Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कार्बाइडने आंबे पिकवणारे फक्त तिघे

$
0
0
शहरात दररोज शेकडो क्विंटल आंब्याची आवक होते. अनेक ठिकाणी कॅल्शियम कार्बाइडव्दारे आंबे पिकवले जातात, असा संशय आहे. परंतु अन्न व औषध प्रशासनाला मागील व या यावर्षीचा अशा दोन हंगामात फक्त तीन आंबा विक्रेते कॅल्शियम कार्बाइडच्या साह्याने आंबे पिकवताना सापडले आहेत.

भंगार गाड्यांमुळे प्रवाशांचे हाल

$
0
0
एसटी महामंडळाची निमआराम सेवा मोडकळीस आली आहे. मध्यमवर्गीय प्रवासी एसटीशी जोडण्यासाठी ही सेवा देण्यात आली होती. तीन लाख किलो मीटरनंतर निमआराम बसचा वापर साधी एसटी बस म्हणून करावा आणि आठ लाख किलो मीटरनंतर बस भंगारात काढावी, असा एसटीचा नियम आहे, मात्र सध्या निमआराम सेवेत असलेल्या अनेक बसचा पाच लाख किलो मीटरपेक्षा जास्त प्रवास झाला आहे.

डीएमआयसी मोबदल्याचे दीडशे कोटी आले

$
0
0
दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडोर (डीएमआयसी) प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदल्याचे १५० कोटी रुपये उद्योग खात्याने जिल्हा प्रशासनाकडे दिले आहेत. या निधीचे येत्या चार दिवसात वाटप केले जाणार आहे.

‘एमजीएम’मध्ये दुर्बिणीद्वारे व्ह‌िपल्स शस्त्रक्रिया

$
0
0
स्वादुपिंडाच्या अग्रभागातील कर्करोगाने पीडित भाग काढण्याची अवघड व अंत्यत किचकट शस्त्रक्रिया दुर्बिणाद्वारे एमजीएम रुगणलयात नुकतीच करण्यात आली. ही शस्त्रक्रिया व्हिपल्स शस्त्रक्रिया या नावाने ओळखली जाते.

जड वाहने आता लिंकरोड मार्गे

$
0
0
औरंगाबाद- पुणे रस्त्यावरील ए. एस. क्लबजवळील नगरलिंक रोड चौफुलीवरील वाहतूक सिग्नल दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे धुळे, चाळीसगाव, नाशिक व सुरतकडून येणारे कंटनेर व जडवाहने आता नगरनाक्यावरून महावीर चौकात येणार नाहीत.

पदवीधर निवडणुकीसाठी ‘नोटा’ पर्यायाची अडचण

$
0
0
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आयोगाने मतदारांना कोणताही उमेदवार योग्य वाटत नसल्यास ‘नोटा’चा (नन ऑफ द अबावू) पर्याय मतदानयंत्रावर उपलब्ध करून दिला होता, परंतु मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ‘नोटा’ची अडचण येणार आहे.

रुंदीकरणातील धार्मिक स्थळे हटवणार

$
0
0
रस्ता रुंदीकरण मोहिमेमध्ये आलेल्या धार्मिकस्थळांना लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर हटवण्याची शक्यता असलाची माहिती सूत्रांनी दिली.

महिलेच्या धाडसामुळे मंगळसूत्रचोर गजाआड

$
0
0
महिलेचे मंगळसूत्र पळवणाऱ्या चोरट्याला महिलेच्या सतर्कतेमुळे नागरिकांनी पकडल्याची घटना गारखेडा भागात शुक्रवारी (९ मे) सायंकाळी सात वाजता घडली. या चोरट्याचा साथीदार दुचाकीवर पसार झाला असून, पकडण्यात आलेल्या चोरट्याला मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्याला त्रास न देण्यासाठी उकळले एक लाख

$
0
0
शासकीय मुद्रणालयाच्या व्यवस्थापकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने हस्तकामार्फत शुक्रवारी (९ मे) ४२ हजार रुपयांची लाच घेताना पकडले. मुकुंदवाडी भागात दुपारी एक वाजता ही कारवाई करण्यात आली.

क्रांती चौकातील काला चबुतरा धोक्यात

$
0
0
औरंगाबाद शहरात १८५७मध्ये झालेल्या स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक म्हणून क्रांती चौकातील काला चबुतरा ओळखण्यात येतो. शनिवारी (१० मे) स्वातंत्र्य संग्रामदिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशनची लिफ्ट अखेर सुरू

$
0
0
रेल्वे स्टेशनवर उभारण्यात आलेली लिफ्टची सुविधा अखेर शुक्रवारी (९मे) प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली.

गारपीटग्रस्तांचा ‘रास्ता रोको’

$
0
0
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने अद्यापपर्यंत मदत केली नाही. सरकारच्या धोरणामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या मंगळवारी (१३ मे) चिते पिंपळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

१७ नगरपालिकांना नोटीस

$
0
0
मालमत्ता; तसेच इतर करांची सरासरीपेक्षा कमी वसुली झाल्यामुळे मराठवाड्यातील १७ नगर पालिकांना कारणे दाखवा बजावण्यात आल्या असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी दिली.

विरोधी पक्षाचे नेते कुठे आहेत?

$
0
0
महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असताना राज्य सरकारमधील जबाबदार मंत्र्यांनी फिरले पाहिजे. शाहू, फुले आंबेडकरांचे नाव घेऊन मते मागणाऱ्यांनी आता तरी पुढे आले पाहिजे. विरोधी पक्षाचे नेते आणि जेष्ठ समाजसुधारक म्हणवणारे कुठे आहेत, असा सवाल रोजगार हमी योजना व जलसंधारणमंत्री नितीन राऊत यांनी येथे शुक्रवारी उपस्थित केला

जीवन प्राधिकरणाला अखेरची घरघर

$
0
0
नगर, महानगर आणि ग्रामीणस्तरावर पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या शासन अंगीकृत विभागाला स्वतःच्या अस्तित्वाची चिंता लागली आहे. शासनाच्या बदलत्या धोरणामुळे या विभागाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घसरल्याने या विभागाला अखेरची घरघर लागली आहे.

मतमोजणी लाइव्ह

$
0
0
लोकसभा निवडणुकीची १६ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून शेंद्रा येथे होणाऱ्या मतमोजणी केंद्रावरील प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी प्रशासनाने एक खास संकेतस्थळ तयार केले आहे.

कल्पना गिरी हत्या: आता CID तपास

$
0
0
काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या कल्पना गिरी यांच्या हत्येचा तपास आता सीआयडी करणार आहे. पोलीस महालसंचालकांनी तशी माहिती लातूर पोलिसांना दिली आहे. तसेच या प्रकरणात सरकारच्या वतीने कोर्टात बाजू मांडण्यासाठी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, अशी शिफारसही सरकारकडे करण्यात आली आहे.

गारपिटीचे मोजमाप करणारी यंत्रणाच नाही

$
0
0
लातूर जिल्ह्यात सर्वच महिन्यांत पावसाने हजेरी लावली. परंतु, दुर्देवाने मोसमी पावसाचीच फक्त गांभिर्याने नोंद ठेवण्याची महसूल विभागाची पद्धत आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस हा गांभिर्याने घेतला जात नसल्याने त्याची नोंद ठेवली जात नाही.

पोस्टाच्या परीक्षेला पावणेचार लाखांवर उमेदवार

$
0
0
महाराष्ट्र राज्यातील १०९८ पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट पदांसाठी रविवागी (११ मे) परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातून तीन लाख ७८ हजार ७८ उमेदवार बसले आहेत. औरंगाबाद सर्कलमध्ये ३५ हजारांपेक्षा अधिक उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. परीक्षा दुपारी दोन ते चार दरम्यान होणार आहे.

खैरेपुत्रासाठी बदनापूरची तयारी

$
0
0
शिवसेनेच्या बदनापूरमधील स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार चंद्रकात खैरे यांना भेटून आमदार संतोष सांबरे यांच्या विरोधातील असंतोष व्यक्त केला. त्याचबरोबर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या बदनापूर विधानसभा मतदारसंघातून खासदार खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांना रिंगणात उतरविण्याची गळ घातली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>