Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ही तर शरद पवारांची भाषा: उद्धव

$
0
0
मराठवाड्यातील दुष्काळावर महसूल मंत्री खडसे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील शाब्दिक चकमक रंगली आहे. खडसेंचे भूईमूग खाली येतात की वर येतात ते मला माहित नाही, त्यांच्या भुईमूगाशी मला काही देणंघेणं नाही, मला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे वाटतात, असा टोला उद्धव यांनी लगावला.

प्रेमसंदेशांनी बरबटला शालीवाहनांचा तीर्थस्तंभ

$
0
0
मराठी साम्राज्याचे जाज्ज्वल्य प्रतीक असलेला पैठण येथील तीर्थस्तंभ शेवटच्या घटका मोजत आहे. शालीवाहन राजाने युद्धातील विजयाचे प्रतीक म्हणून अकराव्या शतकात उभारलेल्या या स्तंभाला राज्य पुरातत्त्व विभाग व पैठण नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अवकळा आली आहे.

दुष्काळ जाहीर करण्याचे निर्देश द्या

$
0
0
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याचे निर्देश राज्यपालांनी राज्य शासनाला द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत केली. राज्यपालांनी या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून वस्तुस्थितीची पाहणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

दुष्काळात लिकेज असलेले पॅकेज नकोच!

$
0
0
राज्यातील दुष्काळी परिस्थितीत भूपृष्ठ व भूजल साठा पिण्यासाठी राखून ठेवणे अत्यावश्यक आहे. पाण्याच्या इतर वापरावर बंदी आणावी. उपाययोजनांसाठी सरकार लिकेज असलेले पॅकेज जाहीर करून कंत्राटदारांची टोळी पोसत आहे. चुकीच्या धोरणांमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.

पतीसह मुलीचा विवाहितेने केला खून

$
0
0
घरामध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून पती आणि अडीच वर्षांच्या मुलीचा खून करून, विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना घनसावंगी तालुक्यातील शिवणगावामध्ये सोमवारी रात्री घडली.

अधिकारी, नगरसेवकांचे मोबाइल झाले बंद!

$
0
0
बिल न दिल्यामुळे रस्त्यांची कामे बंद पडल्याचे आतापर्यंत ऐकिवात होते. पाणीपुरवठ्याची कामेही अनेकवेळा कंत्राटदाराचे बिल न दिल्यामुळे बंद पडल्याची उदाहरणे आहेत, परंतु बिल न भरल्यामुळे अधिकारी आणि नगरसेवकांचे मोबाइल फोन बंद पडल्याची पहिलीच घटना महापालिकेच्या इतिहासात घडली आहे.

मुंबईच्या नेत्यांवर खापर

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब डांगे यांनी कार्यकर्त्यांसह मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत मंगळवारी (२५ नोव्हेंबर) शिवसेनेत प्रवेश केला. संपर्कप्रमुख आणि मुंबईचे पदाधिकारी स्थानिक पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याची तोफ त्यांनी यावेळी डागली.

मनसेचे पदाधिकारी शिवसेनेत

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद शहरातील आगमनापूर्वी मनसेचे काही प्रमुख कार्यकर्ते मंगळवारी शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. माजी महापौर रुख्मिणीबाई शिंदे यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

खडसेंच्या तोंडी आज पवारांची भाषा

$
0
0
महाराष्ट्राचे महसुलमंत्री एकनाथ खडसे काल अजित पवारांची भाषा बोलत होते, आज ते शरद पवारांची भाषा बोलत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी खडसे यांना प्रत्युत्तर दिले.

जायकवाडीला पाणी पिण्यासाठीच

$
0
0
मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने पैठणच्या जायकवाडी धरणात गोदावरी नदीच्या ऊर्ध्व भागातून केवळ पिण्यासाठी पाणी सोडण्याला हिरवा कंदील दिला आहे.

लातूरमध्ये अपघात, सहा ठार

$
0
0
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील चापोली गावाजवळ ट्रक आणि अॅपे रिक्षा यांची टक्कर झाली. या अपघातात रिक्षात बसलेल्या सहाजणांचा मृत्यू झाला आणि चारजण जखमी झाले.

दुष्काळ २५० कोटींचा

$
0
0
मराठवाड्यात पुन्हा एकदा दुष्काळाने ठाण मांडले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाला यंदा २५० कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. मार्चपर्यंत नुसत्या पाणी पुरवठ्यावर १५० कोटी खर्च होतील, असा अंदाज विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी व्यक्त केला.

१९ बंधारे वादाच्या भोव-यात

$
0
0
गेल्या दुष्काळात बीड जिल्ह्यात जवळपास अडीचशे बंधारे मंजूर करण्यात आले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्ह्यात या साखळी बंधाऱ्यासाठी पैसे देण्यात आले. मात्र, आजपर्यंत १९ साखळी बंधाऱ्याचे काम दुसरा दुष्काळ समोर टाकलेला असताना सुरू झाले नाहीत.

दुष्काळात शेतीने दिली साथ

$
0
0
रोहीपिंपळगाव येथील रामा शिंदे या तरुण शेतकऱ्यास दुष्काळी वातावरणातही शेतीने साथ दिली आहे. शेतीचे तंत्र वापरून त्याने या वर्षी खरीपात जूनमध्ये ऊस लावला आणि सोयाबीनचे पीकही घेतले. सर्वाना एक ते दोन क्विंटल सोयाबीनचा उतारा येत असताना शिंदे यास ३० गुंठ्यावर पेरलेल्या सोयाबीनचा साडे सहा क्विंटल उतारा आला आहे.

फसवणाऱ्या बँकांवर गुन्हे नोंदवा!

$
0
0
पीक कर्ज सवलतीच्या व्याजदराने देण्याचे धोरण आहे. राज्यातील राष्ट्रीयीकृत, खासगी बँका या पीक कर्जावर सात टक्के व्याजदराऐवजी ११.७० टक्के व्याजाची आकारणी करत असल्याचे उस्मानाबादच्या जिल्हाधिकांऱ्यामार्फत करण्यात आलेल्या चौकशीत आढळून आले आहे. याशिवाय या बँका इन्स्पेक्शन चार्जेससह अन्य विविध चार्जेस देखील शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले आहेत.

विद्रोही सांस्कृतिक संमेलन

$
0
0
लातूर येथे ६ व ७ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या तेराव्या संमेलनाच्या अध्यक्षपदी लखनौ विद्यापिठातील हिंदी भाषा विभागप्रमुख प्रा. डॉ. कालिचरण स्नेही यांची निवड करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे यांनी दिली.

ट्रक-अॅपेच्या धडकेत ७ ठार

$
0
0
चाकूर-अहमदपूर रस्त्यावर ट्रक व अॅपे रिक्षाच्या समोरासमोरील धडकेत सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी घडलेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांना प्राण गमवावे लागले.

दुष्काळाचे राजकारण नको!: राज

$
0
0
‘दुष्काळ हा राजकारण्यांचा छंद झाला आहे. याबाबत केवळ वक्तव्य करण्यापेक्षा ठोस उपाययोजनेची गरज आहे,’ असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. दोन दिवसांच्या आढावा बैठकीसाठी आले असता, कोकणवाडी येथे बुधवारी (२६ नोव्हेंबर) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कारभारी दमानं

$
0
0
जिल्हा परिषदेच्या सारीपाटावर दुसरा डाव सुरू झाला. महिनाभरानंतर विषय समित्यांचे खातेवाटप सुरू झाले. सर्व सभापती, अध्यक्ष- उपाध्यक्षांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चांगला काळ येणार याची अपेक्षा करण्यास हरकत नाही.

रस्ते विकासासाठी ६२६ कोटी

$
0
0
रस्ते विकासासाठी राज्य शासन महापालिकेला मदत करण्यासाठी ठोस भूमिका घेत नसल्यामुळे महापालिकेने राज्य शासनाच्या मार्फतच केंद्र सरकारकडे रस्ते विकासासह विद्युतीकरण व चौक सुशोभीकरणासाठी ६२६ कोटी रुपयांचा प्रकल्प सादर केला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>