Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

२५ वर्षांत काय केले?

$
0
0

'मटा' डिबेट कार्यक्रमात औरंगाबादकरांचा सवाल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात पाणी, रस्ते, वीज, कचरा याच समस्या भेडसावत असताना महापालिकेच्या सत्तेत असलेल्या शिवसेना - भाजप युतीने २५ वर्षांत काय केले, असा संतप्त सवाल नागरिकांनी युतीच्या आमदारांना विचारला. 'मटा डिबेट' च्या कार्यक्रमात गुरुवारी नागरिकांनी विकासाच्या मुद्यावरून प्रश्नांचा भडिमार केला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगिरी महाविद्यालयाच्या हिरवळीवर गुरुवारी महाराष्ट्र टाइम्स तर्फे 'मटा डिबेट' चे आयोजन करण्यात आले. त्यात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, भाजपचे आमदार अतुल सावे, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, भारिप-बहुजन महासंघाचे गौतम लांडगे आणि रिपाइं आठवले गटाचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम सहभागी झाले. प्रारंभी नेत्यांनी पक्षाची भूमिका मांडली. नागरिकांनी आमदारांसाठी प्रश्न लिहून दिले. यापैकी निवडक प्रश्न नेत्यांना विचारण्यात आले. बहुतांश प्रश्न युतीच्या आमदारांना उद्देशून होते. रस्त्यांच्या अवस्थेबद्दल नागरिकांनी जाब विचारला. पालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता २५ वर्षांपासून आहे. आता खड्ड्यांचे शहर अशी ओळख निर्माण झाली आहे, याला जबाबदार कोण ? शहरात तिसऱ्या दिवशी पाणी मिळते, पण पाणीपट्टी पूर्ण वसूल का केली जाते? नागरिकांचे हीत न जपणारी 'समांतर' योजना तयार का केली? घनकचरा व्यवस्थापनाचा उडालेला बोजवारा, बंद पडलेले पथदिवे, बससेवा अशा अनेक विषयांवर नागरिकांनी प्रश्न विचारले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'मटा' चे निवासी संपादक धनंजय लांबे यांनी केले. सिनीअर असिस्टंट एडिटर प्रमोद माने यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

आता केंद्रात आणि राज्यात आता युतीचे सरकार आहे. पालकमंत्र्यांनी विकासासाठी निधी देणे सुरू केले आहे. प्रगतीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू झाली आहे. त्यात तुमचा हातभार राहू द्या.

- संजय शिरसाट, शिवसेना.

महापालिकेला काँग्रेसची राजवट असलेल्या केंद्र व राज्य सरकारने सावत्रपणाची वागणूक दिली. आता आमचे सरकार आले आहे, आम्ही या शहराचा विकास करू.

- अतुल सावे, भाजप.

महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी बीओटीचा बाजार मांडला, सिटीबसचा प्रकल्प, घनकचऱ्यासंबंधीचा रॅमकीचा प्रकल्प बंद पडला. एकही योजना पूर्णत्वास न नेणारी महापालिका असा या महापालिकेचा लौकिक आहे.

- सतीश चव्हाण, राष्ट्रवादी.

जाती धर्माच्या नावावर जेव्हा निवडणूक लढवली जाते तेव्हा विकासाचे मुद्दे मागे पडतात. त्यामुळे चांगल्या उमेदवारांना निवडून द्या.

- इम्तियाज जलील, एमआयएम

विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात दुजाभाव झाला. पुढच्या काळात सर्व आमदारांनी ठरवले तर आपले शहर पुढे जाईल.

- बाबुराव कदम, रिपाइं.

निवडणुकीसाठी आम्ही शहर बचाव मोर्चाची स्थापना केली आहे. ५३ उमेदवार उभे केले आहेत. मतदारांना जो उमेदवार सक्षम वाटतो त्याला मतदारांनी निवडून द्यावे.

- गौतम लांडगे, भारिप.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुतळ्यांचेही दर आयोगाने ठरवले

$
0
0



उन्मेश देशपांडे, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत एखाद्या राष्ट्रपुरुषाचा पुतळा वापरताना जरा जपून. कारण आता निवडणूक आयोगाने या पुतळ्यांचा खर्च उमेदवाराच्या माथी मारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उंचीनुसार पुतळ्यांचे दरही ठरविले आहेत. अर्थात निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे कठोर कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही, मात्र फक्त कागद काळे करण्याचा उद्योग आयोगाकडून सुरू असल्याची चर्चा आहे.

निवडणूक आयोगाने पुतळ्याबरोबर टोप्या, हार, पाण्याचे पाऊच आदींचे दर निश्चित केले आहेत. प्रचारसभांमध्ये व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी राष्ट्रपुरुषांचे पुतळे ठेवण्यात येतात. आयोगाने पुतळ्यांचे आकार निश्चित केले आहेत. २४ इंच उंचीचा पुतळा वापरल्यास उमेदवाराच्या नावावर २,८२५ रुपये खर्च नोंद होईल. ३२ इंच आणि ४२ इंच उंचीच्या पुतळ्यासाठी अनुक्रमे ५,९८० रुपये आणि ८,९७० दर असेल. त्याचबरोबर १६ बाय २० इंच आकाराच्या फोटोचा दर ४५० रुपये निश्चित केला आहे. वास्तविक सभांमधील पुतळे व फोटो कार्यकर्त्यांच्या घरून आणले जातात. मात्र, ते नवीन आहेत असे आयोग मानणार आहे. खादीच्या कापडाचे दरही निवडणूक आयोगाने निश्चित केले आहेत. हे दर २८०, ३७० आणि ४८० रुपये मीटर असे आहेत.

प्रचाराचे साहित्य स्वस्तात आणले तरी, आयोगाच्या दरानुसारच खर्च गृहित धरणार आहेत. कार्यकर्त्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या टोप्यांच्या किंमती ८ ते १७ रुपयांपर्यंच असतील. ढोल ताशाच्या दहा माणसांच्या पथकासाठी प्रतिदिन साडेअकरा हजार रुपये दर आकारला जाणार आहे.

तपासणीबाबत प्रश्नचिन्ह

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्यावेळी उमेदवारांबरोबर आयोगाकडून व्हिडिओ कॅमेरा तैनात करण्यात येतो. त्यांच्या प्रचाराचे चित्रिकरण करण्यात येते. महापालिका निवडणुकीत मात्र एक हजारांपेक्षा जास्त उमेदवार आहेत. प्रत्येक उमेदवाराच्या हालचालीवर लक्ष ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे उमेदवाराबरोबर किती कार्यकर्ते होते. पदयात्रेत किती टोप्या, हार, झेंडे वापरले आदींवर निवडणूक आयोग लक्ष ठेवू शकणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने प्रचारसाहित्याचे दर ठरविणे म्हणजे केवळ कागद काळे करण्याचा उद्योग असल्याची चर्चा उमेदवारांमध्ये आहे.

आयोगाने ठरवलेले हारांचे दर

झेंडू २५ ते १०० रु.

चिल्ली १०० ते २०० रु.

निशीगंध ३०० ते ४०० रु.

गुलाब ४०० ते ५५० रु.

ऑर्चिड ८०० ते १००० रु.

यापेक्षा कमी दर मान्य केले जाणार नाहीत, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खर्च नियंत्रण कक्ष प्रमुखांना कळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राणेंनीच ओवेसींना ऑफर दिली होती!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

एमआयएम हा शिवसेनेचा नंबर एकचा शत्रू आहे. देशाच्या मुळावर उठलेल्या या पक्षाशी आम्ही साटंलोटं करण्याचा प्रश्नच येत नाही. उलट, वांद्रे पोटनिवडणूक न लढवण्यासाठी नारायण राणेंनीच ओवेसी बंधूंना पाच-पाच कोटी रुपयांची ऑफर दिली होती, पण हे सेटिंग फिस्कटल्यानं ते आमच्यावर आरोप करताहेत, असा प्रतिहल्ला शिवसेना नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज चढवला.

वांद्रे पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नेते आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. शिवसेना राणेंवर कडवी टीका करतेय, त्यांना खोचक सल्ले देतेय, टोमणे मारतेय. पराभव झाल्यानं राणेंची बाजू तशी दुबळी आहे, पण तरीही त्यांचे समर्थक सारवासारव करायचा प्रयत्न करताहेत. अशातच, आपल्या वडिलांच्या बचावासाठी धाकटे चिरंजीव, अर्थात नितेश राणे धावून आले. 'एबीपी माझा'वरील मुलाखतीत त्यांनी राणेंवरील टीकेला, आरोपांना प्रत्युत्तरं दिली. राणेंनी एमआयएमला कुठलीही ऑफर दिली नव्हती, एमआयएम हे तर शिवसेनेचं पिल्लू असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला होता. रामदास कदम एमआयएमच्या आमदारासोबत जेवल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. त्यामुळे कदमांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला होता. त्याचा खुलासा त्यांनी 'एबीपी'कडेच केला.

औरंगाबादचा पालकमंत्री म्हणून तिथले अनेक नेते वेगवेगळी कामं घेऊन मला भेटायला येतात. तसेच एमआयएमचे आमदारही भेटायला आले होते. त्यावेळी आम्ही जेवत होतो, म्हणून मी त्यांनाही जेवायचा आग्रह केला. एकत्र जेवल्याचा अर्थ साटंलोटं आहे, असा होत नाही. देशाच्या मुळावर उठलेल्यांसोबत साटंलोटं करण्याचा प्रश्नच येत नाही, असं रामदास कदम यांनी निक्षून सांगितलं. राणेंच्या मुलांना गल्लीतही कुणी किंमत देत नाही, त्यामुळे त्यांना गांभीर्यानं घ्यायची गरज नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला. नारायण राणेंनीच ताज हॉटेलमध्ये ओवेसींची भेट घेऊन दोन भावांना पाच-पाच कोटी आणि पक्षासाठी वेगळा निधी देण्याची ऑफर दिली होती, पण त्यांची बोलणी फिस्कटल्याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही कदम यांनी केला आहे. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखी काही दिवस सुरूच राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्टीत ‘ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

शाळेतील ग्रंथालयात असलेली पुस्तके शाळेतच वाचायला हवीत या अलिखित नियमाला बगल देत बेट जवळगा (ता. उमरगा) येथील शिक्षिका यू. एम. गाडे यांनी एक ‌अभिनव उपक्रम सुरू केला आहे. उन्हाळा सुट्टीत ग्रंथालयच विद्यार्थ्यांच्या दारी आल्याने विद्यार्थी देखील चांगलेच ‌आनंदून गेले आहेत. त्यांच्यात वाचनाविषयी गोडी निर्माण होऊ लागली आहे. परीक्षा संपल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे. विद्यार्थीही सुट्टीचा आनंद उपभोगत आहेत. तो आनंद अधिक रंजक व्हावा यासाठी गाडे या शिक्षिकेनी चक्क विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयच त्यांच्या दारी नेले आहे. सुट्टीतही अवांतर वाचनाच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी हा अभिनव व अनोखा असा उपक्रम सुरू केला आहे.

सुट्टीत विद्यार्थ्यांच्या अध्यायनातील सातत्य टिकून राहावे यासाठी त्यांनी वेगवेगळी पुस्तकेमुलांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला. वाचनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टीत पुस्तके उपलब्ध होत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांची आवड तशीच मारली जाते किंवा दबून जाते. त्यावर बेटजवळगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका गाडे यांनी पर्याय शोधून हा अनोखा उपक्रम राबविण्यासही प्रारंभ केला आहे.

शाळेतील विद्यार्थी असलेल्या सुरज दगडू-पाटील याच्या घरी सध्या हे ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थी तेथून नोंद करून पुस्तक घेवून आपआपल्या घरी जातत. बरेच विद्यार्थी तर पाटील यांच्या घरीच बसून पुस्तक वाचनाचा आनंद घेतात. यासाठी पाटील यांनी घरात विद्यार्थ्यांना बसून वाचण्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था केलेली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जयंती दिनी या अभिनव उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. हा उपक्रम शाळा सुरू होईपर्यंत म्हणजेच जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राबविण्यात येणार आहे. या ग्रंथालय उपक्रमास बेटजवळगा येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. उन्हात भटकंती करण्यापेक्षा विद्यार्थी गटागटाने बसून वाचनाचा आनंद घेत आहेत. वाचलेल्या पुस्तकांवर विद्यार्थ्यांना छोटे टिपण करायला सुद्धा सांगण्यात आले आहे. याशिवाय वाचलेल्या पुस्तकांवर विद्याथ्यांना चर्चा करण्यासही भाग पाडले आहे. 'ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी' या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गोष्टीची पुस्तके विकत घेवून वाचणे परवडत नाही. त्यामुळे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढावा. त्याचबरोबर या शाळेबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी उमरगा तालुक्यातील जि. प. शाळेतून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून बेटजवळगे येथे ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम आहे.

- यू. एम. गाडे, शिक्षिका बेट जवळगा, ता. उमरगा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ मृतदेहाची ओळख काही पटेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

शहरातील शेरसवार नगर परिसरात आढळून आलेल्या अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. दरम्यान, या इसमाचा गळा आवळून खून केल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून पोलिसात त्यासंबधी गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

भोकरदन नाका परिसरात असलेल्या शेरसवार नगरात गुरुवारी रात्री उशिरा एका अनोळखी इसमचा मृतदेह आढळून आला होता. या इसमाचे अंदाजे वय ३५ ते ३८ वर्ष असून त्याच्या अंगात चौकड्याचा शर्ट, काळी पँट आहे. या वर्णनाशी संबधित व्यक्तीची काही ही माहिती मिळाल्यास तात्काळ सदर बाजार पोलिसांना याची माहिती द्यावी, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी केले आहे. याप्रकरणी सुरुवातीला फक्त अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, सदर मृतदेहच्या गळ्यात नॉयलोनची दोरी आढळून आली. या दोरीनेच गळा आवळून खून केल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने याप्रकरणी आता अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.

ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

मयत युवकाची ओळख पटल्यावरच तपासाची योग्य दिशा ठरविता येणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत. मयताचा फोटो सर्व पोलिसांना देण्यात आला असून शहरासह आसपासच्या परिसरात देखील हे फोटो लावण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर फेसबुक अणि व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियावरून देखील या मयताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओवेसींच्या दलित प्रेमामुळे मुस्लिम उमेदवार नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत एमआयएमची सत्ता आल्यास पहिला महापौर दलित समाजाचा असेल. स्था‌यी समितीचे सभापतिपदही दलित किंवा ओबीसी समाजातील नगरसेवकाला देण्यात येईल, असे आश्वासन एमआयएमचे नेते खासदार असदुद्दिन ओेवेसी यांनी दिले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजीची भावना आहे.

महापालिकेत एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमखास मैदानावर खासदार ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत खासदार ओवेसी यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला. दलित समाजाच्या मतांना आकर्षित करण्यासाठी खासदार ओवेसी यांनी, महापालिकेत एमआयएमची सत्ता आल्यास महापौरपद दलित नगरसेवकाकडे सोपविले जाईल. त्याचबरोबर स्थायी समितीचे सभापतिपद दलित किंवा इतर मागासवर्गीय समाजाचा नगरसेवकावला देण्यात येईल, अशी घोषणा केली. खासदार ओवेसी यांच्या या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी पसरली आहे. एमआयएमची सत्ता महापालिकेवर येईल का नाही, हे सांगणे अवघड आहे, पण आतापासूनच पदांचे वाटप सुरू केले आहे. त्यामुळे नाराजीची भावना आहे, मात्र याबाबत एमआयएमच्या एकाही उमेदवारांने थेट बोलण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदेशाध्यक्षांकडून विलासराव गटाची उपेक्षा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख गट दुर्लक्षित ठेवल्याचे दिसून आले. चव्हाणांच्या दौऱ्यात विलासराव गटाचे नेते बैठका, महत्त्वाच्या चर्चांपासून दूर दिसून आले. चव्हाण यांचा पालिका प्रचारानिमित्त शुक्रवारी औरंगाबादेत आले होते. दुपारी त्यांनी नेते, कार्यकर्त्यांची भेट घेतली. सायंकाळी त्यांच्या तीन प्रचार सभा झाल्या. त्यानंतर रात्री चव्हाणांनी माजी आमदार नितीन पाटील यांच्या घरी निवडक नेत्यांशी संवाद साधला.

माजी मंत्री आरेफ नसीम खान, नितीन राऊत, सचिन सावंत, बाळासाहेब देशमुख, विश्वजित कदम हे त्यांच्यासमवेत उपस्थित होते. नेत्यांशी संवाद साधल्यानंतर चव्हाणांनी निवडक नेत्यांना सोबत घेऊन चर्चा केली. यावेळी आमदार सुभाष झांबड यांच्यासह मुंबईची कोअर टीम बैठकीत होती. याठिकाणी माजी आमदार डॉ. कल्याण काळे व एम. एम. शेख, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम बाहेरच्या सभागृहात बसून होते. परतूरचे माजी आमदार सुरेश जेथलिया तेथे पोचले. ते सुद्धा बैठकीत सहभागी झाले.

पालिका प्रचारात शेख, काळे यांच्यासह विलासराव देशमुख गटाचे नेते सक्रिय असताना त्यांना निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवल्याबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती. माजी पालकमंत्री बाळासाहेब थोरात हे सुद्धा प्रचारानिमित्त शुक्रवारी शहरात होते, मात्र रात्रीच्या बैठकीसाठी तेही उपस्थित नव्हते. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे अशोक चव्हाण गटाचे मानले जातात. आमदार सत्तार सुद्धा बैठकीसाठी उपस्थित नव्हते. या प्रकाराची काँग्रेस कार्यकर्त्यांत चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळ्यात वाहू लागला सहस्रकुंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

हिमायतनगर परिसरातील ​विदर्भ-मराठवाड्यात सीमेवरून वाहणारा पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा अवकाळी पावसामुळे ​भर उन्हाळ्यात वाहू लागला आहे. त्यामुळे ​शनिवारी पर्यटकांनी सहस्रकुंडचा धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली होती.

अवकाळी पावसाने जलसाठ्यात वाढ जाली नसली तरी ​किनवट राज्यरस्त्यावरील इस्लापूर पासून ४ किलो मीटर अंतरावर असलेला सहस्रकुंड ​धबधबा वाहू लागला अाहे. धबधब्याचे मनोहारी दृश्य दरवर्षी पावसाळ्यात पहावयास मिळते. परंतु, यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या अल्प पावसाने धबधब्याचे दृश्य पर्यटकांना पाहण्यासाठी वाट पहावी लागली होती. ​विलंबाने ​धबधबा सुरु झाल्याचे समजताच पर्यटकांची गर्दी उसळली. परंतु , अल्प पावसामुळे ​मोजक्या काही दिवसात धबधबा ​आटला होता. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला होता.

त्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या हजेरीने धबधब्याच्या दोन्ही धारा थोड्या प्रमाणातच का होईना वाहू लागल्या आहेत. अवकाळी पावसाने इस्लापूर व हिमायतनगर भागातील नाले भरून वाहू लागले. या ओढ्याचे पाणी नदीत मिसळून वाहिल्याने हा धबधबा सुरू झाल्याचे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंटेनरवर आदळली बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुण्याहून औरंगाबादला येणारी शिवनेरी व्होल्वो बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळली. या अपघातात गाडीचा चालक मरण पावला असून दहा प्रवाशी जखमी झाले आहेत. या शिवनेरी बसमधून जखमीसह अन्य प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर, काही वेळेनंतर अपघातग्रस्त शिवनेरीला एक ट्रकने पुन्हा धडक दिली. सुदैवाने दुसऱ्या अपघातात कोणाला इजा झाली नाही. ही घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्याहून ३३ प्रवाशांना घेऊन व्होल्वो (बस क्रमांक एमएच ०४ एफके ०७१२) औरंगाबादला निघाली होती. बस गंगापूरजवळील ढोरेगाव नजीक येताच कांद्याचा कंटेनर (क्रमांक एमएच ०६ एसी ५०६१) यावर आदळली. या घटनेत शिवनेरीचा चालक राजू ढोडींराम घुशिंगे हा स्टेरिंगवर अडकल्याने मरण पावला. या घटनेत अकरा प्रवाशी जखमी झाले. या प्रवाशांना शिवनेरीच्या संकटकालीन खिडकीतून बाहेर काढण्यात आले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर औरंगाबादचे कार्यशाळा व्यवस्थापक नंदकुमार कोलारकर, आगार व्यवस्थापक महाजन, एस. आर. नजन, दीपक बिराजदार हे अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर साडे चारच्या दरम्यान सुमारास अपघात झालेल्या शिवनेरीला (एमएच ३१ सीबी २३७८) या ट्रकने जोरदार धडक दिली. या दुसऱ्या अपघात एसटीचे अधिकारी आणि अन्य पोलिस कर्मचारी बचावले. या अपघातात जखमी झालेल्या सात प्रवाशांना घाटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तर तीन जखमींनी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

सेमीलक्झरीच्या चालकाने वाचविले प्रवाशांचे प्राण

पहाटे ३.३० वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातानंतर शिवनेरी बसमध्ये ३३ प्रवाशी अडकून पडले होते. शिवनेरीचा समोरुन झालेल्या अपघातामुळे, या बसचा दरवाजाही बंद झाला होता. यामुळे या बसमधील प्रवाशी हादरले होते. शिवनेरीच्या पाठीमागून येणाऱ्या एसटीच्या सेमीलक्झरीच्या ड्रायव्हरने गाडी थाबविली. एक काठीच्या सहाय्याने शिवनेरीचा आपात्कालीन खिडकी फोडली. एका बाजुच्या आपात्कालीन मार्गासह बसच्या मागील बाजुला असलेली खिडकीही फोडली. एसटीचालक डी. एल. चोपडे यांनी सुखरूप सर्व प्रवाशांना बाहेर काढून या घटनेची माहिती गंगापूर बसस्थानकाला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपक्ष उमेदवाराचे चिन्हच बदलले

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

एकनाथनगरमधील (वाॅर्ड क्रमांक १०१) अपक्ष उमेदवार जोत्सना इंगोले यांचे चिन्ह निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने बदलले. त्याच्या विरोधात इंगोले यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्यांच्या या याचिकेवर सोमवारी न्या. रवींद्र बोर्डे व न्या. व्ही. के. जाधव यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होईल.

जोत्सना इंगोले यांनी एकनाथनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. चिन्ह वाटपावेळी त्यांच्या पसंतीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी शोभा ठाकूर यांनी खुर्ची चिन्ह दिले. चिन्हासह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. खुर्ची चिन्ह घेऊन इंगोले यांनी प्रचाराला प्रारंभ केला. १५ एप्रिल रोजी निवडणूक विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनी उमेदवारास नोटीस बजावून खुर्चीऐवजी गॅस सिलिंडर हे चिन्ह दिले. ही नोटीस मागील तारीख टाकून देण्यात आली, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. इंगोले यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात निवडणूक निर्णय अधिकारी शोभा ठाकूर यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली.

खुर्ची हे चिन्ह घेवून प्रचाराने वेग घेतला आहे. मोठ्या प्रमाणावर खर्चही झाला आहे. हे चिन्ह बदलले तर नुकसान होईल, असा दावाही करण्यात आला आहे. खुर्ची हेच देण्यात यावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी शनिवारी न्या. सुनील पी. देशमुख यांच्यासमोर झाली. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. हे प्रकरण एक सदस्यीय खंडपीठासमोर चालू शकत नाही, असा निर्णय कोर्टाने दिल्यामुळे या याचिकेची सुनावणी सोमवारी द्विसदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे. याचिकाकर्त्याची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे हे मांडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादचे नामांतर अशक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मुस्लिम समाजाने येऊन मजलिस-ए-इत्तेहादुल-मुसलमीन'ला मते दिली तर या शक्तीसमोर कोणीही टिकणार नाही. त्यामुळे 'कोणी माईचा लाल' औरंगाबादचे नाव बदलू शकणार नाही,' असे उद््‍्गार एमआयएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी काढले.

महापालिका निवडणूक प्रचारासाठी अकबरुद्दीन ओवेसी यांची शनिवारी रात्री (१८ एप्रिल) आमखास मैदानावर सभा झाली. या सभेला मोठी गर्दी झाली होती. या सभेत आमदार ओवेसी यांनी शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर तिखट शब्दात टीका केली. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत मुस्लिम व दलित समाज एकत्र येऊन एमआयएमच्या पाठीशी उभा राहिल्यास पालिकेवर एमआयएमचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही,' असे आमदार ओवेसी म्हणाले. 'वांद्रे विधानसभा निवडणुकीत एमआयएम मातोश्रीच्या दारापर्यंत पोहोचली होती. हिंमत असेल, तर या 'कागदी वाघां'नी हैदराबादपर्यंत यावे,' असे आव्हान त्यांनी शिवसेनेला दिले.

केंद्र आणि राज्यातील भाजप, शिवसेनेच्या सरकारने देशाला हिंदुत्ववादी करण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. भाजपने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी लव्हजिहाद, घरवापसी आणि चार अपत्ये या सारख्या ‌वादग्रस्त विषयाला तोंड फोडले आहे. नरेंद्र मोदी सरकारने भ्रष्टाचार कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आघाडीवरही काहीच केले नाही, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसने आतापर्यंत मुस्लिमांना आरक्षण का दिले नाही, श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशी का लागू केल्या नाहीत, अर्थसंकल्पात मुस्लिम समाजासाठी मोठी तरतूद का केली नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. काँग्रेस सरकारने अल्पसंख्याकांना काहीच दिलेले नाही, त्यांच्यावर कसा विश्वास ठेवणार, असा सवाल उपस्थित करीत आमदार ओवेसी यांनी काँग्रेस पक्ष 'सॉफ्टलाइन हिंदुत्ववादी' असल्याचा आरोप केला. हैदराबादमध्ये पक्षाचा २००० खाटांचा दवाखाना आहे, तेथे कमी दरात उपचार केले जातात. एमआयएमची सत्ता असताना मालमत्ता कर फक्त चार हजार रुपये होता. औरंगाबादमध्ये सत्ता आल्यास हैदराबादप्रमाणेच सुविधा देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.

मी मराठी माणूस

आमदार ओवेसी यांनी या सभेत बोलताना 'मराठी माणूस' या विषयालाही हात घातला. आपण नांदेड येथील मूळ रहिवासी असून ही आमची महाराष्ट्रात 'घरवापसी' आहे. 'मी पण मराठी माणूस आहे,' असा दावा करीत त्यांनी पक्ष मुंबई महापालिका निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षा असेल तरच विकास शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादसारख्या शहरामध्ये सुरक्षा आणि विकास हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत. पाणी, वीज, रस्ते शिक्षण हे मुद्दे निवडणुकीत महत्वाचे मुद्दे आहेत, पण शहरात शांतता राहत नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही, असे महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी येथे सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ते शहरात आले होते. ते म्हणाले की, शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला मोठा प्रतिसाद मिळेल. येत्या दोन दिवसांत जनतेमध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या पक्षाला अधिक फायदा होणार आहे. शहरात यश मिळवण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम करावे लागणार अाहेत. शहरामध्ये सुरक्षा आणि विकास हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, मात्र येथे देशविरोधी कारवाया करणाऱ्या गोष्टी वाढता कामा नये.

एमआयएम पक्षाचे नेते प्रचारादरम्यान प्रक्षोभक भाषणे करतात. त्यांच्या पक्षाच्या विचारांची मांडणी योग्य नाही. त्यांचा इतर पक्षांना तात्पुरता फायदा होईल. अशी विषवल्ली वेळीच ठेचण्याची गरज आहे. ते आपल्या देशात राहून पाकिस्तानचे गुणगौरव करतात, ते आम्ही खपवून घेणार नाही. भारतात राहता मग वंदे मातरम् म्हणायला का कचरता, नमस्कार करायला त्यांना काय अडचण आहे, असा सवालही खडसे यांनी यावेळी केला.

शहराच्या विकासासाठी पैशांची आवश्यकता असते. उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याची राजकीय पक्षांची मानसिकता आहे, मात्र कठोर पावले उचलण्यात अनेक अडचणी येतात. औरंगाबादमध्ये महापालिकेची मोठी थकबाकी आहे. थकबाकी वसूल केल्यास दोन वर्षे निधी पुरेल अशी अवस्था आहे. शहरामध्ये परिवहन यंत्रणा कोलमडली आहे. एकाच मार्गावर कमी पैशात कसा प्रवास करता येईल याबाबत अभ्यास सुरू असल्याचेही खडसे यांनी सांगितले.

चव्हाणांचे वक्तव्य राजकीय अस्तित्वासाठी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण हे काही दिवसांपासून मध्यावधी निवडणुकांबाबत वक्तव्य करत आहेत याबाबत खडसे म्हणाले की, चव्हाण सध्या विजनवासात आहेत. ते राजकीय अस्तित्वासाठी अशी वक्तव्ये करीत आहेत. त्यांना त्यांचे आमदार फुटण्याची भीती वाटत अाहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी अधिकाऱ्याकडे घबाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मंठ्याचे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरधे यांच्यावर पाच हजाराची लाच मागितल्याप्रकरणी मंठा येथे शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या शहरातील सिडको एन-४ येथील घराची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली. यामध्ये कोट्यावधी रूपयांची मालमत्ता असल्याचे आढळून आले.

मंठा जि. जालना येथील तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर शामलालजी बरधे (रा. एन-४, सिडको) यांच्याकडे एका शेतकऱ्याची शासनाची सबसिडी मिळवण्यासाठी रोटारोव्हरची फाईल आली होती. ही फाइल मंजूर करण्यासाठी बरधे यांनी दहा हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजार रूपये घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्यानंतर त्यांच्या पडताळणीमध्ये हे निष्पन्न झाले. या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात बरधे याने लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, औरंगाबाद विभागाच्या लाच लुचपत पथकाने बरधे यांच्या घराची शनिवारी रात्री झडती घेतली. यामध्ये त्याच्याकडे शेतजमीन, बंगले, रोख रक्कम, बँक खाते, कार आदी मालमत्ता आढळून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडखोरांना थारा देऊ नकाः मुंडे

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बंडखोर उमेदवारांना मतदारांनी थारा देऊ नये, शहराच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी महायुतीला विजयी करा असे प्रतिपादन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. शहरात विविध भागात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतल्या. मयूरपार्क, हर्सूल, चिकलठाणा आणि कोटला कॉलनी या वॉर्डात त्यांच्या सभा झाल्या. केंद्रात, राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आता शहरातही विकासासाठी युतीच्या हातीच सत्ता सोपवावी, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. पाय मुरगळा असतानाही पंकजा मुंडे यांनी रविवारी प्रचारासाठी हजेरी लावली. बंडखोरांचे आव्हान असले तरी, त्यांना ताळ्यावर आणण्याचे कार्य मतदार करू शकतात. हर्सूल परिसरातील मुस्लिमबहुल भागात मुंडे यांनी महिलांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, डॉ. भागवत कराड, रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, कचरू घोडके यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा ३९ अंशांवर; शहर तापले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे आतापर्यंत न तापलेले शहर आता तापू लागले आहे. एकीकडे शहरात महापालिका निवडणुकीचा प्रचाराचाराने राजकीय वातावरण तापलेले असताना आता उन्हाचा कडाकाही वाढला आहे. रविवारी (१९ एप्रिल) औरंगाबाद शहराचा पारा ३९.४ अंशापर्यंत पोचला.

गेल्या काही दिवसांपसासून शहराच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. या बदलाने शहरातील नागरिक घामाघून झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्यात उन्हाचा पारा आणखी वाढणार असून या आठवड्यामध्ये शहराचे कमाल तापमान ४० अंशापर्यंत जाऊ शकते. अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात शहराचे तापमान कमी झाले होते. गेल्या दोन तीन दिवसांपासून तापमानामध्ये पुन्हा एकदा बदल झाला असून तापमानामध्ये वाढ झाली आहे.

मतदानाच्या दिवशीही उन्हाचे चटके

बुधवारी (२२ एप्रिल) शहरामध्ये महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार मतदानाच्या दिवशी ३९ अंश राहण्याची शक्यता आहे. सोमवार ते शनिवार या संपूर्ण आठवड्यामध्ये साधारणतः तापमान एवढेच राहण्याची शक्यता आहे. २० व २१ एप्रिल रोजी शहराचा पारा ४० अंशापर्यंत पोचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २२ एप्रिल रोजी ३९ अंश तर २३ ते २५ एप्रिल दरम्यान शहराचे तापमान ३८ अंश सेल्सियसपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठवलेंची अवस्था ‘घरका ना घाटका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवीन पिढीला जुने पक्ष नकोसे झाले आहेत. दिल्लीची निवडणूक याचे उत्तम उदाहरण आहे. राष्ट्रीय पक्षांसोबतच दलित पक्षही निकाली निघाले असून आज रामदास आठवले यांची अवस्था 'ना घरका ना घाटका' अशी झाली आहे,' अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

औरंगाबाद शहर बचाव मोर्चाच्या उमदेवाराच्या प्रचारासाठी अॅड. आंबेडकर यांची रविवारी (१९ एप्रिल) संजयनगरमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते बोलत होते. 'आमदार- खासदारकी मिळवणे व कार्यकर्त्यांना दूर लोटणे,अशी आठवलेंची अवस्था आहे,' असे मत त्यांनी यावेळी मांडले.

'सध्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. राष्ट्रीय पक्षांसोबतच दलित पक्षांचाही निकाल लागल्यासारखी अवस्था झाली आहे. उत्तरप्रदेशात तीन वेळेस सत्ता स्थापन केलेला बहुजन समाज पक्ष महाराष्ट्राचा अपवाद वगळता इतर कोणत्याही राज्यात अस्तित्वात नाही. येत्या दीड वर्षांमध्ये बसपाचीही अवघड परिस्थिती होणार आहे,' असा दावा अॅड. आंबेडकर यांनी केला.

'आजच्या पिढीला जुने राजकरण नको आहे,. त्यांना राजकारणाचा नवीन विटी-दांडू व नवीन खेळाडू हवे आहेत. त्यामुळे नवीन पिढी नवीन राजकीय पर्यायाच्या शोधात आहे,' असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 'औरंगाबाद महापालिकेत सत्ता असणाऱ्यांनी नागरिकांसाठी पाण्याचीही सोय केली नाही. पैठणच्या धरणात पाणी आहे, मात्र ते शहरात सोडले जात नाही. पाण्यासाठी सर्वसामान्यांना अडवले जाते ही वस्तुस्थिती आहे. पाण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे; मात्र तसे होत नाही. शहरात वीज आणि स्वच्छतेचाही प्रश्न कायम आहे. जोपर्यंत तुम्ही कचऱ्याला दूर करत नाही, तो पर्यंत तुम्ही डॉक्टरालाही दूर करता येणार नाही. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणे शक्य आहे,' असे ते म्हणाले. या सभेच्या मंचावर भारिप बहुजन महासंघाचे नेते अविनाश डोळस, गौतम लांडगे, रामभाऊ पेरकर तसेच शहर बचाव मोर्चाच्या उमदेवारांची यावेळी उपस्थिती होती. सभेसाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडखोरांचे पानिपत करू!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महापालिकेच्या निवडणुकीची लढाई बिकट आहे. या लढाईत बंडखोरांचा प्रश्न कठीण आहे. बंडखोरांनी पानिपतची लढाई आठवावी. या निवडणुकीत आमचे पानिपत होणे शक्य नाही, पण बंडखोरांचे आम्ही पानिपत करू,' असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला. पालिका निवडणुकीत युतीच्या प्रचारासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची सभा झाली.

व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, प्रशांत बंब, खासदार अनिल देसाई, भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर आदी उपस्थित होते.

या सभेत उद्धव यांनी बंडखोरांचा समाचार घेतला. पानिपतच्या लढाईत मराठे का हरले याचे विश्लेषण करून ते उपस्थित जनसमुदायाला उद्देशून म्हणाले, 'नातेसंबंध, मित्र वगैरे लक्षात घेऊ नका. भगव्याशी नाते ठेवा. १९८८ पूर्वीचे दिवस आठवा. आता राज्यात आणि केंद्रात आपली सत्ता आहे. त्यामुळे विकासाची सुरुवात होत आहे. रस्त्यावरचे खड्डे एखाद्यावेळी भरून निघतील, पण बंडखोरांमुळे भलतेसलते काही घडले तर भलामोठा खड्डा पडेल. तो कधीही भरून निघणार नाही. बंडखोरांना मत म्हणजे 'एमआयएम'ला मत. या शहरात २०० एकरचा भूखंड पर्यटन हबसाठी राखून ठेवला आहे. समांतर जलवाहिनीचा प्रश्न असेल, रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न असेल. आता ही कामे आपले सरकार आल्यामुळे सुरू झाली. आता सूडचक्र संपले आहे.

पूर्वीच्या आघाडी सरकारला पालिकेने १,१०० कोटींची मागणी केली. सरकारने फक्त एक कोटी रुपये दिले. त्यामुळे शहरात जे खड्डे पडले ते त्या सरकारचे पाप होते. काँग्रेस- राष्ट्रवादी संपली आहे. या निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसने विकासावर बोलावे. नागरिकांना द्यायच्या सोयीसुविधांवर बोलावे. या विषयावर बोलण्याची आमचीही तयारी आहे. सोयीसुविधा पुरवल्या नाहीत हे त्या सरकारचे पाप होते. मी काही पाप केले असेल, तर तुमच्या समोर ताठ मानेने

येऊ शकणार नाही,' असा दावा उद्धव यांनी केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही बंडखोरांना इशारा दिला. ते म्हणाले, 'काही वॉर्डांत बंडखोरी आहे. जे जे बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्या सर्वांना भाजपमधून काढू टाकू. मतदारांनी बंडखोरांना घरी बसवावे.' पालकमंत्री रामदास कदम म्हणाले, 'पालिकेची ही निवडणूक तुमच्या सर्वांच्या अस्मितेची आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले पैसे घेऊन येतील. त्यांच्या पैशाला हात लावू नका. युतीच्या अधिकृत उमेदवारांनाच निवडून द्या.'

मातोश्रीच्या अंगणात आलेल्यांचे डिपॉझिट जप्त केले. जे अंगावर आले त्यांना मातोश्रीच्या अंगणात गाडून मी येथे आलो आहे. अंगावर याल तर हे वाघाचे बछडे सज्ज आहेत हे विसरू नका. ( ओवेसींचा उल्लेख करून) हैदराबाद काय तुझ्या बापाचे आहे काय?

- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोज २ शेतक-यांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भीषण दुष्काळ आणि गारपीटीच्या दुष्टचक्रात मराठवाड्यातला शेतकरी अडकला आहे. कर्जबाजारीपणामुळे दररोज दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत. गेल्या १०८ दिवसांत २५५ शेतकऱ्यांनी, तर गेल्या वर्षभरात पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातून दुष्काळ हटण्याचे नाव घेत नाही. ऐन पावसाळ्यात वरुणराजाचा रुसवा सुरू होतो. त्याची मनधरणी करता-करता शेतकऱ्यांची आयुष्य उद्धवस्त होत आहेत. यंदाही दुष्काळाची भीषणता कायम आहे. अनेक भागांत कसेबसे पिक तगले आणि आले. मात्र, या पिकांवरही अवकाळी पावसाने नांगर फिरवला. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडले. हातातोंडाशी आलेले पिक, वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्यांच्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिसेंबर २०१४पर्यंत पाचशेवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकारी दप्तरी आहे. मात्र, २०१५ वर्षांत अवघ्या तीन महिने १८ दिवसांच्या कालावधीत तब्बल २५५ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याचा आकडा आहे. प्रशासनाच्या चौकशीनंतर या पैकी केवळ १४४ आत्महत्यांच्या प्रकरणांना पात्र, ७६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित तर विविध करणांमुळे ३५ आत्महत्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. शासनाकडून देण्यात येणारा मदतीचा लाभ, ११८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाच मिळाला आहे. जानेवारी ते १८ एप्रिल २०१५ या कालावधीत बीड जिल्ह्यात सर्वाधिक ७३ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. त्या पाठोपाठ औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येकी ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. वर्षभरापूर्वी घेतलेले पीककर्ज, शवविच्छेदन अहवाल समितीला प्राप्त न होणे, शेतकऱ्यांच्या नावावर पीककर्ज नाही तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीसंदर्भातील कागदपत्रे पूर्ण नसल्याच्या कारणांमुळे या आत्महत्यांच्या प्रकरणांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादकर उकाड्याने त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद शहराच्या कमाल व किमान तापमानातही वाढ झाली आहे. या बदलाने जिल्हावासीय घामघूम झालेले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्यात उन्हाचा पारा आणखीन वाढणार असून, उस्मानाबादचे तापमान ४० अंशापार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरवर्षी वैशाख सरताना उस्मानाबादकरांना उन्हाळ्यातील सर्वात कडक तापमानाला सामोरे जावे लागत होते. परंतु, यंदा मात्र, वैशाख महिन्याच्या सुरूवातीलाच उस्मानाबाद जिल्हावासियांना कडक तापमानाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मार्च आणि एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात तापमानाची चढउतार, गारपीट यामुळे उन्हाची तीव्रता वाढली आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली. रविवारी ३९ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले. सोमवारी सुद्धा या तापमानात वाढ झाल्याचे अनुभवयास मिळाले. कडक उन आणि उकाड्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.

उस्मानाबादसह जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सूर्य नारायणाने रौद्र रूप धारण केल्याने उस्मानाबाद परिसरात उष्णतेची लाट पसरली असून यामध्ये उस्मानाबाद तुळजापूर, कळंब, उमरगा होरपळून निघाले आहेत. सूर्याच्या चढलेल्या पाऱ्याने कमालीचा उकाडा वाढला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते नागरिकांविना ओस पडलेले दिसत आहेत. सूर्याचा वाढता पारा पाहून नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंद करीत आहेत. या वाढत्या तापमानाचा परिणाम शेतातील मशागतीच्या कामाबरोबरच जलयुक्त शिवार अभियानाच्या कामावरही होऊ लागला आहे. खरीप पेरणी पूर्वीची मशागतीची कामे शेतकरी पहाटे किंवा सायंकाळी करताना दिसताहेत. त्याप्रमाणे तलावातील गाळ उपसण्याचे कामही दिवसा मंदावले आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाने तसा हिसका दाखवला नव्हता. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात मात्र, मोठ्या प्रमाणात त्याजची जाणीव होत आहे. रविवारपासून तापमानाने कहरच ‌केला आहे. सध्या तापमानाचा पाऱ्याने ३८ अशांचा आकडा पार केला आहे. मात्र, उकाड्यामुळे हे तापमान जादा आहे की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. मे महिन्याच्या मध्यानंतर तापमान वाढेल असे वाटत होते. तापमानाचा पारा वाढल्याने रात्रीच्यावेळी हवेत आद्रता तयार होऊन पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात पारा चाळिशीवर

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे उन्हाळ्याची जाणीव मराठवाड्यातील जनतेला झाली नव्हती. रविवारपासून तापमानात वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने घामाघूम झाले आहेत. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, जालना व बीड ‌जिल्ह्यातील तापमानाने ४० अशांचा आकडा पार केला आहे.

लातूरमधील तापमानात वाढ

लातूरः या उन्हाळयात पहिल्यांदाच नागरिक उन्हामुळे त्रस्त झाले आहेत. सोमवारी तापमापीचा पारा ३८ अंशावर गेल्याने कडक तापमानाला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मार्च आणि एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात तापमानाची चढउतार, गारपीट यामुळे उन्हाची तीव्रता रविवारपासून वाढली आहे. उन वाढल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. प‌हिल्यांदाच शहरातील रस्ते नागरिकाअभावी ओस दिसत आहेत.

उन्हाच्या झळाने बीडकर त्रस्त

बीडः गेल्या दोन दिवसांपासून उकाड्यात अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने बीड जिल्ह्यातील तापमान कमी झाले होते. मात्र, त्यामध्ये रविवारपासून अचानक वाढ झाली आहे. तापमापीचा पारा ४० अशांवर आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक त्रास हन करावा लागत आहे.

जालन्यातील रस्ते ओस

जालनाः जालना जिल्ह्यात रविवारपासून तापमानात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर जाणवत असून अचानक वर्दळ कमी झाली आहे. नागरिकाअभावी रस्ते ओस पडले आहेत. उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून त्यामुळे नागरिकांना थंड ठिकाणचा आसरा घ्यावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images