Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पैठण-शेगाव बस अखेर पुन्हा सुरू म. टा. प्रतिनिधी, पैठण एसटी महामंडळाच्या पैठण डेपोतून लांब पल्

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

एसटी महामंडळाच्या पैठण डेपोतून लांब पल्ल्याच्या व धार्मिक क्षेत्रांना जोडणाऱ्या अनेक बस बंद करण्यात आल्या आहेत. या बस सुरू कराव्यात, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेऊन महामंडळाने शुक्रवारी पैठण-शेगाव बससेवा सुरू केली आहे.

मागील काही महिन्यांपासून पैठण-पुणे, पैठण-मुंबई, पैठण-सुरत, पैठण-सोलापूर यांच्यासह धार्मिक क्षेत्रांना जोडणारी पैठण-पंढरपूर, पैठण-तुळजापूर या लांब पल्ल्याच्या बस बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे शहर व तालुक्यातील भाविक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व बस पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन भाजयुमोतर्फे जिल्हा सरचिटणीस प्रशांत आव्हाड यांनी महामंडळाला दिले होते. भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी याकरिता पाठपुरावठा केल्यानंतर एसटी महामंडळाने १५ दिवसांपूर्वी पैठण-तुळजापूर बस सुरू केली. आता शुक्रवारपासून पैठण-शेगाव ही बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. याप्रसंगी आगार व्यवस्थापक सुभाष तरवडे, गजानन मडके, नजन, सुरेश दुबाले, संतोष धापटे, सचिन ज्योतिक, संजीव कोरडे, चालक संजय रिंढे, वाहक सत्यप्रेम नरवडे, परागे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाल्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी फुलंब्री :

वडोद बाजार (ता. फुलंब्री) येथील शाळेतून शौचास गेलेल्या दोन मुलांचा मेळाच्या नाल्यात पाय घसरून पडल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (एक ऑगस्ट) मध्यरात्री उघडकीस आली.

सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये सातवीच्या वर्गात शिक्षण घेणारे तमजील शेख मोबीन (वय १४ वर्षे ) व मिनाज शेख अनीस (१३, दोघे रा. वडोद बाजार) हे दोघे मित्र दुपारी तीनपासून वर्गात दप्तर ठेवून शौचासाठी गेले होते. शाळा सुटल्यानंतर तमजील याचा लहान भाऊ दोघांचे दप्तर घेऊन घरी आला. तमजील शेख मोबीन, मिनाज शेख अनीस दोघे संध्याकाळी घरी आले नाहीत. त्यांच्या आई-वडिलांनी गावात आपल्या मुलांचा शोध सुरू केला. रात्री गावातील नगारिकांनी सर्वत्र शोधाशोध केली व नातेवाईकांना विचारणा केली. काही नागरिकांनी गावाजवळ असलेल्या गिरिजा नदीलगतच्या नाल्यात शोध घेतला असता तेथे एक चप्पल आढळली. ही चप्पल मिनाज याची असल्याचे त्याच्या पालकाने सांगितले. यावरून रात्री नागरिकांनी पाण्यात गळ टाकून शोध घेतला. या गळात मिनाजचा मृतदेह लागला. शुक्रवारी (दोन ऑगस्ट) पहाटे मिनाजचा मृतदेह आढळला त्या जवळच तमजील शेख याचा शोध घेतला असता त्याचाही मृतदेह येथेच अढळला. दोघांचे ही मृतदेह पंचनाम्यानंतर वडोद बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आले. माजी सरपंच शेख रज्जाक यांच्या माहितीवरून वडोद बाजार पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली.

\Bनाल्याचे यंदा खोलीकरण\B

गिरिजा नदी पात्राला जोडून असलेल्या मेळाच्या नाल्याचे यंदा खोलीकरण करण्यात आलेले होते. गिरिजा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे पाणी अडविलेले असल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले आहे. पाणी जास्त असल्याने शोधकार्यास वेळ लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औराळा शिऊर बंगला वाहतूक ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , कन्नड

शिऊर बंगला ते भराडी हा रस्ता धोकादायक बनला असून औराळा ते शिऊर बंगला रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पर्यायी रस्त्यांचे नीट नियोजन न केल्याने व ते तयार करताना मुरुमाऐवजी मातीचा वापर करण्यात आल्याने वाहने उलटत आहेत.

शिऊर बंगला ते भराडी या ११० किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम आठ महिन्यांपासून सुरू आहे. पाणपोई ते शिऊर बंगला, कन्नड ते भराडी (प्रमुख राज्य मार्ग क्रमांक १७८) या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ४५० कोटी रुपये मंजूर आहेत. सध्या संपूर्ण जुना रस्ता खोदून, वळण रस्ते व्यवस्थित करून, अरुंद पुले मोठी करून सिमेटचा नवीन रुंद रस्ता बांधण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम मंदगतिने सुरू आहे. पाणपोई ते शिऊर बंगला या ३८ किलोमीटर अंतरातील ११ पुलांचे कामे अपूर्ण आहे. पर्यायी वळण रस्त्याचे नियोजन व्यवस्थित नसल्याने थोडा पाऊस झाला तरी वाहने घसरून उलटत आहेत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी दबाईसाठी मुरुमाऐवजी मातीचा वापर करण्यात आल्याने पाऊस पडताच रस्ता चिखलमय होत आहे. काही ठिकाणी अद्याप काम सुरू केलेले नाही, पण रस्त्याशेजारी खोदून ठेवल्याने वाहन साइड देताना रस्त्याखाली घसरण्याची भीती आहे. हीच अवस्था हस्ता खांडी ते कोळसवाडी दरम्यान आहे. हा पूर्ण रस्ताच चिखलमय झाल्याने प्रवासासाठी डोकेदुःखी ठरत आहे. संबंधित कंत्राटदारांने हा प्रकार गांभीर्याने घेत नसल्याने या मार्गावरील रहिवाशांमध्ये रोष निर्माण झाला आहे. बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

\Bएसटी बसच्या फेऱ्या देवगाव रंगारी मार्गे \B

हा रस्ता खराब असल्याने कन्नड आगाराच्या नाशिक, वैजापूरला जाणाऱ्या बसच्या दहा फेऱ्या औराळा, गारज मार्गे, तर वैजापूरहून कन्नडला येणाऱ्या वैजापूर आगाराच्या सहा फेऱ्या, नांदगाव आगाराच्या चार फेऱ्या देवगाव (रंगारी) मार्गे वळविण्यात आल्या आहेत.

कन्नड आगाराच्या बस औराळापर्यंत चालवल्या जात आहेत. पुलाचे वळण रस्ते धोकेदायक झाल्याने यापुढील शिऊर बंगलासाठीची एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. औराळा, विटा, मनूर, गारज मार्गे वाहतूक करण्याचे नियोजन आहे.

-कमलेश भारती, कन्नड आगारप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपतीनगरला कचऱ्याचा विळखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

बीड बायपास, सातारा परिसरातील छत्रपतीनगर येथे जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. यामुळे वसाहतीतील रहिवाशांना डेंगीची लागण होण्याची भीती सतावत आहे. सातत्याने मागणी करूनही या परिसरात फवारणी करण्यात आलेली नाही.

छत्रपतीनगर या संपूर्ण वसाहतीला उघड्या नाल्या व नाल्याने वेढले आहे. रात्रीच काय दिवसाही डास चावतात. याखेरीज मोकाट डुकरे, कुत्रे, जनावरे यथेच्छपणे कॉलन्यांमधील गल्लीत साचलेल्या कचऱ्यावर मुक्कामी असतात. मोठ्या प्रमाणात कचराकुंडीत मांसाचे तुकडे फेकले जातात, छत्रपतीनगरातील नाल्यात १५ दिवसांपासून मेलेले डुक्कर तसेच पडून आहे. या वसाहतीतील कमानीसमोरच कचऱ्याचे ढिग साचले आहेत. पाठीमागील मंगल कार्यालयातील उरलेले अन्न रस्त्यावर फेकले जात असल्याने दुर्गंधीसह रोगराईचा धोका वाढला आहे. नगरसेविका सायली जमादार, महापौर नंदकुमार घोडेले व महापालिका वॉर्ड अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही औषध फवारणी झालेली नाही.

सातत्याने मागणी करूनही मनपा कर्मचाऱ्यांनी समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे छत्रपतीनगर वसाहतीत डेंगीचा फैलाव होत आहे. साथरोगांची लागण होण्याआधीच महापालिकेने योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

- चेतन यादव, नागरिक

छत्रपतीनगरसह आजुबाजूला असलेल्या वसाहतींमध्ये कमालीची अस्वच्छता आहे. यामुळे नागरिकांना ताप, डेंगीचा विळखा पडला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याने औषध फवारणी तत्काळ करण्याची गरज आहे.

-राजू जाधव, नागरिक

महापालिकेने संपूर्ण सातारा वसाहत वाळीत टाकल्यासारखीच अवस्था आहे. आम्ही पालिकेचा कर भरतो, नियमांचे पालन करतो, मात्र महापालिका साधी सफाई देखील करू शकत नसल्याने रोगराई पसरली आहे.

-यशराजन इंगळे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरचीच्या लिलावात लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

पिंपळगाव रेणुकाई व भोकरदन येथील बाजारपेठेत मिरचीला मिळणारा भाव आणि शिवना येथे मिळणाऱ्या भावात क्विंटलमागे सुमारे हजार रुपयांची तफावत येत असल्याने शेतकरी चक्रावले आहेत. मंगळवारी भोकरदन व पिंपळगाव रेणुकाई येथे लिलावात २८०० ते तीन हजार रुपये भाव मिळाला, तर त्याच दिवशी शिवना येथे व्यापाऱ्यांनी मिरची दोन हजार रुपये दराने खरेदी केली. कृत्रिम संकट निर्माणकरून व्यापाऱ्यांनी लूट चालविली असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

दिवसागणिक अत्याधुनिक होत गेलेल्या तालुक्यातील मिरची बाजारपेठेत आता व्यापारी हायटेक होऊन लूट करत आहेत, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. तालुक्यातील शिवना, गोळेगाव, आमठाणा, घाटनांद्रा, तर भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई व जाफ्राबाद येथे मिरची खरेदीचे लिलाव बाजार सुरू आहेत. मात्र, शिवना व गोळेगाव येथील बाजारपेठेत शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप आहे. मिरचीची आवक पाहून येथे आलेल्या इतर राज्यातील व्यापाऱ्यांना स्थानिक व्यापाऱ्यांनी 'लिंकिंग 'मध्ये अडकविले आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे डोके सुन्न झाले आहे.

\Bव्यापाऱ्यांची बाजू \B

भावातील तफावतीबद्दल विचारणा केली असता,'रस्ते खोदलेले आहेत, पाऊस सुरू असल्याने आंतरराज्य बाजारपेठेत निर्यात केलेला माल लवकर पोहोचत नाही,' असे येथील व्यापारी राजू काळे यांनी दिले. 'शिवना व गोळेगाव येथील लिलाव बाजारात शेतकऱ्यांची होणारी लूट थांबावी हा आमचा उद्देश आहे. मिरची खरेदीनंतर शेतकऱ्यांना अंधारात ठेवून दुसऱ्या दिवशी भाव खुले करायचे ही फसवणूक आहे. आमच्या लिलाव बाजारात शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव व पैसेही जागेवरच दिले जातात,' असे साई गणेश ट्रेडर्सचे व्यापारी चंदन गुप्ता यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मका उत्पादन घटण्याची भीती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांचे चाऱ्याअभावी मोठ्या प्रमाणात हाल झाले. शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर जनावरांसाठी चारा व नगदी पीक म्हणून तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली आहे. सध्या पीक तरारले आहे. पण, लष्करी अळी आटोक्यात येत नसल्याने मका उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. मका पिकाचा तुरा निघाला नाही, तर चारा म्हणूनही ते उपयोगात घेता येणार नसल्याने ते चिंताग्रस्त आहेत.

तालुक्यात यंदा २१ हजार ७८१ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने मका पिकाला तुरा निघतो की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. लष्करी अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी महाग औषध फवारणी करत आहेत. दोनदा फवारणी करूनही अळी मरत नसल्याने ते चिंताग्रस्त आहेत. कमी वेळेत येणारे व जनावरांच्या चारा मिळणारे पीक म्हणून मकाची लागवड केली जाते. हा दुहेरी फायदा, तर वाळलेली मका वाण हा तिसरा फायदा आहे. दुभत्या जनावरांच्या संगोपनासाठी मक्याचे पीकं घेतले जाते. पण सध्या ते धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

दुष्काळामुळे जनावरांचे चाऱ्याअभावी हाल होत असल्याने थोड्याशा पावसावर मका पिकाची पेरणी केली. पण मोड उगवून येताच त्याला अमेरीकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. हे पीक चाऱ्यासाठी तरी हाती येते की नाही, अशी शंका आहे. उत्पादन कमी झाले तरी चालते, पण चारा मिळावा. किटकनाशकाचाही परिणाम होत नसल्याने काय करावे, हे समजत नाही.

- कृष्णा लहाने, शेतकरी

मका, बाजरी, हरभरा, तुर व इतर कोणतेही पीक घेतले तरी बियाणे, खत, औषधाची फवारणी या सर्वांचा हिशोब आणि हाती आलेल्या उत्पादनाचा हिशोब घातला, तर तोटाच होते. यंदा तर मकाचा चाराही मिळेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे शेती कशी करावी, हे कोडे सुटत नाही.

-शिवाजी तांदळे, शेतकरी

सुरुवातीला मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव सर्वच क्षेत्रावर झाला होता. एकात्मिक कीड रोग नियंत्रण व किटकनाशकांची फवारणी केल्यामुळे नुकसानीची तीव्रता कमी जाणवत आहे. अळीचा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात राहिला असेल, तर निंबोळी अर्क, मेटारायझियम बुरशी व रासायनिक किटकनाशक या तिन्हीचा एकत्रिक वापर करावा. यामुळे अळी नियंत्रणात येऊ शकते.

-मेघा पतंगे, तालुका कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेसाठी एक अर्ज बाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात दाखल झालेल्या अर्जांची शुक्रवारी छानणी करण्यात आली. त्यात विशाल नांदरकर यांचा अर्ज योग्य कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी बाद ठरवण्यात आला. सध्या तरी निवडणुकीच्या रिंगणामध्ये सहा उमेदवार असून, पाच ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबुराव उर्फ भवानीदास कुलकर्णी, नंदकिशोर सहारे, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद शेख, तात्यासाहेब चिमने व शहानवाज अब्दुल रहेमान खान यांची उमेदवारी आहे. ५ ऑगस्ट ही माघार घेण्याची शेवटची तारीख असून त्यानंतर नेमके किती उमदेवारांची लढत होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी १९ ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी चार यादरम्यान मतदान होणार असून, मतमोजणी २२ ऑगस्ट रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांचे पॅचवर्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एक महिन्यानंतर गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून त्यापूर्वी शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क आणि सर्व विसर्जन विहिरींच्या साफसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी तातडीने अंदाजपत्रक तयार करावे, ६७ (३)(सी)च्या अधिकाराचा वापर करून निविदा काढाव्यात, असे पत्र आयुक्तांना दिले आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

या संदर्भात महापौर म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे तातडीच्या कामांना मंजुरी देता येणार नाही. सार्वजनिक गणेशोत्सव तोंडावर आला असून पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची मोठी तारांबळ उडत आहे. त्यामुळे रस्त्यांच्या पॅचवर्कची कामे हाती घेण्याचे प्राधान्याने ठरविण्यात आले आहे. ही कामे गणेशोत्सवापूर्वी होणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गणेश विसर्जनासाठी औरंगपूरा येथील मुख्य विसर्जन विहिरीसह शहरातील २० विहिरींतील गाळ काढून डागडुजी करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद मैदानावरील मुख्य विसर्जन विहिरीतील गाळ काढण्याच्या कामासाठी अंदाजे साडेसात लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. इतर विहिरींसह ५० लाख रुपये खर्च लागणार आहे.

\Bवॉर्ड अभियंत्यांना दोन लाखांची अनामत \B

गणेशोत्सवापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांसह वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांच्या पॅचवर्क, डागडुजी, ड्रेनेज, पाणी पुरवठा दुरुस्तीची कामे करण्यासाठी वॉर्ड अभियंत्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये अनामत द्यावी, असेही महापौर घोडेले यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मिशन रेबीज’ व्हॅन शहरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल २५ टन वजन, चाळीस फूट लांब, मायलेज अवघे दीड किलोमीटर आणि किंमत तब्बल आठ कोटी रुपये! शहरे रेबीजमुक्त करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली व्हॅन शुक्रवारी (दोन ऑगस्ट) महापालिकेत दाखल झाली. दिवसभर या अवाढव्य व्हॅनची चर्चा राहिली.

जागतिक आरोग्य संघटनेने मिशन रेबीजमुक्तची घोषणा केली असून त्यानुसार मर्सिडिज बेंझच्या सहकार्याने अमेरिकेत मिशन रेबीज व्हॅन तयार करण्यात आली आहे. ही व्हॅन भारतात वर्ल्ड वाइल्ड व्हेटर्नरीमार्फत २०१३ पासून विविध शहरात काम करत आहे. या व्हॅनमध्ये सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय, एल्किन डिजिटल एक्‍सरे युनीट, एम-सोनोसाइट, अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, ऑक्‍सिमेंट ३०२, इंटिग्रेटेड ऐनेस्थेटिक आणि दंत चिकित्सालय आहे. त्याच बरोबर लिफ्ट, सोफा, तीन टीव्ही, किचन अशा सुविधा देखील आहेत. गेल्या महिनाभरात या व्हॅनच्या माध्यमातून ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया व पशुसंवर्धन मंत्रालयातर्फे नागपूर शहरात मिशन रेबीज व्हॅनद्वारे महिनाभर पशुचिकित्सकांमध्ये शस्त्रक्रिया, कुत्र्यांची नसबंदी यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. ही 'मिशन रेबीज' व्हॅन पुणे येथे जात असताना औरंगाबाद शहरात शुक्रवारी काही वेळ थांबली. महापौरांसह इतरांनी व्हॅनची पाहणी केली. महापालिका मुख्यालयात दिवसभर या व्हॅनचीच चर्चा होती.

\Bशहराला महिन्याभरासाठी व्हॅन मिळणे शक्य

\Bव्हॅनबाबत माहिती देताना प्रवीण ओव्हळ म्हणाले की, रांची शहर रेबीज फ्री करण्यात आले आहे. त्याठिकाणी सुमारे ५० हजार कुत्र्यांवर लसीकरण करण्यात आले. महापालिकेने झारखंड येथील एका संस्थेला शहरातील कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे काम दिले आहे. ही संस्था वर्ल्ड वाइल्ड व्हेटर्नरीसोबत काम करते. त्यामुळे ही व्हॅन महिनाभरासाठी औरंगाबाद शहराला मिळू शकते. जेणेकरून अॅपव्दारे शहरातील मोकाट कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे, अशी कामे केली जाऊ शकतात. यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहाचा निधी खर्चासाठी मुदवाढ द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकारने शहर ओडीएफ फ्री (पाणंदमुक्त) करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतागृह योजना सुरू केली आहे. मागील चार वर्षांत या कामासाठी महापालिकेला सुमारे १४ कोटींचा निधी प्राप्त झाला; मात्र पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे अद्यापही साडेपाच कोटींचा निधी खर्च झालेला नाही. हा निधी सरकारकडे परत जाणार आहे, हा निधी खर्च करण्यासाठी महापालिकेने सरकारकडे एक महिन्याची मुदतवाढ मागितली आहे.

महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या आभावामुळे केंद्राच्या वैयक्तिक स्वच्छतागृह योजनेकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील आठ हजार ७७६ पात्र लाभार्थींपैकी साडेसहा हजार स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाले की नाही, याची खात्री करून त्यांना अनुदानाचा दुसरा हप्ता देण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेला लाभार्थ्यांच्या घरांचा पत्ताच सापडत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याविषयी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सहायक आयुक्त विजया घाडगे यांच्याकडून आढावा घेतला. त्यानंतर महापौरांनी सांगितले की, आठ हजार ९७६ पैकी सहा हजार ७६० वैयक्तिक स्वच्छतागृहांचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, यातील दोन हजार २६६ बांधकामे पालिकेच्या यादीवर अपूर्ण आहेत. त्यामुळे सरकारच्या नोंदीत अद्याप दोन हजार ३८६ कामे अपूर्ण आहेत. मागील चार वर्षांत वैयक्तिक स्वच्छतागृहांसाठी १३ कोटी ९५ लाख रुपयांचे अनुदान सरकारकडून प्राप्त झाले. त्यापैकी आठ कोटी ४० लाख रुपये लाभार्थींच्या खात्यावर देण्यात आले, अद्याप पाच कोटी ५५ लाख रुपये खर्च होणे शिल्लक आहे. हा खर्च करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत सरकारकडून वाढवून मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यभरात पोचणार मिलिंद महाविद्यालयाचे कार्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिलिंद कला महाविद्यालयाने वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. महाविद्यालयाची थोर परंपरा, अभ्यासक्रम आणि सुविधांची माहिती देण्यासाठी 'पीईएस'च्या अमृत महोत्सवानिमित्त संपर्क अभियान राबवले जात आहे. त्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा 'मिलिंद'चे कार्य पोहचले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत १९४५ मध्ये स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त औरंगाबाद येथील मिलिंद कला महाविद्यालयाच्या वतीने राज्यभरात संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. नागसेनवन परिसरात १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयाची सुरुवात झाली. माफक शुल्क आकारून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महाविद्यालयात अविरत सुरू आहे. मिलिंद कला महाविद्यालयासह नागसेनवन परिसरातील शिक्षण संस्था, विविध अभ्यासक्रम, सोयीसुविधा आणि उज्ज्वल परंपरेची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे.

पहिल्या टप्प्यात करमाड, जाफराबाद, चिते पिंपळगाव, पाचोड, आडूळ, वडीगोद्री, अंकुशनगर, गेवराई, तलवाडा, माजलगाव आदी ठिकाणच्या शैक्षणिक संस्थांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रातील पिंपळनेर, साक्री, सटाणा, चाळीसगाव, दोंडाईचा, शहादा, मालेगाव, धुळे, नंदूरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या जाणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात विदर्भातील वाशीम, बुलडाणा, अकोला जिल्ह्यात भेट दिली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातही पोहचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकूल, डॉ. भन्ते एम. सत्यपाल, डॉ. फेरोज पठाण, डॉ. रामनाथ पवार, डॉ. जितेंद्र देसले, डॉ. गौतम शिरसाट, डॉ. मुरलीधर इंगोले सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहि:शाल मंडळाची उपक्रमातून जागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बहि:शाल शिक्षण मंडळातर्फे संविधान जागृती, मतदान जागृती अभियानासह ४३ महाविद्यालयात विविध १३ उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती संचालक डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिली. याबाबत नियोजन करण्यात आले आहे.

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली बीड, औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद जिल्हयातील ४३ महाविद्यालयांत बहि:शाल शिक्षण मंडळ वर्षभर उपक्रम राबवणार आहे. या कार्यक्रमात विषय तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. २०१९-२० या वर्षासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान जागृती अभियान, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण, माती परीक्षण, महिला सक्षमीकरण, भूजल व्यवस्थापन, पंचायतराज प्रशिक्षण, शेतकरी आत्महत्या विषयावर जाणीव जागृती, यशवंतराव चव्हाण यांची ग्रामीण विकासाची संकल्पना, व्यक्तिमत्व विकास शिबीर, कॉपीमुक्त परीक्षा मोहिम, ग्रामीण भागासाठी आरोग्य शिबीर, संविधान जनजागृती, पाणंदमुक्त गाव संकल्पना या उपक्रमांचा त्यात समावेश आहे. बहि:शाल शिक्षण मंडळाच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, महिला, शिक्षक आदी घटकांसाठी त्यांच्या जाणिवा विकसित करण्याच्या दृष्टीने प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येतात, असे डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी सांगितले.

\Bग्रामस्थांचा मोठा सहभाग\B

बहि:शाल शिक्षण मंडळाच्या सर्व कार्यक्रमांचे आयोजन ग्रामीण भागात करण्यात येते. दरवर्षी मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजना, सेवाभावी संस्था, आरोग्य केंद्राचा सक्रिय सहभाग असतो. ग्रामीण भागात सर्वाधिक प्रतिसाद मिळतो. कॉपीमुक्त परीक्षा अभियानामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व लक्षात आल्याचे पाहणीत आढळले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन वर्षांनंतरही पीएच.डी. रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच.डी. विभागाचा गलथान कारभार कायम आहे. 'स्त्री अभ्यास' विषयाच्या विद्यार्थ्यांची 'आरआरसी'द्वारे मुलाखत झाली नसल्यमुळे वर्षभरापासून विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या पीएच.डी. संशोधनाचा प्रश्न मार्गी लावल्याचा दावा करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाने आता विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट-४) परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संशोधनाचा मार्ग अजूनही खुला झालेला नाही. मानव्यविद्या शाखेअंतर्गत असलेल्या 'स्त्री अभ्यास' विषयाच्या विद्यार्थ्यांनी २०१६ मध्ये 'पेट-४' परीक्षा उत्तीर्ण केली. विद्यापीठाच्या नियमांचे पालन करुन संशोधन विषय निवडून गोषवारा शुल्कासह सादर केला. पात्र विद्यार्थ्यांची यादीनुसार संशोधन मान्यता समितीच्या (आरआरसी) बैठकीची तारीख तीन जुलै २०१८ निश्चित करण्यात आली होती. त्याबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली होती. दुसऱ्या परिपत्रकानुसार अरबी, पाली व बुद्धिझम, फुले व आंबेडकर विचारधारा, स्त्री अभ्यास, संस्कृती व विधि या विषयांची 'आरआरसी' प्रशासकीय कारणामुळे रद्द करण्यात आली. त्यानंतर ११ डिसेंबरच्या परिपत्रकात संस्कृती, पाली व बुद्धिझम, विधि, फुले-आंबेडकर विचारधारा या विषयांची 'आरआरसी' १५ व १७ डिसेंबरला घेण्यात आल्याचे नमूद केले होते. पण, 'स्त्री अभ्यास' विषयाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे मागील सात महिन्यांपासून सहा संशोधक विद्यार्थी 'आरआरसी'च्या प्रतिक्षेत आहेत. विद्यापीठ प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली असून 'आरआरसी' घेण्याची विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे. या निवेदनावर आरती जावळे, किरण बोरकर, अर्चना गायकवाड, ज्ञानदा पाठक, मंजुश्री लांडगे व अशोक बाविस्कर यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त आरक्षणाला समितीचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरक्षण व राजकारण सख्खे भाऊ झाले असून, मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण लागू केल्यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंत योग्य होती मात्र, आता राज्यातील आरक्षण ७४ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. या आरक्षणाला विरोध करण्यासाठी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' समितीचे अमित वैद्य यांनी दिली.

आरक्षणाची मर्यादा वाढल्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मराठा समाजाचे 'एसईबीसी' व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना स्वतंत्र आरक्षण लागू झाले आहे. या पार्श्वभूमीवर 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' समितीने आरक्षणाची मर्यादा कमी करण्याची मागणी केली आहे. याबाबत शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे अमित वैद्य यांनी माहिती दिली. माजी सैनिक, दिव्यांगाचे आरक्षण धरल्यास आरक्षणाची टक्केवारी ९० टक्के झाली आहे. हुशार मुलांचे हक्क नाकारले जात आहेत. त्यामुळे संविधानाप्रमाणे शिक्षण व नोकरीत आरक्षणाची मर्यादा ५० टक्के असावी, असे वैद्य म्हणाले.

या समितीने प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. आरक्षित प्रवर्गाप्रमाणे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल लोकांना शासकीय सर्व योजनांचा लाभ मिळावा, पदव्युत्तर शिक्षणातील आरक्षण पूर्ण बंद करा, सर्व प्रवर्गांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे, २० जानेवारी २०२० रोजी आरक्षणाची मर्यादा संपत आहे. तेव्हा सरकारने श्वेतपत्रिका जारी करून आरक्षणाची समीक्षा करावी, पिढ्यान्‌पिढ्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून आरक्षण बंद करावे व त्याच समाजातील इतर कुटुंबांना लाभ द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.

दरम्यान, सरकारला जागे करण्यासाठी रविवारी (चार ऑगस्ट) क्रांती चौकात सकाळी दहा ते १२ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला धीरेंद्र जैन, डॉ. महेश मोहरीर, श्यामराव अकोलकर, मधुकर वैद्य, अनिल मुळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करमाडमध्ये सोमवारपासून डाळींब, कांदा, फळमार्केट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करमाड येथील उपबाजार समिती आवारात डाळिंब, कांदा, टोमॅटोसह अन्य फळांचे मुख्य मार्केट येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

या मार्केटचे उद्घाटन शेतकऱ्यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेंडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी बाजार समितीचे संचालक गणेश पाटील दहीहंडे, शिवाजीराव वाघ, बाबासाहेब मुगदल, देविदास कीर्तीशाही, सचिव विजय शिरसाठ उपस्थित होते. पठाडे म्हणाले की, करमाड येथे आठ एकर जागेवर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगत उपबाजार आहे. त्यामुळे शेतमालाची वाहतूक जलद होण्यास भविष्यात मोठी मदत होणार आहे. डाळिंब, टोमॅटो, कांदा, मोसंबी आदी फळांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. येथे साडे दहा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या आडत मार्केटचे काम अंतिम टप्प्यात असून फळ मार्केटचे ५० गाळे तयार आहेत. लासलगाव, दिल्ली, नाशिकसह इतर ठिकाणच्या सहा मोठ्या व्यापाऱ्यांनी गाळे बुक केले आहेत. या भागातील शेतकरी नाशिक, लासलगाव, राहुरी येथे जात होते. टोमॅटोच्या एका कॅरेटमागे २० रुपये वाहतूक खर्च येतो. करमाड येथेच मार्केट सुरू होत असल्याने हा वाहतूक खर्च वाचले, असा दावा पठाडेंनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जेनेरिक औषधी विक्री केंद्र; आठवड्यानंतर सुनावणी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

जेनेरिक औषधी विक्री केंद्र वाटपाच्या निविदा प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी एका आठवड्यानंतर होणार आहे.

धुळे येथील नवजीवन युवक मंडळ सहकारी संस्था या जनऔषधी केंद्राच्या परवानाधारक संस्था, तर बीड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय संस्थेने खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान १५ ते ३० दिवस लागतील, असे राज्य शासनाचे विशेष वकील व्ही.जे. दीक्षित यांनी शुक्रवारी निवेदन केले. त्यांच्या विनंतीवरून न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने या याचिकेची सुनावणी एका आठवड्यानंतर ठेवली आहे. शासकीय रुग्णालयात जनऔषधी (जेनेरिक) विक्री केंद्र वाटपासाठी २ मार्चला काढण्यात आलेल्या निविदेतील अटींची पूर्तता करीत नसलेल्या १५ निविदाधारकांना पात्र ठरविले आहे. त्यात औरंगाबादच्या तीन संस्थांचा समावेश आहे. या संस्थांना राजकारण्यांनी प्रशस्तीपत्रे दिली आहेत. निविदेत भागीदारीची अट नसतानाही काही संस्थांनी परवानाधारकांसोबत भागीदारीचे करार केले आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.

याचिकाकर्त्याची बाजू ज्ञानेश्वर बागूल, गिरीष नाईक-थिगळे यांनी मांडली. त्यांना विष्णू मदन पाटील व डी. डे. देशमुख हे सहकार्य करत आहेत. केंद्र शासनातर्फे असिस्टन्ट सॉलिसीटर जनरल संजीव देशपांडे, प्रतिवाद्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. होन, शैलेश ब्रह्मे, विजय लटंगे, हणमंत पाटील, प्रज्ञा तळेकर हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हे शाखेकडून गुटख्याचा साठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुन्हे शाखेच्या पथकाने संजयनगर, बायजीपुरा भागात छापा टाकून ८४ हजारांचा गुटख्याचा साठा गुरुवारी रात्री साडेआठ वाजता जप्त केला. यावेळी एकाला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी दुचाकी आणि गुटख्याचा साठा सोडून पळून गेला.

बायजीपुरा, संजयनगर गल्ली क्रमांक ४ येथे दोन जण अॅक्टिव्हा मोपेडवर गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून सापळा रचून अन्न व औषध प्रशासन अधिकारी पी. एस. अजिंठेकर आणि शेख यांना सोबत घेण्यात आले. यावेळी दोन संशयित दोन दुचाकीवर गुटख्याच्या प्रत्येकी तीन तीन गोण्या घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांच्यापैकी एक पोलिसांच्या हाती लागला, तर दुसरा दुचाकी सोडून पसार झाला. पोलिसांनी पकडलेला संशयित आरोपी प्रभू शंकरलाल मकरिये (वय ४२, रा. संजयनगर), तसेच पळून गेलेला जितेश अशोक कुरलिये (वय ४२, रा. न्यू हनुमाननगर, गारखेडा) यांच्या विरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त मीना मकवाना, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अफरोज शेख, शेख नजीर, सतीश जाधव, सुधाकर मिसाळ, सुधाकर राठोड आणि शेख बाबर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपींना गटारी भोवली, १५ जणांवर गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दीप अमावस्येला गटारी साजरी करणाऱ्या मद्यपींना गटारी चांगलीच भोवली. गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी विविध भागात या मद्यपींवर कारवाई करीत गुन्हे दाखल केले. मुकुंदवाडी, सिडको, एमआयडीसी सिडको, उस्मानपुरा, जवाहरनगर आणि हर्सूल पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये ब्रिथ अॅनालायझरमार्फत तपासणी करण्यात आली.

श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी दीप अमावस्येला गटारी साजरी करण्याचे वेड फोफावले आहे. महिनाभर श्रावण पाळणार असल्याच्या वल्गना करीत यथेच्छ मद्यपान केले जाते. मुकुंदवाडी पोलिसांनी जयभवानीनगर चौकात विनोद मिलिंद बनसोडे आणि मुकेश महादेव बडे या दोघांवर कारवाई केली. सिडको पोलिसांनी चिश्तिया कॉलनी चौकात आनंद ज्ञानदेव चांदणे, अंकुश चिंतामण सोनवणे, उस्मानपुरा पोलिसांनी शहानूरमियाँ दर्गा चौकात मयूर सुभाष गणपुरे, अतुल दिलीप गायकवाड, रोहित विजय बेडकर, कल्पेश अशोक शिंदे, सिडको एमआयडीसी पोलिसांनी चिकलठाणा, जालना रोडवर साईनाथ रमेश गांगे, मनोज रामदास वैष्णव, संतोष सुखदेव कांबळे, इब्राहीम सत्तार शेख या मद्यपींवर कारवाई केली. सुतगिरणी चौकात जवाहरनगर पोलिसांनी चंद्रशेखर पांडुंरंग कुमावत, कार्तिक लक्ष्मण बारहाते, हर्सूल पोलिसांनी श्याम शिवाजी जोशी याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटक्याच्या दोन अड्ड्यांवर छापा; सहा जण ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कल्याण मटका जुगाराच्या दोन अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. दौलताबाद आणि बजाजनगर वडगाव भागात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहा आरोपींना ताब्यात घेऊन जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

मुंबई कल्याण मटका दौलताबाद रोडवर खेळविला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने हिंदुस्तान चहाच्या टपरीजवळ छापा मारून दोघांमना पकडले. शेख मुक्तार शेख जाकेर आणि शेख शरीफ शेख मोईनोद्दीन, अशी त्यांची नावे आहेत. या दोघांकडे चौकशी केली असता हा अड्डा दीपक हनुमंत घुसळे नावाची व्यक्ती चालवत असून पोलिसांना पाहून तो पळून गेल्याचे सांगितले. या दोघांना अटक करून साडेबारा हजारांचे जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी कारवाई वाळूज एमआयडीसी भागात करण्यात आली. येथे बालाजी रोहिदास ताईनात, रवी प्रकाश पांडे, संतोष बालाजी माळी आणि सुनील सुभाष होंडे या चार जणांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून रोख १६ हजार रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई उपनिरीक्षक विजय पवार, नंदकुमार भंडारे, संतोष सोनवणे, योगेश गुप्ता, नंदलाल चव्हाण, रितेश जाधव, लखन गायकवाड, दादासाहेब झारगड आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कामगार कायद्यांच्या सुधारणेच्या नावाखाली केंद्र सरकारतर्फे सध्या अस्तित्वात असलेल्या ४४ कामगार कायद्यांचे रुपांतर चार 'लेबर कोड'मध्ये करण्याचा घाट घातला आहे. त्याला कडाडून विरोध करत कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली.

देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटना व त्यांच्या महासंघानी केलेल्या विरोधास न जुमानता नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने वेतन विधायक, आरोग्य सुरक्षा विधेयकला मंजुरी दिली आहे. लवकरच संबंधित विधेयक लोकसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे आंदोलकांनी यावेळी नमूद केले. केंद्रीय संघटनांना डावलून व त्यांच्या संमतीशिवाय कामगार कायद्यात केंद्र सरकार एकतर्फी बदल करू पाहात आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. या प्रकारमुळे कामगार क्षेत्रात तीव्र असंतोष पसरल्याचे नमूद केले. घोषणाबाजी करत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

प्रस्तावित लेबर कोड स्थगित करून केंद्रीय संघटनांशी चर्चा करावी. मान्यता घेऊनच मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. समितीचे निमंत्रक उद्धव भवलकर, प्रकाश बनसोड, दत्तू भंडे, एम. ए. गफ्फार, देविदास किर्तीशाही यांच्यासह कामगार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bअशा आहेत मागण्या\B

- प्रस्तावित वेतन विधेयक, आरोग्य सुरक्षा विधेयक हे केंद्रीय कामगार संघटनांशी चर्चा करून व त्यांच्या संमंतीशिवाय पारीत करण्यात यावा.

- सरकारी व खासगी क्षेत्रातील कंत्राटीकरण व आउटसोर्सिंग बंद करा.

- नोकरीत कायम होण्याच्या अधिकारापासून वंचित होण्यासाठी निश्चित कालावधी रोजगार धोरण रद्द करा.

- देशातील सर्व असंघटित कामगारांसाठी कायदा करा, त्यांना उचित वेतन व सामाजिक सुरक्षा लाभ द्या.

- सर्व योजना कर्मचाऱ्यांना नियमित करा. त्यांना नियमित कर्मचाऱ्यांइतका पगार व सवलती लागू करा.

- बंद केलेली जुनी पेन्शन योजना सुरू करा.

- ईपीएस-९५ पेन्शनधारकांना कोशियारी समितीच्या शिफारसीप्रमाणे किमान तीन हजार रुपये पेन्शन द्या व महागाई भत्ता लागू करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>