Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मलमपट्टीनंतरही फुटभर खड्डे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोंढा नाका चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या शेजारून करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावर अक्षरशः एकेक फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. कंत्राटदाराने उड्डाणपुलाशेजारील साइडपट्टीचे डांबरीकरण केले, मात्र या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. या ठिकाणी दररोज किमान दहा अपघात होत आहेत.

मोंढा नाका उड्डाणपुलाच्या दक्षिणेकडील बाजूने आकाशवाणीकडून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी रस्ता केला आहे. पाच फुटांचा हा रस्ता सुरुवातीपासूनच अरूंद आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) महापालिकेला सांगूनही या रस्त्यावरील अतिक्रमणे हटलेली नाहीत. त्यात अॅपेरिक्षा कुठेही आणि कशाही उभ्या राहतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी नेहमीच ट्रॅफिक जॅम होते. मोंढा चौकापासून अमरप्रीत हॉटेलकडे येताना तसेच सिंचन भवनाच्या जवळ जिथे उड्डाणपूल सुरू होतो. त्याठिकाणी कायम ही समस्या आहे. मध्यंतरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलिस उभा करण्यात आला होता, पण आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती आहे.

सर्व वाहने या साइडपट्टीच्या रस्त्यावरून जात असल्याने रस्ता वारंवार उखडला. त्याची मलमपट्टी केली गेली, पण गेल्या महिनाभरापासून दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कुशलनगरच्या रस्त्यालगत एक फुटाचे चार मोठे खड्डे या छोट्या रस्त्यावर पडले आहेत. त्यात कायम पाणी साचून राहते. उड्डाणपुलालगत असलेल्या रस्त्यावर तीन दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. पण हे खड्डे बुजविण्यासाठी काहीच पावले उचलली गेली नाहीत. भरधाव येणारी वाहने खड्डा पाहून हळू होतात. मागच्या वाहनांना त्याची कल्पना येत नाही आणि एकमेकावर वाहने आदळण्याचे प्रमाण वाढले आहे. या खड्ड्यांजवळ दररोज किमान दहा अपघात होत असल्याचे आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.

उड्डाणपूल कार्यान्वित होईपर्यंत साइडपट्ट्यांचे मजबुतीकरण करण्याचे कंत्राटादाराला सांगितले होते. त्यानुसार डांबरीकरण केले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत तत्काळ सांगून कार्यवाही केली जाईल.

- उदय भरडे, उपअभियंता, एमएसआरडीसी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरजूंसाठी जेएनईसी कॉर्पस फंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिक अडचणीमुळे एखाद्या विद्यार्थ्याला अभियांत्रिकीचे शिक्षण सोडावे लागू नये, यासाठी जेएनईसीचे माजी विद्यार्थी सरसावले आहेत. त्यांनी 'जेएनईसी कॉर्पस फंड' नावाचा उपक्रम सुरू केला असून, देशातील ख्यातनाम उद्योजक, कॉलेजचे माजी विद्यार्थी जेपी ग्रुपचे व्यवस्थापकिय संचालक सुरेश जैन यांनी या उपक्रमासाठी २५ लाखांचा फंड दिला आहे.

आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो, त्या कॉलेजचे ऋण फेडता यावे या भावनेतून जवाहरलाल नेहरू इंजिनीअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत. त्यासाठी जेएनईसी कॉर्पस फंड उभारला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. त्यामुळे कॉलेजच्या एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये, या भावनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. यासाठी देशातील प्रसिद्ध उद्योजक व कॉलेजचे माजी विद्यार्थी सुरेश जैन पुढे आले. त्यांनी रविवारी या उपक्रमाची घोषणा केली. तसेच उपक्रमासाठी २५ लाख रुपये देत असल्याचे जाहीर केले. यावेळी प्राचार्य डॉ. सुधीर देशमुख, रणजीत कक्कड, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. आर. आर. देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी उद्योजक सुरेश जैन म्हणाले, 'वीस वर्षापूर्वीचे अभियांत्रिकीचे शिक्षण आणि आजचे शिक्षण यात मोठा बदल झाला आहे. पूर्वी इतक्या सुविधा नव्हत्या, परंतु शिक्षकांनी त्या गोष्टींची उणीव भासू दिली नाही. आज एवढ्या वर्षानंतर कॉलेजमध्ये आल्याचा आनंद वाटतो. आज अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकाचा वाटा अधिक असावा.'

कोणाचीही गुणवत्ता आणि शिक्षण आर्थिक अडचणीमुळे मागे राहता कामा नये. यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अशा विद्यार्थ्यांची निवड कॉलेज प्रशासनच करेल. आज तरुणांना चांगल्या संधी उपलब्ध होण्यासाठी उद्योग आणि कॉलेज यांच्यातील इंटरअॅक्शन वाढणे महत्त्वाचे आहे.

- सुरेश जैन, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ वाघांनी अन्नपाणी सोडले

$
0
0

उन्मेष देशपांडे, औरंगाबाद

प्रदीर्घ सहवासानंतर कुणाचीही ताटातूट झाली, तर काही दिवस जीवाला चैन पडत नाही. हीच भावना प्राण्यांमध्येही आहे. मुके प्राणी ही भावना आपापल्या परीने व्यक्त करतात. औरंगाबाद पालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील दोन वाघांना शनिवारी रात्री पुण्याला हलविल्यापासून बारा वाघांनी अन्नपाणी सोडून दिले आहे. पोट रिकामे असल्याने या व्याकुळल्या जीवांची हालचालही मंदावली आहे.

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात चार पांढरे आणि दहा पिवळे वाघ होते. काही दिवसांपूर्वी सेंट्रल झू ऑथॅरिटीच्या पथकाने 'एका प्राणिसंग्रहालयात इतके वाघ ठेवता कसे,' असा सवाल करीत काही वाघ हलविण्याची सूचना केली. त्यानुसार महापालिकेने वाघांची माहिती जाहीर केली. पुण्याच्या प्राणिसंग्रहालयाने दोन वाघांची मागणी नोंदवली. त्यानुसार शनिवारी सायंकाळी 'कैफ' हा पांढरा वाघ आणि 'रिद्धी' ही पिवळी वाघीण पुण्याला रवाना करण्यात आली. या दोन वाघांच्या मोबदल्यात औरंगाबाद महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाला पुण्याच्या प्राणिसंग्रहालयातून दोन मरतुकडे कोल्हे मिळाले आहेत. 'कैफ' आणि 'रिद्धी' पुण्याला रवाना झाले आणि इकडे अन्य वाघांनी अन्नपाणी सोडले.

प्राणिसंग्रहालयात चार पांढरे वाघ आहेत. त्यापैकी 'कैफ' एक होता. दहा पिवळ्या वाघांपैकी 'रिद्धी' एक होती. या दोघांना पुण्याच्या पथकाच्या हवाली करण्यासाठी त्यांच्या पिंजऱ्यात छोटे पिंजरे नेण्यात आले. तेव्हा सर्वच वाघांच्या डोळ्यात अनामिक भीती निर्माण झाली. कैफ आणि रिध्दीला कसेबसे त्या पिंजऱ्यात बसवल्यावर पिंजरे बाहेर काढण्यात आले आणि तेव्हापासून प्राणिसंग्रहालयात शिल्लक राहिलेल्या वाघांनी हाय खाल्ली. त्यांनी अन्नपाणी सोडून दिले आहे. एरवी पिंजऱ्याच्या आवारात मुक्तपणे संचार करणारे, एकमेकांशी दंगामस्ती करणारे वाघ काल संध्याकाळपासून सुस्त झाले आहेत. पिंजऱ्याच्या एका कोपऱ्यात शून्यात नजर खिळवून ठेवत, हे वाघ शांतपणे बसले आहेत. प्राणिसंग्रहालयात सध्या तीन पांढरे आणि नऊ पिवळे वाघ आहेत. या सगळ्यांची अवस्था काल सायंकाळपासून सारखीच झाली आहे. अजून दोन-तीन दिवस अशीच स्थिती राहील. त्यानंतर ते 'नॉर्मल' होतील, असा अंदाज केअरटेकर वर्तवत आहेत.

'कैफ' आणि 'रिद्धी'ची काळजी घेणाऱ्या मोहमद जिया यांनाही कालपासून अन्न गोड लागेना, झोप येईना. 'मटा' शी बोलताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ते म्हणाले, 'कैफचा जन्म (२००४) याच प्राणिसंग्रहालयात झाला. लहान मुलाला बाटलीने दूध पाजावे, तसे मी कैफला दूध पाजले. त्याला तरतरी आणण्यासाठी प्रोटीन दिले. प्रसंगी मांसाचा खीमा खाऊ घातला. कैफ आणि रिद्धीची (जन्म २०११) शरीरयष्टी फारच मजबूत होती. नुसता आवाज दिला, तर ते आवाजाच्या दिशेने धावत यायचे. दोघांनाही अंगाखांद्यावर खेळवावे तसे खेळवले. आता ते दोघेही गेले. त्यामुळे कालपासून मन लागत नाही. काय करावे सुचत नाही.'

धडधाकट गुड्डूही गेला

औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयातून गेल्यावर्षी गुड्डू या वाघाला मध्यप्रदेशातील एका प्राणिसंग्रहालयासाठी नेण्यात आले. गुड्डू अंगाने धडधाकट होता, पण त्याला नेण्यासाठी आणलेला पिंजरा तुलनेने लहान होता. मध्यप्रदेशात जाईपर्यंत अंगाला पिंजरा घासून-घासून त्याला जखमा झाल्या. दोन-तीन दिवसांतच तो हे जग सोडून गेला. प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी आजही गुड्डूची आठवण आल्यावर गहिवरतात.

अजून दोन वाघ जाणार

प्राणिसंग्रहालयातील नऊ पिवळ्या वाघांपैकी दोन पिवळे वाघ येत्या काही महिन्यांत मध्यप्रदेशातील रिता प्राणिसंग्रहालयासाठी पाठवले जाणार आहेत. या वाघांच्या बदल्यात रिता प्राणिसंग्रहालयातून कोणते प्राणी मिळणार, हे स्पष्ट झाले नाही. 'आम्ही दोन वाघ देतो. भविष्यात आम्हाला कोणत्या प्राण्याची गरज पडली, तर तुम्ही ते प्राणी द्या,' असा तोंडी करार पालिका त्या प्राणिसंग्रहालयाबरोबर करणार आहे.

बछडे दुरावले

पुण्याच्या प्राणिसंग्रहालयात नेण्यात आलेल्या रिध्दी या वाघिणीने काही महिन्यांपूर्वी दोन बछड्यांना जन्म दिला. आईशिवाय राहण्याएवढे ते मोठे झालेले नाहीत. आईच्या छायेत हे दोन्ही बछडे पिंजऱ्यात बागडत होते. अधिकाऱ्यांनी रिध्दीला पुण्याला पाठवले आणि बछडे आईपासून दुरावले. कालपासून त्यांची अवस्था पाहवत नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आईच्या शोधात हे बछडे स्वतःला विसरून गेले आहेत.

दैनंदिन सहवास संपल्यास वन्यप्राणी बैचैन होतात. वाघ हा प्राणीसुद्धा सहवासप्रिय असल्यामुळे आपले सहकारी दूर गेल्याने त्यांनी अन्नपाणी सोडले असावे. पुढील चार दिवस अशीच स्थिती राहील आणि वाघ पूर्वपदावर येण्यास किमान आठ दिवस लागतील.

- आर. एन. नागापूरकर; वन्यजीव अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७३ तालुक्यांना अवकाळी फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्याला शनिवारी अवकाळी पावसाने झोडपले. उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ तालुके वगळता विभागातील सर्व तालुक्यांमध्ये रविवारी सकाळपर्यंत पावसाची सरासरी १०.८२ मिलिमीटर इतकी नोंदली गेली. यामध्ये सर्वाधिक १५.८५ मि.मी. नांदेड, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वांत कमी १.१५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

मराठवाड्यात गेल्या तीन महिन्यांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. शनिवारी दुपारपासूनच वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात १२.५२, जालना ९.६७, परभणी १५.८३, हिंगोली १०.७०, नांदेड १५.८५, बीड १३.८७, लातूर ६.९६ तर उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वांत कमी १.१५ मि.मी. पावसाची नोंद झाली. अवकाळीच्या या सरींमुळे पिके व फळबागांना फटका बसला आहे.

पालममध्ये ४१ मि.मी.

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात सर्वाधिक ४१ मि.मी. पाऊस झाला. तर जिल्ह्यातील गंगाखेड २९.५०, सोनपेठ ३८.५० या तालुक्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये १० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनीला गंडा घालणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट कागदपत्रे सादर करून इंदोर येथील फायनान्स कंपनीला एक कोटी चोवीस लाखांचा गंडा घालणाऱ्या संतोष जैस्वाल याला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्या विरुध्द सिडको पोलिस ठाण्यात ३१ जुलै २०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सिडकोतील एडमिनम फायनान्स कंपनीमध्ये एजंट असलेल्या संतोष जैस्वाल (रा. एन सात, सिडको) याने बनावट कागदपत्रे तसेच बनावट कर्जधारक सादर केले होते. या कंपनीतून ८० वाहनांवर जैस्वाल याने एक कोटी चोवीस लाखांचे कर्ज घेतले होते. यानंतर जैस्वाल पसार झाला होता. शहरात असूनही जैस्वाल पोलिसांना चकवा देत होता. दोन दिवसापूर्वी जैस्वालला गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी पीएसआय सुभाष खंडागळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलामुळे वळवलेली वाहतूक ठरतेय घातक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुराणानगर-बसय्यैनगर परिसरामधील नागरिक सध्या वाहतुकीची गर्दी व खराब रस्त्यांमुळे मेटाकुटीला आले आहेत. उड्डाणपुलामुळे वळवलेली वाहतूक, रस्त्यांची लागलेली वाट आणि पाणीपुरवठ्याची अनियमितता डोकेदुखी ठरत आहे. वॉर्डात उद्यान, मंदिरे, सभागृह असल्याने लोकांचे मन रमते. पाणी, वीज आणि ड्रेनेजची इतर अनेक कामे या भागात झाली आहेत, असे मत मटाच्या 'कट्टा मीटिंग'मध्ये येथील नागरिकांनी व्यक्त केले.

नव्या औरंगाबादमध्ये ज्या चकाचक असलेल्या वॉर्डांचा नेहमी उल्लेख केला जातो, त्यात सुराणानगर-बसय्यैनगरचा समावेश आहे. नव्या वॉर्डरचनेनुसार वॉर्ड क्रमांक ६५ म्हणून या वॉर्डाला गणले जाते. सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या या वॉर्डामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या रस्ते व वळवलेल्या वाहतुकीची आहे. वॉर्डात केवळ अर्धा तास पाणी येते. पाण्याच्या वेळा निश्चित असल्या तरी अनेक वेळा नागरिक त्रस्तच असतात. शहरातील नागरिकांना महापालिका प्रशासन 'समांतर' नावाचे गाजर गेल्या काही वर्षांपासून दाखवित आहे. यासाठी वाढीव पाणीपट्टीही वसूल करण्यात येते, मात्र याचा सर्वसामान्य नागरिकांना उपयोग होत नाही. कमी दाबाने पाणी येतच असते. नव्या वॉर्डातील शौर्य व इतर संस्थांनी या वॉर्डात वृक्षसंवर्धन आणि संस्कृतीसंवर्धनाबाबत कामे केली आहेत. वळवलेली वाहतूक व रस्तांची झालेली चाळणी याविषयी येथील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाडे तक्रारी केल्या, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

वॉर्डामध्ये असलेले साईमंदिर, शिवगणेश मंदिर व उद्याने विकसित झाली आहेत. काही ठिकाणी नाला नेहमीच चोकअप होतो. नाल्यावर झाकण टाकण्याची मागणी करण्यात आली, मात्र हे काम करण्यात आले नाही. आता सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होईल असा व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणारा उमेदवार आम्हाला हवा असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

वॉर्डातील कैलासनगर ते एमजीएम कॉलेज या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. वॉर्डात झोपडपट्टीचा काही भाग आहे. या भागाला अद्यापही पुरेशा नागरी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत, अशा व्यथा येथील नागरिकांनी कट्टा मीटिंगमध्ये मांडल्या. या मीटिंगसाठी शिवगणेश मंदिर व माया अपार्टमेंट परिसरातील नागरिकांसह शौर्य या स्थानिक युवक संघटनांमधील नरेंद्र पंडित, संकेत इंगळे, शिवा दामोदरे, मयुरी मालवी परेश्वर कालापाड, वैभव जोशी, संदीप काळे यांची उपस्थिती होती.

आमच्या वॉर्डात खूप काही समस्या नाहीत. मात्र, वाहतूक आणि रस्त्यांची समस्या कायम मेटाकुटीला आणते. या समस्या सोडवल्या जाव्यात. - ऋषिकेश कविमंडन

कैलासनगर ते एमजीएम कॉलेज या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. तो नवीन नगरसेवकाने लवकरात लवकर सोडवावा.

- विशाल बोरले

वॉर्डात काही ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न भेडसावतो. निय‌मित स्वच्छता करण्यात यावी. वेळोवेळी कचरा उचलण्यात यावा. त्यामुळे रोगराई पसरणार नाही.

- सागर साबळे

स्वच्छतेची समस्या मोठी आहे. थातुरमातूरपणे झाडू मारण्यात येतो. वेळेवर कचरा उचलला जात नाही. स्वच्छता ठेवावी. त्यामुळे साथीचे आजार पसरणार नाहीत. - अविनाश देशपांडे

आमच्या भागाला पुरेशा नागरी सुविधा पुरविलेल्या नाहीत. उद्यानांना परिसरातील विहिरीतून पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. नव्या कारभाऱ्यांनी रखडलेली कामे करावी. - भूषण काळे

सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होईल असा व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणारा उमेदवार आम्हाला नगरसेवक म्हणून हवा आहे. - गौरव जावळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेने साथ नव्हे, ‘हात’ दिला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीत शिवसेना कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मदत करत नाहीत. काही ठिकाणी शिवसेनेकडून बंडखोरांना रसद पुरविणे सुरू आहे, अशा एक ना अनेक तक्रारी भाजपच्या उमेदवारांनी रविवारी (१२ एप्रिल) आयोजित मेळाव्यात पक्षश्रेष्ठींपुढे मांडल्या. भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा सकाळी साडेअकरा वाजता काल्डा कॉर्नर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात झाला.

प्रदेश संघटक रवी भुसारी, प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, किशनचंद तनवाणी, डॉ. भागवत कराड, शिरीष बोराळकर, संजय केणेकर, अनिल मकरिये, प्रवीण घुगे, ज्ञानोबा मुंडे, बसवराज मंगरुळे आदी उपस्थित होते. मेळाव्यात उमेदवारांनी निवडणुकीची काय तयारी केली, याबाबत वॉर्डनिहाय आढावा घेण्यात आला. यात अनेक उमेदवारांनी बंडखोरांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. शिवसेना कार्यकर्ते भेटत नाहीत, काम करत नाहीत. शिवसेना नेते-कार्यकर्ते प्रचारासाठी येत नाहीत. एवढेच नव्हे तर काही कार्यकर्ते युतीऐवजी बंडखोरांना रसद पुरवत आहेत, अशा तक्रारी या उमेदवारांनी श्रेष्ठींपुढे मांडल्या. तसेच स्वपक्षाचे काही कार्यकर्तेही अपक्षांना मदत करत आहेत, अशी खंत दोन उमेदवारांनी व्यक्त केली. तर अनेक उमेदवारांनी युतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आपल्याला सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. पक्षातील नेत्यांनी प्रचारासाठी यावे. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी नेत्यांनी लक्ष द्यावे, स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दानवे, घडमोडेंची दांडी

पालिका निवडणूक तयारीसाठी आयोजित या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मार्गदर्शन करणार होते. तसा निरोपही पक्षाकडून कार्यकर्त्यांना मिळाला होता, पण दानवेंनी या मेळाव्याला दांडी मारली. 'अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दानवे गेले आहेत,' असे स्पष्टीकरण प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी यावेळी दिले. दरम्यान भाजप शहराध्यक्ष भगवान घडमोडे यांनीही मेळाव्याला दांडी मारली. ते स्वतः उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचारानिमित्त वॉर्डात राहण्याला त्यांनी प्राधान्य दिले.

...ही तर बैठक!

भाजपच्या या मेळाव्याला मोजक्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जवळपास १० उमेदवार यामेळाव्याला आले नाहीत. ही संख्या पाहता भाजप नेत्यांनी हा मेळाव्या नव्हता, तर बैठक होती असा दावा केला.

शिवसेनेचे कार्यकर्ते काही ठिकाणी बंडखोरांसोबत फिरत आहेत. तसेच शिवसेनेचे काही नाराज कार्यकर्ते काम करत नाहीत. अशा तक्रारी काही भाजप उमेदवारांनी केल्या आहेत. युतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करू. नाराजांची समजूत काढू.

- शिरीष बोराळकर, भाजप प्रवक्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० शी नंतरच्यांना ठरविले बेरोजगार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतील घोटाळ्यातील एकेक पैलू समोर येत आहेत. सुशिक्षित बेरोजगारांसाठी असलेल्या या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चाळीशी ओलांडलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. तशी यादी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटला पाठवली आहे.

पालिकेच्या प्रकल्प विभागाने १,१२४ लाभार्थींची हेअर ड्रेसर, फॅशन डिझायनिंग आणि प्लंबर या तीन ट्रेडस् साठीची यादी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटला पाठवली आहे. या लाभार्थींच्या मोबदल्यात 'कोहिनूर' ला १ कोटी ७० लाख ८८४ रुपये पेमेंट करण्याचे षडयंत्र उपायुक्त डॉ. आशिष पवार आणि प्रकल्प अधिकारी प्रमोद खोब्रागडे यांनी आखले होते. त्याचा भांडाफोड आयुक्त प्रकाश महाजन यांनी केला. जी यादी 'त्या' दोन अधिकाऱ्यांनी 'कोहिनूर' ला दिली ती यादी 'मटा' कडे आहे. जे 'एजबार' झाले आहेत त्यांचाही या यादीत समावेश आहे. सलीम इसाक शेख (मुकुंदवाडी, वय ४० वर्ष), समद समीर शेख (मुकुंदवाडी, वय ५० वर्ष), बबलू शेख (मकुंदवाडी वय ४५ वर्ष), इरफान सलीम शेख (मुकुंदवाडी, वय ४५ वर्ष), तुषार बाबासाहेब साठे ( मुकुंदवाडी, वय ४४ वर्ष), वसंत मारोती गुंजावारे ( मुकुंदवाडी, वय ४५ वर्ष), राहुल तेनराव गाढवे (मुकुंदवाडी, वय ४० वर्ष), बंडू पवार (मुकुंदवाडी, वय ५० वर्ष), अक्षय पाखरे (मुकुंदवाडी , वय ४५ वर्ष), सूरज खनके (मुकुंदवाडी वय ४० वर्ष). एजबार झालेल्यांची अशी अनेक उदाहरणे या यादीत सापडतात. गणेश काळे, आशा मुबारक, संगीता काळे यांच्यासह काही नावे यादीत दोन वेळेस दिसतात.

पत्ते अपूर्ण

महापालिकेच्या प्रकल्प विभागाने 'कोहिनूर'कडे सादर केलेल्या लाभार्थींच्या यादीत एकाही लाभार्थ्याचा पूर्ण पत्ता दिलेला नाही. मुकुंदवाडी, जयभवानीनगर, जयभीमनगर, रोहिदासनगर, फुलेनगर, मिलिंदनगर आदी वसाहतींचा उल्लेख आहे. घर क्रमांक, गल्ली क्रमांक यांचा उल्लेखही केलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात गारपीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील काही भागाला रविवारी पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये गारपीट झाली. तर, जळगाव जिल्ह्यामध्ये झाड कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे. आणखी दोन दिवस हीच परिस्थिती असेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये, तर बीड जिल्ह्यात केज, बीड व धारूर तालुक्याच्या काही भागांमध्ये संध्याकाळच्या सुमारास गारांसह पाऊस झाला. लातूर, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील नेहते येथील रामसिंग साबळे यांच्या अंगावर विजेचा खांब कोसळला. त्यातच गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, यावल तालुक्यातील साकळी येथून रिक्षावर झाड पडल्याने महिलेचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूच्या उपशाने नदी पात्र कोरडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

गेल्या काही दिवसांपासून कौठा एकंबा येथील पैनगंगा नदीच्या पत्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. या प्रकारामुळे पाण्याची पातळी खालावून नदीचे पत्र कोरडेठाक पडले आहे. या सर्व बांबीकडे प्रशासनाचे अक्षम्य दूर्लक्ष होत असल्याने बेकायदेशीरपण वाळू उपसा सुरुच आहे.

मराठवाडा - विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर अनेक ठिकाणी वाळूचे घाट आहेत. परंतु, या वर्षी एकाही वाळू घाटाचा महसुल प्रशासनाने लिलाव केला नाही. त्यामुळे शासनच रोखीने वसूल होणार महसूल बुडत चालला आहे. एकंबा - कोठा येथून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पत्रातून दररोज हजारो ब्रास वाळूचा उपसा चोरट्या मार्गाने करून वाळू वाहतूक करीत आहेत. परिणामी नागरिक व प्रशासनाला वाळू चोरीमुळे दुहेरी फटका बसत आहे. पाणी पातळी खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. तर प्रशासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्यात वाळू मफिया यशस्वी होत आहेत. या दुहेरी संकटातून मार्ग काढण्यासाठी हिमायतनगर तहसील प्रशासन मात्र कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.

अवकाळी पावसामुळे उत्खननाचे खड्डे बुजले

पैनगंगा नदीपात्रातून करण्यात आलेल्या बेसुमार उत्खननामुळे मोठे खड्डे पडले होते. दान दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नदीपात्रातील खड्डे बुजले आहेत. ज्या ठिकाणी वाळूचा चढ आहे ती जागा पाण्यातून वर दिसत असल्याने नदीपात्रातून किती मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्यात आला याचा अंदाज लावणे अवघड झाले आहे.

नदीपात्रील दगडाचीही चोरी

नदी पत्रातून वाळू बरोबर आता दगडाचीही चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. ब्लास्टिंगद्वारे दगड काढले गेल्याने नदी पात्राच्या कडेला मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. शनिवारी झालेल्या पावसाने हे खड्डे सुद्धा भरले आहेत. या सर्व बाबीकडे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय बाँडचा गैरवापर

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय कार्यालयातील बाँडचा गुन्हेगारांकडून गैरवापर होत असल्याचा प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणी शासकीय कार्यालयातून जुने बॉँड चोरून त्याचा गैरवापर करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या बाँडवर खाडाखोड करून जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी त्याचा वापर केला जात होता. या आरोपीविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार असोसिऐशनच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार दिली होती.

महाराष्ट्र व गोवा बार असोसिऐशनचे अध्यक्ष अॅड. सिकंदर अली, सचिव सुनील दौंड व अॅड. कादरी यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली होती. यामध्ये जफरखान मजीदखान हा आरोपी विविध शासकीय कार्यालयातून जुने शपथपत्र असलेले बाँड चोरून त्याचा गैरवापर करीत असल्याचा उल्लेख होता. या प्रकरणी गुन्हेशाखेकडे चौकशी देण्यात आली होती. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता जफरखान व त्याचा साथीदार रोषणगेट भागात अशा जुन्या बाँडवर नारेगाव येथील एका प्लॉटची नोटरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी जफरखान मजीदखान (रा. कटकटगेट) व सय्यद मुश्ताक सय्यद मुजफ्फर (रा. नारेगाव) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून जुना बाँड जप्त करण्यात आला.

अॅड. सुनील दौंड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात चोरी, फसवणूक, कट रचणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरिक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक उन्मेश थिटे व पथकाने ही कारवाई केली.

मजकूर खोडून बाँड करायचे कोरा

आरोपी विविध शासकीय कार्यालयातून हे जुने बाँड चोरत होते. त्याच्यावर असलेला मजकूर ते खोडून तो बाँड कोरा नविन असल्यासारखा तयार करीत होते. यानंतर या बाँडवर नविन मजकूर टाकण्यात येत होता. आरोपी हा मजकूर कशाने खोडत होते याचा तपास पोलिस करीत आहे. जफरखान याच्यावर दोन वर्षापूर्वी अशाच पद्धतीचा गुन्हा सिटीचौक पोलिस ठाण्यात दाखल आहे.

या आरोपींची विविध शासकीय कार्यालयात लिंक असल्याची शक्यता आहे. जमीन खरेदीच्या व्यवहारात या बाँडचा वापर होत होता. आरोपी हा मजकूर कशाने खोडत होते याचाही तपास केला जाईल. शासकीय कार्यालयात कोणते कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत त्याचा देखील तपास करण्यात येत आहे.

- अविनाश आघाव, पोलिस निरिक्षक गुन्हेशाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलमपट्टीनंतरही फुटभर खड्डे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोंढा नाका चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या शेजारून करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावर अक्षरशः एकेक फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. कंत्राटदाराने उड्डाणपुलाशेजारील साइडपट्टीचे डांबरीकरण केले, मात्र या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. या ठिकाणी दररोज किमान दहा अपघात होत आहेत.

मोंढा नाका उड्डाणपुलाच्या दक्षिणेकडील बाजूने आकाशवाणीकडून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी रस्ता केला आहे. पाच फुटांचा हा रस्ता सुरुवातीपासूनच अरूंद आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) महापालिकेला सांगूनही या रस्त्यावरील अतिक्रमणे हटलेली नाहीत. त्यात अॅपेरिक्षा कुठेही आणि कशाही उभ्या राहतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी नेहमीच ट्रॅफिक जॅम होते. मोंढा चौकापासून अमरप्रीत हॉटेलकडे येताना तसेच सिंचन भवनाच्या जवळ जिथे उड्डाणपूल सुरू होतो. त्याठिकाणी कायम ही समस्या आहे. मध्यंतरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलिस उभा करण्यात आला होता, पण आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती आहे.

सर्व वाहने या साइडपट्टीच्या रस्त्यावरून जात असल्याने रस्ता वारंवार उखडला. त्याची मलमपट्टी केली गेली, पण गेल्या महिनाभरापासून दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कुशलनगरच्या रस्त्यालगत एक फुटाचे चार मोठे खड्डे या छोट्या रस्त्यावर पडले आहेत. त्यात कायम पाणी साचून राहते. उड्डाणपुलालगत असलेल्या रस्त्यावर तीन दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. पण हे खड्डे बुजविण्यासाठी काहीच पावले उचलली गेली नाहीत. भरधाव येणारी वाहने खड्डा पाहून हळू होतात. मागच्या वाहनांना त्याची कल्पना येत नाही आणि एकमेकावर वाहने आदळण्याचे प्रमाण वाढले आहे. या खड्ड्यांजवळ दररोज किमान दहा अपघात होत असल्याचे आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.

उड्डाणपूल कार्यान्वित होईपर्यंत साइडपट्ट्यांचे मजबुतीकरण करण्याचे कंत्राटादाराला सांगितले होते. त्यानुसार डांबरीकरण केले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत तत्काळ सांगून कार्यवाही केली जाईल.

- उदय भरडे, उपअभियंता, एमएसआरडीसी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरजूंसाठी जेएनईसी कॉर्पस फंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिक अडचणीमुळे एखाद्या विद्यार्थ्याला अभियांत्रिकीचे शिक्षण सोडावे लागू नये, यासाठी जेएनईसीचे माजी विद्यार्थी सरसावले आहेत. त्यांनी 'जेएनईसी कॉर्पस फंड' नावाचा उपक्रम सुरू केला असून, देशातील ख्यातनाम उद्योजक, कॉलेजचे माजी विद्यार्थी जेपी ग्रुपचे व्यवस्थापकिय संचालक सुरेश जैन यांनी या उपक्रमासाठी २५ लाखांचा फंड दिला आहे.

आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो, त्या कॉलेजचे ऋण फेडता यावे या भावनेतून जवाहरलाल नेहरू इंजिनीअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत. त्यासाठी जेएनईसी कॉर्पस फंड उभारला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. त्यामुळे कॉलेजच्या एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये, या भावनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. यासाठी देशातील प्रसिद्ध उद्योजक व कॉलेजचे माजी विद्यार्थी सुरेश जैन पुढे आले. त्यांनी रविवारी या उपक्रमाची घोषणा केली. तसेच उपक्रमासाठी २५ लाख रुपये देत असल्याचे जाहीर केले. यावेळी प्राचार्य डॉ. सुधीर देशमुख, रणजीत कक्कड, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. आर. आर. देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी उद्योजक सुरेश जैन म्हणाले, 'वीस वर्षापूर्वीचे अभियांत्रिकीचे शिक्षण आणि आजचे शिक्षण यात मोठा बदल झाला आहे. पूर्वी इतक्या सुविधा नव्हत्या, परंतु शिक्षकांनी त्या गोष्टींची उणीव भासू दिली नाही. आज एवढ्या वर्षानंतर कॉलेजमध्ये आल्याचा आनंद वाटतो. आज अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकाचा वाटा अधिक असावा.'

कोणाचीही गुणवत्ता आणि शिक्षण आर्थिक अडचणीमुळे मागे राहता कामा नये. यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अशा विद्यार्थ्यांची निवड कॉलेज प्रशासनच करेल. आज तरुणांना चांगल्या संधी उपलब्ध होण्यासाठी उद्योग आणि कॉलेज यांच्यातील इंटरअॅक्शन वाढणे महत्त्वाचे आहे.

- सुरेश जैन, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ वाघांनी अन्नपाणी सोडले

$
0
0

उन्मेष देशपांडे, औरंगाबाद

प्रदीर्घ सहवासानंतर कुणाचीही ताटातूट झाली, तर काही दिवस जीवाला चैन पडत नाही. हीच भावना प्राण्यांमध्येही आहे. मुके प्राणी ही भावना आपापल्या परीने व्यक्त करतात. औरंगाबाद पालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील दोन वाघांना शनिवारी रात्री पुण्याला हलविल्यापासून बारा वाघांनी अन्नपाणी सोडून दिले आहे. पोट रिकामे असल्याने या व्याकुळल्या जीवांची हालचालही मंदावली आहे.

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात चार पांढरे आणि दहा पिवळे वाघ होते. काही दिवसांपूर्वी सेंट्रल झू ऑथॅरिटीच्या पथकाने 'एका प्राणिसंग्रहालयात इतके वाघ ठेवता कसे,' असा सवाल करीत काही वाघ हलविण्याची सूचना केली. त्यानुसार महापालिकेने वाघांची माहिती जाहीर केली. पुण्याच्या प्राणिसंग्रहालयाने दोन वाघांची मागणी नोंदवली. त्यानुसार शनिवारी सायंकाळी 'कैफ' हा पांढरा वाघ आणि 'रिद्धी' ही पिवळी वाघीण पुण्याला रवाना करण्यात आली. या दोन वाघांच्या मोबदल्यात औरंगाबाद महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाला पुण्याच्या प्राणिसंग्रहालयातून दोन मरतुकडे कोल्हे मिळाले आहेत. 'कैफ' आणि 'रिद्धी' पुण्याला रवाना झाले आणि इकडे अन्य वाघांनी अन्नपाणी सोडले.

प्राणिसंग्रहालयात चार पांढरे वाघ आहेत. त्यापैकी 'कैफ' एक होता. दहा पिवळ्या वाघांपैकी 'रिद्धी' एक होती. या दोघांना पुण्याच्या पथकाच्या हवाली करण्यासाठी त्यांच्या पिंजऱ्यात छोटे पिंजरे नेण्यात आले. तेव्हा सर्वच वाघांच्या डोळ्यात अनामिक भीती निर्माण झाली. कैफ आणि रिध्दीला कसेबसे त्या पिंजऱ्यात बसवल्यावर पिंजरे बाहेर काढण्यात आले आणि तेव्हापासून प्राणिसंग्रहालयात शिल्लक राहिलेल्या वाघांनी हाय खाल्ली. त्यांनी अन्नपाणी सोडून दिले आहे. एरवी पिंजऱ्याच्या आवारात मुक्तपणे संचार करणारे, एकमेकांशी दंगामस्ती करणारे वाघ काल संध्याकाळपासून सुस्त झाले आहेत. पिंजऱ्याच्या एका कोपऱ्यात शून्यात नजर खिळवून ठेवत, हे वाघ शांतपणे बसले आहेत. प्राणिसंग्रहालयात सध्या तीन पांढरे आणि नऊ पिवळे वाघ आहेत. या सगळ्यांची अवस्था काल सायंकाळपासून सारखीच झाली आहे. अजून दोन-तीन दिवस अशीच स्थिती राहील. त्यानंतर ते 'नॉर्मल' होतील, असा अंदाज केअरटेकर वर्तवत आहेत.

'कैफ' आणि 'रिद्धी'ची काळजी घेणाऱ्या मोहमद जिया यांनाही कालपासून अन्न गोड लागेना, झोप येईना. 'मटा' शी बोलताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ते म्हणाले, 'कैफचा जन्म (२००४) याच प्राणिसंग्रहालयात झाला. लहान मुलाला बाटलीने दूध पाजावे, तसे मी कैफला दूध पाजले. त्याला तरतरी आणण्यासाठी प्रोटीन दिले. प्रसंगी मांसाचा खीमा खाऊ घातला. कैफ आणि रिद्धीची (जन्म २०११) शरीरयष्टी फारच मजबूत होती. नुसता आवाज दिला, तर ते आवाजाच्या दिशेने धावत यायचे. दोघांनाही अंगाखांद्यावर खेळवावे तसे खेळवले. आता ते दोघेही गेले. त्यामुळे कालपासून मन लागत नाही. काय करावे सुचत नाही.'

धडधाकट गुड्डूही गेला

औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयातून गेल्यावर्षी गुड्डू या वाघाला मध्यप्रदेशातील एका प्राणिसंग्रहालयासाठी नेण्यात आले. गुड्डू अंगाने धडधाकट होता, पण त्याला नेण्यासाठी आणलेला पिंजरा तुलनेने लहान होता. मध्यप्रदेशात जाईपर्यंत अंगाला पिंजरा घासून-घासून त्याला जखमा झाल्या. दोन-तीन दिवसांतच तो हे जग सोडून गेला. प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी आजही गुड्डूची आठवण आल्यावर गहिवरतात.

अजून दोन वाघ जाणार

प्राणिसंग्रहालयातील नऊ पिवळ्या वाघांपैकी दोन पिवळे वाघ येत्या काही महिन्यांत मध्यप्रदेशातील रिता प्राणिसंग्रहालयासाठी पाठवले जाणार आहेत. या वाघांच्या बदल्यात रिता प्राणिसंग्रहालयातून कोणते प्राणी मिळणार, हे स्पष्ट झाले नाही. 'आम्ही दोन वाघ देतो. भविष्यात आम्हाला कोणत्या प्राण्याची गरज पडली, तर तुम्ही ते प्राणी द्या,' असा तोंडी करार पालिका त्या प्राणिसंग्रहालयाबरोबर करणार आहे.

बछडे दुरावले

पुण्याच्या प्राणिसंग्रहालयात नेण्यात आलेल्या रिध्दी या वाघिणीने काही महिन्यांपूर्वी दोन बछड्यांना जन्म दिला. आईशिवाय राहण्याएवढे ते मोठे झालेले नाहीत. आईच्या छायेत हे दोन्ही बछडे पिंजऱ्यात बागडत होते. अधिकाऱ्यांनी रिध्दीला पुण्याला पाठवले आणि बछडे आईपासून दुरावले. कालपासून त्यांची अवस्था पाहवत नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आईच्या शोधात हे बछडे स्वतःला विसरून गेले आहेत.

दैनंदिन सहवास संपल्यास वन्यप्राणी बैचैन होतात. वाघ हा प्राणीसुद्धा सहवासप्रिय असल्यामुळे आपले सहकारी दूर गेल्याने त्यांनी अन्नपाणी सोडले असावे. पुढील चार दिवस अशीच स्थिती राहील आणि वाघ पूर्वपदावर येण्यास किमान आठ दिवस लागतील.

- आर. एन. नागापूरकर; वन्यजीव अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये फळबागांचे मोठे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस थांबायला तयार नाही. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील १ हजार ७६५ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लवकरच प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यातयेणार आहे.

बीड जिल्ह्यात ९ ते १२ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोनजन वीज पडून तर एक जण घराची भिंत कोसळल्याने मरण पावला. या अवकाळी पावसामुळे झाड कोसळल्याने १३ जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यात पाच जनावरे मृत्युमूखी पडले आहेत. ज्वारी, हरभरा आणि गहू पिकाला ही याचा थोड्याफार प्रमाणात फटका बसला आहे.

या अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान फळबागाचे झाले आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ७६५ हेक्टरवरील फळबागा आणि भाजीपाला पीक मातीत मिसळले आहे. जिल्ह्यातील १८४ गावे या अवकाळी पावसाने बाधित झाली असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाचा आहे. यामध्ये ५६ हेक्टरवरील पिकाचे पन्नास टक्केपेक्षा कमी तर १७०९ हेक्टरवरील पिकांचे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक १ हजार १६९ हेक्टरवरील फळपिके बाधित झाली आहेत. यामध्ये आंब्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. गेल्या पाच दिवसात पडलेल्या पावसाने कैऱ्या गळून पडल्या आहेत. त्यामुळे आंब्याचा रस महाग होणार आहे. ५७६ हेक्टरवरील भाजीपाला पीक या पावसाने बाधित झाले आहे. २० हेक्टरवरील रब्बी पीक मातीमोल झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

पंचनामे करण्याच्या पालकमंत्री मुंडेंच्या सूचना

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यासोबतच लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून पंचनाम्याची तयारी सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्याची गाडी, खुर्ची जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

पाझर तलावासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्याने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाने केलेल्या या कारवाईत उपविभागीय अधिकारींची गाडी, खुर्ची, कंप्यूटर, प्रिंटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

निकळक येथील बद्री रंगनाथ वाहक या शेतकऱ्याची एक हेक्टर २० आर जमीन २००५ मध्ये पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. या जमिनीचा वाढीव मोबदला मिळविण्यासाठी बद्री वाहक यांनी २००६ मध्ये अॅड. आर. एस. वाघ यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने २९१२ मध्ये शेतकऱ्याच्या बाजूने निकाल देत तीन लाख ८७ हजार रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले होते. यासंबंधी वारंवार पाठपुरावा करून देखील जालना उपविभागीय अधिकारी कार्यालयाने त्याकडे लक्ष दिले नाही. न्यायालयाने सात एप्रिल रोजी उपविभागीय कार्यालयाला जप्तीची नोटीसही बजावली होती. मात्र, याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर सोमवारी दुपारी न्यायालयाच्या आदेशाने उपविभागीय कार्यालयावर जप्ती करण्यात आली.

यामध्ये उपविभागीय अधिकारी यांचे वाहन एम. एच. २१ एल ३६९, खुर्ची, तीन नायब तहसीलदारांच्या खुर्च्या, सहा कॉम्पयूटर, दोन प्रिंटरसह इतर सामान जप्त करण्यात आले. अॅड. आर. एस. वाघ, अॅड. आर. जे. बनकर आणि अॅड. श्रीधर हुशे यांनी शेतकऱ्यांच्यावतीने काम पाहिले.

पाझर तलावासाठी शेतकऱ्यांची जमिन संपादित करून अनेक वर्षे उलटूनही मोबदला देण्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून टाळाटाळ झाली. न्यायालयाने दिलेल्या नोटीसीलाही प्रतिसाद न दिल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली. एवढयावरही मोबदला न दिल्यास जप्त केलेल्या साहित्याचा लिलाव करून त्यामधून मिळालेला पैशातून शेतकऱ्याला मोबदला देऊ.

- अॅड. आर. एस. वाघ, शेतकऱ्याचे वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातुरात गारपिटीचा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूर जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीनंतर व सोमवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाच तालुक्यात गारपीट झाली. या वादळीवाऱ्याचा आणि गारांचा फटका केशर आंबा उत्पादकांना बसला आहे. केशर आंब्याच्या बागा पाना फळासह उद्धवस्त झाल्या आहेत. औसा तालुक्यातील गुबाळ या गावी गारपिटीने वामन शंकर सुतार यांचा मृत्यू झाला.

औसा तालुक्यातील गुबाळ येथे वामन शंकर सुतार (वय ५०, रा. म्हाळंग्रा जि. सोलापूर) हे पाहुणे म्हणून आले होते. रात्रीच्या वेळी ते घराबाहेर झोपले होते. गारांच्या पावसामुळे त्यांचा गोरठून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. किल्लारी पोलीस ठाण्यात मात्र, आकस्मीक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. मयताचे शवविच्छेदन करून अहवाल आल्यानंतर त्यांना मदत देणे शक्य आहे की नाही हे समजेल.

लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, चाकुर, औसा आणि देवणी या पाच तालुक्यात वादळी वारे, गारांचा मोठा पाऊस झाला. या पावसामुळे लातूर तालुक्यातील नांदगाव, हरंगुळ, भातांगळी या गावाच्या आंब्याच्या बागा उद्धवस्त झाल्या. भातांगळीमध्ये कापणीला आलेले ज्वारीच पीक पुर्णपणे हातचे गेले आहे. जनावरांसाठी लावलेल्या गवताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील उसाचे पाने गारपिटीमुळे फाटली असून काही ठिकाणीचा ऊस आडवा पडला आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी पडलेल्या गारा मोठ्या होत्या. चाकुर तालुक्यातील आष्टामोड या परिसरात गारांचा थर साचल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

रेणापूर तालुक्यातील सिंधगाव परिसरात पावसाळ्यात जेवढा पाऊस झाला नाही. त्या पेक्षा अधिक जोरदार पाऊस झाल्याचे पंडितराव कुलकर्णी यांनी सांगितले. या परिसरात आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी दिवसभर ही लातूर शहरात पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वांभर गांवडे म्हणाले, 'पाच तालुक्यात गारपीट झाली आहे. गारपिटीने झालल्या नुकसानीचे पंचनामे आणि सर्वेक्षण करण्याचे आदेश तलाठी, मंडळअधिकारी, कृषी साहय्यकांना देण्यात आले आहेत.'

उस्मानाबादमध्ये पाऊस

उस्मानाबादः जिल्ह्यातील कळंब, भूम परिसरात सोमवारी पाचव्या दिवशी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात आंब्याचे अन भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले.

बीडमध्ये रिपरिप सुरुच

बीडः बीड जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पावसाने अवकाळी तडाखा लावला. गुरुवारपासून जिल्ह्यात सलग पाच दिवसांपसून दररोज हजेरी लावली आहे. सोमवारी संध्याकाळी बीडमध्ये एक तास पाऊस झाला. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पावसाळी वातावरण झाले आहे.

खोदलेल्या नाल्याला आले पाणी

या पावसामुळे जलसंधारणाच्या मोहिमेत सुरू करण्यात आलेल्या निलंगा तालुक्यातील नाला सरळीकरणाच्या कामामुळे निलंगा तालुक्यातील कडमुगळी गावा जवळील नाला भरुन वाहत आहे. हा नाला लोकसहभाग आणि खासदार संजय काकडे यांच्या खासदार निधीतून याचे काम सुरू आहे. सध्या दोन किलो मीटर लांब, ४० फुट रुंद आणि १२ फुट खोल खोदलेला आहे. या नाल्याला आलेले पाणी पाहून गावकरी आनंदून गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड तालुक्यात चाऱ्याचे मोठे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

अवकाळी पावसामुळे तालुक्यातील जवळपास ८८ टक्के चाऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर या उन्हाळ्यात जनावरांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न आहे. दरम्यान तालुक्यातील ७५ गावांच्या परिसरात नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

तालुक्यात शनिवारी व रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी जेमतेम पाण्यावर शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. गावरान कांदा बियाण्याला ६० हजार ते ९५ हजार रुपये क्विंटल भाव आहे. यावरून शेतकऱ्यांची किती नुकसान झाले याचा अंदाज येऊ शकतो. त्याचबरोबर उशीरा पेरणी केलेला गहू, उन्हाळी बाजरी, ऊस, मका, आंबा, डांळीब, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्याप्रमामात तालुक्यात नुकसान झाले आहे. आमदार अब्दुल सत्तार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गारपिटीची पाहणी केली.

यावेळी भराडी, अंभई, घाटनांद्रा, उंडणगाव, पालोद, गोळेगाव सर्कलमधील अनेक गावे प्रभावित झाली आहेत. शासनाने फळबागांना २५ हजार, बागायत शेतीला १५ हजार, कोरडवाहू शेतीला दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार सत्तार यांनी पत्रकार परिषदेत केली.

शासनाने शेतकऱ्यांना त्वर‌ित नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. भरपाईचा निर्णय लगेच न घेतल्यास आंदोलन पुकारले जाईल.

- अब्दुल सत्तार, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारांनी झोडपल्या फळबागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवघ्या चार मिनिटांची गारपीट...मात्र शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान. प्रचंड आकाराच्या गारा पडताना पाहून शेतकरी अक्षरशः गारद झाले. औरंगाबाद तालुक्यातील फळबागांचे शनिवारच्या (११ एप्रिल) गारपिटीत प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी (१२ एप्रिल) कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली.

औरंगाबाद तालुक्यातील गाढे जळगाव, लाडसावंगी, डोणवाडा, अंजनडोह या परिसरात तुफान गारपीट झाली. या भागात एवढी गारपीट कधीच झाली नव्हती. सर्वत्र आदळत असलेल्या लिंबाच्या आकाराच्या गारा पाहून शेतकरी सुन्न झाले. गारपिटीचा पहिला फटका बहार धरलेल्या फळबागांना बसला. अवघ्या चार मिनिटात लाखो रुपयांचे नुकसान झाले. डाळिंबाच्या फळांना गारांच्या तडाख्याने तडे गेले आहेत. मोसंबी, पपई आणि आंबा या फळांची मोठी गळ झाली. सातत्याने अवकाळी पावसाचा फटका बसत असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील आणि मंडल अधिकारी राजेंद्र होनराव यांनी केली. यावेळी रामनाथ पवार, सुधाकर पवार, राजाराम देशमुख, जगदीश देशमुख यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांशी कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच डाळिंब बागांची पाहणी करण्यात आली. बहार धरलेल्या मोसंबी व डाळिंबाच्या बागांमध्ये फळगळ झाली आहे. अवकाळी पावसानंतर रोग पसरणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. तसेच झाडांवर बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी, असे आवाहन केले. तसेच फटका बसलेल्या आणि खाली पडलेल्या कैऱ्यांची शेतकऱ्यांनी बाजारपेठेत ताबडतोब विक्री करावी, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला. अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट होणार असून खरीपाचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असे तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे यांनी सांगितले. हवामान बदलाचा फटका पूर्ण कृषीक्षेत्राला बसत असून शेतकऱ्यांना सावरणे कठीण होत आहे; मात्र योग्य उपाययोजना करुन कृषीक्षेत्राला पूर्ववत अवस्था देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी चिंताग्रस्त

गारांच्या तडाख्यात झाडे निष्पर्ण झाली आहेत. पपईची फळे गळून पडल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. डाळींब, मोसंबी व आंबा या फळपिकांनाही फटका बसला आहे. नगदी पीक हातचे गेल्यामुळे कर्ज परतफेड आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च सांभाळणे कठीण होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना उमेद देण्याचा प्रयत्न कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ करीत आहे. या पावसामुळे शेतीचे नुकसान होण्यासोबतच सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत.

- डॉ. संजय पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घृष्णेश्वर परिसरातील अतिक्रमणे हटवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोट्यावधी भाविकांचे श्रद्धस्थान, १२ जोतिर्लिंगापैकी एक असलेले वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर आता अतिक्रमणांच्या विळख्यातून सुटणार आहे. अतिक्रमण हटवून मंदिर परिसरात दुकानदारांचे पुनर्वसन तसेच या परिसराचे शुभोभिकरण करण्याची परवानगी भारतीय पुरातत्व खात्याने दिली आहे. यामुळे आता लवकरच मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी दिली.

केंद्रीय पर्यटनमंत्री डॉ. महेश शर्मा, औरंगाबादचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार, भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी तसेच घृष्णेश्वर मंदिर प्रशासनातील पदाधिकाऱ्यांच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पान-फूल, प्रसाद, रेस्टॉरंट, विविध वस्तूंची विक्री करणारी १८९ दुकाने उभारण्यात आली आहेत. दुकानांच्या या गर्दीमुळे भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या दुकानांना हटवून तेथे सुंदर ‌उद्यान विकसित करण्यासंदर्भातील प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात आला होता. यानुसार येथील लहान मोठ्या दुकानदारांना शेजारीच असलेल्या एका सरकारी जमिनीवर दुकाने बांधून देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live

Latest Images