Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जन्म-मृत्युच्या प्रमाणपत्रास विलंब नको

$
0
0
महापालिकेच्या आरोग्य विभागात जन्म-मृत्यु प्रमाणपत्र देण्यात विलंब होत असल्याची तक्रार महापौरांसह विविध पदाधिकारी व नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली. त्यामुळे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी आरोग्य विभागात जवळपास चार तास तळ ठोकून तेथील सर्व प्रक्रियेची छाननी केली.

कंधार ठाण्यातील तीन पोलिस निलंबित

$
0
0
कंधार पोलिस ठाण्यात दारू पिवून जुगार खेळणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. परंतु, कंधारच्या ठाण्यात ही ओलीपार्टी सुरू असताना वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या धाडीची चाहूल लागल्याने काही पोलिस कर्मचारी पळून गेले होते. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र ग्रामीण बँक बरखास्तीचा प्रस्ताव पाठविणार

$
0
0
शेतकऱ्यांना कर्ज देताना महाराष्ट्र ग्रामीण बँक हात आखडता घेत असल्याने खुद्द सहकार राज्यमंत्र्यांने कारवाईचे संकेत दिले आहेत. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात महाराष्ट्र ग्रामीण बँक असून अडचण नसून खोळंबा झाली आहे, असे मत राज्याचे सहकार राज्यमंत्री सुरेश धस यांनी व्यक्त केले.

घरासाठी दोन महिन्यांपासून उपोषण

$
0
0
शासनाने घरकुल मंजूर केले. मात्र, घरकुल मंजूर केलेल्या जागेवर अतिक्रमण असल्याने दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाजाचे कुटुंब उपोषण करीत होते. त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही.

शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी मदत द्या

$
0
0
यावर्षी राज्यात पावसाचे आगमन जून महिना संपत आला तरी झालेले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा पीआरएसएचएन मोठ्या प्रमाणावर भेडसावणार आहे.

उस्मानाबादचा सुपुत्र शहीद

$
0
0
गडचिरोली येथील ग्यारापत्ती जंगलात २६ जूनच्या पहाटे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात उमेश जावळे हा पोलिस जवान शहीद झाला. २५ जूनच्या मध्यरात्री इनकाउंटर अभियान राबवून झाल्यानंतर पोलिस जंगलात मुक्कामाला असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केला.

पावसाअभावी ७६ प्रकल्प कोरडे

$
0
0
दुष्काळ, अवकाळी आणि गारपीट अशा नैसर्गिक संकटाने बेजार झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील बळीराजाच्या मानगुटीवर यंदा पुन्हा अवर्षणाच्या संकटाची तलवार आहे. रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या पावसाने निराशा केल्यामुळे खरीप हंगामाचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

तीन वर्षांच्या खंडानंतर जूनमध्ये पावसाची दांडी

$
0
0
जून महिना संपत आला आहे. आर्द्रा नक्षत्रही अर्ध्यावर आले असताना अद्याप लातूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली नाही. परंतु, लातूर जिल्ह्याचा पावसाचा इतिहास पाहता दर तीन वर्षानी एकदा असा फटका बसतो. गेल्या दहा वर्षांतील शासकीय आकडेवारी सुद्धा हेच दर्शवते.

‘उडपी कृष्णा भवन’चा आज सुवर्ण महोत्सव

$
0
0
गरम गरम भजे, जिलेबी आणि पारंपरीक फाफड्याचा नाश्ता रस्त्यावर उभे राहून करणाऱ्या जालनेकरांना स्‍वच्‍छ आणि अत्‍यंत नीटनेटक्‍या कर्नाटकी संस्‍कृतीच्‍या उडपी हॉटेलची इडली, वडा, सांबर आणि मसाला दोसा या खास दाक्षिणात्‍य पदार्थांच्‍या विशिष्‍ट चवींची स्‍वातंत्र्योत्तर काळात गोडी लावणारे ‘उडपी कृष्‍णा भवन’ ५० वर्षांची यशस्‍वी वाटचाल करत, शनिवारी सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे.

रिलायन्सच्या ‘फोर जी’साठी दिवाळीचा मुहूर्त

$
0
0
रिलायन्स कंपनीच्या फोर-जी सेवेसाठी दिवाळीचा मुहूर्त साधला जाणार आहे. या सेवेची सुरुवात करण्यासाठी राज्यातून औरंगाबाद व नाशिक या दोन शहरांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती रिलायन्स कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मराठवाड्यात केवळ १८ टक्के पाणी

$
0
0
मराठवाड्यात अद्याप पाऊस पडला नसल्याने मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

डोक्यात मारणार होते गोळी, पण...

$
0
0
पंढरपूर परिसरात गुरुवारी झालेल्या गोळीबारामध्ये निसार खाली पडल्यानंतर ‘इसका गेम बजा दो,’ म्हणत त्याच्या डोक्यावर निशाणा साधण्यात आला, मात्र त्याची आत्या धावत आल्याने आरोपींचा डाव उधळला. हल्ल्यात थोडक्यात बचावलो असल्याची माहिती जखमी निसारने दिली.

गुणवंत यंदाही देत आहे दातृत्वाला साद!

$
0
0
छप्पर नसलेले घर, हरपलेले पितृछत्र, काबाडकष्ट करून मुला-मुलीला शिकविण्यासाठी झटणारे पालक, वाडी-वस्तीमधील प्रतिकूल परिस्थितीतही लक्ष विचलित होऊ न देता निर्धारपूर्वक केलेला अभ्यास, प्रसंगी घरच्या उत्पन्नाला हातभार लावून शिक्षणाचा घेतलेला ध्यास …

कोरड्या धरणांमधील गाळ उपसा

$
0
0
मराठवाड्यामध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या दुष्काळामध्ये कोरड्या पडलेल्या धरणांमधील गाळ उपसण्याचे चांगले काम झाले होते. अशा पद्धतीचे काम यंदाही करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी (२७ जून) दिल्या.

सेवेतून काढण्याच्या आदेशास आव्हान

$
0
0
कंधार (जि. नांदेड) येथील किमान वेतन निरीक्षकाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवीत, त्यांना सेवेतून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले असता, खंडपीठाने प्रतिवादींना नोटिस बजावण्याचे आणि कारवाई न करण्याचे आदेश दिले.

दहा लाखांसाठी विद्यार्थ्याचे अपहरण

$
0
0
दहा लाखांच्या खंडणीसाठी ओळखीच्याच तरुणांनी एका महाविद्यालयीन युवकाचे अपहरण केले. मात्र, पोलिसांनी तपास सुरू केल्यामुळे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने अपहरणकर्त्यांनी या युवकाने सोने चोरल्याचा बनाव रचत पोलिस ठाणे गाठले.

भारनियमन पुढचा एक महिना रद्द

$
0
0
राज्यात पुढचा एक महिना भारनियमन असणार नाही. २९ जून ते ३१ जुलै दरम्यान भारनियमन बंद करण्याचे आदेश निघाले आहेत. आषाढी वारी आणि रमजान महिन्याच्याच्या पार्श्व्भूमीवर भारनियमन न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहीती महवितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ई- पेमेंट पद्धतीला खो

$
0
0
नवीन वाहन खरेदीनंतर आरटीओ कार्यालयात वाहन शुल्क भरण्यासाठी होणारा उशीर टाळण्याकरीता परिवहन विभागाने ई- पेमेंट सुविधा सुरू केली आहे. पंरतु या पद्धतीला शहर व जिल्ह्यातील फक्त दहा टक्के वाहन विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला आहे.

एकाच दिवशी चक्क दोनदा बदली!

$
0
0
शासकीय यंत्रणेत धक्कादायक चमत्कार कसे घडू शकतात, याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. एका लिपिकाची एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बदली करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त के. सी. शेलार (प्रशासन) यांनी दिले होते.

प्राणिजन्य कचऱ्यापासून गॅस

$
0
0
प्राणीजन्य कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारण्याच्या संदर्भात महापालिकेने तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images