Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पीडब्ल्युडी अधिकाऱ्यांची मंत्र्यांच्या आदेशास बगल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

किलेअर्क येथील वसतिगृहातील अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करा, या सामाजिक न्याय विभाग मंत्र्यांच्या आदेशाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी महत्व देत नसल्याचे समोर आले आहे. मंत्र्यांनी आदेश दिल्यावरही वसतिगृहातील लिफ्टसह अनेक कामे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत.

मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाची चार वसतिगृहे किलेअर्क भागात आहेत. सहा मजली इमारतीत लिफ्ट बसविण्याचे काम कंत्राटदाराने पूर्ण केलेले नाही. ड्रेनेजची दुरुस्ती, पाइप बदलणे आदी फुटकळ कामे न झाल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी जानेवारीतील दौऱ्यात वसतिगृहातील कामे अपूर्ण असल्याची कबुली दिली होती. याप्रकरणी दोषींवर चौकशी करून कारवाईचे आश्वासनही पत्रकारांशी बोलताना दिले होते. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी फेब्रुवारीत वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेतले व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु, आदेश देऊन एक महिना उलटला तरी, एकाही कामाला सुरुवात झालेली नाही. यासंदर्भात बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यु. के. आहेर यांच्याशी संपर्क साधला असता ते उपल्बध होऊ शकले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाब विचारल्याने तरुणास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरासमोर सतत फेऱ्या मारणाऱ्यास जाब विचारल्याने एका तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (२१ मार्च) अल्तमश कॉलनी येथे घडली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सय्यद अहेरार (वय २०, रा. अल्तमश कॉलनी) यांच्या गल्लीत व घरासमोर गेल्या एक महिन्यापासून अफसर (रा. बायजीपुरा) हा फेऱ्या मारत होता. सय्यद अहेरार यांनी शनिवारी अफसरला अडवून त्याचे कारण विचारले. त्यावर तुला काय करायचे, थांब माझ्या भावाला आणतो, असे सांगून अफसर निघून गेला. काही वेळाने अफसर व त्याच्या तीन भावांनी सय्यदला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी लोखंडी पाइपचा नाकावर फटका बसल्याने सय्यद गंभीर जखमी झाला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आला आहे.

नारेगावात मारहाण

नारेगाव, ‌माणिकनगर येथे शेख लतीफ यांचा मुलगा हैदर बेग यांच्या मुलासोबत खेळत होता. खेळतांना त्यांचे झालेले भांडण मिटवण्यासाठी लतीफ गेला होता. या वादातून लतीफला आरोपी हैदर बेग, समीर हैदर बेग, सलीम बेग, राजा बेग व रेहाना हैदर बेग यांनी लाकडी दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

महिला जखमी

निकाती नितीन कुलकर्णी (वय ४०, रा. नारायणनगर, नाशिक रोड) यांना अदालत रोडवरून पायी जाताना दुचाकीने (एम. एच. २०, डी. बी. ६२८०) धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी वनिता कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमीचा मृत्यू

गंगापूर तालुक्यातील विटावा येथे दुचाकी घसरून जखमी झालेले बाबासाहेब गुडदे (वय ४०) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा अपघात ११ मार्च रोजी झाला. याप्रकरणी गुडदे यांच्यावर स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणासाठी इंडिगो सज्ज

$
0
0

अब्दुल वाजेद, औरंगाबाद

स्पाइस जेटची विमानसेवा बंद पडल्यामुळे चिंतीत झालेल्या औरंगाबादकरांसाठी एक खूशखबर. येत्या ऑक्टोबरपासून इंडिगोची विमानसेवा औरंगाबाद येथून सुरू होणार आहे. सुरुवातीला फक्त दिल्लीसाठी फेऱ्या करण्यात येथील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जानेवारीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या स्पाइस जेटने औरंगाबादची विमानसेवा बंद केली. त्यामुळे सध्या जेट एअरवेज आणि एअर इंडियाची विमानसेवा औरंगाबादहून सुरू आहे. मुंबई-औरंगाबाद-दिल्ली मार्गावर एअर इंडियाच्या विमानांचे उड्डाण होते. ही विमानसेवा थेट असल्यामुळे शिर्डीच्या दर्शनासाठी दिल्लीहून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांची अडचण होत आहे.

औरंगाबादहून दिल्लीकडे जाण्यासाठी राजकारणी, उदयोगपती, विद्यार्थ्यांसह पर्यटकांचा मोठा ओघ असतो. त्यामुळे औरंगाबाद दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करा, अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर इंडिगोची विमानसेवा सुरू होत असल्यामुळे प्रवाशांना हा सुखद धक्का आहे.

परवानगीची प्रतीक्षा

सध्या उन्हाळी सुट्यांचा हंगाम आहे. विमानसेवेची बुकींग वाढली आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत प्रवासी कमी असतात. त्यामुळे ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू करण्याची तयारी इंडिगोने केली आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यानंतर उदघाटनाचा नारळ फोडला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गोव्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर

मराठवाड्यातून पर्यटनासाठी गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे.सध्या विमानाने जाण्यासाठी मुंबईहून गोव्याला जावे लागते. त्यामुळे आगामी काळात थेट औरंगाबाद ते मुंबई आणि मुंबई ते पणजी ही विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे. तीन महिन्यांसाठी ही सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांनीच पुरवल्या कॉप्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुकुंदवाडीतील राजर्षी शाहू विद्यालयातील शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कॉप्या पुरविल्या व उत्तरे सांगितल्याचा प्रकार घडला आहे. या परीक्षा केंद्रावर पालकांनी मुख्याध्यापक व शिक्षणाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. दुसरीकडे ज्ञानप्रकाश विद्यामंदिरमध्ये चौथीची प्रश्नपत्रिका सातवीला, तर सातवीची चौथीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्याने गोंधळ उडाला होता.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला मराठवाड्यातून ३ लाख ४४ हजार ३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षेत शहरातील काही केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला. मुकुंदवाडी परिसरातील राजर्षी शाहू विद्यालयात 'मास कॉपी' झाल्याची तक्रार पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. या शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरविल्याचा आरोप आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे लिहून दिली, उत्तरे सांगितली, असी तक्रार पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही मुख्याध्यापकांनी दुर्लक्ष केल्याचे पालकांनी सांगितले. शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर आर. सोनवणे, सचिन कुलकर्णी, विजय भंडे, सुनील गंडे, मुधरा पांडे, जयश्री सरकटे, वनिता बिरारे, स्वाती पाटील, दिपाली कांबळे, संतोष नंदागवरे, शुभांगी विडेकर, मनोज पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना शशिकला बिराजदार यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी असे घडले नाही, असा दावा केला आहे.

ज्ञानप्रकाश विद्यालयात प्रश्नपत्रिका बदलल्या

ज्ञानप्रकाश विद्यामंदिरमध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांना सातवीचा, तर सातवीच्या विद्यार्थ्यांना चौथीची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. ही बाब विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांना लक्षात आणून दिली. हा प्रकार समजल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर चूक दुरुस्त करण्यात आली. या केंद्रावर विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ देण्यात आला.

ज्ञानप्रकाश विद्यामंदिरात केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांच्या चुकीमुळे त्रास झाला. त्यांना नोटीस देण्यात आली आहे. शाहू विद्यालयातील प्रकाराबाबत चौकशी समिती नेमली आहे. ही चौकशी सोमवारी करण्यात येईल.

नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी

शिक्षक आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे सांगत होते. हा प्रकार अत्यंत चूक आहे. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत, असे प्रकार होत असतील, तर विद्यार्थ्यांवर काय संस्कार होतील. ही परीक्षा पुन्हा घ्यावी.

वनिता बिरारे, पालक

कॉपी प्रकरणाबाबत पालकांनी मुख्याध्यापकांना सांगितले. परंतु, त्यांनी उलट पालकांनाच दरडावले. आम्ही शिक्षण विभागालाही निवेदन सादर केले आहे.

विजय भंडे, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाचा पारा चढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवकाळी पावसानंतर आता शहरात गेल्या पाच दिवसांपासून उन्हाचा चटका बसत आहे. शहराच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली असून रविवारी (२२ मार्च) ३७.४ अंश सेल्सियस नोंदवले गेले. औरंगाबाद शहरात गेल्यावर्षीप्रमाणेच मार्चमध्ये यावर्षीही तुरळक गारा पडल्या व अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काहीकाळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर वातावरण बदलले आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहराच्या तापमानात वाढ झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी कमी होती. उन्हापासून बचावासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांनी मोठ्या छत्र्या व ताडपत्र्यांचा आधार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८ फूट मगर दिसल्याने खळबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जायकवाडी धरणाच्या दक्षिण भागातील पाणलोट क्षेत्राजवळ रविवारी सकाळी आठ फूट मगर दिसली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांत दहशत पसरली आहे. धरणाच्या उजव्या कालव्यापासून जवळ असणाऱ्या शेवगाव तालुक्यातील कऱ्हेटाकळी शिवारात कचरू गायके हे सकाळी आठच्या दरम्यान आपली पाण्याची मोटार लावण्यासाठी आले होते. तेव्हा पाण्याच्या मोटारीजवळ या शेतकऱ्याला जवळपास आठ फूट मगर पाण्यात मुक्तपणे संचार करताना आढळली. मगरीला बघताच गायके घाबरून गेले. त्यांनी परिसरातील नागरिकांना घटनास्थळी बोलावले. लोकांच्या गर्दीचा मगरीवर कुठलाही परिणाम जाणवला नाही. पाण्याच्या चरित जवळपास अर्धा तास मुक्तपणे संचार केल्यावर ही मगर धरणाकडे निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

पिल्लू झाले मोठे

सकाळी आठच्या सुमारास मगर दिसल्याचे समजताच पैठण परिसरातील आणि पंचक्रोशीतील लोकांनी जायकवाडी धरण क्षेत्राकडे धाव घेतली. मगर पाहण्यासाठी बच्चेकंपनीपासून ते मोठ्यांपर्यंत बघ्यांनी तोबा गर्दी केली होती. पैठण शहरातील शेकडो नागरिक दररोज सकाळी जायकवाडी धरणात पोहण्यासाठी जातात. धरणात मगर आढळल्याची बातमी पसरताच या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. २००६ साली जायकवाडी धरणात मगरीचे लहान पिल्लू सापडले होते. हेच पिल्लू आता मोठे झाल्याची चर्चा पैठणमध्ये सुरू होती.

कऱ्हेटाकळी भागातील धरणाच्या परिसरात दोन मगरी असल्याची नोंद वन विभागाकडे आहे. मार्क क्रोकोडाईल जातीच्या या मगरी असून या मगरींची पूर्णपणे वाढ झाली आहे. सकाळी उन्हात शेकण्यासाठी या मगरी पाण्याबाहेर येतात. आतापर्यंत या मगरीने कोणत्याही माणसावर किंवा प्राण्यांवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यापासून धोका नाही.

- दिलीप यार्दी, पक्षीमित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना हॉटेलला अभय

$
0
0

उन्मेष देशपांडे, औरंगाबाद

खुद्द पालिका आयुक्तांनी क्रांतिचौकातील हॉटेलची इमारत अतिक्रमित ठरवली, तरीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या इमारतीवर हातोडा मारण्याचे धाडस दाखवले नाही. त्यामुळे 'बळ' मिळालेल्या त्या हॉटेल मालकाने भल्या मोठ्या परिसरात परवानगी न घेताच 'एनएच २११' या नावाने धाबा बांधला. या बांधकामाला नोटीस देऊन पालिकेने आपले 'कर्तव्य' पार पाडले. मालकाने या नोटिशीला कोर्टात आव्हान दिले आहे.

क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याचे काम करणाऱ्या जीएनए कंपनीचे मालक हरविंदरसिंग बिंद्रा यांच्या मालकीचे क्रांतीचौकात 'हॉटेल मॅनोर' आहे. या हॉटेलचा अतिक्रमित भाग पडू नये म्हणून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बिंद्रा यांच्यावर कृपादृष्टी ठेवली. हॉटेलसमोरच्या 'राणी लक्ष्मीबाई उद्यानाचा' अ​धिकाऱ्यांनीच बळी घेतला. उद्यानाचा अर्धा भाग रस्त्यासाठी पाडून टाकण्यात आला. बिंद्रा यांच्या हॉटेलचा जो भाग रस्त्याआड येत होता, त्यावर पालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी मार्किंग केले होते. बंड यांची बदली झाल्यानंतर बिंद्रा यांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे अतिक्रमण तर वाचवलेच, पण त्यासाठी पालिकेकडून मिळालेल्या रस्त्याच्या कंत्राटातही चालबाजी केली. पालिकेने 'अभय' दिल्यामुळे बिंद्रांचे बळ वाढले आणि त्यांनी याच रस्त्यावर हॉटेलच्या मागच्या बाजूला 'एनएच २११' या नावाने आलिशान धाबा सुरू केला. धाब्यासाठी त्यांनी रस्त्यालगत वॉल कंपाऊंड बांधले. महापालिकेच्या नगररचना विभागातून मिळालेल्या माहितीनुसार वॉल कंपाउंडच्या आणि धाब्याच्या बांधकामासाठी बिंद्रा यांनी परवानगी घेतली नाही. त्यांनी विनापरवाना बांधकाम केले आहे. नगररचना विभागाच्या या अहवालावरून महापालिकेच्या प्रशासकीय विभागाने 'एनएच २११'ला नोटीस बजावली. विनापरवाना केलेले बांधकाम पाडून टाका, नाहीतर महापालिकेतर्फे ते बांधकाम पाडून टाकण्यात येईल असा इशारा नोटीसव्दारे देण्यात आला, परंतु या नोटीसला बिंद्रा यांनी कोर्टात आव्हान दिले. पालिकेचे अधिकारी मात्र ते आव्हान 'आपोआप' कसे संपुष्टात येईल याचीच वाट पाहत आहेत. कंत्राटदार कोर्टात जाईल हे आधीच लक्षात घेऊन महापालिकेने 'कॅव्हेट' का दाखल केले नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एन २११ धाब्याच्या संदर्भात महानगरपालिकेकडून नोटीस मिळाली आहे. या नोटीसला कोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

- हरविंदरसिंग बिंद्रा, एन-२११ चे मालक

एनएच २११ धाब्याचे बांधकाम, वॉल कंपाऊंडचे बांधकाम विनापरवाना आहे. पालिकेच्या नोटिशीला त्यांनी कोर्टात आव्हान दिले आहे. बांधकाम पाडण्यास कोर्टाने स्थगिती दिली आहे. स्थगिती उठल्यावर ते बांधकाम पाडू.

- महावीर पाटणी, प्रशासकीय अधिकारी, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रात गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद शहरातील जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेतील सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रात सावळा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून जिल्हा परिषदेने बी. एडचे विद्यार्थी नेमले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला. या गोंधळातच विद्यार्थ्यांना नुकसान सहन करत परीक्षा द्यावी लागली.

जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेत सातवीच्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावार रविवारी ( २२ मार्च रोजी) शहरातील ३२५ विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा देण्यासाठी आले होते. त्यांची गणित आणि समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका मराठी माध्यमाला देण्याऐवजी चक्क, इंग्रजी माध्यमातील प्रश्नप‌त्रिका वितरीत करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला.

हा प्रकार परीक्षा केंद्रावर आलेल्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर पालक संतप्त झाले. त्यांनतर शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव यांनी परीक्षा केंद्राला ताबडतोब भेट दिली. तेंव्हा संतप्त पालक आणि शिक्षकांनी त्यांना घेराव घातला. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांना रडू कोसळले. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून बी. एडच्या विद्यार्थ्यांना नेमण्यात आले होत‌े. शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी जागरूक पालक आणि शाळा विद्यार्थ्यांची वर्षभर तयारी करून घेत असतात. एकेका मार्कावर त्यांचे मेरीट अवलंबून असते. पण जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या परीक्षा केंद्र चालकाच्या सावळा गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.

माझ्या मुलाला मराठी माध्यमाची प्रश्न पत्रिका द्यायला हवी होती. त्याने वर्गात मागणी करूनही दिली नाही, तो रडत खाली आला. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

- आर.पी. साळुंखे पालक, उस्मानाबाद

हा गोंधळ बी. एडचे विद्यार्थी शिक्षक पर्यवेक्षक म्हणून नेमल्यामुळे झाला आहे. मराठी माध्यमांचे नुकसान आम्ही सहन करणार नाही.

यापुढील काळात आंदोलन करणार आहोत.

राहुल बचाटे, शिक्षक संघटना, उस्मानाबाद

परीक्षा व्यवस्थापनात हयगय आणि निष्काळजीपणा झाला आहे. या प्रकाराणांशी संबधित असलेल्यांवर कारवाई करू.

- शिवाजी जाधव, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादन कायद्यातील सुधारणा फसव्या

$
0
0

औरंगाबाद : भूमी अधिग्रहण मुद्दा हा जमीनीसोबत जोडलेल्या सर्व बाबींना जोडणारा आहे. त्यामुळे शेतीला जोडलेल्या या मुद्द्यांना वाचा फोडली पहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल. माती म्हणजे सोनं आहे, मात्र मोदी सरकार करत असलेल्या भूसंपादन कायद्यातील सुधारणा म्हणजे फसवणूक असल्याचे मेधा पाटकर यांनी सांगितले.

भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात पाटकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या, व्यासपीठावर अण्णा खंदारे यांची उपस्थिती होती. भूमी अधिग्रहणाचा मुद्दा हा अत्यंत गंभीर असून शासन शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जमीनी घेत आहेत. १९९४ च्या भूसंपादन कायद्यात अनेक चुका होत्या. त्या सुधारण्यासाठी अनेक आंदोलने झाली. २०१३ मध्ये तयार झालेला कायदा २०१५ मध्ये लागू झाला, मात्र आता मोदी सरकार या कायद्यात नवीन सुधारणा करत आहेत. त्या हिताच्या नाही, असेही पाटकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॅगिंग करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द

$
0
0

म.टा.विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जवाहरलाल नेहरू इंजिनीअरिंग कॉलेजने अँटी रँगिंग कायद्यामध्ये दोषी ठरवून दोन विद्यार्थ्यांचे निलंबन केले. हा निलंबनाचा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.संजय गंगापूरवाला व न्या. व्ही. एल. अचलिया यांनी रद्द केला.

राहुल ढवळे व राहुल जायभाये या दोन विद्यार्थ्यांनी ही याचिका केली होती. रँगिंग झाल्याची तक्रार अजय चंद्रवंशी यांचे वडील दत्तात्रय चंद्रवंशी यांनी जे.एन.इ.सी.प्राचार्यांकडे केली होती. ढवळे, जायभाये व चंद्रवंशी हे तिघे एकाच खोलीत राहत होते. आर्थिक व्यवहारामुळे या तिघांमध्ये वाद झाला. २९ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०१४ दरम्यान या तिघांमध्ये भांडण होऊन मारामारी झाली. अजयच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर प्राचार्यांनी चौकशी समिती नेमली. या समितीने दिलेल्या चौकशी अहवालानुसार प्राचार्यांनी ७ सप्टेंबर २०१४ रोजी ढवळे व जायभाये यांना अँटी रँगिंग कायद्यान्वये दोषी ठरविले. २० नोव्हेंबर २०१४ रोजी या दोन विद्यार्थ्यांना निलंबित केले. या आदेशाला दोन विद्यार्थ्यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.

जे.एन.इ.सी. प्राचार्यांनी ए.आय.सी.टी.इ.च्या नियमानुसार अँटी रँगिंग समिती नेमली नाही. ही समिती महाराष्ट्र रँगिंग प्रतिबंधात्मक कायद्याशी सुसंगत नाही. नियम व कायद्यात फरक असेल तर कायदा श्रेष्ठ ठरतो. समितीचा निर्णय नैसर्गिक न्याय तत्वाला धरून नाही. याचिकाकर्ते व तक्रारदार हे एकाच वर्गातील असल्यामुळे झालेली मारामारी रँगिंगच्या व्याखेत मोडत नाही. वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्याने ज्युनिअर विद्यार्थ्याशी असभ्य वर्तणूक किंवा शारीरिक, मानसिक छळ केला तरच रँगिंगच्या शिक्षेस विद्यार्थी पात्र ठरतो, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील सतीश तळेकर यांनी केला. तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यानंतर अँटी रँगिंग समितीची स्थापना केली. समितीने कायद्याच्या चौकटीत राहूनच याचिकाकर्त्यांना एक वर्षांसाठी निलंबित केले, असा युक्तिवाद जे.एन.इ.सी.चे वकील व्ही.एस.कदम व एन.के. चौधरी यांनी केला. कोर्टाने निलंबनाचे आदेश रद्द केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्काच्या जागेची हवामान खात्याला प्रतीक्षा

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणाऱ्या भारतीय हवामान खात्याच्या औरंगाबाद येथील कार्यालयाला हक्काची जागा अद्यापही मिळू शकलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळ प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये हा विभाग असून हक्काच्या जागेच्या प्रतिक्षेत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून भारतीय हवामान खात्याचा हा विभाग स्वतंत्र जागेमध्ये उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र जागा न मिळाल्यामुळे डॉप्लर रडारसारखे महत्वाचे प्रकल्प मंजूर होऊनही रखडले आहेत. विमानतळ प्राधिकरणाच्या इमारतीमधील दोन खोल्यांमध्ये हवामान खात्याचा कारभार सुरू आहे. याच आवारामध्ये जमीन पातळीवरील हवामानाचा अंदाज वर्तवणारे यंत्र तसेच कर्मचाऱ्यांची निवासस्थानेही आहेत.

विमानतळ प्राधिकरणाला विमानांना येण्या-जाण्यासाठी तापमान, हवामान, वाऱ्याची दिशा या विषयांची माहिती हवामान खात्याकडून देण्यात येत असल्यामुळे प्राधिकरणाच्या जागेचे भाडे दोन्ही विभागांच्या वरिष्ठ पातळीवरून वळते करून घेण्यात येते.

हवामानशास्त्र विभागाला कार्यालय, डॉप्लर रडार, कर्मचारी निवासस्थान, विविध यंत्र यासाठी अडीच एकर जागेची आवश्यकता आहे. यासाठी प्रा‌धिकरणाकडेच जागेची मागणीही करण्यात आली, मात्र अद्यापही जागेच्या आकारावरून कोणताही निर्णय झाला नाही. यापूर्वी डॉप्लर रडार तसेच हवामान खात्याच्या स्वतंत्र जागेसाठी खुलताबाद, मूर्तिजापूर या जागांचाही विचार करण्यात आला होता.

सध्या जमीनीपातळीवरुन प्रत्येक तीन तासांना हवामानाचा अंदाज घेण्यात येतो. यामध्ये तापमान, हवेमधील बाष्पाचे प्रमाण, वाऱ्याची दिशा, गती, ढगांचे प्रकार आदींची माहिती एकत्रित करण्यात येते. तसेच विमानांसाठी प्रत्येक अर्धा तासाला संपूर्ण तापमानाची माहिती गोळा करून एअर ट्रफिक कंट्रोलला (एटीसी) देण्यात येते. हवामान खात्याला हक्काची जागा मिळाल्यास सर्व कामांमध्ये सुसूत्रता निर्माण होऊन हवामानाचा अचूक अंदाज बांधता येणार आहे. डॉप्लर रडारसाठी जागा मिळाली तर त्याचा उपयोग मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भाच्या काही भागांनाही होणार आहे. यामुळे हवामानाचा अचूक अंदाज बांधता येणार असल्यामुळे याचा उपयोग शेतीसाठीही होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आजोबा’ रुखरुख लावून जाणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात प्रवेश करताच बच्चे कंपनीला मोह होतो तो त्यांच्या 'आजोबा'ला, म्हणजेच वाघोबाला बघण्याचा. त्यांची धमाल टिपण्यासाठी रोज अनेकांच्या हातातले मोबाइल सरसावतात. चारचार-पाचपाच वाघोबांची पाण्यात सुरू असलेली दंगामस्ती या रखरखत्या उन्हातही बघणाऱ्यांना सुखावून सोडते, पण आता यातले काही वाघ पुणे, तर काही वाघ मध्यप्रदेशातल्या रिता येथे पाठविले जाणार आहेत. त्यामुळे ही ओलीकंची धमालमस्ती काही अंशी कमी होणार आहे. महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात सध्या पिवळ्या वाघांची संख्या आठ झाली आहे, तर पांढऱ्या वाघांची संख्या चार आहे.

पिंजरे आणि पिंजऱ्यांचे क्षेत्रफळ लक्षात घेता ही संख्या जास्त आहे. त्यामुळे काही वाघ कमी करा, अशी सूचना सेंट्रल झू ऑथॅरिटीच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला केली. त्यानुसार महापालिकेने अन्य प्राणिसंग्रहालयांकडून माहिती मागवली. त्यानुसार पुणे येथील प्राणिसंग्रहालयातून मागणी नोंदवण्यात आली, अशी माहिती पालिकेच्या प्राणिसंग्रहलयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी दिली. पुण्याला एक पिवळी वाघीण आणि एक पांढरा वाघ पाठवला जाणार आहे. मध्यप्रदेशात नव्यानेच सुरू झालेल्या रिता प्राणिसंग्रहालयातूनही वाघांसाठी मागणी आली आहे. या ठिकाणी पिवळ्या वाघांची एक जोडी पाठवली जाणार आहे.

बदल्यात मिळणार कोल्हे

पुण्याहून दोन वाघांच्या बदल्यात कोल्ह्याची एक जोडी औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयाला मिळणार आहे. मध्यप्रदेशातून मात्र वाघांच्या बदल्यात लगेच काही मिळणार नाही. भविष्यात प्राण्यांची गरज पडली, तर आम्हाला प्राणी द्या अशा बोलीवर वाघांची जोडी दिली जाणार आहे. वाघांच्या जोडीबरोबर सांबरही दिले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना रस्त्यावर ठिगळपट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील प्रमुख असलेल्या जालना रस्त्याचे डांबरीकरण गेल्या दीड वर्षांपासून डांबरीकरणाअभावी रखडले आहे. लाखो वाहने खड्ड्यातून आपला मार्ग काढत आहेत. महापालिकेच्या हद्दीतील पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील पाच रस्त्यांसाठी मंजूर केलेले २१ कोटी रुपये केवळ कागदावरच राहिले आहेत. त्याचा फटका शहरवासियांना बसत आहे.

जालना रोड, सिडको बसस्टँड ते हर्सूल टी पॉइंट, हर्सूल टी पॉइंट ते दिल्ली गेट यासह अन्य दोन रस्ते महापालिकेत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहेत. या रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून निधी अपेक्षित आहे. गेल्या आठ वर्षांपासून रस्त्यांसाठी निधी मिळालेला नाही. जालना रस्ताही त्यात अडकला आहे. सर्वाधिक रहदारीच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलवाटोलवी करण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने या पाच रस्त्यांसाठी २१ कोटी रुपये मंजूर केले, पण अर्थ खात्याने अखेरपर्यंत निधीच उपलब्ध करून दिला नाही. त्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका लागल्या. आचारसंहितेमुळे निधी आला नाही. त्यानंतर सरकार बदलले. युती सरकारनेही या रस्त्यांच्या निधीकडे दुर्लक्ष केले. परिणामी, खड्डे वाढले आहेत. नाही म्हणायला दीड कोटी रुपये सरकारकडून मिळाले. त्यातून सार्वजनिक बांधकाम विभागाने जालना रोडची ठिगळपट्टी सुरू केली आहे. या रस्त्यांना सरकारने जर मार्चअखेर निधी उपलब्ध करून दिला, तरच संपूर्ण मजबुतीकरण होणार आहे.

Latest Images