Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गजबजलेले बस स्थानक सध्या शांत

$
0
0
एकेकाळी शहरात चालणाऱ्या सिटीबस शहागंज आणि रेल्वे स्टेशन या स्थानकातून धावत होत्या. मात्र रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे शहरातील सिटीबस सेवा बाधीत झाली असल्याने या रस्त्यांवर शहर बस सुरू नाही. यामुळे शहागंज बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन येथील बस स्टेशन हे खासगी पार्किंगमध्ये रूपांतरीत झाले आहे.

३ पुलांमुळे श्वास कोंडला

$
0
0
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तीन पुलांना शहराच्या पश्चिमेकडील मोठ्या वसाहतींचा श्वास कोंडला आहे. कमकुवत झालेल्या पुलांमुळे हा मोठा परिसर गेल्या काही वर्षांपासून सिटीबस पासून वंचीत राहिला आहे.

सौरऊर्जा प्रकल्पातून विजेसह पैशांची बचत

$
0
0
वाढती विजेची मागणी, त्यामुळे वाढणारा आर्थिक भार लक्षात घेऊन, यावर कायमस्वरूपी उपाय व्हावा, या उद्देशाने एमआयटी इंजिनीअरिंगने सौर उर्जा प्रकल्पाचा आधार घेतला आहे. कॉलेजच्या छतावर कॉलेजने तब्बल दोनशे किलोवॉट क्षमतेचा प्रकल्प उभारला असून पैशाची बचत आणि स्वस्त वीज उपलब्ध होणार आहे.

रिलायन्सचे खोदकाम सुरूच

$
0
0
खोदकाम बंद करण्याचे पालिकेच्या शहर अभियंत्यांचे आदेश धाब्यावर बसवत रिलायन्स कंपनीचे शहराच्या विविध भागात खोदकाम सुरुच आहे. शनिवारी दशमेशनगरात खोदकाम झाल्यामुळे वाहतुकीला कमालीचा अडथळा निर्माण झाला होता.

गौण खनिजाची मोठी लूट

$
0
0
हिमायतनगरजवळील सिरंजणीकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत आहे. शासकीय सुट्ट्यांचा फायदा घेऊन गौण खनिज तस्कर मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

१६ लाखांची बॅग पळवली

$
0
0
जिनिंग मिलच्या व्यवस्थापकांची १६ लाख ६० हजार रुपये चोरट्याने लंपास केले. फिर्यादी वैजापुरहून शिऊरकडे दुचाकीवरुन जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन आरोपींनी पैशांनी भरलेली बॅग हिसकावून घेत धूम ठोकली.

खैरेंच्या विरोधात तगडा उमेदवार

$
0
0
शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना कानपिचक्या देत, आगामी लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या विरोधात तगडा उमेदवार दिला जाईल, असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी सांगितले. आपण मात्र खासदारकीची निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

२ युवतींवर सामूहिक बलात्कार

$
0
0
वाळूज औद्योगिक वसाहतीतील कंपनीत प्रशिक्षणार्थी असलेल्या दोन तरुणींवर शुक्रवारी रात्री भांगसी माता गडाजवळ सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. पीडित तरुणी मूळच्या अमरावतीच्या असून, त्यांना उपचारांसाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

‘कव्हर’ मे रहने का!

$
0
0
मोबाइल... सर्वांचाच जिवाभावाचा व जिव्हाळ्याचा विषय. त्यातल्या त्यात तरुणाईनेतर अक्षरश: डोक्यावर घेतलेला हा विषय. हल्ली स्मार्ट फोनचा जमाना आहे.

सीरिअल म्हणजे नोकरीच

$
0
0
जाहिरात, सीरिअल, सिनेमा, रंगभूमी, लिखाण या सर्वच प्रकारांचा विचार करताना, सीरिअलमध्ये काम करणं आजकाल नोकरीच झाली आहे, असं अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी व्यक्त केलं. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या आल्या होत्या. त्यांनी विविध मुद्यांवर ‘औरंगाबाद टाइम्स’शी संवाद साधला.

माझा घोषवाक्यांचा संग्रह

$
0
0
माझ्या घोषवाक्याला बक्षीस मिळालं आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्क वॉ यास माझ्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली.

भूतकाळात नेणारं गाणं

$
0
0
हिंदी सिनेमातील काही अर्थवाही गाण्यांनी मन भरून येतं. पुष्कळ गाणी अशी आहेत, की मनाच्या कोपऱ्यातल्या अगदी हळूवार, करूण, विनोदी भावभावना जागृत करतात. नकळत मन त्याला प्रतिसाद देते आणि क्षणात आपण त्या गाण्यातल्या आशयामुळे थेट तो गतप्रसंग पुन्हा अनुभवू शकतो.

हरवलेल्या बॅगचे आव्हान

$
0
0
अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या विदेशी महिला पर्यटकाची बॅग हरवली. तिने पोलिसांत तक्रारही दाखल केली. ही बॅग माझ्या मैत्रिणीची असल्याचे सांगूत दुसऱ्या एका कोरियन महिलेने सोबत नेली आहे. आता पोलिसांसमोर ती बॅग संबंधित महिलेपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान आहे.

रेल्वे स्टेशनमुळे गाड्यांच्या वेगाला वेसण

$
0
0
नगरसोल रेल्वे स्थानक रेल्वे गाड्यांच्या वेगात खोडा निर्माण करण्याचे काम करत आहे. स्थानकावरील एक साइडलाइन दिवसातून बारा तास रेल्वेच्या पार्किंगसाठी बुक असते. त्यामुळे इतर गाड्यांच्या वेगावर परिणाम होतो.

शस्त्र, जमावबंदीचे पोलिस प्रशासनाचे आदेश

$
0
0
शहरात येत्या काही दिवसामध्ये विविध संघटनांची आंदोलनांची शक्यता आहे; तसेच १९ फेब्रुवारी रोजी शिवजंयती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी २० फेब्रुवारीपर्यंत शस्रबंदी, जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

‘महावितरण’ दरवाढ : तक्रारी नोंदवाव्यात

$
0
0
महावितरण कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेला ९ हजार ३१२ कोटी रुपये म्हणजेच २१ टक्के दरवाढीचा प्रस्ताव सूचना व हरकतीसाठी जाहीर करण्यात आला आहे. आयोगाने पूर्वी मंजूर केलेल्या रक्कमांसह एकूण वाढ रुपये १२ हजार ६७२ कोटी म्हणजे २८.६ टक्के होते.

बजाजनगरात कचऱ्याचे ढीग

$
0
0
बजाजनगरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात घनकचरा उचलण्याचे काम खासगी वाहतूकदार करतात. त्यावर वर्षाकाठी ५० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यात येतो. ८० हजार लाकेसंख्या असलेल्या या वस्तीसाठी १५ मजूर आणि पाच ट्रॅक्टर प्रत्येकी दोन खेपा करतात.

जलसंधारण योजनेत ६० कोटी रुपयांचा घोळ

$
0
0
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षात शून्य ते शंभर हेक्टर सिंचन क्षमतेच्या जलसंधारण योजनेच्या कामात राज्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. रायगड जिल्ह्यातील जांभरुंग, डोंगरपाडा तसेच औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीच्या कामात साठ कोटी रुपयांचा निधी वाटप करतेवेळी अनियमितता झाली आहे.

बालकाच्या मृत्यूनंतर जीप पेटविली

$
0
0
भरधाव टाटा सुमोच्या धडकेमध्ये सायकलस्वार मुलगा जागीच ठार झाला. त्यानंतर संतप्त जमावाने सुमोचालकाला बेदम चोप देत, सुमो पेटवून दिली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजता हडको कॉर्नर भागात घडली.

महिलांना हक्क दिले पाहिजेत

$
0
0
काँग्रेसच्या शेतकरी महिला विकास सेलच्या राज्य संयोजक आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्य ज्योत्स्ना विसपुते या शनिवारी औरंगाबाद दौऱ्यावर होत्या. शेतीत महिलांचा सहभाग ७५ टक्के असूनही त्या प्रमाणात महिलांना हक्क दिले जात नाहीत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images