Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महा‌वितरणची पोलिसांकडे तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देवानगरी परिसरात ज्या कंत्राटदाराच्या जेसीबीमुळे वीजपुरवठ्याची भूमीगत केबल तुटली, त्याच्याविरुद्ध महावितरण कंपनीने जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही केबल तुटल्यामुळे पन्नालालनगरातील ३३ केव्ही उपकेंद्राशी संबंधित वीज ग्राहकांना सोमवारी रात्रभर उकाडा सहन करावा लागला.

देवानगरीत रेल्वे रुळाजवळ कुंपणभीत बांधण्याचे काम केले जात आहे. सोमवारी जेसीबीच्या यंत्राच्या साह्याने खड्डे खोदण्याचे काम केले जात होते. त्यावेळी पन्नालालनगर ३३ केव्हीला वीज पुरवठा करणारी केबल तुटली. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि पन्नालालनगर, चेतनानगर, ज्योतीनगर, उस्मानपुरा, क्रांतिचौक, विश्वभारती कॉलनी, टिळकनगर, पैठणगेटसह अन्य भागांतील वीज पुरवठा खंडित झाला. रात्री उशिरा या भागाला चिकलठाण्यातून वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यामुळे जुन्या केबलही जळाल्या. परिणामी रात्री ७.४५ वाजता पन्नालालनगर भागाला होणारा वीज पुरवठा पूर्णपणे तुटला.

एका कंत्राटदाराच्या बेशिस्त कामामुळे हजारो वीज ग्राहकांना अंधारात रात्र काढावी लागली. या घटनेची गंभीर दखल घेऊन अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी संबंधित कंत्राटदार गिरीश जैस्वाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी अभियंता सतीश सावरे यांनी जवाहर नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली, मात्र याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अर्धे शहर अंधारात टाकणाऱ्या रेल्वेच्या कंत्राटदाराच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल केली आहे. सर्वसामान्य वीज ग्राहकांना सेवा देण्यामध्ये संबंधित कंत्राटदारामुळे व्यत्यय आला आहे. त्यामुळे रेल्वे कंत्राटदार गिरीश जैस्वाल यांच्या विरोधात सदर तक्रार देण्यात आली आहे.

- प्रभाकर निर्मळे, अधिक्षक अभियंता, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परतलो

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

शनिवार व रविवार असे दोन दिवस अर्ध्या-अर्ध्या तासाला भूकंपाचे धक्के अनुभवले... इमारती अक्षरश: डोळ्यासमोर पत्त्याचा बंगल्याप्रमाणे कोसळत होत्या... सगळीकडे आक्रोश... पळापळ... अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परतलोय... हे बोल आहेत औरंगाबादचे बालरोगतज्ज्ञ डॉ. निखिल पाठक यांचे. डॉ. पाठक मंगळवारी (दि. २८) काठमांडूमधून परतले. त्यांनी तेथील थरारक, भयावह अनुभव 'मटा'शी शेअर केला.

औरंगाबादहून बालरोगज्ज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. सखा पाटील, डॉ. राहुल मोरे, डॉ. जय मालानी, डॉ. रमेश बजाज, डॉ. शैलेश लटु‌रिया, डॉ. तुषार ‌शिंदे यांच्यासह डॉ. पाठक काठमांडूला गेले होते. दोन दिवसांची कॉन्फरन्स होती. काठमांडूला सन अँड प्राईड नावाच्या हॉटेलमध्ये ही कॉन्फरन्स होती. डॉ. पाठक म्हणाले, 'कॉन्फरन्स सुरू असतानाच २५ तारखेला सकाळी ११.३० वाजता भूकंपाचे धक्का बसला. आम्ही सगळे हॉटेल सोडून रस्त्यावर पळालो. मी दिवसभर त्या भीतीच्या सावटाखालीच होतो. सातत्याने धक्के वाढतच होते. तससशी आपण मृत्यूच्या दाढेत असल्याची सारखी जाणीव होत होती. कशीबशी रात्र काढली. दुसरा दिवस रविवार (दि.२६) उजाडला तोही पहाटे साडेपाचला भूकंपाचे धक्क्यानेच. त्यानंतर सातत्याने अर्ध्या अर्ध्या तासाने धक्के बसणे सुरू झाले. दिवसभर आम्ही भयग्रस्त होतो.'

त्या हृदयद्रावक आठवणी सांगताना पाठक पुढे म्हणाले, 'आमच्यासमोर असलेले सर्वच दृष्य तसे भीषण होते. औरंगाबादच्या माझ्या नातेवाईकांची सतत आठवण येत होती, पण त्यांच्याशी संपर्कही होईना. अशा परिस्थितीत इंडियन आर्मी आणि मदतीचा ओघ पाहून हायसे वाटले. विमानतळावर कसाबसा पोहचलो. पोहोचताच पाहतो तर काय सात-आठ हजार भारतीय मायदेशी जाण्यास तयार होते. खूप वेळाने म्हणजे रात्री दोन वाजता माझा दिल्लीला जाण्यासाठी नंबर लागला. नंबर लागेपर्यंत जीव मुठीत घेऊनच होतो. तेव्हाही सारखे धक्के बसणे सुरूच होते. विमानात बसून दिल्लीत सकाळी ७ वाजता पोहचलो. तोपर्यंत सोमवार उजाडला होता. सोमवार (दि. २७) दिल्लीत कसाबसा काढून आज मंगळवारी (दि. २८) औरंगाबादला पोहचलो. हे दोन-तीन दिवस अक्षरश: मृत्यूच्या भीतीत काढले. मी तर मृत्यूच्याच दाढेतून परलोय, असे वाटते. आज कुटूंबियांना पाहून खूप जीवात जीव आला.

एकमेकांना आधार

भूकंपानंतरची परिस्थिती भयावह होती. अशावेळी एकत्रित गेलेले हे सर्व डॉक्टर एकमेकांसाठी मोठा आधार होते. डॉ. सखा पाटील, डॉ. राहुल मोरे, डॉ. जय मालानी, डॉ. रमेश बजाज, डॉ. शैलेश लटु‌रिया, डॉ. तुषार ‌शिंदे या सहा जणांनी एकमेकांना आधार देत नेपाळमधील तीन-चार ‌‌दिवस सोबत काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अवैध धंद्यांवर कठोर कारवाई’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद परिमंडळाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून विश्वास नागरे पाटील यांनी मंगळवारी (२८ एप्रिल) सूत्रे स्वीकारली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अवैध धंद्यांना थारा न देता कठोर कारवाई केली जाईल, इशारा दिला आहे.

विश्वास नागरे पाटील हे मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील कारवाईमुळे प्रसिद्ध झाले आहेत. 'परिमंडळ प्रमुख म्हणून या पदावरील भूमिका सुपरव्हिजनची आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याबरोबरच जनतेला अधिकाधिक चांगली सेवा देण्यावर भर दिला जाईल. परिक्षेत्रातील काही जिल्ह्यात वाळू माफियांचा उच्छाद असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात परिस्थितीचा अभ्यास करून या समस्येचे उच्चाटन केले जाईल,' अशी माहिती त्यांनी दिली. 'पोलिस खाते एक कुटुंब असून पोलिसांची निवासस्थाने, त्यांच्या कुटुंबाचे प्रश्न याची जाण आहे. त्याचे प्रश्न सोडवण्यासाठीही प्राधान्य दिले जाईल,' असे ते म्हणाले.

पोलिसाबद्दल अधिक विश्वास निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. अमेरिका, बँकाक येथे घेतलेले प्रशिक्षण व आतापर्यंतचा अनुभव याचा यापदावर काम करताना लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

औरंगाबादेतून सुरुवात

विश्वास नागरे यांनी पोलिस खात्यातील सेवेला प्रोबेशनरी अधिकारी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातून २०००-२००१ मध्ये सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी फुलंबी येथे काम केले आहे. नांदेड, अहमदनगर, लातूर या जिल्ह्यात काम केल्यामुळे त्यांची ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिका तपासणीसाठी या हो...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासणीला येणाऱ्या शिक्षकांची संख्या रोडावली आहे. यामुळे विद्यापीठाने कॉलेजांना 'तपासणीसाठी प्राध्यापक पाठवा हो,' अशा आशयाचे पत्र पाठविले आहे. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे मूल्यांकनाचे काम एकूण १५ केंद्रावर सुरू आहे.

विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल २०१५ परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम विद्यापीठाने स्थापन केलेल्या मूल्यांकन केंद्रावर सुरू आहे. अनेक केंद्रावर संबंधित विषयाचे प्राध्यापक तपासणीस येत नसल्याचे विद्यापीठास निदर्शनास आले. तपासणीस प्राध्यापक न आल्याने निकाल वेळेवर जाहीर करण्यात अडचणी येतात. त्यात महापालिका निवडणूक आणि आता सुट्या असल्यामुळे अनेक विषयाच्या प्राध्यापकांनी तपासणीला दांडी मारली आहे. यानंतर प्राचार्यांना पत्र पाठवून, उत्तरपत्रिका तपासणीसाठी प्राध्यापक पाठवा, असे सांगण्याची वेळ परीक्षा विभागावर आली आहे.

मूल्यांकनासाठी सहकार्य न करणाऱ्या प्राध्यापकांवर विद्यापीठ कायदा १९९४ कलम ३२ (५) (जी)नुसार कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाने यंदा दोन वेळा प्राचार्यांची बैठक घेतली. पदवी परीक्षांसाठी बीड व उस्मनाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन मूल्यांकन केंद्र, जालना जिल्ह्यात एक तर औरंगाबाद जिल्ह्यासाठी चार मूल्यांकन केंद्र आहेत. पदव्युत्तरसाठी सहा मूल्यांकन केंद्र देण्यात आले आहेत.

सुरवातीला काही केंद्रावर ही स्थिती होती, आता तसे काही नाही. प्राचार्यांच्या बैठकीतही तशा सूचना दिल्या होत्या. यानंतरही कोणत्या केंद्राकडून काही तक्रार आल्यास संबंधित प्राध्यापकांवर रितसर कारवाई केली जाईल.

- डॉ. वाल्मिक सरवदे, परीक्षा नियंत्रक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन क्रीडा अधिकारी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्यायामशाळेतील साहित्य खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने पकडले. विशाखा व्यंकटेश केदारे व गौतम सांडुजी साळवे अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

फिर्यादीने १४ जुलै २०१४ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात व्यायामशाळा विकास अनुदान योजनेतून साहित्य खरेदी प्रस्ताव सादर केला होता. जिल्हा क्रीडा अधिकारी विशाखा व्यंकटेश केदारे (वय ५६, रा. अक्षय गार्डन, देवानगरी शहानूरवाडी) यांनी फिर्यादीस बोलवून घेऊन प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने त्रुटीची पूर्तता करून हा प्रस्ताव केदारे व जिल्हा क्रीडा अधिकारी गौतम सांडुजी साळवे (वय ५२, रा. कीर्ती हाउसिंग सोसायटी, एन-आठ सिडको) यांच्याकडे सादर केला. साळवे व केदारे यांनी अडीच लाख रुपयांपर्यंतचे साहित्य मंजूर करून देतो, त्यासाठी बारा हजार रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादीने अॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यात केदारे आणि साळवे यांनी पंचासमक्ष तडजोड करून तक्रारदाराकडे १४ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम मंगळवारी (२८ एप्रिल) देण्यास सांगितले.

यावरून अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलिस उप अधीक्षक प्रकाश कुलकर्णी, रामनाथ चोपडे, विवेक सराफ यांनी सापळ्याचे नियोजन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दुपारी तीनच्या सुमारास चौदा हजार रुपयांची लाच घेताना केदारे व साळवे यांना पकडण्यात आले.

या कारवाईत पोलिस कर्मचारी श्रीराम नांदुरे, अजय आवले, सचिन शिंदे, बाळासाहेब महाजन, मीरा सांगळे आदींनी भाग घेतला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, केदारे व साळवे यांच्या घराची झडती रात्री उशीरापर्यंत सुरू होती. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीत कमावले; भाजपने तहात गमावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीत शिवसेनेपेक्षा सरस कामगिरी करूनही, भाजपने तहात मात्र कमावलेले सारे गमावले आहे. महापौरपदाच्या बोलाचालीत भाजप नेते बॅकफूटवर आले. पाच पैकी एक वर्षाच्या महापौरपदावर नेत्यांनी समाधान मानले.

पालिका निवडणुकीच्या जागावाटपातही भाजपने कमी जागांवर समाधान मानले. त्याचीच पुनरावृत्ती महापौर निवडणुकीत झाली. पालिका निवडणुकीत शिवसेनेपेक्षा भाजपची कामगिरी सरस राहिली. २०१०मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ३० नगरसेवक निवडून आले होते, तर भाजपला १५ नगरसेवक निवडून आणण्यात यश आले. यावेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक ३० वरून २८ वर आले. भाजपच्या नगरसेवकांची संख्या मात्र १५ वरून २२ झाली. त्यामुळे महापौरपद निवडणुकीत भाजपने पुन्हा आक्रमक भूमिका घेत अडीच वर्षाचे महापौरपद देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य होण्याची शक्यता नाही, असे लक्षात आल्यावर शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा न करताच महापौरपदासाठी राजू शिंदे यांनी अर्ज दाखल केला. मात्र, महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी सोमवारी रात्री दिल्लीत शिवसेनेचे चिटणीस खासदार अनिल देसाई आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची बैठक झाली. युतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी दानवे यांनी भाजपसाठी पाच पैकी एकच वर्षाचे महापौरपद भाजपसाठी सोडवून घेतले. पहिले दीड वर्ष आणि शेवटचे अडीच वर्ष असे चार वर्ष महापौरपद शिवसेनेला मिळणार आहे.

आज मतदान

महापौर, उपमहापौरपदासाठी बुधवारी नगरसेवक हात उंचावून मतदान करतील. शिवसेना-भाजपमध्ये युती झाल्यामुळे शिवसेनेचे त्र्यंबक तुपे महापौर म्हणून तर भाजपचे प्रमोद राठोड उपमहापौर म्हणून निवडून येणार हे निश्चित झाले आहे. काँग्रेसतर्फे अफसर खान, तर एमआयएमतर्फे गंगाधर ढगे यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे भाऊसाहेब जगताप, रिपाइं (डेमॉक्रेटिक)चे कैलास गायकवाड, एमआयएमचे सिद्दिकी नासेर रिंगणात आहेत.

...अशी झाली तडजोड!

महापौरपद पहिले दीड वर्ष शिवसेनेकडे, त्यानंतरचे एक वर्ष भाजपकडे. शेवटचे अडीच वर्ष शिवसेनेकडे.

स्थायी समितीचे सभापतीपद - तीन सभापती भाजपचे, दोन सभापती शिवसेनेचे.

सोमवारी रात्री अनिल देसाई आणि रावसाहेब दानवे यांची दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुंबईत पालकमंत्री रामदास कदम यांच्याबरोबर बैठक झाली. त्यात महापौर, उपमहापौर, सभापतीपदाबद्दल समझोता झाला. हा समझोता करताना त्यांनी माझ्याशीही चर्चा केली. या घडामोडींमध्ये पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

- चंद्रकांत खैरे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७ लाखांची बीअर गायब करणारा ट्रक ताब्यात

$
0
0

म.टा.प्रतिनिधी वाळूज

चोरीचे बिअर बॉक्स असलेला ट्रक राजस्थान पोलिसांनी जप्त करून तो एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या हवाली केला आहे. मार्च महिन्यात वाळूज एमआयडीसीतून बिअर बॉक्स घेऊन मुंबईला निघालेला हा ट्रक बेपत्ता झाल्याची तक्रार वाळूज पोलिसांत दाखल झाली होती. जवळपास दोन महिन्यानंतर हा ट्रक सापडला आहे. राजस्थान पोलिसांनी उघड केलेल्या या घटनेचे श्रेय मात्र वाळूज पोलिस घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वाळूज एमआयडीसीतील मिलेनिअम बिअर कंपनीमधील १७ लाख २८ हजार रुपये किंमतीचे बिअर बॅक्स घेवून २२ फेब्रुवारी रोजी ट्रकने (एमएच ४३ वाय ४७१) मुंबईत कुर्ला येथे नेण्यात येणार होते, मात्र हा ट्रक नियोजित स्थळी न पोहोचता बेपत्ता झाला होता. १ मार्च रोजी कंपनीतील अधिकारी दिलीप बरनाळे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी ट्रक चालक मोहमंद नईम मोहमद सलीम, तस्कर हुसेन खान महम्मद अमीन व ट्रन्सपोर्ट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, राजस्थान येथील अजमेर येथे बेवारस अवस्थेत एक ट्रक (एम एच १८ ए ए २००८) आढळून आला. तपासाअंती हा ट्रक वाळूज एमआयडीसीतील असून बिअर चोरीसाठी वापरल्याचे स्पष्ट झाले. हा गुन्हा करताना आरोपींनी बनावट नंबर प्लेटचा वापर केल्याचे लक्षात आले. ट्रकमधील मुद्देमाल मात्र लंपास करण्यात आला होता. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी एस. एम. रोकडे, भगवान जगाताप व अनिल तुपे यांनी राजस्थान येथे जाऊन हा ट्रक ताब्यात घेतला.

गुन्हा दाखल होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटल्यावरही एमआयडीसी वाळूज पोलिसांनी यासंदर्भात कोणतीही पावले उचलली नव्हती. मात्र, राजस्थान पोलिसांनी हा ट्रक जप्त करून ही चोरी उघड केली असताना याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न मात्र एमआयडीसी पोलिसांनी चालविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्याचे दर निम्म्याने घसरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या महिन्यात शंभराच्या वर दर असलेल्या आंब्यांचे भाव आता किलोमागे जवळपास ४० रुपयांनी उतरल्याने आंबाप्रेमींना दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार ‌समितीत व शहागंज, औरंगपुरा, पीरबाजारसह गजानन महाराजमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने आता तो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

मार्च महिन्यामध्ये प्रति किलो १०० ते १२० रुपये असा आंब्याला भाव होता. सध्या ६० ते ८० रुपये प्रतिकिलो असा झाला आहे. महिनाभरात किलोमागे ४० रुपयांनी आंब्याचा भाव उतरल्याने अक्षय्य तृतीयेनंतर आंबा खाण्याचे प्रमाण वाढवणाऱ्यांना ही नक्कीच दिलासा देणारी बातमी आहे. अक्षय्य तृतीयेपासून शहरात आंब्यांची मागणी वाढली असल्याचेही फळविक्रेते सांगतात. यंदाच्या मोसमात कोकणात आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाव किलोमागे १०० रुपये राहतील, असा अंदाज होता. मात्र, अक्षय्य तृतीयेनंतर आंध्र प्रदेश, केरळ, विजयवाडा, रायपूर आदी ठिकाणांहून आंब्यांची आवक वाढली. यामुळे भाव कमी झाले आहेत.

सध्या बाजारात बदाम, केसर, गुलाबखश आदी जातीचे आंबे ६० ते ८० रुपये दराप्रमाणे विक्री होत आहेत. कोकण आणि आंध्र प्रदेशातील हलक्या प्रतीचे आंबेही शहरात दाखल झाले असून त्यांचा दर ५० ते ६० रुपये किलो आहे. मार्च महिन्यात ६०० ते ८०० रुपये प्रतिडझन दराने रत्नागिरी हापूसची विक्री झाली. सध्या हेच दर कायम आहेत. तर तर कोकणातील आंबे जे ८०० ते १००० रूपये डझन होते ते आता ६०० ते ७०० रूपयांपर्यंत खाली उतरले आहेत. कोकणात हापूसचे उत्पादन कमी झाल्याने हे दर अखेरपर्यंत कायम राहतील, असा अंदाज आहे.

बाजारात सध्या मिनी हापूसही विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, खवय्यांकडून कोकणातील हापूसला मागणी असते. शहरात दररोज २०० पेक्षा अधिक पेट्यांची तर २ ते ३ टनांपेक्षा अधिक इतर आंब्यांची विक्री होत असल्याचे फळविक्रेते युसूफ बागवान सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटी परिसरात मृत अर्भक सापडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी हॉस्पिटल परिसरात मंगळवारी (२८ एप्रिल) सकाळी एक दिवसाच्या बाळाचा मृतदेह सापडला. ही माहिती एका नागरिकाने पोलिसांना त्वरित दिली. पण हाकेच्या अंतरावर असलेल्या बेगमपुरा पोलिसांना घटनास्थळी येणासाठी तब्बल दीड तास लागला. घाटी हॉस्पिटल परिसरातील बांधकाम विभाग कार्यालयालगत एक दिवसाच्या बाळाचा मृतदेह कपड्यात गुंडाळून टाकून दिलेला आढळला. ही माहिती एका नागरिकाने पोलिसांना लगेच कळविले. बेगमपुरा पोलिस लगेच येणे अपेक्षित असल्याने ते दीड तास उलटूनही फिरकले नाहीत. माध्यमांचे प्रतिनिधी आल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी धावत- पळत येऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंडेंची सरशी

$
0
0

म. टा. प्रतिधिनी, बीड

बीड जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा पालवे यांची सरशी झाली आहे. कारखान्याच्या वीस जागांपैकी १४ जागांवर लोकनेते गोपीनाथ मुंडे पॅनेलचे उमेदवार निवडून आले आहेत. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक रविवारी पार पडली.

या वेळी परंपरागत मुख्य लढत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथ मुंडे पॅनेल विरुद्ध विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनेलमध्ये होती. जाहीर झालेल्या १४ जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आल्याने कारखाना पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात राहणार हे सिद्ध झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवी श‌िमल्याची थंडगार हवा

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

उन्हाचा कडाका वाढताच औरंगाबादकर पर्यटक हिमाचल प्रदेशातील थंडगार पर्यटनस्थळांकडे रवाना झाले आहेत. या हंगामात शिमला, मनाली, चंडीगड आणि डलहौसी येथे औरंगाबाद शहरातून जवळपास ४० हजार पर्यटक गेले आहेत. काश्मिरात हिंसाचार उफाळल्यामुळे पर्यटकांनी हिमाचल प्रदेशाला पसंती दिली आहे. तर कमी कालावधीची सुटी मजेत घालवण्यासाठी काही पर्यटकांनी महाबळेश्वरला मुक्काम ठोकला आहे.

शाळेला सुटी लागल्यानंतर पर्यटन हंगाम बहरतो. सुरक्षित आणि देखण्या पर्यटनस्थळी मुलांसह जाण्याचा बेत कुटुंबीय आखतात. दरवर्षी जम्मू-काश्मिरात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते; मात्र, सध्या काश्मिरात हिंसाचार उफाळल्यामुळे पर्यटकांनी हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळांना पसंती दिली आहे. बर्फाळ प्रदेशात सुटी मजेत घालविणे पर्यटकांना आवडते. त्यामुळे कुलू मनाली, चंदिगड, शिमला, खजिआर, डलहौसी येथे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. याशिवाय उत्तरांचल राज्यातील नैनिताल, मसुरी आणि डेहराडून येथेही पर्यटक गेले आहेत. औरंगाबाद शहरातून आतापर्यंत तब्बल ४० हजार पर्यटक या दोन राज्यांत गेले आहेत, अशी माहिती पर्यटन व्यावसायिकांनी दिली. देशांतर्गत पर्यटनासोबत विदेशात जाण्याचा ट्रेंडही वाढला आहे. यंदा भूतानला जाण्याचे लक्षणीय प्रमाण आहे. थायलंड, सिंगापूर, बँकॉक, पटाया या नेहमीच्या देशातही पर्यटक वाढले आहेत. किमान ५० ते ८० हजार रुपये टूर पॅकेज असल्यामुळे या देशांना पसंती मिळत आहे. अडीच लाखांपेक्षा अधिक पैसे मोजण्याची तयारी असलेले पर्यटक युरोपात जात आहेत. विदेशात पर्यटनासाठी आतापर्यंत एक हजार पर्यटक गेले अशी माहिती 'टुरिस्ट प्रमोटर्स गिल्ड'चे अध्यक्ष जसवंतसिंह राजपूत यांनी दिली. मागील काही वर्षांपासून युरोपात जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

महाबळेश्वर हाउसफुल्ल

कमी सुटी आणि कमी बजेट असलेले पर्यटक महाबळेश्वरला रवाना झाले आहेत. पाचगणी आणि महाबळेश्वर येथे पर्यटकांची संख्या तुलनेने वाढली आहे. दमट हवामान असल्यामुळे कोकणला कमी पसंती आहे. औरंगाबाद शहराचे तापमान वाढल्यानंतर पर्यटनासाठी अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी जातील, असा पर्यटन व्यावसायिकांचा अंदाज आहे.

स्वतःचे वाहन घेऊन पर्यटनाला जाणारे पर्यटक कोकण किंवा महाबळेश्वरला जातात. चार-दोन दिवस राहून परततात तर, १० ते १५ दिवस मुक्काम करणारे पर्यटक हिमाचल प्रदेशला जात आहेत.

- जसवंतसिंह राजपूत, अध्यक्ष, टुरिस्ट प्रमोटर्स गिल्ड.

शेजारच्या भूतान देशातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी पर्यटक उत्सुक आहेत. या पर्यटकांची संख्या वाढली आहे. यंदा युरोपात जाणाऱ्या पर्यटकांचीही संख्या तुलनेने अधिक आहे.

- सारंग टाकळकर, संचालक, अभिश्री ट्रॅव्हल्स.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू वाहतूक करणारे १९ ट्रक जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळुच्या साठेबाजीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने मंगळवारी अचानक कारवाईला सुरुवात केली. शहरात विविध ठिकाणी छापे टाकून १९ ट्रक जप्त करण्यात आले. मंगळवारी सकाळीच पंचवटी चौक, बीड बायपास रोड, वाळूज रोडवर प्रशासनाने अचानक कारवाई सुरू केली. यामध्ये ५ हायवा ट्रक व अन्य लहान ट्रक मिळून १९ वाहनांमध्ये असलेली वाळू जप्त केली. वाळू भरलेली वाहने तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आली आहेत. वाळू उपसा बंद असतानाही शहरात चोरट्या मार्गाने सर्रास वाळू विक्री सुरू आहे. प्रशासनाच्या नाकाखाली ‌टिच्चून सुरू असलेल्य या प्रकारात केवळ तोंडदेखली कारवाई करण्यात येते. 'आमच्याकडे कर्मचारी नाहीत', 'पोलिस बंदोबस्त नाही' अशी कारणे सांगत महसूल प्रशासन नेहमीच बेकायदा वाळू उपसा आणि विक्रीकडे काणाडोळा करत आले आहे. गौण खणिजच्या नियमाप्रमाणे कंत्राटदारांनी लिलावात घेतलेल्या पट्ट्यांमधून ठराविक ब्रास वाळू उपसा करण्यात येतो, मात्र ही वाळू विक्रीसाठी कोठेही साठवून ठेवता येत नाही. असे न होता चोरीच्या मार्गाने वाळू उपसा करून शहरात वाळुची साठेबाजी करण्यात येते.

असा वाहनाच्या जप्ती व दंडाची तरतूद आहे, मात्र कारवाई केल्याचे दिसत नाही. काही ठिकाणी किरकोळ कारवाई करण्यात येते. प्रशासनाने कारवाई सुरू केली असली तरी, अनधिकृत साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात महसूल विभाग धजावत नसल्याचे चित्र आहे.

शहरातील साठ्यांवर कारवाई केव्हा?

शहरामध्ये महापालिकेच्या हद्दीत सर्रास साठा करून वाळू विक्रीचे प्रकार सुरू आहेत. किराडपुरा, पुंडलिकनगर, हर्सूल टी पॉइंट, पंचवटी चौक, जकात नाका परिसर, टीव्ही सेंटर आझाद चौक या भागांत महसूल प्रशासन, पोलिसांच्या डोळ्यांदेखत महापालिकेच्या जागांवर वाळू साठविण्यात येते. भर रस्त्यात वाळू विक्री होत असल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच्यांवर कारवाई केली जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणमध्ये पुन्हा निर्जळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

गागा भट्ट चौकातील भरणा जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली. सातत्याने जलवाहिनी फुटून पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी भूमिगत गटार योजनेचे काम करणाऱ्या गुत्तेदाराच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी घटना टळली. जलवाहिनी फुटल्याने गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी संजय पवार यांनी दिली.

मागच्या आठवड्यात दोनदा शहराला पाणीपुरवठा करणारी भरणा जलवाहिनी फुटली होती. बुधवारी संध्याकाळी भूमिगत गटार योजनेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा गागा भट्ट चौकात ही जलवाहिनी फोडली. जलवाहिनी फुटल्याची वार्ता शहरात पसरताच मोठ्या संख्येने शहरवासीय गागा भट्ट चौकात जमा झाले. जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार हे लक्षात आल्याने संतप्त नागरिकांनी भूमिगत गटार योजनेचे काम करणाऱ्या गुत्तेदाराच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.

दरम्यान, नगरसेवक इमाम अन्सारी, सुधाकर तुपे व राजूभाई वीटभट्टीवाले यांनी घटनास्थळी गुत्तेदाराच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. याविषयी नगर पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार संजय पवार यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, भरणा पाईपलाईन फुटल्याने गुरुवारी शहराला पाणीपुरवठा होणार नाही. तसेच, यापूर्वी पाईपलाईन फोडल्याने आम्ही भूमिगत गटार योजेनेचे काम करणाऱ्या गुत्तेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, मात्र अजून संबंधित गुत्तेदाराने आपल्या कामात सुधारणा केली नाही नसून त्याच्याविरोधात कडक कार्यवाही करण्याचा विचार सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज रिक्षांची चाके थांबणार

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्ते सुरक्षा विधेयक २०१४ च्या विरोधात देशव्यापी आंदोलनास पाठिंबा देत शहरातील लालबावटा रिक्षा युनियननेही गुरुवारी (दि. ३०) रोजी रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रस्ते सुरक्षा विधेयकात वाहन चालक संघटनांनी अनेक बदल सुचविले होते. मात्र, त्याची दखल सरकारने घेतलेली नाही. त्यामुळे केंद्रीय कामगार संघटना तसेच स्वतंत्र वाहतूक संघटनांनी ३० एप्रिल रोजी देशव्यापी एसटी, तसेच अन्य वाहनांचा बंद पुकारला आहे. आंदोलनाला ऑ‌टो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीनेही पाठिंबा दिला आहे. लालबावटा रिक्षा युनियनही यात सहभागी झाली आहे. लालबावटा रिक्षा युनियनसह परिवर्तन रिक्षा चालक संघटना, वाय.एफ. खान रिक्षा टॅक्सी संघटना आणि न्यू जनता ऑटो रिक्षा युनियननही बंदमध्ये सहभागी होत असल्याची माहिती संघटनेचे सचिव अश्फाक सलामी यांनी दिली.

पैठण गेटवर धरणे आंदोलन

लालबावटा रिक्षा युनियनच्या वतीने पैठण गेट येथे रिक्षा चालकांचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे धरणे आंदोलन सायंकाळी पाच वाजेपर्यंत पैठण गेट येथे सुरू राहणार असल्याची माहिती सलामी यांनी दिली.

एसटीनेही केली बंदची तयारी

या संपात सहभागी होण्याबाबत एसटी विभागातील एकाही संघटनेने अधिकृत सूचना दिलेली नाही, मात्र अनेक एसटी संघटनांनी या विधेयकाला विरोध केला आहे. यामुळे देशव्यापी बंदमुळे एसटीची सेवेत अडचण येऊ नये यासाठी एसटी विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. एसटी चालकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. एसटीमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक आर.एन. पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...इथे कोंडतो रोजच श्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादमधील सर्वात गजबजलेली भाजीमंडई म्हणून शहागंजच्या भाजीमंडईचे नाव घेतले जाते. भाजीमंडईच्या मध्यवर्ती चौकात मात्र ग्राहकांना भाजी घेताना नाना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रोज पादचारी आणि भाजी घेणाऱ्या ग्राहकांचा चौकातील ‌रिक्षा, फेरीवाले यांच्यामुळे श्वास कोंडतो, वारंवार अपघात आणि कोंडी यांना सामोरे जावे लागत आहे. शहागंज भाजीमंडईत सध्या दोन ठिकाणी रिक्षा स्टँड आहेत. २० रिक्षा दोन्ही स्टँडवर उभ्या राहतात. दोन्हीकडील रिक्षांची गर्दी भाजी मंडईला अतिशय त्रासदायक ठरत आहे. या भाजीमंडईच्याच चौकात सुमारे ५० हून अधिक फेरीवाले, फळवाले आहेत. मंडईच्या रस्त्यांमध्येच दुतर्फा ट्रॅक्सही उभ्या राहतात. यामुळे देखील फेरीवाले, भाजीविक्रेते रस्त्यावरच आपली दुकाने थाटत आहेत. भाज्यांचे ठेले, रिक्षा, दुतर्फा ट्रक्स यामुळे येथे रोज अपघात होत आहेत. यामुळे वारंवार भांडणे आणि वाद अशा तक्रारी वाढत आहेत. शहागंजमधील भाजी बाजार हा सर्वांत जुना बाजार असूनही भाजीविक्रेत्यांनाही कोणतेच परवाने दिले जात नसून हॉकर्स झोन म्हणूनही या भागात कोणताच भाग घोषित करण्यात आलेला नाही. यामुळे रोज या शहागंज भाजीमंडईत बजबजपुरी होते व श्वास कोंडतो. या भागातील माजी नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी याकडे कोणतेच लक्ष दिले नाही, अशा तक्रारी या परिसरातील नागरिक आणि भाजीविक्रेत्यांकडून होत आहेत.

रिक्षांची बेशिस्त पार्किंग अडचणीची

भाजी मंडईतील चौकाच्या शेजारीच रिक्षांसाठी वेगळा थांबा तयार करण्यात आला आहे, मात्र येथे रिक्षा न लावता बसस्थानक, तसेच चौकाच्या आजूबाजूला रिक्षा उभ्या करत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. पोलिस चौकी आणि रिक्षा पार्किंग समोरासमोर आहेत, पण पोलिसही बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीटूचा महिनाभर आंदोलनाचा इशारा

$
0
0

म.टा.प्रतिनिधी वाळूज

कायदे करताना शेतकरी, कामगार वर्गाचा सरकार विचार करीत नसल्याने या विरोधात सीटूने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सलग महिनाभर वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले जाणार असल्याची माहिती कॉ. उद्धव भवलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भवलकर म्हणले की, सध्याच्या सरकारची भूमिका पूर्णतः कामगार विरोधी आहे. कामगारांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. कामगारांच्या हिताचे कायदे न करता सरकारने कंपनी, मालकांच्याच हिताचे कायदे बनविण्यात स्वारस्य दाखविले आहे. या कायद्यांचा सीटू जोरदार विरोध करणार आहे. १ मे रोजी पंढरपूर येथील वाळूज औद्योगिक परिसरातील कामगार चौक पुतळ्यापासून दुचाकी रॅलीने आंदोलनाला सुरुवात करण्यात येईल. सायंकाळी ७ वाजता बजाजनगर येथील शहीद भगतसिंग शाळेच्या मैदानावर सीटू परिवारचा मेळवा व संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुढील अंदोलनाची दिशाही ठरविण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस संघटनेचे शंकर नन्नुरे, दिगंबर शिंदे, ख्रिस्तोफर गायकवाड, उद्धव नागरे, संतीष कुलकर्णी, नागरनाथ बढे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीई प्रवेश लटकलेलेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरटीई कायद्यानुसार मोफत प्रवेश प्रक्रियेचा घोळ अद्याप सुरूच आहे. प्रवेशासाठी सोडत प्रक्रिया होऊन आठवडा होत आला तरी, अद्याप ‌पालकांना शिक्षण विभागाकडून एसएमएस आलेले नाहीत. आता सलग तीन दिवस सुटी आल्याने ही प्रक्रिया रेंगाळणार असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. शिक्षण विभागाचा या कारभारामुळे शाळांना मात्र अभय मिळत आहे. सोडतीत नंबर लागल्याची माहिती पालकांना एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. शिक्षण विभागाने १० मेपर्यंत प्रवेश देण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. त्यामुळे पालकांची प्रवेशासाठी धावपळ उडणार आहे. शिक्षण विभागाचा हा गोंधळाचा कारभार शाळाच्या पथ्यायावर पडेल, अशी पालकांची भावना आहे.

शिक्षण विभागाने प्रवेशासाठी सोडत काढली. प्रवेश निश्चित झाले की नाही, याचे एसएमएसही आलेले नाहीत.

- संजय सरकटे, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्योतीनगरमधील रस्त्यावर मरणयातना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उच्च मध्यमवर्गीय वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योतीनगर-दशमेशनगरच्या रस्त्यावर नागरिकांना अक्षरशः मरणयातना सहन कराव्या लागत आहे. गेल्या पाच वर्षांत या रस्त्याचे डांबरीकरण तर दूरच, पण साधा मुरूम अंथरण्याचे कामही महापालिकेने केलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे.

शहरातील काही कुख्यात रस्त्यांमध्ये ज्योतीनगर-दशमेशनगर रस्त्याचा समावेश आहे. या रस्त्यावरील खड्डे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. महादेव मंदिर, दुकाने, मंगल कार्यालय, शाळा, कंपन्यांची वाहने यामुळे हा रस्ता गजबजून गेला आहे. रस्त्यावर कायम रहदारी सुरू असते. उस्मानपुरा येथून शहानूरमिया दर्गा आणि प्रतापनगरकडे जाणारे नागरिक याच रस्त्यावरून ये-जा करतात. त्याशिवाय एसबीआय कॉलनी, उल्कानगरी या भागाला जोडणाराही हाच रस्ता आहे. आता या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. एक तपापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्त्याचे डांबरीकरण करा, अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली, मात्र नगरसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेचे गिरजाराम हळनोर या वॉर्डाचे नगरसेवक होते. त्यांना या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करून घेणे सहज शक्य होते, पण त्यांनी ते काम केले नाही.

नागरिकांची ओरड झाल्यावर पॅचवर्कच्या नावाखाली ठिगळपट्टी करण्यात आली. दोन महिन्यांत रस्ता पुन्हा उखडला. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना पाठीचे व मानेचे आजार जडले आहेत. धुळीच्या साम्राज्यामुळे दम्याचा त्रासही होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. महापालिका किंवा नगरसेवक मात्र रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देताना दिसत नाही.

ज्योतीनगर-दशमेशनगर रस्त्याचे काम मंजूर झाल्याचे अडीच वर्षांपासून ऐकतो, पण अद्याप काम सुरू झाले नाही. दुकानांसमोर प्लेव्हर ब्लॉक्स बसविणे, स्वच्छतागृहाची व्यवस्था आवश्यक आहे. काशिनाथ दरख यांच्या घरापासून माजी महापौर डॉ. काळे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काम अर्धवटच राहिले आहे, ते पूर्ण करावे.

- सुधीर बाहेकर

रस्ता खूपच खराब आहे. जागोजागी खड्डे झालेले आहेत. रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी झाले पाहिजे. खराब रस्त्याचा परिणाम नाल्यांवर झाला आहे. नाल्या तुंबल्यामुळे रस्त्यावर सांडपाणी साचते. त्यातून वाट काढत जाणे कठीण होऊन बसते. या समस्येकडे महापालिकेने लक्ष दिले पाहिजे व रस्त्याचे काम लवकर पूर्ण केले पाहिजे.

- श्रद्धा देवडीकर

ज्योतीनगर रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून झालेले नाही. रस्त्याच्या कामाबरोबरच स्पीड ब्रेकरचे कामही करावे. या संपूर्ण परिसरात स्वच्छतागृहाची गरज आहे. त्याचीही दखल घेतली पाहिजे.

- दिगंबर यादव

रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे आणि मजबूत, चांगला रस्ता नागरिकांना वापरासाठी उपलब्ध व्हावा, अशी नागरिकांची भावना आहे. त्याची दखल महापालिकेने घेतली पाहिजे. आंदोलन होऊनही रस्त्याचे काम केले जात नाही, ही आश्चर्याची बाब आहे. रस्त्याबरोबरच सार्वजनिक स्वच्छतागृहाचा प्रश्नही महापालिकेने सोडविला पाहिजे.

- रवींद्र महाजन

ज्योतीनगर-दशमेशनगरचा रस्ता काही वर्षांपासून आहे तसाच आहे. विजया रहाटकर नगरसेवक असताना सुरुवातीच्या काळात त्यांनी या रस्त्याचे काम केले. त्यानंतर रस्त्याचे काम झालेच नाही. आता तरी काम होईल, अशी अपेक्षा आहे.

- श्रीकांत वळसंगकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाच दिवसाचा आठवडा’ निर्णय राबविणे अशक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा पाच दिवस चालविण्यास आडकाठी न करता दोन दिवस सुटीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे लेखी आदेश शिक्षण सचिवांनी बुधवारी काढले. सचिवांनी हे आदेश काढले तरी औरंगाबादसारख्या शहरात दोन शिप्टमध्ये शाळा चालतात, त्या शहरांमध्ये अशा प्रकारे पाच दिवसांचा आठवडा पाळणे अशक्य असल्याचे मुख्याध्यापक, शिक्षकांचे मत आहे.

'आरटीई' कायद्यानंतर शाळांना शनिवार, रविवार असे दोन दिवस सुटी देत पाच दिवसांचा आठवडा पाळण्यात यावा अशी मागणी पुढे आली. यानंतर बुधवार(२९ एप्रिल) शिक्षण सचिवांनी याबाबत लेखी आदेश काढत, पाच दिवस शाळा चा‌लविण्यास आडकाठी न करता दोन दिवसांचा सुटीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. शिक्षण सचिवांनी याबाबत सूचना दिल्या असल्या तरी राज्यभरातील मुख्याध्यापक शिक्षकांमध्ये याबाबत मतभिन्नता आहे. औरंगाबादसारख्या शहरात या निर्णयाची अंमलबजावणी करणेच अशक्य असल्याचे मुख्याध्यापकांचे मत आहे. आरटीईनुसार आठवड्याला ५० तासिका पूर्ण होणे आवश्यक आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये दहा तास शाळा चालतात, तेथे याची अंमलबजावणी शक्य आहे. मात्र, औरंगाबादमध्ये बहुतांशी शाळा या दोन सत्रात चालतात. तेथे अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे अमंलबजावणी शक्य नसल्याचे मत पुढे आले आहे.

अशा प्रकारच्या नियमाची अमंलबजावणी शक्य यासाठी नाही, की आपल्या शाळा सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात चालतात. एकीकडे आरटीईत आठवड्यात ५० तासिका झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. तेवढा वेळ तासिका व्हायच्या असतीत, तर अमंलबजाणी शक्य नसल्याचे दिसते.

- सुलभा वट्टमवार, मुख्याध्यापक, कर्मवीर शंकरसिंह नाईक हायस्कूल

मोठ्या शहरांसमोर ठेवून या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्याकडे मात्र दोन सत्रात शाळा चालविल्या जातात. अशा परिस्थितीत तिथे अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार, याचा विचार शिक्षण विभागाने केलेला नाही. त्यामुळे हा निर्णय लादलेला आहे.

- मनोहर सुरगडे, मुख्याध्यापक, श्री साईनाथ विद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर समांतर जीवन प्राधिकरणामार्फत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महापालिकेचा प्रस्ताव आल्यास समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम जीवन प्राधिकरणामार्फत पूर्ण करू,' अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी (२९ एप्रिल) दिली. लोणीकर शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

लोणीकर म्हणाले, 'पाणीपुरवठा विभागाकडे मोठ्या प्रमाणात तज्ज्ञ अभियंते आहेत. धुळे मनपाची एक योजनाही या खात्यामार्फत राबवली जात आहे. बहुचर्चित 'समांतर'चे काम जीवनप्राधिकरणामार्फत करण्याची तयारी आहे. अर्थात, हा नगरविकास विभागाचा विषय असून, त्यांनी पालिकेमार्फत प्रस्ताव पाठविल्यास निश्चित काम करू. समांतर प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलवली आहे. आमदार अतुल सावे यांनी लक्षवेधी मांडली होती. जनतेला परवडेल अशा दरात पाणी उपलब्ध झाले पाहिजे. काही वाद असल्यास सरकार हस्तक्षेप करतेच.'

लोणीकर पुढे म्हणाले, 'राज्यात आता १ मेपासून पाणीपुरवठा विभागाचे महसूलनिहाय विकेंद्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या विभागाच्या कामांसाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना आता ठाणे, नाशिक, पुणे या कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. मराठवाड्याचे विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे स्थापन होणार आहे. या ठिकाणी नागरी, ग्रामीण योजनांचे सनियंत्रण, प्रकल्प व्यवस्थापन सेवा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चालवित असलेल्या योजनांचे संचलन ही कामे केली जातील.

वीजबील माफीचा विचार

'ग्रामीण नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनांचे थकित वीजबिले माफ करा, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. किमान पन्नास टक्के माफी देण्याबाबत विचार करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. दुष्काळग्रस्त भागातील योजनांची संपूर्ण वीजबिल माफी व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहोत,' असे लोणीकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images