Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रेबीज फ्री सिटीसाठी आज आरोग्य संघटनेची गाडी येणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेबीज फ्री सिटीसाठी जागतिक आरोग्य संघटनेची गाडी शुक्रवारी औरंगाबाद शहरात येणार आहे. रेबीज फ्री शहर होण्यासाठी काय उपययोजना कराव्या लागतात या बद्दल आरोग्य संघटनेचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार असून गाडीच्या माध्यमातून प्रात्यक्षिक देखील करून दाखवणार आहेत. आरोग्य संघटनेने गोहाटी आणि गोवा येथे रेबीज फ्री उपक्रम यशस्वीपणे राबवला. एक महिन्यापासून ही संघटना नागपूर येथे रेबीज फ्री उपक्रमांतर्गत काम करीत होती. नागपूरहून मुंबईला जाताना संघटनेचे पदाधिकारी त्या गाडीसह काही तास औरंगाबादेत थांबणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने यंदा 'मिशन रेबीज' हाती घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाघांच्या बछड्यांना स्वातंत्र्यदिनी सोडणार खुल्या पिंजऱ्यात

$
0
0

(बछड्यांचा सिंगल कॉलम फोटो वापरावा)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या बछड्यांना स्वातंत्र्यदिनी खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना स्वातंत्र्यदिनी वाघांच्या बछड्यांचे दर्शन होणे शक्य होणार आहे.

प्राणिसंग्रहालयातील समृद्धी या वाघिणीने २६ एप्रिल रोजी चार बछड्यांना जन्म दिला. त्यातील दोन बछडे पांढरे तर दोन पिवळ्या रंगाचे आहेत. एप्रिल पासून आतापर्यंत या बछड्यांचा सांभाळ प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने अगदी काळजीपूर्वक केला आहे. आता या बचड्यांचे वजन देखील बऱ्यापैकी वाढले आहे. त्यांना खुल्या पिंजऱ्यात सोडता येणे शक्य आहे का या दृष्टीने गेल्या आठवड्यात चाचपणी करण्यात आली, पण त्यांच्या पायात थोडी ताकद येऊ द्यावी, या उद्देशाने १५ ते २० दिवसांनी त्यांना खुल्या पिंजऱ्यात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता १५ ऑगस्टला त्यांना खुल्या पिंजऱ्यात सोडले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक काळात अभिव्यक्ती जोखमीची राहिली !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'माणुसकीची भावना मनात जपणारा माणूसच न्यायावर बोलू शकतो. अन्याय, विषमता अनुभवलेल्या अण्णा भाऊ साठे आणि मुन्शी प्रेमचंद यांनी साहित्यातून आवाज उठवला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांनी जोखीम पत्करली होती. या दोघांनी शब्दांची ताकद सिद्ध केली. प्रत्येक काळात अभिव्यक्ती नेहमीच जोखमीची राहिली आहे', असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अस्लम मिर्झा यांनी केले. ते परिसंवादात बोलत होते.

प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष आणि मुन्शी प्रेमचंद जयंतीनिमित्त जिल्हा अधिवेशन व परिसंवाद घेण्यात आले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात गुरुवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. 'अभिव्यक्ती के सारे खतरे उठानेही होंगे अब' या विषयावरील परिसंवादात अस्लम मिर्झा व कवी सुशीलकुमार शिंदे यांनी विचार मांडले. यावेळी तानाजी ठोंबरे, प्रा. समाधान इंगळे, डॉ. सुधाकर शेंडगे आणि राकेश वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 'स्वप्नांना आवाज देण्याचे काम जिवंत माणूस करू शकतो. मुन्शी प्रेमचंद आणि अण्णा भाऊ साठे यांनी तेच काम केले. वंचित आणि शोषितांवरील अन्यायाला साहित्यातून वाचा फोडली. प्रेमचंद यांच्या साहित्यावर बंदी घातली होती. साठे यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जोखीम पत्करली होती. प्रत्येक काळात अभिव्यक्ती नेहमीच जोखमीची राहिली आहे. त्यामुळे शब्दाची ताकद ओळखून लेखन करा', असे मिर्झा म्हणाले.

'लेखक, कलाकार मूलत:च धर्मनिरपेक्ष असतो. लेखकाने शोषितांच्या बाजूने उभे राहून हस्तक्षेप नोंदवला पाहिजे. समाजाला योग्य दिशेला घेऊन जाण्यासाठी कलाकृती उभ्या केल्या पाहिजे. शोषणाचे समर्थन करणारे लेखन डावे-दलित लेखकांनी नकळतपणे केले. त्यामुळे भूमिका समजून लेखन केल्यास आताचा विळखा सैल होईल', असे राकेश वानखेडे म्हणाले.

दरम्यान, परिसंवादानिमित्त घेतलेल्या काव्य स्पर्धेतील विजेते अरविंद हमदापूरकर, हर्षल पवार, डॉ. राज रणधीर, राजनंदिनी वरकड, अमोल मसलखांब, सचिन वालतुरे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी शाहीर अजिंक्य लिंगायत आणि सहकाऱ्यांनी लोकगीत-पोवाडा सादरीकरण केले. डॉ. समाधान इंगळे यांनी प्रास्ताविक केले आणि नीलेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी रसिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bकुणाची अभिव्यक्ती धोक्यात ? \B

'सरसकट अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला असे म्हणणे योग्य नाही. कोणत्याही सत्तेला प्रश्न विचारणारा नको असतो. ज्यांच्या अभिव्यक्तीमुळे व्यवस्थेसमोर प्रश्न तयार होतात, त्यांनाच लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे अशा प्रश्न विचारणाऱ्यांच्या अभिव्यक्तीला धोका आहे. अन्यथा, केवळ दीड हजार प्रतींचा खप असलेल्या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांची हत्या झाली नसती', असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. व्यवस्थेचा प्रतिवाद करणाराच्या अभिव्यक्तीला निश्चित धोके आहेत', असे शिंदे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळी झाडून पळवली कार, तिघांच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड-लोहा रोडवरील कारचालकाचा खून करुन कार व मोबाइल पळवल्याच्या मोक्का प्रकरणात जसप्रितसिंग उर्फ यश गेंदासिंग कामठेकर, अमरसिंग नारायणसिंग वासरीकर व सरणपालसिंग उर्फ पुनित गुरमितसिंग राधी यांच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत (७ ऑगस्ट) वाढ करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश श्रीमती टी. जी. मिटकरी यांनी दिले.

या प्रकरणी नांदेड (ग्रामीण) पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ सीताराम जाधव यांनी फिर्याद दिली होती. ८ एप्रिल २०१९ रोजी रात्री ११च्या सुमारास डॉ. सतीश प्रभाकर गायकवाड, चालक बशीरखान व इतर कारमधून जात असताना त्यांच्या कार थांबवत पिस्तुलातून गोळी झाडली. ती गोळी चालकाच्या हाताला लागली. आरोपींनी डॉ. गायकवाडसह सर्वांना बाहेर येण्यास सांगितल्यानंतर ते कारच्या चावीसह बाहेर आले व पळाले. पहिला प्रयत्न फसल्यानंतर दोघा आरोपींनी बीडीडीएस ऑफिस येथे रस्त्यावरील दुसरा कालचालक शेख नजीब अब्दुल गफार (वय ३०, अहमदपूर) याच्यावर गोळी झाडली व त्याला कारखाली फेकले. यात शेख नबीज याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी कारसह मृताचा मोबाईलही पळवला.

या प्रकरणात नांदेड (ग्रामीण) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संघटित गुन्हेगारीमुळे प्रकरणात मोक्का लावण्यात आल्यानंतर सुरेंद्रसिंग उर्फ सूरज जगतसिंह गाडीवाले (१९), शुभम राजकुमार खेलबुडे (२०) व शिल्पेश राजेंद्रकुमार निळेकर (२१, रा. सर्व रा. नांदेड) यांना २७ जून रोजी अटक करुन पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर जसप्रितसिंग उर्फ यश गेंदासिंग कामठेकर (१९), अमरसिंग नारायणसिंग वासरीकर (१९) व सरणपालसिंग उर्फ पुनित गुरमितसिंग राधी (२२, सर्व रा. नांदेड) यांना २५ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. आरोपींना मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले असता, तिघांना गुरुवारपर्यंत (१ ऑगस्ट) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

\Bफरार आरोपींचा शोध बाकी

\Bतिन्ही आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामु‌ळे त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींचा कबुली जबाब घ्यायचा आहे. तसेच तीन फरार आरोपींचा शोध घेणे बाकी असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्याची विनंती विशेष सरकारी वकील राजू पहाडिया यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने तिन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बार कर्मचाऱ्यांना मारहाण, चौघांचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाइन बार रात्री बंद झाल्यानंतर दारू न दिल्याच्या रागातून बारचा व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांना लाकडी दांडा व रॉडने गंभीर मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ भगवान निकाळजे, मधुकर भीमराव म्हस्के, महेश रावसाहेब नरवडे व बुद्धभूषण मगन निकाळजे यांचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी फेटाळला.

या प्रकरणी बारचा कर्मचारी सतीश मारोती हजारे (वय ३८, रा. मुकुंदवाडी) याने फिर्याद दिली होती. ६ जून २०१९ रोजी बारचा मुख्य व्यवस्थापक धनराज चिकटे याने रात्री ११ वाजता बार बंद केला. त्यानंतर पावणेबाराच्या सुमारास आरोपी सिद्धार्थ भगवान निकाळजे (वय ३८, रा. हिवरखेड रोड, कन्नड) हा बारमध्ये शिरला व त्याने दारूची मागणी केली. बार बंद केल्याचे सांगताच त्याने शिव्या देत फिर्यादीला चापट मारली. सिद्धार्थला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, तो गल्ल्यावर जाऊन बसला आणि दारू दिल्याशिवाय जाणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने फोन करुन सात ते आठ जणांना बोलावून घेतले आणि सर्वांनी फिर्यादी, व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांना लाकडी दांडे, रॉडने गंभीर मारहाण केली.

या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सिद्धार्थ भगवान निकाळजे, मधुकर भीमराव म्हस्के (वय ३८, रा. चिकलठाणा), महेश रावसाहेब नरवडे (वय ३०, रा. मुकुंदवाडी) व बुद्धभूषण मगन निकाळजे (वय २८, रा. उस्मानपुरा) या आरोपींना ३१ जुलै रोजी अटक करून त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानंतर चौघांनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, न्यायालयाने त्यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील सय्यद शेहनाझ यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाचा खून; दोन वर्षानंतर आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वेस्थानक परिसरातील मालधक्क्याजवळ भंगार वेचणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणात तब्बल दोन वर्षानंतर तिसरा आरोपी राजू संतदिन गौतम उर्फ सोन्या बिहारी याला गुरुवारी (१ ऑगस्ट) दुपारी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत (२ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. दहातोंडे यांनी दिले.

या प्रकरणी मृत याकुब (वय १५) याचे वडील जोसेफ प्रेमचंद कांबळे (वय ३७, रा. राजनगर, रेल्वेस्थानक परिसर) यांनी फिर्याद दिली होती़ फिर्यादीनुसार, १० जानेवारी २०१७ रोजी रेल्वेस्थानक परिसरात याकुबचा खून करण्यात आला होता व प्रकरणात लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, मृत शिक्षक दत्तात्रय पोकळे यांच्या खून प्रकरणात आरोपी सोनू दिलीप वाघमारे (वय २०, रा. रेल्वेस्थानक परिसर) याला अटक करण्यात आली होती़ पोलिस कोठडीदरम्यान आरोपी सोनू याने आरोपी सोन्या बिहारी (वय २८, रा. शहागंज), आसेफ व दत्ता जगन्नाथ शिंदे (वय २०, रा. मुकुंदवाडी) यांच्या सहाय्याने याकुबचा खून केल्याची कबुली दिली.

आरोपी सोन्या बिहारी याला पोकळे यांच्या खून प्रकरणात अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीनंतर हर्सूल कारागृहात रवानगी केली होती. लोहमार्ग पोलिसांनी त्याला गुरुवारी हर्सूल कारागृहातून अटक करत न्यायालयात हजर केले असता, आरोपींच्या फरार साथीदाराला अटक करणे बाकी असून गुन्हा करण्यामागे आरोपींचा काय उद्देश होता, याचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरीप्रकरणात दोघा आरोपींना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातून दुचाकी चोरल्याच्या प्रकरणात नाजीम बनेखान पठाण व विजय पुंडलिक दिवटे यांना बुधवारी (३१ जुलै) अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना शनिवारपर्यंत (३ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. दहातोंडे यांनी गुरुवारी दिले. दरम्यान, त्यांच्याकडून तब्बल १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या.

या प्रकरणी अजिनाथ भिमराव पालवे (३३, रा. चेतनानगर, हर्सुल) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २६ जुलै रोजी पालवे यांनी घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लांबवली. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन नाजीम पठाण (२२, रा. नाचनवेल, ता. कन्नड) व विजय पुंडलिक दिवटे (२८, रा. मुकुंदवाडी) यांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्यांनी १९ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली व त्यांच्याकडून १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. दोघा अरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींनी चोरलेल्या दुचाकींपैकी उर्वरित दुचाकी जप्त करणे बाकी असून, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने दोघांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईविरुद्ध मुलाचा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरगुती वादातून विभक्त राहणाऱ्या पतीने ११ वर्षांच्या मुलाला सुट्यांमध्ये आपल्यासोबत घेऊन जात पत्नीबदल अश्लिल बोलायला लाऊन त्याचे व्हिडियो क्लिप्स तयार केले. तणावात असलेल्या मुलाला विश्वासात घेतल्यानंतर त्याने आईला हा प्रकार सांगितला. याप्रकरणी डॉक्टर मातेने सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून पतीविरुद्ध बाल सरंक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

४३ वर्षांची तक्रारदार महिला ११ वर्षांच्या मुलासह सिडको एन १ भागात आई-वडिलांकडे राहते. या महिलेचा विवाह जून २००६ मध्ये ब्रह्मनंद रामराव टाले. (रा. खामगाव, जि. बुलडाणा) याच्यासोबत झाला. २००७ मध्ये या दांपत्याला मुलगा झाला. लग्नानंतर पतीच्या छळामुळे डिसेंबर २०११ मध्ये ही महिला मुलासह माहेरी राहण्यास आली. दरम्यान, या पती-पत्नीचा वाद कौटुंबिक न्यायालयात पोहचला. ऑगस्ट २०१७ मध्ये कोर्टाने मुलाचे वडील ब्रह्मानंद टाले हे दर रविवारी दहा ते तीन वाजेच्या दरम्यान कोर्टाच्या आवारात मुलाला भेटतील, असा निर्णय दिला. तसेच २०१७ पासून ब्रह्मानंद हा कोर्टाच्या आदेशाने मुलाला प्रत्येक दिवाळी, ख्रिसमस आणि उन्हाळ्याच्या सुट्यामध्ये खामगावला घेऊन जात होता.

डिसेंबर २०१८ पासून मुलगा युवराजसिंह हा वडिलांना भेटायला जाताना रडायचा आणि येताना तणावात राहत होता. नुकत्याच संपलेल्या उन्हाळ्याच्या सुट्यामध्ये युवराज वडिलांकडे गेला होता. ७ जून २०१९ रोजी तो घरी परतला. यावेळी देखील तो तणावात होता. त्याच्या आईने विचारले असता, त्याने मी पुन्हा वडिलांकडे जाणार नाही, असे सांगितले. आईने आस्थेने चौकशी केली असता त्याने वडील मला खूप त्रास देतात, मोठ्याने ओरडतात, तू आमच्या पती-पत्नीच्या भांडणाचे कारण आहे, असे सांगत घाण बोलतात, तुझ्याबद्दल वाईट बोलायला लावतात; तसे नाही केले, तर मारहाण करून त्याचे व्हिडियो शुटिंग बनवतात, असे सांगितले. या प्रकारामुळे धास्तावलेल्या महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यामध्ये माझे पती ब्रह्मानंद टाले यांनी मुलाला दिलेल्या वागणुकीमुळे त्याच्या मानसिक स्वास्थावर परिणाम झाला असल्याचा आरोप करीत पतीवर कारवाईची मागणी केली आहे. या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात पती ब्रह्मानंद टाले यांच्या विरुद्ध बाल सरंक्षण कायदा आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार एस. बी. चव्हाण तपास करीत आहेत.

\B'मुझे मर जाना चाहिये'\B

आईशी बोलताना अकरा वर्षाचा युवराज हा, 'मुझे मर जाना चाहिये, मै तुम्हारा गुन्हेगार हुं, कोर्ट मे कुछ हुआ तो वो मैने किया,' असे म्हणत सारखा रडायचा. या महिलेच्या नातेवाईकानी या मुलाचे व्हिडियो व्हॉटसअपवर पाठवले असता यामध्ये देखील हा मुलगा वडिलांनी मारहाण केल्यामुळे रडत रडत बोलत असून तणावात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा संघाकडून दूध उत्पादकांना दोन कोटींचा बोनस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, संघाचे अध्यक्ष तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभासद दूध उत्पादकांना सुमारे दोन कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला. याप्रसंगी दूध संकलन, विक्री यासह विविध मुद्यावरून बागडे व काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या नेत्यांनी खास शैलीत भाषण करत एकमेकांना कोपरखळी मारण्याची संधी सोडली नाही.

जिल्हा दूध संघाची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी बागडे यांच्या अध्यक्षतेखाली पाटीदार भवन येथे घेण्यात आली. माजी आमदार डॉ. कल्याण काळे, संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. बी. पाटील यांच्यासह संघाचे संचालक उपस्थित होते. प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, अंदाजपत्रकार मंजुरी आदी विषयपत्रिकेनुसार कामकाज झाले. याप्रसंगी एका सभासदाने काही संचालकांनी संघाचे वाहन विनापरवानगी वापरल्याचा आरोप केला. त्यावर अध्यक्ष बागडे यांनी नाव घेऊन पुराव्यासह सांगा, असे म्हणत कोणी आजारी असेल वा कामानिमित्त वाहन एक-दोन दिवस नेले असेल, तर तो अधिकार संचालक मंडळाला असल्याचे सांगितले. दुष्काळी परिस्थिती असून दूध व्यवसाय करणे तोट्याचे झाले आहे, असे म्हणत सदस्यांनी यंदा भाव फरक (बोनस) जादा द्यावा, अशी मागणी केली. त्यावर बोलताना संघाचे अध्यक्ष बागडे यांनी दूध उत्पादकांना जादा लाभ व्हावा, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत. प्रशासकीय खर्चात काटकसर केली जात असून एकूण उत्पादनांच्या ८० टक्के हिस्सा दूध उत्पादकांना दिला जातो, असे सांगत यंदा प्रती लिटर ५० पैसे बोनस जाहीर केला. त्यानुसार दूध उत्पादकांना सुमारे दोन कोटी रुपये मिळणार आहेत. वैजापूर येथील शीतकरण केंद्राचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. तेथे नवीन यंत्रणा उभारण्यात आली असून गांधेली दुग्ध प्रकल्प विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जादा प्रमाणात दूध संकलन करणाऱ्या संस्थांना तसेच विक्री करणाऱ्या केंद्र चालकांता याप्रसंगी गौरव करण्यात आला.

\Bकट्टर प्रतिस्पर्ध्यांची एकमेकांना टोलेबाजी \B

दूध संकलन, दूध वाढ यासह विविध मुद्यावरून विधानसभा तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. डॉ. काळे यांनी दूध विक्री कमी झाल्याच्या मुद्दा खास शैलीत मांडत संचालक व अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्यावर बागडे यांनी अनेक ब्रँड बाजारात आले आहेत, स्पर्धा वाढली, कमिशन वाढून दिले जाते, यासह अन्य कारणांमुळ‌े विक्री कमी झाल्याचे नमूद करतानाच काळे यांना तुम्ही खासगी दूध डेअरी काढली आहे, पॅकिग दूध किती विकतात हे पाहू, असा टोला लगावला. त्यावर राग आला, असेल तर शब्द मागे घेतो, असे म्हणत काळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. संघ हा नेहमीच दर्जेदार, निर्भेळ दूध ग्राहकांना देतो. परंतु, अनेक ठिकाणी भेसळयुक्त दूध विक्रीच्या घटना समोर येतात. परिणामी, दूध पिण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे, पहेलवानही कमी झाले, असे बागडे यांनी नमूद केले. त्यांचे भाषण सुरू असतानाच डॉ. काळे यांनी आपल्या आखाड्यातील (राजकीय क्षेत्रातील) पहेलवान वाढले, असा टोला मारला.

वर्ष - दूध संकलन प्रतिदिन (सरासरी लिटर) -- निव्वळ नफा (लाखात)

२०१४-१५ : ७३,१४८ -- ९२.०८

२०१५-१६ : ९०,९२६ -- ८९.४३

२०१६-१७ : ८३,०१७ -- ९०.१९

२०१७-१८: ८९,९४१ -- ९३.७८

२०१८-१९: १,०५,०३० -- ७४.८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोचे लीज होल्ड वाढविण्याबाबत निर्णय गुलदस्त्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको भागातील मालमत्ता धारकांच्या मालमत्ता लीज होल्डवरून फ्री होल्ड करण्याची घोषणा सत्ताधाऱ्यांनी केली होती. मात्र, सिडकोच्या नियमातच फ्री होल्ड नसल्याने, लीज होल्डची मुदत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. हा निर्णय लवकरच होणार असल्याचे संकेत सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकुर यांनी दिले होते. मात्र, त्यानुसार अद्याप लीज वाढविण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

औरंगाबादसह बदलापूर, नवी मुंबई, नांदेड, नाशिक, लातूर या भागातील सिडको विभागाकडून विकसित करण्यात आलेल्या विविध वसाहतींचे मालकी हक्क सिडको वासियांना हस्तांतरीत करण्याची मागणी केली जात आहे. औरंगाबाद येथील सिडको वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सिडको मालमत्ता लीज होल्डवरून फ्री होल्ड करण्याबाबत लढा सुरू आहे. सिडको लिज होल्डचे फ्री होल्ड करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी यापूर्वी सिडको विभागाकडून प्रस्ताव राज्य शासनाने मागवून घेतला होता. या प्रस्तावात लीज होल्डचे फ्री होल्ड करण्यासाठी ग्राहकांसोबत झालेल्या करारानंतर उर्वरित कालावधीसाठी फ्री होल्ड चार्जेस प्रिमीयम स्वरुपात जमा करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता. याबाबत सत्ताधाऱ्यांकडून लीज होल्डचे फ्री होल्ड झाल्याची घोषणाही करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने सिडको कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके, तसेच पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केले होते.

दरम्यान, सिडकोच्या लीज होल्ड फ्री करण्याबाबत सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, सिडको मालमत्तांचे लीज होल्ड फ्री होल्ड करण्याबाबतचे नियम नाही. एनडीपीएलडी म्हणजेच न्यू टाऊन लॅण्ड डिस्पोसल या अॅक्टमध्ये फ्री होल्ड करण्याची तरतूद नाही. यामुळे सिडकोच्या मालमत्ता लीज होल्डच्या फ्री होल्ड न करता, सिडकोच्या मालमत्ता धारकांच्या लीज होल्ड वाढविण्यात येणार आहे. याबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सिडकोचे अधिकारी सर्वसामान्य जनतेला लीज होल्ड वाढीव कसे केले जाणार आहे, याची माहिती देणार आहेत, असेही ठाकूर यांनी सांगितले.

सिडकोवासीयांच्या अडचणी कायमच …

सिडकोमध्ये राहणाऱ्या अनेकांनी सिडको अध्यक्षांसह राज्यमंत्री अतुल सावे यांच्यासमोर त्यांच्या मागण्या आणि अडचणी मांडल्या होत्या. या मागण्याही अद्याप पूर्ण झाल्या नसल्याची माहिती सिडको विभागाच्या सूत्रांनी दिली.

सिडको वासीयांच्या मागण्या…

- सिडको एक एफएसआय देत आहे. महापालिकेच्या नियमाप्रमाणे १.१० एफएसआय देण्याबाबत कार्यवाही व्हावी.

- सिडको आधी सहा हजार ८०० रुपये शुल्क आकारत होते. त्यानंतर हे शुल्क दहा हजार रुपये करण्यात आले आहे. आता हे शुल्क ५० हजार रुपये करण्यात आले आहे. हे दर कमी करावे.

- ऑडशीपच्या जागा देण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा.

- मंदिर आणि धार्मिक संस्था असलेल्या जागांचे दर कमी करण्यात यावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनसामान्यांची कामे प्राधान्याने करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपण लोकसेवक असल्याची जाणीव दृढ करून जनसामान्यांची कामे प्राधान्याने करावीत,' असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त (१ ऑगस्ट) उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी अपर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपायुक्त वर्षा ठाकूर, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांची उपस्थिती होती. यावेळी केंद्रेकर म्हणाले की, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाची जबाबदारी, कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या ज्ञानाचा वापर करण्याची वृत्ती ठेवली तरच निश्चित सर्व सामान्यांची कामे तत्परतेने मार्गी लावणे शक्य आहे. सामान्यांसाठी आपण आहोत, जनतेला सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या शासन यंत्रणेतील आपण एक महत्त्वाचा घटक आहोत, हे लक्षात घ्यावे. सर्वांनी आपल्या पदाचा, आपल्या अधिकारांचा सुयोग्य वापर जनसेवेसाठी करावा, असे आवाहन केंद्रेकर यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यंत्रणेतील शिपाई, कोतवालपासून ते उपजिल्हाधिकारी पर्यंत सर्व घटकांची सक्रियता, उत्साही कृतीशिलता प्रशासन गतीमान ठेवत असते हे लक्षात घेऊन प्रत्येकाने समूह भावनेतून स्वयंप्रेरणेने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

\B७१ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव\B

२०१८-१९ या वर्षात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना गौरवण्यात आले. यामध्ये उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, मृणालिणी सावंत-निंबाळकर, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, तहसीलदार महेश सावंत, ऐश्वर्या काळुसे, नायब तहसीलदार शिवानंद बिडवे, श्रीराम बेंडे आणि मंडळ अधिकारी विलास जोशी, अनिल सूर्यवंशी, शिवाजी सोनवणे, शशिकांत ठेंगे, मनोहर पाटील यांच्यासह विविध संवर्गातील ७१ अधिकारी कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शासकीय दंत’च्या ग्रंथालयाचे उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील नूतनीकरण केलेल्या ग्रंथालयाचे तसेच महिला व्यायामशाळेचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते गुरुवारी (१ ऑगस्ट) झाले. त्याचवेळी, दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घाटीच्या मध्यवर्ती ग्रंथालयाची पाहणीदेखील डॉ. लहाने यांनी केली. मात्र घाटीचे ग्रंथालय नेमके कधी सुरू होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.

शासकीय दंत महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या उद्घाटनप्रसंगी अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे ओएसडी डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. माया इंदूरकर, डॉ. राजन महिंद्रा, डॉ. जगदीश वठार, डॉ. सी. डी. ढालकरी, डॉ. शिरीष खेडगीकर, डॉ. स्मिता खळीकर, प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत बनसोडे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी मौखिक आरोग्यदिनानिमित्त डॉ. लहाने यांच्या हस्ते केक कापण्यात आले. तसेच महिला व्यायामशाळेचेही उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर डॉ. लहाने यांनी घाटीत उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती ग्रंथालयालाही भेट देऊन आढावा घेतला. या वेळी डॉ. येळीकर, डॉ. भारत सोनवणे, डॉ. विकास राठोड आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. लहाने यांनी ग्रंथालयाविषयी समाधान व्यक्त केले. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचीही त्यांनी पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात खरिपची ८८ टक्के क्षेत्रावर पेरणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाच्या हजेरीमुळे पेरण्यांना वेग आला असून मराठवाड्यात आतापर्यंत ८८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात औरंगाबाद विभागात ९४, तर लातूर विभागात ८१ टक्के पेरण्या झाल्या. पीक उगवण आणि वाढीच्या स्थितीत असतानाच पावसाचे आगमन झाल्याने त्यांचा मोठा फायदा पिकांना होईल, अशी माहिती कृषी खात्याने दिली.

औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्याचा समावेश आहे. या तिन्ही जिल्ह्याचे एकूण खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र २१ लाख १५ हजार हेक्टर आहे. यात प्रामुख्याने कापसाचे पेरा क्षेत्र १० लाख २६ हेक्टरवर (९६ टक्के) तर त्यापाठोपाठ सोयाबीनची पेरणी ३ लाख ७४ हजार ९१० हेक्टरवर (१६० टक्के) आणि मक्याचे पेरा सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेते १११ टक्के झाला आहे. औरंगाबाद विभागात सर्वसाधारण क्षेत्रापैकी आतापर्यंत ९४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

लातूर सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात लातूर, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या पाच जिल्ह्याचा समावेश आहे. लातूर विभागाचे खरीपचे सर्वसाधारण क्षेत्र २९ लाख हेक्टर असून आतापर्यंत ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे, अशी माहिती सहसंचालक टी. एन. जगताप यांनी दिली. यात सोयाबीनची पेरणी १३ लाख ७८ हजार २०५ हेक्टरवर झाली आहे. सोयाबीनच्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण १३७ टक्के आहे. कापूस आणि मक्याची पेरणी अनुक्रमे ६७ आणि ४७ टक्के झाली आहे.

\Bपिकांना लाभदायक

\Bपिके हे उगवण आणि वाढीच्या स्थितीत असून पडलेला पाऊस या स्थितीत खूप लाभदायक असल्याचे कृषी विभागाने सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टरवर मका पिकावरील लष्करी अळी आढळून आली आहे. पंरतु, एकात्मिक कीड व्यवस्थापनामुळे अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजोपयोगी संशोधनावर भर द्यावा : डॉ. थोरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संशोधक, प्राध्यापकांनी माझे संशोधन अधिकाधिक समाजोपयोगी ठरावे याकडे पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य शिवाजीराव थोरे यांनी मंगळवारी केले. सरस्वती भुवन कॉलेजमध्ये 'हवामान बदलाचे जैव वैविध्य, पर्यावरण, जीवन विज्ञानावर होणारे परिणाम' परिषदेच्या समारोपात ते बोलत होते.

कॉलेजच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषद समारोप सोहळ्याला व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. उल्हास शिऊरकर यांच्यासह डॉ. तन्मय रुद्रा, डॉ. ए. के. वर्मा, प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. थोरे म्हणाले, 'संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापकांनी संशोधन समाजासाठी उपयुक्त कसे असेल यावर भर द्यावा. निसर्गाला हानी न पोचवता करण्याचा अधिकाधिक प्रयत्न संशोधकांनी करावा, पृथ्वी, पर्यावरण निसर्गाला संवर्धित करणारे असे संशोधन असायला हवे. डॉ. शिऊरकर यावेळी म्हणाले, संशोधकांनी माझा अभ्यासक्रम, माझा कार्यभार, बायोडाटा, एपीआय स्कोर याच्यापलिकडे जाऊन संशोधनाकडे पाहिले पाहिजे.'

डॉ. रिद्रा यांचेही यावेळी भाषण झाले. यासह सहभागी प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. परिषदेत दोनशे संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिवसभरात विविधा सत्रात पर्यावरण, पाणी अशा विविध विषयावर संशोधक विद्यार्थ्यांनी आपले शोधनिंबध सादर केले. यावेळी डॉ. क्षमा खोब्रागडे, डॉ. अंजली नाईक, डॉ. अनिल शंकरवार यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. हेमंत मेहता यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरला दीड वर्ष साधा कारावास

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी वारंवार संधी देऊनही पूर्तता न करणाऱ्याला मंचाच्या अध्यक्षा स्मिता बी. कुलकर्णी आणि सदस्य संध्या बारलिंगे यांनी एक वर्ष सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपीने कारावासाच्या मुदतीच्या आत आदेशाची पूर्तता केल्यास त्याची मुक्तता करावी, असे मंचाने आदेशात म्हटले आहे.

तक्रारदार डॉ. विजयकुमार फुला पाटील आणि डॉ. सुवर्णा विजयकुमार पाटील यांनी मंचात मूळ तक्रार ३ मे २०१६ रोजी दाखल केली होती. मंचाने ७ डिसेंबर २०१६ रोजी आदेश पारित करून गैरअर्जदार बाळासाहेब नामदेवराव पाटील यांनी ३० दिवसांत तक्रारदारांना फ्लॅटचे ताबा पत्र (अॅकुपन्सी सर्टिफिकेट) आणि नोंदणीकृत खरेदी खत करून द्यावे. तसेच ६० दिवसांत लिफ्टचे अर्धवट बांधकाम पूर्ण करून लिफ्ट वापरण्यायोग्य करावी. पार्किंगमध्ये पेव्हर ब्लॉक लावावेत आणि साइड मार्जिनमध्ये काँक्रिट भरावे. उच्च प्रतिचे बांधकाम साहित्य वापरून टेरेसचे दोषविरहीत वॉटर प्रुफिंग करावे. त्याकरिता तक्रारदाराकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम वसूल करू नये. ही कामे ६० दिवसांत पूर्ण करून योग्य प्रशासनाकडून पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवून तक्रारदारास द्यावे, असे आदेशात म्हटले होते.

\Bकोर्ट कमिश्नरचा अहवाल \B

आरोपीने दिलेल्या मुदतीत आदेशाची पूर्तता केली नाही. म्हणून अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २७ नुसार फौजदारी कारवाई दाखल केली होती. दरम्यान आरोपीने काही बाबींची पूर्तता केली. लिफ्टचे काम अपूर्ण असल्याचा अहवाल मंचाने नेमलेल्या कोर्ट कमिश्नर यांनी दिला. आरोपीला विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक खुलासा केला नाही. अनेकदा संधी देऊनही आरोपी मंचाच्या आदेशाचे हेतूपुरस्सर, जाणीवपूर्वक पालन करीत नसल्याचे मंचाचे मत झाले. राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोगाने अशाच प्रकरणांमध्ये दिलेल्या निवाड्यावरुन मंचाने शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संग्रामनगरचा भुयारी मार्ग दोन महिने लांबणीवर

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

संग्रामनगर रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ रेल्वे भुयारी मार्ग तयार करण्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. या रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, या मागणीसाठी मेट्रो औरंगाबाद असोसीएशनच्या पदाधिकाऱ्यांना थेट नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालय गाठावे लागले. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीत हे काम पावसाळा संपल्यानंतर होईल, अशी माहिती देण्यात आली. यामुळे आगामी दोन महिन्यानंतरच या भुयारी रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहानूर मियॉ दर्गाह येथील उड्डाणपूल तयार झाल्यानंतर संग्रामनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ५४ हे रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले. या आंदोलनानंतर तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने भुयारी मार्गासाठी पैसे देण्याचे जाहीर केले. भुयारी मार्गासाठी निधीचे पत्र देण्यापूर्वीच रेल्वे विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती.

१२ ऑगस्ट २०१८ ला तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या भुयारी मार्गाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनामध्ये भुयारी मार्गाचे काम फेब्रुवारी २०१९ मध्ये पूर्ण होईल, असे संकेत देण्यात आले होते. मात्र, हे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे.

या रखडलेल्या कामाबाबत मेट्रो औरंगाबाद असोसीएशनचे अध्यक्ष श्रीमंत गोर्डे पाटील, सचिव प्रेम खडकीकर, सतीश लिंभारे, गोविंद पटेल, शिवानंद वाडकर यांनी नांदेड येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. भुयारी मार्ग नसल्याने नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना या भेटीत माहिती देण्यात आली. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी हे काम पावसाळ्यामुळे होऊ शकत नसल्याचे सांगत या कामाला दोन महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे स्पष्ट केले. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा रेल्वे विभागाचा प्रयत्न राहील, असेही रेल्वे विभागाने स्पष्ट केले.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रु जेटचे विमान तीन दिवस रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हैदराबादहून येणारे ट्रु जेट कंपनीचे विमान गुरुवारी (१ ऑगस्ट) रद्द करण्यात आले. ऐनवेळी हे विमान रद्द झाल्याने विमान प्रवाशांना हैदराबाद गाठण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करावा लागला. हे विमान दोन, तीन व पाच ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्याचे ट्रु जेट विमान कंपनीने कळविले आहे.

हैदराबादहून गुरुवारी ४५ प्रवासी येणार होते. मात्र ऐनवेळी विमान तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यामुळे ४५ विमान प्रवाशांची गैरसोय झाली. औरंगाबादहून हैदराबादला ४३ प्रवासी जाणार होते. हैदराबादहून येणारे विमान रद्द झाल्याने या प्रवाशांची गैरसोय झाली. त्यांना हैदराबाद गाठण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करावा लागला. गुरुवारसह शुक्रवार, शनिवार तसेच सोमवारीही विमान रद्द असून चार ऑगस्ट रोजी विमान येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी सहा टक्क्यांपर्यंत

$
0
0

औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा गुरुवारी रात्री सहा टक्क्यांपर्यंत पोचला. रात्री धरणात ४१ हजार ८५१ क्युसेस पाणी येत होते. दरम्यान, धरणातील पाणीपातळी वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने आपत्कालीन पंपहाउस काढून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सहापैकी चार फ्लोटिंग पंप गुरुवारी कालव्यातून बाहेर काढण्यात आले.

नाशिक परिसरात झालेल्या जोराच्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. जायकवाडी प्रकल्प बुधवारी दुपारी मृतसाठ्यातून बाहेर आला. प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठी गुरुवारी रात्री दहा वाजता १२९.२८९ दशलक्ष घनमीटरपर्यंत (५.९५ टक्के) पोचला. प्रकल्पात ४१ हजार ८५१ क्युसेस पाणी येणे सुरू होते. नांदूर मधमेश्वर येथून गोदावरी पात्रात रात्री २३ हजार ९५९ क्युसेस पाणी सोडण्यात येत होते. धरणातील पाणीपातळी घटल्यानंतर महापालिकेने सहा फ्लोटिंग पपांच्या माध्यमातून उपसा सुरू केला होता. पाणीसाठ्यात वाढ झाल्यानंतर दोन पंप काढण्यात आले. पाणीपातळीत आणखी वाढ झाल्यानंतर उर्वरित पंप काढण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात खरिपाची ८८ टक्के क्षेत्रावर पेरणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाच्या हजेरीमुळे पेरण्यांना वेग आला असून मराठवाड्यात आतापर्यंत ८८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात औरंगाबाद विभागात ९४, तर लातूर विभागात ८१ टक्के पेरण्या झाल्या. पीक उगवण आणि वाढीच्या स्थितीत असतानाच पावसाचे आगमन झाल्याने त्यांचा मोठा फायदा पिकांना होईल, अशी माहिती कृषी खात्याने दिली.

औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्याचा समावेश आहे. या तिन्ही जिल्ह्याचे एकूण खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र २१ लाख १५ हजार हेक्टर आहे. यात प्रामुख्याने कापसाचे पेरा क्षेत्र १० लाख २६ हेक्टरवर (९६ टक्के) तर त्यापाठोपाठ सोयाबीनची पेरणी ३ लाख ७४ हजार ९१० हेक्टरवर (१६० टक्के) आणि मक्याचे पेरा सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेते १११ टक्के झाला आहे. औरंगाबाद विभागात सर्वसाधारण क्षेत्रापैकी आतापर्यंत ९४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

लातूर सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात लातूर, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या पाच जिल्ह्याचा समावेश आहे. लातूर विभागाचे खरीपचे सर्वसाधारण क्षेत्र २९ लाख हेक्टर असून आतापर्यंत ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे, अशी माहिती सहसंचालक टी. एन. जगताप यांनी दिली. यात सोयाबीनची पेरणी १३ लाख ७८ हजार २०५ हेक्टरवर झाली आहे. सोयाबीनच्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण १३७ टक्के आहे. कापूस आणि मक्याची पेरणी अनुक्रमे ६७ आणि ४७ टक्के झाली आहे.

\Bपिकांना लाभदायक

\Bपिके हे उगवण आणि वाढीच्या स्थितीत असून पडलेला पाऊस या स्थितीत खूप लाभदायक असल्याचे कृषी विभागाने सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टरवर मका पिकावरील लष्करी अळी आढळून आली आहे. पंरतु, एकात्मिक कीड व्यवस्थापनामुळे अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदी पात्रात सापडले शाळकरी मुलांचे मृतदेह

$
0
0

औरंगाबाद:

वडोद बाजार परिसरात गिरजा नदी पात्रात दोन शाळकरी मुलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे दोघेही विद्यार्थी दप्तर शाळेत ठेवून नदी व ओढ्याच्या संगमाजवळ शौचास गेले असताना ही घटना घडली.

श्री सरस्वती भुवन शाळेत हे दोन्ही विद्यार्थी सातवीच्या वर्गात शिकत असून दुपारी नदी व ओढ्याच्या संगमा जवळ शौचास गेले होते. या ओढ्याच्या खोलीकरणाचे काम सुरू असल्याने पाणी किती खोल आहे याचा दोघांना अंदाज आला नसल्याने ही दुर्घटना घडली. यापैकी एकाचा पाय घसरून तो संगमात पडला, आपल्या मित्राला वाचवण्यासाठी दुसऱ्याने उडी टाकली परंतु, त्याचा प्रयत्न असफल ठरला. घटनास्थळी एक चप्पल सापडल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांना मध्यरात्री एक मृतदेह तर पहाटे दुसरा मृतदेह सापडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images