Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पदवीधर शिक्षकांच्या ४१९ जागा अद्याप रिक्त

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी आठवडाभर मोहिम राबविण्यात आली. १२०० जागांसाठी शिक्षकांना निकषानुसार एलसीडीसाठी मुख्यालयात बोलाविले.

ट्रकखाली चिरडून ठार

$
0
0
वाळूज एमआयडीसीतील झालेल्या एका विचित्र अपघातात एक तरून ट्रकखाली चिरडून ठार झाला. अॅपेरिक्षाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे त्यावर मोटारसायकलस्वार धडकून रस्त्यावर पडल; त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून तरूण जागीच ठार झाला.

एमआयएम पूर्ण ताकदीने उतरणार

$
0
0
‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे,’ अशी माहिती एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी (२० जुलै) दिली.

स्पेशल पॅकेजची जबाबदारी सरकारची

$
0
0
‘अज्ञानातून सर्वसामान्य जनतेने ‘केबीसी’ कंपनीत गुंतवणूक केली. कंपनीने फसवणूक केल्यामुळे देशोधडीला लागलेल्या लोकांना राज्य सरकारने स्पेशल पॅकेजद्वारे मदत करावी. ‘केबीसी’चा प्रमुख भाऊसाहेब चव्हाण याच्यावर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करावी’ अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली.

शरद पवारांनी घातला खोडा

$
0
0
‘मराठा-मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. मात्र धनगर समाजाला आरक्षण देताना या सरकारच्या पेनची शाई संपली होती काय? धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी पवार घराणे मोठी अडचण आहे. त्यांनीच धनगर समाजाचा सन्मान चोरला,’ अशी टीका रविवारी (२० जुलै) राष्टीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी केली.

भोंदूबाबाला पट्ट्याने चोपले

$
0
0
लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली; मात्र त्यापूर्वीच त्याला पीडित महिलेच्या नातेवाईकांनी पट्ट्याने बेदम चोपल्याचे उघड झाले आहे.

पालिका अधिकाऱ्यांतली माणुसकी गोठते तेव्हा!

$
0
0
माणुसकी गोठलीय याचा प्रत्यय महापालिकेतल्या अधिकाऱ्यांत तुम्हाला नक्कीच दिसेल. पालिकेच्या आजारी जवानाला त्याच्या निधनानंतर पैसे मंजूर झाल्याचे प्रकरण स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सभापतींनी दिले.

वनमहोत्सवात लावली दोन हजार झाडे

$
0
0
छावणी परिसरातील लष्कर अधिकाऱ्यांची कॉलनी, ऑफिस व टेकडी परिसरात रविवारी (२० जुलै) मोठ्या उत्साहात वनमहोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात परिसरात २ हजार झाडे लावण्यात आली. ३० जुलैपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून या दहा दिवसांत जवळपास ६ हजार झाडांची रोपे लावण्यात येणार आहेत.

दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ

$
0
0
माहेरुन दहा लाख रुपये आणण्याची मागणी करीत तब्बल एक वर्षापासून विवाहितेचा छळ सुरू होता. याप्रकरणी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गुणवंताना हवी दातृत्वाची साथ

$
0
0
मुलींच्या शिक्षणासाठी मोडकळीला आलेल्या रिक्षाच्या मदतीने संसाराचा गाडा ओढणाऱ्या वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत ९० टक्के गुण मिळविणारी चैताली पानकडे असो, की मुकुंदवाडी स्टेशन परिसरातील कोलाहलातही अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून ९३ टक्के मिळविणारा देवेंद्र रंधवे असो.

हिमायतबागेच्या गळ्याला फास

$
0
0
विभागीय पातळीवर नावाजलेले हिमायतबाग फळ संशोधन केंद्र अतिक्रमणाच्या फासात अडकले आहे. तब्बल ११० हेक्टरवरील संशोधन केंद्राच्या जमिनीबाबत सोळा प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. वाद सुरू असलेल्या जमिनीवर लागवड किंवा प्रयोग करणे शक्य नसल्यामुळे अडचणी येत आहेत.

डोळ्यांची साथ ठरू शकते धोकादायक

$
0
0
पूर्वीच्या जीवाणूजन्य डोळ्यांच्या साथीची जागा अलीकडे विषाणूजन्य साथीने अधिकाधिक प्रमाणात घेतली असून, विषाणूजन्य साथ अधिक त्रासदायक ठरत आहे. विशेष म्हणजे याकडे दुर्लक्ष केल्यास बुबुळावर दीर्घ काळ किंवा कायमस्वरुपी पांढरे डाग निर्माण होऊन दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.

प्रत्येकाला हवंय, ‘बड्या’ घरचं श्वान

$
0
0
दारात साखळदंडाने बांधलेला कुत्रा औरंगाबादकरांचा जिव्हाळ्याचा साथीदार झाला असून, उत्तमोत्तम जातीचे कुत्रे खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. शहरात मोजक्याच जातीची कुत्री असल्यामुळे श्वानप्रेमी थेट दिल्ली, हरियाणा, मुंबई, चेन्नई व बेंगळुरूहून विदेशी कुत्र्यांची ‘ऑनलाइन’ खरेदी करीत आहेत.

राष्ट्रवादीवर काँग्रेसची कुरघोडी

$
0
0
औरंगाबादमधील पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मंजूर निधी उपलब्ध करून दिला नाही. त्याची संधी साधत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी केली आणि या रस्त्यांना निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.

राणेंच्या बंडाने मेळावा थंड

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काँग्रेसने मंगळवारी औरंगाबादेत मराठवाडा विभागीय मेळावा आयोजित केला होता. पण उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या बंडानंतर अचानकपणे मेळावा पुढे ढकलण्यात आला आल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.

आशयसंपन्न नाट्यानुभवाची साद

$
0
0
आयुष्याच्या जडणघडणीत काही गोष्टींशी जुळलेले जिव्हाळ्याचे नाते शेवटपर्यंत टिकते. ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या ललित लेखावर आधारीत ‘मौनराग’ या नाट्यानुभवात अर्थवाही अभिनयाने चंद्रकांत कुलकर्णी आणि सचिन खेडेकर यांनी रसिकांना उत्तम नाट्यानुभव दिला.

जायकवाडीतील पाण्याची चिंता

$
0
0
मागच्या वर्षीच्या तुलनेने जायकवाडी धरणात जरी १९८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त असला तरी गेल्यावर्षी १९ जुलै रोजी धरणात पंधरा हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली होती.

लोहा-कंधार मतदारसंघ काँग्रेसला सोडा

$
0
0
लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडावा अशा प्रकारची मागणी कंधार तालुक्याचे अध्यक्ष माधव पांडागळे आणि संजय भोसीकर यांनी काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक बी.चंगल रायडू यांच्याकडे केली आहे.

परळी तालुक्यातील २६२ घरकुलांना मंजुरी

$
0
0
परळी तालुक्यातील सात गावामध्ये इंदिरा आवास योजनेतंर्गत २६२ घरकुलांना जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. घरकुल बांधकामासाठीचा सुमारे अडीच कोटी रूपयांचा निधीही पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आला आहे. परळी तालुक्यात दारिद्रयरेषेखाली नागरिकांनी इंदिरा आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव पंचायत समितीने आमदार पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेकडे दाखल केले होते.

नगरसेवकांच्या समोरच रेशनचे वाटप करा

$
0
0
निवडणुका जवळ येऊ लागल्याने नाग‌रिकांच्या रेशनच्या तक्रारीची दखल पालकमंत्री क्षीरसागर यांनी घेतली आहे. बीड शहरातील स्वस्त धान्य दुकानांच्या अनियमित कारभाराच्या व्यथा चक्क नगरसेवकांनी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर मांडल्या. यावेळी त्यांनी बीडमध्ये नगरसेवकांच्या समक्ष रेशनचे वाटप करा अशा सूचना पुरवठा विभागाला केल्या आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images