Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भ्रष्ट वनक्षेत्रपाल जाळ्यात

$
0
0
वनविभागाच्या निवृत्त वनक्षेत्रापाला व त्याच्या मुलाला मंगळवारी (६ मे) लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. सातारा, कोळघर, पिंप्रीराजा व ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे एकाच वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल एक कोटी सहा लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली.

मॅरेज टुरिझम जोरात

$
0
0
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये लग्नतिथी दाट असते. त्यामुळे अनेकांच्या घरी लग्नाचे बार उडत आहेत. लग्नाला जाण्यासाठी यजमानांसोबत वऱ्हाडींचीही घाई गडबड सुरू असते. मामाच्या किंवा काकाच्या लग्नाला जाण्यासाठी सर्वांची घाई सुरू आहे.

विद्यापीठातही आता ‘समर स्कूल प्रोग्राम’

$
0
0
विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांची गोडी वाढवी या हेतूने ‘इन्स्पायर कॅम्प’ यशस्वी करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आता सायन्समध्ये संशोधनाच्या माध्यमातून करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘समर स्कूल प्रोग्राम’ उपक्रम हाती घेतला आहे.

अभ्यासिका, लायब्ररी हाऊसफुल्ल...

$
0
0
दहावी, बारावीसह, पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे अनेकांना आता स्पर्धा परीक्षांचे पुढील करिअरचे वेध लागले आहेत.

कचऱ्यापासून खतनिमिर्ती सुरू

$
0
0
लातूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने गती घेतली आहे. वरवंटीच्या कचरा डेपो परिसरातील माशा आणि दुर्गंधीचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे.

बीडमध्ये अत्याधुनिक अॅम्ब्युलन्स

$
0
0
रस्त्यांवर होणाऱ्या गंभीर अपघातासह बारा प्रकारच्या गंभीर रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा मिळण्यासाठी एनआरएचएम अंतर्गत अत्याधुनिक अॅम्ब्युलन्स जिल्ह्यात उपलब्ध करण्यात आली आहे.

टॉवरवर चढून नगरसेवकाचे आंदोलन

$
0
0
येथील नगरसेवक सचिन देशमुख यांनी बुधवारी भर उन्हात टॉवरवर चढून दीड तास आंदोलन केले. गणपती चौक, देशमुख हॉटेल जवळील हायमस्ट दिव्याची दुरुस्ती करावी अशी त्यांची मागणी होती.

तुपेच्या बँकखात्यांमध्ये किरकोळ रक्कम

$
0
0
बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या निवृत्त वनक्षेत्रपाल श्रीधर तुपे याच्या बँक खात्यांत पोलिसांना दहा ते वीस हजार रुपयांपर्यंतच्या किरकोळ रकमा असल्याचे आढळले.

शेतकरी मदतीपासून वंच‌ित

$
0
0
गारपीट व अतिवृष्टीग्रस्त नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याने किसान सभेच्या आंदोलनामुळे आणखी ३० ते ३५ हजार अर्ज प्रशासनाकडे येण्याची शक्यता आहे. या सर्व शेतकऱ्यांना शासनाला नुकसान भरपाई द्यावी लागणर आहे.

पाण्याची काटकसर करा

$
0
0
लातूर शहराला सध्या दहा दिवसांतून एकवेळा पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी आल्यानंतर अनेक नागरिक पाण्याचा अपव्यय करीत आहेत. येत्या काळात पाणी जर काटकसरीने वापरले, तर शहराला १५ जूनपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिली.

उस्मानाबादकर तहानलेलेचच

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, वाशी, भूम व परंडा या चार तालुक्यांवरील जलसंकट वरचेवर रौद्र रुप धारण करू लागले आहे. जिल्ह्यातील ५९८ गावे व १२२ वाड्यांवर तीव्र पाणी टंचाईचे सावट आहे.

अरुणा खरातचा होत होता कारसाठी छळ

$
0
0
अयोध्यानगर मध्ये मंगळवारी जळून मरण पावलेल्या विवाहितेचा कार घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणण्यासाठी छळ होत असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे.

विद्यार्थिनींसाठी नव्या २४४ बस

$
0
0
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींकरीता मानव विकास मिशनने आणखी २४४ बस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशनतर्फे राज्यातील बावीस जिल्ह्यातील १२५ तालुक्यात सध्या ६२५ बस चालविल्या जातात.

साताऱ्यात म्हशींसाठी स्वीमिंग पूल

$
0
0
साताऱ्यातील आमदार रोडच्या पलिकडे एका ठिकाणी सांडपाणी साचून जनावरांसाठी स्विमिंग पूल तयार झाला आहे. म्हशी आमी इतर जनावरे त्यात पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत असतात. परंतु या घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रणजितनगर, राजधानी कॉलनी, तंत्रज्ञनगर येथील रहिवासी गेल्या वीस वर्षापासून त्रस्त आहेत.

कापूस बियाण्यांची एकाच दिवशी विक्री

$
0
0
ठराविक ब्रॅण्डच्या कपाशीच्या बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी खरीप हंगामपूर्व काळात कृषि सेवा केंद्रांमधून बियाणांची विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरपंच खूनप्रकरणी आरोपी अटकेत

$
0
0
बदनापूर तालुक्यातील नानेगावचे सरपंच मनोज कसाब यांच्या खून प्रकरणातील पसार झालेले तीन आरोपी किशोर चव्हाण, दिगंबर चव्हाण व कृष्णा चव्हाण यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (९ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आठवड्याचा शेवट थोडा ‘कूल’

$
0
0
ढगाळ वातावरण व जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शहराच्या तापमानात किंचित घट झाली आहे. तरीही बुधवारी शहरात ४०.६ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली.

सीईओंनी बजावली नोटीस

$
0
0
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी वेबसाइट संदर्भात सामान्य प्रशासन विभागाला नोटीस बजावली आहे. ‘म. टा.’ ने बुधवारच्या अंकात ‘झेडपीच्या वेबसाइटचे तीन तेरा’ हे वृत प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते.

आज ‘एमएच-सीईटी’ परीक्षा

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे वैद्यकिय व दंत अभ्यासक्रमांसाठी ‘एमएच-सीईटी’ गुरुवारी घेण्यात येणार आहे. शहरातील अठरा परीक्षा केंद्रावर जिल्ह्यातील ६,९९४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

‘वितरणातील नियोजनाअभावी ओरड’

$
0
0
जायकवाडी धरणात पाणी मुबलक आहे. सध्या पाण्याचा उपसाही नेहमीपेक्षा जास्त केला जात आहे. असे असताना शहरात पाण्याची ओरड मात्र कायम आहे. पाणी वितरणातील नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप उपमहापौर संजय जोशी यांनी केला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images