Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सलग ७२ तास मेंदीचा विश्वविक्रम

$
0
0
जालन्यातील प्रिया सुरडकर हिने नागपूरच्या सुनीता धोटेचा सलग ७३ तास ५५ मिनिटे मेंदी काढण्याचा विक्रम शनिवारी (२७ डिसेंबर) रात्री साडेआठ वाजता मोडला. प्रियाने सलग ७४ तास बसून ३०१ महिलांच्या ६०२ हातांवर मेंदी काढली. आता सलग १०० तास बसून मेंदी काढण्याकडे प्रिया सुरडकरने वाटचाल सुरू केली आहे.

सेना-भाजपमध्ये पाणीदार राजकारण

$
0
0
गेल्या आठवड्यापासून विस्कळित झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे औरंगाबादकरांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. पाणीप्रश्नावरून श्रेय घेण्यासाठी शिवसेना, भाजपमध्ये राजकारण सुरू झाले आहे. विशेष म्हणजे समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव या दोन्ही पक्षांच्या काळातच मंजूर झालेला आहे.

नऊ दिवसांनंतर पाणी वळणावर

$
0
0
तांत्रिक बिघाडामुळे गेल्या नऊ दिवसांपासून विस्कळित झालेला शहराचा पाणीपुरवठा शनिवारी बऱ्यापैकी सुरळीत झाला. ९० टक्के वसाहतींमध्ये नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा झाल्याचा दावा औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीने केला.

पालकमंत्री शिवसेनेचा नको!

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे रामदास कदम यांची झालेली नियुक्ती भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रुचली नसल्याचे समोर आले आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून पालकमंत्रिपद भाजपच्या मंत्र्याकडे द्यावे, अशी मागणी केल्याचे समजते.

‘समांतर’च्या ऑफिसवर हल्ला़

$
0
0
औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा आणि समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेतलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या आॅफिसवर शनिवारी दुपारी हल्ला करण्यात आला. चार ते पाच जणांनी तोंडावर कपडा बांधून कार्यालयात प्रवेश केला आणि केबीन, काचांची तोडफोड केली.

प्रदेशाध्यक्षांच्या शर्यतीत दानवेही?

$
0
0
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावाची पक्षाच्या वर्तुळात जोरदार चर्चा आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अधिवेशनापूर्वी राज्यमंत्री दानवे यांच्याशी महाराष्ट्राबद्दल चर्चा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सिंचन विभागाची बनवाबनवी

$
0
0
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाला विविध कामांसाठी किती निधी उपलब्ध झाला ? किती कामांना प्रशासकीय मान्यता दिली गेली ? त्याला कोणते निकष लावण्यात आले होते ? या प्रश्नांची माहिती विचारून महिनोनमहिने उलटून गेले तरी, जिल्हा परिषद सदस्यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

साखरेचे खाणार त्याला...!

$
0
0
रोजचा दिवस साखरेपासून सुरू होतो. सणावाराच्या दिवसात साखरेशिवाय पुढे सरकता येत नाही. घरातून एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडतानाही आई किंवा आजी चमचाभर साखर हातावर ठेवते.

‘झेडटीसीसी’बाबत टोकाची उदासीनता

$
0
0
‘कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट’ अर्थात मेंदूच्या दृष्टीने मृत (ब्रेनडेड) ठरलेल्या रुग्णांच्या अवयव दानासाठी आवश्यक असलेल्या झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन कमिटीबद्दल (झेडटीसीसी) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) अत्यंत उदासीन आहे.

सर्वपक्षीय आमदारांची ९ जानेवारीला बैठक

$
0
0
हक्काचे पाणी न मिळणे, आयआयएम औरंगाबादहून नागपूरला नेणे, महत्वाच्या योजना संस्था जाहीर करताना मराठवाड्याला डावलल्यामुळे विकासाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

फक्त ८ हजारांत एसटी बस ऑनलाइन

$
0
0
रेल्वेचे वेळापत्रक व येण्या जाण्याच्या वेळा ऑनलाइन दाखविल्या जातात. रेल्वेप्रमाणे एसटीची ऑनलाइन माहिती दाखविण्यासाठी एका एसटीबस मागे फक्त ८ हजार रुपये खर्च येईल.

काँग्रेसने उरकला स्थापना दिवस

$
0
0
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसचा १२९ वा स्थापना दिवस रविवारी (२८ डिसेंबर) झाला. दिल्ली, मुंबईत कार्यक्रमाचे सोपस्कार पार पडले. दुपारनंतर शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना याची माहिती कळाली आणि सायंकाळी शहर काँग्रेसने कार्यक्रम उरकला.

जुन्याच वळणावरची संशोधन प्रक्रिया

$
0
0
संशोधनासाठी तुम्ही इच्छुक असाल आणि एकदा पीएच.डी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालात की, पुन्हा पुन्हा तुम्हाला ही परीक्षा देण्याची गरज नाही. तुम्ही संशोधनासाठी कायम पात्र ठराल, असा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला.

कुख्यात दरोडेखोर चावल्या जेरबंद

$
0
0
जोगेश्वरी भागातील कुख्यात दरोडेखोर नितीन काळे उर्फ चावल्याला गुन्हेशाखेच्या पथकाने रविवारी श्रीरामपुरात जेरबंद केले आहे. दोन महिन्यापूर्वी सिमेंटच्या मालाचा ट्रक दरोडा टाकून पळविल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांना चावल्या वाँटेड होता.

हुरडा पार्ट्या चोहीकडे

$
0
0
बोचरी थंडी आणि हुरडा पार्ट्या.. हे आता समीकरण झाले आहे. त्यातच विकेंड असेल आणि ख्रिसमसच्या सुट्या असतील तर, मात्र विकायलाच नको. याची गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्ष अनुभूती मिळत आहे.

रेल्वे फुल्ल, बसलाही बेरोजगारांची गर्दी

$
0
0
नेट, भूमी अभिलेख विभागातील विविध पदांच्या परीक्षेसाठी शहरात रविवारी तब्बल २५ हजार बेरोजगारांनी गर्दी केली होती. त्यामुळे रेल्वे व बसगाड्यांना गर्दी झाली होती. नांदेड- औरंगाबाद या मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात आली होती तर, एसटी महामंडळानेही जादा बसगाड्यांची सोय केली.

नेट परीक्षेला ८,७५० हजर

$
0
0
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे रविवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेला (नेट) ८ हजार ७५० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यंदा प्रथमच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) परीक्षेचे नियोजन केले होते. शहरातील आठ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.

कामगारांना कायम करणे ही पालिकेची जबाबदारी

$
0
0
राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने महापालिकेतील रोजंदारी स्वच्छता कामगारांना कायम करण्यासाठी ‘नानां’नी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपचे गटनेते व भाजप कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांनी केले, मात्र या कामगारांना कायम करण्याची जबाबदारी पालिकेचीच आहे, शासनाची आहे किंवा नाही, हे तपासावे लागेल, अशी स्पष्टोक्ती विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केली.

फुटेज फॉरेन्सिक लॅबकडे

$
0
0
औरंगाबाद सिटी वॉटर युटिलीटी कंपनीच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी फॉरेंसिक लॅबकडे पाठविण्यात आले आहे. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा कसून शोध सुरू आहे.

मनपाकडे ९ कोटींचा कर

$
0
0
विविध करांपोटी महापालिकेने वसूल केलेले जिल्हा प्रशासनाचे ९ कोटी रुपये थकवले आहेत. या करांचा भरणा करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून वारंवार नोटीस बजावूनही पालिकेकडून दाद दिली जात नाही.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images