Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

क्रिकेट कारकीर्द योग्य दिशेने

$
0
0
सीएट सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू हा पुरस्कार मला अगदीच अनपेक्षित होता, मात्र या पुरस्कारामुळे माझी कारकीर्द योग्य ट्रॅकवर चालू असल्याची खूण आहे, अशी भावना युवा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विजय झोल याने ‘मटा’शी संवाद साधताना व्यक्त केली.

अजबनगरात विजेच्या तारा लोंबकळल्या

$
0
0
अजबनगरातील छोटा तकिया भागातील लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांमुळे या भागातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या जिवाला धोक होऊ नये यासाठी तारा व्यवस्थित कराव्यात अशी मागणी जीटीएल विरोधी नागरी कृती समितीने केली आहे.

‘स्थायी’च्या सभापतिपदी वाघचौरे

$
0
0
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे नगरसेवक विजय वाघचौरे यांची निवड झाली. सभातिपदासाठी झालेल्या निवडणुकीत वाघचौरे यांना ९ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ कोकाटे यांना ७ मते मिळाली.

पाणी पुरवठ्यावर आजही बोळा

$
0
0
दुष्काळात तेरावा महिना म्हणतात त्याचा प्रत्यय शुक्रवारी (७ जून) शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात आला. ट्रिपिंगमुळे वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला.

तारेला चिकटून पिता मृत्युमुखी, मुलगा जखमी

$
0
0
इमारतीचे बांधकाम करताना विद्युत पुरवठा करणाऱ्या तारेला स्पर्श झाल्याने गवंडी काम करणारे पिता-पूत्र गंभीर भाजल्याची घटना शुक्रवारी (६ जून) सकाळी अकरा वाजता भारतनगर येथे घडली.

नागरे महापालिकेचे सभागृह नेते

$
0
0
शिवसेनेचे नगरसेवक किशोर नागरे यांनी महापालिकेचे सभागृहनेते म्हणून शुक्रवारी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत सूत्रे स्वीकारली.

भाजपचे नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक बबन नरवडे यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याला पाण्याचे टँकर घरी न पाठवल्याने हा प्रकार गुरुवारी (५ जून) दुपारी कोटला कॉलनी भागात घडला होता.

बोक्या गॅँगच्या गुंडाला ‘तडी’

$
0
0
पोलिस भरतीसाठी आलेल्या बाहेरगावच्या तरुणाला लुबाडणाऱ्या गुंडाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता हा प्रकार घडला. पकडण्यात आलेला आरोपी भोईवाडा भागातील कुख्यात बोक्या गँगचा सदस्य आहे.

विद्यापीठ देशात अव्वल बनविणार

$
0
0
गुणवत्ता असलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यावर आणि केवळ परीक्षार्थी घडविण्यापेक्षा चांगले संशोधक व शास्त्रज्ञ घडविण्यावर भर असेल, असा मानस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी व्यक्त केला. ज्ञाननिर्मितीच्या बळावर विद्यापीठ राष्ट्रीय पातळीवर अव्वल ठरविण्याचा संकल्प केला आहे, असे डॉ. चोपडे म्हणाले.

‘एमएचसीईटी’त लातूरचा झेंडा

$
0
0
मेडिकलच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक परीक्षेत (एमएच - सीईटी) लातूरच्या राजर्षी शाहू कॉलेजचा देवेश शिळीमकर ७२०पैकी ६७८ गुण मिळवून राज्यात आला. याच कॉलेजचा विपुल विजयकुमार जाजू (७२० पैकी ६६६ गुण) राज्यात दुसरा आला.

‘मेडिकल’च्या ४०० जागा अधांतरी

$
0
0
गेल्या वर्षी घाईगडबडीत प्रस्ताव सादर करून राज्य सरकारने भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून (एमसीआय) एमबीबीएस प्रथम वर्षाच्या ४०० जागा कशाबशा मिळवल्या होत्या. यंदाच्या शैक्षणिक वर्षात या जागा भरण्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

नांदेडच्या मासळी बाजाराला फटका

$
0
0
मृग नक्षत्राच्या सुरुवातीच्या दिवशी सर्व मासाहारी नागरिकांसाठी मासळी खाण्याचा प्रघात आहे.परंतु, मासळीची प्रचंड आवक होऊनही अपेक्षेप्रमाणे विक्री मात्र झालेली नाही.

गोपीनाथरावांचे स्वप्न पूर्ण करायचेय

$
0
0
सामाजिक बांधिलकी जगण्याचे, नेतृत्व तयार करण्याचे मोठे काम गोपीनाथ मुंडेंनी केले. मुंडे वन मॅन आर्मी होते. त्यांनी छोट्या घटकांना नेतृत्व दिले. वंचितांना न्याय दिला. मुंडेंना पुढील पाच वर्षांत राज्याचा चेहरा-मोहरा बदलून टाकायचा होता.

एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध सोमवारपासून (९ जून) कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रशासनाने घेतला आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे.

पोलिस भरतीवर कॅमेऱ्यांची नजर

$
0
0
जिल्हा ग्रामीण पोलिस विभागासाठी शिपाईपदाच्या २१५ जागांसाठी शुक्रवारपासून भरती सुरू झाली. पहिल्याच दिवशी २६६, दुसऱ्या दिवशी ३२३ उमेदवार गैरहजर होते. उंची, छाती तपासणी व अन्य कारणांमुळे मिळून शुक्रवारी ८५ आणि शनिवारी १३१ उमेदवार अपात्र ठरले आहेत.

‘दहावी, बारावीनंतर पुढे काय?’

$
0
0
टाइम्स ग्रुप आणि विस्डम एज्युकेशन अकादमी यांच्यातर्फे दहावी नंतर पुढे काय? या विषयावर विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचे भविष्यातील शिक्षण कसे असावे, कोणत्या क्षेत्रात करिअर बनविण्याच्या नव्या संधी उपलब्ध आहेत, या विषयावर तज्ज्ञ सेमिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

‘डीटीएड’चे शंभर कॉलेज बंद होणार

$
0
0
अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाकडे (डीटीएड) विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्यामुळे आता या कालेजांना आता टाळे लावण्याची वेळ आली आहे. राज्यातील शंभरहून अधिक कॉलेज येत्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत. औरंगाबाद विभागातील सुमारे ५० कॉलेजांचा यात समावेश आहे.

‘मेडिकल’च्या जागांबाबत अनास्था

$
0
0
केंद्र सरकारने गेल्या वर्षी महाराष्ट्राला वाढवून दिलेल्या ‘एमबीबीएस’च्या ४०० जागांना सरकारच्या अनास्थेचा फटका बसला आहे. वाढीव जागांच्या बदल्यात अपेक्षित पायाभूत सुविधा पुरविण्याची हमी राज्य सरकारने दिली होती.

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

$
0
0
मतदार नोंदणीसाठी येत्या ९ जून ते ३१ जुलै यादरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत संबंधित मतदान केंद्र, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय येथे मतदार याद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पाणी उपशाला आता गवताचा अडसर

$
0
0
खंडीत वीजपुरवठ्यामुळे जायकवाडी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरील परिणामातून यंत्रणा सावरत असतानाच, आता नव्या त्रासाला सुरुवात झाली आहे. जलाशयातून पाणीउपसा करताना, पंपहाउसला गवताने ग्रासले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images