Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आजपासून परीक्षकांची ‘परीक्षा’

$
0
0
दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सोमवारपासून सुरुवात होत आहे.यं दा प्रथमच प्रात्यक्षिक परीक्षा चक्क ओळखपत्राविना घेण्यात येत आहेत. दहावीच्या ‘प्रिलिस्ट’मध्ये चुकाच चुका असल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला प्रात्यक्षिक परीक्षेआधी विद्यार्थ्यांना ओळखपत्र देता आले नाही.

सिटी बस फेऱ्यांचे ‘टायमिंग’ चुकीचे

$
0
0
रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांनाही वेळेत शहर बससेवा मिळत नसल्याने प्रवाशांना रिक्षांवर अवलंबून राहावे लागत आहे. औरंगाबाद महानगरप‌ालिकेकडून अकोला प्रवासी वाहतूक, एएमटीकडून सार्वजनिक वाहतूक सेवा चालविताना औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष बस व्यवस्था देण्यात आली होती.

वाशीजवळील अपघातात ३ ठार

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशीजवळ रविवारी सकाळी साडेनऊ वाजता कंटेनर आणि कार यांच्या टकरीमध्ये तीन जण ठार झाले. मृतांमध्ये पंढरपूरचे महंत श्री मेधशाम गोपाळराव जालनापूरकर महाराज (वय ६५) यांचा समावेश आहे.

महायुतीचा ‘महाएल्गार’

$
0
0
वाढती महागाई, भ्रष्टाचार, लोडशेडिंग, मंत्र्यांचा मुजोरपणा आदी मुद्द्यांना स्पर्श करीत, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका करीत महायुतीच्या नेत्यांनी रविवारी बीडमधून राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात ‘महाएल्गार’ पुकारला! राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार यांना या वेळी लक्ष्य करण्यात आले.

शिवसेनेचे माजी आमदार काँग्रेसमध्ये

$
0
0
शिवसेनेचे माजी आमदार नामदेवराव पवार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कन्नड येथे झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

‘ए तिकीट तिकीट... चलो भाई तिकिट निकालो...’

$
0
0
‘ए तिकीट तिकीट... चलो भाई तिकिट निकालो... ’; ‘ ए भाऊ काय करतोय रेऽऽ’ ‘ए असं नाही तसं गाऊ...’, ‘अरे बाबा असं नाही तसं बोलायचं, असं वागायचं’ ही अशी एक ना अनेक वाक्य कानावर येत होती कुठेतरी हसणं, मजा करणं, संवाद साधणं, आणि नाटक-एकांकिका- अभिनय काय असतं हे समजून घेणं सुरू होतं, निमित्त होतं गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये सुरू असलेल्या बालनाट्यशिबिराचं.

व्याख्यानमाला गुरूवारपासून

$
0
0
येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी कॉलेजच्या गेल्या २३ वर्षांपासून सुरू असलेल्या ‘शाहू-फुले-आंबेडकर’ व्याख्यानमालेचे आयोजन या वर्षी २० फेब्रुवारीपासून करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. शिवाजीरान थोरे आणि नियमाक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे यांनी दिली.

शास्त्रीय नृत्य म्हणजे पावित्र्य

$
0
0
‘शास्त्रीय नृत्यात स्त्री कलाकारांना अधिक संधी असली तरी उत्तम सादरीकरणामुळे पुरुष कलाकारांनीही स्वतंत्र स्थान मिळाले आहे. नृत्यातील परिपक्वपणा आणि अभ्यास निश्चितच संधी मिळवून देतो. आगामी काळात पुरुष कलाकारांनाही संधीचे दालन खुले होईल’, असा विश्वास प्रसिद्ध कुचिपुडी नर्तक एन. गुरुराजू यांनी व्यक्त केला.

यात्रांचा ‘रंग’ सुनासुना

$
0
0
जिल्ह्यातील यात्रांचा हंगाम सुरू असून भाविकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा मंडळ आणि टुरिंग टॉकिजचालक सज्ज आहेत. सध्या मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झाल्यामुळे लोकनाट्य मंडळांना पूर्वीसारखे बुकिंग मिळत नाही. या कारणामुळे बहुतेक तमाशा मंडळांनी पश्चिम महाराष्ट्रातील यात्रांना प्राधान्य दिले आहे, अशी माहिती कलाकारांनी दिली.

संगीत ठरतंय ‘वेदनाशमक’

$
0
0
संगीताच्या श्रवणाने चंचलता कमी होऊन एकाग्रता वाढते, त्यामुळेच अनेक आजारांवर ‘म्युझिक थेरपी’ महत्त्वाची ठरत आहे. औषधांच्या मात्रेबरोबरच पूरक उपचार म्हणून असणारी ही थेरपी औरंगाबामध्येही लोकप्रिय होत आहे. संगीताची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी ही थेरपी उपयुक्त ठरत आहे.

नाट्य महोत्सवात आज ‘पोतराज’

$
0
0
महात्मा गांधी मिशनच्या नाट्यशास्त्र महाविद्यालयाच्यावतीने सोमवारपासून नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी ‘पोतराज’ एकांकिका सादर होणार आहे.

स्ट्रग्लर्सना आधार बक्षिसांचा

$
0
0
एकांकिका आणि नाट्य स्पर्धांतून विद्यार्थी कलाकारांच्या कलागुणांना संधी मिळत असते. अभिनयकौशल्य सिद्ध करण्यासाठी विद्यार्थी नेटाने प्रयत्न करतात; मात्र काही विद्यार्थ्यांची कौटुंबिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम त्यांना आधार ठरलीय.

‘NCDX’वर कारवाई करा

$
0
0
सध्या आडत बाजारात तुरीची आणि हरभऱ्याची आवक चांगली आहे. भाव मात्र हमीभावा पेक्षा कमी असल्यामुळे त्याची खरेदी सहकार विभागाने बाजार समितीवर बंधने आणून बंद केली आहे. जो व्यापारी हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करेल त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पतसंस्था नोंदणीवरील निर्बंध हटविले

$
0
0
निकषांच्या मर्यादा वाढवित राज्य सरकारने पतसंस्था नोंदणीवर २००८ साली घातलेले निर्बंध हटविले आहेत. याचा लाभ नागरी, ग्रामिण, महिला किंवा मागास वर्गीय पतसंस्था नोंदणी करू इच्छिणाऱ्यांना होणार आहे.

गॅस सबसिडी खात्यातून गायब

$
0
0
घरगुती गॅस ग्राहकांना मिळणारी सबसिडीची रक्कम बँक खात्यातून परस्पर गायब झाल्याचा अजब नमुना उस्मानाबाद येथील कॅनरा बँकेत अनुभवायास मिळाला. त्यामुळे गॅस कंपन्या ग्राहकांची फसवणूक करून शासनाची लुबडणूक करीत असाव्यात असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ज्येष्ठ नागरिकाच्या जमिनीची परस्पर विक्री

$
0
0
ज्येष्ठ नागरिकाच्या इनामी जमिनीची परस्पर विक्री करणा-या पाच आरोपी विरुध्द, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात हा प्रकार घडला होता. रमानगर भागातील लाला चोखा शिंदे (वय ७०) यांची भांबडी (ता. औरंगाबाद) येथे गट क्रमांक ३६ मध्ये एक हेक्टर ३ गुंठे इनामी जमीन आहे.

स्वातंत्र्यसैनिकांचे प्रकरण CID कडे

$
0
0
मंत्रालयातून स्वातंत्रसैनिकांच्या गहाळ फायलींच्या प्रकरणाची सीआयडीमार्फत (गुन्हे अन्वेषण विभाग) चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाईचे आदेश राज्य मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहे.

जनावरांची चोरी

$
0
0
तालुक्यातून शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात सतरा बैल व तीन गायींची चोरी झाली. चोरट्यांनी रात्रीतून जनावरे चोरून नेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या चोरीची नोंद अजिंठा व सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

शेंगदाणा, साखरेचे भाव घसरले

$
0
0
शेंगदाणे, साखरेसह अन्य किराणा मालाच्या भावात घसरण होण्यास सुरवात झाली आहे. खाद्यतेलाचे भावही लिटरमागे तब्बल पाच ते दहा रुपयांनी कमी झालेत. यंदा पीकपाणी चांगले झाल्याने नवीन शेतमालाची आवक बाजारात वाढली आहे. त्याचा परिणाम किराणा मालांच्या किंमतीवरही होऊ लागला आहे. बाजारात नवीन साखरचे आवक येऊ लागताच साखरेच्या किंमती तीन ते चार रुपये प्रति किलोने कमी झाल्या.

घरांच्या मागणीसाठी मोर्चा

$
0
0
मिटमिटा येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी सोमवारी (१७ फेब्रुवारी) जागेच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विनोद पाटील यांनी त्यांचे नेतृत्व केले. मिटमिटा येथील गट नंबर ३०७मध्ये सुमारे २५० एकर जागा आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images