Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

काँग्रेसमध्ये गोंधळात गोंधळ

$
0
0
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा महिन्यापासून सुरू असलेला गोंधळात गोंधळ अद्यापही सुरू आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या उत्तमसिंह पवारांनी ‘मीच उमेदवार असेन,’ असे जाहीर करून एकच खळबळ उडवून दिली.

ज्येष्ठांना सवलतीसह सुविधा

$
0
0
एमजीएम रुग्णालयाच्या वतीने शुक्रवारपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वुई केअर’ आरोग्य योजना राबविण्यात येत असून, पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता एमजीएमच्या बी बिल्डींगमधील सभागृहात योजनेचे उद्घाटन होणार आहे.

‘वारी’ दर महिन्यावारी

$
0
0
शहरातील नवोदित रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा ‘वारी’ उपक्रम काही वर्षांपूर्वी विशेष यशस्वी ठरला होता. दर आठवड्याला नाट्यानुभव अनुभवण्यासाठी रसिकांचीही गर्दी असायची.

तरुणांमध्ये रजनीकांतची क्रेझ

$
0
0
अविश्वसनीय अॅक्शन, हृदयस्पर्शी संवाद आणि युवकांना लाजवणारा उत्साह. हीच ओळख आहे ‘लाखो दिलो की धडकन’ आणि तरुणाईच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या तमिळ सुपरस्टार रजनीकांतची.

मोदींच्या सभेने वाढली चिंता

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नांदेड येथे रविवारी झालेल्या विराट सभेमुळे भाजप-शिवसेनेच्या गोटात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे, तर काँग्रेसच्या गोटात चिंता आहे. मोदीच्या या लाटेमुळे अशोक चव्हाण यांची चिंता वाढली आहे.

बैठक लोकसभेसाठी चर्चा विधानसभेची

$
0
0
लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार नितीन पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीची चर्चा झडली.

नसलेल्या विहिरींचा निधी लाटला

$
0
0
माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, मालकीची विहीर नसतानाही वेळोवेळी शासकीय निधी लाटल्याचे स्पष्ट झाले. सुमारे ३७ गावांमध्ये या प्रकारचा गैरप्रकार असू शकतो, असे लक्षात आल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात पिण्याच्या पाणीच्या पुरवठ्यासाठी अधिग्रहित केलेल्या बोगस विहिरींसंदर्भात अपहाराची उच्चस्तरीय समिती नेमावी;

तपासणीत २४ लाख, सोने जप्त

$
0
0
जिल्ह्यातील सर्व शहरांच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि प्रमुख रस्त्यांवर वाहनांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. याया मोहिमेत गेल्या बारा दिवसांत पोलिसांनी २४ लाख ३८ हजार २५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात केला आहे.

शाळा बांधकामाची चौकशी करा

$
0
0
गणोरी येथील जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम मंजूर आराखड्यानुसार झाले नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

महिला आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा द्यावा

$
0
0
लातूर शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकारी अॅड. कल्पना गिरी यांच्या मृत्युला चौदा दिवस लोटूनही राज्य महिला आयोगाच्या जिल्ह्यातील दोन सदस्यांनी गिरी यांच्या घरी भेट दिली नाही किंवा मारेकऱ्यांना शिक्षा करण्याचीही मागणी केली नाही.

तपासणीत सापडल्या मोठ्या रकमा

$
0
0
लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना नांदेड व सिल्लोडमध्ये गुरुवारी मोटारींमध्ये मोठ्या रकमा सापडल्या नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे एका इंडिका कारमध्ये २० लाख रुपये तर, सिल्लोडमध्ये मध्यरात्रीच्या तपासणीत जीपमध्ये २२ लाख रुपये सापडले आहेत.

उदासीनतेमुळे मसाला पिकांचा सुगंध वाढेना

$
0
0
मसाला पिकांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी कृषी विभागाने प्रोत्साहन योजना राबवली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मसाला पिकांकडे वळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र किचकट प्रशासकीय प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांनी मसाला पिकांकडे पाठ फिरवली.

सहकाऱ्यांना पुढे नेणाराच खरा नेता

$
0
0
‘जो स्वतःबरोबर सहकाऱ्याला पुढे नेतो, त्याचा विचार करतो, तोच खरा नेता असतो,’ असे प्र‌तिपादन प्रा. नितीन बानगुडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी संसदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

घाटीत लिथोट्रिप्सी नाहीच, ‘डिफ्रिब्रिलेटर’ मिळाले दोनच

$
0
0
मूतखड्याच्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त असणारे लिथोट्रिप्सी हे उपकरण मागच्या चार वर्षांपासून घाटीमध्ये कायमस्वरुपी बंद पडले आहे. त्याचवेळी ३१ मार्चपर्यंत खरेदी प्रक्रिया सुरू झालेल्या उपकरणांमध्ये लिथोट्रिप्सीचा समावेश नसल्याची माहिती मिळाली असून, त्यामुळेच या वर्षीही लिथोट्रिप्सी मिळण्याची शक्यता जवळजवळ मावळली आहे.

मतदारांनो, देशात परिवर्तन घडवा

$
0
0
‘देशातील वाढता दहशतवाद आणि आर्थिक संकट पाहून प्रत्येकाने मतदान करावे. शंभर टक्के मतदान झाल्यास देशात परिववर्तन होईल. सुदृढ समाजासाठी आणि देशाच्या विकासासाठी परिवर्तन पाहिजे’ असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरू श्री श्री रवीशंकर यांनी केले.

वाहन नोंदणी पुन्हा सुरू

$
0
0
परिवहन आयुक्ताकडून आलेला आदेश आणि मोटार वाहन अधिनियमातून वगळलेल्या वाहनांच्या यादीवरून ‘वेग नियंत्रक’ कोणत्या गाड्यांसाठी लागू करावा? याचे उत्तर सापडलेच नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयात मागील दोन दिवसापासून वाहन नोंदणीचे रखडलेले काम सुरू करण्यात आले.

एसटीचा औरंगाबाद विभाग ‘मालामाल’

$
0
0
ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी विशेष सेवा, पर्यटकांसाठी विशेष टूर बस आणि यात्रा-जत्रांपर्यं प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागाने उत्पन्नामध्ये राज्यात पहिले स्थान मिळविले आहे. गेल्यावर्षीही औरंदाबाद विभाग अव्वल होता.

पालिकेचा जमा खर्च यापुढे ऑनलाइन

$
0
0
लेखा विभागाशी इंजिनिअरिंग विभाग जोडण्याचे महत्वाचे काम पालिका प्रशासनाने केले आहे. त्यामुळे पालिकेचा जमा खर्च आता ऑनलाइन झाला आहे. या ऑनलाइन पद्धतीला १ एप्रिल पासून सुरूवात करण्यात आली.

सिटी बसची ‘शाळा फेरी’ बंद

$
0
0
एसटी प्रशासनाची शहर बस सेवा सर्वसामान्यांसाठी नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. एसटी विभागाने शहरातील शाळा बंद होताच शहरातील तीन मार्गांवरील शहर बस सेवा येत्या जून महिन्यापर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणुकीत प्रथमच ‘थ्री-डी प्रोजेक्शन’

$
0
0
लोकसभा निवडणूक प्रचारात प्रथमच ‘थ्रीडी होलोग्राम प्रोजेक्शन’ या तंत्राचा वापर होणार आहे. या माध्यमातून देशभरातील शंभर ठिकाणच्या मतदारांना भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी साक्षात उपस्थित राहून संवाद साधत असल्याचा अनुभव एकाच वेळी घेता येईल.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images