Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बंडखोरी शमविण्यासाठी शिवसेना नेत्यांची फिल्डिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीत शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. पालिकेतील गटनेते गजानन बारवाल, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेकांनी अधिकृत उमेदवारांविरुद्ध दंड थोपटले आहेत. या बंडखोरांना थोपविण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. त्यासंदर्भात बुधवारी काही प्रमुख नेत्यांची बैठकही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षा यांची अखेरच्या दिवशी युती झाली. त्यामुळे दोन्हीही पक्षातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना अनेकांनी पक्षाच्या नेत्यांना विचारले नाही. शिवसेनेमध्ये अशा उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या उमेदवारांना थांबविण्याचे मोठे आव्हान शिवसेनेच्या नेत्यांसमोर आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत आहे. त्यामुळे दोन दिवसांत जास्तीतजास्त बंडखोरांना शांत करण्याचे काम शिवसेनेच्या नेत्यांना करावे लागणार आहे. त्याची जबाबदारी कोअर कमिटीच्या सदस्यांवर टाकण्यात आली आहे.

'योग्य' मार्गांचा अवलंब

अर्जांची आज छाननी झाली. त्यामुळे वैध आणि अवैध उमेदवारी अर्ज ठरलेल्या उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. त्यातून बंडखोरांना शोधून त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी भाग पाडले जाणार आहे. त्यासाठी 'आवश्यक' ते मार्ग वापरले जातील अशी माहितीही सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसच निघाला वाळू तस्कर

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, वाळूज

शासनाने वाळू उपसा करण्यावर घातलेले निर्बंध झुगारून पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे अवैध वाळू उपसण्याचा धंदा जोरात सुरू आहे. ही तस्करी दस्तूरखुद्द पोलिस शिपाई करत असल्याने तक्रार करणार कोण? असा प्रश्न होता, मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तस्कारास रंगेहत पकडून थेट गुन्हा दाखल केल्याने परिसरातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

गंगापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करून ती चोरट्या पद्धतीने शहरात विकली जात असल्यची गुप्त माहिती महसूल विभागाकडे आली होती. त्या माहितीच्या आधारे उपजिल्हाधिकारी, प्रशिक्षणार्थी तहसीलदार प्रवीण पवार, (शिंगी, ता.गंगापूर), तलाठी सुधीर पांडे, शिपाई किशोर काळे यांच्या पथकाने आज (८ एप्रिल) रोजी सकाळी नगर-औरंगाबाद महार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली. त्यात गरवारे कंपनीसमोरून ट्रकमधून (एमएच २०-७३४३) चोरटी वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. चालकास पथकाने थांबण्याचा इशारा दिला, मात्र त्याने वाहन न थांबविता वेग वाढवून पळ काढला. यामुळे पथकांचा संशय अधिकच बळावला व त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र त्याचवेळी हा ट्रक पोलिस पथकाच्या ताब्यात जाऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी मागून इंडिगो कारने येऊन (क्र.एमएच १५-बीएन ८७६५) पोलिस शिपाई मोहीयोद्दीन असीफोद्दीन काझी (३६, रा. पोलिस कॉलनी, औरंगाबाद) याने अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा अडथळा झुगारून पथकाने ट्रक चालक लक्ष्मण रघुनाथ आडागळे (३५ रा. उस्मानपुरा) यास मुद्देमाल, ट्रकसह पकडले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या इंडिगो कारमधील पोलिस शिपाई मोहीयोद्दीन असीफोद्दीन काझी यांनी पथकातील अधिकारी, कर्मचारी यांना आरोपीचा व गाडीचा फोटो काढण्यास विरोध करून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे हा सर्व खेळ संबंधित पोलिस शिपायाचाच असल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. तहसीदार पवार यांच्या फिर्यादीवरून वरील दोन्ही आरोंपीच्या विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही आरोंपीना ताब्यात घेतले आहे.

'त्या' घटनेचीही होणार चौकशी?

वाळूज एमआयडीसी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या मदतीने वाळू तस्कारी करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. मागील आठवड्यात वाळू माफीयांनी तीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रक घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानतेने त्यांचा जीव वाचला होता. त्यामुळे परिसरात राज्य कोणाचे असा प्रश्न सर्वसामन्य जनतेला पडला होता. आज एका पोलिसालाच या प्रकरणात अटक झाल्यामुळे मागील प्रकरणांमध्येही त्याचाच हात होता का याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात लाखांचा गुटखा पकडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाचोड येथे बुधवारी (८ एप्रिल) पहाटे गुटखा तस्करांना पकडून जवळपास सात लाख रुपयांचा विविध कंपनीचा गुटखा जप्त केला आहे. हा गुटखा कर्नाटकातील गुलबर्गा येथून औरंगाबादमध्ये विकण्यासाठी आणण्यात येत होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक डी. पी. सरोदे यांना औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून एका वाहनातून गुटखा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पाचोड येथे पैठण चौकात सापळा रचण्यात आला. संशयास्पद जाणाऱ्या एमएच-२०, सीटी ४११३ या क्रमांकाच्या पिकअप व्हॅनची तपासणी केली असता त्यात ७५ गोण्यामध्ये गुटखा सापडला. या गुटख्याची किंमत सहा लाख ९१ हजार रुपये आहे. त्यासोबत चार लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी वाहनाचा चालक सुनील मुकुंद दराडे (रा. सातारा, औरंगाबाद) व सूर्यप्रकाश रामविलास राठी (रा. जवाहर कॉलनी, औरंगाबाद) या दोघांना ताब्यात घेतले आहे. हा गुटखा औरंगाबाद येथील शीतल बाबुलाल बोरा (रा. नाथनगर, जवाहर कॉलनी औरंगाबाद) यांचा असल्याची माहिती या दोघांनी पोलिसांना दिली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी गफार पठाण, संदीप घुनावत व सागर पाटील यांनी सहभाग घेतला होता. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गाडीमालक शेख अफजल शेख अब्दुला (रा. बेरीबाग, हर्सूल, औरंगाबाद) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेदांतनगर (१०३) वॉर्डातून काँग्रेसचा उमेदवार माणिकचंद आसाराम महतोले यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शोभा ठाकूर यांनी अवैध ठरविला. महतोले यांनी अपत्याबाबतचे शपथपत्र सादर केले नसल्याचा आक्षेप याच वॉर्डातील शिवसेनेचे उमेदवार विकास जैन यांनी घेतला होता. छाननीवेळी त्यांच्या अर्जासोबतच शपथपत्र नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा अर्ज बुधवारी सायंकाळी अवैध ठरविण्यात आला.

वेदांतनगर वॉर्ड हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहे. यात ७ उमेदवारांनी ९ अर्ज दाखल केले. यामध्ये शिवसेनेचे जैन, काँग्रेसचे महतोले, राष्ट्रीय समाज पक्षाचे कृष्णा रामनाथ शेळके यांच्यासह अपक्षांचा समावेश आहे.

आयटीआय केंद्रात छाननीदरम्यान जैन यांनी महतोले यांच्या अर्जासोबत अपत्याचे शपथपत्र नसल्याचा आक्षेप घेतला. छाननीदरम्यान त्यांच्या अर्जासोबत संबंधित शपथपत्र नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ठाकूर यांनी महतोले यांचा अर्ज अवैध ठरविला.

सुमित्रा हाळनोरांचा आक्षेप फेटाळला

ज्योतीनगर-दशमेशनगर वॉर्डातून शिवसेनेच्या उमेदवार सुमित्रा गिरीजाराम हाळनोर यांनी काँग्रेसच्या उमेदवार सुनिला सुरेश क्षत्रीय यांच्या नावाबाबत बुधवारी (८ एप्रिल) घेतला आक्षेप फेटाळण्यात आला. सुनिला यांचे नाव मतदारयादीत वेगळे असल्याचा आक्षेप होता. निवडणूक निर्णय अधिकारी शोभा ठाकूर यांनी उमेदवार, त्यांचा फोटो व फोटो आयडी एकाच व्यक्तीचा असल्याने आक्षेप फेटाळला.

मी अपत्याचे मूळ; तसेच झेरॉक्स शपथपत्र अर्जासोबत जोडले होते. त्याची तशी नोंद निवडणूक निर्णय अधिकारी ठाकूर यांच्याकडे आहे. शपथपत्र अर्जासोबत जोडल्यानंतर गहाळ झाले आहे. मी याविरोधात हायकोर्टात जाण्याचा विचार करीत आहे.

- माणिकचंद महतोले, काँग्रेस उमेदवार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नेत्यांच्या बायकांनाच बोलवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'निवडणुकीत तिकीट देण्याची वेळ आल्यावर नेत्यांच्या बायकांनाच प्राधान्य देता, आता त्यांनाच आंदोलनासाठी आणि कार्यक्रमाला बोलवा. आम्ही काय फक्त झेंडे उचलायला आणि मोर्चे काढायलाच आहोत काय,' असा संतप्त सवाल शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या आक्रमक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (८ एप्रिल) समर्थनगर येथील शिवसेना प्रचार कार्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांनी प्रचारावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारांची यादी मंगळवारी (७ एप्रिल) जाहीर करण्यात आली. या यादीत महिला आघाडीच्या एकाही कार्यकर्तीचे नाव नव्हते. त्यामुळे बुधवारी दुपारी महिला आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्या शिवसेनेच्या समर्थनगर येथील प्रचार कार्यालयात पोहोचल्या. जिल्हासंघटक सुनीता आऊलवार, अनिता मंत्री, प्रतिभा जगताप, ज्योती काथार, सुचेता अंबेकर, माधुरी जोशी, नलिनी महाजन, सविता सुराळे, कांता गाडे, शोभा बडे, विणा यादव आदींनी एकदम आक्रमक भूमिका घेतली. या संदर्भात 'मटा' शी बोलताना ज्योती काथार म्हणाल्या, महापालिका निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. शिवसेनेच्या वाट्याला महिलांसाठी आरक्षित झालेल्या वॉर्डांपैकी २५ वॉर्ड आले आहेत. यापैकी काही वॉर्डांमधून महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या, अशी आमची मागणी होती. क्रांतिचौक वॉर्डातून मी आणि ज्योतीनगर वॉर्डातून सुनीता आऊलवार यांनी उमेदवारी मागितली होती, पण आम्हा दोघींनाही डावलण्यात आले. ज्योतीनगर मधून गिरजाराम हळनोर यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. नेत्यांच्या बायकांनाच उमेदवारी मिळणार असेल, तर आम्ही काय फक्त झेंडेच उचलायचे का? महापौर कला ओझा यांना विधानसभेची उमेदवारी दिली, आता महापालिकेचीही उमेदवारी दिली. उमेदवारी देण्यासाठी कला ओझाच पक्षाच्या नेत्यांना दिसत असतील, तर आम्ही काम कशासाठी करायचे? त्यामुळे प्रचारावर बहिष्कार टाकण्याचा विचार आम्ही करीत आहोत. शिवसेनाप्रमुख गेले आणि आमचा आधार गेला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत आमच्या भावना पोहोचू दिल्या जात नाहीत.'

प्रतिभा जगताप म्हणाल्या, 'शिवसेनेतही महिलांवर अन्याय होतो हे आता स्पष्ट झाले आहे. तीस - तीस वर्षांपासून आम्ही शिवसेनेचे काम करीत आहोत. आता आमचा उमेदीचा काळ आहे, त्यामुळे आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे, असे आमचे म्हणणे होते, पण पक्षाच्या नेत्यांनी महिला आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याचे म्हणणे मानले नाही. नेत्यांच्या बायकांनाच तिकिटे दिली गेली. नेत्यांच्या बायकांनाच तिकिटे द्यायची असतील, तर यापुढे त्यांनाच आंदोलनाला, प्रचाराला बोलवा. आमच्या भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचू दिल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत भावना पोहोचाव्यात यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे.'

जिल्हाप्रमुख सामोरे गेले

महिला आघाडीच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे सामोरे गेले. त्यांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढली. न्याय देण्याचे आश्वासन त्यांनी दिले, पण महिला कार्यकर्त्या ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. काहींनी पक्षाकडे दिलेला बायोडाटा जाळून टाकण्याची भूमिका घेतली, पण त्यांना अन्य कार्यकर्त्यांनी थांबवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूल जेलची झडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल मध्यवर्ती कारागृहाची बुधवारी गुन्हेशाखेच्या पथकांनी तीन तास तपासणी केली. बाँब स्क्वॉड, श्वान पथकाच्या मदतीने तब्बल सव्वाशे पोलिसांनी ही सर्च मोहीम राबविली. या मोहिमेत आक्षेपार्ह काहीही आढळून आली नसल्याची माहिती देण्यात आली असून, कारागृह प्रशासनाच्या विनंतीवरून ही शोध मोहीम राबविण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांनी दिली.

नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैद्यांच्या पलायनानंतर राज्यातील कारागृह सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागपूर येथील कारागृहाच्या तपासणीनंतर मोबाइलसह अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्या होत्या. औरंगाबादेतील हर्सूल मध्यवर्ती कारागृह राज्यातील महत्त्वाच्या कारागृहापैकी एक आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता गुन्हे शाखेचा मोठा फौजफाटा कारागृहात दाखल झाला. हर्सूल कारागृहात सध्या १६ बराकीत १६४२ पुरूष व ८३ महिला कैदी आहेत. पोलिसांच्या अकरा पथकांनी या कैद्याच्या सामानाची व बराकींची कसून तपासणी केली. त्याचबरोबर स्वच्छतागृह, हौद, विहीर, नाल्या, कारागृहाचे छत यांचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. या तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह वस्तू पोलिसांना आढळल्या नसल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, एसीपी बाबाराव मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्च मोहीम राबविण्यात आली. यामध्ये पाच पोलिस निरीक्षक, सात पीएसआय व ९४ कर्मचाऱ्यांसह स्थानिक दहशतवादी विरोधी सेल, बाँब स्क्वॉड, श्वान पथक आदींचा समावेश होता.

कर्मचाऱ्यांशी खडाजंगी

पोलिसांचा फौजफाटा कारागृहात शोध मोहिमेसाठी दाखल झाला होता. व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ही मोहीम सुरू करण्यात आली. सुरुवातीला प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पहारेकऱ्यांनी आक्षेप घेत वाद घातला. त्यांची समजूत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढल्यानंतर शोध मोहीमेस सुरुवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकलठाणा एसटी कार्यशाळेत आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा एसटी कार्यशाळेच्या पेंटिंग विभागात बुधवारी (८ एप्रिल) सकाळी साडे दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत गेल्या तीस वर्षांपासून ठेवलेला सीट फोमचा साठा जळाला. चिकलठाणा कार्यशाळेत सकाळी शॉर्टसर्किंटमूळे आग लागताच तेथील नऊ बसगाड्या त्वरित बाहेर काढण्यात आल्या. ही आग वाढत पेन्ट कम्प्रेसरपासून स्टोअर रूमपर्यंत पोहोचली. आग विझविण्यासाठी अग्निशामक यंत्राचा वापर करण्यात आला. स्टोअर रूममधील फोमपर्यंत आग पसरत असल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशामक दलाला कळविण्यात आले. दोन बंबांनी आग विझवली. एसटी महामंडळाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा व्यवस्थापक चव्हाण यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड, लातूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर/नांदेड

लातूर व नांदेड जिल्ह्यात बुधवारी वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेली लावली. मुखेड तालुक्यात काही घरांवरील पत्रे उडून गेले व झाडे उन्मळून पडली. या पावसामुळे आंब्याचे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात ​हदगाव, बिलोली, ​​देगलूर, कंधार तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली. पावसामुळे ​काही वेळ वीज पुरवठा खंडीत झाला होता. लातूर शहरात बुधवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ‌काहीकाळ नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. दरम्यान, उमरगा तालुक्यातील काही भागात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. रात्र उशिरापर्यंत अवकाळी पावसाच्या सरी कोसळत होत्या. औरंगाबाद शहरात गुरुवारी पावसाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडखोरी शमविण्यासाठी शिवसेना नेत्यांची फिल्डिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीत शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. पालिकेतील गटनेते गजानन बारवाल, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेकांनी अधिकृत उमेदवारांविरुद्ध दंड थोपटले आहेत. या बंडखोरांना थोपविण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. त्यासंदर्भात बुधवारी काही प्रमुख नेत्यांची बैठकही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षा यांची अखेरच्या दिवशी युती झाली. त्यामुळे दोन्हीही पक्षातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना अनेकांनी पक्षाच्या नेत्यांना विचारले नाही. शिवसेनेमध्ये अशा उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या उमेदवारांना थांबविण्याचे मोठे आव्हान शिवसेनेच्या नेत्यांसमोर आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत आहे. त्यामुळे दोन दिवसांत जास्तीतजास्त बंडखोरांना शांत करण्याचे काम शिवसेनेच्या नेत्यांना करावे लागणार आहे. त्याची जबाबदारी कोअर कमिटीच्या सदस्यांवर टाकण्यात आली आहे.

'योग्य' मार्गांचा अवलंब

अर्जांची आज छाननी झाली. त्यामुळे वैध आणि अवैध उमेदवारी अर्ज ठरलेल्या उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. त्यातून बंडखोरांना शोधून त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी भाग पाडले जाणार आहे. त्यासाठी 'आवश्यक' ते मार्ग वापरले जातील अशी माहितीही सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसच निघाला वाळू तस्कर

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, वाळूज

शासनाने वाळू उपसा करण्यावर घातलेले निर्बंध झुगारून पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे अवैध वाळू उपसण्याचा धंदा जोरात सुरू आहे. ही तस्करी दस्तूरखुद्द पोलिस शिपाई करत असल्याने तक्रार करणार कोण? असा प्रश्न होता, मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तस्कारास रंगेहत पकडून थेट गुन्हा दाखल केल्याने परिसरातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

गंगापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करून ती चोरट्या पद्धतीने शहरात विकली जात असल्यची गुप्त माहिती महसूल विभागाकडे आली होती. त्या माहितीच्या आधारे उपजिल्हाधिकारी, प्रशिक्षणार्थी तहसीलदार प्रवीण पवार, (शिंगी, ता.गंगापूर), तलाठी सुधीर पांडे, शिपाई किशोर काळे यांच्या पथकाने आज (८ एप्रिल) रोजी सकाळी नगर-औरंगाबाद महार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली. त्यात गरवारे कंपनीसमोरून ट्रकमधून (एमएच २०-७३४३) चोरटी वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. चालकास पथकाने थांबण्याचा इशारा दिला, मात्र त्याने वाहन न थांबविता वेग वाढवून पळ काढला. यामुळे पथकांचा संशय अधिकच बळावला व त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र त्याचवेळी हा ट्रक पोलिस पथकाच्या ताब्यात जाऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी मागून इंडिगो कारने येऊन (क्र.एमएच १५-बीएन ८७६५) पोलिस शिपाई मोहीयोद्दीन असीफोद्दीन काझी (३६, रा. पोलिस कॉलनी, औरंगाबाद) याने अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा अडथळा झुगारून पथकाने ट्रक चालक लक्ष्मण रघुनाथ आडागळे (३५ रा. उस्मानपुरा) यास मुद्देमाल, ट्रकसह पकडले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या इंडिगो कारमधील पोलिस शिपाई मोहीयोद्दीन असीफोद्दीन काझी यांनी पथकातील अधिकारी, कर्मचारी यांना आरोपीचा व गाडीचा फोटो काढण्यास विरोध करून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे हा सर्व खेळ संबंधित पोलिस शिपायाचाच असल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. तहसीदार पवार यांच्या फिर्यादीवरून वरील दोन्ही आरोंपीच्या विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही आरोंपीना ताब्यात घेतले आहे.

'त्या' घटनेचीही होणार चौकशी?

वाळूज एमआयडीसी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या मदतीने वाळू तस्कारी करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. मागील आठवड्यात वाळू माफीयांनी तीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रक घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानतेने त्यांचा जीव वाचला होता. त्यामुळे परिसरात राज्य कोणाचे असा प्रश्न सर्वसामन्य जनतेला पडला होता. आज एका पोलिसालाच या प्रकरणात अटक झाल्यामुळे मागील प्रकरणांमध्येही त्याचाच हात होता का याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात लाखांचा गुटखा पकडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाचोड येथे बुधवारी (८ एप्रिल) पहाटे गुटखा तस्करांना पकडून जवळपास सात लाख रुपयांचा विविध कंपनीचा गुटखा जप्त केला आहे. हा गुटखा कर्नाटकातील गुलबर्गा येथून औरंगाबादमध्ये विकण्यासाठी आणण्यात येत होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक डी. पी. सरोदे यांना औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून एका वाहनातून गुटखा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पाचोड येथे पैठण चौकात सापळा रचण्यात आला. संशयास्पद जाणाऱ्या एमएच-२०, सीटी ४११३ या क्रमांकाच्या पिकअप व्हॅनची तपासणी केली असता त्यात ७५ गोण्यामध्ये गुटखा सापडला. या गुटख्याची किंमत सहा लाख ९१ हजार रुपये आहे. त्यासोबत चार लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी वाहनाचा चालक सुनील मुकुंद दराडे (रा. सातारा, औरंगाबाद) व सूर्यप्रकाश रामविलास राठी (रा. जवाहर कॉलनी, औरंगाबाद) या दोघांना ताब्यात घेतले आहे. हा गुटखा औरंगाबाद येथील शीतल बाबुलाल बोरा (रा. नाथनगर, जवाहर कॉलनी औरंगाबाद) यांचा असल्याची माहिती या दोघांनी पोलिसांना दिली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी गफार पठाण, संदीप घुनावत व सागर पाटील यांनी सहभाग घेतला होता. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गाडीमालक शेख अफजल शेख अब्दुला (रा. बेरीबाग, हर्सूल, औरंगाबाद) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेदांतनगर (१०३) वॉर्डातून काँग्रेसचा उमेदवार माणिकचंद आसाराम महतोले यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शोभा ठाकूर यांनी अवैध ठरविला. महतोले यांनी अपत्याबाबतचे शपथपत्र सादर केले नसल्याचा आक्षेप याच वॉर्डातील शिवसेनेचे उमेदवार विकास जैन यांनी घेतला होता. छाननीवेळी त्यांच्या अर्जासोबतच शपथपत्र नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा अर्ज बुधवारी सायंकाळी अवैध ठरविण्यात आला.

वेदांतनगर वॉर्ड हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहे. यात ७ उमेदवारांनी ९ अर्ज दाखल केले. यामध्ये शिवसेनेचे जैन, काँग्रेसचे महतोले, राष्ट्रीय समाज पक्षाचे कृष्णा रामनाथ शेळके यांच्यासह अपक्षांचा समावेश आहे.

आयटीआय केंद्रात छाननीदरम्यान जैन यांनी महतोले यांच्या अर्जासोबत अपत्याचे शपथपत्र नसल्याचा आक्षेप घेतला. छाननीदरम्यान त्यांच्या अर्जासोबत संबंधित शपथपत्र नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ठाकूर यांनी महतोले यांचा अर्ज अवैध ठरविला.

सुमित्रा हाळनोरांचा आक्षेप फेटाळला

ज्योतीनगर-दशमेशनगर वॉर्डातून शिवसेनेच्या उमेदवार सुमित्रा गिरीजाराम हाळनोर यांनी काँग्रेसच्या उमेदवार सुनिला सुरेश क्षत्रीय यांच्या नावाबाबत बुधवारी (८ एप्रिल) घेतला आक्षेप फेटाळण्यात आला. सुनिला यांचे नाव मतदारयादीत वेगळे असल्याचा आक्षेप होता. निवडणूक निर्णय अधिकारी शोभा ठाकूर यांनी उमेदवार, त्यांचा फोटो व फोटो आयडी एकाच व्यक्तीचा असल्याने आक्षेप फेटाळला.

मी अपत्याचे मूळ; तसेच झेरॉक्स शपथपत्र अर्जासोबत जोडले होते. त्याची तशी नोंद निवडणूक निर्णय अधिकारी ठाकूर यांच्याकडे आहे. शपथपत्र अर्जासोबत जोडल्यानंतर गहाळ झाले आहे. मी याविरोधात हायकोर्टात जाण्याचा विचार करीत आहे.

- माणिकचंद महतोले, काँग्रेस उमेदवार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूल जेलची झडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल मध्यवर्ती कारागृहाची बुधवारी गुन्हेशाखेच्या पथकांनी तीन तास तपासणी केली. बाँब स्क्वॉड, श्वान पथकाच्या मदतीने तब्बल सव्वाशे पोलिसांनी ही सर्च मोहीम राबविली. या मोहिमेत आक्षेपार्ह काहीही आढळून आली नसल्याची माहिती देण्यात आली असून, कारागृह प्रशासनाच्या विनंतीवरून ही शोध मोहीम राबविण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांनी दिली.

नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैद्यांच्या पलायनानंतर राज्यातील कारागृह सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागपूर येथील कारागृहाच्या तपासणीनंतर मोबाइलसह अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्या होत्या. औरंगाबादेतील हर्सूल मध्यवर्ती कारागृह राज्यातील महत्त्वाच्या कारागृहापैकी एक आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता गुन्हे शाखेचा मोठा फौजफाटा कारागृहात दाखल झाला. हर्सूल कारागृहात सध्या १६ बराकीत १६४२ पुरूष व ८३ महिला कैदी आहेत. पोलिसांच्या अकरा पथकांनी या कैद्याच्या सामानाची व बराकींची कसून तपासणी केली. त्याचबरोबर स्वच्छतागृह, हौद, विहीर, नाल्या, कारागृहाचे छत यांचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. या तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह वस्तू पोलिसांना आढळल्या नसल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, एसीपी बाबाराव मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्च मोहीम राबविण्यात आली. यामध्ये पाच पोलिस निरीक्षक, सात पीएसआय व ९४ कर्मचाऱ्यांसह स्थानिक दहशतवादी विरोधी सेल, बाँब स्क्वॉड, श्वान पथक आदींचा समावेश होता.

कर्मचाऱ्यांशी खडाजंगी

पोलिसांचा फौजफाटा कारागृहात शोध मोहिमेसाठी दाखल झाला होता. व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ही मोहीम सुरू करण्यात आली. सुरुवातीला प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पहारेकऱ्यांनी आक्षेप घेत वाद घातला. त्यांची समजूत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढल्यानंतर शोध मोहीमेस सुरुवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'अवकाळी'चा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

निलंगा तालुक्याला गुरुवारी दुपारी वादळी वारे आणि पावसाने झोडपून काढले. याचवेळी वीज पडल्याने शिवणी कोतल येथील एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. त्यासोबतच तालुक्यातील आठ जनावरे दगावली आहेत.

दत्तु यशवंत कोरे (वय ६५, रा. कोतल शिवणी ता. निलंगा) असे मयताचे नाव आहे. अशोक दत्तु कोरे हा भाजल्याने जखमी झाला आहे. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास निलंगा तालुक्याला वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसासोबतच वीज पडल्याने निलंगा तालुक्यातील पशुधनाचे मोठे नुकसान झाल आहे. शिवणी कोतलमध्ये वीज पडल्याने दत्तु कोरे यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा अशोक हा जखमी झाला आहे. त्यासोबतच कोरे कुटुंबाचे दोन बैल जागीच ठार झाले, अशी माहिती निलंगा तहसील कार्यालयाचे कर्मचारी डी. एन मस्के यांनी दिली.

त्यासोबतच वीज कोसळल्याने निलंगा शहरा लगतच्या सुरेश श्रीमंत माने यांच्या गोठ्यातील म्हैस, हडगा येथील भागवत विश्वनाथ क्षीरसागर याच्या शेतातील गोठ्यात बांधलेली गाय, सस मुगाव येथील जीवन सोपान कोळेकर यांचा एक बैल, उमेश बंडु धुमाल यांची एक म्हैस, शेडूळ येथील मकबुल हसन शेख यांची म्हैस, दाबका येथील भगवान सबनीस यांचा बैल दगावला आहे. शिवणी कोतलमध्ये पावसाळ्यापेक्षाही जास्त पाऊस अवघ्या दोन तासांत झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या घटनाचे पंचनामे करण्यासाठी मंडळ निरीक्षक आणि तलाठी घटनास्थळी गेले आहेत.

बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस

बीड जिल्ह्यात गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने ठिकठिकाणी पाणी साठले आहे. जिल्ह्यात पाऊस पडल्याने आंब्याचे व भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले.

उस्मानाबाद जिल्ह्यात रिमझिम

उस्मानाबाद जिल्ह्यातील उपळा पाटीजवळ गुरुवारी सायंकाळी रिमझिम पाऊस झाला. त्यासोबतच येरमाळा येथे वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. तर उमरगा तालुक्यातील
येणेगूर, दाळींब परिसरात मेघ गर्जेनेसह पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद शहरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. सुमारे तासभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यातच वीज गेल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले आहे. उस्माना‌बाद परिसरातील काही गावात गारपीट झाली आहे. त्यासोबतच भूम, वाशी तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीसाठ्यात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळ आहे. पाणीसाठा प्रचंड खालावला आहे. त्यामुळे काही स्वयंसेवी संस्था आणि उद्योजक संघटनांनी एकत्र येऊन गेल्या वर्षी तुषार समृद्धी योजना राबविली होती. त्यामुळे अजूनही विहिरीत पाणी आहे. पुढील तीन वर्षांत या उपक्रमाचा चांगला उपयोग पाहावयास मिळेल, अशी माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

'कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज' (सीआयआय) औरंगाबाद चॅप्टर, एसपीएमईएसएम संस्था, आयएलएफएस आणि फोर्ब्स फाउंडेशन यांनी एकत्र येऊन गेल्या वर्षी दुधना नदीवर सेलूद ते चारठा या दरम्यान पाच कोल्हापुरी बंधाऱ्यांचे खोलीकरण आणि पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले. या उपक्रमाला 'तुषार समृद्धी' असे नाव देण्यात आले आहे. या उपक्रमासाठी शहर व परिसरातील उद्योगांनी सामाजिक दायित्व निधी दिला. या उपक्रमाचा लाभ यावर्षी दिसून येत आहे. पुढील तीन वर्षांत दुधना नदीचे पुनरूज्जीवन पूर्ण होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. सीआयआयचे अध्यक्ष श्रीराम नारायणन, समन्वयक प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष संदीप नागोरी, 'आयएलएफएस'चे राजीव आहेल, योगेश कापसे, मालू भार्गव, 'एसपीएमईएसएम'चे डॉ. प्रसन्ना पाटील, सुहास अजगावकर यावेळी उपस्थित होते.

दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी खोलीकरण केले गेले. यावर्षी लाडसावंगी आणि हातमाळी या दोन गावांना फायदा होणार आहे. या कामातून २४.४२ दशलक्ष लिटर पाणीसाठा अपेक्षित आहे, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ZPत हाणामारी, चौकशी गुलदस्त्यात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी अरूण गावंडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यासाठी सीइओ डॉ. अभिजित चौधरी यांनी एक सदस्यीय समिती नेमली होती. या घटनेला दहा दिवस उलटून गेले तरीही समितीचा अहवाल सीइओ कार्यालयाला मिळालेला नाही. प्रत्यक्षदर्शी माहिती देण्यासाठी पुढे येत नसल्याने अहवाल तयार झालेला नाही, अशी माहिती मिळाली आहे.

बांधकाम विभागातील कर्मचारी अरूण गावंडे यांना ३१ मार्च रोजी दुपारी जिल्हा परिषद सदस्य नंदा काळे यांनी मारहाण केली होती. तीन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडल्याचा संताप अनावर होऊन काळे यांनी मारहाण केली. या घटनेचे जिल्हा परिषदेत तीव्र पडसाद उमटले होते. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. राजकीय दबाव आल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले नाही. प्रशासनाच्या बाजूने सीइओ चौधरी यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बावीस्कर यांची एक सदस्यीय समिती नेमली होती. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बावीस्कर यांनी ३१ मार्च रोजी दुपारी मारहाण झाली त्यावेळी कार्यालयातील किती कर्मचारी उपस्थित होते, याची माहिती घेतली. जबाब नोंदविण्याचे काम सुरू केल्यानंतर प्रत्यक्षदर्शींपैकी अनेकांनी माहिती देण्यासाठी असमर्थता दर्शविली. त्यामुळे दहा दिवस उलटून गेले तरी चौकशी अहवाल तयार झालेला नाही. भरदिवसा एखाद्या कर्मचाऱ्याला कार्यालयात येऊन मारहाण होते आणि ते पाहिलेले कर्मचारी जबाब देण्यास पुढे येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रत्यक्ष पाहिलेल्या घटनेविषयी एवढी अनास्था असेल तर सर्वसामान्यांची कामे कशी पूर्ण होत असतील असा सवाल उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धिविनायक धावला मदतीला!

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद,

मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांना पाणीटंचाई निवारणासाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. मराठवाडा, विदर्भातील पाणीटंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातंर्गत विविध कामांसाठी ही मदत देण्यात आली आहे.

औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर तसेच नागपूर विभागातील नागपूर, अकोला, बुलढाणा, वर्धा या चार जिल्ह्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.

गुरूवारी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये श्री सिद्धिविनायक गणपती मंदीर न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र मुरारी राणे व विश्वस्त हरीश मारोतीराव सणस यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. न्यासातर्फे राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये याप्रमाणे टप्प्या टप्प्याने अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याचे मंदिर न्यासाचे राणे यांनी सांगितले. औरंगाबादचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार, लातूरचे जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांनी तर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून संतोषकुमार देशमुख, के.ए. तडवी, प्रमोदसिंह दुबे, के.बी.बहुरे, डी.पी. मरळे, गजानन कडू, बजरंग बनसोडे यांनी धनादेश स्वीकारले.

यावेळी प्रकाश महाजन (महापालिका आयुक्त), जितेंद्र पापळकर (उपायुक्त, महसूल), विजयकुमार फड (उपायुक्त, सामान्य प्रशासन), व्ही.आर. रेणापूरकर (कृषी अधिकारी, रोहयो) तसेच मंदिर न्यासाचे कर्मचारी धोंडीराम आरोले व गणेश डापके उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ नव्या नगरपंचायती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या अनेक दिवसांपासून नगरविकास खात्याच्या आदेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या १२ नगरपंचायतींना अखेर नगरविकास खात्याने मान्यता दिली असून याबाबत नुकतेच आदेश काढण्यात आले आहेत.

मराठवाड्यात एकूण ५४ नगरपालिका व ३ नगर पंचायती आहेत. वाढते शहरीकरण व लोकसंख्या लक्षात घेता, विभागातील २२ ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यात यावा, असा शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यावर शासनाने अभ्यास करून १२ ग्रामपंयातींना नगरपंचायतींचा दर्जा देण्याचा आदेश काढला आहे. प्रस्तावावर २०१४ मध्ये नगरविकास खात्याने अधिसूचना काढून त्याबाबतचे आक्षेपही मागवण्यात आले होते, मात्र यापैकी मार्च महिन्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील फक्त सोयगाव तालुक्याच्या नगरपंचायतीचे आदेश काढण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित नगरपंयाचती केव्हा होणार याची प्रतिक्षा होती. आता विभागाच्या आदेशानंतर आता १२ नगरपंचायतींचा मार्ग मोकळा झाला आहे.

१० हजार ते २५ हजारच्या आत शहराची लोकसंख्या असल्यास नगर पंचायती स्थापन केल्या जातात. मराठवाड्यात सध्या तीन नगरपंचायती आहेत यामध्ये अर्धापूर, केज आणि माहूरचा समावेश आहे. तर मंठा, जाफराबाद, शेणगाव, औढा, रेणापुर, लोहारा, वाशी हिमायतनगर, नायगाव आणि फुलंब्री या तालुक्यातील ग्रामपंचायती नगर पंचायती होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांसाठी ७२ लाख

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, सातारा

गेल्या अनेक वर्षांपासून खाचखळगे व चिखलमय रस्त्यांमुळे त्रस्त असलेल्या सातारा-देवळाईतील नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. नगरपालिका हद्दीतील ८ रस्त्यांच्या कामाला प्रशासनाची मान्यता मिळाली आहे. लवकरच या रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवातही होणार आहे. या कामासाठी ९० लाख रुपये खर्च येणार आहे. रस्त्यांच्या कामासोबतच एका सामाजिक सभागृहाचेही काम केले जाणार आहे.

सातारा-देवळाईत अनेक ठिकाणी रस्ते नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत असत. पावसाळ्यात सर्वत्र चिखल होत असल्यामुळे चालणे व गाडी चालवणे अवघड होते. हा भाग ग्रामपंचायतीत येत असल्यामुळे निधी कमी मिळत होता. त्यामुळे खर्चालाही मर्यादा येत होत्या. आता सातारा-देवळाई हा भाग नगरपालिका झाल्यामुळे नगरपालिकेसाठीचा असलेला निधी मिळणार आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महा‌अभियान (जिल्हास्तर) अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून ८ रस्ते व एक सामाजिक सभागृह बांधण्यासाठी नगरपालिकेला ७२ लाख रूपये मिळाले आहेत. यात २० टक्क्यांप्रमाणे १८ लाख रूपयांचा वाटा नगरपालिकेला उचलावा लागणार आहे. ९ रस्ते व सामाजिक सभागृहासाठी एकूण ९० लाख रूपये खर्च येणार आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून निविदा प्रकिया झाल्यावर लगेचच कामांनाही सुरुवात होणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळावा यासाठी आमदार संजय शिरसाठ प्रयत्न केले. तर कामांसाठी जि. प. सदस्य योगिता रमेश बाहुले व अनिता राजेंद्र राठोड यांनी पाठपुरावा केला. नजिकच्या काळात नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, मात्र त्यापूर्वीच रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.

नाईकनगरमध्ये सभागृह

सातारा-देवळाईतील ८ प्रमुख रस्त्यांच्या कामासह नाईकनगर येथील सामाजिक सभागृहाच्या कामांलाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. रस्त्यांच्या कामासोबतच या कामाचाही निधी नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. दहा लाख रुपये खर्च या सभागृहासाठी अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपर बदलून परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या पदवी परीक्षेत बी.कॉमच्या तृतीय वर्षाचा पेपर फुटल्याची घटना घडली. गुरुवारी (९ एप्रिल) 'अप्रत्यक्ष कर' विषयाचा पेपर बुधवारीच विद्यार्थ्यांकडे होता. सकाळी ही बाब समजताच प्रश्नपत्रिका बदलत परीक्षा घेण्यात आली. विद्यापीठाच्या कारभारामुळे परीक्षार्थींना फटका बसला अन् अर्धातास उशीराने पेपर सुरू झाला. या प्रकारानंतर
प्रशासन 'काही घडलेच नाही' अशा अविर्भावात होते.

विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सध्या परीक्षा सुरू आहे. यात गुरुवारी बी.कॉम तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रातील 'अप्रत्यक्ष कर' विषयाचा पेपर सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार होता, परंतु आदल्या दिवशीच रात्री उशीरापासून ते परीक्षा सुरू होण्याच्या आधीच विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिका आली होती. अनेकांकडे वॉटस्अॅपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फिरत होती. विद्यापीठ प्रशासनाला पेपर सुरू होण्यापूर्वी ही बाब समजली. यानंतर प्रश्नपत्रिकेचा दुसरा तयार असलेला सेट परीक्षा केंद्रावर पाठविण्यात आला. तोपर्यंत कॉलेज अन् परीक्षार्थींची धांदल उडाली होती. या सगळ्या प्रक्रियेला सकाळचे ९.३० वाजले. यानंतर विद्यार्थ्यांचा पेपर घेण्यात आला. परीक्षा झाली परंतु प्रश्नपत्रिका बदलण्यात आली. या पेपरसाठी ४ हजार ३३३ विद्यार्थी बसले होते.

बी.कॉमचा पेपर फुटल्याचा प्रकार घडल्यानंतरही प्रशासन मात्र 'काही घडलेच नाही' अशा अविर्भावात वावरत होते. इंजिनीअरिंग पेपरफुटीनंतर पुन्हा हा एक पेपरफुटीचा प्रकार घडला. विशेष म्हणजे प्रश्नपत्रिकेच्या छायांकितप्रतीच बुधवारी रात्री विद्यार्थ्यांकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढा प्रकार झाल्यानंतरही पेपर फुटला नसल्याचे विद्यापीठ परीक्षा विभागातील अधिकारी सांगत आहेत. तर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे सध्या दौऱ्यावर असल्याने ते आल्यानंतर त्यांच्यासमोर हा विषय ठेवला जाणार असल्याचे परीक्षा नियंत्रकांनी सांगितले.

आंदोलन

वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घ्या, अशी मागणी करत मुख्य इमारतीत गुरुवारी ठिय्या मांडला. आंदोलनाला एसएफआयचे समर्थन होते. तर यापूर्वी भाविसेने परीक्षा पुढे ढकला अशा प्रकारचा मुद्दा रेटला आहे. दोन्ही संघटनांच्या वादामुळे विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे. विद्यापीठ विभागांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे नियमानुसार सत्रातील ९० दिवसांचे वर्ग झाले नसल्याने परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी करत भाविसेनेच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला दोनशे विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरींचे निवेदन दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live

Latest Images