Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रमोशनच्या संधी द्या निम्या-निम्या

$
0
0
नायब तहसीलदार पदावर प्रमोशनसाठी मंडळ अधिकारी आणि अव्वल कारकून या दोन्ही संवर्गांना समान संधी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने महसूलमंत्र्यांकडे केली आहे.

महसूल कर्मचा-यांचा संप सुरू

$
0
0
नायब तहसीलदारपदी प्रमोशन देण्यासाठी अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी यांचे सरकारने निश्चित केलेल्या प्रमाणाच्या विरोधात महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी बेमुदत संपाला शुक्रवारपासून (१६ ऑगस्ट) सुरुवात करण्यात आली.

खुलताबादमधील महसूल कर्मचारी संघटनेचा संप

$
0
0
महसूल कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. बेमुदत संपाचा परिणाम ग्रामीण भागातून आलेल्या जनतेच्या कामावर झाला.

पैठणमधील कर्मचारी सहभागी

$
0
0
अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्या नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीच्या मराठवाडा विभागातील प्रमाण २.१ ऐवजी ३.१ निश्चित करावे या प्रमुख व अन्य मागण्यासाठी पैठण तालुका महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली.

सोने चांदी महागले

$
0
0
शेअर्स मार्केट तसेच डॉलरच्या तुलनेते रुपयांची झालेल्या घसरणीमुळे सोने - चांदीचे भाव चांगले वधारले आहे, एक दिवसात सोन्याचे भाव प्रति तोळ्यास १४०० रुपयांनी वाढले असून चांदी (प्रति किलो साठी) दहा हजार रुपयांनी महाग झाली आहे, अशी माहिती सराफा व्यापारी नम्रता पुणेकर यांनी दिली.

वन विभागाची भरती सुरू

$
0
0
वन विभागातील वन रक्षक, ड्रायव्हर आणि अन्य पदासाठी गारखेडा येथील क्रीडा संकुलात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. भरतीच्या पहिल्या दिवशी एकुण २२०० लाभार्थीं सकाळी ही लाभार्थी गारखेडा क्रीडा संकुलासमोर जमा झाले होते.

सुरेश जैन यांची फेर उलटतपासणी

$
0
0
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या बदनामीकारक वक्तव्याविरुद्ध आमदार सुरेश जैन यांनी जळगावच्या कोर्टात दावा दाखल केला आहे.

स्लो डाउनचा फटका जालन्यात स्टील उद्योगांना

$
0
0
स्टील उद्योगात वेगळा ठसा उमटविणाऱ्या जालन्यातील कारखानादारांना स्लो डाउनचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. फारशी मागणी नसल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून एक शिफ्ट बंद करण्यात आली आहे, अशी माहिती येथील स्टील उद्योजकांनी दिली.

‘बहिःस्थ’चे शुल्क केले कमी

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बहिःस्थ शिक्षण अभ्यासक्रमांच्या शुल्कामध्ये केलेली वाढ शुक्रवारी काहीअंशी कमी केली आहे.

देवकीनंदन दहीहंडीचे पारितोषिक सात लाख

$
0
0
गुलमंडी येथील देवकीनंदन दहीहंडी महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुभाष कच्छवाहची निवड करण्यात आली आहे. अष्टविनायक गणेश मंडळ व आमदार प्रदीप जैस्वाल मित्र मंडळाच्या वतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

शस्त्रक्रियेने रूग्णांना जगण्याचा आधार

$
0
0
मानेच्या मणक्यांला इजा झाल्यामुळे तीन रूग्णांचे पाय कमरेपासून निकामी झाले होते. या रूग्णांवर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करीत त्यांना सिटीकेअर हॉस्पिटलने जगण्याचा आधार दिला आहे.

आमदार मेटेंच्या विरोधात घोषणाबाजी

$
0
0
मराठा आरक्षण प्रश्नी आमदार विनायक मेटे केवळ दिशाभूल करण्याचे काम करत आहे, असा आरोप आरोप अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेसह अन्य काही संघटनांनी करत त्यांच्या विरोधात शुक्रवारी सायंकाळी जोरदार निदर्शने केली.

‘अजिंठा हिल्स फार्म’ प्लॉट विक्री सुरू

$
0
0
एनडी कन्सल्टंट अँड डेव्हलपर्सच्या अजिंठा हिल्स फार्म प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी (१५ ऑगस्ट) करण्यात आले. पहिल्याच दिवशी प्रकल्पातील साठ टक्के प्लॉटची विक्री पूर्ण झाली आहे.

‘वेगळ्या देवगिरी’साठी आंदोलन

$
0
0
मराठवाड्यासह शेजारील बुलढाणा, नंदूरबार, धुळे व जळगाव अशा बारा जिल्ह्याचा समावेश करुन वेगळ्या देवगिरी राज्याची निर्मिती करण्यात यावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीने शुक्रवारी पैठण गेट येथे धरणे आंदोलन केले.

पोलिस अधिकाऱ्यांची कार्यशाळा

$
0
0
गेल्या पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या तसेच, अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिस आयुक्तालयात सहा जिल्ह्यांतील पोलिस अधिकाऱ्यांची कार्यशाळा शुक्रवारी घेण्यात आली.

आज ‘खिचडी’ ‌शिजलीच नाही

$
0
0
शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारे मध्यान्न भोजन आज अनेक शाळांमध्ये शिजले नाही. मुख्याध्यापकांना योजनेतील जबाबदारीतून मुक्त करा, या मागणीसाठी मुख्याध्यापक संघाने योजनेवर बहिष्कार टाकला असून पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये खिचडी शिजली नाही.

युतीचे सदस्य सहलीवर

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीतील विसंवाद टाळून एकोपा निर्माण करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार विनोद घोसाळकर हे शहरात दाखल झाले आहेत.

तीन नीलगाईंचा मृत्यू

$
0
0
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात मागील तीन दिवसांत अचानक तीन नीलगाई मरण पावल्याची घटना घडली. अचानक तीन नीलगाई मरण्याचीही ही पहिली घटना असून या नीलगाईंचा मृत्यू हा संसर्गजन्य रोगामुळे झाल्याची माहिती काही सूत्रांनी दिली.

स्वातंत्र्यदिन उत्साहात

$
0
0
भारतीय स्वातंत्र्याचा ६६ वा वर्धापन दिन शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संस्था, संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्यदिनी काळे झेंडे

$
0
0
विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न निदर्शकांनी केला. पोलिसांनी वेळीच ६० निदर्शकांना ताब्यात घेतले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>