Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

...तर येणारा महिना आर्थिक अडचणींचा

$
0
0
व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे स्थानिक संस्थाकर (एलबीटी) न भरल्यास पुढील महिन्यात व्हाइट टॉपिंगसह विविध कामांच्या बिलांची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यातील महापौर जकातीच्या बाजूने

$
0
0
राज्यभरातील व्यापाऱ्यांनी जकात कराला पसंती दिली आहे. जकात करच राहू द्या असे मत महापौर परिषदेच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. तसा अहवालही मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंतीही करण्यात आली.

स्टेशनवरही हवे व्हेंडरिंग वॉटरिंग मशिन

$
0
0
दक्षिण भारतातीकडील अनेक रेल्वे स्टेशनवर एक किंवा दोन रुपयांत एक लिटर शुद्ध पाणी देण्याचे मशिन बसविण्यात आले आहेत. त्याप्रमाणे औरंगाबाद स्टेशनवरी अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. वॉटरिंग मशिनच्या माध्यमातून रेल्वेलाही उत्पन्न मिळू शकेल.

पोषण आहाराच्या निविदेस हायकोर्टात आव्हान

$
0
0
नियम डावलून पोषण आहाराच्या निविदा राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी काढल्याचा आरोप करीत निविदेलाच मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. या प्रकरणी पुढील आदेशापर्यंत निविदा काढू नका आणि कुठलीही कारवाई करू नका, असे आदेश खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. व्ही. एल. अचलिया यांनी दिले.

पार्किंग कंत्राटदाराची अनामत रक्कत जप्त

$
0
0
मध्यवर्ती बस स्थानकाच्या पार्किंगसाठी नियोजित जागेपेक्षा जास्त जागा वापरल्या प्रकरणी सुरक्षा विभागाने २८ लाख रुपयाची वसुलीचे आदेश दिल्यानंतर कंत्राटदाराची सुरक्षा अनामत रक्कम ११ लाख रुपये जप्त करण्यात आले असून १७ लाखांच्या वसुलीसाठी एसटीला कोर्टा धाव घ्यावी लागणार आहे.

वैध- अवैध मतांच्या घोळात मोजणीला उशीर

$
0
0
मतमोजणीचे प्रशिक्षण दिल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये वैध व अवैध मतांबद्दल स्पष्टता नसल्यामुळे विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी मतांच्या मोजणीला उशीर झाला.

मंत्र्यांचा आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

$
0
0
सरकारी अधिकारी आणि त्यांचा कारभार कसा निर्लज्ज, निगरगट्ट, गेंड्याच्या कातडीचा असतो याचा नमुना मंगळवारी (२४ जून) अनुभवायला मिळाला. चोवीस तासांत वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या पाण्याचे सगळे प्रश्न सोडवा, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात दिले.

‘वक्फ’च्या जागांवर सरकारी दफ्तरे

$
0
0
मराठवाड्यात वक्फ बोर्डाच्या जमिनींवर तब्बल ११३ सरकारी कार्यालये सुरू आहेत. या कार्यालयातून बोर्डाला ना एका रुपयाचे उत्पन्न मिळते, ना कसला फायदा. त्यामुळे या जमिनी नियमित करून भाडे सुरू करावे, अशा नोटिसा वक्फ बोर्डाने सरकारी कार्यालयांना दिल्या आहेत.

अनाधिकृत शाळांचे रेकार्ड जप्त

$
0
0
शिक्षण विभागाच्या नाकावर टिच्चून शहरातील काही शाळांनी अनधिकृतपणे प्रवेश दिलेल्या तीन शाळांवर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करून २४ तास उलटले तरी संबंधित आरोपींचा शोध सुरूच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मंगळवारी (२४ जून) पोलिसांनी या शाळांमधील कागदपत्रे जप्त केली आहेत.

भागिदारी अभावी प्रकल्प बारगळला

$
0
0
शेतीचे संभाव्य नुकसान टाळणे आणि पीक विमा योजनेसाठी प्रत्येक महसुली विभागात स्वयंचिलत हवामान केंद्र उभारण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली. कृषी विभाग आणि खासगी कंपनीच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर प्रकल्प राबवण्यात येणार होता; मात्र निविदा काढल्यानंतरही भागीदार कंपनी मिळाली नसल्यामुळे संपूर्ण राज्यभरात हा प्रकल्प बारगळला आहे.

थकित एलबीटीवर दोन टक्के व्याज

$
0
0
एलबीटीच्या संदर्भात अनेक व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भूखंडांसाठी पुन्हा टेंडर

$
0
0
मालकीचे भूखंड नावावर करून घेण्यासाठी महापालिका आता टेंडर (निविदा) काढणार आहे. खासगी व्यक्ती किंवा संस्थांच्या माध्यमातून भूखंड नावावर करून घेण्याची योजना आखली जात आहे. येत्या काळात या कामाला गती देण्यात येणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी मंगळवारी (२४ जून) सूचित केले.

राष्ट्रवादीने ‘पदवीधर’ राखला

$
0
0
मोदी लाटेचा प्रभाव असूनही, जनसंपर्काच्या जोरावर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण १५ हजार मतांनी विजयी झाले. भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५३ हजार ६४७, तर चव्हाण यांना ६८ हजार ७६५ मते पडली.

शेतीला पाणी मिळण्याची आशा धूसर

$
0
0
बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणातून यंदा शेतीला पाणी पाळी मिळण्याची मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यात यंदा अजून पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही यासाठी या धरणातील पाणी राखून ठेवने गरजेचे आहे.

‘बेशरमा’मुळे पुराचा धोका

$
0
0
किनवट राज्य रस्त्यावरील ओढ्यामध्ये बेशरमाची झाडे वाढली असून त्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

महिनाभरात २६ लाख रुपयांची वीज चोरी

$
0
0
महावितरणच्या लातूर पोलिस ठाण्यातंर्गत सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. मे महिन्यात वीज ग्राहकांनी तब्बल दोन लाख ७१ हजार ९८६ युनिटची वीज चोरी केली आहे. त्याची किंमत २६ लाख ३६ हजार रुपया इतकी आहे.

पोलिस भरतीवेळी युवक बेशुद्ध

$
0
0
येथील पोलिस भरतीवेळी घेण्यात आलेल्या धावण्याच्या स्पर्धेत युवक बेशुद्ध होऊन कोसळला. विकास श्रीधर गायकवाड असे त्यांचे नाव आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

जालना पोलिसांमध्ये कही खुशी; कही गम

$
0
0
पोलिस बदल्यांची नव्या यादीमुळे कही खुशी तर कही गमचे वातावरण पहायला मिळाले. या यादीतील कर्मचाऱ्यांना मंगळवारी (२४ जून) रात्रीच तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले. पण बहुतांश कर्मचारी अद्याप नवीन ठिकाणी रुजू झाले नाहीत.

जालन्यात ३ जुलैपासून सैन्य भरती मेळावा

$
0
0
भारतीय सैन्य विभागातर्फे जालना येथे ३ ते १२ जुलै याकाळात औरंगाबाद, बुलडाणा, धुळे, हिंगोली, जालना, नांदेड, नंदूरबार आणि परभणी या जिल्हयातील तरूणांची सैन्य भरती करण्यात येणार आहे.

...पण बँकेमुळे पैसे मिळेनात

$
0
0
गारपिटीने पिचलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत पाठविली असली तरी सिल्लोड येथील बँक ऑफ महाराष्ट्रने ती अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावर अजून वर्ग केली नाही. त्यामुळे बँकेच्या खेट्या माराव्या लागत आहेत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images