Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सेंट्रल नाका भागात टोळक्याचा धुडगूस

$
0
0
सेंट्रल नाका चौकात शुक्रवारी (नऊ ऑगस्ट) दुपारी एका टोळक्याने धुडगूस घातल्याची घटना घडली. या टोळक्याने एका इनोव्हासहीत पाच वाहनांवर दगडफेक करीत काचा फोडल्या; तसेच दुचाकीवरील जोडप्याला बेदम मारहाण केली.

कुबेरांमधील ‘टसन’मुळे आला चुरशीला ‘अर्थ’

$
0
0
विधान परिषदेची निवडणुकीत मतदार मर्यादित असल्यामुळे, यातील प्रत्येक मताला ‘अर्थ’ असतो. त्यामुळे उमेदवाराची निवडून येण्याची ‘क्षमता’च महत्त्वाची मानली जाते. या निवडणुकीत उतरलेले दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत.

आजारी प्राण्यांसाठी डॉक्टरांच्या ‘सिद्धार्थ’मध्ये वाऱ्या

$
0
0
महापालिकेच्या सिद्धार्थ प्राण‌िसंग्रहालयातील काही प्राणी सर्दी-पडशाने त्रस्त झाले आहेत. दीप्ती या वयोवृद्ध वाघिणीला गळू झाला असून, तरसाने स्वतःचीच जखम चावल्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला आहे. एकूणच प्राण‌िसंग्रहालय आजारी पडले आहे.

‘अकांउंटन्सीमध्ये संशोधनाची गरज’

$
0
0
चार्टंड अकांउंटन्सी क्षेत्रात काळानरुप संशोधन होणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन या व्यवसायात अधिक पारदर्शकता आणने शक्य असून सीएने स्वतःला अपडेट ठेवून काम करणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी व्यक्त केले.

खतामध्ये भेसळ; विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0
रासायानिक खत उत्पादनामध्ये अग्रेसर असलेल्या झुआरी कंपनीच्या सम्राट नावाने परिचित असलेल्या डीएपी (१८ः४६) या रासायनिक खतांमध्ये भेसळ असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे झुआरी कंपनीसह खतविक्रेत्याविरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोनोग्राफी केंद्राचा परवाना निलंबित

$
0
0
बेकायदा गर्भलिंग निदान केल्याच्या आरोपावरुन डॉक्टर लेन येथील लाइफलाइन डॉयग्नोस्टीक सेंटरच्या सोनोग्राफ़ी केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला.

कृषी विभागाची निधी देण्यास टाळाटाळ

$
0
0
गेल्या उन्हाळ्यात पाण्याअभावी फळबागा नष्ट झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, केंद्राने जाहीर केलेल्या फळबाग पुनर्जीवन योजनेतील निधीचा दुसरा हप्ता देण्यास कृषी विभाग टाळाटाळ करत आहे.

अडवलेले हक्काचे पाणी मिळवणारच

$
0
0
नगर-नाशिक जिल्ह्यात अडवलेले हक्काचे पाणी मिळवणारच, असा निर्धार व्यक्त करीत विविध पक्ष-संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी धरणे आंदोलन केले.

‘लिव्ह-इन’मधील तरुणाची आत्महत्या

$
0
0
घरातून पलायन करुन लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार गुरुवारी जय भवानीनगरात घडला. या तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

स्तनपान न केल्यास कर्करोगाचा धोका

$
0
0
सुदृढ व निरोगी बाळ होण्यासाठी जन्मल्यानंतर सहा महिने केवळ आईचे दूध पाजणे आवश्यक आहे. बाळासोबत आईचीही प्रकृती निरोगी रहावी यासाठी स्तनपान हा प्रभावी उपाय आहे.

‘ट्रान्झिट फी’ची वसुली थांबवावी

$
0
0
नांदेड वाघाळा महापालिकेने परागमन शुल्कवसुली (‘ट्रान्झिट फी’) थांबवून त्या आशयाचे हमीपत्र हायकोर्टात सादर करण्याचे आदेश न्या. रवींद्र बोर्डे व न्या. रवींद्र घुगे यांनी दिले आहेत.

लाखो रुपयांचे नारळ फुटणार

$
0
0
श्रावण महिना म्हणजे धार्मिक, भक्तीमय वातावरण अन श्रद्धाळू भाविकांना पर्वणीच. अध्यात्माकडे वाढणारी ओढ श्रावणात विशेषत्वाने दिसून येते.

खड्डे : आयुक्ताविरुद्ध फौजदारी खटला

$
0
0
रस्त्यावरील खड्डे म्हणजे मानवी हक्काचे उल्लंघन आहे, असा नविन अन्वयार्थ प्रस्थापित केला आहे.

सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा

$
0
0
प्रसवपूर्व लिंगनिदान तंत्र अधिनियम कायदा २००३ अंतर्गतच्या सल्लागार समितीची बैठक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. एन. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

नुकसानग्रस्त शेतक-यांचे रास्ता रोको आंदोलन

$
0
0
हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊनही शासनाकडून केवळ नदी - नाल्याच्या काठावरील नुकसानग्रस्त भागातील पिकांचे सर्वेक्षण केले आहे.

भगतसिंगनगरात नवी वीज वाहिनी

$
0
0
जीटीएलने भगतसिंगनगर (हर्सुल) परिसरासाठी ११ के. व्ही. ची नवीन वीज वाहिनी टाकून फीडर बसविले आहे. यामुळे भगतसिंगनगर परिसरातील तीन हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत होऊन दिल्ली गेट फिडरवरील भार कमी झाला आहे.

शहिदांना श्रद्धांजली; पाकचा केला निषेध

$
0
0
सीमेवर पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारताचे पाच जवान शहिद झाले. या श‌हिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरातील विविध कॉलेजचे तरुण रस्त्यावर उतरले.

नागास दूध पाजू नका

$
0
0
नागपंचमीचा सण रविवारी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. नागपंचमी निमित्त अनेक ठिकाणी नागांना दूध पा‌जविले जाते. नाग किंवा साप दूध पितो हा गैरसमज असून नागरिकांनी नागास दूध पाजू नये असे आवाहन निसर्ग मित्र मंडळाने केले आहे.

बेरोजगारांना गंडविणा-यास पोलिस कोठडी

$
0
0
नोकरीच्या बहाण्याने बेरोजगारांना गंडा घालणारा आरोपी भाई जगताप उर्फ प्रशांत पाठक‌हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्वयंघोषित पदाधिकारी असल्याचे सांगत असल्याची माहिती समोर आली आहे.

कराराविना दिले कम्प्युटरचे काम

$
0
0
स्थानिक संस्थाकर विभागात कम्प्युटरचे काम ज्या कंपनीला देण्यात आले आहे, त्या कंपनीशी पालिकेने करार देखील केलेला नाही. करार न करता हे काम एखाद्या कंपनीला देणे ही बाब गोपनीयता भंग करणारी आहे असा स्पष्ट अभिप्राय लेखापरिक्षणात नोंदवण्यात आला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images