Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

केळकर अहवाल का नाकारला ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष मांडणारा केळकर समितीचा अहवाल आघाडी आणि युती सरकारने नाकारला. हा अहवाल स्वीकारला असता, तर मराठवाड्याला सव्वादोन लाख कोटी रुपये मिळाले असते. परिपूर्ण विकासासाठी मराठवाड्याला निधीची गरज होती, असे परखड मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी मांडले.

अनंत भालेराव काळ आणि कर्तृत्व या माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अभय बंग यांनी केले. या जाहीर कार्यक्रमात बंग यांनी विजय केळकर समितीच्या अहवालावरील राजकारणावर थेट भाष्य केले. मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालात मांडण्यात आला होता. या समितीचे सदस्य बंग होते. समितीने अहवालात नमूद केलेल्या परिशिष्टात एकूण महाराष्ट्रासाठी नऊ लाख कोटी रुपयांची तरतूद सुचवली होती. त्यानुसार मराठवाड्याला सव्वादोन लाख कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अहवाल नाकारला. तर युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अहवाल नाकारला. त्यामुळे दोन्ही विभागांचे नुकसान झाले, अशी खंत बंग यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी हा अहवाल वाचलाच नसावा असेही बंग म्हणाले. आघाडीच्या काळात अहवाल नाकारला गेला तेव्हा आताचे मुख्यमंत्री फडणवीस हे आमदार होते. मात्र युती सरकारच्या काळात त्यांनीही अहवाल नाकारला, अशी खंत बंग यांनी व्यक्त केली.

\Bसातत्याने पाठपुरावा \B

केळकर समितीची स्थापना २०१२ मध्ये झाली होती, तर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात २०१४ मध्ये अहवाल पटलावर मांडण्यात आला. अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्याबाबत अनेकदा चर्चाही झाल्या, मराठवाडा व विदर्भातून त्याबद्दल सरकारला वारंवार प्रश्न विचारण्यात आले आहेत. समितीच्या सदस्यांनीही तीन महिन्यांपूर्वीच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रयत्नातून मराठवाड्यातील विविध संस्थांतर्फे एक कोटी रुपयांना मदत निधी पुरग्रस्तांसाठी उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री मदत निधीमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली. मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द करण्यात आला.

सांगली, कोल्हापूर, गडचिरोलीसह राज्यातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे मोठी हानी झाली आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून, त्यांच्या मदतीसाठी राज्यातून हजारो हात पुढे येत आहेत. विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या प्रयत्नातून मराठवाड्यातील विविध संस्थांनाही आपला खारीचा वाटा उचलला आहे. औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने २५ लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीत जमा केले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपाध्यक्ष नंदलाल काळे, राजेंद्र जैस्वाल, पुंडलिकराव काजे आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी राजे साखर उद्योगाने दहा लाख ५१ हजार रुपयांचा निधी पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्याकडे दिला. हरमन फिनोकेम लिमिटेड कंपनीने ५१ लाख एक हजार रुपये; तसेच बागडे यांनी व्यक्तिगत म्हणून एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली. दरम्यान, १७ ऑगस्ट रोजी विधानसभा अध्यक्ष बागडे यांचा वाढदिवस असून, यानिमित्ताने कोणीही पुष्पहार, पुष्पगुच्छ वा अन्य कोणत्याही प्रकाराची भेटवस्तू न आणता त्यासाठी होणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राखी पौर्णिमेसाठी जाताना काळाचा घाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, मिटमिटा

राखी पौर्णिमेसाठी चिखली येथून नाशिक जाणाऱ्या तिघांची स्पिफ्ट कार (एम एच २० सी एस ४९२३) नाशिक रोडवरील जांभाळा गावानजिक उभ्या ट्रकवर (जी जे १० एक्स ७१५७) आदळून भीषण अपघात झाला. बुधवारी दुपारी झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एका गंभीर जखमीवर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील सातगाव भुसारी (ता. चिखली) येथील हे तीन तरुण आहेत. परमेश्वर ज्ञानेश्वर सोनाळकर, उमेश राजू कोलते आणि आकाश ठोंबरे अशी त्यांची नावे आहेत. हे तिघे नातेवाईक असून उमेश कोलते यांची बहीण नाशिक येथे राहते. राखी पौर्णिमेनिमित्त नाशिकला जाण्यासाठी हे तिघे बुधवारी सकाळी कारमधून चिखलीवरून निघाले होते. जांभाळा फाट्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला या तिघांची कार धडकली. या भीषण अपघातात कार ट्रकच्या खाली अडकली होती. यामध्ये परमेश्वर सोनाळकर आणि उमेश कोलते यांचा जागीच मृत्यू झाला. दौलताबाद पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी आकाश ठोंबरे यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ वाहतूक ठप्प झाली. दोन्ही वाहने क्रेनद्वारे वेगळी करण्यात आली. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

\Bएकाला चार महिन्यांची मुलगी \B

मृत उमेश याची बहीण आतापर्यंत गावाकडे राहायची. ती यंदा नाशिकला राहण्यासाठी गेली आहे. त्यामुळे राखी बांधून घेण्यासाठी तो कारने जात होता. मृत उमेश अविवाहित आहे, तर मृत परमेश्वर विवाहित असून त्याला चार महिन्यांची मुलगी आहे. हे दोघेही शेतकरी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या तयारीत असलेले तिघे जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना बेगमपुरा पोलिसांनी प्राणघातक शस्त्रासह जेरबंद केले. बुधवारी दुपारी तीन वाजता हनुमान टेकडीमागे बुद्धलेणीच्या पायथ्याशी हा प्रकार घडला. बीट मार्शलच्या सतर्केतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. आरोपींविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेगमपुरा पोलिस ठाण्याचे बीट मार्शल ज्ञानेश्वर ठाकूर आणि सुनेश कुसाळे तसेच टुरीझम मोबाइलचे साळुंके हे तिघे हनुमान टेकडी परिसरात गस्त घालीत होते. यावेळी तेथील बाभळीच्या झाडाखाली एका खड्ड्यात काही संशयित त्यांना आढळून आले. पोलिस निरीक्षक सानप यांना ही माहिती देण्यात आली. निरीक्षक सानप पथकासहित दाखल झाले. मात्र, पोलिसांना पाहून आरोपींनी पलायन केले. यावेळी पाठलाग करून तिघांना अटक करण्यात आली असून दोघेजण पलायनात यशस्वी झाले. पकडलेल्या आरोपींमध्ये आमेर शेख रफीक शेख (वय २३), तोशीफ खान मकसुदखान (वय २३) आणि जावेदखान कैसरखान (वय २२ तिघे रा. किराडपुरा) यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याजवळ धारदार जांबिया, चाकू, फायटर, सुती दोरी, लाल मिरची पावडर आणि एक मोपेड दुचाकी आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन सानप, पीएसआय सय्यद सिद्दीकी, देवा सूर्यवंशी, रामधन जाडे, शेख हैदर, सुनेश कुसळे, ज्ञानेश्वर ठाकूर, साळूंके, गायकवाड, नामदेव सानप, शरद नजन, नागेश पांडे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी कट्टा बाळगणारा क्रांतीचौक पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतूस बाळगणाऱ्या आरोपीला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. बुधवारी सकाळी खडकेश्वर येथे ही कारवाई करण्यात आली. व्यवसायाच्या वादातून मित्रावर गोळीबाराचा प्रयत्न आरोपीने केला. मात्र, गोळी सुटली नसल्याने हा प्रकार टळला. आरोपीला सिटीचौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

क्रांतीचौक पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून खडकेश्वर येथे एक आरोपी नागरिकांना फायटरने मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने खडकेश्वर येथील ओम मिरची ग्रँडिंग शॉप गाठले. यावेळी तेथील महावीर रामलाल जैस्वाल (वय ४८, रा. छावणी) याने पोलिसांना माहिती दिली. संशयित आरोपी अनिल हिरालाल जैस्वाल (वय ४४, रा. दर्जी बाजार, छावणी) याने व्यवसायाच्या वादातून आपल्यावर कट्टाने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळी सुटली नसल्याने वाचलो असून हा कट्टा अनिलच्या कंबरेला असल्याची माहिती दिली. या माहितीवरून अनिलला ताब्यात घेत झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या कंबरेला गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतूस आढळून आले. हे घटनास्थळ सिटीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने आरोपीला कट्यासहीत सिटीचौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई क्रांतीचौक गुन्हे शोध प्रकटीकरण पथकाचे एपीआय राहुल सूर्यतळ, नसीमखान, सय्यद सलीम, कोळी, राजेश फिरंगे, मिलिंद भंडारे, संतोष रेड्डी, राजेश चव्हाण, हनुमंत चाळणेवाड, मंगेश मनोरे, रवी पोळ, फातेमखान यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाकाठच्या नुकसानीचा २४ तासात अहवाल द्या - अध्यक्षांचे आदेश

$
0
0

गोदाकाठच्या नुकसानीचा

२४ तासांत अहवाल द्या

जिल्हा परिषद अध्यक्षांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाशिकहून सोडलेल्या पाण्यामुळे गंगापूर व वैजापूर तालुक्यातील गोदाकाठच्या गावांमध्ये पूर येऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रस्ते, शाला, आरोग्य केंद्रे, अंगणवाड्यांच्या नुकसानीचा अहवाल २४ तासात द्या, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी मंगळवारी स्थायी समिती बैठकीत दिले.

नाशिक व परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले गेले. त्यामुळे गंगापूर व वैजापूर तालुक्यातील गोदाकाठच्या २३ गावांना फटका बसला आहे. डोणगाव,

सावखेडगंगा, वांजरगाव, नागमठाण, अटवलगाव, चेंडूफळ, नेवरगाव आदी गावातील रस्ते खचले असून, काही पूल पडले आहेत. शाळांचे नुकसान झाले असून, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायत इमारतींनाही फटका बसला आहे. या गावांना जिल्हा परिषद उपकरातून तातडीने मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्य रमेश बोरनारे, अविनाश गलांडे, मधुकर वालतुरे,पंकज ठोंबरे यांनी केली. २०१६-१७ मध्ये झालेल्या नुकसानीनंतर शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार मदत आली नसल्याचे ठोंबरे यांनी निदर्शनास आणून दिले. नैसर्गिक आपत्तीअंतर्गत निधी मिळतो तो मिळाला नसल्याचे गलांडे म्हणाले. महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा बांधकाम विभाग, पंचायत समिती यांनी तात्काळ पंचनामा करून २४ तासात अहवाल सादर करा, असे आदेश जि.प. अध्यक्षा अ‍ॅड. डोणगावकर यांनी दिले.

टँकर तत्काळ सुरू करा

जिल्ह्यामध्ये अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. अनेक गावांमध्ये तर पेरण्याची झालेल्या नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेले टँकर बंद करण्यात आले आहे, याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्यासह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद, पैठण, गंगापूर व वैजापूर तालुक्यांमध्ये टंचाईग्रस्त गावात तातडीने टँकर सुरु करावेत,अशी सूचना त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांनी केली गुलमंडी मार्गाची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी झाली. त्याचा व्यापाऱ्यावरही परिणाम होत असल्याची बातमी 'मटा'ने मंगळवारी प्रसिद्ध केल्यानंतर बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यांची पाहणी केली. रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी तेथील नागरिकांना सांगितले. दरम्यान, मुख्य बाजार पेठ असल्याने गणेश उत्सवानंतर प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे किमान पॅचवर्कचे काम तरी तातडीने करा, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ व वर्दळीचे ठिकाण असलेल्या सिटी चौक ते पैठण गेट (गोमटेश मार्केट); तसेच फॅशन कॉर्नर ते बाराभाई ताजिया चौक या रस्त्याचे काम निधी असूनही गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले असून, व्यवसायावर ही मोठा परिणाम होत असल्याची ओरड नागरिक, व्यापाऱ्यांकडून होत आहे. यासंदर्भात 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, नगररचना विभागाचे ए. बी. देशमुख, फारूख खान आदींनी सकाळी ११ वाजता गुलमंडी परिसरातील रस्त्याची पाहणी केली. अधिकारी आल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक, व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेत रस्त्यासह अन्य प्रश्न उपस्थित केले. भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, नगरसेवक राजू तनवाणी यांनीही यावेळी नागरी प्रश्न तातडीने मार्गी लावा, अशी मागणी करत याप्रश्नावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यान, गणेश उत्सव, दसरा, दिवाळीनंतर या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागेल, असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला. नागरिकांनी नवीन रस्ता तयार होईलच पण, त्याआधी किमान पॅचवर्कचे कामे सणासुदी आधी करा, अशी मागणी केली.

'मटा'मधील बातमीनंतर बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली. कामासाठी निविदा मागविल्यानंतरही व निधी उपलब्ध असूनही कामे का सुरू केली जात नाहीत, हा प्रश्न आहे. त्यात रस्ता अधिक रुंद असणे अपेक्षित आहे. सणासुदीमुळे कदाचित तूर्तास काम सुरू होणार नाही, असे दिसते. अशा वेळी किमान पॅचवर्कचे कामे करावी आणि खड्डेमय रस्त्यापासून मुक्ती द्यावी.

- रवींद्र बलदवा, व्यापारी, गुलमंडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा शुल्कमाफी वर्षभरानंतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या २०१७-१८ शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा निधी तब्बल वर्षभरानंतर शिक्षण मंडळाकडून वितरित केला जात आहे. हे विद्यार्थी संबंधित शाळा, कॉलेज सोडून गेले आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे निधी देण्यास विलंब झाला. त्यातही मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांपैकी दोन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचेच धनादेश शिक्षणाधिकाऱ्यांकडे मंडळाने पाठविले आहेत.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारने परीक्षा शुल्कमाफी जाहीर केली होती. मात्र, त्याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळाला नाही. अखेर आता मागील वर्षीचे व यंदाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याची प्रक्रिया माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुरू केली आहे. २०१७-१८ व २०१८-१९ अशा दोन्ही शैक्षणिक वर्षांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचे धनादेश शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून संबंधित शाळा, कॉलेजांना ते वितरित केले जाणार आहेत. त्यातही पूर्ण विद्यार्थ्यांचा समावेश नाही. वर्षभरापूर्वी झालेली शुल्कमाफी, यंदाही तीच परिस्थिती असतानाही मंडळाने परीक्षा शुल्क स्वीकारले. मात्र, ते परत करताना अनेक महिन्यांचा विलंब केला आहे.

\Bविद्यार्थ्यांना लाभ नाहीच\B

दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना शुल्क परत करण्याची प्रक्रिया वर्षभरानंतर होत आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात परीक्षा झाली, निकाल जाहीर झाले. निकालानंतर विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी संबंधित शाळा, कॉलेज सोडलेले असते. वर्षभर किंवा काही महिन्यानंतर त्यांना परीक्षा शुल्काची रक्कम परत मिळणार याबाबत माहिती दिली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना योजनेचा लाभच मिळत नाही. इतरत्र शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याने परत शुल्क परत मिळविण्यासाठी केव्हा यायचे याचेही नियोजन नाही.

\Bवर्षभरानंतरही दोन जिल्हेच; मंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष \B

मंडळाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिक्षण उपसंचालक यांचे मार्फत आपण आपल्या २०१७-१८ व २०१८-१९ मधील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची औरंगाबाद जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची यादी या कार्यालयात प्रमाणित करून सादर केल्यानुसार टंचाईग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे शुल्क परत करण्यात येत असून विद्यार्थ्यांची यादी व धनादेश देण्यात येत आहे. हे धनादेश संबंधित विद्यार्थ्यांना वाटप करण्यात यावे. त्यातही मंडळाने विभागात औरंगाबाद व परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचेच धनादेश दिले आहेत. उर्वरित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न कायम आहे.

\B५२ हजार २६१ औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण लाभार्थी विद्यार्थी

१३७७२ दहावी मार्च-२०१८ चे विद्यार्थी

१६०६६ दहावी मार्च-२०१९ चे विद्यार्थी

१००४१ बारावी मार्च २०१८ चे विद्यार्थी

१२३८३ बारावी मार्च २०१९ चे विद्यार्थी \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा वर्गीकरण कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्याचे वर्गीकरण जनजागृतीसाठी महापालिकेने खर्च केला मात्र, त्याचा उपयोग झाला नसल्याचे समोर आले आहे. चिकलठाणा प्रकल्प केंद्रावर मिश्र कचराच येत असल्याने बुधवारी समोर आले. त्यात तात्काळ सुधारणा करा, अन्यथा शुक्रवारपासून कचऱ्याची एकही गाडी रिकामी करून घेतली जाणार नाही, असा दम महापौरांनी कचरा संकलन करणाऱ्या कंपनीला भरला आहे.

शहरात १६ फेब्रुवारी २०१८पासून कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दीड वर्षानंतरही या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना प्रश्न सोडविण्यात यश आलेले नाही. महापौर घोडेले यांनी बुधवारी पुन्हा आढावा घेतला. जनजागृतीसह कचरा संकलनासाठी खासगी कंत्राटदारांचा आधार घेऊनही कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याचे समोर आले. घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने पालिकेला ९१ कोटी रुपयांचा निधी दिला. घनकचरा विल्हेवाटसाठी चार प्रकल्प उभारण्यात येणार आहे मात्र, एकही प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. चिकलठाणा प्रकल्प सुरू झाला त्याचे काम पूर्ण क्षमतेने सुरू नाही. ओला व सुका असे वर्गीकरण करून कचरा येणे अपेक्षित आहे, परंतु तसे होत नाही. एकत्रितच कचरा येत असल्याने प्रक्रिया करताना अडचणी येत आहेत. कचरा संकलनाचे काम दिलेल्या कंपनीने ओला व सुका असे कचऱ्याचे शंभर वर्गीकरण करून तो प्रक्रिया प्रकल्पावर घेऊन जाणे बंधनकारक आहे. कंपनीचे काम सुरू होऊन सहा महिने झाल्यानंतरही एकत्रितच कचरा येतो आहे.

\Bरस्त्यावरील कचऱ्याचा प्रश्न कायम\B

शहरात काही भागांमध्ये रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. त्यामुळे या एकत्रित कचऱ्याचे वर्गीकरण ही करण्यात येत नाही. काही ठिकाणी नागरिक वर्गीकरण करतात मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले. शुक्रवारपर्यंत वर्गीकरणाबाबत कंपनीने ठोस पाऊले उचलावित अन्यथा कचऱ्याची गाडी प्रक्रिया प्रकल्प केंद्रावर रिकामी केली जाणार नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यासह प्रक्रिया प्रकल्पाचे काम विजेअभावी वारंवार बंद पडत असल्याचाही मुद्दा यावेळी चर्चीला गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जपानच्या शिष्टमंडळाला पालिकेचे ‘रेड कार्पेट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जपान दूतावासातील प्रतिनिधींचे शिष्टमंडळ औरंगाबादमध्ये शुक्रवारी येत आहे. त्यांची पालिका विशेष काळजी घेत असून,'रेड कार्पेट' अंथरण्यात येणार आहे. उच्चस्तरीय प्रतिनिधी मिशीओ हराडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी महापालिकेत येत आहे.

हे शिष्टमंडळ महापौरांची सदिच्छा भेट घेणार आहे. जपानच्या दूतावासातील उच्चस्तरीय प्रतिनिधी मिशीओ हराडा यांनी काही दिवसांपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले यांना पत्र पाठवून भेटीची इच्छा दर्शविली होती. महापौरांनी त्यास संमती दिली. त्यानुसार हराडा आणि त्यांचे काही सहकारी येत आहेत. सायंकाळी पाच वाजता चिकलठाणा विमानतळावर येणार आहे. तेथून ते महापालिकेत येणार आहे. सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत ते महापौरांशी चर्चा करणार आहेत. ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठीची महापालिकेने जोरदार तयारी केली आहे. शिष्टमंडळासाठी 'रेड कार्पेट' टाकण्यात येणार आहे. त्यासह इतर बाबींची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेअकरा लाखांचा अपहार; लिपिकाच्या कोठडीमध्ये वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट पावत्यांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या ११ लाख ६६ हजार ५०० रुपयांच्या शैक्षणिक शुल्काचा अपहार करणाऱ्या पैठण रोडवरील गेवराई तांडा येथील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचा लिपिक जयप्रकाश राजाभाऊ चोरघडे याच्या पोलिस कोठडीमध्ये रविवारपर्यंत (१८ ऑगस्ट) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी बुधवारी दिले.

या प्रकरणी एमजीएम महाविद्यालयातील शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख प्रमोद उत्तमराव शिंदे (४५, रा. सिडको) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, शिंदे हे उस्मानाबाद येथील धनेश्वरी मानव विकास मंडळ या संस्थेचे उपाध्यक्ष असून, संस्थेचे गेवराई तांडा येथे अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय आहे. या संस्थेत आरोपी जयप्रकाश राजाभाऊ चोरघडे (३६, रा. कांचनवाडी) हा लिपिक म्हणून कार्यरत होता. जून २०१८ मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जमा होणारे शैक्षणिक शुल्क अत्यल्प असल्याबाबत संस्थेने आरोपी चोरघडे याच्याकडे विचारणा केली असता, आरोपीने खोटी माहिती देऊन वेळ मारून केली होती. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी २७ विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क भरल्याच्या पवात्या अकाउंट विभागाला दाखवून शैक्षणिक शुल्काची रक्कम आरोपी चोरघडे याच्याकडे जमा केल्याचे सांगितले. पवात्यांची पडताळणी करण्यात आली असता, पावत्या बनावट असल्याचे व आरोपीने शैक्षणिक शुल्काच्या ११ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला शनिवारी (१० ऑगस्ट) अटक करण्यात आली होती. त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, आरोपीच्या पोलिस कोठडीत रविवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीचा विनयभंग; दोन वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद तालुक्यातील १४ वर्षीय मुलीचे अपहरण करुन विनयभंग करणारा प्रविण एकनाथ मघाडे याला दोन वर्षे सक्तमजुरी व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी ठोठावली.

प्रकरणात प्रवीण एकनाथ मघाडे हा शहर परिसरातील शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील कंâपनीमध्ये हंगामी कामगार म्हणून काम करत होता. तो किराणा सामान घेण्यासाठी दुकानावर नियमित जात असल्यामुळे त्या परिसरातील १४ वर्षीय मुलीशी ओळख झाली होती. १० डिसेंबर २०१४ रोजी मुलगी नियमितपणे शाळेत गेली होती. मधल्या सुट्टीमध्ये घरी आली आणि पुन्हा शाळेत गेली होती. मात्र, शाळा सुटल्यानंतर ती घरी आली नाही. शोध घेऊनही ती सापडली नाही म्हणून करमाड पोलिस ठाण्यात पित्याने हरवल्याची तक्रार दिली होती व तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मुलीला कामगार प्रवीण मघाडे हा पुणे जिल्ह्यातील देहू फाटा, मुळशी येथे पळवून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन प्रविणला अटक करण्यात आली होती व प्रकरणात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. खटल्यावेळी, सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने प्रविणला दोषी ठरवून भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस कारावास, तर भारतीय दंड संहितेच्या कलम ३६६ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. अॅड. शिरसाठ यांना अ‍ॅड. नितीन मोने व अ‍ॅड. प्राची देशपांडे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा विनयभंग; अटकपूर्व जामीन पेâटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्न समारंभात नाचण्यास विरोध करताच विवाहितेचा विनयभंग करणारा आरोपी व्यापारी सय्यद फैâजान सय्यद मुजाहिद याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. गिरधारी यांनी फेटाळला.

हर्सूल परिसरात लग्न समारंभ सुरू होता आणि समारंभात आरोपी सय्यद फैâजान व त्याचे साथीदार आले. त्यावेळी लग्नामध्ये नाचू द्या, अशी त्यांनी विचारणा केली असता, संबंधित विवाहितेने 'हा महिलांचा कार्यक्रम आहे, तुम्ही येथून जा' असे सुनावले. त्यामुळे संतापलेल्या फैâजानने शिविगाळ करत महिलेशी झटापट केली. प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी सय्यद फैâजान याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी जामीन देण्यास विरोध केला. तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. तसेच गुन्ह्यातील आरोपींची नावे निष्पन्न करावयाची असल्यामुळे त्याला अटक केल्याशिवाय तपास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती करण्यात आल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा नियमित जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभासदाच्या प्लॉटची परस्पर विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोसायटीच्या संस्थापक सदस्याचा प्लॉट परस्पर विक्री केल्याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतरांवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००४ मध्ये हा प्रकार मुकुंदवाडी भागात घडला.

या प्रकरणी प्रल्हाद किसनराव शिरसाठ (वय ७०, रा. महात्मा फुले हौसिंग सोसायटी, हर्सूल) यांनी तक्रार दिली. शिरसाठ हे सोसायटीचे संस्थापक सदस्य आहेत. सोसायटीच्या अध्यक्षांनी संस्थेचे संपूर्ण रेकॉर्ड स्वत:कडे ठेऊन १५ मे २००२ रोजी सभासदांच्या हितासाठी ठराव घेतला होता. यावेळी ठरावात खाडाखोड करून संस्थेची एक एकर २३ गुंठे जमिन काही सभासदांकडून हक्कसोड प्रमाणपत्रावर संमती घेत मिळवून घेतली. यानंतर अध्यक्षांनी जीपीए स्वत:च्या नावावर करून घेत या जमिनीच्या प्लॉटची विक्री केली. शिरसाठ यांच्या प्लॉट क्रमांक सोळाचा ताबा दिला नसल्याने शिरसाठ यांनी सहकारी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने आदेश दिल्याने शिरसाठ यांना प्लॉटवर मालकी हक्क मिळाला होता. याप्रकरणी शिरसाठ यांच्या तक्रारीवरून सोसायटीचे अध्यक्ष डी. बी. कुलकर्णी, उपाध्यक्ष रामराव पांडूरंग शिरसाठ आणि संस्थापक सदस्य पी. डी. तायडे यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार गोरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहायक फौजदार चव्हाण राष्ट्रपती पदकाने सन्मानित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर पोलिस दलातील विशेष शाखेतील सहायक फौजदार गोरख चव्हाण यांना मानाचे राष्ट्रपती पदत जाहीर झाले आहे. चव्हाण यांना यापूर्वी पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस महासंचालक चिन्हाने गौरवण्यात आले आहे.

चव्हाण हे १९८८ मध्ये कॉन्स्टेबल म्हणून दाखल झाले. चव्हाण यांना आतापर्यंत ४०७ कॅश रिवॉर्ड मिळाले असून ११ वेळा उत्कृष्ट काम केल्याच्या नोंदी आहेत. २००२ मध्ये खडकेश्वर, निरालाबाजार आणि नागेश्वरवाडी येथे घडलेल्या बाँबस्फोटाच्या तपासात चव्हाण यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत नांदेड येथील आरोपी निष्पन्न केला होता. क्रांतीचौक पोलिस ठाण्यात कार्यरत असताना रेल्वे स्टेशन येथील एका लॉजमध्ये बांगलादेशी टोळीला अटक करत चार लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या आरोपींना कोर्टाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या कालावधीत त्यांनी १६ मोठ्या चोरी, पाच जबरी चोरी, एक दरोडा आणि दोन खुनाच्या प्रयत्नांच्या गुन्ह्याचा छडा लावला होता. त्यांच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जालना रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना रोडवरील एसएफएस शाळेजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पायी जाणारी ४८ वर्षांची महिला ठार झाली. बुधवारी सकाळी नऊ वाजून ४० मिनिटाला हा अपघात झाला. सरला संजय देसरडा (वय ४८, रा. ऑगस्ट होम, गारखेडा), असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातानंतर नागरिकांनी जवाहरनगर पोलिसांना माहिती देऊन देसरडा यांना जवळच असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. देसरडा यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम घाटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे सोनवणे आणि बावस्कर यांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. याप्रकरणी उशिरापर्यंत जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची पूरग्रस्तांना ५०० टाक्यांची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेना औरंगाबाद शाखेतर्फे कोल्हापूर, सांगली व सातारा या पूरग्रस्त भागांसाठी ५०० पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची मदत पाठवण्यात आली आहे.

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे व महापौर नंदकुमार घोडेले यांच्या प्रमुख उपस्थितीत ५०० पाण्याच्या टाक्या कोल्हापूर, सांगली व सातारा या जिह्यांकडे बुधवारी रवाना केल्या. जिल्हा प्रमुख दानवे म्हणाले, 'सध्या ५०० पाण्याच्या टाक्या पाठवल्या आहेत. यापुढेही वेळोवेळी शक्य तेवढी मदत शिवसेनेकडून करण्यात येणार आहे.' या प्रसंगी शहर प्रमुख विजय वाघचौरे, उपशहर प्रमुख वसंत शर्मा, संजय बारवाल, सुरेश गायके, प्रकाश कमलानी, महिला आघाडी जिल्हा संघटक अनिता मंत्री, अभिजीत पगारे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीची मशागत करताना कळले ‘सीए’ झालो!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा अंतिम निकाल लागला. त्याचे सर्व मित्र त्याचा जल्लोष करत होता, त्याचवेळी तो शेतात मशागत करत होता. निकालानंतर तो उत्तीर्ण झाल्याचे कळले अन् त्यांच्या कुटुंबातील आनंद गगनात मावेनासा झाला. गंगापूरपासून जवळ असलेल्या शेंदूरवादा येथील शेतकरी तरुण संदीप कल्याण निकम याने सीए अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली आहे. गावात पहिल्यांदाच कोणी सीए परीक्षा उत्तीर्ण केल्याने गावातील नागरिकांनीही त्याचे कौतुक केले.

इन्स्टिट्यूट ऑफ चॉर्टर्ड अकाउंटन्सी ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. परीक्षेत औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे यश मिळविले. यामध्ये संदीपही सीए बनला आहे़ आई-वडिलांच्या कष्टांचे चीज होण्यासाठी खूप मोठा होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर संदीप चार्टर्ड अकाउंटंट (सीए) बनला आहे़ आई रूख्मिणबाई अशिक्षित, तर वडील कल्याण हे नववीपर्यंत शिकलेले़ मुलांनी शिकून मोठे व्हावे अशी दोघांचीही इच्छा होती़ बेताच्या परिस्थितीवर मात करत त्यांनी मुलांना शिक्षण दिले़ त्यांच्या मेहनतीला अखेर यश मिळाले आहे़ इतर दोन मुलेही त्यांनी उच्चशिक्षित केले, आता तिसरा मुलगा सीए झाला आहे. नियमितपणा, सातत्य, चिकाटी व आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यास कोणतेही ध्येय गाठता येते हे संदीपने सिद्ध करून दाखविले आहे़ त्याचे शालेय शिक्षण शेंदूरवादा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले असून अकरावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी औरंगाबाद शहर गाठले़ बी. कॉम., एम. कॉम.चे शिक्षण घेतल्यानंतर त्याने सीए होण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले. कल्याण निकम यांच्या मुलाने सीए परीक्षेत यश मिळविल्याने गावकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला. बुधवारी निकालानंतर इन्स्टिट्यूटतर्फे त्याच्यासह त्याचा वडिलांचा गौरव करण्यात आला

\Bशहरातून ६४ विद्यार्थी सीए बनले\B

औरंगाबादहून एकूण ६४ विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून पात्र ठरले. सीएच्या अंतिम नवीन कोर्ससाठी राशी अग्रवालने शहरातून प्रथम, निकुंज बागमारने द्वितीय, अभिनव शर्माने तिसरा, रोशन खांडे यांनी चौथा, तर अनु संकलेचा यांनी पाचवा क्रमांक मिळविला़ जुन्या कोर्ससाठी अक्षत बकलीवाल याने अखिल भारतीय पातळीवर २०वा क्रमांक मिळविला़ मधुरिमा नंदामिरूने औरंगाबाद शहरातून द्वितीय क्रमांक मिळवित यश मिळविले.

निकालाकडे ही माझे लक्ष लागलेले होते. गावाकडे शेतात काम करत असताना निकाल जाहीर झाल्याचे कळले अन् आनंद झाला. जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण पूर्ण केले. आज परीक्षेत यश मिळवित आई-वडिलांचे स्वप्न साकार करू शकलो याचा आनंद आहे.

-संदीप निकम, सीए

अंतिम परीक्षेच्या निकालात औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे. अनेकांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. विद्यार्थ्यांचा वाढता कल, मेहनत करण्याची तयारी यामुळे विद्यार्थी यश मिळविण्यात यशस्वी ठरत आहेत.

-रोहन आचलिया, शाखाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या निविदेला आव्हान

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी औरंगाबाद

महापालिकेतर्फे एमजीएम संस्थेनजिक असलेल्या १७ एकर जागेवरील हजारो वृक्षतोड करून उभारण्यात येणाऱ्या फूड कोर्ट, एएमपी थिएटर व बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या निविदेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणात न्या. प्रसन्न वराळे व न्या. आर. जी. अवचट यांनी याचिकेतील प्रतिवादी महापालिका, वनविभाग, सिडको व राज्य शासनाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात याचिकाकर्ते योगेश बाळसाखरे व सोमनाथ कराळे यांनी महापालिकेच्या सदर निविदेच्या विरोधात जनहित याचिका केली आहे. गायरान जमिनीवर विकास करण्यात यावा, याशिवाय सदर १७ एकरातील साधारण दहा हजारावरील झाडांना हरित पट्टा (ग्रीन झोन) म्हणून घोषित करावे. तसेच त्या झाडांना बाधा पोहोचेल, असे बांधकाम परिसरात करण्यात येऊ नये. या प्रकरणाच्या प्राथमिक सुनावणीदरम्यान खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. खिवंसरा यांना नमिता ठोले यांनी सहकार्य केले. या याचिकेची सुनावणी पाच आठवड्यानंतर होणार आहे.

१५ वर्षांपूर्वीची झाडे तोडणार

सिडकोने महापालिकेकडे १७ एकर जागा (प्रियदर्शनी उद्यान) २००५ मध्ये हस्तांतरित केली. त्यापूर्वी सिडकोने केलेल्या पाहणीनुसार या जागेवर नऊ हजार ८८५ दुर्मिळ प्रजातीची झाडे असल्याचे स्पष्ट केले आहे. या जागेवरील १० ते १५ वर्षापूर्वीची साधारण पाचशेवर झाडे तोडण्यात येणार आहेत. महापालिकेतर्फे काढलेल्या नवीन निविदेत सदर जागेवर फूड कोर्ट, एएमपी थिएटर व बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर

$
0
0

हायकोर्टात आव्हान

म. टा. विशेष प्रतिनिधी औरंगाबाद

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर १९ ऑगस्ट रोजी सुनावणी अपेक्षित आहे.

केज येथील दत्तात्रय ठोंबरे यांनी ही याचिका केली आहे. राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या तसेच पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुका चार महिन्यासाठी लांबणीवर टाकण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या ७ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

महाराष्ट्रातील २५ जिल्हा परिषदेमधील अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ २१ सप्टेंबर २०१९ रोजी समाप्त होत आहे तर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाचा कार्यकाळ १४ सप्टेंबरला संपतो आहे. कायद्यानुसार कार्यकाळ संपायच्या १४ दिवस अगोदर निवडणूक कार्यक्रम प्रकाशित करून निवडणूक घेणे बंधनकारक असताना राज्य मंत्रिमंडळाने कोणतेही कारण न दिले नाही. २५ जिल्ह्यांमधील निवडणुका ४ महिन्यासाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला, असे याचिकेत नमूद केले आहे. राज्य शासनाला सदर निवडणूक लांबणीवर टाकण्याचा कोणताही अधिकार घटनेने दिलेला नाही. तसेच त्याचा कार्यकाळ वाढवण्याचा वा कमी करण्याचे अधिकारही राज्य शासनास नसताना निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून उमा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घटनाबाह्य निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला, असे याचिकेत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images