Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पीडब्ल्यूडी, महसूलचे परस्परविरोधी दावे

$
0
0
आपेगाव येथील तुटलेल्या पुलावरून सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाने परस्परविरोधी दावे केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मत वाळू उपशामुळे पाया खचल्याचे असून, उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे निकृष्ट डिजाईनमुळे पूल खचल्याचा दावा केला आहे.

जड घंटागाड्यांना नकार

$
0
0
नगर पालिका प्रशासने सोमवारी धुळखात पडून असलेल्या घंटागाड्या सफाई कर्मचाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला, मात्र या गाड्या वजनाने जड असल्याने केवळ एक सफाई कर्मचारी वगळता इतर कर्मचाऱ्यांनी घंटागाड्या घेण्यास नकार दिल्याने नगर पालिका प्रशासनाची गोची झाली आहे.

श्रद्धा, आदरभावाला गुरुभक्तीमध्ये महत्त्व

$
0
0
‘जीवनात कोणतेही कार्य करतांना गुरूला फार मोठे महत्व आहे. जनार्दन स्वामी आणि शांतीगिरी महाराज यांच्यातील गुरु शिष्यांना पाहिल्यावर गुरूविषयी श्रद्धा आणि आदरभाव दिसून येतो. प्रत्येकाने गुरुविषयी श्रद्धा आणि आदर ठेवला पाहिजे. गुरुभक्तीमध्ये श्रद्धाभाव महत्त्वाचा आहे,’ असे प्रतिपादन महामंडलेश्वर प्रकाशानंदगिरी महाराज (कल्याण) यांनी वेरूळ येथे विश्वशांती धाम धर्म संस्कार सोहळ्यात प्रवचनाचे पहिले पुष्प गुंफताना केले.

नियोजनानुसार पाणी सोडलेच नाही

$
0
0
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आलेल्या नियोजनाला नाशिक जलसंपदा विभागाने प्रतिसाद न दिल्याने सोमवारी (१० नोव्हेंबर) नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही.

...मला वेड लागले सायकलचे!

$
0
0
पर्यावरण संरक्षणासाठी जालन्याचे भूमिपुत्र आणि आयपीएस असणारे हरिश बैजल यांनी सायकल हातात घेतली. अन् ती हातातून सुटलीच नाही. त्यांनी स्थापन केलेल्या नाशिक सायकलिस्ट ग्रुपची सदस्य संख्या ८ वरून चक्क ७८ वर पोहचलीय. हा अवलिया सध्याही आपल्या १५ सहकाऱ्यांसह नाशिक ते नांदेड फेरीवर निघालाय.

कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत नेण्याची गरज

$
0
0
‘बारा वर्षांच्या कारकिर्दीत कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत पोहचवण्याचे काम कृषी शास्त्रज्ञ (कै.) श्रीनिवास लोध यांनी केले. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या तात्काळ सोडवणे हीच लोध यांना खरी आदरांजली ठरेल. सद्यस्थितीत तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत घेऊन जाण्याचे आव्हान आहे’ असे प्रतिपादन शास्त्रज्ञ डॉ. सूर्यकांत पवार यांनी केले.

मांगल्याची सुरेल गुंफण

$
0
0
सु ख-समृद्धी-समाधानामध्ये न्हाऊन निघालेली कॉलनी म्हणजे पन्नालालनगर. साक्षात अष्टविनायकाच्या छत्रछायेत कला-क्रीडा साधकांची येथे अखंड साधना सुरू असते. जवळजवळ वर्षभर एकाचवेळी अनेक सामाजिक-सांस्कृतिक-अध्यात्मिक उपक्रम सुरू असणाऱ्या या कॉलनीत सदा सर्वकाळ मांगल्याची सुरेल उधळण सुरू असते.

शालेय पोषण आहारावर मुख्याध्यापिकेचे पोषण

$
0
0
वळदगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहाराचे साहित्य मुख्याध्यापिकाच परस्पर लंपास करत असल्याचा प्रकार, सोमवारी (१० नोव्हेंबर) उघडकीस आला. विशेष म्हणजे शालेय व्यवस्थापन समितीच्या एका महिला सदस्यांनेच ही चोरी उघड केली.

‘दौ कौडी के मोल, मराठा बिकने को तैयार नहीं!’

$
0
0
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आत्माराम पाटील यांनी तन-मन-धन अर्पण केले. त्या कै. आत्माराम पाटील यांना गाजलेली कवने सादर करून, नव्या पिढीतील शाहिरांनी आदरांजली वाहिली.

वीजेवर एलबीटी आकारण्याचा प्रस्ताव रद्द कराः जैस्वाल

$
0
0
वीजेवर एलबीटी आकारण्याचा प्रस्ताव महापालिकेने रद्द करावा व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केली आहे. या संदर्भात आपण महापौरांना योग्य ती सूचना देणार आहोत, असे ते म्हणाले.

ज्वलनशील पदार्थांमुळे आग नाही

$
0
0
नांदेड-मनमाड पॅसेंजर रेल्वेला लागलेल्या आगीबाबतचा फॉरेन्सिक अहवाल लोहमार्ग पोलिसांना मिळाला आहे. या अहवालात कोणत्याही प्रकारच्या ज्वलनशील पदार्थामुळे आग लागली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ग्रंथालयांना मिळणार वाढीव अनुदान

$
0
0
ग्रंथालयांना एप्रिल २०१२ पासून वाढीव अनुदान देण्याऐवजी ते जून २०१२ पासून देण्याचे मंत्रालयातील कार्यासन अधिकाऱ्याचे मार्गदर्शनपर पत्र रद्द करण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेत.

सांगा सर कोठे रहायचे?

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव होत आहे. विद्यापीठातील वसतिगृह विद्यार्थ्यांनी रिकामे करावे आणि महोत्सवासाठी आलेल्या खेळाडूंना निवासाची व्यवस्था ‌व्हावी, यासाठी विद्यापीठाने १५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत विभागांना चक्क सुटी दिली आहे.

चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे पेपर रद्द करण्याची नामुष्की

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदव्युत्तर परीक्षेत सोमवारी चुकांची ‘हॅटट्रीक’ केली. एमएस्सी प्रथम सत्रातील ‘ऑर्गनिक केमिस्ट्री’ची प्रश्नपत्रिका चक्क जुन्याच अभ्यासक्रमाची देण्यात आली.

सैनिकांची सायकल यात्रा सुरू

$
0
0
भारतीय सैन्याचा इतिहास व सैन्य दलातर्फे केल्या जाणाऱ्या विविध कार्याची माहिती राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी १६ सायकलपटूंच्या यात्रेला वेरूळपासून सुरुवात करण्यात आला आहे.

तक्रार मागे घेण्यासाठी दबाव

$
0
0
मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांकडून झालेल्या लुटमार प्रकरणात तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदारावर दबाव येत असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही पोलिस अद्याप पसार असून त्यांना साथ देणाऱ्या तरुणीची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

वसावांनी दिली बनावट नियुक्ती?

$
0
0
एका तरुणाला बनावट नियुक्तीपत्र दिल्याबद्दल महापालिकेच्या तत्कालीन कर अधिकारी सपना वसावा व धुळे येथील आरटीओ अधिकारी संदीप खडसे यांच्याविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात बुधवारी (५ नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिर्ची-मसाल्यांची ३४ वर्षांची सोबत

$
0
0
एखाद्याला मिरची किंवा तिखटामुळे ठसका लागला तर, तो खोकून खोकून बेजार होतो. आयुष्यभर तिखट, मसाले यांच्या सानिध्यात राहणे कठीण, पण ‘धनश्री मिरची कांडप’च्या राजश्री खोडे गेल्या तब्बल ३४ वर्षांपासून मसाला-तिखटाच्या सान्निध्यात आहेत...

महापालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा

$
0
0
नारेगावात महापालिकेच्या जागेवर करण्यात आलेली अतिक्रमित बांधकामे सोमवारी (१० नोव्हेंबर) अतिक्रमण हटाव पथकाने पाडून टाकली. गेल्या काही वर्षांपासून ही बांधकामे केली जात होती.

हरितपट्ट्यात चक्क सभागृह!

$
0
0
हरितपट्ट्यासाठी राखीव असलेल्या जागेवर समाजिक सभागृह बांधण्यास ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images