Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गुंठेवारी विभाग दलालांचा अड्डा

$
0
0
‘गुंठेवारी विभाग दलालांचा अड्डा बनला आहे. काही फाइली हँड टू हँड मंजूर केल्या जातात. अधिकारी आणि काही दलालांचा फाइली मंजूर करण्याचा धंदाच झाला आहे,’ अशा शब्दांत नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत गुंठेवारी विभागाच्या कामकाजावर आरोपांच्या फैरी झाडल्या.

झालर क्षेत्र विकासासाठी ५५०० कोटींची गरज

$
0
0
शहरालगतच्या २८ गावांच्या झालर क्षेत्राचा विकास करण्यासाठी सुमारे साडे पाच हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ही रक्कम उपलब्ध झाली तर, नव्याने वाढत असलेल्या व वाढणाऱ्या भागातील नागरिकांना अत्यावश्यक पायाभूत सुविधा पुरविणे शक्य होणार आहे.

औरंगाबादमध्ये दरररोज १ हजार मोबाइलची विक्री

$
0
0
माणसे जोडण्याचे साधन म्हणून सध्या मोबाइल ओळखला जातोय. व्हॉटस् अॅप, फेसबूक आणि दिवसेंदिवस बदलणारे तंत्रज्ञान. यामुळे प्रत्येकालाच आपल्या हातातला मोबाइल जुना वाटतोय. त्यामुळेच मोबाइच्या विक्रीतही वाढ होतेय.

खरीपाचे दीड लाख हेक्टर क्षेत्र घटणार?

$
0
0
तब्बल एक महिना मान्सून लांबल्यामुळे खरीप हंगामाची पेरणी ठप्प आहे. पेरणीसाठी अपेक्षित पाऊस नसल्यामुळे मूग आणि उडिद या कडधान्यांचे क्षेत्र पूर्णपणे बाद झाले आहे. तसेच कपाशी व सोयाबीनचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता असून जिल्ह्यात खरीपाचे किमान दिड लाख हेक्टर क्षेत्र घटण्याची भीती कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

कल्पना गिरी कुटुंबाला मदत कोणत्या निकषातून?

$
0
0
काँग्रेसच्या पदाधिकारी अॅड. कल्पना गिरीचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी तशा स्वरूपाचा गुन्हा ही नोंदवला आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलाला अटकही करण्यात आली आहे. तरी मुख्यमंत्री चव्हाण यांनी गिरी कुटुंबियाना दोन लाखाची मदत कोणत्या निकषातुन देऊ केली असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या आमदार निलम गोऱ्हे यांनी गुरुवारी लातूर येथे पत्रकार परिषदेत केला.

प्रेक्षकांना नाट्यगृहाचा धसका

$
0
0
एकेकाळी शहराचे भूषण असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराची रौप्य महोत्सवी वर्षात प्रचंड दुरवस्था झाली आहे. असह्य उकाडा, दुर्गंधी आणि तुटलेल्या खुर्च्यांचा धसका घेतलेल्या दोनशे प्रेक्षकांनी तिकीट काढूनही ‘टॉम आणि जेरी’ नाटकाकडे पाठ फिरवली. प्रेक्षक नाट्यगृहाकडे फिरकत नसल्यामुळे नाट्य व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

तपासणी पथकावर दगडफेक

$
0
0
येथील मोटेगावकर यांच्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसच्या सेवा कराची तपासणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकावर क्लासच्या विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. त्यामुळे घाबरुन गेलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी संरक्षणासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घ्यावी लागली.

मराठी-उर्दू साहित्याचा बांधला सेतू

$
0
0
लाखो रसिकांच्या मनात रुंजी घालणाऱ्या मराठी कवितांना उर्दू भाषिक रसिकांपर्यंत पोहचवण्याचा वसा शहरातील अॅड. अस्लम मिर्झा यांनी घेतला आहे. मागील पन्नास वर्षात मिर्झा यांनी शेकडो मराठी कविता जगभरातील उर्दू वाचकांपर्यंत पोहचवून मराठी-उर्दू साहित्याचा सेतू बांधला.

रेशनकार्ड मिळणार आता त्वरित

$
0
0
बीड जिल्ह्यातील ज्या नागरिकाकडे रेशनकार्ड नाही अशा कुटूंबाना तात्काळ रेशनकार्ड आता मिळणार आहे. यासाठी विशेष अभियान राबवले जात असून महसूल मंडळाच्या ठिकाणी हे रेशनकार्ड देण्यासाठी शिबीर आयोजित केले जाणार आहे.

‘स्वारातीम’चा निकाल लांबणीवर

$
0
0
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी. ए., बी. एस्सी.च्या अंतिम वर्षाचे निकाल जून महिना उलटून गेला तरी जाहीर झाले नाहीत. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

पक्षी निरीक्षणाची दुर्बिण गायब

$
0
0
डॉ. सलीम अली सरोवराच्या लोकार्पणानंतर तेथे पक्षी निरीक्षणासाठी ठेवण्यात आलेली दुर्बिण गायब झाली आहे. केवळ लोकार्पण सोहळ्यापुरतीच ही दुर्बिण ठेवण्यात आली होती, असे आता स्पष्ट झाले. याशिवाय सरोवरात सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येऊ लागला आहे.

‘घुमान’ संमेलनाकडे प्रकाशकांची पाठ

$
0
0
नियोजित ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान (पंजाब) येथे आयोजित करण्यात आले आहे. संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी असलेल्या घुमानमधील संमेलनात पुस्तक विक्री शक्य नसल्यामुळे औरंगाबाद शहरातील प्रकाशकांनी पाठ फिरवली आहे.

रस्ता घोटाळ्याप्रकरणी कोर्टात जाणार

$
0
0
बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेच्या सभापतीसह सर्वांना अंधारात ठेऊन साडे तीन कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपचे जि. प. सदस्य रामचंद्र तिरुके यांनी जि.प.च्या सर्व साधारण सभेत केला. त्यामुळे सभेत मोठा गोंधळही झाला होता.

चार हजार एकरवरील कापसाचे पीक धोक्यात

$
0
0
पावसाअभावी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने लावलेले कापाशीचे पिक कोमेजून जात आहे. यामुळे कंधार तालुक्यातील चार हजार एकर कापसाची पेरणीपूर्व मशागत, बियाणे व मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे. त्यामुळे ११ कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

नांदेडला दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा

$
0
0
विष्णूपुरी प्रकल्पात सध्यस्थितीत १० दश लक्ष घन मीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. नांदेड शहराला ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरणार आहे. त्यामुळे आगामी काळात नांदेड शहरात पाणीटंचाईचे संकट असणार नाही.

इशाचे मारेकरी शोधण्याचे आव्हान

$
0
0
गेवराई येथील इशा मोर्यची हत्या होऊन पाच दिवस झाले आहेत. तरी पोलिसांना या खुनाचा उलगडा झालेला नाही. ही हत्या नरबळीतून घडली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांपुढे इशाच्या मारेकऱ्यांना शोधण्याचे आव्हान असणार आहे.

आजपासून आषाढी महोत्सवाचे आयोजन

$
0
0
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षीही शनिवारपासून आषाढी महोत्सव २०१४ चे आयोजन करण्यात आले आहे. या आषाढी महोत्सवात ५ जुलै रोजी पार्श्वगायिका श्रीमती सुमन कल्याणपूर यांची प्रकट मुलाखत होणार आहे.

कल्पना गिरींचे मारेकरी अद्याप मोकाटच

$
0
0
लातूर येथील कॉँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या अॅड. कल्पना गिरी हिचा मृत्यू संशयास्पद असून तशा स्वरूपाच्या गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील दोन राजकीय पक्षांशी संबधीत असलेले आरोपी अद्याप मोकाटच आहेत.

बीड रेल्वेप्रश्नी भिजत घोंगडे

$
0
0
बीड जिल्हावासीयांची रेल्वेची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. सुरुवातीला ३५० कोटी खर्च असलेल्या या प्रकल्पाची किंमत विलंबामुळे अडीच हजार कोटीवर जावून पोचली आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी हा प्रकल्प पाच वर्षात पूर्ण करण्याचा निश्चय केला होता.

कन्या प्रशालेत खिचडीत पाल

$
0
0
जिल्हा परिषद कन्या प्रशालेत मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत शुक्रवारी (४ जुलै) पाल आढळल्याने खळबळ उडाली. सुदैवाने खिचडी खाल्लेल्या ७० पैकी एकाही विद्यार्थिनीला विषबाधेचा त्रास न झाल्याने मोठा अनर्थ टळला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images