Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मुंडेंच्या भूलथापांना बळी पडू नका

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे नेते व बीडचे खासदार गोपीनाथ मुंडे हे वारंवार देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर टीका करीत आहेत. मात्र, मुंडेची उंची पवार यांच्यावर टीका करण्याएवढी नाही. त्यामुळे मुंडेंच्या भूलथापांना बळी न पडता सर्वसामान्य माणसांच्या मदतीला धावून येणाऱ्या राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांना बीडमधून निवडून द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मतदानयंत्रांची आज होणार तपासणी

$
0
0
औरंगाबाद मतदारसंघासाठी आवश्यक असलेले बॅलेट युनिट आणण्यासाठी गेलेले पाच पथक शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी आणलेल्या सुमारे साडेचार हजार बॅलेट युनिटची मंगळवारी शेंद्रा प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे.

...तर शेतकऱ्यांचे कर्ज, वीजबिल माफ

$
0
0
राज्यामध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे न भुतो असे नुकसान झाले आहे. सरकारने या शेतकऱ्यांना अल्प मदत जाहीर केली. ती मदत अजूनही शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही.

ओम राजेंची महत्त्वाची भूमिका

$
0
0
उस्मानाबाद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र गायकवाड यांच्या प्रचारार्थ सेना आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

तर पद्मसिंहाचा प्रचार नाही

$
0
0
सिंधुदुर्ग मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार नीलेश राणे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने बंड पुकारल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उस्मानाबादेतही जाणवू लागले आहेत. उस्मानाबादेतील काँग्रेसच्या मधुकर चव्हाण, बसवराज पाटील अशा लोकप्रतिनिधीखेरीज अन्य नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात काम करून नीलेश राणेविरूद्धच्या राष्ट्रवादीच्या खेळीचा बदला घ्यायचा चंग बांधला आहे.

मोदीना टार्गेट करणारे व्हिलन

$
0
0
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडे प्रचार करण्यासाठी मुद्देच राहिलेले नाहीत. त्यामुळे मोदींना विरोध करणे व त्यांना टार्गेट करणे एवढाच एककलमी कार्यक्रम विरोधक करीत आहेत. मात्र, जनतेच्या मनात नरेंद्र मोदींना हिरोचे स्थान मिळालेले आहे.

‘काँग्रेसच्या योजना नेत्यांसाठीच’

$
0
0
काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारच्या योजना ह्या त्यांच्याच पुढाऱ्यांच्या हितासाठी असल्याचा घणाघाती आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी भोकरच्या सभेत केला. महायुतीचे उमेदवार डी. बी. पाटील यांच्या प्रचारार्थ भोकरच्या मोंढा मैदानावर सोमवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

महिलांचा टक्का कमीच

$
0
0
मतदारसंख्येची लोकसंख्येबरोबर सांगड घालण्यासाठी निवडणूक आयोगाने कसोशीने प्रयत्न केले मात्र, महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यात फारसे यश आलेले नाही. २०१४च्या लोकसंख्येत महिलांचे प्रमाण ९२३ आहे, मात्र महिला मतदारांचे प्रमाण केवळ ८८० आहे.

नवनवीन पाककृती शिकण्याची महिलांत ओढ

$
0
0
औरंगाबाद जिल्हा माहेश्वरी महिला मंडळाने आयोजित केलेल्या पाककृती कार्यशाळेला शंभराहून अधिक महिलांचा प्रतिसाद मिळाला. १२ व १३ एप्रिल असे दोन दिवस ही स्पर्धा महेश भवन, गुलमंडी येथे घेण्यात आली. सिल्लोड, बिडकीन, पैठण, लासूर या ठिकाणांहूनही २५ महिला कार्यशाळेकरता आल्या होत्या.

तोफा आज थंडावणार

$
0
0
मराठवाड्यातील सहा मतदारसंघांसह लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी थंडावणार आहे. मराठवाड्यातील उर्वरित औरंगाबाद व जालना या मतदारसंघात आठवडाभराने (२४ एप्रिल) मतदान होत आहे.

मोदींचा विकास अदानींपुरताच

$
0
0
देशाच्या कोणत्याही राज्यात गेले की, गुजरातच्या विकासाच्या मॉडेलची चर्चा होते. परंतु, तेथील विकासाचे मॉडेल हे टॉफी मॉडेल असल्याचे सांगून, तो अदानी या उद्योगपतीचा विकास असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

गरज खंबीर नेतृत्वाची...

$
0
0
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना तरुणाई चौकस झाली आहे. ई-प्रचारामुळे तरुणांच्या माहितीत भर पडली असून योग्य उमेदवाराला मत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. देश घडवण्यात तरुणांचे विशेष योगदान असते. रोजगाराच्या संधी निर्माण करतानाच योग्य शैक्षणिक धोरण राबवणारे नेतृत्व हवे, असे शहरातील श्रीयश इंजिनीअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

समाज आम्हाला स्वीकारणार काॽ

$
0
0
तृतीयपंथियांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास समाजासाठी लागू असलेल्या आरक्षणाचा फायदा देण्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने मंगळवारी जाहीर केला. या निकालाचे शहरातील सामाजिक कार्यकर्ते व तृतीयपंथीयांनी जोरदार स्वागत केले. तथापि, समाज आम्हाला स्विकारणार का ? असा त्यांचा सवाल आहे.

मतदारांसाठी प्रतिज्ञा

$
0
0
निवडणूक आयोगाने मतदारांसाठी यंदा प्रथमच मतदान केंद्रांवर मतदारांनी घ्यावयाच्या प्रतिज्ञेची प्रत लावण्याची सूचना दिली आहे. नांदेडमधील २ हजार ७४३ मतदान केंद्रांवर मतदारांच्या सहज लक्षात येईल, अशा ठिकाणी ही प्रत झळकणार आहे.

कैदी मतदानापासून वंचित

$
0
0
देशातील नागरिकांना घटनेप्रमाणे मतदानाचा अधिकार असला, तरी राज्यातील कारागृतील कच्चे कैदी आणि गुन्हा सिद्ध न झालेले कैदी यंदा मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

तर दोनशे कोटींचा दावा ठोका

$
0
0
‘राजीव सातव यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी माझ्याविरोधात शंभरच नव्हे, तर दोनशे कोटी रुपयांचा दावा ठोकावा,’ असे आव्हान खासदार सुभाष वानखेडे यांनी दिले.

भरारी पथके करतात काय?

$
0
0
आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत, मात्र या पथकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याचे चित्र आहे.

बंदोबस्तावर पावणे चार हजार पोलिस

$
0
0
निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पावणेचार हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कोम्बिग ऑपरेशन, वाहन तपासणी आदी मोहिमा राबविण्यात येत असून आतापर्यंत सुमारे बाराशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याचे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले.

पोलिस बीड, उस्मानाबादला रवाना

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्वत्र तगडा बंदोबस्त असावा, यासाठी नियोजन करण्यात आले असून कर्मचाऱ्याचे आदान-प्रदानही सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीणचे तब्बल पाचशेहून अधिक कर्मचारी बीड, उस्मानाबादला बंदोबस्तकामी मंगळवारी रवाना झाले आहे.

सामाजिक संघटनांची धरणे

$
0
0
शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कल्पना गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, या आणि अन्य मागण्यांसाठी मंगळवारी लातूर शहरात ‘स्वराज युवा संघटने’च्या पुढाकाराने गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images