'मराठवाड्यात परवडण्यायोग्य प्रीमियम हाउसिंग प्रोजेक्टस'बद्दल 'प्राइड ग्रुप'च्या नितीन बगडिया व नवीन बगडिया, 'अमृत डेव्हलपर्स'च्या विजय सक्करवार, 'मराठवाड्यात शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी' केल्याबद्दल 'लिटिल वंडर स्कूल'च्या स्नेहा गुप्ता, 'वैद्य अकॅडमी'च्या धनंजय वैद्य, 'एमआयटी'च्या प्रताप श्रीनिवासन, 'गायकवाड क्लासेस'च्या प्रा. रामदास गायकवाड, 'नारायणा इन्स्टिट्यूट'च्या प्रा. एम. एफ. मल्लिक, 'देवगिरी महाविद्यालय'च्या संजय कल्याणकर, 'आकाश इन्स्टिट्यूट'च्या आर. बी. आसवर, 'आयसीडी'चे डॉ. प्रफुल्ल मिरजगांवकर, 'मराठवाड्याच्या विकासात हातभार' लावल्याबद्दल 'ओशियन बिल्डर'च्या सचिन पाटील, 'एमआर ग्रुप'च्या जुनेद खान, 'विश्वा टुलिंग'च्या खेमराज हिंगणकर, 'दी कुटे ग्रुप'च्या अर्चना सुरेश कुटे व आर्यन कुटे, 'पारंपरिक पोशाख उद्योग' क्षेत्रात योगदानाबद्दल 'डिझायनर सारीज'च्या विनोद लोया, 'वॉटर प्युरिफिकेशन उद्योग' क्षेत्रात 'रेनड्रॉप'च्या इम्रान खान, 'डिजिटल क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी' केल्याबद्दल 'इंटरनेट बिझनेस'च्या अनिकेत कसबे, 'वास्तुशास्त्र' क्षेत्रात 'भाग्यविजय'च्या डॉ. विजय चाटोरीकर, 'स्टील उद्योगात अद्ययावत तंत्रज्ञाना'बद्दल 'राजुरी स्टील' दिनेश राठी, 'अद्ययावत प्रिंटिंग टेक्नॉलॉजी व इव्हेंटस'साठी 'लक्ष्मी ग्राफिक्स'चे संजय तम्मेवार तर 'सामाजिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल' अनिल मकरिये यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

मराठवाड्यात सर्वप्रथम उद्योग आणण्याचा मान डेक्कन फ्लोअर मिलला जाते. रेल्वे स्टेशन भागात खासगी जागेवर ही मिल सुरू झाली. गव्हावर प्रक्रिया करून रेल्वेने तो माल इतरत्र पाठवण्याची सुविधा मिळाली. त्यावेळी जालान यांनी व्यापारी परिषद घेतली होती. त्यामुळे औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीचा उदय व विकास झाला.

\B- हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष

\B

मागासलेपणाचा डाग मराठवाड्याने केव्हाच पुसून टाकला आहे. आज जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मराठवाड्यातील तरुण नोकरी, व्यवसाय करताना बघायला मिळतात. माझा मुलगा बोस्टनमध्ये शिक्षण घेत असून, त्याने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला असून त्यात आपल्याकडचे तब्बल २३० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

\B- अतुल सावे, राज्यमंत्री

\B

जगभर मराठवाड्यातले विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक पसरले आहेत. उद्योग विदेशात आपली उत्पादने पोहोचवत आहेत. शिक्षण, बांधकाम, राजकीय, सामाजिक क्षेत्रात मराठवाडा पुढे आहे. एकेकाळी त्याठिकाणच्या तरुणांना नोकरीसाठी देखील नाकारले जायचे परंतु, आज स्वीकारले तर जातेच शिवाय मान सन्मानही मिळत आहे.

\B- नंदकुमार घोडेले, महापौर

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध कत्तलीसाठी नेताना ३० जनावरांची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कत्तलीसाठी नेत असलेल्या ३० जनावरांची वेगवेगळ्या घटनांत सुटका करण्यात आली. ही कारवाई शनिवारी केंम्ब्रिज चौक आणि हर्सूल भागात करण्यात आली. यामध्ये एकूण १८ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी हर्सूल आणि सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जनावरांची सुटका करण्याची पहिली घटना शनिवारी पहाटे अडीच वाजता जालना रोडवरील केंम्ब्रिज चौकात घडली. या ठिकाणी एका ट्रकमधून कत्तलीसाठी जनावरे कोंबून नेण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाले यांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सापळा रचून सावंगी बायपासवर ट्रक अडवला. ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये १३ जनावरे आणि दोन वासरे आढळून आली. पोलिसांनी या जनावरांची सुटका करीत संशयित आरोपी शेख शागीर शेख शब्बीर, शेख रहीम शेख शखुर (दोघे रा. भोकरदन) आणि शेख आरेफ (वय १९ रा. औरंगाबाद) यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून ट्रक व जनावरे असा एकूण नऊ लाख दहा हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनावरांची सुटका करण्याचा दुसरा प्रकार शनिवारी पहाटे चार वाजता हर्सूल पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर घडला. या ठिकाणी संशयित वाहन अडवून तपासणी करण्यात आली. यामध्ये १५ बैल कोंबलेले आढळून पोलिसांनी या जनावरांची सुटका केली. आरोपी विष्णुसिंह पांडुरंग पवार, जमीर सत्तार शेख, शेख शेरू जैनोद्दिन शेख (सर्व रा. सिल्लोड) यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून वाहनासह पाच लाख पाच हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरणला माळी समाजाचा मेळावा

$
0
0

औरंगाबाद - सावता परिषदेच्या वतीने आरण (जि. सोलापूर) येथे एक ऑगस्ट रोजी माळी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज्यमंत्री अतुल सावे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, खासदार रणजित नाईक-निंबाळकर आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय अध्यक्ष अभिमन्यू उबाळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक क्रांतीतून राजकीय क्रांती घडते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एका जातीच्या मतांवर विधानसभा निवडणुकीत जिंकता येत नाही. लहान-मोठ्या वंचित जाती समूहांनी एकमेकांना हलके-भारी न समजता मतदान केल्यास वंचित बहुजन आघाडीला कुणीही हरवू शकणार नाही. सामाजिक क्रांतीतून राजकीय क्रांती घडते. सर्वजण समान असल्याची सामाजिक भावना ठेवा आणि जिंकण्याचे गमक ओळखा', असे प्रतिपादन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते मेळाव्यात बोलत होते.

गोर बंजारा समाजाच्या वतीने सत्ता संपादन मेळावा आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राधाकृष्ण मंगल कार्यालयात रविवारी झालेल्या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, खासदार इम्तियाज जलील, 'भारिप'चे अमित भुईगळ, अण्णाराव पाटील, प्रल्हाद राठोड, राजपालसिंग राठोड, कांतीलाल नाईक, मोहन राठोड, मोरसिंग राठोड, मनोहर चव्हाण, कृष्णा राठोड, हिरासिंग राठोड, प्रा. श्याम मुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. संविधानाची प्रत देऊन आंबेडकरांनी पक्षात स्वागत केले. मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण, माजी नगरसेवक कृष्णा बनकर, राजपालसिंग राठोड, सुनील चव्हाण, महेश तांबे, शारदा चव्हाण, आतिष राठोड यांनी 'वंचित'मध्ये प्रवेश केला. आपल्या भाषणात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना सत्ताधारी होण्याचे आवाहन केले. 'एखाद्या मतदारसंघात एका जातीचे मतदान ४० हजार असेल तर तेवढ्या मतांवर उमेदवारी मागणे आणि जिंकण्याचा दावा करणे चूक आहे. विजयी होण्यासाठी किमान ७० हजार मतांची गरज असते. लहान-मोठ्या जातींची मोट बांधून किमान ३२ टक्के मतं मिळाली तरच विजय मिळेल. लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या जातीला हलके-भारी मानण्याचे अनुभव घेतले. सर्वजण समान असल्याची सामाजिक भावना बाळगून एकमेकांना मतदान केल्यास विजय निश्चित होईल. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करण्याचा चंग बांधल्यास सत्ता मिळेल. सत्तेत बसल्याशिवाय प्रश्न सुटत नसतात', असे अॅड. आंबेडकर म्हणाले.

यावेळी प्राचार्य ग. ह. राठोड यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मेळाव्याला उपस्थिती होती. स्थानिक मतांचे समीकरण मांडत अनेकांनी जागेसाठी दावा केला. या मेळाव्याला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसभा तो झाँकी थी

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मातील मतदारांनी मला संसदेत पाठवले. त्यामुळे सामान्यांच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवत असल्याचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले. राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर असताना सत्ताधारी बोलत नाहीत. पाणीप्रश्न सुटलेला नसताना आवाज उठवत नाहीत. आपण एकत्रित आपल्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची गरज आहे. लोकसभा तो झाँकी थी, विधानसभा बाकी है, असे खा. जलील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एमआयएम’चा शंभर जागांवर दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड आणि इच्छुक उमेदवारांची वाढलेली संख्या पाहता वंचित बहुजन आघाडीने सर्व २८८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 'एमआयएम'ने शंभर जागांची मागणी केली असून दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते जागा वाटप निश्चित करणार आहेत. लहान-मोठ्या जातींना समान संधी देत विधानसभेत अधिक जागा जिंकण्याचे नियोजन 'वंबआ'ने केले आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे काँग्रसेशी आघाडी करण्याचे चर्चेचे गुऱ्हाळ न लांबवता वंचित बहुजन आघाडीने राज्यात विधानसभेच्या २८८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठवाड्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर करीत 'वंचित'च्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सत्तेपासून वंचित लहान-मोठ्या जातींना एकत्रित करून विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचे पक्के नियोजन 'वंबआ'ने केले आहे. मतदारसंघातील जातीय समीकरण लक्षात घेऊन वंचित अनुकूल ठरणार असल्याचे राजकीय समीकरण आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी शनिवारी मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीला ग्रामीण भागातून आलेल्या इच्छुक उमेदवारांची लक्षणीय संख्या होती. दलित-मुस्लिम या हक्काच्या मतदारांशिवाय ओबीसी घटक सहाय्यभूत ठरणार असल्याचे इच्छुक उमेदवारांनी सांगितले. औरंगाबाद शहरातील तीन मतदारसंघासाठी वंचित आणि एमआयएम यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. राज्यातील १०० जागांवर 'एमआयएम'ने दावा केला आहे. याबाबत 'वंबआ' आणि 'एमआयएम'च्या वरिष्ठ नेत्यात चर्चा होऊन जागा वाटप निश्चित होणार आहे. सध्या जिल्हानिहाय आढावा घेत पक्षाकडून नियोजन करण्यात येत आहे.

\Bतिघांकडे प्रचाराची धुरा\B

लोकसभा निवडणुकीत प्रचाराला मर्यादा आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकर, खासदार असदुद्दीन ओवेसी आणि मी प्रचाराचा धुरळा उडवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी मेळाव्यात सांगितले. विधानसभेत अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे जलील यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक भरतीसाठी बेरोजगार हातघाईवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षक भरतीची प्रक्रिया दोन ऑगस्टपर्यंत करा अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा राज्यातील डीटीएड, बीएडधारक बेरोजगाराने दिला आहे. इशारा देताच प्रशासनाकडून चौकशीचा ससेमिरा सुरू झाला. तर, शिक्षण विभागाकडून पुढील सूचना दोन ऑगस्ट रोजी जाहीर करण्याचे पोर्टलवर नमूद करण्यात आले. भरती प्रक्रियेत गुणवत्ता, निवड यादी जाहीर करण्याऐवजी प्रशासन शब्दांचा खेळ करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

राज्यात आठ वर्षांपासून शिक्षक भरती रखडली आहे. चार वर्षांपासून 'पवित्र पोर्टल' प्रक्रियेद्वारे भरतीचा गोंधळ सुरूच आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रक्रिया करून निवड यादी जाहीर करा, अशी मागणी उमेदवार करत आहेत. राज्यसरकारने १२ हजार जागा भरण्यात येतील, असे जाहीर केले होते. त्यानुसार जागांबाबत माहिती पोर्टलवर देत विद्यार्थ्यांनी पात्रतेनुसार पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर पुढची प्रक्रिया होवू शकली नाही. विद्यार्थ्यांना निवड यादीसह मुलाखत प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर प्रक्रिया प्रशासकीय बाबींमध्ये अडकेल व पुन्हा भरतीला विलंब लागेल, अशी भिती डीटीएड, बीएडधारकांना वाटते. त्यामुळे प्रक्रिया तत्काळ करण्याची मागणी केली आहे. शिक्षण आयुक्तांची भेट घेत चर्चा करण्यात आली. त्यानंतर शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्तांना दोन ऑगस्टपर्यंत अंतिम निवड यादी जाहीर करा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला. पत्रानंतर पोलिस खडबडून जागे झाले असून संबंधित विद्यार्थ्यांना संपर्क साधून चौकशी केली जात आहे.

\Bपत्रात दिलेला इशारा \B

शिक्षक भरती अद्याप पूर्ण केलेली नाही. या दोन वर्षात अभियोग्यताधारकांनी विविध अडचणी लक्षात घेऊन आपल्याला वेळोवेळी सहकार्य केले आहे, पण दोन वर्षापासून चालू असलेल्या शिक्षक भरतीच्या नावे गुणवंत व गरीब अभियोग्यताधारकांची क्रूर चेष्टा करण्यात येत आहे. भरतीच्या आशेने बऱ्याच अभियोग्यताधारकांचा जीव गेला असून, आता आमचे जीवन उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अभियोग्यताधारक उमेदवारांमध्ये असंतोष असून ते कोणत्या स्तराला जाऊन काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. निवड यादी जाहीर करावी अन्यथा, कोणत्याही क्षणी येऊन आपल्या दालनात सर्व अभियोग्यताधारक आत्मदहन करतील याची नोंद घ्यावी.

\Bशब्दाचा खेळ

\Bशिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर याबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना म्हणून माहिती दिली आहे. शिक्षक पदभरतीसाठी आरक्षण सुधारित करण्याची कार्यवाही सुरू आहे. उमेदवारांच्या निवडीबाबतच्या पुढील सूचना पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येतील. प्रशासनाकडून हे जाहीर करण्यात आल्यानंतर प्रशासन शब्दाचा खेळ करत असल्याचा आरोप बेरोजगार करत आहेत.

दोन ऑगस्टला तारखेला मेरिस्ट लिस्ट न लावल्यास महाराष्ट्रतील भावी शिक्षक महाराष्ट्रतील प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा व विभागस्तरांवर विविध प्रकारे गनिमी काव्याने आंदोलन करणार आहोत.

-परमेश्वर इंगोले, राज्य उपाध्यक्ष,

डीटीएड, बीएड स्टुडंन्ट असोसिएशन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तारखांपेक्षा घटनेचे महत्व सांगितल्यास इतिहास अधिक रंजक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आपल्याकडे तारखा शिकवून इतिहासाची भीती घालण्याचा प्रकार होतो. इतिहास शिकविताना तारखेसह घटनांचे महत्त्व सांगितले तर तो शिकणे अधिक रंजक होईल, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्नकुमार वराळे यांनी व्यक्त केले. पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे डॉ. शिवाकांत बाजपेयी यांच्या 'शहर ए औरंगाबाद' या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते रविवारी (२८ जुलै) सायंकाळी सोनेरी महाल येथे झाले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, उपायुक्त वर्षा ठाकुर, कमल नयन बजाज रुग्णालयाचे विश्वस्त सी. पी. त्रिपाठी, इतिहास तज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी, महेंद्र हरपाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी वराळे म्हणाले की, आपल्याकडे इतिहास शिकविताना केवळ तारखा आणि त्यासंबंधी घटना सांगितले जाते. यामुळे इतिहासबाबत रुची तयार होण्याऐवजी भीतीच तयार होते. ऐतिहासिक घटना या आपल्या प्रभावामुळे ओळखल्या जातात. शिवरायांची आगऱ्याहून सुटका ही त्यांच्या आखणी, नियोजन, आकलन, मनुष्यगुण यावर प्रकाश टाकणारा घटना आहे. त्याला फक्त तारखेत बांधून ठेवणे गैर असल्याचे न्यायमूर्ती वराळे यांनी सांगितले. शहरातील ऐतिहासिक वास्तू जपताना शासकीय अधिकारी आपले काम करतीलच, पण नागरिक म्हणून आपण काय योगदान देतो, हेही एकदा नागरिक म्हणून आपण तपासले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. गर्गे म्हणाले की, बाजपेयी यांनी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचा दस्तावेज म्हणून समोर आणले आहे. शहराला जागतिक वारसा असलेले शहर म्हणून घोषित करण्यासाठीचे काम हाती घेतलेले असताना हे पुस्तक येणे अतिशय महत्त्वाची घटना असल्याचे त्यांनी सांगितले. तांत्रिक युग असताना फोटोची किंमत कमी झाली, पण ऐतिहासिक वस्तूंची छायाचित्रे एकत्र आल्याने हे पुस्तक महत्वाचा दस्तऐवज असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. यावेळी दुलारी कुरेशी, वर्षा ठाकूर, रफत कुरेशी तसेच डॉ. शिवाकांत बाजपेयी यांनीही आपले मत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू म. टा. प्रतिनिधी, पैठण नांदूर मधमेश्वर धरणातून सोडण्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

नांदूर मधमेश्वर धरणातून सोडण्यात आलेले पाणी रविवारी संध्याकाळी जायकवाडी धरणात पोहचले. सध्या धरणात २७ हजार क्युसेकप्रमाणे पाण्याची आवक सुरू असली तरी रविवारी सायंकाळपर्यंत धरणाच्या पाणीसाठ्यात दखलपात्र वाढ झालेली नाही. नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू राहिल्यास आवक वाढणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.

गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, या आठवड्यात नांदूर मधमेश्वर धरणातून चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. रविवारी सकाळी ३१५३ क्युसेकप्रमाणे करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग सायंकाळी २४ हजार क्युसेक करण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून सोडण्यात आलेले पाणी सायंकाळी जायकवाडी धरणात पोहचले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.

...

\Bसध्याची पाणीपातळी

१४८९. ५३ फूट

धरणातील पाणीसाठा

५३९.२२ दशलक्ष घनमीटर

उणे ९.१६ टक्के \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिमझिम पावसाने जीवदान; ढगाळ वातावरण धोक्याचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

गेल्या दोन दिवसांपासून फुलंब्री तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. सर्वत्र रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असला तरी, ढगाळ वातावरणामुळे मका पिकावरील आळीचा तर, कपाशीवर मावा तुडतुड्यांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

रिमझिम पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील फक्त गिरिजा नदीला दहा दिवसांपूर्वी पूर आला होता. या पुराने नदीवरील असलेले सर्व कोल्हापुरी बंधारे भरले होते मात्र, तेही आता रिकामे होत चालले आहे. नदीकाठच्या विहिरींना पाणी आले आहे. बाकी नाले व पाझर तलाव कोरडे असल्याने त्यांच्या परिसरातील विहिर अद्याप कोरड्या असल्याने शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे.

रविवारी फुलंब्री मंडळात दोन मिली मीटर पाऊस पडला असून, पावसाळा सुरू झाल्या पासून आतापर्यंत २९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वडोदबाजार मंडळात रविवारी पाऊस झाला नाही. या मंडळात आतापर्यंत या २७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आळंद मंडळातही रविवारी पावसाने हजेरी लावली नाही. या मंडळात आतापर्यंत २४६ मिलीमीटर पाऊस झाला. पीरबावडा मंडळात रविवारी चार मिली मीटर पाऊस पडला. आतापर्यंत या मंडळात २५५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुक्यात रविवारी एकूण सहा मिलीमीटर पाऊस झाला असून, आतापर्यंत १०७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images