Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उस्मानाबादेत पाणीस्थिती गंभीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील २११ प्रकल्पांत सध्या ४४.३५० दशलक्ष घनमीटर (६.९८ टक्के) इतका उपयुक्त जलसाठा असून हा साठा जिल्ह्यातील नागरिकांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला असला, तरी बाष्पीभवन रोखण्याच्या तंत्राचा वापर यंदा होणार नसल्याने पाणीटंचाईची समस्या तीव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे.

सध्या जिल्ह्यातील एक मोठा, १७ मध्यम आणि १९३ लघु असा एकूण २११ प्रकल्पांत एकूण ४४.३५० दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. २०१४ मध्ये या दिवसांत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत एकूण १४.५२ टक्के इतका पाणीसाठा होता, तरीही नागरिकांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. यंदा जलसाठ्याची स्थिती भीषण असून, धरणात पाणीच नसल्याने जिल्हावासीयांच्या घशाला कोरड पडली आहे. जलसाठा कमी असल्याने यंदा बाष्पीभवन रोखण्यासाठी 'फॅटीअॅसिड'ची मोहीम (इव्हिलॉक सिस्टिम) राबवण्यात येणार नाही. त्यामुळे उन्हाळ्याबरोबरच बाष्पीभवनातदेखील वाढ होऊन पाण्याची टंचाई वाढण्याचा धोका आहे.

उस्मानाबादेतील २११ पैकी बहुतांश जलसाठा प्रकल्पांत यंदा पाणीसाठा हा जेमतेम आहे. २०१३मध्ये तीव्र पाणीटंचाई असताना प्रायोगिक तत्वावर 'फॅटी अॅसिड' योजना जिल्ह्यातील १३ तलावांत राबविण्यात आली होती. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता प्रकर्षाने जाणवली नाही. प्रकल्पातील सुमारे ३६.०८ कोटी लिटर पाण्याची या तंत्राच्या वापराने बचत झाली. तुळजापूरसह नळदूर्ग, अणदूर या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणावर या तंत्राचा वापर करण्यात आल्याने टंचाईच्या काळात या गावांना पाणीपुरवठा करता आला. या उपक्रमासाठी ३३ लाख ३६ हजार रुपये इतका खर्च आला.

उस्मानाबाद शहरासह पाच गावांना पाणीपुरवठा करणारा तेरणा मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेला आहे. त्यामुळे तेर, ढोकी, येडशी, कसबे तडवळे या गावांना भीषण टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. गेल्या वर्षी तेरणा प्रकल्पात या वेळी १७.३० टक्के इतका जलसाठा होता. सध्या उपशामुळे व बाष्पीभवनामुळे दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत आहे. शेतीसाठी उपसा करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पाटबंधारे विभागाला दिले असले, तरी कारवाईबाबत पाटबंधारे विभागाकडून डोळेझाकच होत आहे. जिल्ह्यात पाण्याचे टँकर आत्ताच सुरू झाले असून येत्या काळात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

शून्य टक्के साठा

यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्यामुळे जानेवारी महिन्यातच जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. 'परांडा' तालुक्यातील चांदणी, खंडेसर या प्रकल्पांत शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. 'उमरगा' तालुक्यातील रायगव्हाणमध्यम प्रकल्पाची पाण्याची पातळी ही जानेवारीतच जोत्याखाली गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युतीमध्ये बंडखोरीची त्सुनामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , औरंगाबाद

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी शिवसेना, भारतीय जनता पक्षांत बंडखोरांची त्सुनामी उसळली. बहुतेक राजकीय पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल करून नेत्यांना आव्हान दिले आहे. एनडीएचे गटनेते गजानन बारवाल, राजू तनवाणी, विद्यमान नगरसेवक सुशील खेडकर यांच्यासह अनेक इच्छुकांनी अधिकृत उमेदवारांविरुद्ध अर्ज दाखल केले आहेत.

शिवसेना, भारतीय जनता पक्ष युती आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी यासंदर्भात सोमवारपर्यंत संभ्रम होता. शिवसेना-भाजपची युती झाली, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी न करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेने बहुचर्चित पदमपुरा वॉर्डातून संजय बारवाल यांना उमेदवारी दिली आहे. तेथे गजानन बारवाल यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारवाल महापालिकेत शिवसेना-भाजपचे गटनेते होते. समर्थनगर वॉर्डातून खासदारपुत्र ऋषिकेश खैरे यांच्या विरोधात प्रांतोष वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. वाघमारे भाजपचे कार्यकर्ते आहेत. कोटला कॉलनी वॉर्डात भाजपने माजी महापौर डॉ. भागवत कराड यांच्या पत्नी डॉ. अंजली कराड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या कचरू घोडके यांनी पत्नीचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरला आहे.

गुलमंडी वॉर्डातील शिवसेनेचे उमेदवार सचिन खैरे यांच्या विरोधात बंडखोरांचे मोहळच तयार झाले आहे. माजी आमदार व भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य किशनचंद तनवाणी यांचे भाऊ राजू तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय सुधीर नाईक, रवी बलदवा, राजेश मेहता, सोमनाथ बोंबले, पप्पू व्यास, प्रमोद नरवडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नारेश्वरवाडी वॉर्डातून शिवसेनेचे उमेदवार विनायक देशमुख यांच्या विरोधात शिवसेनेचेच कार्यकर्ते योगेश अष्टेकर यांनी बंडखोरी केली आहे. भारतनगर-शिवाजीनगर या वॉर्डातून शिवसेनेने विद्यमान नगरसेवक दिग्विजय शेरखाने यांच्या विरोधात भाजपचे जालिंदर शेंडगे यांनी शड्डू ठोकला आहे. शिवाजीनगर वॉर्डातून शिवसेनेने राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी दिली, पण त्यांच्या विरोधात शिवसेनेचेच माजी नगरसेवक विनोद सोनवणे आणि साईनाथ वेताळ यांनी बंडखोरी केली आहे. तेथे भाजपचे ललित माळी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उल्कानगरी वॉर्डातून भाजपने दिपील थोरात यांच्या विरोधात शिवसेनेचे नगरसेवक सुशील खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अविष्कार कॉलनी वॉर्डातून शिवसेनेने सोपान बांगर यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात शिवसेनेचेच ज्ञानेश्वर अप्पा खर्डे, कृष्णा मांडगूळकर यांनी बंडखोरी केली आहे. भाजपचे मयूर वंजारी यांनीही उमेदवारी दाखल केली. मिटमिटा वॉर्डातून शिवसेनेने रावसाहेब आमले यांच्या विरोधात भाजपचेच मंडलाध्यक्ष दीपक ढाकणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नेत्यांसमोर आव्हान

बंडखोरीची उसळलेली त्सुनामी कशी थांबवायची असा प्रश्न शिवसेना- भाजपच्या नेत्यांसमोर आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १० एप्रिलपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत नेते मंडळींसमोर बंडोबांना शांत करण्याचे आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवेंनी कापले सावेंचे पंख

$
0
0



प्रमोद माने, औरंगाबाद

शिवसेनेबरोबर युती करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्याच पक्षाचा घात केला. भाजपचे नेते तहात पराभूत झाले असून, शिवसेनाच औरंगाबाद महापालिकेत मोठा भाऊ ठरला आहे. पुन्हा एकदा भाजपलाच नमते घ्यावे लागले. तह करताना दानवे यांनी औरंगाबाद पूर्वचे भाजपचे आमदार व निवडणूक प्रमुख अतुल सावे, माजी आमदार, सहनिवडणूक प्रमुख किशनचंद तनवाणी यांचेच पंख कापले आहेत. जागावाटप जाहीर झाल्यानंतर दानवे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेतून बाहेर पडलेले तनवाणी यांचा, युतीचे जागावाटप करताना दानवे यांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्या मदतीने गेम केला, अशी जोरदार चर्चा भाजपमध्ये चालू आहे.

माजी आमदार तनवाणी यांना त्यांच्या मनाप्रमाणे जागा दिल्या नाहीत. केवळ राजाबाजार प्रभागच त्यांना देऊ केला आहे. हर्सूलमध्ये पूनमचंद बमणे यांना तिकीट दिले असले तरी ते भाजपचे नगरसेवक होते हे विसरून चालणार नाही. मयूरपार्कमध्ये विजय औताडे यांनी काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते तनवाणी यांचे कार्यकर्ते नाहीत, असा दावा भाजप कार्यकर्त्यानी केला.

सुरेवाडी, सिडको एन -६, नक्षत्रवाडी या जागा तनवाणी यांनी मागितल्या होत्या. या जागा त्यांना दिल्या नाहीत. या सर्व जागांवरूनच युतीमध्ये बेबनाव निर्माण झाला होता.

आमदारांना सहा वॉर्ड

आमदार अतुल सावे यांच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ३४ वॉर्ड येतात. यापैकी केवळ त्यांच्या पसंतीच्या सहा कार्यकर्त्यांनाच दानवे यांनी तिकीट देऊन सावे यांचे पंख छाटले. नागेश्वरवाडी प्रभाग शिवसेनेला सोडून सावे यांच्या जखमेवर मीठ चोळले. सावे यांचे निकटवर्तीय अनिल मकरिये यांना तेथून तिकीट पाहिजे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना ६४, भाजप ४९!

$
0
0



युतीचा तिढा सुटला; प्रचाराचा नारळ एकत्रित फुटणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीच्या घोषणेपासून निर्माण झालेला शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचा तिढा अखेर सोमवारी सुटला. शहरातील ११३ वॉर्डांपैकी शिवसेना ६४ आणि भाजप ४९ जागांवर निवडणूक लढवणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

औरंगाबाद जिमखाना क्लबमध्ये शिवसेना आणि भाजप नेत्यांची संयुक्त बैठक झाली. दुपारी दोन ते सायंकाळी सातपर्यंत ही बैठक चालली. संध्याकाळी पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवे म्हणाले, 'राज्यात नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत युती करण्याचा निर्णय मागच्या आठवड्यात 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर घेण्यात आला होता. त्यानुसार दोन्ही महापालिकांच्या निवडणुकीत युती करण्याचे आज निश्चित करण्यात आले. नवी मुंबईत ११३ वॉर्डांपैकी शिवसेना ६८, तर भाजप ४३ वॉर्डांमध्ये उमेदवार उभे करण्यात येतील. दोन्ही पालिकांवर युतीचाच झेंडा फडकेल.'

भाजपमध्ये ज्या नगरसेवकांनी प्रवेश केला, त्यापैकी बहुतेकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला, असा दावा करून रावसाहेब दानवे म्हणाले, आता आमची युती झाली आहे. त्यामुळे रामदास आठवले, महादेव जानकर आणि शिवसंग्राम पक्ष यांच्याबरोबर बसून पुढील जागांचे वाटप ठरवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

खासदार खैरे म्हणाले, 'पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती करण्याचा आदेश दिला होता. त्यांच्या आदेशाचे आम्ही पालन केले आहे.' या बैठकीला शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सुहास दाशरथे, आमदार अतुल सावे, नारायण कुचे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, भगवान घडमोडे, डॉ. भागवत कराड आदी उपस्थित होते.

खरी बैठक आजचीच

शिवसेना-भाजपची युती होण्यासाठी अकरा बैठका झाल्या. एवढी ओढाताण सुरू होती का, असा प्रश्न पत्रकारांनी रावसाहेब दानवे यांना विचारला असता ते म्हणाले, 'अकरा बैठका झाल्या ही गोष्ट खरी आहे, पण त्यापैकी काही बैठकांमध्ये फक्त चहा-पाणी झाले. काही बैठका जेवणावळीत गेल्या. युतीसाठीची खरी बैठक आजच झाली आणि दोन तासांत मार्ग निघाला.'

महापौर-सभापतीबद्दल नंतर चर्चा

युतीचे जागावाटप झाले, पण महापौर आणि सभापतिपदाबद्दल दोन्ही पक्षांत काही ठरले आहे का, या प्रश्नावर रावसाहेब दानवे म्हणाले, 'या दोन्ही पदांबद्दल आता चर्चा झाली नाही. निवडणुकीचे निकाल आल्यावर आम्ही पुन्हा बसणार आहोत. त्यावेळी या दोन्ही पदांबद्दल चर्चा करून निर्णय घेऊ.'

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये काडीमोड

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. एकमेकांवर आरोप करत दोन्ही पक्षांनी उमेदवारांना ए, बी फॉर्मचे वाटप केले. राष्ट्रवादी काँग्रेसने ७५ तर काँग्रेसने ८० वॉर्डांसाठी ए, बी फॉर्म वाटप केले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये काडीमोड झाल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले. काँग्रेसचे निरीक्षक सचिन सावंत म्हणाले, आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोडला होता. स्थानिक काँग्रेस नेते राष्ट्रवादीसोबत जाण्यास उत्सुक नव्हते. औरंगाबाद शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची कुठलीही ताकद दिसली नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्व जागा लढविणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित देशमुख यांनी सांगितले की, आघाडीसाठी आम्ही प्रस्ताव दिला होता, पण काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता आम्ही काँग्रेसला त्यांची जागा दाखवून देऊ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कूर्मगतीवर दानवेंचा संताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जिल्ह्याच्या प्रशासनाची अतिशय मंद चाल आणि लोकप्रतिनिधींचा संताप या रंगलेल्या खेळाच्या पहिल्या डावात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची बदली झाली, तर दुसऱ्या डावात आणखी धक्के बघण्यास मिळण्याची चर्चा रंगली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रशासनाच्या कूर्मगतीवर नुकताच संताप व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध विकासकामांचा आढावा मार्च महिन्याच्या शेवटी घेण्यात आला. तो पाहून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पारा अक्षरशः चढलेला आहे. आदर्श ग्रामसेवकांना सन्मानित करण्यासाठी योजलेल्या जाहीर कार्यक्रमात दानवे यांनी जिल्हाधिकारी नायक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांना जाहीर व्यासपीठावर नुकतेच सर्वांसमक्ष खडसावले आहे. जालन्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून मंजूर झालेली आणि प्रत्यक्ष पूर्ण झालेल्या कामांचा लेखाजोखा मार्च महिन्याअखेरीस घेण्यात आला. कामे पूर्ण झालेला आकडा बघून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी संताप व्यक्त केला.

जिल्ह्यातील तहसील स्तरावर सन २०१३-१४ या वर्षात ४८४१ कामे मंजूर करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात ९४५ कामे पूर्ण करण्यात आली. कामे पूर्ण करण्यात येण्याची २४.२६ टक्केवारी आहे. सन २०१४-१५ या वर्षात ५५६८ कामांपैकी अवघी १.४९ टक्के कामे पूर्ण करण्यात आले आहेत. दानवे म्हणाले, 'जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत सर्वाधिक घोटाळ्यात अडकून पडलेल्या हजारो सिंचन विहीरींचे पेमेंट शेतकऱ्यांना मिळत नाही. तालुक्यातील गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी प्रत्येक विहीरीमागे मागे

मंजुरीप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान तीस हजार रुपये रोख रक्कम घेऊनच मान्यता दिली आहे. असे असताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय काम करतात? तहसील कार्यालयात चकरा मारून थकलेले शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांना दिसत नाही का? मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आपण या बाबींची तक्रार दाखल केली आहे.' या संदर्भात जिल्हा प्रशासनाचे अधिकारी काहीही बोलत नाहीत हे विशेष! देशभ्रतार यांची रत्नागिरी येथे बदली झाली आहे, तर यानंतर कुणाची बदली होते, या प्रतीक्षेत सर्वजण असल्याची चर्चा रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस उत्पादकांवरही कारवाई होणार का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

'बीडमध्ये खसखस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अफू तयार करण्याचा खोटा आरोप लावण्यात आला आहे. ऊसापासून साखरेप्रमाणेच दारूही तयार होते. मग ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरही अशीच कारवाई करणार का, असा संतप्त सवाल शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांना 'मटा'शी बोलताना व्यक्त केला. शेतकऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई ही अन्यायकारक असून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बीड येथून औरंगाबादकडे जात असताना रघुनाथदादा पाटील काही वेळ जालन्यात थांबले होते. या वेळी त्यांनी बीडमधील शेतकऱ्यांवरील कोर्टाच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले. पाटील म्हणाले, 'खसखसच्या बोंडापासून अफू निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी खसखस उत्पादक शेतकऱ्यांवर कारवाई करून राजकीय सूड उगविला जात आहे. ऊसापासून साखरेप्रमाणेच दारूही तयार होते. मग तुम्ही उस उत्पादक शेतकऱ्यांवरही अशाच प्रकारची कारवाई करणार का?'

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील २५ खसखस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना अफू तयार केल्याच्या आरोपाखाली दोन दिवसांपूर्वी कोर्टाने दोषी ठरविले. त्यांना प्रत्येकी १० वर्षांची शिक्षा व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याविषयी पाटील म्हणाले, 'देशात इतर राज्यात खसखस उगविण्यास परवानगी आहे. मग राज्यात का नाही? खसखसच्या बोंडांपासून अफू तयार होते. अफू तयार करणारया कारखान्यांवर, त्याची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसच्या अपघातात एक ठार, २० जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

एका दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर बसमधील २० प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील गोळेगावजवळ मंगळवारी (७ एप्रिल) दुपारी दोनच्या सुमारास झाला.

यावल-औरंगाबाद ही बस (एमएच ४०,एन ९८१८) सिल्लोडकडे येत असतांना गोळेगावजवळील श्याम ढाब्यासमोर अचानक मोटार सायकलस्वार (एमएच २०,सीजी २७३८) रस्त्यावर आला. या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस निलगिरीच्या झाडावर आदळली. बसची दुचाकीला धडक बसून दुचाकीस्वार किरण नागोराव मोकाशे जागीच ठार झाला. बसमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर पोलिस व गोळेगावच्या नागरिकांनी जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यासाठी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, राजूमियाँ देशमुख, पाशू देशमुख यांनी मदत केली.

परमेश्वर धोंडकर (वय ४०, रा. आडगाव), महादुसिंग बहादूर सिंग (वय २८, रा. आनाड), इक्बाल बशीर शेख (वय ५०, बसचालक, रा. यावल), मुश्ताक शेख लड्डू (वय ५८, रा भराडी), सुरैय्याबी शेख गुलाब (वय ५०, रा. सिल्लोड), गौसियाबी शेख नूर (वय ५४, रा. सिल्लोड) या जखमींवर प्रथमोपचार करून औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. रिजवाना रफ‌िक शहा (वय २५), सिमरन रफ‌िक शहा (वय ४, रा. दोघाही नायगाव), पुनम शैलेद्र वाघ (वय३०), अक्षरा वाघ (वय ४ वर्ष रा. दोघेही लिहाखेडी), शोभा तोराराम वाघ (वय४०), गणेश तातेराव चव्हाण (वय ६, रा. दोघेही कांचनवाडी), अमित तडवी (वय २८, रा यावल वाहक), संजय दाभाडे (वय४५, रा. सिल्लोड), शरीफ शहा (वय २४, रा. नायगाव), यांच्यावर सिल्लोड येथे उपचार करण्यात आले. अपघाताची नोंद अजिंठा पोलिस ठाण्यात घेतली आहे.

नातेवाईकांचा आक्रोश

अपघातात मरण पावलेला तरूण किरण मोकाशे शेळ्या विकत आणण्यासाठी पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारात गेला होता. परंतु, त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात हबंरडा फोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात सरपंचाचा राडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

रोजगार हमी योजनेच्या कामावरून सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्याच्या पतीने मंगळवारी पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि कार्यालयातील सामानाची तोडफोड केली. सुधाकर वाडेकर असे संबंधिताचे नाव असून ते जामवाडीचे सरपंच आहेत. याच्या निषेधार्थ पंचायत समिती, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी बंदचे हत्यार उपसले आहे.

सत्ताधारी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सरला वाडेकर यांचे पती व जामवाडीचे सरपंच सुधाकर वाडेकर हे मंगळवारी दुपारी आपल्या कामानिमित्त जालना पंचायत समिती कार्यालयात आले होते. रोजगार हमी योजनेच्या कामावरून आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. वादातून संतापलेल्या वाडेकर यांनी कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खुर्ची, टेबल व काचेची तोडफोड केली. या घटनेचा कर्मचाऱ्यांनी निषेध केला आणि काम बंद आंदोलन सुरू केले. शिवसेनेचे माजी पंचायत समिती सभापती संतोष मोहिते यांनी या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही. हा पहिला प्रकार नसून यापूर्वीही त्यांनी असे प्रकार केले असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला. वाडेकर यांनी कार्यालयातून माघारी जाताना आज, बुधवारी, पुन्हा कार्यालयातील कम्प्युटर फोडण्याचीही धमकी दिल्याचे महिला कर्मचाऱ्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. घटनेची माहिती 'सोशल नेटवर्किंग'द्वारे वाऱ्यासारखी पसरली. याचे पडसाद जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांबरोबरच जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांतही उमटले. त्यांनीही काम बंद आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदविला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

अशा प्रकारे शासकीय कामात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित महिलेचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाडेकर यांनी केली आहे.

शासकीय कार्यालयात येऊन अशा प्रकारे शिवीगाळ आणि तोडफोड करणे हा अतिशय निषेधार्ह प्रकार आहे. या प्रकारामुळे कर्मचारी दहशतीखाली आहेत. देशभरातील रोहयोच्या कामाची ऑनलाइन पेमेंट १ एप्रिलपासून बंद असून शासनाकडून त्याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. तांत्रिक अडचणी समजून न घेता दहशत पसरविणे चुकीचे आहे.

-सचिन सूर्यवंशी, गटविकास अधिकारी,जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तपासणीमुळे अधिकाऱ्यांची भंबेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात झालेल्या कामांची तपासणी गुणवत्ता निरक्षकांकडून करण्यात येत आहेत. दोन दिवसांच्या तपासणीत पथकाला अनेक कामांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची भंबेरी उडत आहे.

मग्रारोहयो अंतर्गत ग्रामपंचायत, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, सिंचन विभागांकडून कामे करण्यात आली आहेत. या कामांची खुलताबाद तालुक्यात सोमवारपासून (६ एप्रिल) गुणवत्ता निरीक्षकांकडून तपासणी करण्यात येत आहे. या पथकात गुणवत्ता निरीक्षक बी. जी. पंडित, उपअभियंता जी.व्ही. होंदरणे, विलास सोनवणे, जे. जी. कांबळे, राजू कीर्तने यांचा समावेश आहे.

या पथकाने सोमवारी भडजी येथे ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलेल्या दोन रस्त्यांच्या कामांची व म्हैसमाळ येथे वनविभागाने केलेल्या सिमेंट नालाबांध कामांची पाहणी केली. दरेगाव व लोणी येथील कामांची पाहणी मंगळवारी (७ एप्रिल) करण्यात आली, तर बुधवारी (८ एप्रिल) टाकळी राजेराय, धामणगाव येथील कामाचीही पाहणी केली जाणार आहे.

या पथकाकडून तालुक्यातील २०१०-११ या कालावधीत झालेल्या कामांची तपासणी केली जात आहे. पथकाकडून चांगले काम झाल्याचे दाखवून प्रशस्तीपत्रक मिळवण्याचा खटाटोप केला जात आहे. परंतु, गुणवत्ता निरीक्षकांनी काही कामांबद्दल नाराजी व्यक्त करून विचारणा केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची धाबे दणाणले आहे.

अनेक कामांत त्रुटी

अनेक कामांमध्ये त्रुटी आढळल्याने पथकाने नाराजी व्यक्त करीत जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारल्याची माहिती मिळाली आहे. कामांचे अभिलेखे, कागदपत्रे अद्यायावत नसल्याबद्दलही उपस्थितांची चांगलीच खरडपट्टी काढली. कामाच्या गुणवत्तेचा दर्जा निकृष्ट असल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहयो मजूर कमी कसे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना रोजगार हमी योजनांची कामे व मजुरांची संख्या कमी कशी झाली, अशी विचारणा राज्य सरकाने विभागीय आयुक्तालयाकडे केली आहे. मराठवाड्यात एक आठवड्यात नरेगाची १३०३ कामे कमी झाली असून मजुरांच्या संख्येत २६ हजार ८०२ ने घट झाली आहे.

गेल्या आठवड्यात मराठवाड्यामध्ये ४ हजार ६१८ कामांवर तब्बल ८० हजार ९७६ मजुरांची उपस्थिती होती. मात्र एकाच आठवड्यात १३०३ कामे कमी झाली असून, त्यामुळे २६ हजार ८०२ मजूरही कमी झाले आहेत. सध्या विभागात ३,३१५ कामांवर ५४ हजार १७४ मजुरांची उपस्थिती आहे. मजूर उपस्थिती व कामांच्या संख्येत नेहमीच पिछाडीवर असलेले औरंगाबाद, जालना व हिंगोली जिल्ह्यांची परिस्थिती जैसे थे आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतही मजूर संख्या कमी झाली आहे. परभणी जिल्ह्यात ८७ कामे वाढली व ११४९ मजूर वाढले आहेत. हा एकमेव अपवाद आहे. सर्वाधिक घट नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, जालना, लातूर या जिल्ह्यांत नोंदवली गेली आहे.

रोजगार हमी योजनेत प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यातच मराठवाड्यात सध्या दुष्काळ असून शेतीत काम नाही. या परिस्थितीत मजूर संख्या वाढण्याऐवजी कमी होत असल्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्याबद्दल विचारणा झाल्यामुळे विभागीय आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादेत पाणीस्थिती गंभीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील २११ प्रकल्पांत सध्या ४४.३५० दशलक्ष घनमीटर (६.९८ टक्के) इतका उपयुक्त जलसाठा असून हा साठा जिल्ह्यातील नागरिकांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला असला, तरी बाष्पीभवन रोखण्याच्या तंत्राचा वापर यंदा होणार नसल्याने पाणीटंचाईची समस्या तीव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे.

सध्या जिल्ह्यातील एक मोठा, १७ मध्यम आणि १९३ लघु असा एकूण २११ प्रकल्पांत एकूण ४४.३५० दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. २०१४ मध्ये या दिवसांत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत एकूण १४.५२ टक्के इतका पाणीसाठा होता, तरीही नागरिकांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. यंदा जलसाठ्याची स्थिती भीषण असून, धरणात पाणीच नसल्याने जिल्हावासीयांच्या घशाला कोरड पडली आहे. जलसाठा कमी असल्याने यंदा बाष्पीभवन रोखण्यासाठी 'फॅटीअॅसिड'ची मोहीम (इव्हिलॉक सिस्टिम) राबवण्यात येणार नाही. त्यामुळे उन्हाळ्याबरोबरच बाष्पीभवनातदेखील वाढ होऊन पाण्याची टंचाई वाढण्याचा धोका आहे.

उस्मानाबादेतील २११ पैकी बहुतांश जलसाठा प्रकल्पांत यंदा पाणीसाठा हा जेमतेम आहे. २०१३मध्ये तीव्र पाणीटंचाई असताना प्रायोगिक तत्वावर 'फॅटी अॅसिड' योजना जिल्ह्यातील १३ तलावांत राबविण्यात आली होती. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता प्रकर्षाने जाणवली नाही. प्रकल्पातील सुमारे ३६.०८ कोटी लिटर पाण्याची या तंत्राच्या वापराने बचत झाली. तुळजापूरसह नळदूर्ग, अणदूर या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणावर या तंत्राचा वापर करण्यात आल्याने टंचाईच्या काळात या गावांना पाणीपुरवठा करता आला. या उपक्रमासाठी ३३ लाख ३६ हजार रुपये इतका खर्च आला.

उस्मानाबाद शहरासह पाच गावांना पाणीपुरवठा करणारा तेरणा मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेला आहे. त्यामुळे तेर, ढोकी, येडशी, कसबे तडवळे या गावांना भीषण टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. गेल्या वर्षी तेरणा प्रकल्पात या वेळी १७.३० टक्के इतका जलसाठा होता. सध्या उपशामुळे व बाष्पीभवनामुळे दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत आहे. शेतीसाठी उपसा करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पाटबंधारे विभागाला दिले असले, तरी कारवाईबाबत पाटबंधारे विभागाकडून डोळेझाकच होत आहे. जिल्ह्यात पाण्याचे टँकर आत्ताच सुरू झाले असून येत्या काळात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

शून्य टक्के साठा

यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्यामुळे जानेवारी महिन्यातच जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. 'परांडा' तालुक्यातील चांदणी, खंडेसर या प्रकल्पांत शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. 'उमरगा' तालुक्यातील रायगव्हाणमध्यम प्रकल्पाची पाण्याची पातळी ही जानेवारीतच जोत्याखाली गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीमध्ये बंडखोरीची त्सुनामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , औरंगाबाद

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी शिवसेना, भारतीय जनता पक्षांत बंडखोरांची त्सुनामी उसळली. बहुतेक राजकीय पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल करून नेत्यांना आव्हान दिले आहे. एनडीएचे गटनेते गजानन बारवाल, राजू तनवाणी, विद्यमान नगरसेवक सुशील खेडकर यांच्यासह अनेक इच्छुकांनी अधिकृत उमेदवारांविरुद्ध अर्ज दाखल केले आहेत.

शिवसेना, भारतीय जनता पक्ष युती आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी यासंदर्भात सोमवारपर्यंत संभ्रम होता. शिवसेना-भाजपची युती झाली, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी न करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेने बहुचर्चित पदमपुरा वॉर्डातून संजय बारवाल यांना उमेदवारी दिली आहे. तेथे गजानन बारवाल यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारवाल महापालिकेत शिवसेना-भाजपचे गटनेते होते. समर्थनगर वॉर्डातून खासदारपुत्र ऋषिकेश खैरे यांच्या विरोधात प्रांतोष वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. वाघमारे भाजपचे कार्यकर्ते आहेत. कोटला कॉलनी वॉर्डात भाजपने माजी महापौर डॉ. भागवत कराड यांच्या पत्नी डॉ. अंजली कराड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या कचरू घोडके यांनी पत्नीचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरला आहे.

गुलमंडी वॉर्डातील शिवसेनेचे उमेदवार सचिन खैरे यांच्या विरोधात बंडखोरांचे मोहळच तयार झाले आहे. माजी आमदार व भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य किशनचंद तनवाणी यांचे भाऊ राजू तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय सुधीर नाईक, रवी बलदवा, राजेश मेहता, सोमनाथ बोंबले, पप्पू व्यास, प्रमोद नरवडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नारेश्वरवाडी वॉर्डातून शिवसेनेचे उमेदवार विनायक देशमुख यांच्या विरोधात शिवसेनेचेच कार्यकर्ते योगेश अष्टेकर यांनी बंडखोरी केली आहे. भारतनगर-शिवाजीनगर या वॉर्डातून शिवसेनेने विद्यमान नगरसेवक दिग्विजय शेरखाने यांच्या विरोधात भाजपचे जालिंदर शेंडगे यांनी शड्डू ठोकला आहे. शिवाजीनगर वॉर्डातून शिवसेनेने राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी दिली, पण त्यांच्या विरोधात शिवसेनेचेच माजी नगरसेवक विनोद सोनवणे आणि साईनाथ वेताळ यांनी बंडखोरी केली आहे. तेथे भाजपचे ललित माळी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उल्कानगरी वॉर्डातून भाजपने दिपील थोरात यांच्या विरोधात शिवसेनेचे नगरसेवक सुशील खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अविष्कार कॉलनी वॉर्डातून शिवसेनेने सोपान बांगर यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात शिवसेनेचेच ज्ञानेश्वर अप्पा खर्डे, कृष्णा मांडगूळकर यांनी बंडखोरी केली आहे. भाजपचे मयूर वंजारी यांनीही उमेदवारी दाखल केली. मिटमिटा वॉर्डातून शिवसेनेने रावसाहेब आमले यांच्या विरोधात भाजपचेच मंडलाध्यक्ष दीपक ढाकणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नेत्यांसमोर आव्हान

बंडखोरीची उसळलेली त्सुनामी कशी थांबवायची असा प्रश्न शिवसेना- भाजपच्या नेत्यांसमोर आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १० एप्रिलपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत नेते मंडळींसमोर बंडोबांना शांत करण्याचे आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाय घसरून विहिरीत पडल्याने महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता टोकाला पोहचली आहे. उमरगा तालुक्यातील वागदरी येथील महिलेचा पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. कलावती सारणे (वय ३० रा. वागदरी ता. उमरगा) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जिल्ह्यातील या भीषण पाणी टंचाईने एका महिलेचा बळी घेतला आहे. वागदरी येथे पाणीटंचाई असल्याने नागरिकांना गावाशेजारी असलेल्या विहिरीतून पाणी आणावे लागते. लाखो रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र, गावातील नागरिकांना त्याचा फायदा झालेला नाही.

वागदरी येथील धोकादायक असलेल्या ४० फूट खोल विहिरीतून पाणी भरावे लागते. या विहिरीला उतरण्यासाठी पायऱ्या नसल्याने पाणी भरत असताना मोठी कसरत करावी लागते. याच विहिरीतून पाणी आणण्यासाठी बुधवारी गेलेल्या कलावती सारणे या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतरही जिल्हा प्रशासन जागे झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड बँक घोटाळा विधानसभेत गाजला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्याचे प्रकरण बुधवारी विधानसभेत गाजले. बँकेचे संचालक मंडळ आणि मोठ्या थकबाकीदारांवर अटकेची कारवाई करण्याची तसेच त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्याची जोरदार मागणी सत्ताधारी भाजप, शिवसेनेच्या सदस्यांसह विरोधी पक्ष नेत्यांनी केली. त्यातच गदारोळ वाढल्याने विधानसभेचे तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी यासंबंधीची लक्षवेधी सूचना राखून ठेवण्याचा निर्णय घेतला.

आमदार सर्वश्री अॅड. लक्ष्मण पवार, अतुल भातखतळकर, भीमराव धोंडे यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शासन कोणत्याही परिस्थितीत बँक घोटाळ्यातील दोषींना पाठीशी घालणार नाही. ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी कारवाई करण्यात येईल. दोषींवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्यात येईल. तसेच उच्च न्यायालयाने या प्रकरणात जामीन नाकारलेल्या व्यक्तिंवर, त्यांच्यावर ज्या कलमान्वये गुन्हे दाखल आहेत, त्याप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना गृहविभागाला देण्यात येतील. थकबाकीदारांची यादी मोठी असल्याने ती विधान सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

या उत्तरावर समाधान न झाल्याने आमदारांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. बड्या थकबाकीदारांची नावे विधानसभेत जाहीर करण्यात यावीत, अशी मागणी आमदार सर्वश्री गुलाबराव देवकर, डॉ. मुंदडा, अतुल भातखळकर, आर. टी. देशमुख, अनिल गोटे, राज पुरोहीत, श्रीमती संगिता ठोंबरे यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी लावून धरली. सध्या तयार करण्यात आलेली यादी ही बँकेच्या सर्व थकबाकीदारांची आहे. यापैकी मोठ्या १० थकबाकीदारांची नावे वेगळी करुन ती पटलावर ठेवली जातील, असे राज्यमंत्री भुसे यांनी सांगितले.

थकबाकीदारांची यादी

राज्यमंत्री भुसे यांनी पटलावर ठेवलेल्या थकबाकीदारांच्या यादीत प्रामुख्याने जगमित्र नागा सहकारी सुतगिरणी (टोकवाडी, ता. परळी), माऊली सहकारी सुतगिरणी (गेवराई), जयभवानी सहकारी साखर कारखाना (गेवराई), गजानन सहकारी साखर कारखाना (राजुरी), अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना (अंबाजोगाई) इत्यादी विविध संस्थांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॉकेल कोट्यात कपातीमुळे विक्रेते- ग्राहकांमध्ये खटके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

एप्रिल महिन्यासाठी शासनाकडून रॉकेलचे नियतन प्राप्त झाले नसल्यामुळे मार्च महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातील घाऊक व अर्धघाऊक परवानाधारकांच्या मंजूर कोट्यात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे विक्रेते व ग्राहकांमध्ये खटके उडत आहेत.

गरिबांच्या दैनंदिन वापरातील रॉकेल हे महत्त्वाचे इंधन आहे. गॅस कनेक्शन व सिलिंडर मिळण्यात अनेक अडचणी येत असल्याने ग्रामीण भागात रॉकेलचा वापर केला जातो. विशेषतः दारिद्र्यरेषेखालील नागरिकांकडून रॉकेलला मागणी असते. यापूर्वी एका कुटुंबाला तीन लिटरच्या आसपास रॉकेल मिळत होते. सध्या रॉकेल टंचाई निर्माण झाल्याने विक्रेते व ग्राहकांमध्ये खटके उडत आहेत. खुलताबाद तालुक्यात ३१ हजार शिधापत्रिकाधारकांना २ लाख १४ हजार लिटर रॉकेलची आवश्यकता आहे. परंतु, केवळ ५० हजार लिटर रॉकेल मिळणार असल्याने ते सर्वांना कसे वाटप करावे, असा प्रश्न विक्रेत्यांसमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणाला पिस्तुलासह अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पिस्तुल विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणारा मंगळवारी रात्री (७ एप्रिल) पकडले. त्याच्याकडून एक पिस्तुल, दोन जिंवत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हे शस्त्र मध्य प्रदेशातून आणले असावे, अशी माहिती तपासात समोर येत आहे.

लासूर स्टेशन येथील सावंगी चौकात एक तरुण पिस्तुल विक्रीच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पी. डी. भारती यांना मिळाली होती. त्यांनी अशोक बडे, नवनाथ कोल्हे, आशिष जमधडे या कर्मचाऱ्यांसह तेथे रात्री दहा वाजता सापळा रचला. संशयित तरुण येताच पोलिसांनी झडप घालून पकडले. त्याचे नाव काकासाहेब दतात्रय शिंदे (वय २३, अगरकानडगाव, ता. गंगापूर), असे आहे.

पोलिस चौकशीत त्याने हे पिस्तुल गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी आजीनाथ उर्फ आज्या ठोंबरे याच्याकडून वीस हजार रुपयांना विकत घेतल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी शिंदेसह ठोंबरे याच्या विरोधात सिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठोंबरे यास काही दिवसांपूर्वी शस्त्र तस्करीप्रकरणी शहर पोलिसांनी अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे, अशी माहिती तपास अधिकारी भारती यांनी दिली. दरम्यान, ही शस्त्रे मध्यप्रदेशातून आणली जात असून अहमदनगर येथील काही आरोपी त्यांची तस्करी करतात, अशी माहिती समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्वयंचलित पिस्तुल

देशी बनावटीचे हे स्वयंचलित पिस्तूल असून ते स‌िल्व्हर रंगाचे आहे. त्याचा बोर अंदाजे ७.६५ एमएम अाहे. हे पिस्तुल वीस हजार रुपयांना तर जप्त केलेले काडतूस प्रत्येकी पाच रुपयांना विकत घेतल्याचे आरोपीने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार उद्योजकांचे दलाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'रेल्वे, सिंचन प्रकल्प, सेझ आणि विद्यापीठांसाठी सरकारने संपादित केलेली लाखो एकर जमीन वापराविना पडून आहे. या जमिनी असताना सरकार पुन्हा भूसंपादन कायद्याखाली शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. जमिनीचा मालक असलेला शेतकरी आणि उद्योजकात थेट करार करा. या व्यवहारात सरकारने दलाल होऊ नये' असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी केले. गांधी भवन येथे बुधवारी (८ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दुष्काळी परिस्थिती आणि नवीन भूसंपादन कायद्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी पाटील म्हणाले, 'शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय जमीन संपादन शक्य नव्हते. नवीन भूसंपादन कायद्याचे समर्थन करताना सरकार बाजारभावानुसार जमिनी घेईल असे म्हटले आहे; मात्र बाजारभाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्याला नाही. उद्योजकांसाठी कवडीमोल दराने जमिनी घेण्याचा सरकारचा डाव आहे. उद्योगासाठी जमीन हवी असल्यास शेतकरी आणि उद्योजकात करार करा. सरकारने दलालीचे काम करू नये. शेती तोट्याचा व्यवसाय झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. व्यसन आणि प्रतिष्ठेपायी शेतकरी आत्महत्या करतो, असे म्हणणे चूक आहे. त्यांना प्रचंड निराशा जेरीस आणत आहे'.

दरम्यान, गोवंश हत्याबंदी कायदा शेतकऱ्यांसाठी हानीकारक आहे. दुधाळ जनावरे सांभाळणे कठीण असताना भाकड जनावरे कोण सांभाळणार, असा प्रश्न आहे. भावनिक मुद्दा टाळून सरकारने व्यावहारिक विचार करावा असेही पाटील म्हणाले. या पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कैलास तवार, श्रीकांत उमरीकर, अॅड. सा. मा. पंडित, जी. पी. कदम, रशीद मौलाना, भाऊसाहेब गायके, मच्छिंद्र गुंड, शिवाजी सोनवणे, विश्वंभर हाके आदी उपस्थित होते.

दिल्लीत मका परिषद

मका उत्पादनाच्या सद्यस्थितीबाबत दिल्लीत 'फिक्की'ने ९ आणि १० एप्रिल रोजी मेझ कॉन्फरन्स (मका परिषद) आयोजित केली आहे. या परिषदेत गुणवंत पाटील हंगरगेकर महाराष्ट्रातील मका उत्पादनावर बोलणार आहेत. क्रांतीकारी संशोधनातून उत्पादन वाढवण्याबाबत मुद्दे मांडणार असल्याचे पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव पाणीपट्टीबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी आणि उच्चभ्रू वसाहतींसाठी एकाच दराने पाणीपट्टी आकारणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी प्लंबर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचा आरोप असोशिएशनने केले आहे.

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. झोपडपट्टीत जे नागरिक नळ कनेक्शन घेऊ इच्छितात त्यांना निवासी वापराच्या नियमीत दराने पट्टी न आकारता कमी दराने पाणीपट्टी आकारावी, असा शासनाचा आदेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याने २ ऑगस्ट २०१० रोजी हा आदेश काढला असून राज्यातील सर्व महापालिकांना या आदेशाच्या अंमलबजावणीची सक्ती केली आहे. परंतु, हा आदेश असतानाही औरंगाबाद महापालिकेने समांतर जलवाहिनी योजनेअंतर्गत शहरातील झोपडपट्टीवासीयांच्या निवासी वापराच्या पाणीपट्टीत वाढ केली आहे. उच्चभ्रू वसाहतीत आकारण्यात येते तेवढी पाणीपट्टी झोपडपट्टीत आकारली जात आहे. हे करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांचे हित लक्षात घेतलेले नाही. समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीचे हित अधिकाऱ्यांनी जोपासले आहे. औरंगाबाद शहरात ५३ घोषित झोपडपट्ट्या आहेत. त्यातून सुमारे चार ते पाच लाख नागरिक राहतात. या सर्वांवर आता जास्तीच्या पाणीपट्टीचा बोजा पडणार आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांची केलेली ही फसवणूकच आहे. त्यामुळे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व कंपनीचे हित जपणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्लंबर असोसिएशनचे पदाधिकारी अशोक खरात देवखेडकर, दिलीप बोर्डे, अब्दुल सलीम अब्दुल रहीम यांची नावे आहेत. या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाच्या प्रती पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त आणि पालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकलठाणा एसटी कार्यशाळेत आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा एसटी कार्यशाळेच्या पेंटिंग विभागात बुधवारी (८ एप्रिल) सकाळी साडे दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत गेल्या तीस वर्षांपासून ठेवलेला सीट फोमचा साठा जळाला. चिकलठाणा कार्यशाळेत सकाळी शॉर्टसर्किंटमूळे आग लागताच तेथील नऊ बसगाड्या त्वरित बाहेर काढण्यात आल्या. ही आग वाढत पेन्ट कम्प्रेसरपासून स्टोअर रूमपर्यंत पोहोचली. आग विझविण्यासाठी अग्निशामक यंत्राचा वापर करण्यात आला. स्टोअर रूममधील फोमपर्यंत आग पसरत असल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशामक दलाला कळविण्यात आले. दोन बंबांनी आग विझवली. एसटी महामंडळाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा व्यवस्थापक चव्हाण यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड, लातूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर/नांदेड

लातूर व नांदेड जिल्ह्यात बुधवारी वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेली लावली. मुखेड तालुक्यात काही घरांवरील पत्रे उडून गेले व झाडे उन्मळून पडली. या पावसामुळे आंब्याचे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात ​हदगाव, बिलोली, ​​देगलूर, कंधार तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली. पावसामुळे ​काही वेळ वीज पुरवठा खंडीत झाला होता. लातूर शहरात बुधवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ‌काहीकाळ नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. दरम्यान, उमरगा तालुक्यातील काही भागात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. रात्र उशिरापर्यंत अवकाळी पावसाच्या सरी कोसळत होत्या. औरंगाबाद शहरात गुरुवारी पावसाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images