Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

संघटित कामगारांचा टक्का घसरता

$
0
0
औरंगाबादमध्ये उद्योग- व्यवसायात वाढ होत असल्याने मोठ्या प्रमाणात सेवा क्षेत्रात रोजगाराच्या वाढत आहेत. मात्र हे रोजगार कंत्राटी स्वरूपाचे आहेत. जिल्ह्यातील एकूण कामगारांमध्ये संघटित कामगारांचा टक्का घसरत आहे.

अळ्यांचे प्रकरण गंभीरच

$
0
0
महापालिकेच्या फोराळा येथील जलशुध्दीकरण केंद्रात अळ्या निघाल्याचे प्रकरण गंभीरच आहे. त्यामुळे आम्हीही ते प्रकरण तेवढ्याच गांभीर्याने घेतले आहे. अळ्या नष्ट करण्याचे काम सध्या जी एजन्सी करीत आहे, त्या एजन्सीला तीन महिन्यानंतर पुन्हा बोलावण्याचे ठरवले आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

डीएनए श्रुती भागवतांचेच

$
0
0
उल्कानगरी येथील बहुचर्चित श्रुती भागवत खून प्रकरणात डीएनए रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालात श्रुती भागवत यांच्याशिवाय अन्य कोणाचेही डीएनए नमुने आढळले नाहीत. त्यामुळे तपासातील शेवटची आशा माळवली आहे.

उस्मानाबादजवळ गारपीट

$
0
0
उस्मानाबादपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चिलेवाडी (ता. उस्मानाबाद) येथे बुधवारी पाच वाजता गारपीट झाली. या वेळी वादळी वाऱ्यास‌ह झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

'त्या' पाण्याचे नमुने तपासणीसाठी

$
0
0
सिडको एन ५ येथील पाण्याच्या टाकी अळ्या आढळल्याने तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महामार्गाचे काम जूनअखेरपासून

$
0
0
औरंगाबाद ते येडशी (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११) रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम येत्या जूनअखेर सुरू होण्याची चिन्हे आहेत. रस्त्यासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.

शेतकऱ्यांना ७५ कोटींचे वाटप

$
0
0
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पासाठी बिडकीन परिसरातील भूसंपादन केलेल्या ९६ शेतकऱ्यांना गुरुवारी ७५ कोटी रुपयांचे मोबदला वाटप करण्यात आले. लाखो रुपयांचे धनादेश मिळत असतानाही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर वाड-वडिलांची शेतजमीन गेल्याची खंत स्पष्टपणे दिसत होती.

१ जूनपासून मतदार नोंदणी

$
0
0
येत्या एक जूनपासून पुन्हा एकदा मतदार नाव नोंदणी अभियान सुरू करण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळ्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता.

विटांशी खेळणारे हात लॅपटॉपवर

$
0
0
पोटाची खळगी भरण्यासाठी डोक्यावर घमेले आणि हातामध्ये कुदळ-फावडे घ्यावे लागते, मात्र हेच कष्ट आपल्या मुलांच्या नशिबात येऊ नये, अशी प्रत्येक मजुराची इच्छा असते. या नोंदणीकृत मजुरांच्या मुलांमध्ये आधुनिक कौशल्ये यावीत, यासाठी पाचवीच्या पुढे शिकणाऱ्या मुलांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मतमोजणीसाठी प्रशासनाची लगीनघाई

$
0
0
राज्यातील सर्वाधिक उमेदवार आणि चुरशीने झालेल्या मतदानामुळे बीड मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडूनही मतमोजणीसाठीची तयारी सुरू केली असून, मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी आठशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वच पोलिस ठाणी एका क्लिक’वर

$
0
0
राज्यातील सर्व पोलिस ठाणी आणि मुख्यालये येत्या जूनपासून ऑनलाइन होत असून, या प्रक्रियेची तयारी जोरात सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातही ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

बसवेश्वर जयंतीचा लातूरमध्ये उत्साह

$
0
0
महात्मा बसवेश्वरांची जयंती लातूर जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. विविध मंडळांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये तरुणांचा विशेष सहभाग दिसून येत होता.

तोतया डॉक्टरांच्या दवाखान्यांना कुलुप

$
0
0
परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये कोणतीही पदवी किंवा नोंदणी नसलेल्या तोतया डॉक्टरांच्या विरोधातील कारवाई जोरात सुरू असून, काही जणांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक तोतया डॉक्टरांनी पलायन केले आहे.

महाराष्ट्र दिनाचा मराठवाड्यात उत्साह

$
0
0
मराठवाड्यामध्ये गुरुवारी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्याच्या मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले, तसेच पोलिसांचे संचलनही या वेळी करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिकांसह विविध कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला.

दोन आरोग्य केंद्रांच्या इमारती मोडकळीस

$
0
0
तालुक्यातील किनगाव व आळंद येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. नवीन ठिकाणी बांधकामाची परवानगी मिळाली असूनही अद्यापही बांधकाम सुरू झालेले नाहीत.

पत्नीच्या खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

$
0
0
गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील संजय मारुती डवले (वय ४०) यास सत्र न्यायालयाने पत्नीचा जाळून खून केल्याप्रकरणी जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीने २०१२ मध्ये पत्नीला घरात रॉकेल टाकून पेटवले होते.

परशुरामापर्यंत ब्राह्मण समाज सहनशील

$
0
0
‘ब्राह्मण्य म्हणजे एक कृती व विशाल विचार आहे. ब्राह्मण समाज ब्रह्मऋषिंपासुन परशुरामापर्यंत सहनशील राहिला,’ असे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या नंदा जोशी यांनी केले. परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण सभेतर्फे गुरुवारी गोपाल हॉलमध्ये 'परशुरामाचे अवतार कार्य' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कृष्णराव गाडेकर होते.

सालगड्यांनी वाढवली शेतकऱ्यांची अडचण

$
0
0
सालगड्यांच्या वाढलेल्या मागण्या, काही सालगड्यांनी बदलेले कामाचे स्वरूप यामुळे तालुक्यात सर्व शेतकऱ्यांना अद्याप सालगडी मिळाले नाहीत. गारपीट व अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत सालगड्यांमुळे भर पडली आहे.

महाराष्ट्र दिन उत्साहात

$
0
0
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५४ वा वर्धापन दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर १ मे रोजी, गुरुवारी मुख्य शासकीय समारंभ झाला. तसेच शैक्षणिक संस्था, कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कांदळगावकर यांना अॅवॉर्ड जाहीर

$
0
0
बायोवेस्ट मॅनेजमेंट व त्यापासून उर्जा निर्मितीत महत्वाचे योगदान दिल्याबद्दल येथील निर्मला कांदळगावकर यांना मॅक्सेल अॅवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. आंत्रप्रेन्युअरशिप, इनोव्हेशन आणि कार्पोरेट क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिली जातो.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images