Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

$
0
0
मराठवाड्यातील सहा लोकसभा मतदार संघांतील निवडणुकीच्या प्रचारांच्या तोफा मंगळवारी थंडावल्या. मतदानाची तयारी पूर्णत्वास आली असून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ट्रॉलीपेक्षा विंडो चेकिंग प्रिय

$
0
0
औरंगाबाद ते मनमाड रेल्वेरुळाची पाहणी करण्यासाठी नेमलेले कनिष्ठ अभियंता पुश ट्रॉली ऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विंडो चेकिंग करीत आहेत. रेल्वेरुळाची तपासणी पूर्णपणे ‘की मन’ वर सोपवून तब्बल एक वर्षापासून पथ निरीक्षक अधिकारी नामानिराळे राहत असल्यामुळे रुळ तुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

लाखो लिटर पाणी वाया

$
0
0
तिसगाव तलावाची ओळख आता वाळू धुणा-यांचा धोबीघाट झाली तर नवल वाटू देऊ नका. इथे दररोज वाळू धुण्यासाठी लाखो लिटर पाणी वाया जाते आहे. प्रशासनाने मात्र इकडे दुर्लक्ष केले आहे.

लिंक रोडला सिग्नलमुळे ब्रेक

$
0
0
जडवाहने आणि वाळूज औद्योगिक वसाहतीलील उद्योजक, कामगारांना वरदान ठरू पाहणारा नगरलिंक रोड पूर्ण तयार होऊनही किरकोळ कारणामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. ए. एस. क्लबसमोरील टी जंक्शनवर काही दिवसांपूर्वी सात अपघात झाले.

‘त्या’ नोटांची धास्ती नाहीच

$
0
0
२००५ पूर्वीच्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या नसतील तर ‘त्या’ नोटांची तूर्तास धास्ती घेऊ नका. रिझर्व्ह बॅँकेने या नोटा जमा करण्याची मुदत आता जानेवारी २०१५ पर्यंत वाढवली आहे.

उन्हाच्या झळांची खिशाला ‘हाय’

$
0
0
उकाडा दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे कुठे घरातल्या माळ्यावर ठेवलेले कूलर आपसूक बाहेर आलेत, तर कुठे ‘एसी’ पुन्हा सुरू झाला आहे. विजेच्या या अतिवापरामुळे विजेच्या खर्चात पाच ते दहा टक्क्यांची वाढ झालेली दिसते. ग्राहकांचा खिसा या वाढलेल्या बिलांमुळे रिता होतोय.

डेंगी, गॅस्ट्रो अन् निमोनियाही

$
0
0
शहराचे तापमान वाढत असले तरी सद्यस्थितीत उष्माघाताचे रुग्ण नाहीत, मात्र गॅस्ट्रो, निमोनिया, विषाणूजन्य आजारांनी वेगवेगळ्या वयाचे लहान-मोठे नागरिक त्रस्त आहेत. एरव्ही उन्हाळ्यात न दिसणारा डेंगी व डेंगीसदृश आजारांचे रुग्ण काही रुग्णालयांमध्ये आहेत.

बोर्डेची सुटका, अटकेची शक्यता?

$
0
0
हर्सूल कारागृहात स्थानबध्द असलेल्या अरूण बोर्डेची मंगळवारी सुटका झाली. मात्र, एका हॉटेल व्यावसायिकेला वीस लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी, बोर्डेला पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली गुन्हे शाखेने सुरू केल्यात.

५५ मिनिटेच पाणी सोडा

$
0
0
शहरातील पाणीपुरवठा करताना नियोजित वेळापत्रकानुसार ५५ मिनिटेच पाणी सोडावे. कुठल्याही परिस्थितीत वेळा वाढवू नका, असे आदेश पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिले आहेत. ऐन उन्हाळ्यात ही सक्ती केल्याचा फटका शहरवासियांना बसणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने शिस्त पाळावी

$
0
0
राज्यात लोकसभा निवडणुकीत यश मिळवायचे असल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेसने आघाडीचा धर्म आणि पक्ष शिस्त पाळावी, अशा शब्दात कॉँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक महेंद्र जोशींनी कानपचिक्या घेतल्या. ते मंगळवारी जालना येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

विद्यार्थी मतदारांची ‘आयात’ जोरात

$
0
0
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शहरातील विविध वसतिगृहातील मुलांनी गावाकडचा रस्ता धरला आहे. विशेष म्हणजे अनेक उमेदवार समर्थकांनी त्यासाठी व्यवस्था केल्याचे समजते.

हमाल मापाडी झाले स्टार प्रचारक

$
0
0
कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपमध्ये स्टार प्रचारकांची फळी आहे. तशी नावे पक्ष जाहीर करतो. अन् त्यांच्या सभा देशभर होतात. आम आदमी पक्षात मात्र थोडे उलटे आहे. या पक्षाचे स्टार प्रचारक सध्या हमाल आणि मापाडी झालेत.

अ‘पक्षां’च्या घिरट्या शहरावरच

$
0
0
लोकसभा निवडणूक म्हणजे मोठी खर्चाची बाब, मात्र तरीही यंदा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधून २७ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक असल्यामुळे मुख्य उमदेवारांच्या प्रचाराला वेग आला असला तरीही मतदारसंघातील काही अपक्ष उमदेवारांनी ग्रामीण भागात प्रचारच सुरू केला नाही.

पालकांवर होलिक्रॉसबाहेर लाठीमार

$
0
0
होलिक्रॉस हायस्कूलमध्ये पाल्याला प्रवेश मिळविण्यासाठी गर्दी केलेल्या पालकांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. हा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. या शाळेच्या आवारात पालकांनी पहाटे चारपासूनच रांगा लावल्या होत्या, सकाळी सात वाजल्यानंतर ही गर्दी वाढली आणि त्यानंतर गोंधळ वाढत गेला.

अखेरच्या क्षणी युवराजांची बॅटिंग

$
0
0
गुजरातचे विकासाचे मॉडेल फसवे असून, त्यामध्ये सामान्य माणूसच विकासापासून दूर जाणार आहे, असा आरोप करत काँग्रेसचे उपाध्यक्ष भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडले.

उस्मानाबादेत ‘जंबो’ बंदोबस्त

$
0
0
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात १७ एप्रिल रोजी मतदान होत असून, यासाठी संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

जागृतीमुळे मतदानाचा टक्का वाढणार

$
0
0
नांदेड लोकसभा मतदार संघात होणाऱ्या मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत शासकीय यंत्रणे मार्फत प्रथमच मतदार जागृती मोहीम राबविल्याने या निवडणुकीत ७० टक्के मतदान अपेक्षित आहे.

परभणीत १, ९७५ केंद्रांवर मतदान

$
0
0
परभणी लोकसभा मतदारसंघात १ हजार ९७५ मतदान केंद्रावर सकाळपासून मतदानाला प्रारंभ होणार आहे. १८ लाख २ हजार ८९४ मतदारांना मतदान करता यावे यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था तसेच बंदोबस्त तैनात केला आहे.

हिंगोलीत ९ हजार ५८१ कर्मचारी

$
0
0
हिंगोली लोकसभा मतदारसंघात १५ लाख ८६ हजार १९४ मतदार मतदानाचा हक्क बजवणार आहेत. त्यासाठी १ हजार ८७३ मतदान केंद्र मतदानाच्या प्रक्रियेसाठी ९ हजार ५८१ अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मतदानावर बहिष्कार नाही

$
0
0
लातूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी ६५ ते ७० टक्के व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक प्रयत्न केले आहेत. ज्या गावांनी बहिष्काराचा इशारा दिला होता, त्यांची समजूत काढण्यात आली आहे. कोणतेही गाव मतदानावर बहिष्कार घालणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांनी व्यक्त केला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images