Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बँकेवर कारवाईचा फास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,जालना

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सरकार कारवाईचा फास लवकरच आवळणार असल्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शेतकऱ्याच्या दुष्काळी अनुदानाची रक्कम बँक स्वतःच्या धंद्यात गुंतवणूक करत असल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी शासनाकडे आल्या आहेत. जिल्हाधिकारी नायक यांनी याबाबत बँकेला नोटीस बजावली असल्याचे लोणीकर यांनी सांगितले.

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अंकुशराव टोपे यांनी जिल्हय़ातील दुष्काळी अनुदान वाटपात मोठे राजकारण सुरू केले आहे. राष्ट्रवादी विचारांच्या विरोधात असलेल्या गावांमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा होत नाही, असा आरोप पालकमंत्री लोणीकर यांनी केला. आमदार राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्याची दिशाभूल थांबवावी. टोपे पालकमंत्री असताना गेल्या पाच वर्षांत त्यांनी अवघे ३३ कोटी ८९ लाख रुपये पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिले आहे. सन २०१२-१३ च्या भयंकर दुष्काळात केवळ ३२ कोटी ७६ लाख रुपये जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना टोपे पिता-पुत्रांनी वाटप केले, असा आरोपही त्यांनी केला.

चालू वर्षांत दुष्काळात होरपळून निघत असलेल्या शेतकऱ्यांना पिक विम्याची १९० कोटी रुपये वाटप होणार आहेत. या सरकारच्या निर्णयाचे राजकारण करण्याच्या हेतूसाठी राष्टूवादीने जालन्यात मोर्चा काढला असल्याचे लोणीकर म्हणाले.

अन्यथा आता गाठ माझ्याशीच

शेतकऱ्यांना खरीच मदत करायची असेल तर खऱ्या अर्थाने जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार लक्ष केंद्रित करून चालवण्याची गरज आहे. शेतकऱ्याच्या सरकारी अनुदानाचे वाटप वेळेत पूर्ण करा. त्यामध्ये राजकारण करू नका अन्यथा गाठ आता माझ्याशीच आहे असा खणखणीत इशारा लोणीकर यांनी टोपे पिता-पुत्रांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

राष्ट्रीय पीक विमा योजनेतंर्गत बीड जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक ३३६ कोटी ५८ लाख रूपये पीक विमा मंजूर झाला आहे. ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एवढी मोठी रक्कम प्रथमच मंजूर झाली आहे. दुष्काळाने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

बीड जिल्ह्यात सातत्याने निर्माण होणारी दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता पालकमंत्री पंकजा मुंडे एकीकडे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाणी वाढविण्यासाठी प्रयत्नशील तर आहेत. दुसरीकडे त्यांनी पीक विमा योजनेतून जिल्ह्याला राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत ३३६ कोटी ५८ लाख ४६ हजार ६३० रूपये एवढी मोठी रक्कम मंजूर करून घेण्यात यश मिळवले आहे. खरीप हंगाम २०१४ साठी जिल्ह्यातील सात लाख ३२ हजार ७७० शेतकरी या योजनेत सहभागी झाले होते. त्यापैकी सहा लाख २८ हजार ५१५ शेतकरी त्यासाठी पात्र ठरले. एकूण तीन लाख ९७ हजार ८८० हेक्टरसाठी हा विमा भरण्यात आला होता.

सोयाबीन, तूर, मुग आणि कापूस या पिकांना विमा मंजूर झाला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या वरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना विमा कंपनी आता नुकसान भरपाई देणार आहे. बीड जिल्हयाला मंजूर झालेली विम्याची रक्कम राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. बीडनंतर जालना जिल्ह्याला १९ कोटी रूपये इतका पीक विमा मंजूर झाला आहे. उर्वरित जिल्हे त्याखाली आहेत. अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना या विम्याचा मोठा फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाचण्यावरून युवकावर हल्ला

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुन्या भांडणाच्या कारणावरून युवकाच्या घरावर हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे शिवाजीनगर भागात घडला. या घटनेत युवकावर चाकूहल्ला करीत आठ ह‌जार रूपये पळवण्यात आले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर भागातील पवन जैस्वाल (वय १८) या युवकाचा सोहेल शेख नावाच्या युवकासोबत जुना वाद आहे. शुक्रवारी पह‌ाटे सोहेलने पवनला फोन करून कुठ आहे असे विचारले. पवनने घरी असल्याचे सांगितल्यानंतर सोहेल सात ते आठ साथीदारासह त्यांच्या घरात घुसला. या कार्यक्रमात का नाचवण्यास लावले या कारणावरून पवनवर चाकूने दंडावर वार केला. सोबतच्या साथीदारांनी सायकलच्या चैनने व दगडाने मारहाण केली. या घटनेत पवनच्या डोक्यात दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीतही गाड्या जाळण्याचा प्र‌कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

वाहन जाळण्याचे पेव आता फुलंब्रीपर्यंत पोहोचले आहे. येथील याज्ञीक पुरोहीत मदन जोशी यांची वॅगनार कार अज्ञात इसमाने जाळली आहे. ही घटना शुक्रवारी ( १५ मे) मध्यरात्री घडली. मदन जोशी यांचे गणपती मंदिराजवळघर आहे.घराजवळ वॅगनॉर कार ( क्र. एम. एच. ०१ ए. सी. ९०७३) उभी होती. शुक्रवारी रात्री बारानंतर हे वाहन अज्ञात इसमाने समोरच्या बाजूने पेटवून दिले. यामुळे वाहनाचे इंजिन जळाल्याने दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

ही घटना घडल्यानंतर झालेला भडका शेजारील व्यक्तीने आरडा-ओरडा करून सर्व गल्ली जागी केली. यानंतर सर्वांच्या प्रयत्नाने ही कार विझविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, यामध्ये कारचे समोरील इंजिन व बोनेट जळाले. याबाबत फुलंब्री पोलिसात नोंद झाली असून पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंचानामा होऊन पुढील तपास सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी येथील कचरू कुडके यांचे शेत व समाधान ढाबा रस्त्यावर आहे. या ढाब्यासमोरील दुचाकी वाहनास असेच अज्ञात इसमाने पेटवून दिले. यामध्ये ही दुचाकी पुर्णपणे जळाली. यामुळे वाहन धारकांत घबराट निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपुरातील अतिक्रमणावर हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज

औरंगाबाद-नगर महामार्गावरील पंढरपूर येथील तिरंगाचौक ते कामगार चौकापर्यंत पसरलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोडी झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी जागतिक बँक प्रकल्प व के.टी.संगम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया कंपनीने पोलिस व अतिक्रमण हटवा पथकाच्या सहकार्यांने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद-नगर हा महामार्गावरील पंढरपूर येथे गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणात मोठ्या संख्येन वाढ होत आहे. रस्त्यावर वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहनांची मोठी कोंडी होतहोती. तर अपघाताचे प्रमाणातही वाढ झाली होती. त्यामुळे या महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात येत होती.

त्यावर जागतीक बँक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून हे अतिक्रमण हटविण्याचे काम शुक्रवारपासून ( १६मे) सुरू करण्यात आले. यावेळी अतिक्रमण हटविण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामध्ये जागतीक बँकेचे अधिकारी प्रकल्प एम. एन. कानडे, एस. एस. म्हस्के, के.टी. संगम, इन्फो. इंडिया कंपनीचे के. पी. आग्रवाल, गणेश राऊत, वाहतूक पोलिस निरिक्षक डॉ. जी. एस. दराडे, पीएसआय एम. बी. चौधरी यांच्यासह ३०ते ३५ पोलिस कर्मचारी तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी जेसीबी आदींचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम पाडण्यासाठी याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

हौसिंग सोसायटीचे बनावट कागदपत्र तयार करून, बेकायदेशीर सभा घेऊन भूखंड हडप करण्यात आला. त्या भूखंडावर असलेले बांधकाम पाडण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका करण्यात आली आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी, तत्कालीन उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत,मनपा आयुक्त,सिडको प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्यासह १४ जणांना नोटीस बजावण्याचे आदेश सुटीतील न्या.इंदिरा जैन यांनी दिले आहेत.

ही याचिका विद्यासागर फ्लॅट ओनर्स हौसिंग सोसायटीचे मुख्य प्रवर्तक पांडुरंग विठ्ठलराव डक यांनी केली आहे. सिडकोतर्फे फेब्रुवारी २००९मध्ये भूखंडाच्या सोडती काढण्यात आल्या. त्यात एन ४ येथील प्लॉट क्रमांक २३५, सर्व्हे क्रमांक २३ -२४मधील भूखंड विद्यासागर फ्लॅट ओनर्स हौसिंग सोसायटीला मिळाला होता.संस्थेचे मुख्य प्रवर्तक पांडुरंग विठ्ठलराव डक यांच्या नावाने या सोडतीमध्ये चिठ्ठी निघाली होती. या संस्थेत २०१०मध्ये रवींद्र बळीराम राजपूत, मीनाक्षी राजपूत,डॉ. बाळासाहेब कदम व सुवर्णा कदम यांना सिडकोच्या परवानगीने सभासदत्व देण्यात आले होते.हा भूखंड फ्लॅट ओनर्स म्हणून आरक्षित असताना या ठिकाणी बंगला बांधण्याचे काम राजपूत व कदम यांच्याकडून सुरू करण्यात आले होते.

दरम्यान, पांडुरंग डक यांनी सर्व सभासदांच्या सह्याने ऑक्टोबर २०११ मध्ये संस्था नोंदणीसाठी तालुका उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला होता. याबाबत कारवाईचे आदेश उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने सहकार अधिकारी डी. आर. मातेरे यांना देण्यात आले होते. मात्र, मातेरे यांच्याशी अकरा सदस्यांनी संगनमत केले.१५ नोव्हेंबर २०११ रोजी नोटीस काढून ३० नोव्हेंबर रोजी संस्थेची सभा घेण्यात आली. यामध्ये बोगस प्रोसिडिंग बनवून मुख्य प्रवर्तकाला डावलून ही बेकायदा सभा घेण्यात आल्याचा आक्षेप या याचिकेत घेण्यात आला आहे.

बारा जणांविरुद्ध कोर्टाच्या आदेशाने सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.त्यात निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, संस्थाचालक डॉ. बाळासाहेब कदम, सहकार अधिकारी मातेरे आदींचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट दस्तावेज तयार करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बांधकाम प्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील एन बी पाटील यांनी नोटीस स्वीकारली. याचिकाकर्त्याची बाजू सुधीर भालेराव यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांना निलंबित करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गोणार येथील युवक संतोष भालके याचा अपहरण करून खून करण्यात आला. या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या दोषी पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्यावतीने विशेष पोलिस महानिरीक्षक आणि जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे करण्यात आली आहे.

संतोष भालके याचे २४ फेब्रुवारी २०१५ रोजी अपहरण करण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल न करता प्रकरण चौकशीवर ठेऊन कंधार पोलिसांनी आरोपींशी सौदेबाजी करून त्यांना फरार होण्यास सहकार्य केले. त्यामुळेच संतोषचा खून झाला. या सर्व प्रकारास पोलिस अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच सर्व आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कार्यकर्त्यांनी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

भालके अपहरण व खून प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची व सर्व आरोपींना अटक करण्याची तात्काळ कार्यवाही नाही केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर, विदर्भ प्रमुख भगवान गायकवाड, सतीश भालके आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचायतीच्या निवडणुका जुलैमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रमुख घटक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या जुलै महिन्यात होणार आहेत. जिल्हा प्रशासन स्तरावर त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील या ४२३ ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांचा कार्यकाल सप्टेंबर २०१५ मध्ये संपत आहे. राजकारणाचे प्रशिक्षण केंद्रे म्हणूनच ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते. त्या दृष्टीने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या बेंबळी, आळणी, वडगाव (सि.), येरमाळा, पारगाव, तेरखेडा, इट, आष्टाकासार, अणदूर, जळकोट, मंगरूळ या गावांचा या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रामुख्याने समावेश आहे. उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या रणधुमाळी नंतर आता या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पुन्हा एकदा जिल्हा राजकारण ढवळून निघणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. परंतु, देशात व राज्यात भाजप व सेना युतीची सत्ता आल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर देखील आपलेच वर्चस्व असावे यासाठी भाजप व शिवसेना प्रयत्नशील आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी दिला आहे. पोलिसांविषयी लोकांमध्ये अधिक विश्वास निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्नशील असून, कम्युनिटी पोलिसिंगवर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला.

यापूर्वी अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून याठिकाणी येथे काम केले आहे. जिल्हा परिचित असल्याने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील गुंडगिरी, अवैध धंदे त्यांचा बिमोड केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ग्रामीण भागातील वाहतुकीच्या समस्या, कर्मचाऱ्यांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याबरोबरच जनतेला अधिकाधिक चांगली सेवा कशी मिळेल, यावर भर दिला जाईल. त्यासाठी कम्युनिटी पोलिसिंगवर भर असेल, असेही त्यांनी सांगितले.

असे आहेत रेड्डी

पोलिस खात्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून १९९५ मध्ये ते रुजू झाले. १९९८ पर्यंत चंद्रपुर जिल्ह्यात ते प्रोबेशनरी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी २००० पर्यंत पोलिस उपअधीक्षक म्हणून कर्तव्य बजाविले. परभणी जिल्ह्यात पोलिस उपाधीक्षक म्हणून काम केल्यानंतर औरंगाबाद शहरात त्यांनी सहायक पोलिस आयुक्त या पदावर काम केले. २००८ मध्ये औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. मुंबई येथे राज्य गुप्त वार्ता विभागात काम केल्यानंतर २०१० ते २०१४ पर्यंत त्यांनी दहशतवाद विरोधी विभागाचे अधीक्षक म्हणून कार्यकाळ सांभाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजाजनगरातही जाळपोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज

बजाजनगरापासून सुरू झालेल्या दुचाकी जाळण्याचा प्रकार काही काळ थांबताच पुन्हा नव्याने हा प्रकार सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री साडेबाराच्या सुमारास इंद्रप्रस्थ कॉलनी परिसरात तीन दुचाकी आणि एक चारचाकी वाहन जाळण्याचा प्रकार उघडकीस आला.

दुचाकी जाळण्याचा प्रकार सर्वप्रथम एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या हद्दीत गेल्या सहा वर्षांपूर्वी सुरू झाला होता. शेकडो गाड्यांची होळी होऊनही आद्याप खऱ्या आरोपींना पकडण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. दोन महिन्यांपूर्वी माजी पोलिस आयुक्तांनी हा प्रकार कायमचा बंद करण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. त्यादरम्यान माथेफिरू दुचाकी जाळण्यासाठी आले होते. पोलिसांनी पकडण्यासाठी धाव घेताच त्यांनी हल्ला केला. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. गोळीबार करूनही पकडण्यात त्यांना यश पोलिसांना आले नाही. शुक्रवारी रात्री बजाजनगरातील इंद्रप्रस्थ कॉलनीत राहणारे नागनाथ भीमराव कानशेट्टे यांची मारुती आल्टो-८०० (एमएच२० सीएस ९९१२), प्रविण भीमराज आल्हाट यांची होंडा शाइन (एमएच २० डीएल ३४२४), विनोद रामप्रवेश गिरी यांच्या स्पेंडर प्रो (एमएच२० सीई ४०९७) गाडीसह एक सायकल आज्ञात माथेफिरुने जाळून टाकल्या. दोन दुचाकी जळून खाक झाल्यातर काही नागरीकांच्या सतर्कतेमुळे कानशेट्टे यांची चार चाकी वाचली. याबाबत पोलिस ठाण्यात आज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.

बदली आणि जाळपोळ

अधिकारी व कर्मचारी यांची एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याला पसंती असते. गेल्या सहा वर्षांपासून दुचाकी जाळण्याच्या प्रकारामुळे ठाण्यास वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हा प्रकार सुरू होण्यापुर्वीपासून काही पोलिस कर्मचारी ठाण्यात ठाण मांडून होते. आशा २५हून अधिक कर्मचाऱ्यांची बदली होऊन ८ दिवसांचा कालावधी उलटला, तोच पुन्हा एकदा दुचाकी जाळण्याचा प्रकार उघडकीस आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभरात विकास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या विकासासाठी पाच वर्ष प्रतीक्षा करण्याची गरज नाही. विकासकामे करून वर्षभरात शहराचा चेहरामोहरा बदलू, असा शब्द महापौर त्र्यंबक तुपे यांनी शनिवारी दिला. 'मटा'तर्फे 'औरंगाबाद रायझिंग' उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

'स्मार्ट सिटी'च्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत, याची जाणीव करून देण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने हॉटेल अजंठा अँबेसेडर येथे शनिवारी एका अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी सर्वच नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी महापौर त्र्यंबक तुपे बोलत होते. व्यासपीठावर उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ, 'महाराष्ट्र टाइम्स'च्या औरंगाबाद आवृत्तीचे निवासी संपादक धनंजय लांबे उपस्थित होते. मोठ्या संख्येने नगरसेवक या कार्यक्रमाला हजर होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला धनंजय लांबे यांनी शहर विकास आणि शहरासंबंधीच्या महत्त्वाच्या मुद्यांबद्दल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केले. प्रेझेंटेशन करताना ते म्हणाले, '११३ नगरसेवकांपैकी बहुतेक जण प्रथमच निवडून आलेले आहेत. त्यामुळे येत्या पाच वर्षाच्या काळात शहर विकासाचे काम करताना नगरसेवकांनी कोणती 'बेस लाइन' लक्षात ठेवली पाहिजे हे लक्षात आणून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहराचा सर्वांगिण आणि समतोल विकास झाला पाहिजे, अशी 'मटा'ची भूमिका आहे.' हाच मुद्दा कार्यक्रमाची मध्यवर्ती कल्पना राहिला.

हाच धागा पकडून महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले, 'शहर विकासासाठी पाच वर्ष प्रतीक्षा करण्याची वेळ येणार नाही. एका वर्षात विकास करू आणि संपूर्ण शहराचा चेहरामोहरा बदलून टाकू. महापालिकेत नगरसेवकांची नवीन टीम आलेली आहे. नव्याने आलेले नगरसेवक काम करून घेण्याच्या बाबतीत फार फास्ट आहेत. त्यांचे सहकार्य घेऊन शहराच्या विकासाचे नियोजन केले जाईल. सर्व नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डातील विकासासाठी निधी मिळाला पाहिजे. सर्व वॉर्डांचा समतोल विकास झाला पाहिजे, यासाठीही येत्या काळात नियोजन केले जाईल. शिक्षण, क्रीडा, साफसफाई, दिवाबत्ती, रस्ते हे विषय महत्त्वाचे आहेतच, या संबंधींची कामे सुरू झाली आहेत. चौकांच्या सौंदर्यीकरणासाठी अनेक उद्योजक, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात प्रमुख चौकांचे रूप पालटलेले दिसेल. पुढच्या महिन्यात शाळा सुरू होत आहेत, तोपर्यंत सिटीबसचे नियोजन करण्याचा विचारही सुरू आहे. महापालिकेत निवडून आलेला प्रत्येक नगरसेवक वॉर्डाचा, शहराचा विकास करण्याचा विचार घेऊनच आला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्याच दृष्टीने त्यांना मदत करून येत्या काळात शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल. शहराच्या विकासासाठी जे जे करता येणे शक्य आहे, ते ते सर्व आम्ही सगळे मिळून करू. प्रत्येक कामात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. लोकसंख्या वाढत आहे तसा शहराचा विस्तारही होत आहे. विकास कामांचे नियोजन करताना याचाही विचार करावा लागणार आहे.' कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सीनिअर असिस्टंट एडिटर प्रमोद माने यांनी केले.

जी भूमिका 'मटा'ची, तीच आमची

शहराचा विकास हीच भूमिका 'महाराष्ट्र टाइम्स'ने मांडली आहे, असे सांगत महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले, 'निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकाची भूमिका शहराचा विकास हीच असते आणि असली पाहिजे. शहराचा विकास झाला पाहिजे, समस्या सुटल्या पाहिजेत अशी भूमिका 'मटा'ने मांडली आहे, आमची पण तीच भावना आहे. 'मटा'ने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून शहर विकासाच्या संबंधीच्या अडचणी सांगितल्या आणि त्यावर उपायही सुचविले, त्याबद्दल 'मटा'ला धन्यवाद दिले पाहिजेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुकीप्रकरण सायबर सेलकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुन्हेशाखेने पकडलेल्या ६ बुकींचा तपास शुक्रवारी सायबर सेलकडे सोपवण्यात आला. आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या लाइन बॉक्सचा आणि त्यावेळी सुरू असलेल्या २८ लाइनधारकांचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणातील परराज्यातील प्रमुख आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून आयपीएल ट्वेंटी-२० स्पर्धेवर सट्टा चालविणाऱ्या सहा जणांना अटक केली होती. या आरोपीमध्ये लाइन ऑपरेटर नरेश पोतलवाड याच्यासहीत बिल्डर अनिल मुनोत, उद्योजक विनय जैन, व्यापारी अलोक अग्रवाल, ललीत कोठारी तसेच प्रफुल्ल राठी याचा समावेश आहे. हे आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. ऑपरेटर नरेश पोतलवाड याच्या घरातून पोलिसांनी बेटिंगसाठी विशेष तयार करण्यात आलेला मोबाइल लाइन बॉक्स जप्त केला होता. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी २८ मोबाइलवर बेटिंगच्या लाइन सुरू होत्या. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी हा तपास सायबर सेलकडे सोपविला आहे. सट्टा चालवणारे २८ लाइनधारक कोण होते याचा सखोल तपास करण्यात येत आहे. दिल्ली, गुडगाव व हरीयाना येथील प्रमुख आरोपींच्या संपर्कात हे आरोपी होते. प्रमुख सूत्रधारांचा, पुढे लाइन चालविणाऱ्या बुकींचा देखील तपास सुरू आहे.

या प्रकरणात परराज्यातील काही प्रमुख आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना रवाना करण्यात आली आहे.

- अविनाश आघाव, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० हजारांसाठी बालिकेचे अपहरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

५० हजारांच्या खंडणीसाठी पाच वर्षांच्या बालिकेचे अपहरण केल्याचा प्रकार ‌गारखेडा भागातील विशालनगर येथे शुक्रवारी सायंकाळी घडला. ब्रिजवाडी परिसरात आरोपींनी बालिकेचे हातपाय बांधून जंगलात सोडले होते, मात्र नागरिक व सिडको एमआयडीसी पोलिसांनी तिची सुटका केली. यानंतर पोलिसांनी अवघ्या सात तासात आरोपीला अटक केली. हा तरूण व्होडाफोन कॉल सेंटरमध्ये नोकरीला आहे. मुख्य सूत्रधार असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार मात्र पसार झाला आहे.

सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक शुक्रवारी रात्री आठ वाजता एन १ भागात नाकाबंदी करीत होते. यावेळी दोन तरुणांनी त्यांना फोन करून ब्रिजवाडी येथील बेडसे कंपनीजवळील झुडुपात एका बालिकेला हातपाय, तोंडाला पट्टी बांधून फेकल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून या बालिक‌ेची सुटका केली. तिने तिचे स्नेहल नाव सांगितले. तिचे अपहरण झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. वायरलेसवर ही माहिती सर्वत्र देण्यात आली.

दरम्यान, या पोलिस ठाण्यातील कर्मचारी प्रमोद पवार यांच्या मोबाइलवर त्यांच्या रामचंद्र शिंदे नावाच्या परिचित व्यक्तीचा फोन आला. त्याने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली. पवार यानी त्याला वर्णन विचारले असता ते वर्णन स्नेहलशी मिळते जुळते होते. रामचंद्र शिंदे यांना माहिती देताच त्यांनी पोलिस ठाणे गाठले. स्नेहलला माहिती विचारली असता, आपल्याला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून दोघांनी सोबत नेल्याची माहिती तिने दिली.

दरम्यान, रामचंद्र शिंदे पोलिस ठाण्यात येत असताना त्यांच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे. तिच्या सुटकेसाठी ५० हजारांची खंडणी समोरील व्यक्तीने शिंदे यांना मागितली.‌ शिंदे यांनी त्याचे म्हणणे एकूण घेत ठाण्यात येऊन पोलिसांना ही माहिती दिली. समोरील व्यक्तीने पुन्हा शिंदे यांच्याशी संपर्क साधला. यादरम्यान पोलिसांनी प्लॅन आखला होता. अपहरणकर्त्यांना मुलगी ताब्यात असल्याची माहिती कळू न देता घाबरल्याचे नाटक करीत शिंदे यांनी खंडणी देण्याची तयारी दर्शवली. अपहरणकर्त्यांनी रात्री दोन वाजता मुख्य रेल्वे स्टेशनवर खंडणीची रक्कम घेऊन बोलावले. यावेळी पोलिसांनी सापळा रचून खंडणी स्वीकारताना आरोपी बळीराम गणेश राऊत (रा. जिंतूर) याला अटक केली. बळीरामने दिलेल्या माहितीवरून रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार संदीप राठोड उर्फ बिल्ला (रा. बाळापूर) हा या कटाचा सूत्रधार असल्याचे समोर आले. सचिन राठोड पसार झाला आहे. रामचंद्र शिंदे यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी या पीएसआय गोरख चव्हाण, अनिल वाघ, सायबरसेलचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी पार पाडली.

सात तासांत ऑपरेशन यशस्वी

आठच्या सुमारास स्नेहलची पोलिसांनी सुटका केली. त्यानंतर अपहरणकर्त्यांचे फोन येणे सुरू झाले. अपहरणकर्त्यांनी सुरुवातीला बन्सीलालनगरातील व्हिट्स हॉटेलनंतर किज हॉटेलपाशी खंडणी घेऊन बोलाविले होते. त्यानंतर त्यांनी ठिकाण बदलून एपीआय कॉर्नर तर, शेवटी रेल्वे स्टेशनला बोलाविले. या ठिकाणी बळीराम राऊत जाळ्यात सापडला. तो वोडाफोन कॉलसेंटरमध्ये कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचे लग्न रोखले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका १७ वर्षीय मुलीचे लग्न करमाड पोलिसांच्या कारवाईमुळे रोखण्यात यश मिळाले. करमाड येथे शनिवारी हा प्रकार घडला. मुलीचे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच लग्न करू, असे लेखी आश्वासन नियोजित वधू आणि वराकडील मंडळींनी दिल्यानंतर त्यांना समज देत सोडून देण्यात आले.

करमाड येथील महादेव मंदिरात एका १६ वर्षांच्या मुलीचा विवाह होणार आहे, अशी माहिती करमाड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांना मिळाली. त्याआधारे त्यांनी चौकशी केली असता ती मुलगी जळगाव जिल्ह्यातील आणि मुलगा (वय २२) हा करमाड येथील रहिवासी अाहे. मुलाच्या राहत्या घरीच वऱ्हाड मंडळींची लगीनघाई सुरू असल्याचे त्यांना समजले. त्याआधारे पोलिसांनी घटनास्थळी पोचले. त्यावेळी उपस्थित निवडक वऱ्हाडी मंडळीसाठी जेवण तयार करण्याचे काम सुरू होते.

पोलिस आल्याने दोन्ही बाजुच्या पाहुण्यांची गाळण उडाली. चौकशी केल्यानंतर नियोजित वधू अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी नियोजित वधू तसेच वराच्या पालकांसह त्यांच्या प्रमुख नातेवाईकांना पोलिस स्टेशनमधून आणले. अल्पवयीन मुला- मुलीचा विवाह लावणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगून दोन्ही बाजुच्या नातेवाईकांना पोलिसांनी समज दिली; तसेच त्यांचे समुपदेशन केले. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच लग्न करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती करमाड पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयभवानीनगरात ८ दुचाकी जाळल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगरातील तेरावी योजना भागात शनिवारी पहाटे अज्ञात माथेफिरूंनी आठ दुचाकी वाहने पेटविली. तत्पूर्वी दोन अज्ञात आरोपींनी एका नागरिकाला लुबाडून मारहाण केली. त्याचबरोबर एका किराणा दुकानचालकावर दगडफेक केली. त्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. बीड बायपास भागातून गुरुवारी चाकूचा धाक दाखवून पळविलेली अॅपे रिक्षाही चोरट्यांनी या परिसरात सोडून दिलेली आढळून आली. या घटनेमुळे नागरिकांत दहशत पसरली आहे.

तेरावी योजना परिसरातील एका गल्लीमध्ये ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गाड्या एका ठिकाणी उभ्या केल्या होत्या. आरोपीने पहाटे चारच्या सुमारास एका ठिकाणी उभ्या असलेल्या पाच दुचाकी आणि दुसऱ्या ठिकाणी उभ्या असलेल्या दोन दुचाकी पेटवून दिल्या. त्यावेळी झालेल्या आवाजामुळे नागरिकांना जाग आला. तोपर्यंत दुचाकी जळून मोठे नुकसान झाले होते. ही वाहने किशोर काशीनाथ पाटील, श्रीहरी प्रभाकर आंबेकर, राजेंद्र आसाराम मांडवगड, संजय आसाराम मांडवगड, शिरीष देशमुख, शंकर सूर्यवंशी आणि ज्योती सुनील कुलकर्णी यांची आहेत. हा प्रकार करण्यापूर्वी आरोपींनी घटनास्थळाच्या मागील बाजुला असलेल्या गल्लीत राहणारे दूध विक्रेते रामदास कांबळे यांची दुचाकी चोरून सुनील भागले यांच्या घरासमोर आणून पेटवून दिली. कांबळे यांनी दुचाकीचा बराच शोध घेतला. नंतर त्यांना त्यांची दुचाकी पेटविल्याचे समजले. घटनास्थळी पोलिस उपायुक्त संदीप आटुळे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, नाथा जाधव आदींनी भेट दिली. किशोर पाटील याच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांत दहशत

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत दहशत पसरली आहे. तेराव्या योजनेजवळच असलेल्या मैदानावर नेहमी तरूणांचे टोळके मद्यपान करीत बसतात. त्यांच्या धुडगूसामुळे नागरिक दुकाने लवकर बंद करतात. पोलिसांची या भागात गस्त नसते. या भागात पोलिस चौकी उभारण्याची मागणी नागरिकांनी या पूर्वीच केली आहे.

चोरलेली रिक्षा घटनास्थळी

प्रकाश भोसले (रा. हनुमाननगर) हा तरूण अॅपे रिक्षाचालक आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजता बीड बायपास भागातील सूर्या लॉन्सजवळ तो उभा होता. यावेळी तीन तरुणांनी त्याला कटरचा धाक दाखवत मारहाण केली व रिक्षा पळवून नेली. शुक्रवारी सकाळी दुचाकी जाळण्यात आलेल्या परिसरात ही रिक्षा पोलिसांना आढळून आली. या तिन्ही प्रकरणातील आरोपी एकच असल्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे.

तरुणाला लुबाडले

गुरुवारी रात्रीपासून या भागात अज्ञात आरोपींकडून धुडगूस सुरू आहे. सचिन किराणा स्टोअर्सचे मालक नेताजी शंकरराव मुळे रात्री साडेदहा वाजता दुकानाबाहेर उभे होते. यावेळी समोरून दोन तरुणांनी कारण नसताना त्यांच्यावर दगडफेक केली. त्यात ते जखमी झाले. नंतर हे तरूण पळून गेले. रात्री सव्वाअकराच्या सुमारास अरूइ निळकंठ हा तरूण पायी जात होता. यावेळी त्याला तिघांनी अडवून मारहाण केली व त्याच्या खिशातील सहाशे रुपये काढून घेतले.

मी दुकानाबाहेर उभा होतो. अचानक समोरून दोन तरूण धावत आले. त्यापैकी एक तरूण या भागात नेहमी दिसतो. त्याला पाहिल्यावर ओळखू शकतो. काही कारण नसताना त्यांनी माझ्यावर दगडफेक केली. मानेला व पोटाला मार लागला आहे.

- नेताजी मुळे, जखमी दुकानमालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलेक्टर जेव्हा रेल्वेने येतात...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबईहून औरंगाबादला येण्यासाठी विमानाचा पर्याय उपलब्ध असताना, नवनियुक्त जिल्हाधिकारी रेल्वेने प्रवास करत शहरात दाखल झाले. जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारतानाच, जिल्ह्यात काम करताना जनसेवेलाच प्रथम प्राधान्य देणार असल्याचे ‌त्यांनी सांगितले.

वीरेंद्र सिंह दुपारी एक वाजता तपोवन एक्स्प्रेसने औरंगाबाद रेल्वेस्थानकावर आले. सर्वसामान्य प्रवाशांमधून वाट काढत ते रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर वीरेंद्र सिंह यांनी काही वेळ सुभेदारी विश्रामगृहावर थांबून विभागीय आयुक्तालयात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या सत्काराला हजेरी लावली. या कार्यक्रमामध्येही कर्मचाऱ्यांमध्ये नवीन जिल्हाधिकारी रेल्वेने आले, हाच चर्चेचा विषय होता.

दरम्यान, सायंकाळी साडेपाच वाजता विक्रम कुमार यांच्याकडून वीरेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. 'मी वीरेंद्र सिंह यांना यापूर्वी सिंधुदुर्ग येथेही पदभार दिला होता. आता पुन्हा एकदा पदभार देत आहे. ते माझे चांगले मित्र असून, जिल्ह्यात काम करण्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत,' असे सांगत विक्रम कुमार यांनी वीरेंद्र सिंह यांच्याकडे सूत्रे दिली. वीरेंद्रसिंह म्हणाले, 'मी बीडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे मला औरंगाबाद नवीन नाही. विक्रम कुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगले काम केले असून अशाच पद्धतीने काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, 'व्हिजन २०२०' आधार घेणार आहे.' या वेळी महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

रेल्वेने औरंगाबादला येण्याचे विशेष असे काही कारण नाही. मला रेल्वेने येणेच जास्त सोयीचे होते. मी रेल्वेच्या प्रवासाचा आनंद घेतला. सर्वप्रथम जिल्ह्याची ओळख तसेच जिल्ह्याचे महत्त्वाचे प्रश्न समजून घेणार आहे. जनतेसाठी व जनसेवेसाठीच आमचे काम असल्यामुळे, काम करताना सर्वप्रथम जनतेलाच प्राधान्य असेल.

- वीरेंद्र सिंह, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळी पिवळीच्या आंदोलनाला रामदास आठवलेंचा पाठिंबा

$
0
0

औरंगाबाद : काळी पिवळी टॅक्सीला शहरात येण्यासाठी बंदीचा निर्णय परत घ्यावा या मागणीसाठी मराठवाडा टॅक्सी, मेटाडोर अॅण्ड जिप ओनर्स असोसिऐशनच्या वतीने विभागीय आयुक्तालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनकर्त्यांना खासदार रामदास आठवले यांनी भेट दिली. काळी पिवळीमुळे वाहतुकीची कोंडी होत नसेल तर प्रवेश बंदीचा निर्णय लागू करणे योग्य नाही. पोलिस आयुक्तांची भेट घेऊन या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले. या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी असोसिऐशनचे अध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय, इम्राज सिराज पठाण, शेख रफिक, शेख खाजर, अमर राजेंदसिंग हाक, काजी नईम आदींची उपस्थिती होती.

तिघांची प्रकृती खालावली

दरम्यान, या आंदोलनातील तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मराठवाडा टँक्सी युनियनच्या वतीने देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूजला जलवाहिनीसाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूज महानगरासाठी ११० एमएलडी क्षमतेची स्वतंत्र पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी योजनेसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी दिली. वाळूज महानगर पर्यावरणपूरक व्हावे यासाठी शेतकरी, बिल्डर्स आणि सिडको एकमेकांच्या सहकार्याने प्रयत्न करतील, असेही ते म्हणाले. क्रेडाई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर उद्योगभवन येथे गुरुवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. वाळूज महानगर प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती बिल्डर्स प्रतिनिधींना व्हावा, यासाठी या बैठकीचे आयोजन सिडको प्रशासनातर्फे करण्यात आले होते.

पैठण रोड व अहमदनगर रोड यामधील भागात औरंगाबाद शहरलगतचे दुसरे सर्वार्थाने समृद्ध शहर वसविण्याचा सिडकोचा प्रयत्न असल्याचे मुख्य प्रशासक केंद्रेकर यांनी सांगितले. येथील अंतर्गत रस्ते किमान बारा मीटरचे असणार आहेत. पैठण रोडवरून गोलवाडी टेकडीमार्गे नगररोडवर निघणारा तसेच शेतकी शाळेजवळून नगर चार भागातून नगर दोनला जोडणारा रस्ता हा १८ मीटरचा राहील. मोठ्या लेआऊटच्या बाजूला पार्किंगसाठी सुसज्ज व्यवस्था असेल आणि या नवीन शहरातील दोन लाख लोकसंख्येसाठी ११० एमएलडी क्षमतेच्या स्वंतत्र जलवाहिनी व्यवस्थेसाठी सिडको प्रयत्नशील आहे, असे केंद्रेकर म्हणाले.

वाळूज महानगरचा विकास आराखडाही आकार घेत असून यासंदर्भात बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या योजना तयार करताना वृक्षारोपण तसेच घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. क्रेडाईचे विकास चौधरी, देवानंद कोटगिरे, महावीर ललवाणी, राजेंद्र देसरडा, अनिल जैन, सुनील भारुका, निलकंठ नागपाल, नंदकुमार तावडे, नीलेश अग्रवाल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणे हटविण्याचा BSNL ला फटका

$
0
0

म .टा. प्रतिनिधी, वाळूज

पंढरपूर महामार्गालगत असलेली अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे अतिक्रमण काढताना बीएसएनएलचे कनेक्श्न तुटल्याने या परिसरातील सेवा विस्कळीत झाली आहे. याचा मोठा फटका दूरध्वनी धारकांसहित इंटरनेट वापरणाऱ्यांनाही बसला आहे.

औरंगाबाद-नगर महामार्गावर पंढरपूर येथे वाढत असलेली अतिक्रमणे गेल्या दोन दिवसांपासून हटविण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. त्यात कालपर्यंत जवळपास २० मालमत्ता हटविण्यात आल्या आहेत. आज सुटीच्या दिवशी काही मालमत्ताधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली. पंढरपूर परिसरातील सर्वच अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याने आणखी काही दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे.

दरम्यान, काल (१६ मे) काही मालमत्ता हटविण्याचे काम अतिक्रमण हटाव पथकाने केले. त्यावेळी बीएलएनएनचे कनेक्श्न काही ठिकाणी खंडित झाले. त्यामुळे पंढरपूर परिसरात अनेकांचे दूरध्वनी बंद पडले. याशिवाय इंटरनेटसेवाही बंद पडली. इंटरनेटवर काम करणाऱ्यांच्या रोजच्या कामकाजावर कामकाजावर त्याचा परिणाम होत असून ही सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा तरी पाऊस तारणार का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ९३ टक्के पर्जन्यमानाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला आहे. निश्चित पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक पद्धती बदलावी, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. तसेच उत्पादन खर्च कमी करण्याबाबत काही उपाययोजना सूचविल्या आहेत.

तीन वर्षांपासून पाऊस लांबणीवर पडत असल्यामुळे खरीप पिकांची लागवड होत नाही. याचा कडधान्य पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यंदा निश्चित पर्जन्यमान असल्यामुळे कमी उत्पादन खर्च, पीक पद्धतीत बदल आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी उपाययोजना सांगितल्या आहेत. मूग व उडीद ही डाळवर्गीय पिके लवकर पेरल्यास त्यावर रब्बी ज्वारी किंवा हरभरा ही पिके भारी जमिनीत कोरडवाहू शेतीत घेणे शक्य आहे. गेल्या काही वर्षांपासून मृग नक्षत्रात पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकरी मूग पेरणी टाळतात. मूग कमी कालावधीचे आणि जमिनीची सुपिकता वाढवणारे पीक आहे. हवेतील मुक्त नत्र आपल्या मुळावरील गाठीत साठवून मूग पीक हंगामासाठी उपलब्ध करते. बदलते हवामान शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान आहे.

पावसाचे आगमन आणि परतीचा पाऊस यांचे वेळापत्रक अनिश्चित आहे. या परिस्थितीत खरीप हंगामाच्या तयारीबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे. खरीपाच्या पेरणीसाठी जेमतेम पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे नांगरणी, मोगडणी, शेणखत पसरविणे, पाल्या तोडणे, खोड काढणे ही पूर्वमशागतीची कामे मे महिन्यातच पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यात पूर्वमशागतीची कामे वेगात सुरू आहे. ही कामे वेळेत आटोपली, तर पडलेल्या पावसाचे पाणी जागच्या जागी जमिनीत मुरते. त्यामुळे ओलावा वाढून पेरलेली पिके रुजण्यास फायदा होतो. यावर्षी पावसाच्या अंदाज पाहता जमिनीच्या खोलीनुसार पिके घेणे गरजेचे आहे.

हलक्या ते मध्यम जमिनीत बाजरीचे पीक घेणे गरजेचे आहे. बदलते हवामान विचारात घेता त्याचा काही प्रमाणात उपयोग खरीप पीक व्यवस्थापनासाठी करावा, असे आवाहन कृषी शास्त्रज्ञांनी केले आहे. तूर आणि कापूस या पिकांचा तुलनात्मक उत्पादन खर्च लक्षात घेतल्यास तुरीचा खर्च कमी आहे. भारी जमिनीत पाणी देण्याची सोय असल्यास शेतकऱ्यांनी 'बीएसएमआर ७३६' किंवा 'बीएसएमआर ८५३' या वाणांची निवड करावी. हा वाण मर व वांझ रोगप्रतिकारक आहे. मध्यम ते हलक्या जमिनीत कृषी शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने वाणाची निवड करावी. एकच पीक वारंवार घेतल्याने उत्पादनात घट होते. त्यामुळे जमिनीचा फेरपालट आवश्यक आहे. मका आणि बीटी कापूस वारंवार घेतल्यास जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामात पीक बदल करणे आवश्यक आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

अर्थकारणावर परिणाम

मागील हंगामात पाऊस गायब झाल्यानंतर सर्वाधिक फटका कापूस पिकाला बसला. कापसाचे उत्पादन नगण्य झाल्याने शेतीचे अर्थकारण विस्कळीत झाले आहे. एकरी एक ते दीड क्विंटल कापूस उत्पादन झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. या संकटातून मार्ग काढण्यासाठी शास्त्रज्ञांनी बहुपीक पद्धतीचा उपाय सूचवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images