Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दबाव वाढल्यास ‘जशास तसे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काही वर्षांपासून विद्यापीठ परिसरात दलाली, गुत्तेदारी, हप्ते वसुली व गुंडगिरी करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. या उपद्रवी लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सुरू केलेले प्रयत्न 'आश्वासक पाऊल' आहे. कुलगुरूंवर दबाव आणणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने दिला आहे. तर, गर्दी जमवून दबाव आणणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचे सूतोवाच कुलगुरू येवले यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी एक महिन्यापूर्वी कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतली. अधिष्ठाता नियुक्त्या, प्रकुलगुरू नियुक्ती आणि प्रशासकीय निर्णयातून आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखवली आहे. या नियुक्त्यात डावलले गेल्याची भावना झालेले काही प्राध्यापक-अधिकारी अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर कुलगुरूंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या घडामोडीनंतर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कुलगुरूंची पाठराखण केली. कुलगुरू येवले यांच्याशी कर्मचाऱ्यांनी बुधवारी चर्चा केली. यावेळी परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, अध्यक्ष पर्वत कासुरे उपस्थित होते. 'महिनाभरात विद्यापीठाचे कामकाज सुरळीत झाले आहे. अशैक्षणिक गोष्टींना थारा नसल्याने विद्यार्थीकेंद्री काम सुरू आहे. कर्मचारी भरतीत रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिल्यास कामकाज अधिक सुरळीत होईल', असे डॉ. पाथ्रीकर म्हणाले. 'विद्यापीठ परिसरात अशैक्षणिक व असांस्कृतिक मंडळींचा अड्डा तयार झाला. हा अड्डा उध्वस्त करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा पर्वत कासुरे यांनी व्यक्त केली. कुलगुरू, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्यास खपवून घेणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा कासुरे यांनी दिला.

तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी खंबीर प्रशासन राबवून दुकानदारी मोडली होती. दुर्दैवाने मधल्या काळात हस्तक्षेप वाढल्याने विद्यापीठाचा गाडा विस्कळीत केला. आपण महिन्यातच सर्वांना विश्वासात घेऊन काम केल्यामुळे मनापासून साथ देऊ, असे उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके म्हणाले. अधिकाऱ्यांशी नियमितपणे संवाद होत असल्याने प्रशासन सुरळीत झाल्याचे उपकुलसचिव दिलीप भरड यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे सचिव प्रकाश आकडे, अर्जुन खांडरे, शकील रामपुरे, भगवान फड, विजय दरबस्तवार, आर. आर. चव्हाण, व्यंकट खैरनार, जीवन डोंगरे, सुरेंद्र घोरपडे, मोहम्मद अली, नजमा खान, डॉ. सुनिता अंकुश, डॉ. पंजाब पडूळ उपस्थित होते.

\Bदबाव आणणाऱ्यांचा बंदोबस्त करू \B

मागील ३५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून चांगले-वाईट अनुभव गाठिशी आहेत. कुलगुरू झाल्यानंतर महिनाभरातच मराठवाड्यातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व नागरिकांनी खंबीर साथ दिली. या पाठिंब्यामुळे भारावून गेल्याचे कुलगुरू येवले म्हणाले. बेकायदेशीरपणे व गर्दी जमवून दबाव आणणाऱ्यांचा योग्य बंदोबस्त करण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थिनींसाठी विद्यापीठ असुरक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थिनींसाठी सुरक्षित राहिले नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तालीम करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत थांबलेल्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी दारू पिऊन विद्यापीठात गोंधळ घातला. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन समज देऊन सोडले. या प्रकरणात परप्रांतीय विद्यार्थिनीची छेड काढण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. याबाबत कुलसचिव डॉ. साधना पांडे या कुलगुरूंना लेखी माहिती सादर करणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. विद्यापीठात वेगवेगळ्या मार्गाने रात्री उशिरापर्यंत उपद्रवींची वर्दळ असते. प्रेमी युगूल रात्री उशिरापर्यंत विद्यापीठ परिसरात फिरतात. याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनींवर बुधवारी मध्यरात्री वाईट प्रसंग ओढवला. नाट्यशास्त्र विभागात स्वातंत्र्यदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम होणार होता. या पार्श्वभूमीवर १४ ऑगस्टला देशभक्तीपर गीत आणि नृत्याची तालीम घेण्यात आली. या तालमीमुळे उशीर होईल, असे सांगून विभागाचे दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनी घरी गेले नाही. तालीम संपल्यानंतर सायंकाळी चौघे विभागातून निघून गेले. सर्वजण रात्री ११ वाजता पुन्हा विभागात परतले. सुरक्षारक्षकाने विभाग बंद झाल्याचे सांगून घरी जाण्याचा सल्ला दिला. विद्यार्थी परत न जाता गोंधळ घालत असून ते दारू प्यायल्याचे सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. विद्यार्थ्याने सोबतच्या परप्रांतीय विद्यार्थिनीशी झोंबाझोंबी केल्याने ती रडायला लागली. हा गोंधळ तासभर सुरू असल्याने सुरक्षारक्षकाने पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर दामिनी पथकाने विद्यापीठात येऊन मद्यपी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि विभागातील प्राध्यापकांना रात्री पोलिसांनी बोलावून घेतले. तसेच समज देऊन विद्यार्थ्यांना पालकांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणाची गंभीर दखल विद्यापीठ प्रशासनाने घेतली आहे. याबाबत प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे या कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना लेखी माहिती सादर करणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी दोषी आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. याबाबत नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

\Bजुजबी कारवाई\B

विद्यापीठ परिसरात दारू पिऊन विद्यार्थिनीशी लगट करण्याचा गंभीर प्रकार घडला. मात्र, या प्रकाराची फारशी वाच्यता न करता प्रशासन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी झाली असती, तर ठोस कारवाईची शक्यता होती. विद्यार्थिनीचे पालक शनिवारी शहरात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वक्फ बोर्ड निवडणूक : मुतावलीचे नाव मतदारयादीत

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना जिह्यातील दर्गाह राजबाग शेर सावरचे मुतावली सय्यद जमील अहमद जानिमिया यांचे नाव मतदार म्हणून वक्फ बोर्डाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आदेश न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने दिले व ही याचिका निकाली काढली. यावर्षी वक्फ बोर्डाची निवडणूक होत असून, मतदार यादीत याचिकाकर्त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले नव्हते. त्यानाराजीने त्यांनी बोर्डाकडे आक्षेप नोंदविला होता, मात्र बोर्डाने त्याची दखल घेतली नाही म्हणून त्यांनी याचिका केली. याचिकाकर्त्याची बाजू प्रज्ञा तळेकर यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजाजनगरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0

वाळूज महानगर : बजाजनगर येथे एका २२ वर्षांच्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सकाळी ११च्या सुमारास उघडकीस आली. गीता अशोक महिवाल (२२, रा. जीवन प्रकाश हौसिंग सोसायटी, जागृत हनुमान मंदिराजवळ बजाजनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, अशोक महिवाल व गीता महिवाल यांचे २०१७मध्ये लग्न झाले. शुक्रवारी सकाळी पती अशोक महिवाल कामानिमित्त बाहेर गेले असताना घराच्या एका दरवाज्याला कुलूप लावून दुसरा दरवाजा आतून लावून घेतला व गीता यांनी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. याविषयी वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यावर सहाय्यक फौजदार आर. डी. वडगावकर व जगदाळे यानी घटनास्थळी नागरिकांच्या मदतीने गीता महिवाल यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून गीता यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

शिवराईत एकाची गळफास घेऊन आत्महत्या

वाळूज महानगर : वाळूज जवळील शिवराई येथे एका ३८ वर्षांच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (१५ ऑगस्ट) संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. सचिन तुळशीराम भुजंग (३८, रा. शिवराई, ता. गंगापूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. याची माहिती मिळताच विजय भुजंग, भानुदास भुजंग व इतर नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी सचिन भुजंग याना रात्री आठच्या सुमारास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील म्हस्के हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांवर दुष्काळछाया !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे राज्यात वरुणाराजा जोरदार हजेरी लावत असताना पावसाच्या दोन महिन्यानंतर मराठवाड्यावर अद्यापही पाऊस रुसला असल्याने बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत स्थिती चिंताजनक आहे. ऐन पावसाळ्यात या जिल्ह्यांवर दुष्काळछाया असून दोन्ही जिल्ह्यांतील तब्बल ५९२ गावे ११६ वाड्यांमधील तब्बल १५ लाख ८२ हजार नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. ही ऑगस्ट महिन्याची स्थिती असून, येत्या कालावधीमध्ये पाऊस झाला नाही तर भीषण टंचाईची भीती निर्माण झाली आहे. विभागातील अन्य जिल्ह्यांची स्थितीही कमी-अधिक प्रमाणात अशीच आहे.

लातूर जिल्ह्याचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. या जिल्ह्यात ६४ टँकर सुरू आहेत, मात्र पाऊस झाला नाही तर काय, असा प्रश्न कायम आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये समाधानकारक नसला तरी पाऊस आहे. शिवाय जायकवाडी धरणामध्येही मुबलक पाणी आले असून, धरणावर अवलंबून असलेली गावे, शहरांची अडचण नाही. उस्मानाबाद व लातूर शहरांना येणाऱ्या काळात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये औरंगाबाद आणि जालना; तसेच नांदेडमध्ये कमी-अधिक प्रमाणामध्ये सातत्याने पाऊस झाला. त्यामुळे या भागातील पिकांना जीवदान मिळाले, मात्र बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. यंदा पाण्याच्या सर्वाधिक दुष्काळाला सामोरे गेलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ८२.१ टक्के तर, जालना जिल्ह्यात ६९.१ टक्का पाऊस पडला आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ८४.२ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत बीड जिल्ह्यात अद्याप निम्माही पाऊस झालेला नाही जिल्ह्यात केवळ ४४.८ असा सर्वात कमी पाऊस झालेला असून, उस्मानाबाद जिल्ह्यातही केवळ ५९.२ टक्के पाऊस झाल्याने चिंता वाढल्या आहेत.

पावसाळ्याच्या दोन महिन्यांनंतरही बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, शिरूर कासार, अंबाजोगाई, वडवणी, केज व धारूर, लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, चाकूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, भूम, परंडा, हिंगोली जिल्ह्यातील वसमत या तालुक्यांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत निम्माही पाऊस झालेला नाही. गेल्यावर्षी पहिल्या काही आठवड्यांमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. यावर्षी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांमध्ये वरुणराजाची सातत्याने हजेरी होती. सध्या विभागातील ७४३ गावे आणि १४३ वाड्यांमधील १९ लाख ४५ हजार नागरिकांची तहान १०४२ टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. पावसाळ्याच्या प्रारंभीपासूनच औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांमध्ये अनेक महसूल मंडळांमध्ये सातत्याने अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्पांमध्ये पाणी आले होते. अशीच स्थिती जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद तालुक्यांची होती.

बीड, उस्मानाबादमध्ये चाऱ्याचा प्रश्न कायम

अत्यल्प पावसामुळे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील चारा छावण्या सुरू आहेत. प्रारंभीच्या कालावधीत झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या करून घेतल्या त्यावेळी चारा छावण्यांमधील जनावरांची संख्या कमी झाली होती, मात्र आता पेरण्या केल्या तरी पाऊसही येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा जनावरे चारा छावण्यांमध्ये आणण्यास सुरुवात केली आहे. सध्या बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या ४७ चारा छावण्यांमध्ये २६ हजार १८६ तर उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या १५ छावण्यांमध्ये दहा हजार ८८७ जनावरांच्या चारा पाण्याची सोय करण्यात येत आहे.

\Bआतापर्यंतचा पाऊस\B

जिल्हा...............पडलेला पाऊस......वार्षिक टक्केवारी

औरंगाबाद.............८२.१.......................४६.२

जालना.................६९.१.......................३९.३

परभणी.................६३.३.......................३५.६

हिंगोली.................६९.८......................४२.९

नांदेड...................८४.२......................४९.२

बीड.....................४४.८......................२४.०

लातूर...................६२.९......................३३.८

उस्मानाबाद...........५९.२......................३१.४

एकूण...................६७.९३ टक्के............३८.४ टक्के

(पडलेला पाऊस १५ ऑगस्ट अपेक्षितच्या तुलनेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’च्या ईव्हीएम हटाओ मोहिमेस सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचंड विजयानंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त करणाऱ्या पक्षांनी आता या मुद्द्यावर लढ्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (१६ ऑगस्ट) शहरातील आमखास मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ईव्हीएम विरोधात नागरिकांकडून फॉर्म भरून घेण्यात आले.

मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संध्याकाळपर्यंत ११७५ फॉर्म भरून घेण्यात आले असल्याचे शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष विजय साळवे यांचीही उपस्थिती होती. जगातील बहुसंख्य पुढारलेल्या आणि लोकशाही राष्ट्रांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सारख्या संशयाला जागा असणाऱ्या निवडणूक प्रक्रिया नाकारून मतपत्रिकेचा अवलंब केला आहे. त्यामुळे मी भारताचा नागरिक आणि मतदार या नात्याने यापुढील सर्व निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्या, अशी माझी मागणी आहे. मतदान कुठल्या पद्धतीने व्हावे हे ठरवण्याचा अधिकार माझा आहे आणि म्हणूनच माझी मागणी पूर्ण व्हायला हवी असा मजकूर भरून घेण्यात आलेल्या फॉर्ममध्ये आहे. या फॉर्मवर भरून देणाऱ्याचे नाव तसेस संपर्क क्रमांकही आहे. १९ ऑगस्टपर्यंत शहराच्या विविध भागातून अशा प्रकारचे फॉर्म भरून घेण्यात येणार असून, हे फॉर्म मुंबई येथील कार्यालयाला पाठवण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीनशे वीस मतदार इगतपुरी सहलीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीतील शिवसेना - भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्यासाठी तीनशेपेक्षा जास्त मतदार १५ ऑगस्ट रोजी सहलीसाठी इगतपुरीला रवाना झाले. मतदानाच्या दिवशी सोमवारी ते परतणार आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे अंबादास दानवे आणि काँग्रेस आघाडीचे भवानीदास (बाबूराव) कुलकर्णी यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी (१९ ऑगस्ट) मतदान होणार आहे. निवडणुकीत ६५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी महायुतीच्या मतदारांची संख्या ३३३ आहे. विजयासाठी ३२८ मतांची गरज आहे. महायुतीकडे बहुमत असले तरी कोणत्याही प्रकारची जोखीम न पत्करण्याच्या भूमिकेमुळे शिवसेनेने पुढाकार घेत सर्व मतदारांना सहलीवर नेण्याचे नियोजन केले आहे. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका सदस्य या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू शकतात. युतीच्या पारड्यातील ३३३ मतदारांपैकी गुरुवारी (१५ ऑगस्ट) सुमारे ३२० मतदार सहलीसाठी इगतपुरीला रवाना झाले. त्यांच्यासाठी खास बसची व्यवस्था करण्यात आली होती. क्रांतीचौकातून हे मतदार इगतपुरीकडे रवाना झाले.

\Bमहापौर, उपमहापौरही रवाना

\Bमहापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती जयश्री कुलकर्णी, सभागृहनेते विकास जैन व अन्य काही पदाधिकारी शुक्रवारी रात्री इगतपुराला रवाना होणार आहेत. शनिवार आणि रविवारी शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री एकनाथ शिंदे इगतपुरीत या सर्वांची भेट घेवून मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी दुपारनंतर सर्व मतदार इगतपुरीहून औरंगाबाद - जालन्याच्या दिशेने निघतील. रात्री त्यांचे आगमन होईल. सोमवारी ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध संघाची क्षमता वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दर्जेदार उत्पादनाच्या बळावर वाढत्या स्पर्धेचा सामना करणाऱ्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने उत्पादन क्षमता वाढवली आहे. त्यासाठी गांधेली येथील मुख्य डेअरीचे विस्तारीकरण, अत्याधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, येत्या महिनाभरात प्रकल्पाचे लोकार्पण सोहळा होईल, अशी माहिती संघाने दिली.

देवगिरी महानंद या ब्रँडने उत्पादने बाजारात आणणाऱ्या दूध संघाला जिल्ह्यातील ४७५हून अधिक प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्थां नियमित दुधाचा पुरवठा करते. दूध उत्पादक सहकारी संस्था नाही, अशी ठिकाणी नवीन संस्था स्थापन करत त्यांना बळकट देणे, शेतकऱ्यांना अनुदानावर कडबा कटर, इको मिल्क वाटप, दूध तपासणी संयत्र यांसह अन्य साधनाचे वाटपावर भर दिल्याने आजघडीला ४५ हजारांवर दूध उत्पादक शेतकरी जोडल्या गेले आहेत. गेल्या काही वर्षात दूध संकलना मोठी वाढ झाली असून, सरासरी रोज एक लाख लिटरवर संकलन होत आहे. दूध विक्रीसह साधे, मसाला ताक, श्रीखंड, आम्रखंड, तूप, फ्लेवर्ड मिल्क, दही, लस्सी, आइस्क्रिम, आदी दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती संघ करते.

संघाच्या उत्पादनांना जास्त मागणी असली तरी,त्याप्रमाणे पुरवठा करण्यात संघाला मर्यादा येत होत्या. आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे गांधेली येथील मुख्य डेअरी प्रकल्पातील सयंत्राची क्षमतेची कमतरता होय. हा प्रकल्प १९९६मध्ये उभारण्यात आला होता. प्रकल्पात दुधावर पाश्चरायझेशन आणि होमोजिनायजेशन या महत्त्वाच्या प्रक्रिया केल्या जातात. त्यावेळी ५० हजार लिटर दूध हाताळण्याची त्याची क्षमता होती. त्यामुळे संघाचे अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व संचालक मंडळाने पुढाकार घेत विस्तारीकरण, अत्याधुनिकीकरणाचे काम घेतल्याचे संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

डेअरी विस्तारीकरणासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत (एनपीडीडी) शासनाकडून दहा कोटी २६ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. प्रकल्पासाठी एकूण खर्च हा २० कोटीच्या घरात असून, उर्वरित रक्कम संघाने उभी केली आहे. त्याद्वारे आणि सिल्लोड तालुक्यातील भवन येथे शीतकरण केंद्राचे काम पूर्ण झाले. त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च आला असून, उर्वरित निधीतून गांधेली प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. सिव्हिल काम पूर्ण झाले असून यंत्रसामुग्री बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अत्याधुनिक होमोजिनायझर, प्रत्येक कंटेनरमधील दुधाची तपासणी करण्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्र आणि रसायन प्रयोगशाळा, इन्क्युबेशन रूम, दुग्धजन्य पदार्थ निमिर्ती विभाग, पॅकिंग, डॉक यार्ड, स्टोअर, बॉयलर, कॉप्रेसर; तसेच डीजी रुम यांसह अन्य अत्याधुनिक मशीनचा वापरावर भर देण्यात आला असून, यामुळे प्रकल्पाची क्षमता व गती वाढणार आहे.

निर्भेळ, दर्जेदार दूध हा संकल्प मानून संघा काम करीत आहे. दूधाचे संकलन वाढत असून त्यादृष्टीने गांधेली प्रकल्पाची क्षमता वाढविणे गरजेची होती. त्यादृष्टीने काम हाती घेतले. लवकरच या प्रकल्पाचा लोकापर्ण सोहळा होईल.

- नंदलाल काळे, उपाध्यक्ष, जिल्हा दूध संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विरोधी नगरसेवकांची कामे चार महिन्यांत पूर्ण करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची कामे चार महिन्यांत पूर्ण करावीत, असे आदेश मुंबई उच्च न्याच्यालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील, न्या. एस. व्ही. गंगापूरवाला यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

नगर पंचायतीमधील पाच विरोधी नगरसेवकांची कामे होत नसल्याने त्यांनी या अन्यायाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. फुलंब्री नगर पंचयतीमध्ये १७ नगरसेवक आहेत. यात भारतीय जनता पक्षाचे ११, शहर विकास आघाडीचे पाच आणि 'एमआययएम'चा एक नगरसेवक आहे. १३ डिसेंबर २०१७ रोजी सार्वत्रिक निवडणूक झाली. तेव्हापासून या आघाडीच्या नगरसेवकांच्या मागण्यांप्रमाणे त्यांच्या वॉर्डातील कामे होत नसल्याने त्यांनी ११ मे २०१८ व २८ डिसेंबर २०१८ असे दोन निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले होते. तरीही यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. यानंतर या पाच नगरसेवकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. यावर सुनावणी होऊन न्यायाधिश मंगेश पाटील व एस. व्ही. गंगापूरवाला यांनी नगरसेवकांची असलेली कामे चार महिन्यांत पूर्ण करावीत, असा आदेश जिल्हाधिकारी यांना दिला आहे.

आघाडीचे नगरसेवक रऊफ कुरेशी, मुदस्सर पटेल, गयाबाई प्रधान, मोहिनी काथार, व सुमैय्या मन्सुरी यांनी ही याचिका दाखल केली होती. ऑड. रवींद्र गोरे यांनी या नगरसेवकांची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या तयारीतील तिघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरोड्याच्या तयारी असलेले आमेर शेख रफिक शेख, तौसिफ खान मकसूद खान व जावेद खान कैसर खान या आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता, आरोपींना शनिवारपर्यंत (१७ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी दिले.

१४ ऑगस्ट २०१९ रोजी जटवाडा रोडवर संशयित हालचाली करीत असलेल्या आमेर शेख रफिक शेख (२३), तौसिफ खान मकसूद खान (२३) व जावेद खान कैसर खान (२२, सर्व रा. किराडपुरा) या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चाकू, फायटर, मोबाईल असा ३५ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याप्रकरणी सहाय्यक सरकारी वकील एन. ए. ताडेवाड यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रू जेटची अहमदाबाद-औरंगाबाद विमानसेवा एक सप्टेंबरपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रू जेट कंपनीने एक सप्टेंबरपासून अहमदाबाद-औरंगाबाद विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, शुक्रवार आणि रविवारी ही सेवा सुरू राहणार असून, याचे तिकीट बुकींग सुरू करण्यात आले आहे.

अहमदाबादेतून हे विमान औरंगाबाादसाठी दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी उड्डाण करणार असून, ते औरंगाबादेत पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पोहचेल. औरंगाबादेतून हे विमान सायंकाळी सहा वाजता अहमदाबादसाठी उड्डाण करणार असून, अहमदाबादला सायंकाळी सात वाजून २५ मिनिटांनी पोहचेल. तसेच हे विमान अहमदाबादवरून इंदूरकडे सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी उड्डाण करणार असून, पावणेआठ वाजता इंदूरला पोहचेल. इंदूर येथून सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी उड्डाण करणार असून अहमदाबादला सकाळी सव्वानऊ वाजता पोहचेल. अहमदाबादवरून हे विमान सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी जळगावकडे रवाना होणार असून, जळगावला दहा वाजून ५५ मिनिटांनी पोहचेल. जळगाववरून हे विमान सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी उ‌ड्डाण करणार असून, सात वाजून वीस मिनिटांनी जळगावला पोहचणार आहे.

\Bस्पाइस जेटची दिल्ली विमान सेवा सुरू

\Bस्पाइस जेट विमान कंपनीने देखील आठ ऑक्टोबरपासून औरंगाबाद दिल्ली विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. दिल्ली येथून सकाळी सहा वाजता हे विमान औरंगाबादकडे उड्डाण करेल. औरंगाबादेत सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी पोहचेल. औरंगाबादेतून सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी उड्डाण करून ते दिल्लीत सकाळी दहा वाजून विस मिनिटांनी पोहचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाजपेयींचा पडला पालिकेला विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजप-शिवसेना युतीची सत्ता असणाऱ्या महापालिकेला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा विसर पडला आहे. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वाजपेयी यांचा शुक्रवारी (१६ ऑगस्ट) स्मृतिदिन होता. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पालिकेतर्फे त्यांना आदरांजली अर्पण करणे संयुक्तिक होते, पण पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांना त्याचा विसर पडला. जपानच्या राजदूताच्या स्वागतासाठी पालिकेत सकाळपासून लगबग सुरू होती. स्वागतासाठी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे जातीने उपस्थित होते. पण त्यांना वाजपेयी यांच्या स्मृतिदिनाची आठवण झाली नाही. पालिकेच्या मुख्य सभागृहात वाजपेयी यांचे तैलचित्र लावण्याचा प्रस्ताव वाजपेयी यांच्या निधनानंतर लगेचच मंजूर करण्यात आला होता, पण अद्याप तैलचित्राचे अनावरण पालिकेने केले नाही. पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या वाजपेयींबद्दलच्या अनास्थेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान भाजपच्या उस्मानपुरा येथील विभागीय कार्यालयात वाजपेयी यांना राज्यमंत्री अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहर सरचिटणीस दिलीप थोरात, विवेक देशपांडे, जयश्री कुलकर्णी, राजेश मेहता, राजेंद्रसिंग जबिंदा, नरेंद्रसिंग जबिंदा, प्रदीप पाटील यांनी आदरांजली वाहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांना मिळणार मुद्रांक शुल्कात माफी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उद्योग उभारू इच्छिणाऱ्या उद्योजकांना मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा मोठा फायदा औद्योगिक क्षेत्राला होईल, असा विश्वास उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला.

राज्यात कुठेही नवीन उद्योग सुरू करावयाचा असल्यास त्याला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग विभागाकडून मुद्रांक शुल्कमाफी योजना राबविण्यात येत होती. परंतु, या माफी योजनेला दिलेली मुदत ३० सप्टेंबर २०१८ रोजी संपल्यापासून नवीन उद्योजकांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. एकट्या औरंगाबादेत उद्योगासाठी नवीन जागा घेणाऱ्या, नोंदणी करणाऱ्या अनेक उद्योगांना मुद्रांक शुल्कात कुठलीही सवलत मिळत नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल ऑफ इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चरने (मासिआ) मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, महसूलमंत्री, विकास आयुक्त यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून मुद्रांक शुल्क माफी बाबत त्वरित निर्णय जाहीर करावा, अशी मागणी केली होती.

दरम्यान, मुद्राक शुल्क माफीसंदर्भात औरंगाबाद, पुणे, नाशिकसह राज्यातील इतर भागातील उद्योजकांकडून सातत्याने मागणी केली जात होती. त्यानुसार, अधिकाऱ्यांची बैठक घेत मुद्रांक शुल्क माफीबाबत निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उद्योग राज्यमंत्री सावे यांनी दिली. नवीन उद्योग, विस्तारीत उद्योग प्रकल्प तसेच युनिट यांना देखील या योजनेद्वारे सवलतीचा लाभ मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची धूळफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोठा गाजावाजा करून गेल्या आठवड्यामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू केल्याची पत्रकार परिषद घेण्यात आली. प्रत्यक्षात मात्र ती केवळ चाचणीच होती. त्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगची धूळफेक सुरू असल्याचे चित्र सध्या आहे. प्रयोगासाठी नियमित वापरण्यात येणारे विमान सध्या परदेशात आहे. या प्रयोगाचे घोडे कुठे अडकले, यावर मात्र कुणीही बोलण्यास तयार नाही.

अत्यल्प पावसामुळे ३० कोटी रुपयांचे प्रयोगाचे कंत्राट वेदर मॉडिफिकेशन या कंपनीच्या माध्यमातून या प्रयोगासाठी देण्यात आले आहे. या प्रयोगाचे पूर्ण नियंत्रण शास्त्रज्ञांच्या हाती आहे. विभागीय प्रशासनाने या सगळ्या प्रकारावर मदत व पुनवर्सन विभागाच्या सचिवांशी चर्चा करून नेमके काय चालले आहे, याची माहिती घेतली. प्रयोग करण्यासाठी वापरण्यात येणारे विमान सध्या परदेशातच आहे. ते औरंगाबादेत आलेलेच नाही. सध्या आकाशात भरारी घेणारे विमानाच्या माध्यामातून केवळ रडारची चाचणी घेण्यात येत आहे. यावर प्रयोगासाठी नियमित जे विमान ठरले आहे, तेच पाठविण्याची मागणी आयुक्तांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतातील एक व परदेशातील एक असे दोन कंपन्यांकडे प्रयोगाचे कंत्राट असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

\Bआज विमान दाखल होणार\B

तांत्रिक बिघाडामुळे कृत्रिम पावसाचे विमान परदेशात होते. हे विमान शनिवारी औरंगााबदमध्ये येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील प्रयोगासाठी कंपनीने दोन विमाने ठेवली आहेत. प्रयोगासाठी अमेरिकेतीलच कंपनीने नियुक्त केलेली आहे. त्याला हैदराबादमधील एक कंपनी संलग्न आहे. यासोबत शास्त्रज्ञांचे पथकही औरंगाबादमध्ये दाखल होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फक्त २० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना फक्त प्रचारापुरती आहे. दोन वर्षांनंतरही जेमतेम २० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. या लाभार्थ्यांना चालू वर्षात पीक कर्ज नाकारण्यात आले. मराठवाड्यात दुष्काळाचे सावट असून रोजगार, चारा आणि पाणीप्रश्न गंभीर आहे. या मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे', अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा स्थगित करण्यात आली होती. ही यात्रा १९ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असलेल्या विधानसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा निघणार आहे. याबाबत राष्ट्रवादी भवन येथे शनिवारी पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी यात्रेची माहिती सांगितली. 'राज्यात पूरस्थिती असताना मराठवाड्यात दुष्काळाचे सावट आहे. जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी व रोजगाराचा प्रश्न उभा आहे. तब्बल ७५ टक्के शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. कर्जमाफीची घोषणा झाली तरी दोन वर्षात जेमतेम २० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती आहे. पण, राष्ट्रीयकृत बँकांकडे ठोस आकडेवारी नाही. जिल्ह्यातील २६ चारा छावण्या जुलै महिन्यात बंद करण्यात आल्या आहेत. या छावण्या तातडीने सुरू करण्याची गरज आहे. जायकवाडी धरणात पाणी असले तरी इतर प्रकल्प कोरडे आहेत. या प्रश्नांवर शिवस्वराज्य यात्रेत संवाद साधला जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. शिवस्वराज्य यात्रा ८० मतदारसंघात फिरणार असून मराठवाड्यातील १७ मतदारसंघाचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. राज्य सरकारच्या धोरणाबद्दल जनतेच्या मनात रोष असून निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील असे पाटील म्हणाले. यावेळी पैठण तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, शिवाजीराव गावंडे, जयमालसिंग रंधवा, अनिल फड, प्रल्हाद निर्फळ, विलास लिपाणे, रवींद्र माहूरकर, प्रवीण देसरडा उपस्थित होते.

\Bशिवस्वराज्य यात्रा उद्या जिल्ह्यात

\Bराष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सोमवारी (१९ ऑगस्ट) औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन सकाळी नऊ वाजता यात्रा निघेल. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. बालानगर येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभा होईल. तर दुपारी दोन वाजता बदनापूर येथे संवाद साधून ही यात्रा चार वाजता भोकरदनला पोहचणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेची हमी काय ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या छेडछाड प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी तक्रार आणि अहवाल आल्यानंतर सोमवारी (१९ ऑगस्ट) कारवाई करण्यात येणार आहे. ही घटना विद्यापीठ कॅम्पसमध्ये घडली नसल्याचा दावा करीत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली.

नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थिनीच्या छेडछाड प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने माहिती मागवली आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते व प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे कारवाई करणार आहेत. नाट्यशास्त्र विभागाच्या परिसरात मध्यरात्री छेडछाडीचा गंभीर प्रकार घडल्यानंतरही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार डीकेएमएम कॉलेज परिसरात झाला असून विद्यापीठात झाला नसल्याचा दावा रेटला जात आहे. प्रत्यक्षदर्शी सुरक्षारक्षक, विद्यार्थी, प्राध्यापकांनी हा दावा फेटाळला आहे. अंगावरील जबाबदारी ढकलण्यासाठी बनाव उभा केला जात आहे. परराज्यातील विद्यार्थिनीच्या पालकांना पाठबळ देण्याऐवजी प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणणे योग्य नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. छेडछाडीची घटना घडल्यानंतर विद्यार्थिनी तणावाखाली आहे. तिचे पालक शनिवारी सकाळी शहरात पोहचले. विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक आणि काही विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेऊन धीर दिला. या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून संबंधित विद्यार्थिनीकडून खुलासा लिहून घेण्यात आला आहे. ही घटना बाहेर घडल्याचे पत्रात नमूद केले आहे. मात्र, हा खुलासा दबावाखाली लिहून घेतल्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे विद्यार्थिनीकडून खुलासा लिहून घेण्यात आला. पण, विद्यार्थ्याला मोकळीक दिली असून हा विद्यार्थी अजूनही विभागात आला नाही. या विद्यार्थ्यावर कठोर कारवाईची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

पालक चिंतातूर

नाट्यशास्त्र विभागाची विद्यार्थिनी परराज्यातील असून शिक्षणासाठी औरंगाबादेत आली. तिच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पालक चिंतातूर आहेत. दोन दिवस सुटी असल्यामुळे विद्यापीठ बंद आहे. त्यामुळे पालक सोमवारी प्रकुलगुरू आणि कुलसचिवांची भेट घेणार आहेत. सुरक्षिततेची हमी मिळाली तरच मुलीला राहू देईल. अन्यथा, सोबत घेऊन जाणार असल्याचे पालकांनी प्रशासकीय अधिकाऱ्याला सांगितले.

---

मटा भूमिका

---

\Bसुरक्षित वातावरण हवे

\B---

विद्यापीठामध्ये मुले मद्यपान करून येतात आणि त्यातून पुढचा सगळा प्रकार घडला. हे खरोखर चिंताजनक आहे. विद्यार्थिनी शहरातील असो की परराज्यातील, त्यांना सुरक्षित वातावरण मिळायलाच हवे. आपण त्यांना मुक्त श्वास घेऊ दिला तरच त्यांचे भवितव्य उज्ज्वल असेल. मुलांमध्ये ही शिकवण खरे तर घरातून रुजली पाहिजे. प्रत्येकाच्या घरात आई, ताई असते. आपण असे प्रकार करण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचा विचार करावा. त्यातून काही बोध झाला तर होईल. कारण कायदा, विद्यापीठ, पोलिस हे सगळे बाह्य निर्बंध झाले. काही-काही गोष्टीत बदल होण्यासाठी माणूस म्हणून आपल्यालाही बदलले पाहिजे. उठसूठ महिला सक्षमीकरणाच्या गप्पा झोडून काही होणार नाही. महिला, मुलगी कुठल्याही घरातली असो, तिला सगळीकडे सुरक्षित वातावण मिळावे. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून हे आपले कर्तव्यच आहे. ते सगळ्यांनी नीट बजावावे. कुलगुरूंनी हा प्रकार गांभीर्याने घेत प्रकरण योग्य हाताळावे. जेणे करून विद्यार्थिनींना विद्यापीठ सुरक्षित वाटेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अतिक्रमण हटाव’चे आदेश अडगळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे इशारे दिले. त्यानंतर तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मात्र, कारवाईची कसलिही हालचाल नाही. त्यामुळे अतिक्रमण हटाव विभागातील अधिकारी, कर्मचारी हे प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिका प्रशासनाने सहा वर्षांपूर्वी रस्त्यांचे रुंदीकरण केले. परंतु रुंद केलेल्या रस्त्यांवर हातगाड्या, टपऱ्या आणि शेडचे अतिक्रमण झाले. त्यामुळे रुंद केलेले रस्ते पुन्हा अरुंद झाले. या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवा, अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार केली, पण त्यांच्या मागणीकडे तेवढ्या गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर देखील महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेची घोषणा केली. प्रामुख्याने जुन्या शहरातील, शहागंज परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश त्यांनी अतिक्रमण हटाव विभागाला दिले. महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आमखास मैदानाच्या बाजूने दुकाने थाटण्यात आली आहेत. दुकानांचे हे अतिक्रमणच असून सर्व दुकाने पाडून टाका, असे आदेश देखील महापौरांनी दिले. त्यानुसार अतिक्रमण हटाव विभागाने दोन वेळा कारवाई देखील केली, परंतु पुन्हा या ठिकाणी दुकाने थाटण्यात आली आहेत. आता या ठिकाणी चार चाकी वाहनांच्या रि सेलचे दुकान थाटण्यात आले आहे.

\B...पुन्हा त्याच ठिकाणी दुकाने

\Bदिल्ली गेट परिसरातील जुने फर्निचर विकणाऱ्यांची दुकाने मुख्य रस्त्याच्या लगत आहेत. या दुकानांवर पालिकेने अनेकवेळा कारवाई केली. कारवाई केल्यानंतर लगेचच काही तासांनी पुन्हा त्याच ठिकाणी दुकाने थाटली जातात. जुन्या शहरातील रस्त्यांवर व प्रामुख्याने शहागंज, चमन भागातील रस्त्याच्या बाजूने झालेल्या टपऱ्या आणि हातगाड्यांच्या अतिक्रमणांबद्दल देखील अतिक्रमण विभागाला अनेकवेळा आदेश देण्यात आले व ती अतिक्रमणे हटविण्याचे सांगण्यात आले. मात्र, या ठिकाणी जुजबी कारवाई करून अतिक्रमण हटाव विभागाचे पथक नामानिराळे होते. त्यामुळे रस्त्यावरची अतिक्रमणे आहे तशीच आहेत. टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा, गजानन महाराज मंदिर परिसर, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, टी.व्ही. सेंटर चौक आदी भागात देखील रस्त्यांवरील अतिक्रमणांची स्थिती अशीच आहे. अतिक्रमण हटाव विभागाचे पथक तोंडदेखली कारवाई करते असा आरोप या भागातील नागरिक करतात.

सोमवारपासून रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली जाणार आहे. वाहतूक पोलिस आणि संबंधित पोलिस ठाणे यांच्याशी समन्वय राखून अतिक्रमणे हटविण्याचे काम केले जाणार आहे. त्याचे सूक्ष्म नियोजन देखील करण्यात आले आहे.

\B- रवींद्र निकम, उपायुक्त, महापालिका

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बॅँकांकडून आराखडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन कोटींपर्यंत नेण्याचा संकल्प सरकारने केला आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थ व वित्त विभागाच्या सहकार्याने देशाभरातील बँकांमार्फत थेट सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क असलेल्या शाखा व्यवस्थापकांच्या बैठका घेतल्या जात आहेत. बँकांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींवर चर्चा सुरू असून, या सर्व मागण्याचा विचार करून एक आराखडा तयार करून तो केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे,' अशी माहिती सिंडिकेट बँकेचे उपमहाव्यवस्थापक कुलविंदर सिंग आणि प्रादेशिक व्यवस्थापक हरीश गुंडेकर यांनी दिली.

सिंडिकेट बँकेच्या वतीने शाखा व्यवस्थापकांसोबत विशेष बैठक शहरातील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आली होती. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीची सुरुवात शनिवारी झाली. बैठकीत हरिश गुंडेकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी कुलविंदर सिंग यांची उपस्थिती होती. यावेळी कुलविंदर सिंग यांनी दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीबाबत माहिती दिली. गुंडेकर म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन कोटीपर्यंत नेण्यासाठी शासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांच्या अडीअडचणी आणि त्यांच्यावरील एकूण कामाच्या व्यापाची माहिती घेत आहोत. बँकांच्या पाच वर्षांच्या कामगिरीची माहिती घेण्यात येत आहे. यातून बँकांच्या विविध कार्याचे मूल्यांकन आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचे काम केले जाणार आहे. या कार्यामध्ये डिजिटल पेमेंट, बिझनेस, एमएसएमईसाठी कर्ज, तंत्रज्ञानाचा वापर, रिटेल कर्ज, कृषी कर्ज आणि बँकेमध्ये कॉर्पोरेट शासन याचा समावेश करून आराखडा तयार केला जाणार आहे. हा आराखडा प्रादेशिक व्यवस्थापकांच्या बैठकीत ठेवण्यात येईल. त्यानंतर झोनल बैठकीत मांडण्यात येईल. त्यानंतर केंद्रीय पातळीवर हा आराखडा तयार करून तो केंद्रीय वित्त मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे.

\Bशाखा वाढविण्याचा विचार

\B'गेल्या सहा मे रोजी सिंडिकेट बँकेने औरंगाबाद हे स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय म्हणून घोषित केले आहे. पूर्वी हा विभाग आधी नागपूर व नंतर नाशिकला जोडण्यात आला. मात्र, आता स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय झाल्यानंतर ग्रामीण भागात बँकेच्या शाखा वाढविण्याकडे कल राहणार आहे,' अशी माहिती गुंडेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणात उच्चवर्णीयांची मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देशाच्या शासनकर्त्यांनी शिक्षण उच्चवर्णीयांसाठी उभे करण्याचा कट रचला आहे. त्यांचा उच्चवर्णीयांची मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,' असा आरोप प्रा. सुशिला मोराळे यांनी शनिवारी केला. त्या अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेतर्फे आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावरील परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापक सभेचे अध्यक्ष माजी आमदार जयवंतराव ठाकरे होते. कार्यक्रमाला शरद जावडेकर, अजमल खान, एस. पी. जवळकर आदींची विशेष उपस्थिती होती. यावेळी प्रा. मोराळे म्हणाल्या, 'आपल्या मुलांना शिक्षण मिळत आहे, पण त्यांना मिळणाऱ्या शिक्षणाची चिंता करण्याची वेळ राज्यकर्त्यांमुळे आपल्यावर आली आहे. त्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. त्यात आपण शिकार होत चाललो आहोत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांना विक्रेते तर विद्यार्थ्यांना ग्राहक बनवले आहे. शैक्षणिक संस्थांना कंपनी संबोधले आहे. नवीन शैक्षणिक धोरण ठरवताना राज्यकर्त्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत,' अशी टीका त्यांनी केली. शरद जावडेकर यांनी शिक्षणाचे अर्थकारण या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९मध्ये सरकारने शिक्षण क्षेत्रात भांडवलदारांनी लुटमार करावी म्हणून शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी सताड उघडी केली आहेत. त्यामुळे या धोरणाची चिकित्सा होणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात पाहिजे तेवढी जागृती दिसत नाही आणि राज्यकर्त्यांना तेच हवे आहे,' असा उल्लेख देखील त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहलीत बजावला मतदानाचा हक्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इगतपुरी येथे सहलीसाठी गेलेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला व आपले मतदान बाद होणार नाही याची खात्री करून घेतली. या मतदारांना शिवसेना - भाजपच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. सर्व मतदार रविवारी सायंकाळी औरंगाबादेत परतणार आहेत.

औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप महायुतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी (१९ ऑगस्ट) या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यानच्या काळात युतीच्या मतदारांना इगतपुरी येथे सहलीला नेण्यात आले आहे. एका हॉटेलमध्ये या सर्वांना ठेवले असून शनिवारी त्यांच्याशी शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी संवाद साधला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, आमदार अनिल परब, माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी महापौर भगवान घडमोडे, उमेदवार अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख नेत्यांनी मतदारांना मतदानाची पद्धत समजवून सांगितली. त्यानंतर डमी मतपत्रिका तयार करून प्रत्येकाकडून मतदान करून घेण्यात आले. मतदान करताना कुणी चुकत असेल तर त्याला मार्गदर्शनही करण्यात आले. दानवे यांना पहिल्याच पसंतीचे मत पडले पाहिजे, कुणाचेही मत बाद होता कामा नये, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिरीष बोराळकर यांना मुद्दाम इगतपुरीला पाठवले होते. त्यांनी मतदारांना मार्गदर्शन केले. बोराळकर म्हणाले, दरवेळी ही निवडणूक अटीतटीची होते. यंदाची निवडणूक मात्र एकतर्फी निवडणूक आहे. आपला उमेदवार दोनशेपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल. प्रत्येकाने मतदान करताना काळजीपूर्वक मतदान केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. सुभाष देसाई यांनी देखील मतदानाची पद्धत उपस्थितांना समजवून सांगितली. एकही मत बाद व्हायला नको असे ते म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. निवडणुकीत भाजपचे २०२ तर शिवसेनेचे १४१ मतदार आहेत. यापैकी जालना जिल्ह्यातील मतदारांपैकी सुमारे ८० मतदार औरंगाबादेत हॉटेल व्हिटसमध्ये मुक्कामाला आहेत, उर्वरीत मतदारांना इगतपुरीला नेण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images