Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मृत शेतकऱ्याच्या कुटुंबास इफ्कोकडून आर्थिक मदत़

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

इफ्को खत कंपनीतर्फे संकट हरण योजनेतून सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तालुक्यातील राजू संपत चोपडे या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ८५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या मदतीचा धनादेश इफ्कोचे केंद्रीय संचालक अॅड. त्रिंबकराव शिरसाट यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कंपनीचे विभागीय व्यवस्थापक डी. डी. कुलकर्णी व जिल्हा व्यवस्थापक एस. एन. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

राजू संपत चोपडे यांचे २४ जुलै २०१४ रोजी सर्पदंशाने निधन झाले होते. त्यांनी २५ मे २०१४ रोजी विविध कार्यकारी सेवा संस्थेतून इफ्कोचे खत खरेदी केले होते. इफ्को कंपनीमार्फत अपघाती निधन झालेल्या शेतकऱ्याला लाभ दिला जातो. संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबाला खत खरेदीच्या पावतीनुसार प्रती गोणी चार हजार रुपये मदत दिली जाते. शेतकऱ्यांनी संस्थेकडून खत खरेदी केल्यानंतर पावती सांभाळून ठेवली तर आर्थिक मदत मिळू शकते. खाजगी दुकानदाराकडून खरेदी केल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही, असे सांगण्यात आले. अपघातात शेतकऱ्यास अपंगत्व आले, तर प्रति गोणी एक हजार रुपयांचा लाभ दिला जातो. यावेळी सेवा संस्थेचे सदस्य एकनाथराव जगधने, कृषी सहायक गुलाबराव खंडागळे, आनंदा राऊत, म्हातरजी वाघ, संपत चोपडे, हिरामण चोपडे, दत्तू देवमाळी, गंगाधर सुगंधे, गोरख ढंगारे, सांडू राऊत, गणपत वाघ, गमन कुदळे, मोहन बनसोड आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


९ गावांना २१ लाखांचे बक्षीस!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

'तंटा नाय तर घंटा नाय,' हे फक्त चित्रपटात शोभून दिसते. प्रत्यक्षात गावात भांडण-तंटा नसला की गावचा विकास होतो म्हणतात. ते काही खोटे नाही. तंटामुक्त गाव अभियान योजनेच्या २०१३-१४च्या पुरस्कारासाठी खुलताबाद तालुक्यातील ९ गावे पात्र ठरली आहेत. या गावांना २१ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. या बक्षिसातून गावात विविध विधायक कामांना गती मिळणार आहे.

गावातील तंटे गावात मिटवून गावात शांतता, सौख्य नांदावे यासाठी शासनाने तंटामुक्त अभियान ही योजना सुरू केली. यामुळे गावात लोकांचा समन्वय राहील गाव गुण्यागोविंदाने नांदेल यासाठी पोलिस ठाण्यांर्गत ही योजना राबविली गेली. शासनाने सन-१३-१४ या वर्षीचा पुरस्कार जाहीर केला आहे. या अनुषंगाने पोलिस ठाण्यांना बक्षिसाची रक्कम देण्यात आली. त्यांनी त्या गावांना समारंभपूर्वक ही रक्कम दिली.

उपविभागीय पोलिस अधिकारी राम मांडुरगे, अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर शिंदे, सिल्लोड ग्रामिण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या हस्ते त्या गावात जाऊन पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. बक्षीसपात्र गावातील सरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती सदस्यांसह गावकऱ्यांच्या उपस्थितीत बक्षिसाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

हे ठरले मानकरी

अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पानवडोद (खुर्द), खुपटा, वसई, मांडणा, खेडी या गावांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे पारीतोषिक मिळाले आहे. सिल्लोड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव बाजार गावास तीन लाख रुपये, पिरोळा-डोईफोळा या गावास ४ लाख रुपये बक्षीस मिळाले. वडोदबाजार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा व निल्लोड गावास प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाई आढावा बैठकीस ग्रामसेवकांची दांडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

तालुक्यातील पाणीटंचाईसंदर्भात गुरुवारी (२३ एप्रिल) झालेल्या पाणीटंचाई निवारण आढावा बैठकीकडे ग्रामसेवकांनी पाठ फिरवली. त्यामुळे नाराज झालेल्या उपविभागीय अधिकारी राजू नंदकर यांनी गैरहजर ग्रामसेवकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाण्याचे टँकर अडविण्याऱ्या ग्रामस्थांविरुद्ध पोलिस कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी भद्रा मारुती भक्तनिवास येथे उपविभागीय अधिकारी नंदकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व ग्रामसेवक, तलाठी, ग्रामसेवकांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तालुक्यात एकूण ३३ ग्रामसेवक कार्यरत आहेत. त्यापैकी पाणीटंचाई आढावा बैठकीस १९ ग्रामसेवक हजर होते. सहा गैरहजर, दोन कोर्टात, दोन रजेवर, दोन निलंबित, दोन कार्यालयात तर एक ग्रामपंचायतीच्या बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील ७६ गावे, तांडे, वाड्या, वस्त्यांना पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी गावनिहाय आढावा घेण्यात आला. पाणीटंचाई संदर्भात आंदोलन झाल्यास ग्रामसेवकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे तेथील तपासणी नियमितपणे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्या गावांना मंजूर असलेले पाण्याचे टँकर इतर गावात अडविण्याऱ्या ग्रामस्थांविरुद्ध पोलिस कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीटंचाई असलेल्या गावात विहीर अधिग्रहण व पाण्याचे टँकरचे सादर करा, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभारी अधिकाऱ्यांवर कारभार

$
0
0

विजय चौधरी, खुलताबाद

तालुक्यातील प्रशासकीय कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. त्यामुळे जनतेची कामे खोळंबली आहेत. खुलताबाद तालुक्यातील महत्वाच्या विभागांचा कारभार हा प्रभारीवरच सुरू आहे. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार सचिन घागरे रजेवर गेल्यामुळे नायब तहसीलदार प्रशांत काळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सविता हारकर रजेवर गेल्यामुळे अतिरिक्त तहसीलदार प्रशांत काळे यांच्याकडेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. तहसीलदार आणि नगरपालिका मुख्याधिकारी अशा दोन्हीही पदाचा कार्यभार मोठ्या कौशल्याने सांभाळून प्रशांत काळे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. तहसील कार्यालयातला कारभार पाहून पाणीटंचाईच्या काळात येसगाव येथील गिरजा मध्यम प्रकल्पातील नगरपालिकेच्या विहिरींना आडवे बोअर तसेच चारी खोदकाम स्वतः उपस्थित राहून सुरू केले आहे. तालुक्यातील ७६ गावांसह शहरवासियांना पिण्याचे पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागू नये, यासाठी त्यांनी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे.

तालुका कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण यांची पदोन्नतीवर बीड येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागी अद्याप तालुका कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. तालुका कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार गंगापूरचे तालुका कृषी अधिकारी वैजीनाथ हांगे यांच्याकडे आहे. गंगापूरचे गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार खुलताबादचे गटशिक्षणाधिकारी बी. बी. शिंदे यांच्याकडे आहे. आपल्या तालुक्याचा कारभार सांभाळून प्रभारी कार्यभार असल्यामुळे इतरही कामांचा ताण या अधिकाऱ्यांवर पडत आहे.

प्रशासकीय कामे रखडली

अतिरिक्त पदभार असल्यामुळे या अधिकाऱ्यांना आपल्या नियुक्ती असलेल्या ठिकाणी तसेच प्रभारी कार्यभार असलेल्या ठिकाणी पूर्ण वेळ देता येत नाही. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. वैयक्तीक लाभाच्या योजनांसह अनेक योजनांची कामे रखडली आहेत. प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत कामकाज सुरू असल्यामुळे अनेक फाइली प्रलंबित आहेत. त्यातच तालुका पाणीटंचाईच्या भीषण संकटात असताना जलयुक्त शिवार योजनेच्या कामात अडचणींचा डोंगर वाढल्याचे चित्र दिसत आहे.

म्हैसमाळ गट नंबर १२७मध्ये जमिनीच्या क्षेत्र दुरुस्तीचे प्रकरण नियमित तहसलीदार नसल्यामुळे प्रलंबित आहे. त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांकडे किडनी विक्री करण्याची परवानगी मागितली आहे.

- दिलीप बेडेकर, शेतकरी, म्हैसमाळ

खुलताबाद शहरात भीषण पाणी टंचाई आहे. शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. तो वेळेवर होत नाही. अशातच मुख्याधिकारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळित न झाल्यास आम्ही ४ मे रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत. पाणी प्रश्न न सुटल्यास आत्मदहन करू.

- निसार पठाण, माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात फक्त ५१ हजार लँडलाईन फोन्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) लँडलाईन फोन्स वापरणारे जिल्ह्यात फक्त ५१ हजार आहेत हे वाचून कोणालाही आश्चर्यच वाटेल, पण हे सत्य आहे. मोबाइलचा वाढता वापर, बीएसएनएलची योग्य नसलेली सर्व्हिस यामुळे ही संख्या तब्बल २ लाखाहून फक्त ५० हजारावर आली आहे.

वेगवेगळ्या योजना देऊनही ग्राहकांना संतुष्ट न करता वारंवार ग्राहकसंख्या घटण्याचे कारण म्हणजे तंत्रज्ञान असूनही योग्य वापर न होणे, अपुरे मनुष्यबळ आणि खासगी मोबाइलचा वाढता वापर हे सांगण्यात येत आहे. यामुळेच लँडलाईन कनेक्शन वाढविण्यासाठी बीएसएनएल सातत्याने विविध योजना जाहीर करीत आहे. सध्या इंटरनेटसाठी अतिउच्च दर्जाचे ब्रॉडबँड वापरणारेही फक्त १४ हजार ग्राहक आहेत. ही संख्या २००९ पासून सातत्याने घटत चालली आहे. २००९ या वर्षात जिल्ह्यात तब्बल २ लाख लँडलाईन फोन वापरणार ग्राहक होते. ते आज २०१५ या वर्षात ५१ हजारावर आले आहेत. ब्रॉडबँड युजर्स ४ ते ५ हजार होते. ते मात्र वाढून १४ हजार झाले आहेत. १४ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात लँडलाईन वापरणाऱ्यांची संख्या फक्त २३ हजार आहे. शहरात सुमारे २ लाख ८० हजार घरे आहेत. त्यामानाने फक्त २३ हजार लँडलाईन फोन कनेक्शन असणे ही बीएसएनएलला काळजीत टाकणारी बाब आहे. बीएसएनएल ब्रॉडबँड आणि मोबाइल इंटरनेटची प्रचंड मागणी आहे, मात्र विस्ताराची योजना बीएसएनएलकडे नाही. लँडलाइन मेंटेनन्ससाठी लागणारे साहित्य, मोबाइल सेवेसाठीचे टॉवर्स, एक्स्चेंज, केबल, ड्रॉप वायर वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. यामुळे सेवा देण्यात अडचणी येतात.

मोबाइलचा वाढता वापर व बीएसएनएलची झालेली दुरवस्था काही कोणापासून लपलेली नाही. सातत्याने बीएसएनएल वाचवण्यासाठी गेल्या दोन वर्षात ५ आंदोलने झालीत, पण उपयोग झाला नाही. ६४५ कर्मचारी आज शहरातील बीएसएनएलच्या विविध कार्यालयात कार्यरत आहेत. पूर्वी ही संख्या १ हजाराच्यावर होती. लोकं सोडून गेले तरी मनुष्यबळ भरलेच गेले नाहीत. याचा परिणामही सेवांवर होतो. - रंजन दाणी, अध्यक्ष, बीएसएनएल यु‌नियन फोरम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजयी उमेदवाराच्या घरावर हल्ला

$
0
0

औरंगाबाद : काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराने एमआयएमच्या विजयी उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी रहेमानीया कॉलनीत घडला. रहेमानीया कॉलनी वॉर्ड क्रमांक ४१ येथे काँग्रेसकडून रमजानीखान नवाबखान तर एमआयएमकडून शेख इर्शाद इब्राहिम निवडणुकीसाठी उभे होते. गुरूवारी झालेल्या मतमोजणीमध्ये शेख इर्शाद विजयी झाले. सायंकाळी नवाबखान यांनी दहा ते पंधरा समर्थकांसह शेख इर्शाद यांच्या घरावर हल्ला चढवला. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. शेख इर्शाद यांच्या गटाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला. जिन्सी पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात एक एकरावर डंपिंग ग्राऊंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

सातारा-देवळाई नगर पालिकेच्या हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक एकरापेक्षा जास्त जागा डंपिंग ग्राउंडसाठी वापरण्यात येणार आहे. देवळाईतील गट क्रमांक १४५मध्ये ही जागा आहे. जिल्हा प्रशासनाकडे या जागेची मागणी करण्यात आली आहे.

पालिकेने ३ घंटागाड्या व २० हातगाड्या खरेदीची प्रकिया सुरू केली असून, ते पूर्ण झाल्यावर पुढील महिन्यापासून परिसरातील कचरा गोळा करून त्याची डंपिंग ग्राउंडमध्ये विल्हेवाट लावण्याची प्रकिया सुरू होईल. ७५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सातारा-देवळाईत पाण्यानंतर कचऱ्याची समस्या भीषण आहे. आतापर्यंत कचरा उचलण्यासाठी येथे कुठलीही यंत्रणा नव्हती. सफाई कर्मचारी कचरा जागेवरच जाळून टाकत असत. हॉटेल, मंगल कार्यालये व रहिवाशांचा कचरा आसपासच्या मोकळ्या जागेत तसाच पडून राहिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.

नगर पालिकेने १३ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत प्रत्येक वॉर्डात १ व चौकात ५ अशा ३० कचराकुंड्या, २० हातगाड्या व ३ घंटागाड्या खरेदीची प्रकिया सुरू केली आहे, परंतु जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिग ग्राउंडचा प्रश्न बाकी होता. देवळाईतील गट क्रमांक १४५ मधील ५१ आर म्हणजे एक एकरपेक्षा जास्त शासकीय गायरान जागा डंपिग ग्राउंडसाठी निश्चित केली आहे. ही जमीन नागरी वसाहतीपासून दूर असून, त्याच्या दोन बाजुंना वन खात्याची जमीन व डोंगर, तर एका बाजुला खासगी पडिक जमीन, तर एका बाजुला म्हाडा कॉलनी आहे. या जमिनीची पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पाहाणी केली.

केंद्र सरकारकडूनही स्वच्छतेसाठी सूचना

केंद्र सरकारने 'स्वच्छ भारत अभियान' राबविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रोज संपूर्ण कचरा उचलावा. त्याच्या वाहतुकीसाठी वाहनांची व्यवस्था करावी. वैद्यकीय कचरा गोळा करून जाळून टाकावा. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी जागेची प्राधान्याने निवड करावी. या जागेभोवती झाडे लावावीत, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. पालिकेने जिल्हा प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात या सूचनांचा उल्लेख करण्यात आला आहे.

पुढील महिन्यापासून कचरा गोळा करून त्याची डंपिंग ग्राउंडमध्ये विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.

- अशोक कायंदे, मुख्याधिकारी, सातारा-देवळाई नगर परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून प्रलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन महिन्यांपासून काही केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे वेतन रखडले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार शालार्थ वेतनप्रणालीनुसार ऑनलाइन झालेले आहेत. वेतन रखडल्याने प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ९ हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. पूर्वी केंद्राकडून तालुक्याला आणि तिथून जिल्ह्यात पगारबिले आल्यानंतर वेतन काढण्याची प्रक्रिया होत होती. या विलंब झाला तर १५ तारखेपर्यंत वेतन होत नव्हते. शिक्षकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने काही महिन्यांपूर्वीपासून ऑनलाइन वेतन देणे सुरू केले. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला होता, पण दोन महिन्यांपासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शिक्षकांची पगाराची बिले रखडली आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या गुरुजींना दुहेरी त्रास होत आहे.

याशिवाय ४७ शिक्षकांचे तब्बल ५४ लाखांची पुरवणी बिले प्रशासनाने त्रुटी दाखवून अडवून ठेवली आहेत. त्यामुळे औरंगाबाद तालुक्यातील शिक्षकांची दयनीय अवस्था झाली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने या दोन्ही प्रश्नी पंचायत समितीमधील शिक्षण व अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली, मात्र टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जालना रोड ८ वर्षांनी गुळगुळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल आठ वर्षांनंतर जालना रोडला गुळगुळीत होण्याचे भाग्य लाभले आहे. डागडुजी आणि डांबरीकरणासाठी राज्य सरकारकडून एक रुपयाही दिला न गेल्याने या रस्त्याची डागडुजी रखडली होती. मार्चअखेर चार कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाले. त्यातून जालना रोड, जळगाव रोडचे डांबरीकरण सध्या सुरू आहे.

महापालिकेच्या हद्दीत असलेल्या पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या पाच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मागितला असता राज्य सरकारने ठेंगा दाखविला होता. दोन वर्षांपूर्वी या पाच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २१ कोटी रुपये तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांनी मंजूर केल्याचा दावा स्थानिक नेत्यांनी केला होता. वर्षभर पाठपुरावा करूनही प्रत्यक्षात एक रुपयाही मिळाला नव्हता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाठपुराव्यानंतर एक कोटी रुपये मिळाले. पैसे मिळणार नसल्याचे कळाल्यावर निविदा भरण्यासाठी कंत्राटदारही पुढे आले नव्हते. अखेरीस निधी आल्यावर कंत्राटदार निश्चित झाले पण आलेला अल्पनिधी काही दिवसातच संपला आणि काम बंद झाले होते. त्यात पावसाळा सुरू झाला. त्यानंतर निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आणि रस्ते दुरुस्ती आचारसंहितेत अडकली होती. त्यानंतर राज्यात नवीन सरकार आले.

युतीच्या सरकारकडूनही सुरवातीचे चार महिने औरंगाबादच्या रस्त्यांबाबत काहीच निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे यंदाचा पावसाळाही औरंगाबादकरांना रस्त्यावरील खड्ड्यातून काढावा लागणार की काय अशी शक्यता निर्माण झाली होती, पण मार्चअखेरीस चार कोटी रुपयांचे बजेट सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाले. त्यातून बाबा पेट्रोल पंप ते चिकलठाणा (सात किलोमीटर), सिडको बसस्टँड ते हर्सूल टी पॉइंट (पाच किलोमीटर) आणि हर्सूल टी पॉइंट ते दिल्ली गेट (दोन किलोमीटर) या रस्त्यांचे डांबरीकरण सुरू झाले. मस्कट कन्स्ट्रक्शन्स आणि अजीम कन्स्ट्रक्शन्स यांच्यामार्फत हे काम सुरू आहे. रस्त्यावर पहिला ३० मिलिमीटर (दोन इंच)चा थर देण्यात आला. त्यावर २० मिलिमीटर जाडीचे कारपेट (डांबराचे) अंथरले जात आहे. ज्यामुळे रस्ता गुळगुळीत होणार आहे. सर्वाधिक रहदारीचा जालना रस्ता आठ वर्षांनंतर गुळगुळीत होत आहे. रस्त्यांचे बहुतांश काम पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी हे तीनही रस्ते गुळगुळीत होणार आहेत.

जालना रस्ता, सिडको बसस्टँड रस्ता तसेच दिल्लीगेट रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. काम दर्जाचे होईल यावर पूर्ण लक्ष असून महिनाअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे टार्गेट आहे.''

- के. टी. वाघ, उपअभियंता, पीडब्ल्यूडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रवेशाच्या लॉटरी’त प्रश्नांचा भडिमार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरटीईत प्रवेश मिळूनही शाळा प्रतिसाद देत नाही. त्यांच्यावर कारवाई का होत नाही, शाळेचा कोटा स्पष्ट करा, केवळ गरजुंनाच लाभ द्या, पालकांच्या अशा अनेक प्रश्नांनी प्रवेशाच्या लॉटरीत अधिकाऱ्यांना भंडाऊन सोडले.

शुक्रवारी (२४ एप्रिल) संत तुकाराम नाट्यगृहामध्ये सर्व शिक्षा अभियान जिल्हा परिषद व महापालिकेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकारांतर्गत वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी लकी ड्रॉ काढण्यात आले. यावेळी पालकांनी व्यासपीठावर येऊन अधिकाऱ्यांसमोर आपल्या प्रश्नांचा भडिमार केला.

सर्वप्रथम चिमुकल्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून त्यांच्याच प्रवेशाचा लकी ड्रॉ काढण्यात आला. यासाठी शहरातील १५५ शाळांमधील १,६२५ जागांसाठी तब्बल ४,०७५ अर्ज आले होते. यामध्ये इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्जांची संख्या अधिक होती. साडेबारा वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, ड्रॉ नंतर पालकांनी प्रवेशासाठी ज्या शाळा पात्र आहेत, त्यांची यादी जाहीर करण्याची मागणी केली. यावर अधिकाऱ्यांनी तुम्ही संकेतस्थळ पाहा असे सांगताच पालक जागेवरून उठुन व्यासपीठावर आले. यादी जाहीर करा असे म्हणत व्यासपीठावर उपस्थित असलेले महापालिका आयुक्त प्रकाश महाजन, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, एन. के. देशमुख, आर. व्ही. ठाकूर यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यानंतर अधिकाऱ्यांनी आरटीई प्रवेशासाठी असलेल्या शाळांची यादी आणि विद्यार्थी संख्या वाचून दाखवली व प्रक्रियेबाबत पुन्हा माहिती दिली. आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा अशी सर्वांची इच्छा असते. प्रशासनाकडून ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात येईल, असे आश्वासनही अधिकाऱ्यांनी पालकांना दिले. यानंतर पालकांना समाधान झाले. शुक्रवारी झालेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश निश्चित झालेल्यांना दोन दिवसांमध्ये एसएसएस येतील व त्यानुसार १० मे पर्यंत संबंधित शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.

आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित झालेल्या शाळांमध्ये प्रतिसाद मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे पात्र शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलावण्यात येणार आहे. या शाळांनी प्रवेशामध्ये अडचणी निर्माण केल्यास, त्यांच्यावर कारवाई करणार आहोत.

- नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलेरियाचे जिल्ह्यात वर्षभरामध्ये ९० रुग्ण

$
0
0

औरंगाबादः जिल्ह्यामध्ये मलेरियाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी, २०१४ मध्ये ९० रुग्णांना मलेरिया (हिवताप) झाल्याचे स्पष्ट झाले. अर्थात, यातील बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील असून, शहरामध्ये मलेरियाचे प्रमाण अल्प असल्याचेही दिसून आले आहे. त्यातही वैजापूर तालुक्यामध्ये मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक असल्याचे समोर आले. २५ एप्रिल हा हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मलेरियामुळे जिल्ह्यात मागच्या वर्षी एकही मृत्यू नसल्याची 'खूशखबर' जिल्हा हिवताप कार्यालयातून देण्यात आली. विशेष म्हणजे मागच्या वर्षभरात शहरामध्ये डेंगी, स्वाइन फ्लूने कहर केला; पण मलेरियाचे शहरातील प्रमाण अत्यल्प होते, हेही यानिमित्ताने दिसून आले. नागरिकांनी घर, परिसरामध्ये पाण्याची डबकी साचू देऊ नये, स्वच्छता राखावी आणि डासमुक्ती साधावी. हाच मलेरियासह विविध आजारांवर शाश्वत उपाय असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अविनाश कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेत फोडाफोडीचे राजकारण रंगणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महापालिका निवडणुकीचा दुसरा अध्याय आता सुरू झाला आहे. यात आता फोडाफोडीचे राजकारण रंगणार असून, त्यासाठी अपक्ष नगरसेवकांसह 'एमआयएम'ला टार्गेट केले जाणार आहे.

महापालिका निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही, परंतु शिवसेना - भाजप युतीला बहुमताच्या जवळ नेऊन पोचवले. त्यामुळे युतीचाच महापौर होणार हे स्पष्ट झाले आहे. महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी युतीला ७ नगरसेवकांची गरज आहे. युतीच्या निवडून आलेल्या बंडखोर नगरसेवकांची संख्या ११ आहे. त्यात भाजपचे ६ आणि शिवसेनेचे ५ नगरसेवक असल्याचे चित्र आहे. बंडखोर ११ नगरसेवकांची एकत्रित संख्या लक्षात घेतली, तर युतीच्या नगरसेवकांची एकूण संख्या ६१ होते. बंडखोरांसह भाजपची संख्या शिवसेनेच्या सदस्य संख्येएवढी (२८) होते. ५ पाच बंडखोर शिवसेनेच्या तंबूत परतल्यास शिवसेनेचे ३३ नगरसेवक होतात, परंतु अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेले राजू तनवाणी यांनी महापौरपदासाठी तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांचा डोळा काही अपक्ष नगरसेवकांसह एमआयएमच्या काही नगरसेवकांवर आहे. युतीच्या वाटाघाटीत पहिले महापौरपद भाजपला सुटले, तर तोडफोड करून बहुमताने महापौरपदावर विराजमान होण्याची व्यूहरचना भाजपतर्फे आखली जात आहे.

महापौर कोणाचा, आज ठरणार?

महापौरपदाच्या निवडणुकीची पहिली टर्म शिवसेनेला द्यायची की भारतीय जनता पक्षाला, याचा निर्णय शनिवारी मुंबईत होण्याती शक्यता आहे. महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचाही उद्याचाच शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दुपारी एकपर्यंत निर्णय होईल, असे मानले जात आहे.

यांनी नेले अर्ज

महापौर

कीर्ती शिंदे (अपक्ष) - २ अर्ज

राजू वैद्य (शिवसेना) - २ अर्ज

नंदकुमार घोडेले (शिवसेना) - २ अर्ज

विकास जैन (शिवसेना) - २ अर्ज

त्रिंबक तुपे (शिवसेना) - २ अर्ज

भगवान घडमोडे (भाजप) - ४ अर्ज

अफसर खान (काँग्रेस) - २ अर्ज

सिद्दिकी नासेर (एमआयएम) - २ अर्ज

उपमहापौर

कीर्ती शिंदे (अपक्ष) - २ अर्ज

अफसर खान (काँग्रेस) - २ अर्ज

सिद्दिकी नासेर (एमआयएम) - २ अर्ज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा दिवसांत पर्यटन बस सुरू!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या दहा दिवसांत वेरूळ-अजिठ्यांचा प्रवास सुखदायी, हवेशीर, थंडगार होणार आहे. याला कारण म्हणजे वर्षभरापासून वेटिंगवर असलेल्या पर्यटन बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या निधीतून या दोन व्हॉल्वो वातानुकूलित बस खरेदी करण्यात आल्या आहेत.

औरंगाबादमध्ये येणाऱ्या विदेशी आणि देशी पर्यटकांना जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी, खासगी गाड्या किंवा एसटीच्या विनाआराम बस मधून प्रवास करावा लागत आहे. या पर्यटकांना वातानुकूलीत बसमध्ये प्रवास करता यावा, यासाठी व्हॉल्वो बस खरेदी करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी मांडला होता. आर्थिक चणचणीत असलेल्या एसटी विभागाने व्हॉल्वो खरेदी करण्यात असमर्थता दर्शविली होती. यामुळे पर्यटकांच्या सुविधेसाठी दोन व्हॉल्वो (वातानुकूलीत बस) विकत घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटी ८० लाखांचा निधी वर्षभरापूर्वी दिला होता.

वातानुकूलीत बस खरेदी करण्याचा प्रस्ताव एसटीच्या लालफिती अडकला. त्यामुळे या बस खरेदी करण्यास उशीर लागला. सदर बस खरेदीबाबत महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयात तत्कालीन विभागीय नियंत्रक संजय सुपेकर यांनी प्रयत्न केले होते. याशिवाय सध्याचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनीही सदर बस खरेदीबाबत महामंडळात वारंवार संपर्क करून निविदेबाबत माहिती घेतली. त्या प्रयत्नाला अखेर यश आले.

एसटी महामंडळाने एकूण १२ बस खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यातील दोन बस औरंगाबादसाठी मिळणार आहेत. या बस रायगड येथे आणण्यात आल्या आहेत. आगामी दहा दिवसांत या वातानुकूलीत बस पर्यटकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

चालकांना विशेष प्रशिक्षण

पर्यटकांसाठी सुरू होणाऱ्या या बस चालविण्यासाठी ४ चालकांना बेंगळुरू येथे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी एसटीच्या चार चालकांना बेंगळुरू येथे पाठविण्यात आल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी केलेल्या प्रयत्नामुळे वातानुकुलीत दोन वातानुकूलीत बस घेण्यात आल्या आहेत. पर्यटकांसाठी त्या लवकरच औरंगाबादला आणल्या जाणार आहेत.- आर. एन. पाटील;

विभाग नियंत्रक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएमने मारली मुसंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जकात नाका निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील ११ पैकी सात वॉर्डात एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. सिडको एन सहा वॉर्डात शिवसेना, गुलमोहर कॉलनीत भाजपा, राजाबाजार व कैसर कॉलनीत अपक्ष विजयी झाले.

या केंद्राची मतमोजणी एमजीएम बॅडमिंटन हॉल येथे करण्यात आली. संजयनगर खासगेट वॉर्डात पिछाडीवर असल्याने काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते जफर खान यांनी प्रतिनिधींसह मतमोजणी केंद्र सोडले. या वॉर्डात एमआयएमच्या शेख समिना इलियास विजयी झाल्या. नवाबपूरा वॉर्डातून एमआयएमचे उमेदवार फिरोज खान यांनी काका कैसरखान यांच्यावर विजय मिळविला. शहाबाजार वॉर्डातून सरवत बेगम आरेफ हुसैनी, अल्तमश कॉलनीतून अयुब जहागीरदार बारी कॉलनीतून अस्मा पठाण यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. इंदिरानगर उत्तरमध्ये उमेदवारांच्या जास्त संख्येमुळे कोणाला विजय होणार याबद्दल उत्सुकता होती. या वॉर्डातून एमआयएमचे शेख जफर यांनी विजय मिळवला. गुलमोहर कॉलनी वॉर्डातून भाजप उमेदवार शिवाजी दांडगे हे विजयी झाले. सिडको एन सहा वॉर्डातून माजी महापौर विमल राजपूत आणि शीतल गादगे यांच्यात थेट लढत झाली, शिवसेनेच्या गादगे यांनी ६३ मतांनी विजय मिळवला. अविष्कार कॉलनीत अखेरच्या फेरीपर्यंत एमआयएम विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत झाली. अखेरच्या फेरीत एमआयएमचे अब्दुल रहीम नाईकवाडी यांनी १७ मतांने विजय मिळवला. राजाबाजार वॉर्डातून सिद्ध विरुद्ध बखारिया अशी लढत झाली. या लढतीत अपक्ष तरूण उमेदवार यशश्री बखारिया यांनी रिना सिद्ध यांना पराभूत केले.

राजाबाजार वॉर्डाची मतमोजणी होताना एक बॅलेट मशीन बॅटरी नसल्याने सुरू होत नव्हते. या मशीनमधील चिप दुसऱ्या मशीनमध्ये बसवून मतमोजणी करण्यात आली. हे मशीन उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या हातूनच बदलण्यात आले.

फेरमोजणी फेटाळली

सिडको एन सहा वॉर्डातून शिवसेनेच्या शीतल गादगे आणि ‌शिवसेनेच्या बंडखोर माजी महापौर उमेदवार विमलबाई राजपूत यांच्यात थेट लढत झाली. कमी मतांनी पराभव झाल्याने राजपूत आणि पूत्र किशोर यांच्यासोबत मतमोजणी केंद्र सोडले. पण काही वेळाने परत येऊन फेरमतमोजणीची मागणी केली. परंतु, निवडणूक निर्णय अधिकारी नारायण उबाळे यांनी निकाल घोषित झाल्याने फेरमोजणी होत नसल्याचा नियम दाखविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेक्षकांच्या खिशावर डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील 'अंजली बिग' मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांना तिकिटासोबत फूड कुपन घेण्याची सक्ती आहे. या मनमानी प्रकारामुळे इच्छा नसूनही ६० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो, अशी तक्रार प्रेक्षकांनी केली आहे. तर फूड कुपनची सक्ती नसून सवलतीचे पर्याय आहेत, असा खुलासा मल्टिप्लेक्स प्रशासनाने केला आहे. फूड कुपन फॉर्म्युलामुळे विद्यार्थी प्रेक्षकांची सर्वाधिक कुचंबणा सुरू आहे.

शहरातील पाच मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन स्किम राबविल्या जात आहेत. 'अंजली बिग' मल्टिप्लेक्समध्ये ९०, ८० आणि ६० रुपये तिकीट दर आहे. या मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट पाहणारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. पूर्वीपासून मराठी चित्रपटांचे माहेरघर असा लौकिक असलेल्या चित्रपटगृहाची मल्टिप्लेक्स झाल्यानंतरही जुनी ओळख कायम आहे. मराठी चित्रपट पाहण्यासाठी मध्यमवर्गीय प्रेक्षक आणि विद्यार्थी असतात. प्रेक्षकांना मागील काही महिन्यांपासून फूड कुपन प्रकाराने जेरीस आणले आहे. प्रत्येक तिकिटासोबत ६० रुपयांचे फूड कुपन सक्तीने दिले जात आहे. एका कुटुंबातील चार प्रेक्षकांना तिकिटासाठी किमान सहाशे रुपये खर्च येतो. तसेच कमी खर्चात चित्रपट पाहण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थी प्रेक्षकांना फूड कूपन घेणे परवडत नाही. अंजली मल्टिप्लेक्समध्ये नियमित मराठी चित्रपट पाहणारे अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी अक्षय उगले आणि अजिंक्य देवणीकर यांना हा वैताग देणारा अनुभव आला. 'फूड कुपन नको' असे तिकीट खिडकीवर सांगूनही त्यांना सक्तीने कुपन दिले गेले. कुपन घेणार नसल्यास तिकीट मिळणार नाही असे उत्तर मिळाले. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स' कार्यालयात येऊन दोघांनी अडचण मांडली. तीन वेगवेगळ्या दरांची तिकीटे असतात; मात्र वरच्या श्रेणीतील दोन तिकिटांसोबत हमखास फुड कूपन देतात. तब्बल ६० रुपये खर्च करून पॉपकॉर्न खाण्याची इच्छा नाही. मग प्रेक्षकांच्या हक्कांवर गदा आणणे चूक आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाराचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाशी त्यांनी संपर्क साधला. यावेळी विभागातील अधिकाऱ्यांनी फूड कुपनचे पुरावे घेऊन येण्यास बजावले. त्यामुळे दोघांनी मल्टिप्लेक्सच्या तिकीट खिडकीवर मोबाइलने 'स्टिंग ऑपरेशन' केले. या चित्रीकरणात काउंटरवरील व्यक्ती या विद्यार्थ्यांशी फूड कुपनवरुन हुज्जत घातल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार सुरू असताना करमणूक कर विभागाचा कर्मचारी उपस्थित होता. कुपनची सक्ती प्रेक्षकांना मराठी चित्रपटापासून दूर ठेवत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

ऑनलाइन सोयीचे

शहरातील मल्टिप्लेक्समधील तिकिटासाठी ऑनलाइन बुकिंग करता येते. ऑनलाइन बुकिंग केल्यास फूड कुपनची सक्ती करता येत नाही; मात्र ऑनलाइन बुकिंगसाठी जास्तीचे १३ रुपये मोजावे लागतात. शहरातील कोणत्याही मल्टिप्लेक्समध्ये फूड कुपनची सक्ती नाही. त्यामुळे अंजली बिग मल्टिप्लेक्सने सक्ती करू नये अशी मागणी प्रेक्षकांनी केली आहे.

मल्टिप्लेक्स आणि करमणूक कर विभाग यांच्या संगनमताने प्रेक्षकांच्या खिशावर डल्ला मारण्याचा हा प्रकार आहे. स्वस्तात मराठी चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा फूड कुपनच्या सक्तीमुळे संपली आहे.

- अक्षय उगले, प्रेक्षक

मल्टिप्लेक्समध्ये कॉम्बो ऑफर आहे. तिकिटासोबत कुपन घेतल्यास शीतपेय आणि पॉपकॉर्न ६० रुपयात मिळते. तिकिटाशिवाय खरेदी केल्यास शीतपेय ६० आणि पॉपकॉर्न ६० रुपयांना मिळते. प्रेक्षकांच्या सोयीसाठी ऑफर असून सक्ती नाही.

- विनोद लोखंडे, व्यवस्थापक, अंजली मल्टिप्लेक्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपला सत्तेत निम्मा वाटा हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिकेच्या सत्तेत भारतीय जनता पक्षाला निम्मा वाटा हवा आहे. भाजपने महापौर पदावर दावा केला असून, तसा प्रस्ताव मित्रपक्ष शिवसेनेला शुक्रवारी सादर केला. यावेळी सत्तेतला निम्म्या वाटा देण्याची मागणी भाजपने केली. त्यावर युतीच्या नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. एमआयएमच्या प्रवेशामुळे यंदाची महापालिका निवडणूक चांगलीच रंगतदार ठरली. त्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस स्वबळावर लढल्याने आणि अपक्षांनी लावलेल्या ताकदीमुळे अनेक वॉर्डांत अटीतटीचा सामना पाहण्यास मिळाला. अखेर जनतेने पुन्हा एकदा युतीच्या पारड्यात कौल दिला. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ३० सदस्य होते. यंदा हा आकडा २८ वर आला.

भाजपच्या मात्र आठ जागा वाढल्या असून एकूण २३ नगरसेवक विजयी झाले. मात्र, स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठी युतीला आता बंडखोर, अपक्षांची मदत घ्यावी लागत आहे. गेल्या टर्ममध्ये कमी जागा मिळाल्याने सत्ता वाटपात भाजपला दुय्यम स्थान देत शिवसेनेने पाच वर्ष महापौरपद स्वतःकडे ठेवले. यंदा मात्र महापौरपदासाठी भाजप आग्रही आहे. सत्तास्थान वाटपासंदर्भात शुक्रवारी युतीच्या नेत्यांची बैठक झाली. यात खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, भाजपचे आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष भगवान घडमोडे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, डॉ. भागवत कराड, संजय केणेकर आदी उपस्थित होते.

यात सत्तेत पन्नास टक्के वाटा मिळाला पाहिजे तसेच महापौर पदाची पहिली संधी द्या, असा प्रस्ताव भाजपने सेनेसमोर ठेवला. या काळात उपमहापौर सेनेला दिले जावे, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. स्थायी समितीसह अन्य पदाबाबतही याप्रसंगी चर्चा झाली. मात्र, शिवसेनाही महापौरपदासाठी आग्रही आहे. त्यामुळे या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. यासंदर्भात उद्या (शनिवारी) युतीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. दरम्यान, यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यास शिवसेनेच्या नेत्यांनी नकार देत पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

महापौरपद निवडणूक वेळापत्रक

उमेदवारी अर्ज वितरित करणेः २५ एप्रिल दुपारी ३पर्यंत.

अर्ज स्वीकारणेः २५ एप्रिल पावणेसहापर्यंत.

अर्जांची छाननीः महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी विशेष सभा सुरू झाल्यावर सभागृहात पिठासन अधिकारी अर्जांची छाननी करतील.

अर्ज मागे घेणेः छाननीनंतर वैध अर्ज पिठासन अधिकारी जाहीर करतील. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक घेतली जाईल.

महापौरपदासह अन्य पदाबाबत शिवसेनेच्या नेत्यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. शुक्रवारी युतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात चर्चा झाली असून शनिवारी याबाबत निर्णय घेतला जाईल.

- अतुल सावे, आमदार भाजप

युतीच्या नेत्यांमध्ये सकारत्मक चर्चा झाली. सत्तेत पन्नास टक्के वाटा मिळावा, अशी अपेक्षा आहे. दोन्ही बाजूने प्रस्ताव देण्यात आले आहेत.

- शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप

भाजप नेत्यांसोबत चर्चा झाली. महापौर, उपमहापौरसह अन्य पदाचे वाटप कसे व्हावे, यासंदर्भात चर्चा झाली असून पक्षश्रेष्ठांना माहिती कळविण्यात आली. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.

- अंबादास दानवे, शिवसेना नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबा उत्पादनालाही उन्हाचा डाग

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्ह्यातील आंबा फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. या संकटातून वाचलेल्या फळबागांना आता तीव्र उन्हाचा फटका बसला आहे. मागील आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे फळगळ वेगात सुरू आहे. या बिकट परिस्थितीत मराठवाड्याची ओळख असलेले केशर आंबा उत्पादन अवघे ३० टक्के होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरवर आंबा फळबागा आहेत. जेमतेम पावसामुळे झाडांना नैसर्गिक ताण बसून आंब्याच्या झाडांना विक्रमी फुलोरा आला होता; मात्र जानेवारी महिन्यातील अवकाळी पावसात फुलोरा गळाला. अवकाळी पावसानंतरही झाडांना लक्षणीय फळे होती. एप्रिल महिन्यात गारपीट व अवकाळी पावसात फळांची प्रचंड नासाडी झाली. सध्या शिल्लक असलेल्या आंब्यांना उन्हाचा सामना करावा लागत आहे. मागील आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने फळे काळी पडली आहेत. झाडाला लगडलेली फळे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे पण, प्रचंड उन्हात फळे नामशेष होण्याची भीती आहे. 'उन्हाची तीव्र किरणे खूप वेळ राहिल्यास फळांवर काळे डाग पडतात. डाग पडल्यानंतर फळाचा दर्जा खालावतो आणि फळे लवकर खराब होतात. या परिस्थितीत फळांना वाचविण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे,' असे हिमायतबाग फळबाग संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केशर आंबा बाजारपेठेत येणार आहे. जिल्ह्यात केशरसह इतर स्थानिक आंब्याच्या जातीची हजारो फळबागा आहेत. या फळबागांना उन्हाचा फटका बसल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. औरंगाबाद, फुलंब्री आणि कन्नड तालुक्यांत सर्वाधिक आंबा उत्पादन होते. या फळबागांच्या संरक्षणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शेतकऱ्यांना उपाययोजनांची माहिती सांगण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ फळबागांना भेटी देत आहेत. रिधोरा (ता. फुलंब्री) गावात नुकताच आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. झाडांची विरळणी करून फळाला साधा कागद गुंडाळल्यास फळांचे संरक्षण होईल, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.

केशर निर्यात बंद

गारपीट आणि अवकाळी पावसाने आंब्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक संघाचे सदस्य केशर आंब्याची निर्यात करीत आहेत. अनेक देशात मराठवाड्यातील आंबा पोहचला आहे; मात्र यावर्षी स्थानिक बाजारपेठेतच केशर दिसणार आहे. निर्यातीसाठी गुणवत्तायुक्त आंब्याची वानवा आहे. यंदा उत्पादन घटल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत केशर आंबा ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होईल, असा अंदाज आहे.

पाणी टंचाई आणि वाढत्या उन्हात फळांना उन्हाच्या दिशेने कागदी पिशवी बांधावी. फळांना पानांच्या आत ठेवावे. या उपाययोजना केल्यास किमान ३० टक्के उत्पादन हाती येईल.

- डॉ. संजय पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हिमायतबाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक-ऑटोरिक्षाच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे निघालेल्या तुळजाभवानी भक्तांच्या ऑटोरिक्षाला ट्रकची धडक बसल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये ऑटोरिक्षाचे चेंदामेंदा झाले असून पाचजण जखमी झाले आहेत. ही घटना उमरगा-सोलापूर महामार्गावरील भुसणी पाटीजवळ शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. शांताबाई म‌‌क्कणा भोसले (वय ५०), सरू भालचंद्र मंडले (वय १८), शिल्पा मो‌हन मंडले (वय ५०) असे मरण पावलेल्यांची नावे आहेत. भुसणीवाडी ( ता. उमरगा) येथील मंडले कुटुंबिय एम. एच. २२ एच ९०४ या रिक्षाने कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी नातेवाईकासोबत निघाले होते. भोसगा पाटीजवळ हैदराबादकडे जाणाऱ्या एपी २६ एक्स ७०२९ या क्रमांकाच्या ट्रकने ऑटोरिक्षाला जोराची धडक दिली. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदावरून राजकारण रंगले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी युती केलेल्या शिवसेना, भारतीय जनता पक्षाने महापौरपदासाठी स्वतंत्र उमेदवार उभे करून एकमेकांना आव्हान दिले आहे. काँग्रेस आणि एमआयएम या पक्षांनीही महापौरपदासाठी उमेदवार दिले असल्यामुळे ही निवडणूक तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपला बहुमत मिळाले नाही. शिवसेनेचे २८ तर, भाजपचे २२ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे दोन्हीही पक्षांमध्ये महापौरपदासाठी स्पर्धा सुरू झाली. बंडखोर आणि अपक्ष नगरसेवक मिळून शिवसेनेपेक्षा आमचे संख्याबळ जास्त आहे, असे म्हणत भाजपने राजू शिंदे यांना महापौरपदाची उमेदवारी दिली. शिवसेनेने, मोठा भाऊ आपणच, अशी मनाशी खुणगाठ बांधत त्रिंबक तुपे यांचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर कला ओझा, गिरजाराम हळनोर आदी उपस्थित होते. राजू शिंदे यांचा महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमदार अतुल सावे, भाजपचे प्रदेश चिटणीस सुरजितसिंह ठाकूर, बसवराज मंगरुळे, अनिल मकरिये, डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

भाजपने यावेळी उपमहापौरपदासाठी प्रमोद राठोड यांचाही उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेने मात्र उपमहापौरपदासाठी कुणाचाही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. एमआयएम पक्षातर्फे गंगाधर ढगे यांचा महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. उपमहापौरपदासाठी शेख झाफर अख्तर आणि कादरी जमीर अहेमद रहीम अहेमद यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी आमदार इम्तियाज जलिल, जावेद कुरैशी, गफार कादरी, मुकुंद सोनवणे उपस्थित होते. काँग्रेसतर्फे अफसर खान यांनी महापौरपदासाठी तर भाऊसाहेब जगपात यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

येत्या बुधवारी मतदान

महापौर, उपमहापौरपदासाठी बुधवारी (२९ एप्रिल) मतदान होणार आहे. सकाळी अकरा वाजता विशेष सभा सुरू झाल्यावर उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यावर दोन्हीही पदांसाठी मतदान घेतले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्याने मारला ६६ हजारांवर डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका कर्मचाऱ्याने कार्यालयातील पैशांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने रोख २२ हजार रुपयांसह एटीएम कार्ड चोरून ४४ हजार रुपये चोरले आहेत. सेक्युरिटी सर्व्हिसेस कार्यालयात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी जवाहरनगर पोलिस तपास करीत आहेत.

रामचंद्र चौधरी (वय ४६, रा. शांतीनिकेतन कॉलनी) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांचा सेक्युरिटी मॅनेजमेंटचा व्यवसाय असून, शांतीनिकेतन कॉलनी येथे त्यांच्या पांडे सेक्युरिटी सर्व्हिसेसचे कार्यालय आहे. या कार्यालयात संशयित आरोपी रमेश दुबे (मुळ रा. बिकानेर, राजस्थान) गेल्या दोन महिन्यांपासून असिस्टंट म्हणून काम करीत होता. तो कार्यालयातच राहत असे. त्याने बनावट चावीचा वापर करून फिर्यादीच्या ड्रावरमधून २२ हजार रुपये व एटीएम कार्ड, दोन मोबाइलही चोरले.

आरोपीने एटीएम कार्डाचा वापर करून ४४ हजार रुपयेही काढून घेतल्याचे समोर आले आहे. २३ व २४ एप्रिल या दोन दिवसांत हा प्रकार घडला. कर्मचाऱ्यानेच चुना लावल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी जवाहरनगर पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान, संशयित आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही.

पासवर्ड घेतला

गेल्या काही दिवसापूर्वी फिर्यादी चौधरी हे पैसे काढण्यासाठी एका एटीएम सेंटरला गेले होते. पैसे काढण्यासाठी ते प्रक्रिया करत असतानाच गार्ड म्हणून सोबत असलेला संशयित आरोपी दुबे हा सेंटरमध्ये आला होता. त्याचवेळी त्याने एटीएम कार्डचा पासवर्ड पाहिला असावा, असे फिर्यादी चौधरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images