Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वाहनधारकांना सुगीचे दिवस

$
0
0
पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत गेल्या एक वर्षात ३२ वेळा बदल झाला आहे. मार्च पूर्वी सातत्याने दरवाढ होत, होती. एप्रिलनंतर फक्त एकदाच दर वाढले. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांत पेट्रोलचे दर १२ व चार महिन्यांत डिझेलचे दर नऊ रुपयांनी कमी झाले आहेत.

वीजचोरीच्या गुन्ह्यात सक्तमजुरी

$
0
0
वीजचोरी करणाऱ्या गिरणीचालकास अतिरिक्त सत्र न्यायधीश आर. आर. काकाणी यांनी दोन वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा प्रकार ६ ऑगस्ट २००७ रोजी नंदनवन कॉलनीत घडला होता.

‘१०० – १ = ०’ हेच यशाचे रहस्य

$
0
0
ऑटोमॅटिक पॉलिशिंग अँड मायक्रोफिनिशिंग मशीन निर्मितीत जपान-जर्मनीच्या प्रोडक्टशी स्पर्धा करणारी ‘ग्राईंड मास्टर’ ही देशातील पहिलीच ‘एसएमई’ ठरली आहे. कंपनीच्या एमडी मोहिनी केळकर व सीईओ मिलिंद केळकर यांना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नुकताच दि इमर्जिंग इंडिया अवॉर्ड-२०१४ प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त मिलिंद केळकर यांच्याशी केलेली ही बातचित.

अल्पसंख्याकांना मिळाली माहिती

$
0
0
मौलाना आझाद महाविद्यालयात अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठीच्या योजनांचे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शासनाच्या विविध विभागांकडून राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

बेल वाजली की वर्गाचा दरवाजा बंद!

$
0
0
व्यक्तीचा दर्जा उंचावण्यामध्ये शिक्षण हे महत्त्वाचे साधन असते. त्याला शिस्तीची जोड असेल तर, तो कार्यरत असलेल्या क्षेत्रात अमिट छाप सोडतो. शिक्षण क्षेत्रात तर अशा व्यक्तींची ओळख या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरते. अलीकडच्या काळात शिक्षणाचे संदर्भ बदलत असल्याने, समाजाचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे.

पडिक जमिनीला हिरवा शालू

$
0
0
तालुक्यातील वडोदवाडी येथील माळरानावरील खडकाळ जमिनीत पूर्णेश्वर सेवा आश्रम आहे. येथे गेल्या कांही दिवसांपासून मेहनत करून आवळा, मोसंबीची बाग फुलविण्यात आली आहे. ऐन दुष्काळातही येथील झाडांना फळे लगडलेली आहेत. एकेकाळी पडिक असलेल्या जमिनीने आता हिरवा शालू नेसला आहे.

२४ लाखांचा रस्ता खोदला

$
0
0
पैठण- आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या कामातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. दीड वर्षांपूर्वी २४ लाख रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता, प्राधिकरणामार्फतच करण्यात येणाऱ्या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या कामासाठी खोदण्यात आला आहे.

पुन्हा भात्यातून बाण निघाले!

$
0
0
राज्यात एकमेकांची ताकद आजमवून पाहिलेल्या शिवसेना- भाजपचे आगामी महापालिका निवडणुकीसाठी डावपेच सुरू झाले आहेत. भाजपकडून पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना औरंगाबादचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी आग्रही मागणी स्थानिक भाजप नेत्यांकडून होत आहे.

कामातील कामचुकारपणा भोवला

$
0
0
परीक्षांचे कामकाज टाळणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्याचे संकेत विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत. परीक्षेदरम्यान दिलेले काम टाळणाऱ्या अशा सव्वाशेपेक्षा अधिक प्राध्यापकांना गुरुवारी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. आठ दिवसात संबंधितांना खुलासा करावयाचा आहे. संबंधितांवर कारवाईबाबत परीक्षा मंडळासमोरही हा विषय ठेवण्यात येणार आहे.

जाहीर पॅकेज मिळेल कधी?

$
0
0
मराठवाड्याच्या पाचवीला पूजलेल्या दुष्काळाने यंदाही आपली वक्रदृष्टी दाखविल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातील ७ लाख ३१ हजार हेक्टर पेरणी क्षेत्रामधील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पैसेवारीमध्येही जिल्ह्यात दुष्काळ असल्याची सरकारी मोहोर लागली आहे.

खोबऱ्याचे भाव शंभरने घसरले

$
0
0
चवीने खाणाऱ्या खवय्यांसाठी एक खुशखबर. खोबऱ्याचे भाव किलोमागे चक्क १०० रुपयांनी घसरले आहेत. सोबत उच्चप्रतीचा सुगंधी बासमती ६० रुपयांनी, साबुदाणा ३०, तर शेंगदाण्याचे दर किलोमागे १५ रुपयांनी घसरले आहेत.

शहरात शस्त्र, जमावबंदी

$
0
0
ख्रिसमस आणि वर्षअखेरच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी शहरात शस्त्र, व जमावबंदीचे आदेश दिले आहेत. शहरात ख्रिसमस सेलीब्रेशन मोठ्या प्रमाणात होत असते.

पैसे न भरणाऱ्यांच्या बांधकामांवर हातोडा

$
0
0
सातारा-देवळाई नगरपालिकेच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या २५ पैकी १४ याचिकाकर्त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येकी दहा लाख रुपये खंडपीठात भरले आहेत.

रेडी रेकनर दरात यंदा १०% वाढ?

$
0
0
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे २०१५ वर्षासाठी मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी शहरी भागात रेडी रेकनरच्या दरात सरासरी १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागामधील दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाने घेतला आहे.

इंग्रजी मेसेजमुळे पाच लाख गेले!

$
0
0
दलालवाडी येथील एका महिलेला टेलिफिशिंग अॅटॅकरने ४ लाख ८४ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. या महिलेकडून फोनवरून एटीएम कार्डाचा पासवर्ड व इतर माहिती घेण्यात आली होती. पैसे काढले जात असल्याचे इंग्रजीतून येत असलेले मेसेज न कळाल्याने त्या भामट्याचे चांगलेच फावले.

कोट्यवधींची कामे मंजूर, पण...

$
0
0
विविध वॉर्डांमध्ये डांबरीकरण, क्राँकिटीकरण, ड्रेनेजलाईनची कोट्यवधी रुपयांची कामे मागील ६ महिन्यांत मंजूर झाली. त्याच्या वर्कऑर्डरही निघाल्या. पण पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने ही कामे रखडली आहेत.

बिले देताना समांतरची दमदाटी

$
0
0
पाण्याची बिले वाटप करताना योग्य पद्धतीने करा, विनाकारण नागरिकांना त्रास देऊ नका, असा सल्ला दिलेल्या नागरिकावर दादागिरी करण्याचा प्रयत्न औरंगाबाद वॉटर युटीलिटी कंपनीच्या (समांतर) कर्मचाऱ्यांकडून झाला. पण नागरिकांनी त्यांना तीव्र विरोध केल्याने पुढील अनर्थ टळला.

युवक सायबर क्राइमच्या फेऱ्यात

$
0
0
एकीकडे माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झाल्यामुळे जग जवळ आल्याचे बोलले जाते. मात्र, इंटरनेट, मोबाइलचा गैरवापर केल्याने औरंगाबादचा युवक सायबर क्राइमच्या पाशात ओढला जात असल्याचे विदारक चित्र एका संशोधनातून समोर आले आहे.

दहा कंपन्यांचे वीज-पाणी तोडले

$
0
0
औरंगाबाद औद्यागिक क्षेत्रातील दहा कंपन्यांची जवळपास पाच लाखांपर्यंतची बॅँक गॅरंटी जप्त करत, वीज-पाणी तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरणाचे नियम न पाळल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्षभरात हे कठोर पाऊल उचलले.

‘समांतर’चा विषय टळला

$
0
0
औरंगाबाद शहरासाठीची पाणी वितरण व्यवस्था औरंगाबाद वॉटर युटीलिटी कंपनीच्या (समांतर) ताब्यात गेल्यापासून अनेक अडचणी येत आहेत. काही राजकीय नेत्यांच्या पाठबळावर समांतरला जीवदान दिले जात आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images