Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रखडलेल्या प्रमाणपत्रांमुळे कोंडी

$
0
0
राज्य सरकारने मराठा, मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आरक्षण दिले. मात्र, या आरक्षणांसाठी आवश्यक विविध प्रमाणपत्रांना उशीर लागत असल्यामुळे, शेकडो विद्यार्थ्यांना आरक्षणापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

लाँग वीकेंड पेट्रोलच्या रांगेत

$
0
0
स्वातंत्र्य दिन आणि त्यानंतर दोन दिवस सुट्ट्यांचा परिणाम औरंगाबादच्या पेट्रोल पुरवठ्यावर झाला. इंधनाचा पुरवठाच न झाल्यामुळे शहरातील अनेक पंपांवर रविवारी ‘नो स्टॉक’चे बोर्ड झळकलेे. ही परिस्थिती सोमवारी दुपारपर्यंत कायम राहील, असा अंदाज आहे.

राष्ट्रवादी भवनाची तोडफोड

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर समाजाच्या आरक्षणाला पठिंबा दर्शविल्याच्या रागातून परभणीमध्ये आदिवासी समाजाच्या युवकांनी राष्ट्रवादी भवनावर जोरदार दगडफेक केली.

पालिकेने जनहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे

$
0
0
पाणी, रस्ते, आरोग्य व साफसफाई या मूलभूत गरजेसाठी उस्मानाबादेतील जनता भूकेली आहे. त्या पूर्ण करण्यासाठी उस्मानाबादमध्ये सीओ म्हणून नव्याने रुजू झालेल्या शशीमोहन नंदा यांनी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे.

कायद्यासाठी जनजागृतीची गरज

$
0
0
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संवेदनशीलपणे त्या कायद्याची जनजागृती केली पाहिजे, असे मत भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या प्रदेश सचिव अॅड. शाल‌िनी बापट यांनी लातूरात व्यक्त केली.

बीड जिल्ह्यात सात महिन्यांत ६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

$
0
0
बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्याच्या पाठोपाठ बीडमध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत. जानेवारी ते ऑगस्ट २०१४ या साडेसात महिन्याच्या काळात तब्बल ६८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली.

वैद्यनाथाच्या दर्शनासाठी गर्दी

$
0
0
श्रावणी सोमवार निमित्ताने जिल्हाभरातील शिवमंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी लांबच लांब भक्ताच्या रांगा दिसून येत होत्या. सर्वत्र ‘हर हर महादेव’ असा गजर घुमत असून बारा ज्योतर्लिंगापैकी एक ज्योतीर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या परळीच्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली.

न्यायमूर्ती नियुक्तीमध्ये अन्यायाची शक्यता

$
0
0
न्यायमूर्ती नियुक्तीसाठी केंद्र सरकार नव्याने समिती नेमणार आहे. त्यामध्ये राज्या राज्यातील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे महत्त्च कमी होणार आहे. त्यामुळे राज्यावर अन्याय होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी व्यक्त केली.

विष्णुपुरीतील पाण्याचा सिंचनासाठी उपसा

$
0
0
नांदेड पालिका प्रशासन आणि सिंचन विभाग यांच्यात ताळमेळ नसल्याने पिण्यासाठी आरक्षित केलेल्या साठयापैकी ३.७६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा अनधिकृतपणे सिंचनासाठी उपसा करण्यात आला आहे.

तलाव, विहिरी कोरड्या

$
0
0
पावसाळा सुरू होऊन तब्बल तीन महिने उलटूनही तालुक्यातील तलाव कोरडे असून विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. दमदार पावसाअभावी पिके माना टाकत आहेत.

जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण

$
0
0
वैजापूर नगर पालिकेने बांधलेल्या स्वयंचलित जलशुद्धीकरण केंद्र व अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सोमवारी (१८ ऑगस्ट) लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पांसाठी नगर पालिकेने अनुक्रमे चाळीस कोटी व ७४ लाख रुपये खर्च केले आहेत.

मधमाशांच्या हल्ल्यातून तरुणीला वाचवले

$
0
0
एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखविल्यामुळे मधमाशांच्या हल्ल्यातून सायकलवर जाणाऱ्या तरुणीचा बचाव झाला. ही घटना १३ ऑगस्ट रोजी घडली. क्रांती चौक पोलिस ठाण्यातील कर्मचारी श्याम पवार साप्ताहिक सुटी असल्यामुळे दुचाकीवर गावाकडे जात होते.

बसस्थानकातील विहीर अखेर बंदिस्त

$
0
0
कन्नड बसस्थानाकातील धोकादायक विहिरीला अखेर संरक्षक कठडे उभारण्यात आले आहेत. याबद्दल ‘म.टा.’ ने याकडे लक्ष वेधले होते. धोकादायक विहिरीभोवती कठडे उभारल्यामुळे स्थानकावर बस लावण्यातही शिस्त आली आहे.

...तर तक्रारी कमी होतील

$
0
0
‘अधिकाऱ्यांनी जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या कामाबद्दल लवचिक धोरण स्वीकारल्यास त्याबद्दलच्या तक्रारीचा ओघ कमी होईल,’ असे मत वैजापूरचे आमदार आर. एम. वाणी यांनी व्यक्त केले. सध्याची टंचाईची अवस्था लक्षात घेऊन विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तत्काळ मार्गी लावावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांचे पाणी रोखल्यास उद्योगाचे पाणी बंद करू

$
0
0
सिंचनासाठी जायकवाडी धरणातून पाणी उपसा करण्यापासून शेतकऱ्यांना रोखल्यास धरणातून उद्योगाला होणारा पाणीपुरवठा व डीएमआयसीच्या नियोजित पाणीपुरवठ्याचे काम बंद पाडण्याचा इशारा जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीने दिला आहे.

औरंगाबाद तहसीलचे विभाजन निवडणुकीनंतर

$
0
0
औरंगाबाद तहसील विभाजनाचा प्रस्ताव पुणे जिल्ह्यातील हवेली तहसीलच्या धर्तीवर दुसऱ्यांदा प्रस्ताव शासनाकडे नुकताच पाठवण्यात आला, हा प्रस्ताव हाय पॉवर कमेटीसमोर गेल्यानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे.

‘व्हाॅट्स अॅप’द्वारे वैद्यकीय ज्ञानाचे आदान-प्रदान

$
0
0
अधिकतर मनोरंजनासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘व्हाॅट्स अॅप’चा वैद्यकीय ज्ञानाच्या आदान-प्रदानासाठी वापर होऊ शकतो, हे शहरातील रेडियोलॉजिस्ट डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी सिद्ध केले आहे.

नागरिकांनीच केला कुंटणखाना उद‍्ध्वस्त

$
0
0
दोन महिला चालवित असलेला मिसारवाडी भागातील कुंटणखाना तेथील नागर‌िकांनीच रविवारी (१७ ऑगस्ट) उद‍्ध्वस्त केला. कुंटणाखाना चालविणाऱ्या महिलेसह एका ग्राहक व पीडित मुलीला ताब्यात घेण्यात आले असून मुख्य महिला आरोपी पसार झाली आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होमियोपॅथीची औषधे डेंगीवरही प्रभावी

$
0
0
डेंगीवर होमियोपॅथीची औषधे अतिशय प्रभावी असून, प्रतिकारशक्तीसह प्लेटलेट वाढवण्यासाठी ही औषधी उपयुक्त ठरतात. विशेष म्हणजे अॅलोपॅथीची औषधे घेत असतानाही होमियोपॅथीची औषधे सर्व वयोगटातील रुग्णांना घेता येतात.

उड्डाणपुलाच्या मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

$
0
0
सिडको बसस्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या बांधकामावरील एक मजूर भूमिगत इलेक्ट्रीक वायरच्या झटक्यामुळे मरण पावला. ही घटना सोमवारी (१८ ऑगस्ट) दुपारी घडली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images