Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एका वाटसरू बिबट्याची कथा!

$
0
0
दरेगाव (ता. पैठण) येथे बिबट्या मृतावस्थेत आढळल्यानंतर बिबट्याच्या वास्तव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. स्थलांतर करताना बिबट्याचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

...तरच जायकवाडीला पाणी

$
0
0
मराठवाड्यात तुलनेमध्ये कमी झालेल्या पावसामुळे पिकांची परिस्थितीही बिकट झाली आहे. दरम्यान, गोदावरी पाटबंधारे महामंडळामध्ये बुधवारी (३० ऑक्टोबर) जायकवाडीत पाणी सोडण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.

वीज बिलांतील ‘LBT’वर हल्लाबोल

$
0
0
शहरातील वीज ग्राहकांकडून स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसूल करण्याच्या निर्णयावर जिल्हास्तरीय विद्युतीकरण समितीच्या बैठकीत गुरुवारी (३० ऑक्टोबर) सदस्य तुटून पडले. कोणत्याही स्थितीत ग्राहकांकडून या कराची वसुली करू नये, असा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

नुसत्याच आढावा बैठका

$
0
0
शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारलेल्या समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नुसत्याच आढावा बैठका सुरू आहेत. जलवाहिनीच्या प्रत्यक्ष कामाबद्दल कंपनी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतल्यामुळे नियोजित वेळेत हे काम पूर्ण होईल का, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.

पाहुण्यांची वाढती किलबिल...

$
0
0
हिवाळ्याची चाहूल लागताच स्थलांतरित पक्ष्यांची शहर परिसरात वर्दळ वाढली आहे. ऑक्टोबरच्या शेवटी ‘सँड पायपर’ आणि ‘वेड्या राघू’चे आगमन झाले आहे. पानथळ परिसरात मनसोक्त विहार करणारे पक्षी पाहण्यासाठी पक्ष‌िमित्रांनी तयारी केली आहे.

यंदाही गारप‌िटीचा अंदाज

$
0
0
यंदा निलोफर वादळामुळे तापमानात घसरण झाली आहे. उत्तर भारतातून वाहत असलेल्या पश्चिमी विक्षोपाच्या वाऱ्यांमुळे यंदाही जानेवारीत दक्षिण पठाराच्या भागात गारपीट होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

‘डीएमआयसी’त सुविधांवर भर

$
0
0
बहुचर्चित दिल्ली–मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) मेगा इंडस्ट्रीयल पार्कसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प थाटण्यापूर्वी येथे संपूर्ण पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, त्यानंतर उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याचे डीएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी यांनी सांगितले.

घाटीत २०० खाटांचा सुपरस्पेशालिटी विभाग

$
0
0
केंद्र सरकारच्या पंतप्रधान स्वास्थ्य योजनेतून घाटी हॉस्पिटलसाठी १५० कोटी रुपये मंजूर झाले होते. यातून घाटी परिसरात २०० खाटांचा स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विभाग उभारण्यास शुक्रवारी हिरवा कंदील दर्शविण्यात आला.

परवानगीविनाच अधिकाऱ्यांच्या हवाई सफरी

$
0
0
हवाई सफरींना परवानगी नसतानाही महापालिकेचे अधिकारी-पदाधिकारी महापौर व आयुक्तांच्या आडून हवाई सफर करीत असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी महिन्याला सरासरी लाखभराचा खर्च पालिकेला सोसावा लागत आहे.

‘ब्रेस्ट कॅन्सर’चा धोका वाढला

$
0
0
स्तनांचा कर्करोग अर्थात ब्रेस्ट कॅन्सर दरवर्षी १.६ टक्क्यांनी वाढतो आहे आणि हा विळखा आता घराघरांपर्यंत पोचला आहे. २०१५मध्ये भारतात ब्रेस्ट कॅन्सरच्या सुमारे १ लाख ५५ हजार नवीन केसेस असू शकतात आणि यामुळेच तब्बल ७६ हजार महिलांच्या जीवाला धोका होऊ शकतो.

महिन्यात उखडलेल्या रस्त्यावर पुन्हा नवा रस्ता

$
0
0
अवघ्या एक महिन्यात वाट लागलेल्या रस्त्यावर पुन्हा नवा रस्ता करण्याच्या कामाला शुक्रवारपासून (३१ ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे. या रस्त्याबद्दल ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आली. आता तरी हा रस्ता दर्जेदार होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

हनुमान चालिसा यंत्राद्वारे फसवणुकीचा दावा

$
0
0
अद्भूत शक्तीचा लाभ देण्याचा दावा करीत लोलकातील श्री सिद्ध हनुमान चालिसा, भगवान हनुमानाची मूर्ती व गळ्यात घालण्यासाठीची साखळी सोन्याची असल्याचे भासवून यंत्राची विक्री करून फसवणूक करण्यात आली.

निजामाविरुद्धचा संघर्ष हिंदू- मुस्लिम नव्हता

$
0
0
‘निजामाविरुद्धचा संघर्ष हा हिंदू विरुद्ध मुस्लिम धर्माचा लढा नव्हता. हा संघर्ष सुलतानशाहीविरुद्ध लोकशाही असा होता,’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी केले आहे.

बहुपीक पॅटर्न ठरला लाखमोलाचा

$
0
0
लहरी हवामानामुळे पिकांचे होणारे नुकसान शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. या परिस्थितीत एका पिकावर अवलंबून न राहता बहुपीक पद्धतीचा पॅटर्न राबवून श्रावण गायकवाड हा तरूण शेतकरी परिसरात ‘आयडॉल’ ठरला आहे.

मतदानासाठीचा अनोखा नांदेड पॅटर्न

$
0
0
लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा निवडणूक यंत्रणेने मतदानाच्या टक्केवारीचा अचूक तपशील प्राप्त व्हावा, यासाठी पोल डे मॉनिटरिंग सिस्टीम ‘पीडीएमएस’ या एसएमएस प्रणालीचा यशस्वी वापर केला.

दुष्काळ जाहीर करा

$
0
0
जिल्ह्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण होते. दोन वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सरकारकडून टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली होती. याउलट पश्चिम महाराष्ट्रात मात्र सरसकट दुष्काळाची घोषणा केली होती.

अर्थसंकल्पात १०० कोटींची तूट

$
0
0
महापालिकेचा सुधारित अर्थसंकल्प शंभर कोटी रुपये तुटीचा असण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. या तुटीचा परिणाम शहरातील विकास कामांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एकाच मंत्रिपदामुळे नाराजी

$
0
0
राज्यात स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याला केवळ एकच मंत्रिपद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अपेक्षेप्रमाणे पंकजा मुंडे यांचा शपथविधी झाला, पण अन्य नेत्यांना कधी संधी मिळणार, असा सवाल आता कार्यकर्ते करत आहेत.

पंकजाच्या शपथ‌विधीनंतर जल्लोष

$
0
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दहा मंत्र्यानी शुक्रवारी शपथ घेतली. यामध्ये कोअर कमिटी सदस्या आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. यामुळे बीड जिल्ह्यात सर्वत्र फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.

निषेध मोर्चाला लातूर हिंसक वळण

$
0
0
अहमदनगरमधील जवखेडे येथील दलित हत्याकांड प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करत लातूरमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला आज हिंसक वळण लागले. या मोर्चाच्यावेळी संतप्त आंदोलकांनी रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या अनेक गाड्यांची आणि सरकारी कार्यालयांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images