Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विजेच्या अडचणींची आता संयुक्त पाहणी

$
0
0
पाणीपुरवठा व्यवस्थेतील पाणीपुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी पालिका आणि महावितरणचे अधिकारी संयुक्त पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर लक्षात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

ब्लॉक नकाशांचे काम अंतिम टप्यात

$
0
0
महापालिकेच्या एप्रिल २०१५मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नव्याने वॉर्ड रचना केली जाणार आहे. या रचनेसाठीच्या ब्लॉक नकाशांचे काम अंतिम टप्यात आले आहे. येत्या आठवड्यात हे नकाशे राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार आहेत.

उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

$
0
0
विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मंगळवारी (३ जून) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. सोमवारी ११ उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले. आतापर्यंत ३० अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त सामान्य प्रशासन डॉ. विजयकुमार फड यांनी दिली.

दीर्घकालीन उपायांनी वाढेल वनराई

$
0
0
दुष्काळी भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनातून वनक्षेत्र वाढवणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी लाखो रोपांची लागवड करुनही पुढील वर्षी पु्न्हा रोपांची लागवड होते. या परिस्थितीत रोपांचे संगोपन केल्यास वनक्षेत्र वाढू शकते, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी मांडले. तर सामाजिक वनीकरण विभागाने दीर्घकालीन दुष्काळ निवारण प्रकल्पाचे मॉडेल तयार करुन प्रस्ताव पाठवला आहे.

नेत्र शस्त्रक्रियांचा ‘मुहूर्त’ पुन्हा हुकला

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) नेत्र विभागाने सोमवारपासून शस्त्रक्रिया सुरू करणार असल्याचा ‘वायदा’ दिला होता. मात्र शस्त्रक्रियागृहाच्या (ओटी) निर्जंतुकीकरणाचे दोन रिपोर्ट अद्याप न आल्यामुळे शस्त्रक्रियांचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. आता उर्वरित दोन रिपोर्ट अपेक्षेप्रमाणे ‘निगेटिव्ह’ आले तर गुरुवारपासून शस्त्रक्रिया सुरू होतील, नाहीतर अजून एक आठवडा पुन्हा एकदा ‘ओटी’ बंदच राहणार, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

इलेक्शनची विलक्षण लगीनघाई

$
0
0
प्रशासन गेली सहा महिने लोकसभा निवडणुकीत व्यस्त होते. लोकसभेची मतमोजणी सुरळीत पार पडल्यानंतर सुटकेचा निःश्वास टाकत असतानाच पुन्हा विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीचे काम प्रशासनाला करावे लागत आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुटीचे नियोजन पार कोलमडले आहे. मात्र निवडणूक आयोगाचा आदेश असल्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी ‘इलेल्शनच्या विलक्षण लगीनघाई’ ला जुंपले आहेत.

मराठवाड्याला मिळाली औटघटकेची मंत्रिपदे

$
0
0
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत काय होईल, याची धास्ती घेतली आहे. राज्यात काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानवे लागले. त्या दोन्हीही जागा मराठवाड्यातील. त्याचे बक्षिस म्हणून काँग्रेसने अब्दुल सत्तार आणि अमित देशमुख यांना मंत्रिपद दिले आहे खरे, पण चार महिन्यांसाठी मिळणारे हे औटघटकेचे मंत्रिपद देऊन कितपत फायदा होणार हे येणारा काळच दाखवून देणार आहे.

वारसा जपण्यासाठी संग्रहालयाची निर्मिती

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने खूप मोठे महत्त्व आणि वारसा आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा आणि तो संकलित करून लेखणीबद्ध करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

पर्जन्यमानाच्या अचूक नोंदीसाठी प्रशिक्षण

$
0
0
जिल्ह्यात पिकांची अचूक आणेवारी काढण्यासाठी पर्जन्यमानाच्या नोंदी अचूक कशा घ्याव्यात याचे प्रशिक्षण मंडळअधिकारी, तलाठी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. या प्रशिक्षणास भारतीय हवामान खात्याच्या वजिराबाद नांदेड येथील ऑब्झर्व्हर बालासाहेब कच्छवे यांनी मार्गदर्शन केले.

पाणी टंचाईच्या झळा यंदा पैठण तालुक्याला सर्वाधिक

$
0
0
जिल्ह्याची पाण्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण असलेल्या पैठण तालुक्याला पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे. तालुक्यातील ३८ गावांना ६३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सध्या ११६ गावांना १८२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खुलताबाद आणि सोयगाव तालुक्यातील पाणीस्थिती चांगली असून अद्याप या दोन्ही तालुक्यांत एकही टँकर सुरू नाही.

बाजार समितीत ४८ पोटभाडेकरू

$
0
0
शेतीनियमित मालाचा व्यवहार करण्यासाठी जाधववाडी भागात व्यापाऱ्याना वर्षाकाठी ११० ते ४४० रुपये एवढ्या नाममात्र दरात गाळे देण्यात आले आहेत. परंतू समितीच्या आतापर्यंतच्या तपासणीत ४८ पेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी स्वतः व्यवसाय न करता हे गाळे महिन्याकाठी अन्य दुसऱ्या व्यापाऱ्यांना भाड्याने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘पर्यावरणा’ने बदलली मार्कलिस्ट

$
0
0
बारावीच्या गुणपत्रिकेमध्ये यंदापासून पर्यावरणातील गुणांचाही समावेश करण्यात आला असून, त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना झाला आहे. अन्य बोर्डांच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांचा बोनस मिळायचा आणि त्याचा फटका राज्यातील बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत होता. यंदा मात्र पर्यावरणाच्या गुणांमुळे चित्र बदलले आहे.

पैठणमध्ये रात्रीतून सहा घरफोड्या

$
0
0
अज्ञात चोरट्यांनी रविवारी (़१ जून)रात्री पैठण शहरात सहा घरे फोडून तीन लाख रुपयांचा ऐवज पळवला. मोठा बंदोबस्त तैनात असताना शहराच्या मध्यवस्तीत सहा चोऱ्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. घरफोडीच्या या घटनामुळे चोरांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.

उस्मानाबादेतील ६९ प्रकल्प कोरडे

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यातील २११ पैकी ६९ प्रकल्पात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. यामध्ये ६५ प्रकल्पांची पाणी पातळी जोत्याखाली आहे. चार प्रकल्पामध्ये ५० टक्क्याच्या आसपास पाणीसाठा आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पाणीटंचाईच्या संकटात वाढ होत आहे.

झेडपीत व्हॉट्सअपचे प्रशिक्षण

$
0
0
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना महत्वाचे संदेश देण्यासाठी व्हॉट्स अपचा वापर करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये याविषयी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यू. ए.कोमवाड यांनी विस्तार अधिकारी यांची बैठक घेतली.

पाच वर्षानंतर लातूरला लाल दिवा

$
0
0
राज्याच्या मं‌त्रिमंडळात सलग तीस वर्ष प्रतिनिधीत्व करीत असलेल्या लातूर जिल्ह्याला गेल्या पाच वर्षांपासून लाल दिव्यापासून दूर रहावे लागले होते. पाच वर्षानंतर सोमवारी आमदार अमित देशमुख यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने पुन्हा एकदा लाल दिवा मिळाला आहे.

नियतीचा क्रूर खेळ...

$
0
0
बीड जिल्ह्यातील परळीचे सुपुत्र आणि मराठवाड्याचे आशास्थान असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ज्यांचा सत्कार करण्यासाठी परळीकर कालपासून आतुरतेने वाट पाहत होते, त्या आपल्या लाडक्या नेत्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ परळीकरांवर ओढवली आहे.

महानेता हरपला

$
0
0
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने मराठवाडा सुन्न झाला आहे. नाथ्रा येथून निघालेली एक संघर्ष यात्रा दिल्लीत मंगळवारी थांबली. त्यांच्या निधनाने त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता, त्यांचा मित्र, विरोधक सारेच हेलावून गेलेत.

जीवन आणि मृत्यूमधील तो दीड तास…

$
0
0
गोपीनाथ मुंडे औरंगाबादला जाण्यासाठी लोधी इस्टेटमधील निवासस्थानातून मारुती सुझुकी एसएक्स ४ या गाडीतून विमानतळाकडे निघाले. सकाळच्या ट्रॅफिक नसलेल्या वेळेत कमाल अर्धा तासाचा प्रवास. त्यांचे सचिव नायर त्यांच्यासमवेत होते.

‘वाहनचालकांचीही काळजी घेणारा नेता’

$
0
0
गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाडा, मुंबई आणि दिल्लीमध्ये तीन स्वतंत्र वाहनचालक होते. ते सर्वांप्रमाणेच वाहनचालकांशी आपुलकीने वागायचे आणि अडचणी सोडवायचे, अशी भावना मुंडे यांचा वाहनचालक बाबासाहेब पांढरे यांनी व्यक्त केली. मुंडे मराठवाड्यामध्ये असताना पांढरे त्यांच्या गाडीवर चालक असायचा.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images