Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सत्ताधारी नगरसेवकांत असंतोष

$
0
0
गेल्या चार महिन्यांपासून वॉर्डाची विकास कामे रडखली आहेत. त्यातच स्पिलओव्हरच्या नावाखाली अनेक कामे रद्द करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांत असंतोष पसरला आहे.

‘बीपीओ’तील कर्मचारी हैराण

$
0
0
आर्थिक स्वावलंबनासाठी विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरलेल्या ‘बीपीओ सेंटर’मध्ये विद्यार्थी कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. कमी वेतनात मर्यादेपेक्षा जास्त काम करून घेणे आणि ऑफिसमध्ये शिवीगाळ केल्याची तक्रार चिकलठाणा परिसरातील ‘सर्को’ बीपीओतील कर्मचाऱ्यांनी कामगार उपायुक्त कार्यालयात केली आहे.

जलसाठा पोचला ९.७० टक्क्यांवर

$
0
0
ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्याचे प्रमाण पुन्हा वाढविण्यात आले आहे.

अकरा वाळू डेपोंवर कारवाई

$
0
0
वाळूच्या साठेबाजीवर बंदी असताना शहरात वाळूचा सर्रास साठा होत असल्यचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. किराडपुऱ्याच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वाळूडेपोंवर कारवाई झाली.

येत्या १५ वर्षांत भारत कृषी महासत्ता होईल

$
0
0
शेतकरी ते ग्राहक यामध्ये मूल्यवर्धीत साखळी निर्माण केली आणि त्याला कौशल्य विकासाची जोड दिली तर येत्या १५ वर्षात भारत कृषी महासत्ता होईल, असा आशावाद राज्याचे कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी व्यक्त केला.

भंडारवाडीचे पाणी पेटले

$
0
0
रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी मध्यम प्रकल्पातून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने ३१ कोटी रुपयांची पुरक योजना मंजूर केली आहे. या योजनेला रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे.

सुफी संत परंपरेचे आकर्षण

$
0
0
जगभरातील संशोधकांना सुफी संत परंपरेचे आकर्षण आहे. भारतातील सुफी परंपरेचे एक महत्वाचे केंद्र असलेल्या खुलताबाद जवळील वेरूळ येथे आंतरराष्ट्रीय संशोधकांची चार दिवसाची कार्यशाळा नुकतीच पार पडली.

अग्निशमन केंद्र असते तर, वाचला असता जीव

$
0
0
नियमानुसार खुलताबाद येथे अग्निशमन दल असेत तर, कदाचित सहारा ऑटोमोबाईलचे शेख सलाउद्दि न यांचा जीव वाचला असता. नगर पालिकेकडे ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही अग्निशमन केंद्राची स्थापन झालेली नाही.

संपाचा सर्वसामान्यांना फटका

$
0
0
‌महसूल कर्मचारी संघटनेच्या संपाचा सर्वसामान्यांना फटका बसत असून जिल्ह्यात विविध प्रकाराची तीन हजार प्रमाणपत्रे रखडली असून शेती जमिनीच्या सुनावण्या लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

४० लाखांच्या रस्त्याची तीन महिन्यांत वाट

$
0
0
रेणुकामाता कमान ते म्हाडा कॉलनी चौक या २ किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम ४० लाख खर्चून फक्त तीन महिन्यांपूर्वी झाले. या रस्त्यावरील डांबरीकरणाची भुरभुर पावसाने अक्षरशः वाट लागली आहे.

सरकारचा शॉर्टकट विद्यार्थ्यांना भारी

$
0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएसएसी) पूर्वपरीक्षा असलेल्या सिव्हिल सर्व्हिस अॅप्टिट्यूड टेस्ट (सीसॅट) मधील इंग्रजी उताऱ्यांचे २२ गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे सरकारने लोकसभेत जाहीर केले.

‘फिंगर प्रिंट सिक्युरिटी सिस्टिम’

$
0
0
कम्प्युटरविना चालणारी ‘फिंगर प्रिंट सिक्युरिटी सिस्टिम’ नॅशनल इस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅँड इफॉरमेशन टेक्नालॉजी (नीलिट)च्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. या फिंगर प्रिंट सिस्टिमसाठी साधारणतः १५,००० रुपयांपर्यंत खर्च येतो. या विद्यार्थ्यांनी फक्त ४००० रुपये खर्च करून ही सिस्टिम तयार केली आहे.

इंजिनीअरिंगला घरघर

$
0
0
इं‌जिनीअरिंगच्या रिक्त राहणाऱ्या जागांची संख्या यंदा ६० हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या पाच वर्षांपासून लागलेल्या या घरघरीमुळे अभ्यासक्रमाचे ‘तंत्र’ बसविणे तंत्रशिक्षण विभागाला अडचणीचे ठरणार आहे.

नवऱ्याचा सुपारी देऊन काढला काटा

$
0
0
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा प्रियकराच्या मदतीने सुपारी देवून खून केल्याची घटना बुधवारी (६ ऑगस्ट) उघडकीस आली. नवऱ्याचा मृतदेह तब्बल २४ तास घरात ठेवून फुलंब्री शिवाऱ्यात जाळण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले.

रस्त्यावर वाळू; प्रशासनाची डोळेझाक

$
0
0
वाळुचा साठा करण्यावरील बंदी धुडकावून शहरात रस्तो रस्ती खुलेआम वाळुंचे साठे करण्यात आले आहेत. हा बेकायदा कारभार नागरिकांना दिसत असताना प्रशासनाने मात्र डोळेझाक चालविली आहे.

रुपयाच्या घसरणीमुळे महागाई

$
0
0
आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचा भाव घसरून प्रती डॉलर ६१ रुपये झाला. त्याचा परिणाम महगाईवर होणार आहे. औषधापासून ते इंधनापर्यंत अनेक वस्तुंच्या किंमती वाढू शकतात. त्याचा परिणाम देशाच्या विकास दरावरही होईल.

‘स्पिलओव्हर’चा असंतोष कायम

$
0
0
महापालिकेने सुमारे १०० कोटी रुपयांच्या स्पिलओव्हरच्या कामांना मुहूर्त लागत नसल्यामुळे अस्वस्थ असलेल्या नगरसेवकांनी बुधवारीही (६ ऑगस्ट) पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.

विद्यार्थीच मिळेनात !

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २७ विभागांमधील प्रवेश फुल्ल झाले असले तरी, १५ विभाग अद्यापही विद्यार्थ्यांची वाट पाहत अाहेत. या विभागांमधील तब्बल ४८३ जागा रिक्त आहेत.

रिंग रोड अंतिम टप्प्यात

$
0
0
औद्योगिकीकरणानंतर औरंगाबादचा विस्तार वेगाने झाला. परिणामी शहरातील रस्त्यांवरील ताण वाढू लागला. शहर ओलांडून जाण्यासाठी जालना रोड हा एकमेव रस्ता. या रस्त्यावरून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतुकीला अडचण होऊ लागली.

कुस्तीची नवी मॅट अवतरली!

$
0
0
दोन वर्षांपासून गायब कुस्ती मॅटचे गूढ अद्यापही कायम आहे, मात्र बुधवारी (६ ऑगस्ट) नवीन कुस्ती मॅट आल्याने नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय; तसेच क्रीडा उपसंचालक कार्यालय यांच्यापैकी कोणीही ‘ऑर्डर’ दिलेली नाही. त्यामुळे नवीन मॅट कोणी मागविली, असा प्रश्न आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images