Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आचारसंहितेमुळे ग्रामविकासाला अडथळा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ग्रामपंचायतअंतर्गत होणारी विकासकामे थांबविली जाऊ नयेत, मंजूर विकासनिधी प्राप्त व्हावा, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासह प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. मंगेश पाटील यांनी दिले.

या प्रकरणी खुलताबाद तालुक्यातील इंदापूर-कनकशीळ ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप निकम यांनी याचिका केली. याचिकेनुसार, निवडणूक आयोगाने औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक १९ जुलै २०१९ रोजी जाहीर केली. त्या दिवसापासून दोन्ही जिल्ह्यांमध्ये निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणीस प्रारंभ झाला. यामुळे ग्रामपंचायतीअंतर्गत सर्व विकासकामे थांबली. याचिकाकर्त्यांच्या ग्रामपंचायतीसाठी काही विकासकामांना जिल्हा परिषदेने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. मात्र, आचारसंहितेमुळे पुढील सर्व प्रक्रिया रखडली. याच ग्रामपंचायतीला चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार काही निधी मंजूर झाला, परंतु आचारसंहितेमुळे तो अडकला आणि विकासकामे रखडली.

वास्तविक ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा काहीही संबंध नाही. या निवडणुकीसाठीचे मतदार हे जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका यांचे सदस्य असतात. या निवडणुकीसाठी त्या मतदारांच्या याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. ही निवडणूक थेट जनतेतून होत नसल्याने ग्रामपंचायतीसाठी या निवडणुकीची आचारसंहिता लागू केली जाऊ नये, ग्रामपंचायतीच्या क्षेत्रासाठी ती रद्द करावी आणि विकासकामांना परवानगी द्यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. सिद्धेश्वर ठोंबरे काम पाहत आहेत.

\Bदोन आठवड्यानंतर पुढील सुनावणी \B

याचिकेवर आज झालेल्या सुनावणीअंती खंडपीठाने केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य शासनाचे मुख्य सचिव, प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.याचिकाकर्त्याची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे हे मांडत आहेत. या याचिकेची सुनावणी दोन आठवडयांनंतर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एनएमसी’विरुद्ध डॉक्टरांचा बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभेत संमत झालेल्या 'नॅशनल मेडिकल कमिशन' (एनएमसी) विधेयकाच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) शहर शाखेच्या वतीने बुधवारी (३१ जुलै) शहरात बंद पुकारण्यात आला. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला, असा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात काही रुग्णालयांच्या दैनंदिन ओपीडी सेवा सुरू होत्या. त्याचवेळी नियोजित छोट्या-मोठ्या शंभर शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याची माहिती 'आयएमए'तर्फे देण्यात आली.

समर्थनगर येथील आयएमए हॉलमध्ये सकाळी ११ वाजता निषेध सभा घेण्यात आली. या प्रसंगी 'आयएमए'चे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी, सचिव डॉ. यशवंत गाडे, उपाध्यक्ष डॉ. मंजुषा शेरकर, सहसचिव डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. संतोष रंजलकर, डॉ. संजीव सावजी, डॉ. आनंद काळे, डॉ. रमेश रोहिवाल, डॉ. उज्वला झंवर, डॉ. हरमितसिंग बिंद्रा, डॉ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. सचिन फडणीस आदी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. सोमाणी म्हणाले, नव्या विधेयकानुसार भारतीय वैद्यक परिषदेचे प्रातिनिधिक अस्तित्व संपुष्टात येईल. नव्या आयोगात शासननियुक्त प्रतिनिधींची वर्णी लागणार आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सरकारला विरोध करण्याची शक्ती त्यात नसेल, असेही डॉ. सोमाणी म्हणाले. सध्या अस्तित्वात असलेला कायदा आणि प्रस्तावित विधेयकाची उद्दिष्ट्ये सारखीच आहेत. त्यामुळे नवीन कायद्याची गरजच काय, असा सवाल डॉ. गाडे यांनी उपस्थित केला. कुठल्याही पूर्व परवानगीविना वैद्यकीय महाविद्यालय काढणे, पदवी व पदव्युत्तरच्या जागा वाढवणे, हे या प्रस्तावित कायद्याने शक्य होईल. तसेच काही त्रुटी असल्यास पाच ते शंभर कोटी रुपये दंडाची तरतूद आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळू शकतो, असेही डॉ. गाडे म्हणाले. दरम्यान, बंदमध्ये शहरातील १४०० डॉक्टरांनी पाठिंबा दिल्याचा दावा 'आयएमए'ने केला.

\Bशिक्षण होईल धनदांडग्यांची मक्तदारी\B

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील फक्त ५० टक्के जागांचे शुल्क नियमन सरकार करणार असल्याने वैद्यकीय शिक्षण ही फक्त धनदांडग्यांची मक्तेदारी होईल, असे शाखेचे सहसचिव डॉ. अनुपम टाकळकर म्हणाले. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथिक अशा इतर उपचार पद्धतीच्या पदवीधारकांना, तर आरोग्य व्यवस्थेशी संबंधित परिचारिका, तंत्रज्ञ किंवा सहाय्यक यांना जुजबी प्रशिक्षण देऊन आधुनिक वैद्यकशास्त्राचे उपचार करण्याची मुभा देणे हे अशास्त्रीय व समाजासाठी अन्यायकारक आहे, असेही नियोजित शहर अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या आकृतीबंधात ९,८४० पदे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका प्रशासनाने ९,८४० पदांचा समावेश असलेला आकृतीबंध तयार केला आहे. या आकृतीबंधाला मंजुरी देवून तो शासनाकडे पाठवण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करावी लागणार आहे. सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यासाठी परवानगी द्या, असे साकडे पालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांना घातले जाणार आहे.

आकृतीबंधाबद्दल गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेत चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यात प्रशासनाने त्याला मूर्तरूप दिले आहे. त्याचे सादरीकरण बुधवारी उपायुक्त मंजुषा मुथा आणि आस्थापना अधिकारी विक्रम दराडे यांनी केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीच्या सभापती जयश्री कुलकर्णी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पालिकाच्या आस्थापनेवर ४,७९९ मंजूर पदे आहेत. त्यात २,११७ नवीन पदांचा समावेश करण्यात आला होता. आणि ६,९१६ पदांचा आकृतीबंध पालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेला सादर केला होता. सर्वसाधारण सभेने त्यात २,९२४ पदांची वाढ सुचवली होती. सर्वसाधारण सभेने सुचवलेल्या वाढीसह प्रशासनाने ९८४० पदांचा आकृतीबंध तयार केला. त्याचे सादरीकरण पदाधिकाऱ्यांसमोर करण्यात आले. आता हा आकृतीबंध मंजुरीसाठी पुन्हा सर्वसाधारण सभेत ठेवावा लागणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महापालिकेला सर्वसाधारण सभा घेता येणार नाही. त्यामुळे आकृतीबंधाबद्दल निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी द्या, अशी विनंती करणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवा, असे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहारचे जेलभरो आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतीच्या पेरणी ते काढणीपर्यंत कामाचा समावेश मनरेगा अंतर्गत करावा, यासह अन्य मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले.

आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, महानगरप्रमुख प्रदीप त्रिभुवन, विद्यार्थी संघटनेचे कृष्णा गाडेकर, प्रभाकर भुसारे, अनिल पालोदकर, उज्ज्वला लहाने आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतीच्या पेरणी ते काढणीपर्यंत कामाचा समावेश मनरेगा अंतर्गत करावा, पीकविम्याची रक्कम तातडीने द्या, घोषित झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान द्यावे, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ करा, ओबीसी साठी स्वातंत्र्य घरकुल योजना करून आर्थिक तरतूद करा, आदिवासी समाज बांधवांचे प्रलंबित वनहक्क जमीनपट्टे त्वरित वाटप करा, दुबार पेरणीचे संकट असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने बियाणे, खते व आर्थिक मदत करा यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. वंदना म्हस्के, बाळासाहेब भोसले, सुदाम गायकवाड, राम गाडेकर, अमोल ढगे, प्रमोद गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नंतर त्यांची सुटका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रान्सपोर्ट हबच्या जागेवरील अधिक्रमण भूईसपाट

$
0
0

वाळूज महानगर: मुंबई महामार्ग जवळील करोडी शिवारातील गट क्रमांक २४ मधील शेकडो एकर शासकीय जमिनीवर काही दिवसांपासून करण्यात आलेले अतिक्रमण बुधवारी पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. येथील ट्रान्सपोर्ट हबसाठी दिलेल्या ६० एकर जागेवरही झोपड्या बांधून अतिक्रमण करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी करोडी-साजापूर ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला असता मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता.

दोन दिवसांपूर्वीचा पोलिसांच्या उपस्थितीत अनेकांत हाणामारी झाली होती, तसेच ग्रामस्थांना धमकाविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून महसूल प्रशासनाने पोलिस उपायुक्तांना पत्र देऊन पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. तसेच ग्रामपंचायतीतर्फे उपविभागीय अधिकारी, अप्पर तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्यासह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून येथील अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. याची दखल घेत प्रशासनाने बुधवारी सकाळी ११च्या सुमारास करोडी-साजापूर ग्रामपंचायत पदाधिकारी, महसूल प्रशासन, रस्ते विकास महामंडळ यांनी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन येथील हॉटेल, टपऱ्या, ट्रान्सपोर्ट कार्यालये आदींचे अतिक्रमण जेसीबीने भूईसपाट करण्यात आले. अतिक्रमणाचा मलबा ट्रॅक्टर, ट्रकमध्ये भरून लगेच विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी अतिक्रमणधारकांनी अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणी मांडत व्यवसाय व राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली.

यावेळी तहसीलदार रमेश मुनलोड, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, उपअभियंता सुधाकर बाविस्कर, दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक विवेक सराफ, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड, वाळूज वाहतूक शाखेचे शेषराव उदार, उपनिरीक्षक प्रीती फड, लक्ष्मण उंबरे, रवीकुमार पवार, तलाठी डी. डी. सोनवणे, पी. बी. राजपूत, एम. एम. मुळे , मंडळ अधिकारी एल. के. गाडेकर, बी. डी. कटारे, सरपंच अंकुश राऊत, पोलिस पाटील चंद्रभान जाधव, देविदास गवांदे, भारत जाधव यांच्यासह दंगा नियंत्रण पथक व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

\Bअत्यंत महत्त्वाची जागा \B

गट क्रमांक २४ मध्ये १५० एकर शासकीय जमीन आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, पॉवर हाउस, आरटीओ कार्यालय, अग्निशमन दल, ट्रान्सपोर्ट हब यासाठी ही जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या जागेवर काही अज्ञात नागरिकांनी मार्किंग करून, झोपड्या बांधून अतिक्रमण केले होते. येथील ट्रान्सपोर्ट हबच्या जागेवर अतिक्रमण केल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता सुधाकर बाविस्कर यांना मिळताच त्यांनी दौलताबाद पोलिस ठाण्यात अतिक्रमणधारकाविरोधात तक्रार दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमान 'स्लॉट'ची अडचण सोडविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एक आनंददायी बातमी. औरंगाबाद येथून विमानसेवेचा विस्तार करण्यासाठी विमान कंपन्यांना दिल्ली आणि मुंबई येथे स्लॉट (विमान उड्डाणासाठी वेळ) अडचण भेडसावत आहे. ही अडचण दूर करण्याचे आश्वासन बुधवारी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरप्रित सिंग पुरी यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिले.

औरंगाबाद विमानतळावरून जेट एअरवेज विमान सेवा बंद झाल्यानंतर प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबद्दल खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. याशिवाय त्यांनी औरंगाबाद ते उदयपूर आणि मुंबईसह दिल्ली विमान सेवा वृद्धिंगत करावी, अशी मागणी केली होती. दरम्यान औरंगाबादहून विमान सेवा सुरू व्हावी, यासाठी खासदार रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात राज्याचे राज्यमंत्री अतुल सावे, डॉ. भागवत कराड यांनीही विमान कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेतली. औरंगाबादचे उद्योजक सुनीत कोठारी आणि औरंगाबाद टुरिझ्म डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह यांच्यासह इंडियन टुरिझम फोरमच्या प्रतिनिधींकडून विमान सेवा सुरू करण्याबाबत वारंवार विमान कंपन्यांसोबत बैठका सुरू आहेत. ३० जुलै रोजी औरंगाबाद विमानतळासंदर्भात कोठारी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने विविध विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यासाठी 'स्लॉट' उपलब्ध होत नाही. ही माहिती समोर आली. या कारणामुळे एअर इंडियाची मुंबई - औरंगाबाद - उदयपूर ही विमान सेवाही सुरू होत नव्हती. या 'स्लॉट' बाबत खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री हरप्रित सिंग पुरी यांची संसदेत भेट घेतली. खासदार जलील यांनी पुरी यांना औरंगाबाद विमान सेवा विस्तारीकरणाबाबत विमान कंपन्यांना होत असलेल्या अडचणीची माहिती दिली. याबाबत पुरी यांनी 'दिल्ली आणि मुंबई विमानतळ खासगी ऑपरेटरच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. या ठिकाणी 'स्लॉट' मिळविण्याबाबत त्या ऑपरेटरशी चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवू,' असे आश्वासन जलील यांना दिले.

………

\Bअसा पाहिजे 'स्लॉट '…

\Bएअर इंडियाने घोषित केलेल्या मुंबई - औरंगाबाद - उदयपूर या विमानाला मुंबईत दुपारी १२.३०चा स्लॉट उपलब्ध होणे आवश्यक आहे. शिवाय उदयपूर - औरंगाबाद - मुंबई विमानासाठी सायंकाळी सातचा 'स्लॉट' आवश्यक आहे. इंडिगो कंपनीकडूनही औरंगाबाद - मुंबई - दिल्ली विमानासाठी सकाळचा 'स्लॉट' मिळविण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. सायंकाळच्या सत्रात जेट एअरवेजच्या जुन्या वेळापत्रकानूसार विमानसेवा सुरू करण्याचा अन्य एका कंपनीचा विचार आहे. या तिन्ही विमान कंपन्यांना मुंबई आणि दिल्लीच्या विमानतळाचा सकाळी आणि संध्याकाळचा स्लॉट मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथसागर मृतसाठ्यातून बाहेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद/पैठण

गेल्या चार महिन्यांपासून मृतसाठ्यात असलेल्या जायकवाडी धरणातील पाणीपातळी बुधवारी दुपारी चार वाजता जीवंत पातळीपर्यंत पोचली. ऊर्ध्व गोदावरी खोऱ्या झालेल्या दमदार पावसामुळे चार दिवसांपासून जायकवाडी धरणामध्ये आवक सुरू आहे. या कालावधीत तब्बल नऊ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा धरणामध्ये आला. चार दिवसात धरणाच्या पाणीपातळीत जवळपास पाच फुटांनी वाढ झाली.

नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडीत पाणी सोडण्यात येत असून, मृतसाठ्यात असलेले धरण अवघ्या चार दिवसांत जीवंत साठ्यापर्यंत पोचले. सध्या गंगापूर, ओझर, दारणा, वालदेवी, पालखेड, कडवा येथून पाणी सोडण्यात येत असून, नांदूर मधमेश्वर येथून ५१ हजार ४७९ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. सध्या धरणात ४५ हजार क्युसेक पाणी आवक सुरू आहे.

गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जायकवाडी प्रकल्प भरला नव्हता. २२ मार्चपासून धरणाच्या मृतसाठ्यातून उपसा कराणे सुरू करावे लागले. २५ जुलै रोजी जायकवाडीच्या मृतसाठ्यात ४५३.७३७ दशलक्ष घनमीटर पाणी होते. २६ जुलैपासून ऊर्ध्व प्रकल्पांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. अवघ्या चार दिवसांत मृतसाठ्यात असलेली धरणाची पाणीपातळी जीवंत स्तरापर्यंत पोचली. प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा रात्री आठ वाजता १.०५ टक्क्यांपर्यंत पोचला. प्रकल्पात ४५ हजार क्युसेस पाणी येणे सुरू होते.

मृतसाठ्यातून सर्वाधिक उपसा

जायकवाडी प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून यावर्षी २३८.४९५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा करण्यात आला. मृतसाठ्यातून यावर्षी सर्वाधिक पाणी उपसण्यात आले. यापूर्वी २०१३मध्ये धरणात सुमारे २०० दशलक्ष घनमीटरच्या पाण्याचा उपसा करण्यात आला होता. त्यापेक्षा जास्त उपसा यावर्षी करावा लागला. यावर्षी आतापर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे धरणात पाणी आले नाही. जुलै महिन्याच्या सुरुवातीला नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आले. ते पाणी जायकवाडीच्या बॅकवॉटरपर्यंत पोचले, पण प्रकल्पाच्या पाणीपातळीवर त्याचा काहीही परिणाम झाला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी योजनेच्या ‘डीपीआर’ला तांत्रिक मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या 'डीपीआर'ला (सविस्तर प्रकल्प अहवाल) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनी बुधवारी सायंकाळी मान्यता दिली. तांत्रिक मान्यतेचे पत्र महापालिकेला गुरुवारपर्यंत प्राप्त होण्याची शक्यता आहे. हा 'डीपीआर' १६९४ कोटी ५९ लाख रुपये किमतीचा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महापालिकेने शहराच्या पाणीपुरवठ्याचा एकत्रित आराखडा तयार केला. पालिकेसाठी यश इनोव्हेशन सोल्युशन्स कंपनीने 'डीपीआर' तयार करून दिला आहे. त्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मान्यता आवश्यक होती. प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देण्यासाठी महापालिकेकडे योजनेच्या किमतीच्या एक टक्के (सुमारे १७ कोटी रुपये) शुल्क मागितले. एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे महापालिकेने शासनाला कळवल्यावर शासनाच्या नगरविकास खात्याने महापालिकेकडून जीवन प्राधिकरणाला शुल्क मिळण्याची हमी घेतली. त्यानंतर 'डीपीआर'च्या तांत्रिक मान्यतेचा मार्ग मोकळा झाला. पालिकेने 'डीपीआर' तांत्रिक मान्यतेसाठी प्राधिकरणाला सादर केल्यावर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यात सुमारे ६० त्रुटी काढल्या. त्यांची पूर्तता करून पालिकेने 'डीपीआर' पुन्हा जीवन प्राधिकरणाकडे सादर केला. प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंत्यांनी तो प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांकडे सादर केला. सदस्य सचिवांनी बुधवारी सायंकाळी 'डीपीआर'ला तांत्रिक मान्यता दिली, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिली.

\B'डीपीआर' सरकारकडे पाठविणार\B

सदस्य सचिवांनी मंजूर केलेल्या तांत्रिक मान्यतेचा 'डीपीआर' गुरुवारी औरंगाबादेत जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याच्या कार्यालयाला प्राप्त होईल. त्यानंतर मुख्य अभियंत्यांकडून महापालिकेस 'डीपीआर'ला तांत्रिक मान्यता मिळाल्याचे पत्र दिले जाईल. हे पत्र मिळाल्यावर प्रशासकीय मान्यतेसाठी 'डीपीआर' शासनाच्या नगरविकास खात्याला सादर केला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास कंत्राटदारांचा नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास कंत्राटदारांनी नकार दिला आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी झोन कार्यालय निहाय पथकांची स्थापना करा, असे पत्र महापौरांनी आयुक्तांना दिले आहे.

शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना कमालीचा त्रास होत आहे. पावसामुळे खड्ड्यांची तीव्रता अधिकच जाणवू लागली आहे. त्यातच आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव सुरुवात होणार आहे. त्यामुळे खड्ड्यांवरून चर्चा सुरु झाली आहे. राज्य शासनाने दिलेल्या शंभर कोटींच्या निधीतून तीस रस्त्याच्या व्हाइट टॉपिंगची कामे केली जाणार आहेत. शासनाचा निधी प्राप्त झालेला असताना रस्त्यांच्या कामांना मात्र गती मिळत नसल्याचे चित्र आहे. कामाची गती वाढवावी म्हणून आयुक्तांनी कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे. शासनाच्या निधीतून केल्या जाणाऱ्या रस्त्यांची कामे रखडलेली असताना अन्य रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी आढावा घेतला, तेव्हा कंत्राटदार खड्डे बुजवण्याचे काम करण्यास तयार नसल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. शासकीय अनुदानातून रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडून खड्डे बुजवण्याचे काम करता येते का याची चाचपणी करा, असे महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले. रस्त्यांचे कंत्राटदार देखील खड्डे बुजवण्याचे काम करण्यास तयार नसतील तर, झोन कार्यालयनिहाय पथकांची स्थापना करून खड्डे बुजवण्याचे काम करा, असे पत्र आपण आयुक्तांना देणार आहोत असे महापौरांनी पत्रकारांना सांगितले.

\Bडांबर प्रकल्पाचा विरोध भोवला

\Bखड्डे बुजवण्यासाठी तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी डांबर प्रकल्पाची कल्पना मांडली होती. महापालिकेने स्वत:चा डांबर प्रकल्प टाकला तर, खड्डे बुजवण्यासह अंर्तगत रस्त्यांची कामे देखील या प्रकल्पाच्या सहाय्याने करता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, पालिकेतील अधिकारी - पदाधिकारी व काही नगरसेवक यांच्या लॉबीने केंद्रेकरांची कल्पना हाणून पाडली. पालिकेचा स्वत:चा डांबराचा प्रकल्प असला असता तर, कंत्राटदारांपुढे हात पसरण्याची वेळ आली नसती असे आता बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर बाजार समितीला बरखास्तीची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्तीची नोटीस बजाविण्यात आली आहे. समितीच्या चौकशीत अनेक गैरप्रकार व अनियमितता आढळून आल्याने ही नोटीस बजावल्याचे जिल्हा उप निबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सात दिवसांची मुदत संपल्यानंतर समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

बाजार समितीची तीन वर्षांपूर्वी संचालक मंडळाच्या १८ जागासाठी निवडणूक झाली होती. त्यात काँग्रेस पुरस्कृत पॅनलने मोठ्या फरकाने जागा जिंकल्या, तर गंगापूरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव सभापतिपदी विराजमान झाले. दरम्यान, गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मनमानी कारभारासंदर्भात सदस्य प्रमिला काळे यांनी सहकार व पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (पुणे) यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत पणन मंडळाचे त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती.

समितीने चौकशी करून अहवाल पणन संचालक यांच्याकडे सादर केला होता. बाजार समितीच्या सभापती-उपसभापती, संचालक मंडळाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास विनियम) अधिनियम १९६३ मधील कलम २९ चे उल्लंघन करून अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे, अनियमितता यामुळे जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. गंगापूरचे सहायक उपनिबंधक अनिल पुरी यांची बाजार समितीचे प्रशासक म्हणून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजांत निवडणुकांसाठी २३ सप्टेंबर रोजी मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. निवडणुकीची अधिसूचना १६ ऑगस्टला जारी केली जाणार आहे. महाविद्यालये, विद्यापीठ विभागांमध्ये ३१ ऑगस्ट रोजी निवडणूक होईल, तर महत्त्वाचा विद्यापीठ स्तरावरील निवडणुकीचा टप्पा २३ सप्टेंबरला पार पडेल. त्याचा निकाल २६ सप्टेंबरला जाहीर होईल.

विद्यापीठ प्रशासनाने बुधवारी महाविद्यालयीन निवडणुकींचे वेळापत्रक जाहीर केले. १६ ऑगस्टपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. कॉलेज विद्यापीठस्तरावर अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी व राखिव प्रवर्गातील सदस्याची निवडणुकीसाठी मतदान याद्या १९ ऑगस्ट रोजी जाहीर कराव्या लागतील. आक्षेपानंतर २० ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. २२ ऑगस्ट रोजी अर्ज दाखल करावे लागतील. विद्यार्थ्यांना २८ ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. मतदान ३१ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दोन यादरम्यान होणार आहे. निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी तीन वाजता जाहीर करावा लागेल. कॉलेज, विभागस्तरावर अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी व राखीव प्रवर्गातील निवड झालेल्या सदस्यांची नावे विद्यापीठाकडे तीन सप्टेंबरपर्यंत सादर करावे लागतील. त्यानंतर विद्यापीठस्तरावरील पुढची प्रक्रिया सुरू होईल.

\Bविद्यापीठात २३ सप्टेंबर रोजी मतदान\B

विविध महाविद्यालयातून निवडून आलेल्या सदस्य मतदारांची अंतिम यादी ११ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर केली जाईल. अर्ज दाखल करण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी साडेचारपर्यंत मुदत आहे. अर्ज मागे घेण्यासाठी १८ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल व मतदान २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेतीनदरम्यान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी २६ सप्टेंबर रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रान्सपोर्ट हबच्या जागेवरील अतिक्रमण भूईसपाट

$
0
0

वाळूज महानगर: मुंबई महामार्ग जवळील करोडी शिवारातील गट क्रमांक २४ मधील शेकडो एकर शासकीय जमिनीवर काही दिवसांपासून करण्यात आलेले अतिक्रमण बुधवारी पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. येथील ट्रान्सपोर्ट हबसाठी दिलेल्या ६० एकर जागेवरही झोपड्या बांधून अतिक्रमण करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी करोडी-साजापूर ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला असता मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता.

दोन दिवसांपूर्वीचा पोलिसांच्या उपस्थितीत अनेकांत हाणामारी झाली होती, तसेच ग्रामस्थांना धमकाविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून महसूल प्रशासनाने पोलिस उपायुक्तांना पत्र देऊन पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. तसेच ग्रामपंचायतीतर्फे उपविभागीय अधिकारी, अप्पर तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्यासह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून येथील अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. याची दखल घेत प्रशासनाने बुधवारी सकाळी ११च्या सुमारास करोडी-साजापूर ग्रामपंचायत पदाधिकारी, महसूल प्रशासन, रस्ते विकास महामंडळ यांनी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन येथील हॉटेल, टपऱ्या, ट्रान्सपोर्ट कार्यालये आदींचे अतिक्रमण जेसीबीने भूईसपाट करण्यात आले. अतिक्रमणाचा मलबा ट्रॅक्टर, ट्रकमध्ये भरून लगेच विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी अतिक्रमणधारकांनी अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणी मांडत व्यवसाय व राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली.

यावेळी तहसीलदार रमेश मुनलोड, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, उपअभियंता सुधाकर बाविस्कर, दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक विवेक सराफ, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड, वाळूज वाहतूक शाखेचे शेषराव उदार, उपनिरीक्षक प्रीती फड, लक्ष्मण उंबरे, रवीकुमार पवार, तलाठी डी. डी. सोनवणे, पी. बी. राजपूत, एम. एम. मुळे , मंडळ अधिकारी एल. के. गाडेकर, बी. डी. कटारे, सरपंच अंकुश राऊत, पोलिस पाटील चंद्रभान जाधव, देविदास गवांदे, भारत जाधव यांच्यासह दंगा नियंत्रण पथक व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

\Bअत्यंत महत्त्वाची जागा \B

गट क्रमांक २४ मध्ये १५० एकर शासकीय जमीन आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, पॉवर हाउस, आरटीओ कार्यालय, अग्निशमन दल, ट्रान्सपोर्ट हब यासाठी ही जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या जागेवर काही अज्ञात नागरिकांनी मार्किंग करून, झोपड्या बांधून अतिक्रमण केले होते. येथील ट्रान्सपोर्ट हबच्या जागेवर अतिक्रमण केल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता सुधाकर बाविस्कर यांना मिळताच त्यांनी दौलताबाद पोलिस ठाण्यात अतिक्रमणधारकाविरोधात तक्रार दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थसंकल्पातील २५० कोटींच्या कामांना कात्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या अर्थसंकल्पात आयुक्तांनी सुमारे २५० कोटींच्या कामांना कात्री लावली आहे. कामांना कात्री लागल्यामुळे आयुक्तांनी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना चपराक मारल्याचे मानले जात आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रशासनाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात कामांना कात्री लावली जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याची देखील चर्चा आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात कामांची नोंद झाल्यावर अनेक कामे त्याच आर्थिक वर्षात पूर्ण होत नाहीत. त्यामुळे ही कामे पुढील वर्षाच्या कामात समाविष्ट केली जातात. अशा कामांना 'स्पील ओव्हर'ची कामे असे संबोधले जाते. दरवर्षी 'स्पील ओव्हर'च्या कामांची संख्या वाढत जाते. यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल २५० कोटी रुपयांची 'स्लीप ओव्हर'ची कामे समाविष्ट केली जाणार होती, परंतु आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ही सर्वच्या सर्व कामे वगळून टाकली आहे. या कामांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यातच आला नाही. प्रशासनाने स्थायी समितीला सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर ही बाब उघड झाली आहे. 'स्पील ओव्हर'ची कामे रद्द करण्यात आल्यामुळे पूर्वी मंजूर झालेली कामे आता होणार नाहीत. त्यामुळे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे परंतु, त्याची तमा न बाळगता अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; अर्थसंकल्पात आयुक्तांनी सध्या सुरू असलेल्या व वर्कऑर्डर झालेल्या कामांचाच समावेश केला आहे. हा समावेश करताना त्यांनी, काम केव्हा मंजूर झाले, कामासाठी किती खर्च येणार, कामाची सध्याची स्थिती काय आहे याचाही उल्लेख केला आहे. मंजूर झालेली आणि वर्कऑर्डर दिलेली कामेच अर्थसंकल्पात घेण्यात आली आहेत. त्यामुळे मंजूर झालेल्या जुन्या कामांना आता नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना विसरावे लागणार आहे.

\Bआयुक्तांचा अर्थसंकल्प ८३३ कोटींचा\B

आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी २०२० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असता तरी त्यांचा खरा अर्थसंकल्प केवळ ८३३ कोटींचाच असल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्थसंकल्पातील उर्वरित रक्कम शासकीय अनुदानाची आहे. अपेक्षित शासकीय अनुदान मिळाले तर २०२० कोटींचा अर्थसंकल्प साध्य होणार आहे. अन्यथा मालमत्ता कर, पाणीपट्टी, जीएसटीचे अनुदान व शासनाकडून मिळणारे अन्य नियमित अनुदान यामुळे ८३३ कोटींचा अर्थसंकल्प साध्य होईल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३०० रुपयांसाठी पत्नीचा खून

$
0
0

बीड

केवळ ३०० रुपयांचा हिशेब दिला नसल्याच्या शुल्लक कारणावरून पतीने पत्नीची विटांनी ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील सातेफळ शिवारात घडली आहे.

अशोक गुलाब नरसिंगे असे आरोपीचे नाव असून बीड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अशोक आणि त्याची पत्नी दिपाली हे वीटभट्टी कामगार आहेत. दोघांमध्ये मंगळवारी ३०० रुपयांच्या हिशेबावरून वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झालं आणि अशोकने दिपालीची विटांनी ठेचून हत्या केली. या दाम्पत्याला पाच महिन्यांची मुलगी आहे.

दिपालीची हत्या करून परराज्यात पसार होण्याच्या तयारीत असलेल्या अशोक याला उस्मानाबाद येथून अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हे शाखेकडून दुचाकी चोर जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या संशयित आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. बुधवारी बीड बायपास परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गुन्हे शाखेच्या पथकाला सातारा परिसरात एकतानगर भागात एक तरुण चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचून संशयित आरोपी शेख इस्राईल शेख मुजीब (वय १९, रा. पिंपळवाडी ता. पैठण) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीची चौकशी केली असता इस्राईलने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी दुचाकीसह आरोपीला इस्राईलला अटक करत सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे, सय्यद मुजीब, गजानन मांटे, भावसिंग चव्हाण, आनंद वाहुळ यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्व उघड होते, डाग लागू देऊ नका!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत सर्व उघड होते. त्यामुळे सावध रहा. पक्षाच्या आदेशानुसार मतदान करा. विनाकारण आपल्यावर डाग लावून घेऊ नका,' असा इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवसेना, भाजप व मित्रपक्षाच्या मतदारांना दिला.

औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ नाट्यगृहात युतीच्या मतदारांसाठी मेळावा करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करतानाशिंदे बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, संपर्कनेते विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, संदीपान भुमरे, संतोष दानवे, प्रशांत बंब, मनीषा कायंदे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांची विशेष उपस्थिती होती.

शिंदे म्हणाले, 'या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून अनेक जण इच्छुक होते. इच्छा व्यक्त करणे गैर नाही. चांगल्या आणि अभ्यासू कार्यकर्त्याला उद्धव ठाकरे यांनी संधी दिली आहे. दानवे यांनी अनेक वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली. चंद्रकांत पाटील यांचीही भेट घालून दिली. या दोघांनीही अंबादास दानवे आमदार झाले पाहिजेत अशी सदिच्छा व्यक्त केली,' असा उल्लेख शिंदे यांनी केला. युतीच्या मतदारांना इशारा देताना शिंदे म्हणाले, 'या निवडणुकीत सर्व उघड होते. त्यामुळे विनाकारण आपल्यावर डाग लावून घेऊ नका. ही निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम आहे. त्यामुळे या निवडणुकीत कुचराई होऊ देऊ नका. मतदान होईपर्यंत आपला विभाग, आपले शहर सोडून जाऊ नका.'

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी 'अंबादास दानवे यांच्या विजयात जालना जिल्ह्याचा वाटा मोठा असेल,' असा शब्द यावेळी दिला. 'ही निवडणूक संशय घेतली जाणारी आहे. त्यामुळे सावध रहा. छोट्या - छोट्या संशयामुळे बाहेर फेकले जाऊ नका,' असा सल्ला त्यांनी मतदारांना दिला. अंबादास दानवे म्हणाले, 'मी सामान्य कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहणार आहे. माझे दोन हात लाखांचे हात आहेत. मी मतदारांना फक्त हात जोडणार आहे. बाकी सर्व नेते मंडळी पाहून घेतील.' मेळाव्याचे प्रास्ताविक जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी केले. आमदार संतोष दानवे, डॉ. भागवत कराड, विनोद घोसाळकर यांची यावेळी भाषणे झाली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले. उपमहापौर विजय औताडे यांनी आभार मानले.

\B'अंबादास'कडून अपेक्षा ठेऊ नका

\Bचंद्रकांत खैरे यांनी देखील मेळाव्यात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'काही जण म्हणतात माझे व अंबादास दानवे यांचे भांडण आहे. पण तसे काही नाही. अंबादास दानवे मला नेता मानतात आणि एक अभ्यासू कार्यकर्ता म्हणून मला तो हवाच आहे. अंबादास दानवे गरीब आहे. त्याच्याकडून काही अपेक्षा ठेऊ नका. आपल्याला या विधान परिषद निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या नऊच्या नऊ जागा जिंकायच्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पाण्यासाठी अनेकजण पाण्याच्या टाक्यांवर चढले. आता देखील पाणी नाही, पण कुणीही पाण्याच्या टाकीवर चढत नाही,' असा उल्लेख खैरे यांनी केला.

\Bमतदारांसाठी कार्यकर्त्यांना उठवले

\Bविधान परिषदेच्या निवडणुकीत ठराविकच मतदार आहेत. त्यातही शिवसेना - भाजप युतीच्या मतदारांची संख्या जास्त आहे. गुरुवारचा मेळावा मतदारांसाठीचा होता. पण कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्याला आले होते. त्यांनी सभागृहातील खुर्च्या काबीज केल्या होत्या. त्यामुळे मतदारांवर उभे राहण्याची वेळ आली. ही बाब लक्षात आल्यावर सूत्रसंचालन करणाऱ्या महापौरांनी कार्यकर्त्यांना खुर्चीवरून उठण्यास सांगितले. 'तुम्ही उठा, मतदारांना जागा,' द्या असे ते म्हणाले. त्यांच्या आवाहनानंतर काही कार्यकर्ते खुर्चीवरून उठले. हाच धागा पकडत अनिरुद्ध खोतकर म्हणाले, 'कार्यकर्त्यांना उठवू नका. त्यांच्यामुळेच आपण मतदार झालो आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलइन पीयूसीप्रकरणी १९ जणांना नोटीस

$
0
0

औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाने मार्च २०१९पासून पीयूसी केंद्रांवरील यंत्रणा ऑनलाइन असणे बंधनकारक केले आहे मात्र, अनेक केंद्रांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने १९ जणांना नोटीस बजावल्या आहेत.

पीयूसी केंद्रांवरील यंत्रणा ऑनलाइन केल्याने वाहनांची तपासणी केल्यानंतर त्याची माहिती ऑनलाइन प्रणालीद्वारे थेट 'आरटीओ' कार्यालयाकडे येईल. त्यामुळे बनावट पीयूसी वाटपावर लगाम बसेल, अशी अपेक्षा आहे. यासाठी पीयूसी केंद्रांना मार्चमध्ये ऑनलाइन यंत्रणा बंधनकारक केले. त्यासाठी या केंद्रांच्या यंत्रणेत बदल करण्याचे आदेश देण्यात आले. एप्रिल महिन्यात नव्या बदलानुसार एका पीयूसी केंद्राने प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली, परंतु अनेक जण जुन्या पद्धतीनेच पीयूसी प्रमाणपत्र वाटप करीत आहेत. त्यामुळे नोटीस बजावून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या पीयूसी केंद्रधारकांवर वायूवेग पथक, पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल, अशी सूचना सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडगाव कोल्हाटीच्या सरपंचावर अविश्वास

$
0
0

वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतच्या सरपंच उषाताई एकनाथ साळे यांच्याविरुद्ध १७ पैकी १४ सदस्यांनी तहसीलदारांकडे ३० जुलै रोजी अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामपचांयतीमध्ये एकूण १७ सदस्य आहेत त्यात शिवसेनेचे १५ भाजपाचा एक सदस्य व एक अपक्ष सदस्य आहे.

ग्रामपंचायतीवर शिवसेनेची एक हाती सत्ता असली तरी सरपंचपदाचे दावेदार जास्त असल्याने सर्वाना समान संधी मिळावी यासाठी सरपंचपदाचा कार्यकाळ ठरवला होता. पहिल्यांदा महेश भोंडवे हे सरपंच झाले. त्यांनी कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा न दिल्याने इतर सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास आणून पाय उतार केले होते. त्यानंतर नाट्यमयरित्या अपक्ष सदस्य उषाताई साळे यांनी शिवसेनेत प्रवेश करून सरपंचपद मिळविले. साळे यांना काही महिन्यांसाठी सरपंच केले असून त्यानंतर इतराला संधी देणार असल्याचे त्यावेळी पक्षाच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. मात्र दीड वर्षांचा काळ उलटून गेल्यानंतरही त्यांनी राजीनामा दिला नसल्यामुळे नाराज सदस्यांनी एकत्र येऊन साळे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. काम करतांना विश्वासात घेत नाही, ग्राम निधीची गैरवापर, सरपंचाचे कुंटुंबीय कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

\Bठरावावर यांच्या सह्या \B

या अविश्वास ठरावावर ग्रामपंचायत सदस्य हौसाबाई पाटोळे, सचिन गरड, श्रीकांत साळे, महेश भोंडवे, रमाकांत भांगे, वैशाली जिवरग, संगीता कासार, सुरेखा लगड, उषा हंडे, श्रीकृष्ण भोळे, मंदाताई भोकरे, अलका शिंदे, मोहन गिरी, अरुण वाहुळ यांनी स्वाक्षरी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन्ही उमेदवार आमनेसामने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबुराव उर्फ भवानीदास कुलकर्णी आमने-सामने झाले. दानवे यांनी कुलकर्णी यांच्या पायाला वाकून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करताच कुलकर्णी म्हणाले, दानवे मी मायक्रो मायनॉरिटी आहे, त्यावर दानवे म्हणाले, आशीवार्द असू द्या. दोन्ही उमदेवारांच्या या खेळीमेळीच्या संवादामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हशा पिकला.

महायुती व आघाडीचे उमेदवार अर्ज भरणार असल्याने येथे दोन्हीही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. १२ वाजेच्या सुमारास दानवे यांनी अर्ज भरला अन् ते खाली आले. नेमके तेव्हाच कुलकर्णी हे कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्याने दोघेही आमने सामने झाले, पाच मिनिटे त्यांच्यात संवाद सुरू होता.

महायुतीकडून दानवे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी खा. चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, डॉ. भागवत कराड, महापौर नंदकुमार घोडले, उपमहापौर विजय औताडे, प्रमोद राठोड आदींची यावेळी उपस्थिती होती. कुलकर्णी यांचा अर्ज दाखल करतांना आ. सुभाष झांबड, आ. सतीश चव्हाण, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नामदेवराव पवार, राष्ट्रवादीचे कैलास पाटील आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरांकडून आणखी दोन दुचाकी जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको पोलिसांनी पकडलेल्या दुचाकी चोरांकडून चोरीच्या आणखी दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी या जोडीला बुधवारी अटक करत १९ दुचाकी जप्त केल्या होत्या. दरम्यान, ग्रामीण भागातील नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वस्तात दुचाकी खरेदी करू नये, असे आवाहन सिडको पोलिसांनी केले आहे.

सिडको पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बुधवारी संशयित आरोपी नाजीम बनेखान पठाण (वय २२, रा. नाचनवेल, ता. कन्नड) आणि विजय पुंडलिक दिवटे (वय २८, रा. मुकुंदवाडी) या दोघांना अटक केली आहे. त्यांनी शहरातून १९ दुचाकी चोरल्याची कबुली देत या दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या. अधिक चौकशीत त्यांनी आणखी दोन दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या. त्यांच्याकडून चोरीच्या आणखी दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी व्यक्त केली.

\Bचोरीच्या दुचाकी घेणे टाळा\B

या आरोपींनी दुचाकी चोरी केल्यानंतर त्याची विक्री औरंगाबाद ग्रामीण भागात केली होती. मेगा फायनान्स कंपनीचे कर्मचारी असून या दुचाकी जप्त केलेल्या असून अवघ्या पाच ते दहा हजारांत त्याची विक्री केली होती. नागरिकांची देखील या दुचाकी विकून आरोपींनी फसवणूक केल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी दुचाकीच्या कागदपत्रांची शहानिशा केल्याशिवाय दुचाकीची खरेदी करू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images