Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शेततळ्यांनी वाचविल्या फळबागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील फळबागांना भर दुष्काळात शेततळ्यांनी जीवदान दिले आहे. विहिरी व कूपनलिका कोरड्याठाक पडलेल्या असताना पाण्याने डबडबलेल्या शेततळ्यांवर शेतकरी विसंबून आहेत. जवळपास दीड हजार शेततळी शेतीसाठी संजीवनी ठरली आहेत. विशेषतः सर्वाधिक फळबागा असलेल्या औरंगाबाद तालुक्यात शेततळी शेतकऱ्यांसाठी जगण्याचा आधार ठरली आहेत.

एप्रिल महिन्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे पैठण, औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील फळबागा जळाल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळाच्या तुलनेत फळबागा जळण्याचे प्रमाण कमी आहे. विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठलेला असताना फळबागांना शेततळ्यांनी जिवंत ठेवले आहे. २०१२ मधील दुष्काळी परिस्थितीत सर्वाधिक शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली होती. यातूनच औरंगाबाद आणि पैठण तालुक्यात लक्षणीय शेततळी बांधली गेली. मागील वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात झालेल्या पावसाचे पाणी शेततळ्यात साठले आहे. शिवाय डिसेंबर, जानेवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यातील अवकाळी पावसाने शेततळ्यात पाणीसाठा टिकून आहे. शेततळी बांधल्यामुळेच पाणीसाठा शक्य झाला आहे. औरंगाबाद तालुक्यात डाळींब आणि मोसंबी फळबागांचे सर्वाधिक क्षेत्र आहे. जानेवारी महिन्यात विहिरींनी तळ गाठल्यानंतर शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या पाण्यावर फळबागा जिवंत ठेवल्या आहेत.

जिल्ह्यात २०१२ मध्ये १२०० शेततळी मंजूर झाली. तर त्यापूर्वीच्या शेततळ्यांची संख्या लक्षात घेता सद्यस्थितीत दीड हजार शेततळी आहेत. या पाण्यावर भाजीपाला, फळबागा व उन्हाळी पिके तरारली आहेत. पाच ते दहा वर्षे वयाच्या फळबागा तुटल्यास शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. नव्याने फळबाग लागवड करून पीक निघण्यास तीन वर्षांचा कालावधी लागतो. या कालावधीत आर्थिक उत्पन्नासाठी शेतकऱ्यांकडे दुसरा स्रोत नसतो. तीन वर्षांपूर्वी दुष्काळात किमान १२ हजार हेक्टरवरील फळबागा नामशेष झाल्या आहेत. यावर्षी अत्यल्प पावसाने भूजलस्तर खालावला आहे.

फळबागा आणि पिकांना पाणी देणे कठीण असल्याचे खरीप हंगामातच स्पष्ट झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रयत्न करून शेततळ्यात पाणीसाठा केला. या पाण्याने जिल्ह्यातील शेतीला नवी दिशा दिली असून दुष्काळाच्या छायेतही पिके जगली आहेत. या दुष्काळातही राज्य सरकारने शेततळ्यांसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी कृषी विभागाकडे प्रस्ताव आणत आहेत; मात्र सरकारी मंजुरी नसल्याने प्रस्ताव स्वीकारणे बंद आहे.

शेतकऱ्यांचे परिश्रम

कृषी विभागाने शेततळ्यांचे नवे प्रस्ताव स्वीकारणे बंद केले आहे. त्यामुळे ३३२ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेततळी बांधली आहेत. या शेततळ्यांची पाहणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली असून नियमावलीनुसार शेततळी बांधली गेली आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने पाठवला आहे. या प्रस्तावावर कृषी खात्याने अंतिम निर्णय घेतला नसल्यामुळे शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.

शेततळ्यांमुळेच औरंगाबाद तालुक्यातील फळबागा जिवंत आहेत. कदाचित, शेततळी नसती तर किमान दोन ते तीन हजार हेक्टर फळबागा तुटल्या असत्या. तालुक्यातील ४६० शेततळी फळबागांसाठी वरदान ठरली आहेत.

- अशोक कोंडे, तालुका कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन्हीही नाट्यगृहे अडगळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाच्या तडाख्याने प्रेक्षकांना संत एकनाथ रंगमंदिर आणि संत तुकाराम नाट्यगृहात बसणे अशक्य झाले आहे. नाट्यगृहांच्या नूतनीकरणाबाबत महापालिका प्रशासन दोन वर्षांपासून टोलवाटोलवी करीत आहे. तत्कालिन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी शहरातील नाट्यकर्मींच्या बैठकीत निविदा काढून नाट्यगृहाला सुस्थितीत आणू असे आश्वासन दिले होते, मात्र कांबळे यांची बदली झाल्यानंतर हे आश्वासन हवेत विरले आहे.

महानगरपालिकेच्या संत एकनाथ रंगमंदिर आणि संत तुकाराम नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. मोडक्या खुर्च्या, धुळीने माखलेला रंगमंच, रंग उडालेले पडदे, स्वच्छतागृहात पाण्याचा अभाव आणि एसी यंत्रणा बंद असल्यामुळे प्रेक्षक वैतागले आहेत. महापालिका निवडणुकीच्या कालावधीत महिनाभर दोन्ही नाट्यगृहे बंद ठेवली होती. कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी नाट्यगृह भाड्याने उपलब्ध नव्हते. सध्या दोन्ही नाट्यगृहे सुरू झाली असून प्रेक्षकांना उकाड्याने हैराण केले आहे. संत एकनाथ रंगमंदिरात सोमवारी (२७ एप्रिल) लावणी शो झाला. या प्रयोगावेळी वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने प्रेक्षकांची गैरसोय झाली. नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर शहरातील रंगकर्मी आणि नाट्य व्यावसायिकांनी आवाज उठवला होता. तत्कालिन मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याशी रंगकर्मींनी चर्चा केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीत लवकरच दोन्ही नाट्यगृहांचे नूतनीकरण करू, असे आश्वासन कांबळे यांनी दिले होते. तसेच दुसऱ्या दिवशी मनपा अभियंत्यांच्या पथकाने नाट्यगृहांची पाहणी करुन अहवाल तयार केला होता. या त्वरित कार्यवाहीमुळे नाट्यगृहे सुस्थितीत येतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात डॉ. कांबळे यांची बदली झाल्यानंतर हा विषय मनपाने गुंडाळला. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी दोन्ही नाट्यगृहांची अवस्था बिकट आहे. संत तुकाराम नाट्यगृहाचे प्लास्टर पडले असून काचांना जळमटे लागली आहेत. दोन्ही नाट्यगृहातील किमान पन्नास खुर्च्या मोडल्या आहेत. या खुर्च्या सोडून इतर खुर्च्यांची तिकीटे नाट्य व्यावसायिक देत आहेत. रंगमंचावर प्रचंड धूळ असल्यामुळे प्रथितयश कलाकारांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. संत एकनाथ रंगमंदिरातील रंगमंचावरील फळी पायात घुसल्याने एका कलाकाराला इजा झाली होती. हा सगळा प्रकार सुरू असूनही प्रशासनाने नाट्यगृहांना वाऱ्यावर सोडले आहे. या दुर्लक्षाबाबत रंगकर्मींमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

नव्या महापौरांकडून अपेक्षा

या आठवड्यात शहराचे नवीन महापौर निवडले जाणार आहेत. यापूर्वीच्या महापौरांनी कधीही नाट्यगृहांच्या प्रश्नावर चर्चेला वेळ दिला नाही. किमान नवीन महापौर चर्चा करून नाट्यगृहांचा प्रश्न मार्गी लावतील अशी रंगकर्मींची अपेक्षा आहे. नवीन नगरसेवक आणि महापौरांनी नाट्यगृहांनी सुस्थितीत आणावे अशी मागणी कलाकारांनी केली आहे.

शहराचे भूषण असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहांतील दुर्गंधीमुळे प्रेक्षकांची गैरसोय होते. पिण्यासाठी पाण्याची सुविधा नाही. या वास्तूला मनपाने अडगळीत टाकले आहे.

- अमोल सानप, प्रेक्षक

नाट्यगृहात 'एसी' नसल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी वाढल्यास निश्चितच गैरसोय होते. मनपा आयुक्तांची बदली झाल्यानंतर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा प्रश्न रेंगाळला आहे. हा प्रश्न लवकर निकाली निघाला पाहिजे.

- राजू परदेशी, नाट्य समन्वयक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर-जळगाव रेल्वे जालना मार्गेच

$
0
0

औरंगाबादः सोलापूर-जळगाव रेल्वेमार्ग जालना मार्गेच होणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पैठण आणि घृष्णेश्वर हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन या मार्गावर येऊ शकणार नसल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. सोलापूर-जळगाव या नवीन रेल्वे मार्गाची घोषणा तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी केली होती. या रेल्वे मार्गाच्या सहाय्याने सोलापूर, पैठण, जळगाव जोडले जाणार होते, मात्र दीड वर्षापूर्वी हा रेल्वेमार्ग जालनामार्गे करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या विरोधात मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठात दादही मागितली होती.

न्यायलयात प्रकरण गेल्यानंतर या रेल्वे मार्गाबाबत काहीच माहिती देण्यात येत नव्हती. अखेर २७ फेब्रुवारीला दिलेल्या पत्रात मध्य रेल्वेने नवीन रेल्वे मार्गांचा उल्लेख करीत हा रेल्वेमार्ग जालना, भोकरदन, केदार खेडा मार्गे सिल्लोडहून जाणार असल्याची माहिती दिली आहे. रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पर्यटन आणि धार्मिक स्थळांना जोडण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. सोलापूर-जळगाव या रेल्वेमार्गात पैठण आणि घृष्णेश्वर जोडले असते तर पर्यटक आणि धार्मिक पर्यटकांची संख्या वाढू शकली असती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार बसचा त्रास संपला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद-पुणे मार्गावर मागील दीड वर्षापासून धावत असलेल्या निमआराम बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. भंगारात काढाव्यात अशा बसही या मार्गावर प्रवाशांची ने-आण करीत होत्या. अखेर या मार्गावर आता १४ नवीन बस धावू लागल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. असे असले तरी अन्य काही मार्गावर अद्यापही दहा भंगार बसचा प्रवास सुरूच आहे.

औरंगाबादहून पुण्याच्या मार्गावर निमआराम विनावाहक बसला प्रवाशांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत होता, मात्र धावणाऱ्या बसची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. एसटी महामंडळाने नवीन बस खरेदी बंद केल्याने या बसेसचा अडीच लाख किलोमीटरचा प्रवास होऊनही त्या बदलता येत नव्हत्या. भंगार बस या मार्गावर धावू लागल्याने प्रवाशांची संख्याही घटली होती. उत्पन्नावर याचा परीणाम होऊ लागल्याने अखेर नवीन बस खरेदीची मंजुरी देण्यात आली.

सध्या औरंगाबाद बसस्टँडला १४ नवीन बस देण्यात आल्या असून या सर्व बस औरंगाबाद-पुणे मार्गावर धावत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा त्रास कमी झाला आहे. अन्य मार्गावर जुन्याच बस धावत आहेत. या बसेसही बदलून नवीन बस सुरू कराव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे.

१४ नवीन निमआराम बस सध्या सुरू केल्या आहेत. आणखी दहा बसची मागणी करण्यात आली आहे. त्या लवकरच आम्हाला मिळतील.

- आर.एन. पाटील, विभाग नियंत्रक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी, कर्मचाऱ्यांनी वाचविला महिलेचा जीव

$
0
0

औरंगाबाद : चेन्नई-नगरसोल एक्सप्रेसने येत असलेल्या महिलेला हृदय विकाराचा झटका आला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एस-७ कोचमध्ये प्रवास करणाऱ्या पद्मा शंकरन यांना जालना रेल्वे स्टेशनवर असताना छातीत त्रास होऊ लागला. तिथे त्यांना डॉक्टरांनी तपासले व त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे निदान झाले. त्या महिलेला तातडीने औरंगाबादला घाटीत घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. ही माहि‌ती कंट्रोल रूमवरून औरंगाबाद रेल्वे स्टेशन प्रमुख अशोक निकम यांना देण्यात आली. रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच निकम यांनी अॅम्ब्यूलन्स बोलाविली. रेल्वे पोहोचताच लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी त्वरेने पेशंट महिलेला बाहेर काढले. या कामात प्रवीण आणि सुभाष मेहेर महिलेला बाहेर काढून रुग्णवाहिकेत नेण्यास मदत केली. रेल्वे पोलिस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे जीव वाचविण्यासाठी धावपळ केल्यावर अन्य प्रवाशांनीही या मदत केली. महिलेस तातडीने घाटीत नेण्यात आले. अन्य प्रवासीही सोबत होते. रेल्वे कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनीही मदत केल्यामुळे या महिलेचे प्राण वाचू शकले, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. महिलेवर उपचार सुरू असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पादन घटल्याने मिरची तिखट

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

हंगामातच सातत्याने गारपीट झाल्याने मिरचीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात कोरड्या मिरचीची आवक मंदावली आहे. सध्या लाल कोरड्या मिरचीच्या बाजारात तेजी असून सरासरी सुमारे ६ हजार ते ७ हजार रुपये क्विंटल एवढा भाव मिळत आहे. मिरचीला नोव्हेंबर महिन्यात गारपिटीचा अधिक दणका बसला. गारपीट, अवकाळी पाऊस, वादळाचा परिणाम मिरची उत्पादनावर झाल्यामुळे व्यापाऱ्यांना परराज्यातील मिरची आयात करावी लागत आहे. कमी-अधिक प्रमाणात मिरचीचे उत्पादन सर्वत्र होते. साधारणपणे जानेवारीपासून लाल ओली मिरची बाजारात विक्रीसाठी येते. किरकोळ बाजारामध्ये कोरडी लाल मिरची ६ ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलने विक्री होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी मिरची 'तिखट' झाली आहे. हा भाव गेल्या आठवड्यात ५ हजारापर्यंत होता. ओली ‌लाल ‌मिरची ६० ते ७० रूपये किलो या दराने विकली जात आहे.

स्थानिक मिरची अत्यल्प

आंध्र प्रदेशातील गुंटुर, सोलापूर भागातून 'सी ५' या वाणाच्या मिरच्या तर मध्यप्रदेशातून बडवानी, धामणोद कुक्षी या भागातून पाच ते सहा व्यापारी मिरची विक्रीसाठी आणतात. रसगुल्ला, रेडचिली, चपाटा, संखेश्वरी, पाण्डी, लवंगी पटना, जरेला अशा विविध जाती मिरचीच्या आहेत.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

यावर्षी लहरी हवामानाने ओल्या लाल मिरचीचा बाजार थंड राहिला. ही मिरची फारशी विक्रीस आली नाही. ग्राहक आता परराज्यातील मिरची घेत आहेत. यासाठी येणारा वाहतूक खर्च पाहून विक्री केली जाते. त्यामुळे यंदा भाव तेज आहेत. साधारणत: ६ हजार ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिरचीचा दर आहे.

शशीकला खोबरे, भाजीविक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गहू, डाळीची ग्राहकांच्या दारी विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्राहकांच्या दारी डाळी व अन्नधान्यांच्या थेट विक्रीमुळे शेतकरी व डाळी उत्पादकांना दुष्काळात थोडा तरी दिलासा मिळाला आहे. ठिकठिकाणी होत असलेल्या आठवडी बाजारात व चौकाचौकातही शेतकरी डाळी व गहू विकताना दिसू लागले आहेत.

दरम्यान, जाधववाडी, मोंढा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत ग्राहकांकडून हमाली व तोलाई उकळली जाते. व्यापारीही मालाला मनमानी मनमानी भाव लावतात. हमाली, तोलाई शेतकरी घेत नसल्याने व व्यापारी व एजंटवर्गाचा त्रास नसल्याने ग्राहकांनाही आर्थिक फायदा होत आहे. शेतकरीच स्वतः माल विकत असल्याने मालाचीही खात्री मिळत असून त्यांची विक्रीही वाढली आहे. सोमवारी (दि.२७) पीरबाजारात गुजरात, राजस्थानहून आलेला गहू आणि डाळींची विक्री करताना काही शेतकरी व एजंट दिसले. याशिवाय शिवाजीनगर चौक, सुतगिरणी चौक, जिल्हा परिषद मैदान या भागातही काही डाळी उत्पादकांनी त्यांची उत्पादने विक्रीस आणल्याचे चित्र आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा सुमारे ३०० क्विंटल माल शहरातील विविध ठिकाणी आला आहे.

पीरबाजारात आलेला माल सुमारे १०० क्विंटल असून एवढाच माल रोज शहरातील विविध बाजारपेठेत येत असल्याचे काही एजंटांनी नाव न देण्याच्या अटीवर सांगितले. शहरात चार ठिकाणी आठवडी बाजार सुरू असून अभिनय थिएटरजवळ रविवार बाजार, सोमवारचा पीरबाजार, गुरूवारचा छावणी बाजार यात प्रसिद्ध आहेत.

...पण भाव चढेच

शेतकरी थेट आठवडी बाजारात माल विकत असले तरी भाव चढेच आहे. गहू २२०० ते २८०० रूपये क्विंटल, ज्वारी ३६०० ते ४००० रूपये क्विंटल तर डाळी ८० रूपये किलो ते ११० रूपये किलो यानुसार विकल्या जात आहेत. हरभरा, मठ, तूर, मूग आणि मसुरी या डाळींना सुमारे ११० ते १२० रूपये किलोचा दर गाठला आहे.

आवक घटली

तूरडाळ ६२ क्विंटल भाव ४५०० ते ५९४० रूपये क्विंटल, हरभरा १४ क्विंटल ३६०० ते ३७०० रूपये क्विंटल आणि गहू ८९ क्विंटल आला असून त्याला १५०० ते २००० रूपये भाव मिळाला आहे. ज्वारीची सर्वाधिक आवक झाली असून त्याला १४४२ ते २२५१ रूपये भाव मिळाला आहे.

मोंढ्यातील दर वेगळेच

मोंढ्यात गहू २२०० ते ३२०० क्विंटल या दरम्यान तर डाळी ११० ते १४० रूपये किलो या दरम्यान विकल्या जात आहेत. येथे हमाली व तोलाई सुमारे १ ते ५ टक्के मालानुसार लावली जात आहे. याशिवाय घरपोच हमालीचे दर सुमारे २८० ते ३५० रूपये यानुसार वेगळे द्यावे लागत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवडणुकीसाठी घोडेबाजार

$
0
0

महापौर निवडणुकीत नगरसेवकांचा भाव वधारला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बुधवारी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी घोडेबाजार तेजीत आला आहे. फोडाफोडीच्या राजकारणाने गती घेतल्याने नगरसेवकांचे भाव कमालीचे वधारले आहेत. नगरसेवकाची बोली लाखो रुपयांपासून लागण्यास सुरुवात झाल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे. घोडेबाजारात शिवसेना - भाजपची युती राहणार की तुटणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत औरंगाबादकरांनी युतीच्या बाजुने स्पष्ट बहुमत दिलेले नाही. २०१०मध्ये शिवसेनेचे ३० तर, भाजपचे १५ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी मतदारांनी शिवसेनेचे २८ नगरसेवक निवडून दिले. भाजपचे संख्याबळ २२ झाले. यावेळी 'एमआयएम' या पक्षाने पालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांचे २५ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे महापालिकेतील सत्तेचे गणितच बदलून गेले. सात नगरसेवक वाढल्यामुळे भाजपने पहिल्या महापौरपदावर दावा केला आणि राजू शिंदे यांना उमेदवारीही देऊन टाकली.

शिवसेनेने 'मोठा भाऊ' या नात्याने नगरसेवक त्र्यंबक तुपे यांना महापौरपदाची उमेदवारी दिली. महापौर कुणाचा, शिवसेनेचा की भाजपचा या मुद्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये खल सुरू आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक पातळीवर घोडेबाजार तेजीत आला आहे. एका नगरसेवकाची बोली ५० लाखांपासून सुरू होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही नगरसेवकांचा भाव भलताच वधारल्याचे बोलले जात आहे.

भाजपने आतापर्यंत ४४ नगरसेवकांची मोट बांधल्याचा दावा त्या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. आणखी चार नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवसेनेतील सूत्रांच्या माहितीनुसार; त्यांच्या तंबूतील नगरसेवकांची संख्या ३८पर्यंत पोचली आहे. आणखी काही नगरसेवक मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेत महापौरपदासाठी चार दावेदार होते. त्यापैकी एकाची उमेदवारी निश्चित करण्यात आली. त्यामुळे उर्वरित तिघांमधून दोघांनी फोडाफोडीच्या प्रकारापासून स्वतःला सुरक्षित अंतरावर ठेवले असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे आकड्यांचे गणित जुळवण्याची जबाबदारी पालकमंत्री रामदास कदम यांच्यावर येऊन पडली आहे. दुसरीकडे 'तयारी जोरात सुरू ठेवा, आपल्याला महापौर निवडणूक लढवायची आहे,' असा संदेश भाजपच्या प्रदेशस्तरावरील नेत्यांनी दिल्यामुळे राजू शिंदे यांच्यासह त्यांना सहकार्य करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढले आहे. एमआयएममधील एक गट आपल्या बाजुने वळविण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जात आहे.

भाजपने हे महापौरपद मिळवले तर दुसऱ्या अडीच वर्षांच्या 'टर्म'मध्येही भाजपचाच महापौर होईल. स्थायी समितीचे सभापत‌िपदही भाजपलाच मिळू शकेल.

लोणावळ्यात होणार नेत्यांची बैठक

शिवसेनेचे नगरसेवक सहलीसाठी लोणावळा येथे गेले आहेत, तर भाजपचे महाबळेश्वरला मुक्काम ठोकून आहेत. महापौर निवडणुकीत युती कायम ठेवून पुढील पाच वर्षे गुण्यागोविंदाने नांदण्याच्या संदर्भात मुंबईत शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मंगळवारी होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत महापौरपदाच्या मुद्दयावर तोडगा निघेल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुंटणखान्यावर छापा; जालन्यात ७ अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

शहरात भरवस्तीत गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम सुरू असलेल्या कुंटणखान्यावर सोमवारी रात्री उशिरा छापा मारण्यात आला. सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांनी बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली. या कारवाईत पाच महिलांसह सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ९५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

शहरातील कादराबाद परिसरात राहनारी चन्दा चंदनकर (वय ५०) या महिला त्यांच्या घरात कुंटनखाना चालवित होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम चालणाऱ्या या अवैध धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्यांमार्फत यासंदर्भात माहिती मिळाली. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यानी एक बनावट ग्राहक पाठवून सोमवारी रात्री उशिरा कुंटनखान्यावर छापा टाकला. कारवाईत गणेश सदानंद मांडोगळे (वय २९ रा. खरपुडी) आणि नागेश दत्तात्रय डवले वय २५ रा. ब्राह्मणखेडा) या दोघांना अटक करण्यात आली, तर रवी शेजूळ (वय ३५ रा. रामनगर) हा फरार झाला.

कुंटणखाना चालवणाऱ्या आणि देहविक्री करणाऱ्या चार महिलांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण ९४ हजार ७३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. यामध्ये रोख १२ हजार ८३० रुपये, एक सीडी डीलक्स, एक अॅक्टिवा, ९ मोबाईल यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकनीकर, आदींनी ही कारवाई केली.

या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने दोन मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलांची सुधारगृहात रवानगी केली आहे.

- शितलकुमार बल्लाळठाणे, प्रमुख, सदर बाजार पोलिस ठाणे, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजांचाच वरचष्मा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांनी वरचष्मा राखला आहे. कारखान्याच्या वीस जागांपैकी पांगरी आणि नाथरा आणि परळी गटातून भाजपचे सर्व नऊ उमेदवार निवडून आले आहेत.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक रविवारी पार पडली. या वेळी परंपरागत मुख्य लढत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथ मुंडे पॅनल विरुद्ध विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनेलमध्ये होती. या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकात भिडल्याने परळीला पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. त्यामुळे मंगळवारी मतमोजणीकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मंगळवारी दुपारी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पांगरी गटाची मतमोजणी झाली. यात पंकजा पालवे यांच्या नेतृत्वाखालील तांबडे त्रिंबक, मुंडे श्रीहरी आणि मुंडे ज्ञानोबा यांचा तब्बल १८०० मतांनी विजय झाला. त्यानंतर नाथरा गटातून स्वतः पंकजा पालवे, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव आणि भाऊसाहेब घोडके हे निवडून आले. परळी गटातून भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र कांबळे यांनी जाहीर केले. जाहीर झालेल्या नऊ जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आल्याने कारखाना पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात राहणार हे सिद्ध झाले.

वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीत पंकजा पालवे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संघर्षात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, सुरुवातीला तरी पंकजा पालवे यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या पॅनेलवर मात केल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभर फटाके फोडून या विजयाचा आनंद साजरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खळवाडीतील महिलांची टँकरची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

तालुक्यातील वडजी येथील खळवाडी परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. येथील महिलांना पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. या भागातील महिलांनी तहसीलदार संजय पवार यांच्याकडे टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे.

वडजीची लोकसंख्या अडीच हजार लोकसंख्या असून सध्या एका टँकद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या एका टँकरने फक्त वडजीतील गावकऱ्यांची गरज भागत आहे. पण परिसरातील वस्त्यांवर राहणाऱ्या गावकऱ्यांना पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे गावाजवळच असलेल्या खळवाडीतील महिलांनी सोमवारी पंचायत समिती सदस्य प्रज्ञा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार संजय पवार यांची भेट घेऊन समस्या मांडली. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर चंद्रकला झिने, कमलबाई आहेर, सुरेखा निर्मल, चंदा झिने, सिंधुबाई आहेर, तारामती झिने, केसरबाई झिने, अलका गोजरे, मंदा बोंबले, पद्माबाई झिने, रेखा निर्मल, कमलबाई आहेर, जनाबाई गायके आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणला दुष्काळाचा सर्वाधिक फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई पैठण तालुक्यात जाणवत आहे. या तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याची कबुली जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली. पैठण तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक १०५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाचोड परिसरातील टंचाई अधिक तीव्र असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. उन्हाची तीव्रता वाढणार असल्याने फुलंब्री तालुक्यातही टंचाई वाढणार आहे. गेल्या महिन्यांतील अवकाळी पावसामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी टँकर सुरू ठेवावे लागतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. 'जिल्ह्यातील ३२४ गावे व ९ वाड्यांत ४४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. प्रत्येक टँकरला जीपीएस लावण्यात आल्याने कोणत्या गावात, कोणत्या क्रमांकाच्या टँकरच्या किती खेपा झाल्या, हा टँकर कोठे आहे, याची माहिती मिळते,' असा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. शिवारातील पाणी शिवारातच अडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील २२८ गावांमध्ये सिमेंट नाला बांधची १०१, कंपार्टमेंट बंडिंगची ११०० कामे सुरू आहेत. यापैकी २०० कामे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

चार नद्यांचे पुनरुज्जीवन

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील चित्ते, येळगंगा, मार्तंडेय व अन्य एक, अशा चार नद्यांचे १५ जूनपूर्वी पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. या नद्यांवर बंधारे बांधण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५१२ कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

केंद्र सरकारमार्फत ग्रामविकासाला पुरक असलेली बीआरजीएफ योजना बंद होणार आहे. त्यामुळे या योजनेत काम करणाऱ्या राज्यातील ५१४ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सप्टेंबरपासून बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

विकासाचा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी २००६-०७ पासून बीआरजीएफ योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. केंद्र सरकारच्या निधीतून ही योजना राज्यातील औरंगाबाद, अमरावती, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली या १२ जिल्ह्यात राबविली जात आहे. या योजनेबद्दल प्रधान सचिव (ग्रामविकास व जलसंधारण) यांच्या अध्यक्षतेखाली यशदा, पुणे येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांना योजना बंद करण्यात येत असल्याची सूचना देण्यात आली आहे. ही योजना बंद झाल्यास राज्यातील १२ जिल्ह्यातील विकासकामे प्रभावित होणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका पातळीपासून जिल्हास्तरावर कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. शासनाने या योजनेतील चालू कामे ३१ मे २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत सुरू न केलेली कामे तत्काळ रद्द करून निधी जिल्हास्तरावर जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू नये, जुन्या कंत्राटी कर्मचाऱ्यांंच्या मानधनासाठी सप्टेंबरपर्यंत तरतूद करणे आदी सूचना या बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिहेरी अपघातात २ ठार, ६ जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड ते भराडी रस्त्यावर अॅपेरिक्षा, क्रुझर जीप व मोटार सायकलच्या विचित्र अपघातात दोन जण ठार व सहा जखमी झाले आहेत. या दोघांचा औरंगाबादमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास धानोरा फाट्याजवळ झाला.

सिल्लोडकडून भराडीकडे जाणारी क्रुझर जीप (एम.एच.२४, सी ५७०२) व सिल्लोडकडे येणारा अॅपेरिक्षा यांचा आधी अपघात झाला. या दरम्यान अपघातग्रस्त वाहनावर एक मोटार सायकल अचानक आदळली. या अपघातात अॅपेरिक्षाचा चक्काचूर झाला आहे. रिक्षाचा क्रमांक समजू शकला नाही. जखमींपैकी दादाराव रवी बोरसे (वय १८, रा. भराडी) व विठ्ठल गणेश सनांसे (रा. टाकळी अंतूर),यांचा औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

अपघातात दीपक मनोहर सनांसे (वय१८, रा.भराडी), स्वप्नील श्रीकांत कापुरे (वय१५, रा. बरकतपूर), सुरेखा सोमीनाथ थरगड (वय २८, रा. संगमपूर), राजेंद्र संजय वाघ (वय१५, रा.मोढा), बाबुराव सिताराम आव्हाड (वय ४५, रा. दिगावखेडी), विकास तातेराव खंदारे (वय.२४, रा.तांगापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून औरंगाबाद येथे पाठवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाच्या आमिषाने १६ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

'जितकी जमीन तितके कर्ज' मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका एजंटाने खुलताबाद तालुक्यातील नऊ शेतकऱ्यांना १६ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी माटरगावचे सरपंच भाऊसाहेब चव्हाण यांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे.

दिल्ली येथील अमर अँड सन्स फायनान्शियल सोल्यूशन्स प्रा.लि. नावाच्या कंपनीचा एजंट असल्याचे सांगून शेख हरून शेख बशीर याने फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याने चार टक्के व्याजाने कर्ज प्राप्त करून देतो, असे आमिष माटरगावचे सरपंच सरपंच भाऊसाहेब चव्हाण यांना दाखविले होते. जितकी जमीन तितके कर्ज अशी या कंपनीची योजना असून कर्ज मंजूर करून देण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांची मागणी केली. चव्हाण यांनी ही योजना इतरांना सांगितली. या कर्जासाठी शेख हारून याने सरपंचासह इतर नऊ जणांना तयार केले. जितकी जमीन तितके कर्ज पाहिजे असल्यास त्याच्या २० टक्के रक्कम आधी कंपनीत जमा करावी लागेल, अशी अट होती. त्यानुसार हारुन याने ३० जानेवारी २०१३ रोजी सर्व कर्ज प्रकरणे मंजूर झाल्याच्या फाइल आणल्या. फाइल देण्यासाठी त्याने भाऊसाहेब शेकू चव्हाण (रा. माटरगाव, दोन लाख रुपये), शेकू त्रिंबक चव्हाण (रा. माटरगाव, दोन लाख रुपये), तेजराव बाजीराव आहेवाड (रा. पाडळी, एक लाख रुपये), रोहिदास साहेबराव आहेवाड (रा. पाडळी,एक लाख रुपये), हरी महादू जाधव (रा. नाचनवेल, एक लाख रुपये), बाबुराव त्रिंबक गायकवाड (रा. दरेगाव, दोन लाख रुपये), बाबुलाल चांदखां पठाण (रा. पिंप्रीराजा, दोन लाख रुपये), अमोल भाऊसाहेब जाधव (रा. शिऊर, चार लाख रुपये), चंद्रभान एकनाथ गायकवाड (रा. दरेगाव, ५० हजार रुपये), संजय बाबुराव गायकवाड (रा. दरेगाव, ५० हजार रुपये) असे १६ लाख रुपये उकळले आहेत. त्याने प्रत्येक शेतकऱ्याकडून कोरे चेक घेतले आहेत. सर्व शेतकऱ्यांची रक्कम दिल्ली येथे जाऊन भरावी लागेल, असे सांगितले. हारुनने भाऊसाहेब चव्हाण यांना दिल्लीला नेले. सरपंचाना एका हॉटेलमध्ये बसवून दोन तासांनी येऊन पूर्ण पैसे भरले, आता कर्जाच्या चेकची वाट पहा, असे सांगितले. त्यानंतर सरपंच चव्हाण यांना खुलताबाद येथे आणून सोडले. हे शेतकरी दोन वर्षांपासून कर्जाची रक्कम मिळेल, या आशेवर होते. विचारणा केल्यानंतर शेख हारून याने उडवाउडवीची उत्तरे देऊन टोलवाटोलवी सुरू केली. त्याच्याशी आता मोबाइलवरही संपर्क होत नाही.

यावरून शेतकऱ्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानतर खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी याप्रकरणी तपास करून गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुण शेतकऱ्याची विहिरीत आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

नापिकी व कर्जबाजारीपणामुळे निराश झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना घटना मंगळवारी (२८ एप्रिल) सकाळी सहा वाजता तालुक्यातील फकिराबादवाडी शिवारात उघडकीस आली. कल्याण पंढरीनाथ वाणी (वय २३) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

कल्याण वाणी लाडगाव येथील रहिवासी असून त्यांनी एका खासगी फायनान्स कंपनीकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जातून त्यांनी विहीर खोदली होती. परंतु, विहिरीला पाणी लागले नाही. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा व इतर पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कर्ज फेडण्याची त्यांना चिंता होती. ते सोमवारी (२७ एप्रिल) शेतात जातो, असे सांगून घराबाहेर पडले. परंतु, परत न आल्याने त्यांचा कुटुंबियांनी शोध घेतला असता फकिराबादवाडी शिवारातील गट क्रमांक ९५ मधील विहिरीत त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वीरगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह काढला. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेसाठी पैठणमध्ये आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

सोलापूर-जळगाव रेल्वेमार्गातून वळवल्यामुळे पैठणमध्ये पुन्हा एकदा आंदोलन सुरू झाले आहे. हा लोहमार्ग पैठणमार्गेच व्हावा या मागणीसाठी मंगळवारी (२८ एप्रिल) निदर्शने करण्यात आली. यावेळी खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध संतप्त घोषणा देण्यात आल्या, तर येत्या सोमवारी पैठण बंदची हाक देण्यात आली आहे.

पैठणमार्गे लोहमार्गाचे सर्वेक्षण होऊन आठ वर्षे लोटल्यानंतर नियोजित सोलापूर-जळगाव मार्गातून पैठण व औरंगाबाद वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आता हा मार्ग जालनामार्गे होणार आहे. त्यामुळे पैठणकरांनी रेल्वेमार्गासाठी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. शहरातील नागरिकांनी मंगळवारी महाराणा प्रताप चौकात निदर्शने केली. यावेळी जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात संतप्त घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर तहसीलदारांना निवेदनात देण्यात आले.

सोलापूर- जळगाव पैठण व औरंगाबाद मार्गे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर जालना, भोकरदन मार्गे दुसरे सर्वेक्षण करण्यात आले. या घडामोडीची माहिती मिळाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. नागरिकांनी त्यावेळी आंदोलन केले, तेव्हा नवीन लोहमार्गाचे सर्वेक्षण करताना नियमानुसार दोन पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण केले जाते, असे सांगून समजूत काढण्यात आली होती. दरम्यानच्या काळात हा रेल्वेमार्ग पैठणला वगळून होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने येथील नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे.

धार्मिक पर्यटन क्षेत्र असलेले पैठण रेल्वेमार्गावर नसल्याने इतर धार्मिक स्थळांपेक्षा अविकसित राहिले आहे. पैठण शहर लोहमार्गाशी जोडावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. पैठणचे सुपुत्र दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी पैठण येथील रेल्वेमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. तत्कालीन रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांनी २००७ च्या रेल्वे अर्थसंकल्पात ४५० किलोमीटर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मान्यता दिली. सोलापूर, उस्मानाबाद, कुंथलगिरी, बीड, गेवराई, पैठण, औरंगाबाद, घृष्णेश्वर, सिल्लोड, अजिंठा, जळगाव या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.

सर्वेक्षण अहवाल सादर

मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी माहितीच्या अधिकारात या मार्गाची माहिती घेतली आहे. त्यानुसार सोलापूर, खेड, मर्डी, रायखेल, तुळजापूर, सांजा, उस्मानाबाद, येडशी, मस्सा, नांदूर, नेकनूर, बीड, गेवराई, शहागड, वडीगोद्री, अंबड, जालना, नागेवाडी, केदारखेडा, भोकरदन, सिल्लोड, अजंठा, वाकोड, पहूर, नेरी, नासिराबाद, जळगाव, असे सर्वेक्षण बोर्डाकडे सादर करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् जाग्या झाल्या लातूर भूकंपाच्या आठवणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

'नेपाळमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी त्वरित धाऊन आले, ते म्हणजे भारतीय लष्कर. त्यांनी केवळ भारतात परत येण्यासाठीच आम्हाला मदत केली नाही, तर त्या ठिकाणी जो मानसिक आधार दिला, त्याला तोड नाही. भारतीय लष्कराला त्रिवार सलाम!', भारतीय लष्कराप्रती असे कृतज्ञतेचे उद्गार लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. दत्ता गोजमगुंडे यांनी काढले. नेपाळमध्ये भूकंप झाला, त्यावेळी ते तिथे होते.

नेपाळमध्ये काठमांडू येथे आयोजित आंतरराष्ट्रीय न्युट्रिशन परिषदेसाठी लातूरमधून दोन बालरोग तज्ज्ञ गेले होते. त्यामध्ये डॉ. दत्ता गोजमगुंडे आणि डॉ. संदिपान साबदे पती-पत्नीचा समावेश होता. नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर परिषदेत सहभागी लातूरकर डॉक्टरांना १९९३च्या किल्लारीच्या भूकंपाची आठवण झाली. डॉ. गोजमगुंडे सोमवारी रात्री लातुरात परतले. या वेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. काठमांडूच्या दीड दिवसांतील अनुभव सांगताना डॉ. गोजमगुंडे म्हणाले, 'आमची परिषद सुरू असताना आम्हाला जनरेटरचा मोठा आवाज असतो, तसा जाणवला आणि त्यानंतर इमारत हालू लागली. १९९३च्या भूकंपाचा अनुभव असल्यामुळे आम्ही तत्काळ सांगितले, की हा भूकंपाचा प्रकार आहे. तोपर्यंत लोक मोठ्याने ओरडू लागले होते. आम्ही सगळे हॉटेलच्या पार्किंगमध्ये जमलो. ज्या ओबेरॉय हॉटेलमध्ये उतरलो होतो. त्यापासून परिषदेचे ठिकाण १६ किलोमीटर दूर होते. सायंकाळी नेपाळमधील एका नागरिकाने आम्हाला मदत केली आणि कार जाईल तेथपर्यंत मी तुम्हाला सोडतो, असे तो म्हणाला. वाटेत आम्ही पडलेल्या इमारती, घाबरलेली माणसे, उद्ध्वस्त शहर, जमीनदोस्त झालेली मंदिरे, जगप्रसिद्ध टॉवर पाहिल्यानंतर आम्हाला भीती वाटली. हॉटेल पंचतारांकित असले, तरी तिथे आता काहीच सुविधा नव्हत्या. सायंकाळी हॉटेलमधील रुममध्ये जाण्यास बंदी होती. तेथे लाईट नव्हते. सर्व व्यवस्था कोलमडल्या होत्या. दरवाजे तोडून आम्ही सामान बाहेर काढले.ती रात्र ११ ते १२ डिग्री सेल्सिअस तापमान असताना आणि पाऊस पडत असताना हॉटेलच्या हिरवळीवर काढली. सकाळी विमानतळ गाठले, तर तिथे किमान २० हजार लोक दिसत होते.'

'भारतीय दूतावासातून माहिती मिळण्यास विलंब लागत होता. त्याचवेळी हवाई दलाची विमाने काठमांडू विमानतळावर उतरू लागली. लष्कराने विमानतळाचा ताबा घेतला. या लष्करी तुकडीत महाराष्ट्रातील परभणी, अकलूजचे जवानही होते. त्यांनी मराठीत बोलण्यास सुरुवात केली आणि जिवात जीव आला. भीषण आपत्तीत त्यांनी आम्हाला मानसिक आधार दिला, हिंमत दिली. विमानतळावर गर्दी वाढतच गेली. आम्ही वेटिंग हॉलमध्ये न थांबता 'रन-वे'वर थांबलो. त्याठिकाणी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून आलेल्या फुडपॅकेटचे वाटप लष्कराने केले. ते आम्हाला मिळाले. परंतु या आपत्तीत आपले लष्कर-प्रशासन सर्वांना धीर देत होते, याचा अनुभव आला. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातूनसुद्धा माझ्या घरी फोन आला. त्यांनी चौकशी केली होती. मी भूकंप झाल्या बरोबर घरी फोन करून सुखरूप असल्याचे कळविले होते. त्यानंतर कोणाचाही आमचा संपर्क झाला नाही. दरम्यान, डॉ. संदिपान साबदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजचोरीप्रकरणी २५ हजारांचा दंड

$
0
0

नांदेड : हिमायतनगर तालुका कृषी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या एका खासगी पाणी शुद्धीकरण केंद्रावर वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. आकड्यांद्वारे वीजचोरी करताना रंगेहाथ पकडून २५ हजार ३९० रुपयाचा दंड आकारला आहे.

शहरातील नांदेड-किनवट राज्य रस्त्यावरील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या मुनिबोद्दिन अमजद मुजीबोद्दिन यांच्या शेतामध्ये पाणी शुद्धीकरण केंद्र सुरू होते. या ठिकाणी अनाधिकृत विद्युत पुरवठा लघु दाबाच्या वीजवाहिनीच्या तारावर आकडे टाकून विजेची चोरी केली जात होती. याची माहिती उपकार्यकारी अभियंता राठोड यांना मिळताच त्यांनी सहाय्यक अभियंता टीकार, सहाय्यक अभियंता मोरे, लाईनमन कर्मचारी यांना पाठवून सदर वीजचोरीवर कारवाही केली. यात कम्पाउंडिंग चार्ज ८ हजार रुपये, वीजचोरीबाबत १७ हजार ३९० रुपयांचा दंड, असा एकूण २५ हजार ३९० रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील विजेची चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्नालालनगर केंद्राचा वीज पुरवठा सुरळीत

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पन्नालालनगर उपकेंद्राला सातारा भागातून भूमीगत वीज वाहिनीद्वारे होणारा वीज पुरवठा केबल नादुरूस्त झाल्याने खंडित झाला होता. चिकलठाणा भागातून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न तांत्रिक अडचणीमुळे तातडीने होऊ शकला नाही. अखेर मध्यरात्री पावणे एक वाजेच्या दरम्यान चिकलठाणाहूनच वीज पुरवठा करण्यात यश आले. सातारा येथून पन्नालालनगर उपकेंद्राला वीज पुरवठा मात्र होऊ शकला नाही.

पन्नालालनगर उपकेंद्राला होणारा वीज पुरवठा सातारा येथून केला जातो. सोमवारी रेल्वे पटरीजवळ जेसीबीमुळे सातारा ते पन्नालालनगरमधील भूमीगत वीज वाहिनी उखडली होती. यामुळे पन्नालालनगर ३३ केव्ही उपकेंद्रावरील अनेक कॉलनी आणि वस्त्यांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. पन्नालालनगर येथील वीज पुरवठा नियमित करण्यासाठी चिकलठाणा उपकेंद्रावरून प्रयत्न करण्यात आला, मात्र चिकलठाणा उपकेंद्रावरून वीज पुरवठा होत असताना, वीज पुरवठा करणारे वीज यंत्र नादुरूस्त झाले. यामुळे वीज पुरवठा नियमित करण्यासाठी सात ते आठ तासाचा अवधी लागला. यामुळे पन्नालालनगर, चेतनानगर, ज्योतीनगर, क्रांतिचौक, सिंधी कॉलनी, विश्वभारती कॉलनी, टिळकनगर, पैठणगेट, नूतन कॉलनी भागातील वीज पुरवठा रात्री १२.४५ वाजता सुरळीत करण्यात आला. या कामासाठी अधिक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे, यांच्यासह अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. ए. कुलकर्णी, एस. बी. डोंगरे, एस. ए. चारबे, ए. व्ही. कौरगर, एन. व्ही. सत्यनारायण व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

पन्नालालनगर ३३ केव्हीच्या लाईनला, सातारा येथून नियमित वीज पुरवठा केला जात होता. मंगळवारी वीज कर्मचाऱ्यांनी सातारा येथून वीज पुरवठा व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र सातारा येथून वीज पुरवठा होऊ शकला नाही.

एक तासाचा राहणार 'ब्रेक'

सातारा येथून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मंगळवारी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी ९ ते १० वाजे दरम्यान एक तास वीज पुरवठा खंडित करून सातारा येथून वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images