Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दयानंद कॉलेजला ‘नॅक’चा दर्जा

$
0
0
विद्यापीठ अनुदान आयोगाची स्वतंत्र संस्था असलेल्या राष्ट्रीय मुल्यांकन परिषदेने लातूरातील दयानंद कॉलेजला ‘अ’ दर्जा घोषीत केला आहे. ‘अ’ दर्जा मिळविणारे लातूर जिल्ह्यातील दयानंद हे दुसरे महाविद्यालय असल्याचे प्राचार्य जयप्रकाश दरगड यांनी सांगितले.

तपास अधिकाऱ्यावरून मंत्र्यांमध्ये मतभेद

$
0
0
नानेगाव येथील दलित सरपंच मनोज कसाब यांच्या खुनप्रकरणाच्या तपासावरून सरकारमधील दोन मंत्र्यांमध्येच मतभेद असल्याचे गुरुवारी (८ मे) समोर आले.

टीईटी प्रमाणपत्रासाठी फरफट

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा( टीईटी) निकाल जाहीर होऊन दोन महिने उलटले तरी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. बेरोजगार डी. एड्. धारक व त्यांचे पालक प्रमाणपत्रासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात खेट्या मारत आहेत.

राज ठाकरेंच्या वॉरंटला स्थगिती

$
0
0
शेकटा येथील दगडफेकीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटला अतिरिक्त सत्र न्यायधीश एस.जी. शेट्ये यांनी तात्पुरती स्थगिती दिली.

हार्ड लँडिंगमागे खराब हवामान

$
0
0
जेट एअरवेजच्या ९ डब्ल्यू २५११ विमानाचे बुधवारी (७ मे) झालेले हार्ड लँडिंगमुळे प्रवाशांमध्ये भिती निर्माण झाली होती. या प्रकारामागे हवामानात झालेल्या बदल कारणीभूत असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष

$
0
0
फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. कर्जबाजारी झालेल्या नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी केवळ १९ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदतीचा हात दिला आहे.

पंजाबच्या मंत्र्याची १ तास सेवा

$
0
0
येथील सचखंड गुरुद्वारातर्फे तनखैय्या म्हणून जाहीर करण्यात आलेले पंजाबचे महसूल मंत्री विक्रमसिंघ मजिठिया यांना गुरुवारी याच गुरुद्वारामध्ये एक तास सेवा करण्याची शिक्षा देण्यात आली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा वेध घेणारा ‘भाकर’

$
0
0
शेतकरी आपला अन्नदाता. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ साधत गेली अनेक वर्षे संसाराचा गाडा रेडणारा बळीराजा कायमच आर्थिक विवंचनेत अडकलेला राहिला. सावकाराचे कर्ज, वादळ, गारपीटासारखी अस्मानी संकट झेलत राबणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी नेमहीच उपेक्षा आली आहे.

रम्य ते बालपण

$
0
0
पाणावलेले डोळे, दाडलेले कंठ, ओठावर स्मिआत हास्य, मनात चैतन्याचा झारा असा भावनांचा सुंदर मिलाफ दिसून आला तो आनंद कृष्ण वाघमारे प्रशालेत. निमित्त होते १९९० च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलनचे.

गरीब विद्यार्थ्यांना मोफत क्लास

$
0
0
दहावीच्या निकालावरून विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरत असते. त्यासाठी दहावीत चांगले यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगले यश मिळणे गरजेचे असते. हुशार परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी संवेदना सोशल ग्रुपने त्याच्यासाठी मोफत क्लास घेण्याचे ठरविले आहे.

विद्यार्थ्यांची प्रोझोन सफर

$
0
0
प्ले झोन, फूड प्लाजा, सरकत्या जिन्याची गंमत-जंमत मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी (दि. ८ मे) अनुभवली. भव्यदिव्य असा प्रोझोन मॉल बघून ही मुले हरखून गेली.

प. महाराष्ट्र अभ्यासण्याची संधी

$
0
0
मराठवाड्यातील ६० युवक युवतींना पश्चिम महाराष्ट्रातील विकास, कृषी, पर्यटन, शिक्षण व्यवस्था, उद्योगधंदे, साहित्य कला, संस्कृती, आचार संस्कृती राहणीमान समजून घेण्याची संदी यंदा मिळणार आहे. युथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

चार्लीची तरुणांमध्ये क्रेझ

$
0
0
जगभरातील भ्रमंती करून, तब्बल २४ देश फिरून ‘तो’ आता महाराष्ट्रात आला आहे. लहान अनाथ मुलांसाठी निधी गोळा करणं, जगाच्या कानाकोपऱ्यांत बंधुभाव जागवणं आणि सांस्कृतिक वैविध्याची देवाण-घेवाण करणं ही त्याच्या दौऱ्याची वैशिष्ट्यं आहेत.

टॉवर चालकांना नोटिसा बजावणार

$
0
0
नवीन नियमावलीनुसार अधिकृत अथवा अनाधिकृत असलेल्या मनपा क्षेत्रातील सर्वच मोबाइल टॉवरचालकांना महापालिकेची नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आता प्रस्ताव दाखल करावा लागणार आहे.

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

$
0
0
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी १६ मे रोजी उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

गोदापात्रातून वाळू उपसा

$
0
0
जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याने गोदापत्राची अक्षरश: चाळणी झाली आहे. त्यामुळे पात्रातील पाणी कमी होत आहे. वाळूच्या वाहतुकीने रस्ते खराब होत असून, महसूलापोटी मिळणाऱ्या रकमेतून ग्रामपंचायतींनी विकासाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

$
0
0
एका अकरा वर्षाच्या मुलीवर तिच्या वडिलांच्या मावसभावाने उसाच्या शेतात नेऊन बलात्कार केला. ही घटना मुद्देश वडगाव येथे गुरुवारी (८ मे) रात्री घडली. या पीडित मुलीचे आई- वडिल लग्नाला गेले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुख्य प्रशासकांना खर्चाचे अधिकार

$
0
0
‘वाळूज महानगराच्या विकासासाठी साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी खर्च करण्याचा अधिकार मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांना दिले आहेत,’ अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना दिली.

अतिक्रमणाचा प्रशासकीय विभाग बरखास्त

$
0
0
महापालिका प्रशासनाने अतिक्रमणासंबंधीचा प्रशासकीय विभाग बरखास्त केल्यामुळे संबंधित वार्ड अभियंत्यांना आता वार्ड कार्यालयाचे पदनिर्देशित अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पब्लिक स्कूलच्या शिक्षकांना दिलासा

$
0
0
महेशनगर येथील महाराष्ट्र पब्लिक स्कुल इंग्रजी व मराठी माध्यमातील याचिकाकर्त्यां शिक्षकांना संस्थेने २४ जानेवारी २०१४ रोजी सेवा समाप्त करण्याबद्दल दिलेल्या नोटिसांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images