Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सिटीबस म्हणजे नावडते अपत्य

$
0
0
गेल्या तीन वर्षांत सिटीबस सेवेत सुधारणा करून ती लोकोपयोगी करण्याचे कोणतेही प्रयत्न न झाल्याने लोकांना पर्यायी रिक्षावर अवलंबून राहावे लागत आहे. सिटीबस व्यवस्था ही एसटीसाठी नावडते अपत्य बनले आहे.

प्रवासी सुरक्षा वाऱ्यावर

$
0
0
मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवासी महिलेचे ६५ हजार रुपयांचे दागिने पळवण्याची घटना गुरुवारी (१९ जून) दुपारी घडली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारीही एका प्रवासी महिलेचे ९२ हजारांचे दागिने पळवण्याचा प्रकार घडला होता.

रेल्वेसाठी ‘अच्छे दिन’ पण...

$
0
0
केंद्र सरकारने जाहीर केलेली दरवाढ येत्या मंगळवारपासून (२५ जून) लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्पीलर कोचसाठी सध्याच्या भाड्यात ‌२५ रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत.

यादीतील घोळाने मतदानात घट

$
0
0
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच मतदार यादीमधील तांत्रिक घोळामुळे विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता.२०) झालेल्या निवडणुकीकडे पदवीधरांनी पाठ फिरवली.

मान्सून पोचला मराठवाड्यात

$
0
0
रेंगाळलेल्या मान्सूनने अखेर शुक्रवारी (२० जून) मराठवाड्यात पोचला. आज दुपारी मान्सूनने मराठवाड्याचा बहुतांश भाग व्यापला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

कर्मचाऱ्यांनीच केले लुटमारीचे नाटक

$
0
0
शैक्षणिक संस्थेचे पैसे बँकेत भरण्यासाठी कारने जात असलेल्या संस्थेच्या अध्यक्ष व कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांच्याकडील तब्बल ५२ लाख रुपये लुटणाऱ्या सहा आरोपींना रोख रक्कमेसह गजाआड करण्यात पोलिसांना शनिवारी (२१ जून) यश आले आहे.

बसस्थानके होणार ‘फाइव्ह’स्टार

$
0
0
राज्यातील चाळीस वर्षांपेक्षा जास्त जुनी बसस्थानके बीओटी तत्वावर नव्याने बांधत, या बसस्थानकांना पंचतारांकित लूक देण्याच्या कामाची सुरुवात बहुधा जुलै महिन्यात करण्यात येणार आहे.

१४१ प्रकल्पांत सात टक्के पाणीसाठा

$
0
0
बीड जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणी प्रश्न उग्र समस्या धरण करू लागला आहे. बीड जिल्ह्यातील १४१ सिंचन प्रकल्पातील पाणी पातळी घटली असून जून महिन्यात बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात केवळ सात टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

गौताळ्यात रंगीबेरंगी पक्ष्यांचे संसार

$
0
0
गौताळ्याच्या जंगलात रंगीबेरंगी पक्षांची वसाहत वाढू लागली आहे. त्यामुळे पक्षीमित्रांची पाऊलेही आता या जंगलाच्या दिशेने वळू लागली आहेत. वन्यप्राण्यांसाठी कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य प्रसिद्ध आहे.

निवडणुकीत ३७ टक्क्यांवर मतदान

$
0
0
विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत शुक्रवारी (२१ जून) ३७.४७ टक्के मतदारांनी मतदान केले. सर्वाधिक, ४५.२५ टक्के मतदान हिंगोली जिल्ह्यात नोंदविले गेले. त्याखालोखाल जालना जिल्ह्यात ४४.४३ टक्के मतदान झाले.

डिप्लोमाचे प्रवेश बुधवारपासून

$
0
0
पॉलिटेक्निकच्या ‌थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रियेला मुर्हूत लागला आहे. तंत्रशिक्षण विभागाने शनिवारी (२१ जून) प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावी सायन्स, व्होकेशनल, आयटीआय पूर्ण केलेले विद्यार्थी प्रवेशास पात्र असतात.

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

$
0
0
यंदा पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ठिंबक सिंचनाची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली असून, आतापर्यंत सुमारे १६ हजार हेक्टरवर लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

वनरक्षक ठरवणार जंगलाचे धोरण

$
0
0
वन संरक्षण करण्यासाठी स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्याला राज्य शासनाने अधिकार दिले आहेत. महाराष्ट्र वन नियमावलीनुसार वन कायद्यात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. नवीन कायद्यांची वन कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी बुधवारी विशेष कार्यशाळा घेण्यात आली.

पत्नीच्या छळाने पती त्रस्त !

$
0
0
सासरी विवाहितेचा छळाच्या घटना नव्या नाहीत, पण चक्क पत्नीकडून छळ होत असल्याच्याही तक्रारी सुरू झाल्या आहेत. गेल्या दीड वर्षांत पत्नीच्या त्रासामुळे तब्बल ४० पतींनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यापैकी ५ प्रकरणांत घटस्फोट झाला, तर ५ जणांचे संसार रुळावर आले आहेत.

कोरियन दिव्यांनी शहर उजळणार

$
0
0
कोरियन बनावटीच्या दिव्यांनी येत्या काही महिन्यांत संपूर्ण शहर उजळून निघणार आहे. पथदिव्यांसाठीचे बीओटीसह सर्व प्रकारचे कंत्राटे रद्द करण्याच्या हालचाली पालिकेत प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत.

‘एलबीटी’चा ओघ वाढला

$
0
0
व्याज वाचवण्यासाठी स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) पैसे भरण्याकडे व्यापाऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे पालिकेच्या आमदनीचा ओघ वाढला असून पालिका कर्मचाऱ्यांच्या पगाराचे टेन्शन कमी झाले आहे.

कारमधून ५२ लाख लुटले

$
0
0
शैक्षणिक संस्थेचे पैसे बँकेत भरण्यासाठी कारने जात असलेल्या संस्थेच्या अध्यक्ष व कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांच्याकडील तब्बल ५२ लाख रुपये लुटणाऱ्या सहा आरोपींना रोख रक्कमेसह गजाआड करण्यात पोलिसांना शनिवारी (२१ जून) यश आले आहे.

शाळा प्रवेशात आरक्षण द्यावे

$
0
0
बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याबाबत जिल्हा परिषदेने व्यापक जनजागरण मोहीम राबवून जागृती केली. तथापी इंग्रजी शाळा मागसघटक व वंचित घटकाच्या २५ टक्के आरक्षण प्रवेशाबाबत उदासिन आहेत.

जीवनदायचा शिधापत्रिकेवरही लाभ

$
0
0
शासनाने समाजाची गरज ओळखून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. तळागाळातील नागरिकापर्यंत योजना पोचवून लाभार्थ्यांना आरोग्य कार्ड द्यावे व तोपर्यंत शिधापत्रिकेच्या आधारे लाभ द्यावा, अशी सुचना अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री अमित देशमुख यांनी लातूर येथील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आतापर्यंत ३१ मिलिमीटर पाऊस

$
0
0
बीड जिल्ह्यातील काही भागात गेल्या आठवड्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सरासरी ३१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. या झालेल्या पावसावर शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images