Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘मेक - उत्सव’मध्ये तरुणाईची धम्माल

$
0
0
इंजि‌नीअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा ‘मेक - उत्सव’ एमआयटीच्या प्रांगणात रंगला आहे. यात ‘टेक्निकल’ते ‘फन गेमपर्यंत’च्या इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीचे दर्शन घडले.

सामाजिक जाणीव शब्दांच्या हिंदोळ्यावर

$
0
0
‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ म्हणत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी मराठी कवितेला अधिक समृद्ध केले. मराठी दिनाचे औचित्य साधून समृद्ध कवितेची परंपरा कायम टिकवण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने कवी संमेलन आयोजित केले.

पाटलांचा अनोखा मळा

$
0
0
सिमेंटच्या जंगलात बागा फुलविण्यासाठी जागा उरल्या नाहीत आणि त्यामुळे मनुष्याचे जीवनही रुक्ष होत गेले. त्यातच रासायनिक औषधयुक्त पालेभाज्या आणि फळभाज्यांमुळे मानवी आयुर्मानच कमी होत आहे.

विद्यार्थी रंगले काव्यात

$
0
0
सामाजिक सद्यस्थितीवर परखड भाष्य करतानाच विनोदातून भल्याभल्यांची रेवडी उडवत मान्यवर कवींनी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित कवी संमेलन गाजवले. जागतिक मराठी दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात कवी संमेलन पार पडले.

‘अॅडव्हेंचर’चा थरार आजपासून

$
0
0
चित्तथरारक प्रात्यक्षिकांच्या स्वरुपात भावी अभियंते ‘अॅडव्हेंचर’चा थरार अनुभवणार आहेत. भावी अभियंत्यांच्या कल्पनाशक्ती, सामर्थ्याचे दर्शन घडविणारा ‘अॅडव्हेंचर’ हा इव्हेंट एमआयटीच्या मैदानावर शनिवारपासून (दि.१ मार्च) रंगणार आहे.

विक्रीकर रिटर्न न भरणाऱ्या २ संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल

$
0
0
विक्रीकर रिटर्न मुदतीच्या आत न भरणे, वेळोवेळी नोटीस पाठवूनही उत्तर न देणे या कारणावरून विक्रीकर विभागाने दोन व्यापारी संस्थांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. रिटर्न दाखल न केलेल्या व्यापारी संस्थांनी लवकरात लवकर पूर्तता केली नाही, तर अशीच कारवाई केली जाईल, असे संकेत विभागाने दिले आहेत.

रेल्वे भरती फसवणूक; आरोपींना पोलिस कोठडी

$
0
0
रेल्वे भरती फसवणुकीतील कोटा येथून अटक करून आणलेल्या तीन आरोपींना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले. या वेळी त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

‘मॅचवेल’मधून ७५ हजार लंपास

$
0
0
गुलमंडीवरील मॅचवेल दुकानात चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. तीन चोरट्यांनी गच्चीवरील दरवाजा तोडून प्रवेश करीत गल्ल्यातील ७५ हजार रुपये पळवले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन प्रमाणपत्र : औरंगाबाद राज्यात प्रथम

$
0
0
‘संग्राम सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून चार महिन्यांमध्ये २७ हजार ६९९ प्रमाणपत्रे देऊन औरंगाबाद जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. ग्रामविकास खात्याने राज्यातील ग्रामपंचायतींना ‘संग्राम सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून १९ प्रकारची प्रमाणपत्रे ऑनलाइन देणे बंधनकारक केले आहे.

राज्याच्या निर्णयानुसार वीज बिलांमध्ये कपात

$
0
0
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, वीज बिलात २० टक्के कपात केलेली देयके या महिन्यात आली आहेत. या निर्णयाचा शहरातील सुमारे सव्वा दोन लाख वीज ग्राहकांना दरमहा जवळपास १६ कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. मात्र, ‘एमईआरसी’ पुढील प्रस्तावामुळे ग्राहकांच्या डोक्यावर दरवाढीची तलवार कायम आहे.

राज्यपालांच्या निर्देशांना खो

$
0
0
राज्यपालांनी दिलेल्या निर्देशांवर नियोजन विभागाने कार्यवाही केली की नाही, याची राज्यपाल के. शंकर नारायणन यांनी विचारणा केली आहे. २००९च्या निर्देशांनुसार, अपेक्षित असलेला अहवाल अद्याप राज्यपालांना सादर करण्यात आलेला नाही.

नेत्यांची फौज, कार्यकर्ते गायब

$
0
0
राज्यातील १६ मंत्र्यांना भ्रष्टाचारी ठरवित रावणरुपी पुतळा दहन आंदोलनाला महायुतीतील पाच पक्षांच्या नेत्यांची फौज असली, तरी कार्यकर्त्यांची संख्या मर्यादित होती. क्रांती चौकात शुक्रवारी सकाळी हे आंदोलन झाले.

दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

$
0
0
लातूर जिल्ह्यात शुक्रवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव परिसरातील पिके पावसामुळे आडवे पडली आहेत. त्यासोबतच द्राक्ष बागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदार अडचणीत

$
0
0
प्रतिकूल हवामान व अवकाळी पावसाने जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पार अडचणीत आले आहेत. कांदा, टोमॅटो, डाळिंब, ऊस उत्पादकांपाठोपाठ आता द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

आघाडीच्या नेत्यांचे पुतळे दहन

$
0
0
शिवसेनेच्या वतीने राज्यातील भ्रष्ट आघाडी सरकारच्या नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे दहन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी १८ भ्रष्ट मंत्र्यांचे पुतळ्याचे दहन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांच्या नेतृत्वाखाली पुतळा दहन करण्यात आला.

वन विभाग तयार करणार अॅडव्हेंचर पार्क

$
0
0
दौलताबाद आणि सारोळा वन क्षेत्रात साहसी खेळाची सुरुवात करण्यात आली आहे. या साहसी खेळाला वाव मिळावा. यासाठी वन विभागाने चार ठिकाणी अॅडव्हेंचर पार्क तयार करण्याचे नियोजन केले आहे. या अॅडव्हेंचर पार्कमधून नागरिकांना साहसी खेळाकडे आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे.

‘कॉँग्रेससोबत घरोबा नाही’

$
0
0
कॉँग्रेस जागा सोडू म्हणते, पण सोडत नाही. फक्त भूलथापा मारण्यात येतात. त्यामुळे आगामी निवडणुकांत कॉँग्रेससोबत घरोबा करणार नसल्याचा निर्धार भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

‘आपचे उमेदवार आधीच फिक्स’

$
0
0
आम आदमी पार्टीचे उमेदवार आधीच फिक्स होते, असा आरोप पक्षातील बडतर्फ कार्यकर्त्यांनी केला आहे. उमेदवार निवडीसाठी केवळ नावापुरतीच प्रक्रिया राबवली. समाजवादी जनपरिषदेसह अन्य संघटनेतून आलेल्या लोकांनाच तिकीट देण्याचे आधीच फिक्स होते.

‘बारकोड’चा गठ्ठा रस्त्यावर

$
0
0
दररोज नवा गोंधळ समोर येत असलेल्या दहावीच्या परीक्षा प्रक्रियेतील आणखी एक प्रताप शुक्रवारी समोर आला. परीक्षेचे साहित्य घेऊन जाणाऱ्या एका गाडीतील ‘बारकोड’चा गठ्ठा चक्क रस्त्यावर आढळला. गाडीतील संबंधित शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे पोलिसांसह बोर्डाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.

मालमत्ता कर गेल्या वर्षीप्रमाणेच

$
0
0
महापालिकेच्या कर आकारणी विभागाच्या कारभाराची लक्तरे काढत, स्थायी समितीने मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव फेटाळला. गतवर्षीप्रमाणेच मालमत्ता कर आकारा, असे आदेश सभापती नारायण कुचे यांनी दिले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images