Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सिडकोतून वसुली जास्त; विकासावर खर्च मात्र कमी

$
0
0
कर वसुलीच्या तुलनेत सिडको - हडको भागात विकास कामांवर खर्च कमी करण्यात येत आहे. कर वसुली आणि विकास कामांवरील खर्चात २५ ते २७ कोटी रुपयांचा फरक आहे. हा फरक महापालिकेचे प्रशासन कसा भरून काढणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

कोसळणाऱ्या कुटुंबांना भारतीय संस्कृतीच तारेल

$
0
0
आत्मसन्मान मिळवायचा असल्यास दुसऱ्यांचा सन्मान करावा लागतो. सध्या भारतीय संस्कार, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था शेवटची घटका मोजत आहे. कोसळणाऱ्या कुटुंबांना पुन्हा एकदा भारतीय संस्कृतीच तारणार आहे.

टेलीफिशिंग अॅटॅकरने घातला ४९ हजारांचा गंडा

$
0
0
टेलीफिशिंग अॅटॅकरने शहरातील एका एटीएम कार्डधारकाला बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगत एटीएम कार्ड क्रमांक मिळविला आणि ऑनलाइन शॉपिंग करीत ४९ हजाराचा गंडा घातल्याचा प्रकार बुधवारी (१८ जून) घडला.

बंब यांच्याविरुद्ध पोलिस सुप्रीम कोर्टात

$
0
0
भानेवाडी टोल नाक्यावर अतिरिक्त टोल वसुलीचा आरोप करीत करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब व इतरांवर दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने बंब यांना निर्दोष ठरवले असले तरी, राज्य शासनाने सुप्रीम कोर्टात नुकतेच आव्हान दिले आहे.

‘जेईई-अॅडव्हान्स्ड’मध्येही औरंगाबाद आघाडीवर

$
0
0
आयआयटी प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या ‘जेईई-अॅडव्हान्स’चा निकाल गुरुवारी जाहीर झाला. औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी यात चमकदार कामगिरी केली असून शहरातील सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी आयआयटी प्रवेश निश्चित केला आहे.

५ वर्ष, १५ किलोमीटर, १०९ बळी

$
0
0
औरंगाबाद - नगर महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. गेल्या पाच वर्षात वाळूज ते दहेगाव बंगला, या १५ किलोमीटर दरम्यान १०९ जणांचा अपघातात बळी गेला आहे. तर अनेकांना अपंगत्व आले आहे. त्यात वीस नंबर खोली हे स्थळ केंद्रस्थानी असून या खोलीच्या जवळपास जास्त अपघात झाले आहेत.

मान्सून मराठवाड्याच्या उंबरठ्यावर

$
0
0
यंदा मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यानंतर आता मान्सून मराठवड्याड्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. येत्या दोन – तीन दिवसांमध्ये मराठवाड्यात मान्सूनचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

रिलायन्सचे ट्रॅक्टर जप्त केले

$
0
0
एक महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर विनापरवानगी खोदकाम सुरू केल्यामुळे नगरसेवक जगदीश सिद्ध यांच्या तक्रारीवरून महापालिकेने गुरुवारी (१९ जून) रिलायन्स कंपनीचे ट्रॅक्टर जप्त केले.

नाथांची पालखी निघाली...

$
0
0
टाळमृदंगाचा जयघोष, ज्ञानोबा-तुकारामांचा गजर आणि पावसाने लावलेली हजेरी. अशा भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात गुरुवारी (१९ जून) नाथांच्या पालखीने ऐन सूर्यास्ताच्या वेळी गोदातीरावरून पंढरपूरकडे प्रस्थान केले.

पदवीधरसाठी आज मतदान

$
0
0
विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी (२० जून) आठ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होईल.

अजयने गाजवले मलेशिया

$
0
0
बहारदार ओडिसी नृत्याने औरंगाबादेतील युवा कलाकार अजय शेंडगे याने मलेशियातील रसिकांना भारावून टाकले. मलेशियातील सिबू सारावाक शहरात मागील आठवड्यात हा आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव झाला. महोत्सवात अजयने भारताचे प्रतिनिध‌ित्व केले. विशेष म्हणजे जगभरातील रसिकांनी शास्त्रीय नृत्याला दाद दिली.

भद्रा मारुतीच्या दिंडीचे पंढरपूरकडे मार्गस्थ

$
0
0
सत्तावीस वर्षांची परंपरा असलेल्या श्री भद्रा मारुतीची दिंडीने भद्रा मारुतीचा जयघोष व टाळ, मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे शुक्रवारी (२० जून) प्रस्थान केले.

श्री जनार्दन स्वामींच्या पालखीचे प्रस्थान

$
0
0
आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या दिंड्या मार्गस्थ झाल्या आहेत. दौलताबाद येथून शुक्रवारी जनार्दन स्वामी महाराजांच्या पालखीने प्रस्थान ठेवले. विठ्ठलाच्या जयघोषात शेकडो वारकरी सहभागी झाले होते.

इथून प्रवास, नको रे बाबा!

$
0
0
मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या वाटेत अरुंद रस्त्याने काटे पेरले आहेत. अतिक्रमणामुळे जयभवानीनगरातून स्टेशन गाठताना वाहनधारकांच्या नाकी नऊ येतात. त्यामुळे या स्टेशनवरून प्रवास म्हणताच, लोकांचे उत्तर असते ‘नको रे बाबा...!’

३० टक्क्यांपेक्षा कमी वाढ

$
0
0
राज्यातील ९२ हजार वीज कर्मचाऱ्यांच्या नवीन वेतन करारात ३० टक्क्यांपेक्षा कमी वेतनवाढ राहील, असे संकेत होल्डिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांनी वीज संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेत दिली.

मोलमजुरी करून फरीन शेखने साधले लक्ष्य

$
0
0
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शाळेतून आल्यानंतर कधी विटभट्टीवर तर कधी शेतमजुरीला जावे लागले. परिस्थितीचे ओझे वाहतानाच शाळेचे दफ्तरही पाठीवर असावे, या इच्छेच्या जोरावर हर्सुलमधील फुलेनगरात राहणाऱ्या फरीन शेख या विद्यार्थिनीने दहावीच्या परिक्षेत ८२ टक्के गुण मिळविले आहे.

१३ इमारती कारवाईच्या प्रतीक्षेत

$
0
0
महापालिकेच्या शहर अभियंत्यांच्या अभिप्रायात धोकादायक इमारतींची फाइल अडकली आहे. अभिप्रायानंतर ही फाइल कारवासाठी अतिक्रमण हटाव विभागाच्या ताब्यात येईल. तेरा धोकादायक इमारती कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत.

कुख्यात गुंड टिपूच्या हल्ल्यातून कारचालक बचावला

$
0
0
जालना रोडवर सोमवारी (१६ जून) रात्री तलवारी घेऊन नंगानाच करणाऱ्या कुख्यात गुंड टिपूच्या टोळक्यातून एक कारचालक बालंबाल बचावला. तलवारीचा वार त्याच्यावर होणारच होता, पण जीव मुठीत घेऊन त्याने स्वतःला वाचवले.

गोठ्याची जागा बीओटी करण्याचा डाव

$
0
0
गोठ्यासाठीच्या २५ एकर जागेतून सहा एकर हडप करण्याचा डाव फसल्यानंतर आता ही संपूर्ण जागा बीओटीवर विकसित करण्याचा डाव आहे. भूखंड मर्जीतल्या विकासकाला बीओटीवर देण्यासाठी पालिकेतील बडे पदाधिकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत.

चार इंजिनीअरिंग कॉलेज ‘बंद’च्या वाटेवर?

$
0
0
राज्यभरात सुळसुळाट झालेल्या ‘इंजिनीअरिंग’ची वाटचाल ‘डीटीएड’ अभ्यासक्रमाच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. पुरेशा प्रवेशाअभावी यंदा औरंगाबादमधील तीन ते चार कॉलेज सुरूच होणार नाहीत, अशी स्थिती आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images